Site icon Gacchivarchi Baug : Grow Organic

जागतिक परसबाग दिन २०२१

Advertisements

world kitchen Garden Day by गच्चीवरची बाग, नाशिक.

दर वर्षाच्या ऑगस्ट महिण्यातील चौथा रविवार हा जागतिक परसबाग दिन म्हणून साजरा केला जातो. #world_kitchen_Day या दिवसाचे महत्व आहे. या वर्षी हा दिवस २२ ऑगस्ट २०२१ रोजी आला आहे. विकसनशील देशात व मुखत्वे अविकसीत देशात कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. अन्नाच्या अभावाने होणारे कुपोषण व त्यातून ओढवणारे मृत्यू ही भयावह बाब आहेच. पण यात मुखत्वे महिला, मुली व लहान मुलं ही त्यास बळी पडतात. त्यांना आपल्या हक्काच्या जागेत आपले स्वतःचे पोषण मुल्य असलेले फळे भाज्या उगवणे हे शिकवणं, त्यासाठी प्रेरीत करणेसाठी विकसीत देश धर्मदाय संस्थाच्या मधस्थीने समूह कार्यक्रम राबवले जातात. आपले अन्न आपण उगवू शकतो हा संदेश व विश्वास जगभर पोहचवण्यासाठीच हा दिवस साजरा केला जातो.

पूर्वी जंगल होती. शेतात, गावकुसाबाहेर चिंच, बोरं, आंबा अशा फळांची झाडं असायची. भूक लागली की मुलं त्यावर भूक भागवायचे. काही अंशी का होईना योग्य ते पोषण मिळाल्यामुळे अन्नाच्या कुपोभूक आवरली जायची. पण आधुनिकीकरणामुळे जंगलं, शेती संपत चालली. छोट्या छोट्या सुखापुढे झाडांचाही बळी दिला गेला. पण आपण एका अन्नाच्या स्त्रोतांला कधी मुकलो हे कळलेच नाही. तसेच शेतात वाढत्या रसायनामुळे अन्नाची मुबलकता वाढली पण ती क्रयशक्ती असलेल्या लोकांपुरतीच मर्यादीत राहिली. खरे तर तेथेही कुपोषण आहे. त्यामुळे अन्नाच्या अभवामुळे खेडेगावात व अन्नाच्या स्वभावामुळे शहरात कुपोषण आहे. हे पहिल्यांदा सर्वांनी मान्य केलं पाहिजे. त्यामुळे आज अविकसीत अविकसनशील देशच नव्हे विकसीत देशातही जागतिक परसबागदिन साजरा करण्याची गरज आहे. म्हणून हा लेख आपल्या ग्रामिण व शहरी वाचकांसाठी देत आहोत.

पूर्वी आजच्या सारखी यांत्रिक शेती नव्हती. त्यामुळे शेतात पिकले जाणारी धान्य, कडधान्य हाच काय तो बाजारातील देवाण घेवाणीचा व्यवहार होता. भाज्या या ज्याच्या त्याच्या शेतात, घरच्यापुरता पिकवल्या जायच्या किंवा परसबागेत पिकवल्या जायच्या. पण जसे जसे यांत्रिक पध्दतीने भाज्या पिकवू लागले तसे तसे त्यास स्थानिक व परदेशी बाजारापेठेत निर्यात व आयात होवू लागले. खाणार्या तोंडाना अन्न पुरावे म्हणून रसायनांच्या वॅगन्स मातीत ओतल्या गेल्या. पण यात खाणार्यांच व शेतकर्यांचं हितापेक्षा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळण्यासाठीच रासायनिक शेती आणली गेली यात तिळमात्र शंका नाही. आज देशात पंजाबात कॅन्सर ट्रेन चालते आहे तर कोल्हापुरात कॅन्सर ट्रेन सुरू होण्याच्या मार्गावर आहे. रसायनाच्या वाढत्या वापरामुळे जल, जंगल, जमीन, जनावरे व जन ही तरी प्रदुर्षीत झालीच पण जमीरसुध्दा नासला गेला याचं भान आता उरलं नाहीय.

हे सारं ताळ्यावर आणणं शक्य नाही. जो विध्वंस व्हायचा तो आता आपल्या कतृत्वाने होणारचं आहे. पण काही पर्यावरणीय उपाय, सवयी, लावून घेतल्या तर त्याच्या प्रखरतेची तिव्रता काही अंशी कमी करता येईल हे मात्र नक्की… तर काय आहेत उपाय….

जागतिक परसबाग दिनाचे औचित्य साधत गेल्या सहा वर्षापूर्वी गच्चीवरची बाग, नाशिक या उपक्रमाची गुढी नाशिक शहरात उभारली होती. ही गुढी आता अनेकाच्या गच्च्यावर दिसू लागली आहे. केवळ रसायनमुक्त भाज्या पिवकवणे एवढाच हेतू नाही तर पालापाचोळयाचे, किचन वेस्टचे व्यवस्थापनातून भाज्यांची बाग फुलवली जाते. अर्थात परदेशात कंपोस्टींग केले जाते. आपल्याकडे त्याची उपयुक्ता जाणवून द्यावी लागते. पण गच्चीवरची बाग,नाशिक या उपक्रमाने कचरा व्यवस्थापन व बाग फुलवणे यांची मोठ्या कौशल्याने परस्परपुरक बांधणी करत गारबेज टू गार्डेन ही संकल्पना रूजवत आहे.

अगदी कुंड्या भरण्यापासून ते टेरेसवर व जमीनीवर वाफे बनवण्यापर्यत ८० टक्के सुका, जैविक कचर्याचा वापर केला जातो व माती मिश्श्रीत खताचा २० टक्के वापर केला जातो. ८० टक्के सुका जैविक कचर्यात पानझड झालेला पालोपाचोळा, सुकवलेले किचन वेस्ट, खरकट्या पाण्याचा वापर, कंपोस्टीग करण्याचे गरजेनुसार, जागेच्या उपलब्धतेनुसार विविध घरच्या घरी बनवता येणारे सहज सोपे प्रयोग केले आहे.

घरच्या भाज्या खाण्यातून अनेक प्रकारचे फायदे होतांना दिसत आहेत. बाजारापेक्षा चवदार व पोषक भाज्या तर मिळतातच. त्यांच्या सेवनाने पोषक घटक पुरवले गेल्यामुळे शरिर व मनाचे संतुलन घडून येते. तसेच आहारातील बेकरीचे मैदाचे पदार्थ, चहातील साखर, जेवणातील मीट, मासांहार, तेलाचा वापर, दूध हा कमी कमी होत जात तो नंतर नकोसा वाटतो. कारण ही सारी आज रसायनावर पोसली जातात. जी आज आरोग्यासाठी घातक ठरताहेत. घरच्या भाज्या खाण्याची चव लागली ही वरील घटकांबद्दल आपोआपच नऑशिया तयार होतो. व बाजारातील भाज्याही नकोशा होतात. असा हा प्रवास लोकांनी अनुभवावा म्हणून गच्चीवरची बाग,नाशिक प्रयत्न करत आहे. या उपक्रम महाराष्ट्रातील इच्छुकांपर्यंत पोहचावा यासाठी सोशल मिडीयावर निशुल्क मार्गदर्शन केले जाते. दोनही संकेत स्थळांवर रसायनमुक्त भाज्या निर्मीतीसाठी माहितीपट व लेख नियमीत पणे प्रकाशीत केले जातात. त्याचा इच्छुकांनी उपयोग करावा. तसेच बागेला भेट देवून पर्यावरण विषयक चाललेले प्रयत्न प्रत्यक्ष प्रयोगातून, चर्चेतून जाणून घेवू शकता.

www.gacchivarchibaug.in

www.organic_vegetable_terrace_garden.com

लेख आपण आपल्या वर्तमान पत्रासाठी प्रकाशीत करू शकता.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

8087475242 / 9850569644

Exit mobile version