World Kitchen garden Day..
गच्चीवरची बाग नाशिक मधे गेल्या आठ वर्षापासून सातत्याने पर्यावरण संवर्धनात काम करत आहे. Grow, Guide, and Build, Products Sale & Services या पाच प्रकारची कार्यक्षेत्र लक्षात घेवून लोकांना प्रयोग, प्रशिक्षण, प्रकल्प, सेवा व साहित्य उपलब्ध करून दिले आहे. ही संपूर्ण प्रक्रियेचा कणा हा गारेबज टू गार्डेन असा आहे. कमीत कमी मातीत घरातील व बागेतील कचर्याचे सृजनशील व्यवस्थापन करत विषमुक्त भाजीपाला पिकवण्याचे काम अविरत करत आहोत.
मार्गर्दशनाचा भाग म्हणून lock downच्या काळात Lock down Inspiration Film Making या स्पर्धेचे आयोजन केले होते. यात जवळपास ५०० लोकांनी सहभाग नोंदवला होता. ज्यांनी सहभाग घेतला त्यातील काही निवडक दोन कुटुंबाची यात निवड झाली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत महिला प्रतिनिधीचा समावेश होता.
या स्पर्धेत एक प्रथम क्रमांक विजेता व उत्तेजनार्थ विजेता असे दोनच क्रमवारी ठरली होती पण.. आमच्या हाती आलेल्या माहितीपटातून दोनही स्पर्धेकांना संयुक्त पध्दतीने प्रथम क्रंमाकाचे विजेता घोषीत करावे लागले. कारण दोघीचा सहभाग, त्यासाठी घेतलेले कष्ट, वय, आवड यांचा विचार करता त्यांच्यात उत्तेजनार्थ ठरवणे फार अवघड होते.
प्रथम क्रंमाकाचे संयुक्त विजेते हे नित्या पाटील, नाशिक व अनुष्का कशाळकर, नाशिक असे आहेत.
यांनी बनवलेला माहितीपटाची लिंक सोबत देत आहोतच…
अनुष्का कशाळकर ही दहावीची विद्यार्थीनी. आई बांबाना शेतीची, निसर्गाची पूर्वीपासूनची आवड. शासकीय कामानिमित्त अगदी जंगलाच्या सहवासात झाडं, झुडपे, फुलात रमलेले हे कुटुंब. पण शहरात आल्यावर झाडांशिवाय कसे राहणार? जागा आहेच कुठे.. अरूंद रस्ते.. उंच उंच ईमारती त्यांच्यामुळे आहे त्या अंगणात पुरेसा प्रकाशही येत नाही. मग पर्याय गच्चीचाच… त्याच्या तनूजा ही आनंद निकेतन या प्रयोगशील शाळेची कृतीशील व उत्साही विद्यार्थिनी.. तर तनुजा व कुटुंब निसर्गाचा आनंद तर घेत आहेतच शिवाय चविष्ट, रसदार, अशा विषमुक्त भाज्यांचेही उत्पादन घेत आहेत.
तर नित्या पाटील ही सहावीची विद्यार्थिनी. दोघेही पालक वैदयकिय सेवेत कार्यरत आहेत. नित्या ही सिंब्वायसिस या शाळेची विद्यार्थीनी. मितभाषी, उत्सुक. विविध उपक्रमात सहभागी होणारी, निसर्गासोबत रमणारी, त्यातील किटकांचा अभ्यास करणारी. आजूबाजूच्या प्रश्नांची जाण, त्यामुळे ती वयाच्या पाचव्या वर्षापासून फटाके फोडत नाही. कारण त्यामुळे आपल्या भूमातेचे संरक्षण होते. तिन नुकतच HOMI BHABHA YOUNG SCIENTIST EXAM उत्तीर्ण झाली. त्याल तिला चांदीचे पदक देवून गौरवण्यात आले ..
तिने या परिक्षेत शहरी शेतीचा अभ्यास केला होता. त्यासाठी गच्चीवरची बाग, नाशिक ची निवड केली. तिने प्रकल्प संशोधन केले. त्यातूनच तिने काही घरी प्रयोग केले, त्यातून तिला बागेची आवड निर्माण झाली व गच्चीवर तिनेही बाग फुलवली…
या स्पर्धेत विजेत्यांना काय देणार हे गुलदस्त्यात असूनही त्यांनी सहभाग घेतला याचे कौतुक वाटते. बरेचदा मंडळी काय व किती मिळतयं यावर सहभाग अंबलबून असतो. पण Lockdown Inspiration Film Making स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतलाच पण त्यांच्या कुटुंबियांनीही त्यांना भक्कम पाठबळ दिले. त्यांना गच्चीवरची बाग तर्फे सलाम… गच्चीवर बाग फुलवून निसर्गाजवळ जाण्याचा, त्याला समजून घेण्याच्या या प्रयत्नात आपण सर्वेच सहभागी झाला या बदद्ल धन्यवाद मांडतो. विजेत्यांना त्याचे बक्षीस लवकरच देण्यात येईल… अशा रितीने WORLD KITCHEN GARDEN DAY संपन्न केला.