8 Type Of Multipal Inteligence
मल्टीपल इंटेलिजन्स व गार्डेनिंग
Multipal Inteligence बहुआयामी बुध्दीमत्ता व बागकाम या विषयावर ऑनलाईन सेशन संपन्न झाले आहे. हा विषय नेमका काय आहे. कसा आहे. हे जाणून घेण्यासाठी हा लेख प्रपंच, अर्थात दीड तासाच्या ऑनलाईन सेशन मधे या ही पेक्षा अधिक मुद्दयावर चर्चा केलेली आहे. तेंव्हा तो व्हिडीओ डॅशबोर्डवर पहायला विसरू नका. संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
- 👉 तुम्ही अजूनही केमिकल भाज्या खात आहात का?
- 👉 योग्य system नसल्यामुळे तुम्ही अडकले आहात का?
- 👉 तुमचं स्वतःचं garden असावं असं वाटतंय का?
- 👉 7 दिवसांत सुरुवात झाली तर तयार आहात का?

Table of Contents
बहुआयामी बुध्दीमत्ता Multipal Inteligence
खरं तर अशा प्रत्येक बुध्दीमत्तेचा एकमेंकाशी जोडण्याचे किंबहुना प्रामुख्याने गुफंण्याचे काम पर्यावरणीय बुद्धीमत्ता ही ठळकपणे करत असते. थोडक्यात पर्यावरणीय बुध्दीमत्तेत सर्वच बुध्दीमत्तां प्रतिबिंब दिसून येते. त्यामुळे पर्यावरणीय बुध्दीमत्ता ही सर्वच बुध्दीमत्तेची जननी आहे. असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण माणूस हा प्राणी पर्यावरणातूनच जन्माला आला आहे. त्यामुळे ही बुध्दीमत्ता ग्राह धरावी का असाही एक वाद संशोधकामधे आहे. असो पण ही बुद्धीमत्ता Multipal Inteligence फुलवण्यासाठी गच्चीवरची बाग ही संकल्पना मदतगार ठरत आहे. हे लक्षात येते. येथे मुख्य मुद्दा येतो तो म्हणजे या समाजातील विविध वयोगटातील व्यक्तिसाठी गच्चीवरची बाग कशा रितीने महत्वाची आहे. किंबहुना तिची भविष्यातील गरज ही ठळकपणे अधोरेखीत करण्याचा प्रयत्न या लेखातून करत आहोत. समाजातील व्यक्तिचे खालील प्रमाणे वयोगट केल्यास त्यातून पर्यावरण विषयक आवडी निवडी, त्यातून येणारे वर्तन आपल्याला जाणवू लागते.
वयोगटः ६ ते १२, १३ ते १७, १८ ते २४, २५ ते ३४, ३५ ते ४४, ४५ ते ५४, ५५ ते ६४, ६५ ते पुढे
६ ते १२ : या वयोगटातील मुलं मुली ही उत्साही असतात. एका ठिकाणी बसणं तसं अशक्य असतं. यांना कोणत्यातरी गोष्टी सातत्याने हाताळून पहाव्याशा वाटतात. रंगी बेरंगी फुलं, फुलपाखरं तसेच पाण्याच्या फवार्या सोबत, पाण्यात, मातीत, चिखलात खेळावसं वाटतं. यांना या वयोगगटात जर आपण आपल्या बागकामात सहभागी करून घेतलं तर ते त्याच्याशी फॅमीलिअर होतात. त्यांना आपल्या आजूबाजूला घडणार्या अनेक घटनांबद्दल कुतुहल असतं. बिज कसं रुजत, ते कसं मोठ होते. हे त्यांना करून बघायचं असतं. असं बरच काही .. या आवडीला त्यानां पालकांनी, शिक्षकांनी जपू द्यावं. कदाचीत ते निसर्गाची चित्र सुध्दा काढतील. त्यातील प्राण्याच्या गोष्टी त्यांना आवडतील असं बरच काही या पर्यावरण बुद्याकांत येतं. त्यांना पालक म्हणून संधी द्या. हे विविध वयोगटातील पालक त्यांचे आईबाबा, ताई दादा, शिक्षक, आजी आजोबा कुणीही असू शकतं. त्यांना बागेत काम करतांना सहभागी करून घ्या. पालेभाजी, फळभाज्या, वेलवर्गीय, कंदमुळे, फुलझाडे याच्यांशी त्यांची ओळख करून द्या. मुख्य म्हणजे या वयोगटात त्यांना निसर्गाशी तोंडओळख करून देणे, त्यांच्या ढोबळ संकल्पना समजावून सांगणे अथवा हाताळू देणे गरजेचे आहे. यातूनच Multipal Inteligence वाढीस लागते.
१३ ते १७ वयोगटातील बुध्दीमत्ता
या वयोगटात मुलं ही मुख्य आवडीपासून भरकटू शकता. पण हे भरकटणं म्हणजे सोडून देणं नसतं. त्या त्या क्षेत्रात ते काय काय नव नविन आहे याचा शोध घेत असतात. कदाचीत ते या विषयीच्या फिल्म पाहतील. त्या त्या विषयांच्या स्पर्धा व सहलीमधे सहभाग पण घेतील. त्यांच्या जाणीवेच्या पातळीवर आवडीचा विषय जरा धुकट होईल व ती फक्त काचेवर साठलेली धुळ अथवा धुक असतं. पालकांना या वयोगटात त्यांना प्रेरीत केले पाहिजे. किंबहूना त्यांना हात पकडून तेथ पर्यंत नेलं पाहिजे. थोडक्यात या वयातील गटातील बुध्दी ही ढोर बुद्धी असते. वळून, चुकारून त्यांना तेथ पर्यंत न्यावं लागतं. त्यांच्यात पर्यावरणीय Multipal Inteligence बुध्दीमत्ता कशी वाढीस लागेल याचा पालकांनी विचार करणे गरजेचे आहे. त्यानां निसर्गा विषयीच्या बातम्या आवडतील. त्यांना पर्यावरण संवर्धनाच्या बर्याच गोष्टी माहीती सुध्दा असतील. कदाचीत ते जाणीवपूर्वक त्यांच्या आयुष्यात गुफंण्याचा प्रयत्न करतील. त्यांना आवडीचे झाडं लावावेसे सुध्दा वाटेल. कचरा व्यवस्थापनात, वर्गीकरणात सहभाग घेतील. या वयोगटात पालकांनी पर्यावरण बुध्दीमत्ते विषयीचे परिघावरचा निसर्ग सजमून घेण्यास प्रेरीत केले पाहिजे.
१८ ते २४ वयोगटातील बुध्दीमत्ता
: या वयोगटातील तरूण मुलं त्या त्या बुध्दीमत्ते नुसार करिअरच्या वाटा शोधू लागतील. आता त्यांच्यात कोणती बुध्दीमत्ता ठळक आहे, त्याची दिशा कोणती आहे. हे प्रामुख्याने जाणवू लागेल. पर्यावरण विषयक शिक्षण ते जाणून घेतील. या क्षेत्रात काम करणार्यां लोकांना ते ओळखू लागतील. कदाचीत त्यांच्यातील बुध्दीमत्तेतील आवडीची, निवडीची क्रमवारी ठरवेली असेल. कशाला प्राधान्य द्यायचे व नेमंक काय हाती घ्यायचं याचा ते निर्णय करण्याच्या पायवरीवर असतील. तर या वयोगगटातील तरूण नेमकं काय व कोणते काम ठळकपणे करतात. याला पालाकांनी शोध घ्यावा. त्यात भविष्यात कोणत्या संधी आहेत. याची ओळख पालकांनी आपुलकीने करून द्यावी. पर्यावरणीय बुध्दीमत्ता Multipal Inteligence असल्यास ही मुलं बर्यापैकी पर्यावरण क्षेत्रात नेमकं काय करायचं हे ठरवून टाकतात. व त्यांच्या विचारांच्या वारूवर स्वार होवून कृतीचा लगाम हाती घेतलेला असतो. आणि चौफेरित्या उधळू लागतो. किंवा ते नसर्रीत झाडे आणण्यासाठी येतील. छोट्या मोठ्या कामात तात्पुरता हातभारही लावतील. निसर्ग सहलीला जावू लागतील. निसर्गात रमतील. वृक्ष लागवडीच्या समूहात सहभागी होतील. भाषा व संवाद कौशल्य असेल तर वृक्षातोडीवर बंदी आणतील.
२५ ते ३४ वयोगटातील बुध्दीमत्ता
२५ ते ३४ या वयोगटातील तरूण कौटुबिंक जबाबदारी घेवू लागतील. ते नोकरी करू लागतील. ते आपला जोडीदार त्या विचारांचा शोधू लागतील. किंबहुना तो त्यांच्या आजूबाजूलाही असेल. फक्त ओळखणे गरजेचं आहे. पर्यावरण बुध्दीमत्ता असलेल्या या वयोगटातील व्यक्ति शेवटच्या अर्धा टप्पात ही माणसे (स्त्री व पुरूष) घरी कुंड्या आणतात. त्यांना पाणी देणं त्याची काळजी घेवू लागतील. त्यावर चर्चा करतील. त्यांना शेती करावीशी वाटू शकते. त्याना बाहेच्या जगात पर्यावरण क्षेत्रात काय चाचलंय याची स्पष्ट कल्पना आलेली असते. आपण काय खातो, ते कितपत चांगल आहे याची त्यांना स्पष्टता असते. निसर्गातील छोट्या छोट्या कार्यात ते (घर ते परिसर) सहभाग घेवू लागतात. त्यासाठी मी स्वतः नेमके पणाने काय योगदान देवू शकतो याचा कृती आराखडा तयार असतो. या वयोगटातील व्यक्तिची समाजात पर्यावरण मित्र किंवा या मित्रांचे मित्र म्हणून नाव व्हायला सुरूवात झालेली असते. लोक त्यांना त्यांच्या कामाने ओळखू लागतात. या वयोगटात लहान मुलांचे पाऊलं प्रत्येकाच्या घरात आलेली असते. पालक म्हणून त्यांना आपल्या पाल्यांना पर्यावरण विषयक संवदेनशिलता निर्माण करतात. पर्यावरण विषयक मुद्यावर ते आंदोलन करू शकतात. जनजागृती करण्यात ते पुढे असतात. थोडक्यात पर्यावरण बुध्दीमत्ता ही इतर बुद्धीमत्तांना Multipal Inteligence आता स्थिरस्थावर होत, विण अधिक घट्ट करत असते.
३५ ते ४४ वयोगटातील बुध्दीमत्ता
३५ ते ४४ या वयोगटातील माणसांना ही अधिक सक्षमपणे विश्लेषण करू लागतात. त्यांना आपले करिअर, आवडी निवडी कुठे घेवून जात आहेत. याचा सर्वागीन अंदाज आलेला असतो. त्यांचे एक विश्लेषणाची पध्दत असते. ठोकताळे असतात व त्यासाठी व्यापकतेने मी व समाजाने काय केले पाहिजे याची स्पष्ट कल्पना असते. पर्यावरण बुद्धीमत्ता असलेल्या व्यक्ती पर्यावऱण क्षेत्रातील वाटचाल लोकल ते ग्लोबल कुठं जाणार आहे? याची स्पष्टता व त्यासाठी दिशा ठरलेली असते. ते त्या वाटेवरील लक्ष्यावर लक्ष ठेवून असतात. ते कदाचीत लोक सहभागाचे व्यासपिठ तयार करतील. कार्यक्रम घेतील. पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाची इच्छुकता असलेल्या लोकांना मार्गदर्शन अथवा मदत करतात. यांना या वयोगटात निसर्ग समजू लागतो तो कसा काम करतोय, करेन याची स्पष्ट कल्पना असते. व तसे ते मार्गदर्शन करू लागतात. त्यांची काही पुस्तके छापून येतात. वर्तमान पत्रात लेख प्रकाशीत होतात. व्याख्यानं देवू शकतात. Multipal Inteligence हा सुध्दा एक पदर आहे.
४५ ते ५४ वयोगटातील बुध्दीमत्ता
४५ ते ५४ या वयोगटातील व्यक्तीमधील बुध्दीमत्त्तेचे त्या त्या क्षेत्रात व्यवस्थापकीय पायरी गाठलेली असते. ज्याला आपण सिस्टीम लावणे असे म्हणतो. सुसंगतता, त्याची परिणामकारता कशी साधता येईल या विचारात व कौशल्यात ते पारंगत होतात. नव्या नेतृत्वाला ते आकार देत असतात. आपल्यासारखी एकादा वा अनेक तयार व्हावीत यासाठी प्रयत्न करत असतात. पर्यावरणीय बुध्दीमत्ता असलेली मंडळी अनेकांना मार्गदर्शन करू लागतात. पण ते केवळ तांत्रिक नसून त्यातील अध्यात्माची मांडणी करू लागतात. निसर्ग हाच देव आहे इथपर्यंत त्यांच आधात्म पोहचू लागते. त्यांच्या संभाषणात बोलण्यात एक प्रकारचा आपलेपणा Multipal Inteligence जाणवू लागतो. भूतदया तर ही अत्यूच्च पातळीवर पोहचलेली असते. ही मंडळीत पर्यावरण क्षेत्रात असतील तर ते हिरहिरीने पुढाकार घेतात. वय झालयं असं जाणवत नाही. किंवा एकाद्या कामात तंद्री लागली तर त्यात ते रमतात.
५५ ते ६४ ही मंडळी आपापल्या क्षेत्रातील व्यापक पसारा इतरांच्या खांद्यावर सोपवलेला असतो. शारिरिक मर्यादामुळे ते बसून ते काम करू लागतात. किंवा करून घेतात. त्यांच्या निर्णयाची प्रमाण पट्टी ही डार्क किंवा व्हाईट असते. इतरांना जमतच नाही येथ पर्यंत यांची पोहच असते. किंवा अगधी विरोधी भूमिका असू शकते. ते सारं बागकाम एकटे करतील किंवा विषयच सोडून देतील.पण येथेच त्यांची भूमिका फार महत्वाची असते. कारण या वयातच त्यांच्याकडे वेळ असतो. त्यांनी स्वतः निर्णय घेतला तर ते सारं काही हळूवार का होईना करू शकतात. घरातील इतर मंडळी कशाला नको ते उद्योग म्हणून त्यांना दुर ठेवतात. काहीनी नुकतीच रिटायरमेंट घेतेलेली असते. पण तसे करू नका. त्यांना बागकाम कसे सोपे होईल त्याकडे लक्ष द्या. त्यांना उकीडवे बसून बागकाम होत नसेल तर स्टूल द्या. एका उंचीवर कुंड्या ठेवा. एकादा रविवार त्यांच्या सोबत बागेत काम करा. त्यावर चर्चा करा. बघा येथून नवीन आयुष्य सुरू होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे Multipal Inteligence वाढू लागते.
वय वर्ष ६५ पुढील बुध्दीमत्ता
६५ ते पुढे येथून पुढे त्यांचे बालपण सुरू होते. रंगी बेरंगी फुले, त्यांचा गंध फार आवडतो. त्यांचे सर्वच प्रकारचे पालकत्व कुटुंबातील इतर व्यक्तीनी स्विकारलेले असते. त्याना आनंद वाटेल अशा गोष्टीत निसर्गही येतो. त्यांच्या सोबत ते वेळ घालवतात. त्यात त्याना करमू लागते. नवं काही करण्यापेक्षा आहे तेवढं पुरे असे असते. टीपः लेखात दिलेले वयोगटानुसारचे वर्तन हे पुढील अथवा मागील वयोगटासाठी थोड्याफार फरकाने लागू पडू शकते. तर असा हा वय व निसर्गाची सोबत सांगणारा लेख.. आपल्याला आवडला तर नक्की शेअर करा.
- 3 grow vegetables at home
- 5 Things of Grow Organic
- Window Garden Lizard Control
- 5 Stop Random Gardening Tips
- Organic Terrace Gardening

(निसर्ग बुद्धीमत्ता काय आहे, नैसर्गिक बुद्धीमत्ता प्रकार) and how it interacts with other forms of intelligence. Enhance your cognitive skills (बुद्धीमत्ता कशी वाढवावी) and understand why certain interests and specialties (स्पेशॅलिटी ओळखणे) make you unique. Join us to explore multiple intelligences and their significance (Importance of Naturalistic Intelligence). Use hashtags like #निसर्गबुद्धीमत्ता #NaturalisticIntelligence, #स्पेशॅलिटीओळखा #IdentifySpecialAbilities, and #इंटेलिजन्समराठी #MultipleIntelligences, निसर्ग बुध्दीमत्ता काय आहे. स्पेशॅलिटी ओळखण्याचे तंत्र, नैसर्गिक बुद्धिमत्ता प्रकार, बुद्धिमत्ता कशी वाढवावी, What is Naturalistic Intelligence, Importance of Natural Intelligence, Identifying Special Abilities. Types of Naturalistic Intelligence, How to Enhance Intelligence, #निसर्गबुद्धीमत्ता, #स्पेशॅलिटीओळखा, #नैसर्गिकबुद्धीमत्ता, #बुद्धिमत्तावाढवा , #इंटेलिजन्समराठी, #MultipleIntelligences, #NaturalisticIntelligence, #IdentifySpecialAbilities, #NaturalIntelligence, #EnhanceIntelligence. ,
(Mini Course) व्दारे शिकणार?
👉 Annual Detailed Course
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.



You must be logged in to post a comment.