Site icon Grow Organic

Yellow Sticks Pad

Advertisements

Yellow Sticks Pad

बाग फुलवतांना अनेक प्रकारची कीड येत असते. अगदी डोळे बारिक करून पाहिले तर दिसू शकेन अशा फळमाशा सुध्दा येतात. त्या तर लहान असतांनाच फळामधे शिरतात. व आत जावून फळ पोखरतात. अशा सुक्ष्म कीडीचा वावर हा दूरवर असतो. आपण मारलेल्या औषधांचाही प्रभाव संपून जातो. त्यावेळात ते त्यांचा कार्यभाग उरकतात. अशा वेळेस त्यांना नियंत्रीत करण्यासाठी  Yellow Sticks Pad ( पिवळ्या रंगाचे चिकट सापळे) वापरले जातात. यांना फळमाशी, चिटले. माशा सुध्दा चिकटतात व कीडीचे वेळीच नियंत्रीत होते. या प्रकारचे चिकट सापळे म्हणजे प्लास्टिकच्या कोरोगेटेड शिटला दोनही बाजूने चिकट द्राव्य लावलेले असतात. त्यांनी एका टोकाला छिद्र पाडून दोरीने बांधावी म्हणजे हवे बरोबर ते हलत असतात. पिवळा रंग कीडीना आकर्षीत करतो त्यामुळे त्यावर चिटकून बसतात.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक

Exit mobile version