किचन वेस्ट का अलग अलग तरह से इस्तेमाल करने से मिट्टी उपजावू बनती तो उसीके साथ उत्पादनशील भी बनती है.
गार्डनिंग करते समय बेस्ट फ्रॉम वेस्ट काफी महत्वपूर्ण है। गार्डनिंग के लिए जो मिट्टी हम इस्तेमाल करते हैं, उसमें पोषक तत्वों का सही समावेश होना बहुत जरूरी होता है। मिट्टी की उरर्वकता को बढाने के लिए जैविक कचरे का उपयोग करना बहोत ही महत्वपूर्ण है.. किचन वेस्ट का अलग अलग तरह से इस्तेमाल करने से मिट्टी उपजावू बनती तो उसीके साथ उत्पादनशील भी बनती है. बेस्ट फ्रॉम वेस्ट से हम घर में उपलब्ध नकारात्मक चीजों जैसे कि पेपर, फल और सब्जी के छिलकों, आदि से गार्डनिंग में उपयोगी खाद और कीटनाशक बना सकते है. भरपूर कंपोस्ट बना सकते हैं।
इससे हम सस्ते तरीके से अपनी मिट्टी को उन्नत बना सकते हैं जिससे हमारे पौधे अधिक संवेदनशील बनते हैं। इसके अलावा, यह भी हमारे घर में नकारात्मक चीजों का निस्तारण करता है जो हमारी स्वच्छता को भी बढ़ाता है और स्वच्छता से ही मन की प्रसन्नता बढती है. इसलिए, बेस्ट फ्रॉम वेस्ट एक संरक्षक और पर्यावरण के लिए स्वास्थ्यपूर्ण तरीका होता है।
आईए ऐसेही तंत्रो और मंत्रो को हमारे online Gardening course व्दारा जाने.
कोर्स की डिटेल्स निचे लिंक में सविस्तर से जाने…
आनेवाले शनिवार और रविवार के दिन हिंदी और मराठी भाषा में gardening के बारे मे QnA session रात 8 बजे शुरू होगा … Wts app group पर लिंक भेजी जाएगी.
Our course covers everything from veggies production to garden planning, soil science, planting techniques, communication, crop protection, and the use of tools in gardening.
Do you want to learn the art of organic gardening in Hindi n Marathi language from the comfort of your own home?
Our online gardening course is the perfect choice for you! With our comprehensive course curriculum and experienced instructors, you can learn everything you need to know about gardening and become a skilled gardener in no time.
Our course covers everything from veggies production to garden planning, soil science, planting techniques, communication, crop protection, and the use of tools in gardening. You’ll have access to interactive online lessons, videos, Weekly Q n A session n Personal suport call, which will help you learn at your own pace and gain personalized feedback from our experts.
Whether you’re a beginner or an experienced gardener, our course is designed to help you grow your knowledge and skills in gardening. You’ll learn how to grow your own vegetables, herbs, and flowers, and how to care for them throughout the year. You’ll also be part of a supportive community of fellow gardeners where you can share tips, ask questions, and get advice.
So, what are you waiting for? Start your gardening journey in Hindi or Marathi today with our online gardening course. Enroll now and get ready to create your own beautiful garden that will fill your life with joy and freshness!
चाहे आप एक नया बागवान हों या अनुभवी बागवान हों, हमारा कोर्स आपकी जानकारी और कौशलों को बढ़ाने में मदद करेगा। आप सीखेंगे कि कैसे अपनी खुद की सब्जियां, जड़ी-बुंटीया, फुल पौधे, धान उत्पादन के साथ साथ …..
क्या आप अपने घर की सुरंगत से भरी एक सुंदर बागवानी बनाना चाहते हैं? हमारा ऑनलाइन बागवानी कोर्स आपके लिए सटीक विकल्प है! हमारे विस्तृत कोर्स की पाठ्यक्रम व्यवसायिक एवंम अनुभवों द्वारा तैयार किया हैं और आपको बागवानी के सभी पहलुओं को समझाने में मदद करेंगे।
हमारा कोर्स सब्जी उत्पादन से लेकर बागवानी की योजना तक, मिट्टी विज्ञान, रोपण तकनीक, संचार, फसल संरक्षण, और बागवानी में उपयोग किए जाने वाले तंत्र और मंत्र तक शामिल होता है। आपको इंटरैक्टिव ऑनलाइन पाठ्यक्रम, वीडियो, प्रश्नोत्तरों के विकेंड सेशनका एक्सेस मिलेगा, जो आपको आपकी बागवानी की रफ़्तार से सीखने और हमारे विशेषज्ञों से व्यक्तिगत प्रतिक्रिया प्राप्त करने में मदद करेंगे।
चाहे आप एक नया बागवान हों या अनुभवी बागवान हों, हमारा कोर्स आपकी जानकारी और कौशलों को बढ़ाने में मदद करेगा। आप सीखेंगे कि कैसे अपनी खुद की सब्जियां, जड़ी-बुंटीया, फुल पौधे, धान उत्पादन के साथ साथ टेरेस गार्डेन, किचन गार्डन, विंडो गार्डेन, फार्महाऊस, खेती बाडी में भी ईस्तेमाल कर सकते है.. अगर आप गार्डेनिंग को लेकर कुछ व्यवसाय बनाना चाहते है, विस्तार करना चाहते है तो डिजिटल मीडिया के कौशल को आप प्राप्त कर सकते है.
आएं हमारे मराठी और हिंदी भाषा में विस्तृत कोर्स की जानकारी निचे दि गयी लिंक व्दारा पांए.
मागील दहा वर्षात आमची उत्पादने प्रयोगाच्या ( Experiments) त्याच्या परिणामकारकतेच्या, ( Effectiveness) उपयोगीतेच्या ( Useful) कसोटीवर पारखून पहात होतो. तेव्हा त्यांची किंमत ही ना नफा ना तोटा या तत्वावर आम्ही विक्री करत होतो. थोडक्यात ही आरंभीची किंमत होती. (Welcome Price) पण येत्या काळात गच्चीवरची बाग या उपक्रमाची व्यापकता ( Scope, Reach) वाढवण्यासाठी (उदाः लाईव्ह वेबिनार, ( zoom webinar) तसेच वाढती महागाई, डिजीटल प्लॅटफार्मचे वाढते वार्षिक सभादत्व व मागील उत्पादनांच्या खर्चाची तूट भरून काढण्यासाठी आमच्या उत्पादनांच्या किंमती १ जाने . २०२३ पासून वाढवत आहोत.
नमस्कार, गच्चीवरची बाग, नाशिक.
तुमच्या आमच्या आवडीची
बाग गच्चीवरची…
गच्चीवरची बाग अर्थात रसायनमुक्त भाजीपाल्याची बाग.
गच्चीवरची बागेला दहा वर्ष ( 10thAnniversary) पूर्ण होऊन अकाराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. मागील दहा वर्षापासून पूर्णवेळ काम (full time work) करत आहोत. या दहावर्षात विविध समाज माध्यमांव्दारे, (social Media) वर्तमानपत्राव्दारे, ( news paper & Magazine) ई पुस्तकांव्दारे, ( E Books) सेटअप बिल्डव्दारे ( vegetable Setup) आम्ही आमचे अनुभव, ( Experience) प्रयोग, ( experiments) संसोधन, ( research) उत्पादने पोहचवत आहोत. आम्ही साधारण एक कोटी लोकांपर्यंत पोहचलो
(Reach) आहोत. येत्या काळात आम्ही हिंदी व इंग्रजी भाषेतही आमची सेवा पुरवणार आहोत. त्यामुळे येत्याकाळात शंभर कोटी लोकांपर्यंत पोहचण्याचा मानस आहे.
रसायनमुक्त भाजीपाल्याची (Chemical Free Food) ही काळाची गरज आहे. त्यामुळे आम्ही मागील दहा वर्षात जी काही उत्पादनं तयार केलीत. सहजरित्या भाजीपाला उत्पादनांसाठी (vegetable production) त्याचा वापर करता येतो. असे टॉप फाईव्ह प्रोडक्ट ( Top Five Garden Products) व इतर उत्पादनांच्या किंमती ( Increase price) आता वाढवत आहोत.
मागील दहा वर्षात आमची उत्पादने प्रयोगाच्या ( Experiments) त्याच्या परिणामकारकतेच्या, ( Effectiveness) उपयोगीतेच्या ( Useful) कसोटीवर पारखून पहात होतो. तेव्हा त्यांची किंमत ही ना नफा ना तोटा या तत्वावर आम्ही विक्री करत होतो. थोडक्यात ही आरंभीची किंमत होती. (Welcome Price) पण येत्या काळात गच्चीवरची बाग या उपक्रमाची व्यापकता ( Scope, Reach) वाढवण्यासाठी (उदाः लाईव्ह वेबिनार, ( zoom webinar) तसेच वाढती महागाई, डिजीटल प्लॅटफार्मचे वाढते वार्षिक सभादत्व व मागील उत्पादनांच्या खर्चाची तूट भरून काढण्यासाठी आमच्या उत्पादनांच्या किंमती १ जाने . २०२३ पासून वाढवत आहोत.
आपणास या किंमती जास्त वाटू शकतात. पण व्यवसाय व लोकांना निशुल्क शिकवतांना तारेवरची कसरत होतेय. तरी सुध्दा आपण ३१ डिसें. २२ पर्यंत आपण आपणास हवे असलेले साहित्य हे आहे त्याच किंमतीत आरक्षित ( Pre Book Offer) करू शकता. हवं तर आपण मार्च २०२३ पर्यंत त्याचा स्विकार केला, किंवा घेवून गेलात तरी चालेल. पण यासाठी तुम्हाला ३१ डिसेंबर २२ पूर्वीच त्याची रक्कम अदा ( Payment) करावी लागेल.
टॉप फाईव्ह प्रोडक्टस ( आताच्या किमंती – २०२३ मधील किंमती)
अन्नपूर्णा बॅग्ज – ३५० रू. – ५०० रू. प्रति नग,
एरो ब्रिक्स बेड ३५०- ५०० रू. प्रति चौरस फूट
छापिल व ई पुस्तके. २५०- ५०० रू.,
बिशकॉम ( १६रू. शेणखत २२ रू.) ३२ रू. किलो.
इतर द्राव्य खतं.गोमुत्र, निम व करंज स्प्रे, जिवामृत २२ रू. – ३२ रू. लिटर
इंस्टट पॅकिंग फूड ( Instant Food) मधील रसायानांबद्दल बोलणार आहोत.. आज पाणीपुरीच्या दुकानापासून ते मिठाईच काय अगदी जगप्रसिध्द च्याऊ म्याऊ बनवणार्यापर्यंत तर अगदी अमृततूल्य बनणार्या पेय व शितपेयांपर्यंत सर्वच जण रसायनांचा (Chemical essence) वापर करत आहेत. (खरं तर चहाची पाने सुध्दा रसायनं टाकून वाढवली जातात) या रसायंन कृत्रीम चव, त्याचा दिर्घाआयुष्य (Preservative) वाढवण्यासंर्दभात असतात. कशात रसायनं नाहीत हे सांगा…खरं तर सारेच जण slow poisoning चे बळी पडत आहोत.
importance of home grow vegies
बाजारातील रासायनिक (Chemical) भाज्यांचं करायचं काय ?
तुमच्या आमच्या आवडीची बाग गच्चीवरची
अर्थात रसायन मुक्त भाजीपाल्याची!
नमस्कार मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक,
गच्चीवरची बाग नाशिक ही पर्यावरणीय उद्मशीलता (environmental entrepreneur) असून आम्ही मागील २२ वर्षापासून विषमुक्त (chemical Free) भाजीपाला पिकवण्यासंदर्भात काम करत आहोत. भाज्या कसल्या औषधंच (Medicinal Herbs) म्हणा हवं तर… आज प्रत्येक पदार्थात रसायनांचा (Chemical) वापर होत आहे. मग ते जनावरांना असो की माणूस प्राण्यांसाठी). अगदी शेतात (Farming) पिकणार्या भाज्यांपासून तर अगदी इंस्टट पॅकिंग फूड (Instant Food , Fast Food) थोडक्यात agriculture industry पासून ते Food industry पर्यंत सर्रास वापर होतोय. भाज्यांचा नैसर्गिक वाढीचा (Natural Growth) कालावधी कमी केला गेलाय. तर कुठे रसायनांचा (chemical) वापर करून खाल्या जाणार्या पदार्थांचे नैसर्गिक आयुष्यमान वाढवले गेले. काय तर एवढ्या मोठ्या जनतेला भाजीपाला, अन्न मिळावे (food Security) म्हणून, पण तुम्ही पाहत आहात की, ना पिकवणार्याला (Farmers) योग्य तो दाम मिळत, ना विकत घेणार्याला (buyers) त्याचा चवीचा, (Taste) पोषणाचा मोबदला… मग अशा बाजारातल्या भाज्यांना काय आग लावायची का? आग सोडाच पण सडवून सुध्दा खत (Home fertilizer) तयार होत नाही. असो…
ब्रॅडेंड मसाले वापरूनही घरची अन्नपूर्णा (House Wife) जर भाजीला चव नाही असं ऐकून घेत असेन तर तो तिचा दोष ( Guilt) नाही की, तिच्या आई बाबांनी स्वयंपाक (Cooking Skill) करायला शिकवलं नाही, असं नाही.. खरी मेख
रसायनं टाकून उगवलेला भाजीपाला (Chemical Farming) ही खरी गोची आहे.. पण या मुळांपर्यंत (Roots Problem) फार कमी लोक जातात. आणि त्यातले तूम्ही एक आहात, जे हा विषय मुळापासून समजून घेण्याचा विचार करत आहोत. म्हणूनच तर हा लेख वाचत आहात. असो… हे झाले भाज्यां संदर्भात,, भाजीचं रासायनिक पुराण फार मोठ आहे…
तर इंस्टट पॅकिंग फूड ( Instant Food) मधील रसायानांबद्दल बोलणार आहोत.. आज पाणीपुरीच्या दुकानापासून ते मिठाईच काय अगदी जगप्रसिध्द च्याऊ म्याऊ बनवणार्यापर्यंत तर अगदी अमृततूल्य बनणार्या पेय व शितपेयांपर्यंत सर्वच जण रसायनांचा (Chemical essence) वापर करत आहेत. (खरं तर चहाची पाने सुध्दा रसायनं टाकून वाढवली जातात) या रसायंन कृत्रीम चव, त्याचा दिर्घाआयुष्य (Preservative) वाढवण्यासंर्दभात असतात. कशात रसायनं नाहीत हे सांगा…खरं तर सारेच जण slow poisoning चे बळी पडत आहोत. तर अशी पदार्थ आपण जेव्हां खातो. अशी कोणकोणती पदार्थ सकाळी पासून अगदी चघळण्यापासून ते पोट भरण्यापर्यंत खातोय.. त्याची जरा यादी (monthly bucket List) करा… तुम्ही बाहेरची (Out Dore Food) पदार्थच नव्हे वेगवेगळी रसायनं खात आहात. तेव्हां या पदार्थात वापरलेले रासायनिक रंग, चव, त्यातील रसायनं हे जेव्हां पोटात जातात, त्याचे पचनास (Digestion) जेव्हां सुरूवात होत असेन तेव्हां त्यातून कोणता केमिकल लोचा होत असेन याचा कधी विचार केलाय… नाही… खरं तर विचार करायला लागलात तर खायचं काय हा बेसिक प्रश्न तुम्हाला पडेल. त्यामुळे काही मंडळी याचा विचार न केलेलाच बरा…असं म्हणतील. (म्हणजे प्रश्न तसाच सोडून दिला तर तो सुटेल की गुंता वाढवेल … ?) असो विचार करायचा कि नाही, किती खोलवर करायचा हे वैयक्तिक स्वांतत्र्य आहे. त्यावर मला गदा आणायची नाही असो..
तर पोटात जाणार्या या वेगवेगळ्या रसायनांची लक्षणं (Symptoms) साधी व सोपी आहेत. अनिद्रा, (Insomnia) अनामिक भिती, feeling unnecessary fears कसलंतरी भय, चिंता,(anxiety) चिडचिडेपणा, छोटे छोटे निर्णय घेण्यात चालढकल (Decision making) किंवा अगदीच दुर्लेक्ष, विसराळू पणा, विस्मरण अशी अनेक गोष्टी दिसून येतात.
या सर्वाचा आपल्या दैनदिन जिवनावर (Daily routines) कार्यक्षमतेवर (अगदी सकाळच्या मॉर्निंग वॉक पासून तर रात्री बेडवर निंवात झोपेपर्यंत) परिणाम करत आहेत. तो स्वतःवरही होत आहेच पण कुटुंबावरही होत आहे.त्यामुळे अशी पदार्थ टाळा, आता तर नुसंत घरी बनवलेलं खाऊन चालणार
नाही तर घरी पिकवून घरीच बनवलेलं खाणं गरजेचं आहे.. निवड तुम्हाला करायचीय.
आम्ही तर मागील २२ वर्षापूर्वीच सुरूवात केलीय.. आम्ही Grow, Guide, Build, Products, Sales N services या पाच सुंत्राव्दारे काम करत आहोत. भाजीपाला उत्पादन सहज सोपे व्हावे म्हणून आम्ही पाच प्रकारचे (Top Five products) तयार केले आहेत.
काम केवळ आरोग्याचे नसून पर्यावरण जतन करण्याचे सुध्दा आहे.
वर दिलेल्या आमच्या डिजीटल व्यासपिठावर तुम्हाला बरीच माहीती मिळेल, त्यासाठी ज्यांना सुत्रबध्द रितीने माहीती घ्यायची असेल त्यांनी ई पुस्तके विकत घ्यावीत. वाचावीत. या उपरोक्तही काही अडचणी असल्यास संपर्क साधावा. ही विनंती.
तुमच्या आमच्या आवडीची बाग गच्चीवरची
नमस्कार, मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक येथून
आम्ही गेल्या दोन दशकांपासून विषमुक्त भाज्या कशा पिकवायच्या या बद्दल काम करत आहोत. आणि मागील एक दशकांपासून या विषयात
पूर्णवेळ काम करत आहोत. कारण हे आमच्यासाठी केवळ प्रोफेशन नसून Passion आहे.
आम्ही Grow, Guide, Build, Products, Sales n Services या पंचसुत्राव्दारे आम्ही भाज्या उगवण्याचे, उगवून देण्याचे. सशुल्क व निशुल्क
मार्गदर्शनाचे, विविध Setup तयार करून देण्याचे तसेच या संबधी विक्री व सेवा सुविधा पुरवत आहोत.
आज जगात सर्वात मोठी गुंतवणूक (Investment) कोणती असेल तर ती म्हणजे आरोग्य, आरोग्य ही गुंतवणूक असू शकते याचा आपण विचारच
करत नाही. हेल्थ इन्शुरंन्स, प्रॉपर्टी, बडेजावपणा, हायफाय राहणीमान, नातेवाईक काय म्हणतील यावरच खर्च व गुंतवणूक होत असते. पण हे
सर्व करण्यासाठी आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. लंबी रेस का घोडा बनणायचे असेल तर आरोग्य चांगले राखणे गरजेचे आहे. कारण
आरोग्यच ही सर्वात मोठी पायाभूत, मूलभूत अशी गुंतवणूक आहे. ज्यात वेळेची, पैशाची, ज्ञानाची, श्रमाची ही गुंतवणूक तुम्हाला स्वतःलाच करावी
लागते.
पण जेव्हां केव्हां रेस्ट ईन पिसची वेळ येते तेव्हां आपल्याला आरोग्याची आठवण येते. अरे अरोग्य चांगले राखले असते तर अकाली निघून
जाण्याची, शारिरिक त्रास भोगण्याची गरज पडली नसती. पण तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असते.
असो, आरोग्यदायी जगण्यासाठी अनेक प्रकारच्या गुंतवणूक असतात. त्यातील एक महत्वाची आणि हे सर्व ज्या शरिर नावाच्या इंजिनावर चालते
त्याला विषमुक्त अन्न खावू घालणं गरजेचे आहे. हेच आम्ही गेल्या २४ वर्षापासून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.
आमच्या प्रयत्नांना आता यश येवू लागले आहे. त्यासाठी आम्ही मासेस टू क्लासेस यांच्यासाठी आमच्याकडील अनूभवांची सुर्यथाळी तयार केली
आहे. तुम्हाला जेवढे शिकायचे तेवढे तुम्ही शिकू शकतात. यासाठी तुम्हाला आमचा युट्यूब चॅनेल, इंस्टाग्राम, ५०० लेखाची वेबसाईट, तुम्हाला
माहिती देणारे संकेतस्थळं तयार केली आहे. व्हॉट्सअपवर रोज अपडेट पाठवत असतो. आमचा मोबाईल न. व्हाट्सअप मधे चेक करून व्हा.
व्हॉट्सअप स्टेटसला आम्ही अपडेट करत असतो. त्यांना सब्जक्राईब करा, लाईक करा. म्हणजे वेळोवेळी तुम्हाला अपडेटस मिळत राहतील.
स्वतः अनुभवलेले, वर्तमान पत्रात लिहिलेल्या सदरांचे दहा ई पुस्तके आहेत. या पुस्तकांची माहती देणारे सारांश ई पुस्तके सुध्दा तयार केली
आहेत. ति वाचा. अनुभवा, कामाला सुरूवात करा.
अगदीच सुरूवात करायची असेल तर गुगल किंवा गुगल इमेजवर जावून गच्चीवरची बाग नाशिक असे टाईप करा. तुम्हाला सगळ्या ए टू झेड
प्रकारची माहिती आम्ही आमच्या बॅनर खाली देण्याचा प्रयत्न केला आहे.
बरीच मंडळी आमची माहिती न घेताच भेटायला येतात. फोनवरही बराच वेळ घेतात. आम्ही निशुल्क मार्गदर्शन करत असलो तरी वैक्तिगत वर्ग
घेत नाही याची दखल घ्या. कारण गच्चीवरची बाग कामाचा व्याप प्रचंड वाढत आहे. आम्ही मागील १० वर्षात १ कोटी लोकांपर्यंत पोहचलो आहोत.
येत्या काळात ही संख्या १०० कोटी लोकांपर्यत नेण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे कुणा एका वैक्तिसाठी वेळ देता येणार नाही. ते योग्यपण
नाही. कारण हे काम केवळ आरोग्याचे नसून पर्यावरण जतन करण्याचे सुध्दा आहे.
वर दिलेल्या आमच्या डिजीटल व्यासपिठावर तुम्हाला बरीच माहीती मिळेल, त्यासाठी ज्यांना सुत्रबध्द रितीने माहीती घ्यायची असेल त्यांनी ई
पुस्तके विकत घ्यावीत. वाचावीत. या उपरोक्तही काही अडचणी असल्यास संपर्क साधावा. ही विनंती.
तसेच आम्हाला मोबाईल मधे पहाता येत नाही, वाचता येत नाही. असे म्हणून चालणार नाही. आज सर्वात जास्त वेगाने व विविधतेने शिकण्याचे
साधन हे मोबाईल आहे. त्यामुळे ते हाताळण्याचं कौशल्य हे अवगत करावेच लागेल. तेव्हा संपर्कात रहा, शिकत रहा, पिकवत रहा.
नमस्कार, मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक विषमुक्त अन्न ही आरोग्याची गुरूकिल्ली आहे. विषमुक्त धान्य जगाच्या कोणत्याही कोपर्यातून आयात करता येईल पण ताज्या भाज्या कधीच नाही. घरी पिकवलेल्या विषमुक्त भाज्या या खात्रीशिर असतात. सहजतेने विषमुक्त भाज्या पिकवा यासाठी आम्ही गेल्या २२ वर्षापासूनच सुरूवात केली व मागील १० वर्षापासून या विषयात पूर्णवेळ काम करत आहोत. Grow, Guide, Build, Prducts, Sale & Services या पंचसुत्रीव्दारे आम्ही काम करत आहोत. Guide या भागात आम्ही विविध माध्यमांव्दारे गरजूना माहिती व अनुभव उपलब्ध करून देत आहोत. यातील एक माध्यम म्हणजे ई बुक होय. आम्ही गेल्या दहा वर्षात सात पुस्तकं लिहली आहेत. खरं तर तुम्हाला गार्डेनिंग या क्षेत्रात मास्टरकी मिळवायची असेल तर गच्चीवरची बाग मास्टर-की वापरणे फार गरजेचे आहे. आमच्या अनुभवांचा उपयोग करत अनेक जन उपलब्ध जागेत भाजीपाला पिकवत आहेत. नैसर्गिक चवीच्या, उत्तम पोषणाच्या भाज्या उगवून स्वतःचे व स्वताच्या कुटुंबाचे आरोग्याचे संवर्धन करत आहेत. तर ई बुक जेथे उपलब्ध आहेत त्याचा दुवा पाठवत आहे. तेथे तुम्हाला पुस्तक खरेदी करण्याआधी पुस्तकांची सारांश प्रत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ति अगदी निशुल्क आहे. तुमचे नाव पत्ता टाकून ति डाऊनलोड करून वाचू शकता. इंस्टामोजो स्टोअर लिंकः तुम्हाला सांराश ई पुस्तक आवडल्यास संपूर्ण ई पुस्तकाची प्रत डाऊनलोड करण्यासाठी पेमेंट गेटवेचा वापरही करू शकता.
या खालील लिंकव्दारे तुम्ही आमच्या उत्पादनांची माहिती मिळवू शकता. व्हॉट्स अप कॅटलॉग लिंकः संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक.
नमस्कार, मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक येथून.
आज आपण घेवडा या भाजीबद्दल माहिती घेणार आहोत.
फ्रेंच बिन्स यालाच आपल्याकडे घेवडा, श्रावण घेवडा, फरसबी असेही म्हटले जाते. फ्रेंच बीन हे शेंगवर्गीय असल्याने हे चवीला अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असते. सफेद पुलाव करतांना याची छान चव लागते. तसेच बटाट्याच्या भाजीबरोबर याची चव तर अप्रतिमच…
याची लागवड जुलै, संप्टेबर व जाने मधे करावी. पर्यंत छान फळ धरतात. गुच्छाने शेंगा लागतात. कच्च्या खाल्यातरी मातीसारखी उत्तम चव लागते.
घेवड्याचे बिज. अर्धा सेंटीमिटर लांबीचे लांबट व टपोरे सफेत व लाल ठिपके असतात. याची लागवड एक चौरसफूटात चार चार बोटाच्या अंतरावर करावी. ही झुडुप वर्गीय फळभाजी आहे. बि अति पावसात लावल्यामुळे कुजून गेल्यास पून्हा याची लागवड करावी. तसेच याच्या आजूबाजूला पालेभाजीची लागवड करू शकता.
नमस्कार मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक येथून.
आज तुम्हाला वेलवर्गीय भाज्या वाढवण्याचे सिक्रेट सांगणार आहे.
एरो ब्रिक्स बेड व जमिनीवर वेलवर्गीय लावतांना सगुणा बॅगेत वेल वाढवण्याच्या पध्दतीचा वापर करा. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. कितीही पाऊस आला, कितीही पाणी साचलं तरी वेलाची मुळ खराब होणार नाही. अधिक पाण्यामुळे वेलाचे खोड व मुळ सडण्याची दाट शक्यता असते. कारण ते फार नाजूक असतात. त्यामुळे वेलवर्गीय बिया लावतांना सगुणा बॅगेचा वापर करा. याचे शास्त्रीय कारण म्हणजे अधिकच्या पाण्यात मुळं सडली तरी पाण्याच्या संपर्कापासून खोड वर रहाते. त्यामुळे खोड तग धरते. व त्यामुळे वेल दगावत नाही.
अधिक पावसामुळे बॅगेतील मुळं व वर पर्यंत खोड सडून जाते. पण खोडाने अशा प्रतिकूल परिस्थतीत मुळांचा फुटवा तयार करून वेल जिवंत ठेवतात. आणि याला खात्रीने भरपूर फळे लागणार यात शंकाच नाही. या पध्दतीने वेलवर्गीयाची लागवड करून आम्ही जमिनीवर दूधी भोपळ्याचे अनपेक्षीत असे उत्पादन घेतले आहे. याचा फायदा भाजीपाला उत्पादन करणारी शेतकरी सुध्दा करू शकता. लाईक करा, शेअर करा. कॉमेंट करा. कारण शेअरींग ईज केअरिंग. आम्हाला गुगलवर शोधा. धन्यवाद.
आता विविध बागेच्या स्पर्धांचे आयोजन होणार आहे. होत आहे. या स्पर्धा जिंकायच्या कशा त्यातील बारकावे काय आहेत. हे या लेखातून समजून घेणार आहोत.
कोव्हीड १९ आता संपलेला आहे. रोजचे दैंनदिन व्यवहार सुरू झाले आहे. लॉकडाऊन नंतरचा हा पहिला पावसाळा, बागप्रेमी मधे प्रचंड उत्साह संचारला आहे. ग्रीन कॉलर्स ( म्हणजे पर्यावरण पुरक व्यवसायकांची) संख्या वाढते आहे. वाढलीच पाहिजे. अनेक ग्रीन कॉलर्स कडून आता विविध बागेच्या स्पर्धांचे आयोजन होणार आहे. होत आहे. या स्पर्धा जिंकायच्या कशा त्यातील बारकावे काय आहेत. हे या लेखातून समजून घेणार आहोत. कारण गच्चीवरची बाग नाशिकची सुरवात ही भाजीपाला बाग व होम कंपोस्टींगच्या स्पर्धा आयोजनातून झाली होती. त्यामुळे काहीसा अनूभव गाठीशी आहेच.
बाग संदर्भात खालील विषयावर स्पर्धाचे आयोजन होत असते.
होम कंपोस्टींग
भाजीपाला बाग
फुलांची बाग
गुलाबांची बाग
ऑर्चिडची बाग
असे काही नमुनेदार स्पर्धा आयोजन केले जाते. यातील काही कॉमन फॅक्टर काय असतात. ते आपण लेखातून समजून घेवू.
सुंदरताः सुंदरता हा बागेचा आत्मा आहे. ही सुंदरता अनेक गोष्टीतून प्रतीत होत असते. जसे की बागेची रचना, जागेचा केलेला कल्पक वापर, कमी जागेत जास्त झाडे. बागेतील झाडांची विविधता. बागेत असेलेला टापटिपपणा, झाडाची केलेली निवड, त्याची वाढ अशा अनेक गोष्टीतून सुंदरता प्रकट होत असते.
स्वच्छताः स्वच्छता हा सुंदरतेचा पाया आहे. बागेत स्वच्छता असेल तर ५० टक्के बाग सुंदर दिसू लागते. ही स्वच्छता अनेक गोष्टीतून प्रकट होत असते. जसे की बागेत कुठेही माती पडलेली नसावी. झाडांवरची पिवळी पाने काढलेली असावी. वाळलेल्या फांद्या नसाव्यात. झाडांची बेढब वाढ नसावी. नको त्या फांद्या काढून टाकणे. झाडांचे सरळमिसळ नसावी. नाहीतर ते गचाळ अक्षरासारखे दिसते.
हिरवळः बागेत एक वेळ फुल नसेल तर चालेल. पण बाग हिरवीगार असावी. कारण हिरवेपणा हे बागेचे वस्त्र आहे. बागच हिरवीगार नसेल तर विवस्त्र माणसासारखी बाग दिसेल. डोळ्यांना सुखावणारा रंग हा हिरवा आहे. तसेच मानसिक समाधान त्यातून मिळते. तसेच हा हिरवेपणा म्हणजे बाग निस्तेज न दिसता ति टवटवीतपण दिसली पाहिजे.
टाकाऊ वस्तूंचा वापरः बरेचदा स्पर्धेत सहभागी व्हायचे म्हणजे चांगल्या रंगी बेरंगी कुंड्या आणल्या जातात. त्यावर अमाप खर्च होतो. खरं तर कशात झाडं लावता या पेक्षा त्यात ते झाडं कसं उगतं. वाढतं, बहरतं यावर लक्ष दिले पाहिजे. या टाकाऊ वस्तूंना अंत नाही. फक्त कल्पकता अंगी असावी. तसेच स्पर्धा ही चांगल्या कुंड्या म्हणजे मटेरिअलिस्टीक स्पर्धा नसते. स्पर्धा असेते झाडांची, ते कसं बहरलं आहे. ते कसं वाढलं आहे. ते किती आनंदीत आहे. यावरच ना. तेव्हा झाडं कशात लावली आहे या पेक्षा त्याच्या आत मधे काय भरलं आहे. याला फार महत्व आहे. त्यासाठी चांगल्या BISHCOM या पॉटींग मिक्सचा वापर करा.
आपले त्यातील ज्ञानः केवळ चांगली झाडे आणून त्याला आपल्या बागेत जागा देवून स्पर्धा जिंकता येत नाही. त्याची जाग कोणती, त्याचा फळण्या फुलण्याचा सिझन कोणता, त्याची ऊन, पाणी, तापमान याच्या सवयी काय आहेत. याचाही अभ्यास पाहिजे.
ऑरगॅनिक फॅक्टरः बरेचदा स्पर्धेत जिंकण्यासाठी रसायनांचा आधार घेतला जातो. रसायनं केवळ सजीवांना नव्हे तर वनस्पतींना सुध्दा घातक असतात. त्याचे परिणाम येतात पण ते तात्कालीन असतात. आणि यातला अभ्यास फार बारिक करावा लागतो. पण ऑरगॅनिक तत्वांचा वापर करत असाल तर हा अभ्यास फारसा लागत नाही. मोजक्या खतांमधे त्यांचे भागते. पण ते शाश्वत असते. सारं काही चांगले पुरवत राहिले तर निसर्ग फुलणारच. अर्थात त्यासोबत ऊन, सावली,पाणी, तापमान याचा अभ्यास करणे गरजेचे असते.
होम कंपोस्टींगः घरच्या कचर्याचे कंपोस्टींग करणे हे स्पर्धेतील महत्वाचे गुण आणू शकतात. कारण त्यात स्वांवलंबन असते. सारीच खत विकत आणून झाडे पोसता येत नाही. त्यांनी घरच्या खतांची गरज असते. कारण त्यात आपल्याच बागेतील मातीमधून वापरलेले घटक हे होम कंपोस्टींग करून पुन्हा वापरता येतात.
भावना, संवेदनाः झाडांशी भावना व संवेदना जोडलेल्या असतात. त्यामुळे प्रत्येकाची एक गोष्ट असते. आपण फक्त आनंद घेणार असाल तर या गोष्टी फार कमी असतात. पण आपण स्वतः त्याची काळजी घेणारे असालं, त्यासाठी प्रयत्न केलेले असेल तर नक्कीच संस्मरणीय अशा आठवणी जपता येतात. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होताना अशा प्लॅन्ट्स स्टोरीज तुमच्या जवळ असल्या पाहिजेत. कमी असल्या तरी चाललीत पण त्या खर्या खुर्या असाव्यात. रचलेल्या नसाव्यात.
यासाठी काय करावे.
स्पर्धा समजून घ्या… स्पर्धा नेमकीं काय आहे. कशाची आहे. त्यातील घटक काय आहेत. हे निट समजून घ्या. कारण प्रत्येक स्पर्धेचे अटी नियम वेगवेगळे असतात. त्याचे बारकावे समजून घ्या. तरच तुमचा पहिल्या पाचांमधे नं. येऊ शकतो. नाहीतर हाती धुपाटणे येते. व त्यातून आपण कायमची निवृत्ती घेतो. तसे होऊ देवू नका.
एक्सपर्ट व्यक्तिचा सल्ला व सेवा घ्याः बागेसाठी नेहमी तज्ञ, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. काही जमत नाही म्हणून जशी शेती केली जाते तसेच शहरी भागात रोजगार नाही म्हणून बागेची देखभाल करणारी मंडळी भेटतात. ते काम म्हणून बागकामाकडे पहातात. तज्ञ लोक त्याकडे प्रक्रिया, निष्कर्ष म्हणून अभ्यास करतात. तेव्हां ऐकायचे कुणाचे व कितपत याचा समतोल ठेवा. तज्ञ व अनुभवी व्यक्तीचा सल्ला हा प्रत्यक्ष भेटीतूनच मिळतो असे नाही. त्यासाठी आता विविध माध्यमे उपलब्ध आहेत. फोनवरही सल्ला देणारी सेवाभावी मंडळी आहेत. त्यांचा शोध घ्या.
काही खर्च करा. बरेचदा बागेची फार हौस असते पण खर्च करण्याची तयारी नसते. अनुभवी व्यक्तिकडून सेवा सुविधा विकत घ्या. बरेच मंडळीना सर्जरी करायची असेल तर कंपाऊंडरचा सल्ला घेतात. फार महागडा आहे काहो डॉक्टर? नक्की गुण येतो ना? खरं एम.डी.चाच सल्ला घ्यावा. तसेच बरेच जणांना सर्जरी करून हवी असते पण ति कंपाऊंडरला दिलेल्या टीप मधे. असो… काम करायचे तर ते उत्तमच झाले पाहिजे. त्याची सुरवात ही पायाभूत गोष्टीपासून झाली पाहिजे.
उन्हाळ्यात वापरा ह्युमिक जल.. बरेचदा काही स्पर्धा या उन्हाळ्यात असतात. अशा वेळेस बाग टवटवीत ठेवण्यासाठी ह्युमिकजलाचा वापर करा. बाग तर हिरवी राहतेच शिवाय फळा फुलांनी बहरलेलीसुध्दा असते.
आपल्या बागेचे वेळोवेळी व्हिडीओ डॉक्यूमेन्टेशन करा. आपल्या बागेतील फुलांचे झाडांचे, संस्मरणीय क्षणाचे चित्रीकरण करून ठेवा. कारण वेळोवळी केलेले चित्रण हे एकादी फिल्म बनवतांना उपयोगात येते. हे कसे करावे याचे उत्तम उदाः तुम्हाला INSTAGRAM वरील @gacchivrchi_baug या अंकाऊंट वर पहायला मिळेल.
अनुभवी व्यक्तीकडून आपल्या बागेचे चित्रण करून घ्या. कारण ही सुध्दा एक महत्वाची गोष्ट आहे. जि तुम्हाला बागेची स्पर्धा जिंकून देवू शकते.
युट्यूबचा चौकसपणे सल्ले आमलांत आणा.. सध्या सर्वच प्रकारचे शिक्षण हे युट्यूबवर उपलब्ध आहे. पण बरेचदा लोक आपल्याला त्यातील फार कळते असा आव आणून व फक्त चेहरा दाखवून सल्ले देत असतात. प्रत्यक्षात काम करणार्या व्यक्तिचे व्हिडीओ पहावेत. खरंच ही व्यक्ती त्यातील आहे का? याचा मागोवा घ्या. कारण सुंदर चेहरा व आवजातील मधूरता ऐकून लोक सल्ले आमंलात आणतात. तसेच ही मंडळी सर्वच प्रकारची व्हिडीओ बनवतात. हा मोबाईल चांगला तो वापरा. ईकडे फिरायला गेलो त्याची अनुभव सांगणे. अशा व्यक्तिपासून दूर रहा. कारण आज इंटरनेटच्या काळात बरेच चित्रीकरण विनामुल्य मिळत असते. ईकडून तिकडून हे चित्र गोळा करायचे. चांगले हेडींग द्यायचे व पैसे कमवायचे एवढेच यांचे काम असते. त्यामुळे जेन्यूईन व्यक्तीचा शोध घ्या. त्यांना फॉलो करा. त्यांच्या संपर्कात रहा.
शत्रु किटकातील प्रमुख कीड असते ति म्हणजे वाळवी. वाळवी म्हणजे काय? ति का जन्माला येते ? ति का वाढीस लागते ? ति कुठपर्यंत आपल्याला व किती व कसे नियंत्रीत करायची या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
वाळवी, दिमक, Termite
बाग फुलवायची म्हणजे त्यात मित्र किटक, शत्रू किटक आलेत. त्यात काहींची आपल्याला उगीच भिती वाटत असते. तर कधी काहीच होत नाही म्हणून त्याकडे अक्षम्य दुर्लक्षही केले जाते. तर काहींना उगीचच शत्रू मानून त्यावर अघोरी उपाय केले जातात. या शत्रु किटकातील प्रमुख कीड असते ति म्हणजे वाळवी. वाळवी म्हणजे काय? ति का जन्माला येते ? ति का वाढीस लागते ? ति कुठपर्यंत आपल्याला व किती व कसे नियंत्रीत करायची या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
वाळवी म्हणजे काय ? वाळवी ही बागेत पडलेल्या, सुकी लाकडं, फांद्या यांना खाण्याचे काम करते. ती खाऊन त्याची माती तयार करते. व ज्या लाकडाभोवती लागते त्याभोवती ति मातीचे आवरण तयार करते. वाळवी ही अनेक प्रकारची असते. मुख्यतः वाळवी ही वाळलेलीच काष्ट अर्थात लाकडं खात असते. फार कमी जातीच्या वाळवी असतात ज्या ओल्या लाकडांना खात असतात. वाळवी ही आंब्याच्या खोडाला लागते. कारण आंबा ठराविक वयाचा झाला की त्यावर सुकलेले आवरण तयार होते. ते नैसर्गिक रित्या काढून टाकण्याचे काम करते. वाळवी ही घातक नसते. ती उपकारक असते. पण हीच वाळवी घरातील फर्निर्चरला, जुन्या कागदांना खाते. वेळोवेळी स्वच्छता असली तर ति पण आपल्यापासून दूरच राहते. सध्याच्या काळात केमिकलचा वापर करून तयार केलेले फर्निर्चर असल्यामुळे ति सहसा लागत नाही.
बागेत वाळवी लागण्याचे कारण म्हणजे जूनी झालेली झाडांची खोडं. खर तर जंगलात वारूळे वाढण्याचे एक प्रक्रिया आहे. मोठ मोठी झाडे नैसर्गिक रित्या वाळून जातात. त्याची खोडं ही तशीच वर्षानुवर्ष जमीनीत गाडलेली असतात. यात ही खोड खाण्याचे काम वाळवी करत असते. लाकूड खाऊन झाले की त्यात जो पोकळपणा तयार होतो. तेथे मुंग्या अधिवास करतात. थोडक्यात वारूळंही मुंग्याची नसतात. त्याचा मुळ मालक ही वाळवी असते. अर्थात यात वाळवी हे मुंग्याचे खाद्य असते. एकाच रेषेत असलेली वारूळांच्या खाली पाण्याचे प्रवाह असतात. त्यामुळे वारूळ्याच्या जवळपास आपल्याला पाण्याची कुपनलिका तयार करू शकतो. तसेच हा प्रवाह किवां दिशा ही नदीच्या दिशेला घेवून जातात. असे हे शाश्त्र आहे. असो..
बागेत मुंग्या होत आहेत म्हणून त्यावर नियंत्रण मिळवायला गेलो तर वाळवीचे प्रमाण वाढत जाते. कारण त्यांना खायला कुणीच नसते. त्यामुळे मुंग्या या परसबागेत असणे हे उत्तम आहे. तसेच वारंवार वाळवी होत असल्यास किंवा मुंग्या होत नसल्यास परसबागेच्या एका कोपर्यात कंपोस्टींगचा एरोब्रिक्सचा हौद कराव्यात. येथे वाळवी व मुंग्या सहजिवन पध्दतीनी एकत्र नांदतात. किंवा एकाच जागेवर एकवटतात.
वाळवी घरात येण्याची शक्यता असल्यास त्यांना नियंत्रीत करणे गरजेच आहे. कारण त्याला काहीच पर्याय नाही. पण उगीचच घाबरून जावून त्यावर नियंत्रण मिळवू नये. तसा प्रयत्नही करू नये. जिव जिवस्य जिवनम हे निसर्गाचे तत्व आहे. निसर्गाती प्रत्येक जन्माला आलेला जीव, वनस्पती ही परस्परांचे अन्न आहे.
जून्या जिवंत झाडांच्या सालीला वाळवी लागल्यास मिठाचे पाणी फवारावे. बागेत थोडफार व वरचेवर खडे मिठाचा वापर केल्यास वाळवी ही नियंत्रीत होते. त्यामुळे पूर्वी लाकडी बांधकाम करतांना जमीनीत खडे मिठ टाकले जायचे त्यामुले वर्षानुवर्ष लाकडी वाडे ही शाबूत रहायचे. नंतर नंतर डांबराचा वापर करायला लागले.
तसेच थोड्या प्रमाणात असल्यास कपडे धुण्याच्या साबणाचा वापर करावा. पण तेही रसायन आहे. इतर सुक्ष्म जिवांना घातक ठरतात. मातीची उत्पादकता कमी होते. या पेक्षा रॉकलची फवारणी ही योग्य ठरते. तसेच देशी गायीच्या गोमुत्राचीही फवारणी ही फायदेशीर ठरते.
आंबा, नारळ, आवळा जांभूळ अशा फळझांडाना हात पोहेचेल तिथपर्यंत (साधारण ५ -६ फूटापर्यंत) या झाडांना ऑक्टोबर महिण्यात चूना व गेरूचे आवरण द्यावे म्हणजे वाळवी लागत नाही.
बरेचदा मंडळी ही कच्च्या शेणखताचा वापर करतात. शेणखत हे किमान वर्षभर तरी चांगले मुरलेले अथवा कंपोस्ट झालेले असावे. शेणखत कच्चं व अर्धवट असल्यास त्यास वाळवी लवकर लागते व आयतेच आमंत्रण दिल्यासारखा होते.
परसबाग, शेतातील, फळबागेतील परिसर वरचेवर स्वच्छ करणे गरजेचे असते.
मिठ हे नैसर्गिक आहे. या ऐवजी थायमेट पण रसायन वापरले जाते खरे. पण त्याचा दुर्गंध फार येतो तसेच ते पाण्यात, मातीत मिसळणे घातक आहे.
वसुंधरा जैसे थे होणे अशक्य आहे. पण त्याला वेळीच उपाय नाही केला तर मागे फिरणे शक्य नाही. बरे पुढेच जायचे म्हणजे कडेलोटच आहे. एकप्रकारे ठरवून केलेली आत्महत्या होय. या सर्वांचे कारण म्हणजे प्रदुर्षीत होत चालेली माती. आपल्याला कसे सर्व इंस्टंट हवेय. तूप खाल्ले की रूप आले पाहिजे. इनपुट दिले की लगेच आऊटपूट पाहिजे. या सार्या हट्टहासापायी आपण मातीचा पोत, मातीची सुपिकता गमावत आहोत.
ही पृथ्वी समस्त जिवांचे पालनपोषण करू शकते पण एका व्यक्तिचा लोभ पूर्ण करू शकत नाही. – महात्मा मो.क.गांधी
नुकताच वसुंधरा दिन साजरा झाला. वसुंधरेला बहूप्रसवा सुध्दा म्हणतात. कणाकणातून ति अन्नांची, जिवांची निर्मिती करत असते. पण सो कॉल्ड हुशार माणसाने या सर्वांचा जवळपास सत्यानाश करून टाकलाय. सगळीकडे जंगल तोड, मोजक्या झाडांची पूर्नलागवड. वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे, वाढत्या औद्योगीकीरणामुळे घटत चाललेले शेती क्षेत्र. या सर्वांचा परिपाक म्हणजे वाढते तापमान. आपल्याला काय पुढील पिढीलाही काय चाललय हे कळेनासं झालयं. ज्यांना कळतंय त्यांना वळत नाही. वळालं तर सातत्यता नाही.
वसुंधरा जैसे थे होणे अशक्य आहे. पण त्याला वेळीच उपाय नाही केला तर मागे फिरणे शक्य नाही. बरे पुढेच जायचे म्हणजे कडेलोटच आहे. एकप्रकारे ठरवून केलेली आत्महत्या होय. या सर्वांचे कारण म्हणजे प्रदुर्षीत होत चालेली माती. आपल्याला कसे सर्व इंस्टंट हवेय. तूप खाल्ले की रूप आले पाहिजे. इनपुट दिले की लगेच आऊटपूट पाहिजे. या सार्या हट्टहासापायी आपण मातीचा पोत, मातीची सुपिकता गमावत आहोत. हे झाले अनैसर्गिक खते वापरामुळे तर होतच आहे. पण औद्योगीकीरण, रोजच्या जिवनात वापरले जाणारे विविध रसायने यामुळे पाणीही प्रदुर्षीत होत आहे. ते मातित मिसळले की मातीही खराब होते. मातीतील आपण प्रदुर्षण रोखले तर धरणीमाता बहुप्रसवा गुणधर्मानुसार ति तिचे पूर्नजिवन नक्कीच करू शकते.
मानवी वस्त्या या सुपिक जमीनीच्या लगत वसत गेल्या वाढत गेल्या. आता सुपिकता फक्त अमेझॉनच्या खोर्यातच पहायला मिळेल. कारण आज तिथे तरी मानवी हस्तक्षेप फार कमी आहे. पूर्वीतर ही सुपिक माती सर्वत्र रहात होती. त्यातून अनेक जिव तयार होत होतेच. शिवाय त्यांच्या संगोपनासाठी अन्नही ही मातीच तर तयार करत होती. अर्थात अन्न मिळवण्यासाठी संघर्ष हा प्रत्येक जिवाला करत लागत होता. आहे.. पण किमान अन्न तरी उपलब्ध होते. आज अन्नच काय पाणी मिळणे सुध्दा दुरापास्त झालेय. कारण ते पुरवणारी नैसर्गिक व्यवस्थाच ऑक्सीजनवर आली आहे.
माती सुपिक असली तर नैसर्गिकरित्या पडणार्या पावसाच्या पाण्याचे व्यवस्थितरित्या जिरते. पाण्याला योग्य गती असली की तिच्या सहयोगाने जिवसृष्टी हिरवीगार होऊ लागते. उघडे बोडके डोंगर, टेकड्या, डांबरट रस्ते यामुळे आता पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले. बदाबदा पडणारा पाणी न साचता, झिरपता वाहून जाते. पर्यायाने पूरसुध्दा येतो.
आज शेतात, घरपरिसरात, गच्चीवर माती सुपिक कशी बनेल याच्या जर उपाययोजना केल्या तर नक्कीच आपण पाणी जिरवू शकतो. माती सुपिक बनवण्यासाठी जमिनीवर जास्तीत जास्त पालापाचोळ्याचे आच्छादन द्या. कुंड्या भरण्यासाठी पालापाचोळा किंवा त्याचा चुरा (बिशकॉम) वापरा. मातीतील सुक्ष्मजीव वाढीस पोषक वातावरण तयार करा. मातीत कोणतेही रसायने मिसळू नका. कारण त्यांच्या वापरामुळे सुक्ष्मजीव हे मरून जातात. पर्यायाने माती ही निर्जीव होते. माती निर्जिव झाली की झाडं, रोपं उगत नाही. पर्यायाने त्यावर अबलंबून जिवांचे अन्न तयार होत नाही.
सुपीक मातीची लक्षणे पुढीलप्रमाणे समजून घेता येतील.
पूर्वी गर्भारपणात शेतातील काळी माती ही खाल्ली जायची. जखम झाली की त्यावर माती चोळली जायची. तसेच मातीनेच बरेच त्वचारोग हे बरे केले जायचे ज्याला मडबाथ असे म्हणतात. गांजली माशी चावली की त्या आग होणाऱ्या त्याच्यावर तुळशी खालची माती वापरली जायची. कारण असे सुपीक माती मध्येच उपकारक असे सूक्ष्मजीव असायचे जे आपल्याला आरोग्यासाठी उपयोगी ठरत असत. गावाकडे वळवाचा पाऊस पडला की सुगंध यायचा, तो सुगंध आपण हरवून बसलो आहोत पण आता मातीची प्रदूषित झाल्यामुळे अनेक गोष्टींवर बंधने आलेले आहेत आणि त्याचे दुष्परिणाम पण जाणवत आहेत.
I would like to introduce you to a unique product called Bishcom. Bishcom means biomass shredding compost material. You can use it as cocopith. Having done terrace gardening for more than one decade, we found a few difficulties using cocopith.
Hi Friends
I am Sandeep Chavan from Home Grow Vegetable Services in Nasik. We are also called Gacchivarchi baug, which means Terrace Garden.
I would like to introduce you to a unique product called Bishcom. Bishcom means biomass shredding compost material. You can use it as cocopith. Having done terrace gardening for more than one decade, we found a few difficulties using cocopith.
Essentially coco pith is not manure, but a potting mixer, since it only reduces porosity in limited time and increases water retention in excess of requirements. Basically, every plant is different in how it consumes water. But how are we to judge?
90 % water creates multiple problems when plants are growing, blooming, fruiting, and attracting pesticides, which ultimately leads to plants dying.
Using Bishcom, we are able to overcome all types of plant problems and also create naturally humid environment that plants need. Plants do not consume water directly, they consume moisture.
So we create Bishcom. Bishcom is made from shredded dry leaves and branches.
There are very small pieces in different sizes and it is fermented in cow urine & Jiwamrut & then herbinated. Therefore it can be used by gardeners as potting mix. It is only created by gacchivarchi baug and is available in only Nasik.
बोनमिलला असलेला माझा विरोध. ते खत म्हणून उत्तमच आहे. त्या बद्दल वादच नाही. पण ते ज्या कारणामुळे तयार होते त्याला विरोध आहे. अर्थात मी सफेद रंगाची टूथपेस्ट वापरतच नाही. मी सारेच मजंण एकत्र करून दात घासतो. असो. विरोध यासाठी आहे की आपण एका बाजूला गोधन वाचले पाहिजे म्हणून प्रयत्न करायचे. पण त्याना ज्या मासांहारासीठी जिवंत कापले जाते. त्यासाठी ज्या पध्दतीने त्यांची तस्करी होते त्यांचे मांस विकले जाते त्यांच्याच हाडातून तयार होणारे हे खत झाडांना वापरणे हे खरचं किती अर्थाने नैतिक आहे.
बोनमिल म्हणजे काय ?
ते कसे तयार होते ?
बोनमिल हे नैसर्गिक खत आहे का ?
त्याचा कुंड्यातील झाडांना कसा उपयोग करायचा?
ते उन्हाळ्यात वापरले तर चालते का ?
बोनमिलला पर्याय आहेत ?
या वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.
बोनमिल या नावावरूनच ते कशापासून बनलेले असावे याचा अंदाज येतो.
अर्थातच हाडांचा हा चुरा असतो. कत्तलखान्यात मारल्या जाणार्या जनांवरांची जी हाडे उरतात. त्याचा चुरा तयार केला जातो. अर्थात ही हाडाचा चुरा दात घासण्यासाठी ज्या ब्रॅंडेड टूथपेस्ट तयार होतात त्यातही वापरली जाते. तर हाडांमधे फॉसस्परस अर्थात गंधक व कॅल्शियमचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. झाडांना फुले येण्यासाठी नैसर्गिक गंधकाची गरज असते. अर्थात फूल येण्यासाठी बोनमिल हाच एक पर्याय आहे असे नाही. मी गेल्या दहा वर्षापासून भाजीपाला उगवून देण्याचे काम करत आहे पण एकदाही बोनमिल वापरलेले नाही. याचे कारण म्हणजे….
बोनमिलला असलेला माझा विरोध. ते खत म्हणून उत्तमच आहे. त्या बद्दल वादच नाही. पण ते ज्या कारणामुळे तयार होते त्याला विरोध आहे. अर्थात मी सफेद रंगाची टूथपेस्ट वापरतच नाही. मी सारेच मजंण एकत्र करून दात घासतो. असो. विरोध यासाठी आहे की आपण एका बाजूला गोधन वाचले पाहिजे म्हणून प्रयत्न करायचे. पण त्याना ज्या मासांहारासीठी जिवंत कापले जाते. त्यासाठी ज्या पध्दतीने त्यांची तस्करी होते त्यांचे मांस विकले जाते त्यांच्याच हाडातून तयार होणारे हे खत झाडांना वापरणे हे खरचं किती अर्थाने नैतिक आहे. हा माझा प्रश्न आहे. याचे समांतर उदाहरण म्हणजे मला माझा देश, परिसर स्वच्छ असावा म्हणायचे व त्यासाठी आग्रही धरतो पण मीच येता जाता कचरा कुठेही फेकला तर याला काय म्हणायचे. याला भ्रमित व्यक्तिमत्व मानले जाते. तर बोनमिल बद्दल हे माझे मत आहे. ते तुम्ही वापरून नये असा आग्रह नाही. ज्याला त्याला स्वांतत्र्य आहे. तर असो…
कुंड्यामधील झाडांना व परसबागेतील झाडांना खत देण्यात विविधता असावी हे मी बरेचदा सांगितले आहे. त्या विविधतेत बोनमिला समावेश करता येईल पण हाच एक पर्याय आहे असे नाही. गंधक हे भुरू भूरू जळते. ते सर्वच प्राण्याच्या हाडात जसे सापडते तसे ते कोणत्याही काष्ट वा झुडुपाच्या वाळलेल्या काड्यामधेही आढळते. जे झाडांत आहे ते पानांतही असणारच त्यामुळे गंध पुरवण्याची व्यवस्था निसर्गाने आपसूच केली आहे. निसर्गाने हा ईनबिल्ट प्रोग्राम केलेलाच आहे. पण माणूस म्हणून आपली बुध्दी तोडकी पडतेय. जे विकलं जातय तेच वापरलं जातय हा आजच्या अर्थव्यस्थेचा तकलादू पाया आहे. असो..
खत कोणते आहे त्यावर त्याचे झाडांना देण्याचे प्रमाण ठरते. बोनमिल, तंबाखू पावडर, राख, निमपेंड हे एका चौरस फुटाला एक चमचा भर द्यावे. शक्यतो ते सायंकाळी द्यावे, माती उकरून दिल्यास उत्तमच. म्हणजे उत्तमपणे ते मातीखाली झाकले जाते वा मिक्स होते. कारण तिव्र उन्हामुळे कोणत्याही खतातील घटक हे करपू शकतात. किंवा दिल्या नंतर मोजके पाणी द्यावे. म्हणजे ते अधिकच्या पाण्यामुळे वाहून जाणार नाहीत. तसेच जिवामृत, गोमुत्र, ह्युमिक जल या मधेही गंधक व कॅल्शियमचे प्रमाण असते.
खतं कोणतही असोत ती मोजक्याचा स्वरूपात द्यावी. कारण हे वर खत आहेत. वरखतं ही जेवणातील तेल मिठ, मिरची, लोणच्या सारखी असतात. किंवा बडी शोफ सारखी असतात. ती योग्य प्रमाणात सेवन केली तरच त्याला चव असते व त्याचा योग्य परिमाणात योग्य तो परिणाम साध्य करता येतो.
कोणत्याही दोन खतात ७ ते १५ दिवसांचे अंतर असावे. अर्थात त्यात खतांत विविधता असावी. एकच एक खत टाकल्यानेही झाडं किडीना बळी पडतात.
गंधक हे कंपोस्ट खतातून मिळते. तसेच गारबेज इंजाईम मधूनही मिळते. तसेच देशी गायीचे शेणखतातही असते. खरं तर डॉक्टर आपल्याला वरून साखर वा मिठ खायला सांगत नाही. त्यांचे म्हणणे असते की जे नैसर्गिक रित्या फळातून धान्यातून भाजीतून मिळते ते खरं मिठ साखर. तुम्हाला माहित असेन की घरची पालकात नेहमी प्रमाणे मिठ टाकून चालत नाही. कारण तिच्यात नैसर्गिकरित्या मिठाचे प्रमाण हे अधिक असते.
तर सारी व्यवस्था ही निसर्गात आहे. त्याचा वापर करायला आपण शिकले पाहिजे. काही मंडळीना हा लेख एकांगी वाटेलही पण थोडा विचार करून पहा.. आपल्याला निसर्ग फुलवायचा आहे. निसर्ग जपण्यासाठी तेही निसर्गालाच सोबत घेवून.. जे निसर्गाने त्यागले आहे त्याचा पूर्नवापर करण्याची अक्कल ही फत्त माणूस प्राण्यालाच दिली आहे. त्याचा वापर करायला आपण सर्वानी शिकले पाहिजे.
घराला, बंगल्याला शेताला आपण तारेचे अर्थात जाळीचे कुंपन केलेले असल्यास तुमचे अभिनंदन, कारण जाळीचे कुंपन हे पर्यावरणपुरक आहे. अशा कुंपनाला एक तर आपण प्रायव्हसीसाठी ग्रीन नेट लावू शकता. किंव त्यासाठी वेलवर्गीय वनस्पतीची लागवड करू शकता.
वेलवर्गीय वनस्पती लागवडीचे फायदे पहिल्यांदा पाहूया..
हवा खेळती राहते. कमीत कमी जागा लागते. कुपनांच्या दोनही बाजूला कुंपनाला खेटून बाग फुलवता येते. तसेच नारळ आंब्याची झाडे लागवड करू शकता. तसेच याभोवती बाग फुलवल्यास आपल्याला नैसर्गिक गारवा अर्थात तापमान नियंत्रीत करता येते.
अशा जाळीच्या कुंपनावर नेहमी ऊन येत असल्यास त्या ठिकाणी कोणकोणत्या वेलवर्गीय वनस्पतींची लागवड करता येते. ते पाहूया..
फळभाज्यांची वेलः सर्व प्रकारची फळभाज्या देणांरी वेल, तोंडली, तसेच मायाळू, विड्याची पाने.
शोभेचे वेलः गारवेल, कर्टन क्रीपर्स, मनीप्लांट,
बरेचदा मंडळी जाळीचे कुपनांवर वेल लावला तर ते सडून जाईल असा दावा करतात. ते काही अंशी खरेही आहे. पण वाळलेल्या फांद्या, काड्या वेळेवर स्वच्छ केल्या तर तेथे पाणी साचत नाही. त्यामुळे गंजण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच जाळीच्या सडण्यापेक्षा त्यापासून मिळणारा स्वच्छ प्राणवायू, डोळ्यांना सुखवणारी हिरवळ, पक्षांना मिळणारा आसरा तसेच त्यापासून मिळणारे पशू पक्षी व मानवासाठी मिळणारे अन्न हे अधिक सुखदायक आहे.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग. नाशिक.
वरील वेलवर्गीयांची अधिक माहिती याच संकेतस्थळावर नावानिशी शोधा..
आपण घर बांधतो, बंगला बांधतो किंवा शेती घेतो. बरीच मंडळी यासाठी विटांच्या भिंती (Compound Wall) बांधतात. पण अशा भिंत बांधण्याचे फायद्यापेक्षा तोटे अधिक आहेत. तर त्या ऐवजी तारेच कुंपण (mesh Wall) बांधणे सर्वार्थाने फायदेशीर आहे . थोडक्यात कोणत्या प्रकारच्या कुपनांचे फायदे तोटे काय आहेत हे आज आपण या लेखातून पहाणार आहोत.
विटांची भिंत बांधण्याचे तोटे काय काय आहेत ते पाहूया..
विटांची भिंत ही खर्चीक असते.
कालांतराने त्यास तडे जातात.
जागा वाया जाते.
हवेचा अटकाव होतो.
विटांची भिंत ही खर्चीक असते. बरेचदा बंगल्यातील भिंतीचे बांधकाम हे सिंगल विटेत असते. तर कुपनाचे बांधकाम हे डबल विटेत करावे लागते. तसेच त्यास आतून बाहेरून प्लास्टर करणे, त्यास रंगरंगोटी करणे हे सारेच खर्चिक असते. तसेच त्यास ठराविक उंचीपर्यतच बांधकाम होते. कारण उंची वाढवण्यासाठी अधिक खर्च असतो. तसेच ति पडली तर त्यास पुन्हा खर्च येतो. तसेच या सार्या गोष्टीत नैसर्गिक संसाधने, मजूरी, वेळ हा खर्च येतोच.
कुंपनाची भिंत पडण्यास अनेक कारणे असतात. त्यास कालांतराने नैसर्गिक तडे जातात. ते उन पावसामुळे वाढत जातात. तसेच भिंतीच्या बाजूला एकादे नारळ आंब्याचे झाड असल्यास तेही भिंतीस तडे जाण्यास कारणीभूत ठरतात. कालांतराने इच्छा असूनही झाड काढून टाकण्यास प्राधान्य देतो. तसेच भिंती कधीही पडण्याची भिती असतेच त्यामुळे इतरांना शारिरक इजा होण्याची शक्याता अधिक असते.
विटांच्या भिंत ही किमान एक फूट रूंद तरी असते. त्यापेक्षा कमी रूंद असल्यास ती लवकर पडते. एक फूट रूंद असलेली भिंतीच्या आतून बाहेरून दीड ते दोन फूट जागा सोडूनच झाडे लावता येतात. त्यामुळे एकतर ही झाडे आगावूपणाने रस्त्याची जागा अडवतात. किंवा भिंतीच्या आतील जागा खातात. त्यामुळे विटांच्या भिंती बांधू नये..
खेळत्या हवेला अटकावः विटांची भिंत ही खेळत्या हवेला अटकाव करत असते. पर्यायाने घराभोवती असलेली बाग कीडीला अधिक बळी पडते. तसेच कोंदट वातावरण, स्वच्छ सुर्यप्रकाशाचा अभवा या सार्या गोष्टीची शक्यता अधिक असते. तसेच भिंत उंच असल्यामुळे भिंतीच्या जवळ छोटी फुलझाडे लावता येत नाहीत. कारण तेथे ऊनच पोहचत नाही.
या वरील कारणामुळे विटांची भिंत बांधू नये. मग याला पर्याय काय…
याला पर्याय आहे. तारेचे कुंपन अर्थात जाळीचे कुंपन तयार करावे.
याचे फायदे काय काय आहेत. ते पाहूया..
जलद गतीने व कमी खर्चात कुंपन तयार होते.
पूर्नबांधणीस कमी खर्च लागतो.
जागा वाचते
बाग फुलवता येते.
बागेसाठी हवा खेळती रहाते.
हवी तेवढी उंची वाढवता येते.
तारेचे कंपन हे जलद गतीने तयार होते. तसेच भिंती पेक्षा याचा खर्च कमीच येतो. मजूरी वाचते. नैसर्गिक संसाधनाचा कमीत कमी वापर होतो. शिवाय यास भंगार मुल्य अथवा पुर्नवापर करता येतो.
अशा कुंपनास पूर्नबांधणीचा खर्च जवळपास नसतोच. असलाच तरी फार कमी येतो. वेळोवेळी रंग रंगोटी केल्यास लोखडी एंगव व तारेची जाळी ही बरीच वर्ष टिकते.
तारेच्या कुंपनामुळे जागा वाचते. तारेचे कुंपन हे जास्तीत जास्त २ ते ४ इंच जागा व्यापते. किंबहुना त्याही पेक्षा कमी. तसेच याच्या आजूबाजूला हिरवळ फुलवता येते. नारळ आंब्याची झाडे वाढवता येता, अशा कुंपनाला या झाडापासून कोणताही धोका नसतो. झालाच तर त्यास कमी वेळात तसेच कमी खर्चात त्याची पुर्नबांधणी करता येते. येथेच्छ बाग फुलवता येते.
तसेच अशा कुंपनामुळे हवा खेळती राहते. राहिलाच प्रश्न प्रायव्हिसीचा तर त्यास हिरवे कापड ( Green Net) लावता येते. किंवा त्यावर वेल वर्गीय वनस्पती लावून दृष्यता अडवता येते.
तसेच हे कुंपन हवे तेवढे उंच तयार करता येते.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग,नाशिक.
हा पण लेख नक्की वाचा…तारेच्या कुंपनावर वेलवर्गीय कोणत्या वनस्पती लागवड करता येतात…
बरीच मंडळी आपल्या घराच्या, बंगल्याच्या आवारात, शेतावर, फार्महाऊस येथे नारळाचे झाडे लावतात. काही खोबर्याचे नारळ असते कर काही पाणीदार शहाळ देणारं नारळं असतात. यांना येणारी नारळं ही वेळेवर काढली गेली तर त्याचा उपयोग होतो. रोज उपयोग करण्यायोग्य अनेक गोष्टीही असतात. बर्याच मंडळीना एकतर रोज काय उपयोग करायचा हे ठावूक नसत किंवा कुटुंबातील संख्या कमी असल्यामुळे त्याची विक्रीपण करतात.
पण घरीच नारळ किंवा शहाळाचा उपयोग करत असतील तर त्याचा कचरा फार तयार होतो. ही ओली शहाळं व सुक्या नारळांच्या कचर्याचं काय करायचं हे सांगणारा हा लेख…
सुकी नारळ असतील तर ते हॅंड ऑपरेटेड मशीन ते सोलून घ्यावे. त्यातील पाणी काढता आले तर उत्तम. बरेचदा त्यातील खोबरे काढणे जरा वेळखाऊ व जिकरीचे असते. यावर उपाय आहे. त्या दोन वाटयांना उपडेच उन्हाच्या दिशेने ठेवा. कालातंराने नारळाच्या टणक भागापासून खोबरे सहजतेने बाजूला करता येते.
सुक्या नारळाच्या शेंड्या, सुकी शहाळं ही तुकडे करून कुंड्या भरतांना तळाशी वापरा किंवा एरिओ ब्रिक्स कंपोस्टींग अथवा एरिओ ब्रिक्स बेड पधद्तीत तळाशी वापरा म्हणजे वर्षभराने ते कुजून जातात.
ओली शहाळं असल्यास त्याचे व्यवस्थापन वेगळ्या पध्दतीने करावे लागते.
आपल्याकडे फार्म हाऊस असल्यास किंवा शेतातील जमीन पुरता येतात. त्यासाठी ओल्या शहाळात, शेण, ओली माती भरावी. व हे उलटे करून ठेवावेत. व मातीने झाकून टाकावेत. व विसरून जावे म्हणजे कालांतराने म्हणजे वर्षभरात याचे जमीनीत छान खतात रूपांतर होते.
आपल्याला त्याचे घरीच व्यवस्थापन करावयाचे असल्यास त्याला खालील प्रमाणे उपाय करता येतील.
त्याचे तुकडे करा. वाळवून घ्या, कंपोस्ट हौदात, ड्रम मधे त्याचे खत तयार करता येईल.
तुकडे करून वाळवून घेतल्यास त्याचा इंधन अथवा शेकोटी म्हणून वापर करा.
बागेत कुंड्या किंवा वाफा भरण्यासाठी त्याचा वापर करा.
ही शहाळं वाळल्यानंतर त्याचा रोपे लावण्यासाठी उपयोग करा.
त्याचे कोकोपीट तयार करता येईल. पण त्यासाठी घरगुती श्रेंडींग मशीनची गरज लागेल.
गच्चीवरची बाग आता नऊ वर्षाची पूर्ण होतेय. मार्च २०२१ पासून दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे.
फक्त ऐकले होते शहरी शेती केली जाते. पण ति कशी करतात. काय करतात. काहीच माहित नव्हते. २००५ पासूनच प्रयोगांना सुरूवात झाली होती. पण त्याही आधी मला कचरा व्यवस्थापनात विशेष रूची होती. पुणे मुंबई सारखी नाशिकची स्थिती होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो. त्यात नाशिककरांचा सहभाग कसा घेवू शकतो हाच तो काय विचार होता. होम कंपोस्टींगवर प्रयोग करता करता नैसर्गिक, विषमुक्त, रसायनमुक्त भाज्या पिकवण्याकडे अर्थात शेती कडे कल वाढला. पण कंपोस्टींग विषय काही डोक्यातून जात नव्हता. प्रयोग करता करता चिंतनातून या दोनांची सांगड घातली गेली नि मागे वळून पाहिलेच नाही. प्रत्येक प्रयोग यशस्वी होत गेला. गच्चीवरची बाग पुस्तक प्रकाशीत केले. नि याला पूर्णवेळ देवून अर्थाजनाचे साधन होईल याचा कधीही विचार नव्हता. पण बागप्रेमीचा पाठींबा मिळत गेला. भांडवल गुंतवून हळू हळू व्यवसायात अर्थात पूर्ण वेळ काम करण्याचे ठरवण्यात आले.
आज आम्ही तीन विषयात काम करत आहोत.
कंपोस्टींग…
यात होम कंपोस्टींग, झाडपाल्याचे कंपोस्टींग, गुरा ढोरांच्या शेणाचे कंपोस्टींग करत आहोत. हे सारे जैविक कंपोस्टींग करण्यासाठी विविध प्रकारचे सेटअप तयार केले आहे. जे कचर्याच्या स्वभाव, आकार, उपलब्ध जागा, दिला जाणारा वेळ, पैशाची गुंतवणूक व उपलब्ध जागा या नुसार तयार केले आहेत.
गार्डेनिंग...
या विषयात आम्ही ऑरगॅनिक पध्दतीने भाजीपाला उत्पादन, फुलझाडे व फळझाडांचे संगोपन व वाढ, उत्पादनावर काम करत आलो आहोत.
स्पेस डेकोरेशेन …
या विषयात विविध उपलब्ध जागेत निसर्गाचे सानिध्य कशा प्रकारे तयार करता येईल या विषयी हॅंडमेड उत्पादने तयार केली जातात. व त्यात निसर्ग फुलवला जातोय.
आज गच्चीवरची बाग नाशिकचे काम पाच विभागात करत आहे.
Grow : ऑरगॅनिक पध्दतीने भाज्या उगवतो व उगवून देतो.
Guide : यासाठी इच्छुकांना विविध सोशल मिडीयाव्दारे मार्गदर्शन करतो.
Build: भाज्या उगवण्यासाठी उपलब्ध जागेनुसार सेटअप तयार करतो.
Products : ऑरगॅनिक भाज्या उगवण्यासाठी लागणारे संबधित गोष्टीचे उत्पादनं करतो.
Sale N : ही उत्पादनांची आम्ही ऑनलाईन ऑफलाईन विक्री करतो.
Services : उपलब्ध जागेत फळझाडे, फुलझाडे, भाजीपाला उत्पादनांसाठी सेवा सुविधा पुरवितो.
हे विभाग जसे जसे वाढत गेले. तस तसे आमच्या कामाचा विस्तार होत गेला. आजमितीला पाच ठिकाणी आमचे काम विस्तारत आहे. अर्थात ही अशी ठिकाणं आहेत जेथे आमचे काम तुम्हाला पहाता येईल, अनुभवता येईल.
Garden Lab..
गार्डन लॅब म्हणजे आमचे स्वतःचे टेरेस ज्यावर आम्ही आमच्यासाठी ऑरगॅनिक भाज्या उगवतो. ज्यात विविध तर्हेचे प्रयोग केले जातात.
Garden Studio…
गार्डेन स्टुडिओ ज्यात वरील कामासाठी लागणारे साहित्य संग्रह, रोजचे काम, उत्पादनाचे डिस्पले केले जाते. हा स्टुडिओचा आम्ही विविध तर्हेने वापर करत असतो. थोडक्यात ज्याला मल्टीपर्पज स्पेस असे म्हणू शकतो.
Garden Digital…
वरील कामकाज चालण्यासाठी ई माध्यमांव्दारे लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यात सातत्याने जाणीव जागृती होण्यासाठी व्हिडीओ, लेख, पोस्ट करणे असे कामकाज चालते. थोडक्यात यात आम्ही जाहिरात व मार्केटिंग हे विषय हाताळले जातात.
Garden Shopy…
गच्चीवरची बागेव्दारे जे काही उत्पादने केली जातात. ती इतर जिल्हा, राज्यात पोहचण्यासाठी फ्रांचाईजी स्वरूपात गार्डेन शॉपी तयार करण्यात येत आहेत. ज्यात स्थानिकांना सहजतेने गच्चीवरची बागेची उत्पादने खरेदी करता येतील व सहकार्यांना रोजगार मिळेल या उद्देशाने सुरू आहे.
Garden community…
गार्डेन कम्यूनिटी म्हणजे आम्ही ज्यांच्या घरी भाजीपाल्याच्या बाग तयार करून दिल्या आहेत ते कुटुंब होय. आजपर्यत आम्ही साडेसातशे ठिकाणी भाजीपाल्याचे उपलब्ध जागे नुसार सेटअप बिल्ड करून दिल्या आहेत. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते.
ईथ पर्यंत प्रवास हा आमच्या एकट्याचा नव्हताच. व पुढचा प्रवास ही एकट्याने करण्यासारखा नाही. हे काम लोकांपर्यत पोहचण्यासाठी प्रत्येकाने आपाआपले पर्यावरणीय सहभाग व पुढाकार नोंदवला आहे. त्या ज्ञात अज्ञात व्यक्तिचां गच्चीवरची बाग मनापासून ऋणी आहे. कारण हा फक्त व्यवसाय (प्रोफेशन) नाही तर पर्यावरण संवर्धनासाठी आमची आस (पॅशन) आहे. ज्यात आपण सारेच हातात हात घालून आरोग्य, पर्यावरण संरक्षणाच्या क्षितीजाकडे जात आहोत.
गोगलगाय नि पोटात पाय अशी आपल्याकडे म्हण आहे. दिसायला गरीब असली तरी फार उपद्रवी कीडा आहे. ऑरगॅनिनक पध्दतीने बाग फुलवायची म्हणजे कीडीचा त्रास आलाच. त्यातील झिरो टॉलरन्स म्हणजे अजिबात सहन करायची नाही डायरेक्ट एक्शनच घ्यायची. नाहीतर तिच बागेचा करेक्ट कार्यक्रम करते. कारण ही जलद गतीने स्वतःची संख्या वाढवते व त्याच गतिने बागेतील नवीन व कोवळी पाने, छोटी रोपे, अंकुर फस्त करत असते. दिवसेंदिवस या कीडीचा शेतात व बागेत त्रास वाढत चालला आहे. थोडे जरी दुर्लक्ष केले तरी त्यांची संख्या फार त्रासदायक होते.
गोगलगाय ही विषारी कीड नाही. स्वरक्षणासाठी सोडत असलेला पांढरा स्त्राव हा सुध्दा विषारी नाही. तिला सहजतेने हाताळता येते. उचलून फेकता येते. काही मंडळीना हा किळसवाणा किडी वाटतो. कारण तो लिबलिबत, अतिशय मऊ, प्रसंगी थंड स्पर्श असेलला कीडा आहे. गोगलगायी ही चिकट शेबडासारखा स्त्राव सोडते. गांडूळ व गोगलगाय या कीडीना हाड नसते. जपान मधे गोगलगायीचा उपयोग ब्यूटी थेरेपी म्हणून करतात. तेथे चेहर्यावर फिरवतात. त्याने त्वचा तुकतुकीत व चमकदार होते. ही कीड निशाचर आहे. बागेतील ओलावा, थंडावा असलेल्या जागेवर, भेगामधे , कुंड्याच्या कडामधे, मातीखाली वास्तव्य करते.
ऊन, गरम हवा, प्रकाश यांना सहन होत नाही. वाढत्या तापमानात यांची संख्या कमी होत जाते तर पावसाळ्यात यांची संख्या फार झपाट्याने वाढते. प्रतिकूल परिस्थीतही त्या तग धरून असतात. विना ऑक्सीजन व अन्नपाण्याशिवाय त्या राहू शकतात. गोगलगाय दोन प्रकारात असतात. जिला शंखाकृती वा गोलाकार कवच असते. व दुसरा प्रकार जिला हे कसलेही कवच नसते. शंखाकृती गोगलगायी या मोठ्या असतात. तर पाठीवर गोलाकार कवच असलेल्या गोगलगायी छोट्या व लांबट असतात.
तर पाठीवर कवच असलेल्या व विचा कवच असलेल्या गोगलगायी छोट्या असतात. विना कवच असलेल्या गोगलगायी या पावसाळ्यात व हिवाळ्यात या गोर्या पाठीच्या असतात. तर वाढत्या उन्हाल्यात यांची पाठ ही काळी पडते. तसेच यांची पिल्लावळ ही नखाच्या आकाराची असतात. त्यांना शंखाकृती छोटे कवच असते. यावर रासायनिक उपाय आहेत. पण ऑरगॅनिक पध्दतीने बाग फुलवतांना मातीत रसायने टाकली तर माती खराब व निर्जीव होते. रसायनांच्या वापरामुळे मित्र किटक मरत असतात. जैवविविधता संपून जाते.
त्यामुळे रासायनिक उपाय करू नका. मग त्यावर नैसर्गिक उपाय हाच उत्तम पर्याय आहे. गोगलगायीवर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गोगलगायीना फक्त भारव्दाज पक्षी व बदक खातात. बाकी ते गिळगिळीत असल्यामुळे इतर पक्ष्यांच्या गळ्यात उतरत नाहीत. त्यातील रामबाण ठरणारी काही उपाय पाहणार आहोत. बागेत कोणतही कीड असेल तर त्या वेचून फेकणे हा सर्वात चांगला, रामबाण व बिनखर्चीक उपाय आहे. गोगलगाय सुध्दा वेचून फेकून देता येतात.
गच्चीवर बाग असेनतर त्या मोकळ्या प्लॉट, खुल्या मैदानात, पटागणांत फेकून द्याव्यात पण काही काळाने त्या परिसरात वाढतच जातात. जमिनीवर बाग असेन तर मग त्या हमखास तुमच्या बागेत परत परत फिरून येतात. गोगलगाय फेकून देणे सोपा मार्ग आहे. पण त्यापेक्षा त्यांना एकाद्या प्लास्टिक बॅगेत, बाटलीत हवा बंद कराव्यात. मग त्या घंटागाडीत टाकाव्यात किंवा संग्रहीत करून ठेवल्यास त्याचे कालातंराने छान खत तयार होते. महिनाभर प्लास्टिक बाटलीत भरून त्या सावलीत ठेवल्या तरी त्या जिंवत होत्या. अशी ही चिवट कीड आहे. गोगलगाय नियंत्रणासाठी दुसरा पर्याय आहे.
तो म्हणजे तंबाखू पावडरचा वापर करणे. तुबाखू पावडरचा दोन प्रकारे वापर करता येतो. बागेत कुठेही गोगलगाय, छोटी पिल्ल दिसली तर त्यावर तंबाखू पावडर टाकणे हा सोपा पर्याय आहे. व दुसरा पर्याय म्हणजे मुठभर तंबाखू एक लिटर पाण्यात भिजवावी व गोगलगायी वेचून त्यात टाकत जाव्यात. कालांतराने हे पाणी बागेत एकाद्या झाडाला खत म्हणून देता येते. नखाएवढ्या आकाराची गोगलगायीची पिल्ल वेचता येत नाही. त्यावर तंबाखू पावडर टाकावी.
गोगलगायीची अंडी ही साबुदाण्याच्या आकाराची गुच्छाने असतात. मोह वाटावा असा तो पुंजका असतो. मनुष्याचा सहसा वावर नसेन या ठिकाणी त्या निवास करतात वा अंडी घालतात. अशी अंडी तुम्हाला आढळल्यास त्यावर तंबाखू पावडर टाकावी अथवा प्लास्टिक पिशवीत बंद कराव्यात. बागेतील कॅल्शीयम हे खनिज कमी झाल्यामुळे यांची संख्या वाढत असते. अशा वेळेस चूना पाण्याची फवारणी करावी. तसेच यांनी रात्रीच्या वेळेस वेचावेत. किंवा बागेत फरशी, गोणपाठ, पृष्ठा ठेवावा त्याखाली त्या गारव्यामुळे जमा होतात. त्यामुळे एकाच ठिकाणी त्या मिळतात. गोगलगायीला कॅबेजची ताजी व सुकी पाने फार आव़डतात. ही पाने एका जागेवर ठेवावीत व रात्री ते खायला एकत्र जमतात. तेव्हा त्या वेचून जमेल तो उपाय करावा.
तसेच बागेची वेळोवेळी कुंड्या हलवून स्वच्छता करावी. कुंड्याची जागा बदलवणे, त्याच्या बाहेरी कडा अथवा तळ तपासून पहावा. कारण त्या तिथे चिटकलेले असातात. हे उपाय केल्यास त्यांना नियंत्रीत करता येते. सांयकाळी चार पाच वाजता पाणी दिल्यास बाग लवकर थंड होते. व गोगलगाय या लवकर बागेत फिरायला येतात. त्यावेळेस त्यांना मोबाईल्या प्रकाशात वेचणे सोपे जाते.
माझं नाशिक स्वच्छ सर्व्हेक्षणात पहिल्या पाच मधेही येत नाही. मागील अनेक वर्षापासून आपण सारेच या एकाच वर्गात आहोत. पुढे जाणे सोडाच एका जागेवर स्थिरपण नाहीत. अर्थात यात फक्त स्थानिक प्रशासनच नाहीत तर नागरिकही जबाबदार आहेत. आणि हे संघटीत नाशिककर, कुटुंब म्हणून अपमानजनक आहेत. अर्थात हा अपमान किती मनावर घ्यायचा. घ्यायचा की नाही मुळातच हा नाशिककरांचा अपमान होण्यासारखा हा मुद्दा आहे का हा खरा प्रश्न आहे. असो. ज्याची त्याची दृष्टी वेगळी.
पण पहिल्या पाच मधेही अजूनही आपण येत नाही याचा खेद वाटतोय. याची कारण काय काय असावीत या विषयी गेल्या पाच वर्षापासून यावर चिंतन करण्याची संधी मिळत गेली ति या लेखातून मांडत आहे.
कोरोना पूर्व व कोरोना नंतर असे या दोन प्रकारात आपल्या प्रत्येकाच्या जगाची विभागणी झाली. कोरोनानंतर सामान्य माणसे पोटासाठी धावत आहेत. मध्यमवर्गीय आपआपल्या काम धंद्यात बुडाले आहेत. सारे काही स्थिर स्थावर होत नाही तो पर्यंत तरी या अपमान मनाला लावून घेता येणार नाही. कारण सर सलामत तर पगडी पचास. पण प्रशासनाचे काय? ( ते पण कोरोना महामारी मधे व्यस्त होती खरी) या दोन वर्षात बराच वेळ हाताशी होता. म्हणतात की कागदावरचं नियोजन केले की ते प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याआधीच पन्नास टक्के यशस्वी झालेले असते. अर्थात हे नियोजन म्हणजे फक्त टास्क झाली की टिकमार्क केल्यासारखे नसते. त्यातील प्रत्येक टास्क मधे एक समन्वय, त्याचा एकमेंकाशी असलेला संबध, त्याचे परस्परांवलंबन लक्षात येते व डोक्यात असलेली ढिगभर कामे छोटी व साध्य करता येण्यासारखी वाटू लागतात. ति त्या त्या वेळेत पूर्ण होतील याचा आत्मविश्वास तयार होतो नि दिवसाखेर ति पूर्ण झाल्याचा आनंद व समाधान मिळते.
या आनंद व समाधानात आजचे प्रशासन कमी पडतेय. ते भरपूर करताहेत पण दिवसाखेर आनंद व समाधानाचा अभाव आहे. एन्ड रिझल्ट दिसत नाही. त्यामुळे उत्साह वाटत नाही. ढिगभर कामे साचतात. नियोजनाचा अभाव असल्यास त्याचा पसारा जाणवतो. व ते कधी कधी एकएकटे पूर्ण करावे लागते. व त्यात वर्षभर अभ्यास करूनही निकालाच्या नंतर कळते की आपण नापास आहोत. हीच गंमत स्वच्छ सर्व्हेक्षणात दरवर्षी होतोय. आपण जो पर्यंत प्रश्नांचा आऊट ऑफ बॉक्स विचार करत नाही तो पर्यंत यश हातात येणार नाही ही काळ्या दगडावरची रेष.
तर आपल्याला काय करावे लागेल. दोन पातळीवर, आघाडीवर हे काम करता येईल.
स्वच्छ सर्व्हेक्षात प्रशासनाचा पुढाकार व नागरिकांचा सहभाग घेणे गरजेचे आहे. केद्राने मुद्दे दिलेत तेवेढेच साध्य करून चालणार नाहीत किंवा ते तेवढ्यापुरतेच साध्य करूनही चालणार नाही . त्यात सातत्यता, निरतंरता कशी राहिल याचा विचार स्थानिक प्रशासनाने व पदाधिकार्यंनी केला पाहिजे.
विचार उत्तम होता. पण हाच विचार आपण इतर ठिकाणीही किंवा इतर बाबतीतही का करत नाही हा मुद्दा आहे. उदाः मनपाचे स्वच्छता कर्मचारी जोगोजागी कचरा गोळा करतात व पेटवून देतात. रोजचीच दिवाळी. दिवाळीतील प्रदुर्षणापेक्षा रोज जळणारा कचरा अधिक वातावरण दुषित करतो पण हे कोणी कुणाला सांगयाचं?. हे आरोग्य अधिकार्यांना दिसत नाही का.. दिसते ना.. पण कचरा उचलायलाच परवडत नाही. मुद्दा बरोबर आहे.. पण त्याला पर्याय नाही का…
स्वच्छता व पर्यावरण ही हातात हात घालून फिरणारं प्रेमी युगल आहे. स्वच्छ स्रर्व्हेक्षणात आपल्याला स्थान मिळावे म्हणून दिवाळीत फटाके फोडण्यास बंदी करण्यात येणार होती. पण नाही करता आली. करताही येणार नाही. ते सामान्यांच्या आंनदा सोबत आर्थिक चक्राशी जोडलेले गणित आहे. विचार उत्तम होता. पण हाच विचार आपण इतर ठिकाणीही किंवा इतर बाबतीतही का करत नाही हा मुद्दा आहे. उदाः मनपाचे स्वच्छता कर्मचारी जोगोजागी कचरा गोळा करतात व पेटवून देतात. रोजचीच दिवाळी. दिवाळीतील प्रदुर्षणापेक्षा रोज जळणारा कचरा अधिक वातावरण दुषित करतो पण हे कोण सांगणार. हे आरोग्य अधिकार्यांना दिसत नाही का.. दिसते ना.. पण कचरा उचलायला परवडत नाही. मुद्दा बरोबर आहे.. पण त्याला पर्याय नाही का… हे म्हणजे भूक लागली म्हणून दरोडा टाकण्यासारखे आहे. असो..
स्थानिक आरोग्य अधिकार्यांना मी गेल्या काही वर्षापासून पहातोय. ते फार व्यस्त असतात. कुठेही कचरा नको याची ते जिवापाड दक्षता घेतात. पण नागंरिकांनी कचरा करायचा व तो आवरला की नाही ते या अधिकार्यांनी कटाक्षाने पहावे. प्रश्न जैसा आहे तसाच आहेत. तिळमात्र फऱक पडललेला नाही. नागरिकांना जबाबदेही बनवले पाहिजे. नागरिकांनी घरातला, परिसरातला कचरा स्थानिक पातळवरचा कचरा अॅट सोर्स तो व्यवस्थापन झाला पाहिजे यासाठी प्रयत्नांची वारंवारिता वाढवली पाहिजे. त्यासाठी काय करता येईल याकडेही लक्ष दिले पाहिजे. उत्पानाचे मार्ग अनेक शोधले ते कार्यरत राहून चालत नाही. त्याचे मल्टीफिकेशन जसे गरजेचे आहे. तसेच स्व्छता ही मल्टीफिकेशन तंत्राने कशी दृतगतीने वाढत जाईल याचाही विचार करा.
नाशिकमधेच होम कंपोस्टींग वर काम करणार्या अनेक सामाजिक संस्था व व्यक्ति सोशली व प्रोफेशनली काम करत आहेत. त्यातील नफा तोटा, कमाई, मलई याचा विचार न करता त्यांची मोट बांधावी. या मंडळीना लोकांसमोर आणा. नागरिक कंपोस्टींग करण्यासाठी तयार आहेत. पण त्यांना येणार्या अडचणी, पडलेले प्रश्न याची उत्तरे देण्यासाठी प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून कुणी आहे का..सध्यातरी कुणीच नाही. तर अशा क्षेत्रात काम करणार्या मंडळीना स्वच्छतेचे दूत, संवादक, मदतनीस म्हणून त्यांच्या त्यांच्या परवानगीने त्याची नावे प्रशासनाच्या संकेतस्थळावर जाहिर करावेत. म्हणजे लोक त्यांची मदत सहजतेने घेवू शकतील. आता तर कुजणार्या कचर्याचे कंपोस्टींग करण्याची गरज नाही. तो वाळवून घेतला तर त्यात बागाही फुलवता येतात. यात पुणेकर पुढे आहेत. पुणे करांचे खरचं या बाबतीत पाय धूवून पिले पाहिजे. एवढे ते दक्ष व जागृत आहे. त्यात नागरिक व प्रशासन सुध्दा पण आपण नाशिकरमात्र कमी पडतोय. पण हे असे घरोघरी झाले तर घंटागाड्याच्या फेर्या कमी होतील. वजनाला कमी कचरा भरला तर कमाई व पर्यायाने मलई कमी होईल. खाते मंडळीचा मेवा कमी होईल निवडणूकीचा फंड कसा गोळा करायचा याची बिच्च्यारांना चिंता सतावत असते. त्यात हे असे झाले तर आणखीनच पंचाईत. शिवाय कोरोना काळात ही खाते मंडळी जास्त भरडली गेली. देव त्यांच लवकर भले करो. प्रशासनातील अधिकारी हे प्रामाणिक प्रयत्न करत असतात. पण ही खाते मंडळी त्यांनी जमू देतील तर शप्पथ. या दबावातून स्थानिक अधिकार्यांनी बाहेर पडले पाहिजे. त्याना जे वाटतं. तेच करायची एक वर्ष संधी द्या. नाशिक खरचं स्व्च्छ व सुंदर होईल. पहिल्या पाच काय देशात एक नंबर होईल.
तर स्व्छतेत व पर्यावरणात काम करणार्यांना मंडळीची एक मोट बांधा, ऑनलाईलस ऑफलाईन चर्चा सत्र घडवून आणा. अनेक माध्यमं आहेत. लोक फोन धरून स्क्रीन समोर बसलेलीच असतात. तेथे का नाही प्रशासन पोहचत. मल्टी टास्ककिंग संवेदनशिल महिला अधिकारी निवडा. आपण स्व्च्छतेत काय करू शकतो. याची माहिती विविध समाज माध्यमांवर देत रहावी. फक्त एकाच पर्यायावर थांबून चालणार नाही. अनेक आघाडीवर एकाच वेळेस अनेक हातांनी भिडावे लागेल.
त्यासाठी स्व्छता फेस्टीव्हल घडवून आणा. केवळ फ्लाॅवर फेस्टीव्हल घेवून स्व्छता होणार नाही त्यात स्व्छतेत काम करणार्या मंडळीना व्यासपिठ द्या, त्यांचा सत्कार करून आणा.. जेथे कुत्र चावतयं तेथेच उपचार करा आणि कुत्र्याचा बंदोबस्त करा. स्थानिक वॉर्ड, प्रभाग पातळीवर जागृती घडवून आणली पाहिजे. उदयोन्मुख, नवोउत्सुक नगसेवकांना हाती घेवून प्रचार प्रसार घडवून आणला पाहिजे. स्वच्छतेचा बार उडाल्या शिवाय स्व्छ सर्व्हेक्षणाचा रस्ता लख्ख दिसणार नाही.
कचर्याचे खत तयार करा असे सांगण्याचेही दिवस गेलेत. ते खंडीने कवडी मोलाच्या भावाने मिळतेय पण कचरा व्यवस्थापनेतून ऑरगॅनिक भाज्या उगवता येतात हे सिध्द केलेय. व त्यासाठी लोकसहभाग वाढवता येईल. तसेच अशा घरोघरी फुललेल्या बागा ऑक्सीजन तयार करतील. अशा बागा फुलवणार्यांना, होम कंपोस्टींग करणार्या व्यक्ती, संस्था, आस्थापनांना घरपट्टीत सवलत द्या. सरकारी इमारती, शाळा, कॉलेजेस यांच्या छत, जमीनीवरील जागा रिकाम्या आहेत. मनुष्यबळीही उपलब्ध आहे. त्यांना थोडी जबाबदारी दिली तर नाशिक हातोहाती स्वच्छ व सुंदर होईल. स्वच्छ सर्व्हेक्षणात काय काय मुदे परिक्षेचे वा परिक्षणाचे असतात यास जाहीर करा. ते लोकांपर्यंत पोहचवा.
औद्योगिक क्षेत्रातील रिकाम्या जागा, सरकारी जमिनी गार्डेनिंगसाठी, वृक्षारोपनासाठी खुल्या करा. रिकाम्या प्लॉटवर स्वच्छता नसेल तर जबरा कर बसवा. जेणे करून काही बेरोजगारांना काम मिळेल. वरील सारे मुद्देची माहिती गोळा करता येईल असे लोकसंवादाचे एॅप तयार करा. त्यावर रिवाॅर्डस द्या. या रिवर्र्ड्स मधून घरपट्टीत, पाणी पट्टीत सवलत द्या. विषयात काम करणार्या मंडळीनाच स्वच्छता दूत- एबेंसेडर निवडा. त्या त्या क्षेत्रातीलच लोक त्या त्या क्षेत्रासाठी योग्य वाटतात व नेमका संदेश लोकांपर्यत पोहचतो. याची काळजी घ्या.
सध्या टॉप टू बॉटम विचारांचे कृतीचे अभिसरण होतेय. ते बॉटम टू टॉप झाले पाहिजे म्हणजे खर्या अर्थाने लोकसहभाग वाढेल. नाहीतर ये रे माझ्या मागल्या, शिळ्या भाकरी चांगल्या यावरच समाधान मानावे लागेल. स्वच्छ सर्व्हेक्षणात आपण कुणाच्याच खिजगणीत नाही आहोत हे लक्षात घ्या. अधिकार्यांनी प्रयत्न करूनही यश मिळेत नसेल तर ते त्यांच्यासाठी अपमानजनक ठरते. त्यांच्या कारकिर्दिला उजाळा मिळत नाही. अर्थात हे काम एकट्या दुकट्याचे वा एकाच मार्गाने करता येणारे नाही. ते संघटीत व एकीचे काम आहे. चला तर हातात हात घेवू.. काय करता येईल याचा कृती आराखडा तयार करू. तो पर्यंत पुढील स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी सदिच्छा..
वाळलेल्या फुलांचे बियाणे पेरले तर पुन्ही रोपे तयार होतात का?
हा प्रश्न आपल्या सर्वांना कधीना ना कधी पडतोच. काही मंडळीना यातून रोपे तयार होण्याचा अनुभव येतो तर काहीना रोपे तयार होत नाही… असा अनुभव येतो… असे का होते. याचा विचार आपण या लेखात करणार आहोत.
फुलांपासून रोपे तयार होऊ शकतात.. अशी फुले म्हणजे झेंडू व त्याचे प्रकार, जरबेरा तसेच शेवंती होय.. पण काही वेळेस रोपे तयार होत नाहीत.. याची कारणे दोन आहेत.
बाजारात येणारी फुले ही बरेचदा छोटी व मोठी असतात. मोठी झालेली फुले ही मॅच्यूअर म्हणजे ती बियाणांपर्यंतचा त्यांचा प्रवास तयार झालेला असतो. थोडक्यात पुढील पिढीला जन्माला घालण्याचा त्यांचा डी.एन.ए. हा त्या फुलात आलेला असतो. म्हणजे त्यांची परिपक्वता ही आलेली असते. तर छोटी फुले ही अपरिपक्क असतात. त्यांच्यात वर नमुद केलेली कोणतेही गुण सामावलेले नसतात. या फरकामुळेच मोठी फुले वाळवून पेरली तर त्याची रोपे तयार होतात. व लहान फुले पेरली तर रोपे तयार होत नाही.
दुसरे कारण म्हणजे फुल मोठे असले तरी ते किती काळात तयार झाले आहे याचाही फरक पडत असतो. अर्थात ते कुणालाही सांगता येणार नाही. पण सांगावयाचा मुद्दा असा की त्याला रासायनिक खतं टाकून कमी कालावधीत वाढलेले असेल तर ते फुल मोठे असुनही त्यात रोपांसाठी बियाणे तयार होत नाही.
वरील दोनही फुलं ही व्यापारी पिक आहेत. पूर्वी सारखी सेंद्रीय अथवा नैसर्गिक पध्दतीने वाढवली जात नाही. पण यालाही बांधावरची फुले अपवाद असतात. म्हणून अशा फुलांच्या बिया या रूजवून येतात. तसेच घरी फुलवलेल्या फुलांच्या बियाणांची रोपे तयार होतात. जर ती रसायनमुक्त पध्दतीने फुलवलेली असतील तरच.. असो…
तर अशी ही दोन कारणे वरील फुलांची बियाणे रूजवून येण्याची वा न येण्याची आहेत.
अशा वेळेस नर्सरीतील तयार फुलांची रोपे आणून लावावीत. बरेचदा झेंडू व झेडूंचे प्रकारातील रोपे तयार होतात. पण शेवंतीचे रोपे हे शेवंतीच्या फुलापासून होण्यापेक्षा त्याच्या फांदीपासून होण्यास जास्त संभावना असते.
दि. २४ ऑक्टोबर २०२१ रोजी, शंकाराचार्य़ न्यास, नाशिक या ठिकाणी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, पश्चिम महाराष्ट्र प्रांत व्दारे गोसेवा गतिविधी यावर एक दिवसीय कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात दुपारच्या सत्रात गच्चीवरची बाग अर्थात शहरी शेती व गायीचे महत्व या विषयावर आधारित स्लाईड शो प्रदर्शन होत आहे.
या एक दिवसीय कार्यशाळेत देशी गायीचे अर्थव्यवस्थेतील, दैंनदिन आरोग्यातील महत्व, तसेच शेतीतील महत्व, तिचे फायदे व संगोपन या विषयावर विविध मान्यवरांची विचार मांडणी होणार आहे.
दोन दिवस पाऊस पडून वातावरणात स्वच्छता होती. पोर्णिमेच्या दिवशी लख्ख चांदण पडावं तसा दिवसा डोळ्यांना सुखावणारा सुर्यप्रकाश पडला होता. प्रत्येक गोष्ट नजरेत टिपता येईल अशा प्रकाशाची घनता होती. गंगापूर रस्त्याने घरी जात होतो. रस्ता बर्यापैकी मोकळा होता त्यामुळे स्कुटीनेही वेग पकडला होता. गंगापूर रोड वरील जेथे झाडे आहेत तेथे पडलेली सावली व झाड नाहीत तेथे पडलेले ऊन जणू उन सावलीच्या खेळातून आपण जात आहोत असे वाटत होते. सोमेश्वर जवळ होतो. नजरेच्या पुढील दहा मिटर टप्प्यात डांबरी रस्त्यावर काहीतरी तळहाताएवढे फडफडतांना दिसत होते. काही क्षणात विचारांची गती वाढली. काय असेन, एकादा पक्षी? , चिमणी?, वाळलेलं पान? काय फडफडत असावं? म्हणून त्याच्याजवळ गाडी पोहचली सुध्दा. स्कटी वेगातच होती. त्याला थोडा वळसा दिला नि स्कूटी वेगात पुढे गेली पण. तेवढ्या काही क्षणात नजरेने टिपले की ते फुलपाखरू होते. सुंदर आकर्षक रंगाचे. बस हा विचार करत नाही तोपर्यंत फार पुढे आलो होता. मनात विचार येत होते. अरे काय् काय झालं असणार त्याला, काय करावं, थांबाव कि जावं, दुसरीकडे उचलून ठेवावं का? येणार्या जाणार्या गाडीखाली गेलं तर… पण स्कूटी पुढे जात होती. मागे अचानक गाड्यांचा लोढां वाढला.
त्या क्षणी मला मागे वळून पहावसं वाटलं नाही. कारण ते फुलपाखरू चिरडलेले पाहण्याची हिंमत नव्हती. ते चाकाखाली चिरडलं गेलं असणार.. पण दुसरा विचार मनात आला. त्याने मनाची घालमेल झाली. मागे येणार्या गाडीखाली त्या क्षणाला ते फुलपाखरू चिरडलं नसेल तर. आपण एकदा तरी पहायला हवं होते. नसेल उडता येत पण उचलून दुसरीकडे तरी ठेवता आले असता. आपण का थांबलो नाही. का उचलून त्याला बाजूला ठेवलं नाही. एक ना अनेक प्रश्न मनात आले. आजही मला ते फुलपाखरू आठवतं. का तो क्षण माझ्या हातून सुटला… याचं वाईट वाटत, आपल्या हातून असं कसं घडलं. एवलासा जिव वाचला असता कदाचित….
काय करता येईल. त्याच्यासाठी… काय करू शकतो आपण… विचारांच चक्र घटना घडल्या दिवासापासून सुरू आहे…. त्यातलं एक काम तर करतोय ज्या काही शहरात अर्बन स्पेसेस आहेत तेथे ऑरगॅनिक भाज्या तर उगवून देत आहोत. कुठेही फुलांच्या, फळांच्या, भाजीपाल्याच्या बागेत रसायनं वापरत नाही. त्याने जैवविविधता तर जपली जात आहेच. पण फुलपाखरांच जिवनही फुलत आहे. हे तर झालं.. अजून काही करता येईल का… मी काय करू शकतो, इतर मंडळी त्यात सहभागी होतील असं काय करता येईल… थोडक्यात आपण सर्वच जण काय करू शकतो… मन फुलपाखरूमय झालंय.. कदाचित हा स्ट्रोक नव्या कामांचा असावा, गच्चीवरीची बाग काम उभं करतांना असाच स्ट्रोक आला होता वर्षभर चालू होता… सेम तिच प्रोसेस डोक्यात चालू आहे.. काही तरी जबरदस्त, लोकांना आवडेल, सहभागी होतील. असेच काहीतरी उभं करायचं फुलपाखरासाठी…
One straw revolution या पुस्ताकाचे म्हणजेच एका काडातून क्रांती हे पुस्तक वेणू पळशीकर यांनी मराठीत भाषांतरीत केले आहे. २००५ साली वाचनात आलेले या पुस्तकाने इतरांप्रमाणे माझीही निसर्गाप्रती, शेती बद्दलच्या विचारांची दिशाच बदलवली. इतक सुंदर पुस्तक खर्या अर्थाने ओघवत्या शैलीत भाषांतरीत केले आहे. शेतीकडे पहाण्याचीच दृष्टी बदलून जाते.
जपानमधील मासानोबू फुकुओका यांनी लिहलेले पुस्तक आहे. या पुस्तकांती कितीतरी संदर्भ लख्खपणे डोक्यात आहेत. पुन्हा पुन्हा वाचतांना कंटाळा येत नाही. दर वेळेस नवे संदर्भ, त्याचे पुरावे मिळू लागतता. खरं म्हणजे ज्याला शेती करायची आहे त्याचा फांऊडेशन कोर्स म्हणजे हे पुस्तक आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. शेतीच्या कितीतरी पध्दती आहेत. सध्या रासायनिक शेतीच्या दृष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक शेतीपध्दतीचे महत्व हे ठळकपणे अधोरेखीत होते. ( या पुस्तकांतील निवडक कोटस ( वाक्य) तुम्हाला माहित आहे का या गच्चीवरची बाग पुस्तकात मिळतील.)
शेती करणे म्हणजे नफा, इनपुट आऊटपुट, उत्पादन असे व्यापारी दृष्टी नाही. ती एक जिवनदृष्टी आहे. निसर्गाला समजून घेत, पुढे जाण्याची, जगण्या जगवण्याची. निसर्ग कधीच हातचं राखून ठेवतं नाही. तो स्वार्थी नाही. तो परतावा देतो. पण त्याची वाट पहावी लागते.
या पुस्तकातील जिवनदृष्टीने माझ्याही जिवनात अमुलाग्र बदल केले. किंबहुना गच्चीवरची बाग हे काम या पुस्तकाच्या वाचल्यानंतर 8 वर्षानी सुरू झाले. एवढं कृतीशील चिंतन या पुस्तकाने घडवून आणले हे मान्य करायला हरकत नाही. मुळात गच्चीवरची बागेचा पायाच या पुस्तकातून अंकुरला आहे. आम्ही अंमलात आणत असलेले बरचसे तत्वे ही या पुस्तकावर आधारित आहेत. कारण जिवनशैली बदलल्या शिवाय जगण्यात शांतता नाही. जी आपण आजच्या शहरी जिवनात हरवून बसलो आहोत. जगण्यात शांतता हवी असेल तर निसर्गाची साथ संगत असावी. निसर्गाची साथ संगत हवी असेन तर शेती घ्या, फार्म हाऊस घ्या. ते शक्य नसेन तर घरा भोवती, छतावरती, गच्चीवर बाग फुलवा. तेथे काम केल्याने, मेहनत केल्याने अपार शांतता, समाधान मिळते.
बरीच मंडळी फुलझाडांनाच निसर्ग समजून घेतात. पण फुलांमधे काहीच प्रकार असतात. बरेचदा निवडक असतात. तशा प्रमाणात भाजीपाल्यात विविधता असते. प्रत्येकाची गरज वेगळी, कीड, पाणी, कालावधी यात बहुविविधता असते. त्यामुळे तेथे फुलांपेक्षा शिकायलाही फार मिळते. आमचा एक मित्र व्हेटरनरी डॉक्टर आहे. त्याला सहज विचारले का रे सोपे असेन ना सगळे हे शिकणे. तेव्हा त्याने सुंदर उत्तर दिले. माणसांचा डॉक्टर होणे सोपे आहे. कारण त्यात फक्त दोनच शरिर अभ्यासायची आहेत. ति म्हणजे स्त्री पुरूष. जनांवराचा डॉक्टर होणे तसे फार अवघड आहे. अभ्यास फार असतो. कारण कुत्रे, मांजर, गायी, म्हशी, घोडे, गाढवे, उंट, एका ना अनेक प्राण्यांच्या शरिरराचा अभ्यास करणे आवाहानात्मक आहे. फक्त यात रिस्क कमी असते. कारण मानवी जिवापेक्षा प्राण्यांच्या जिवाला काही झाले तरी त्याची जबाबदारी कमी असते. असो. तर मुद्दा असा की फुलांपेक्षा भाजीपाला निर्मिती व त्यातल्या त्यात विषमुक्त करणे हे फार कौशल्याचे काम आहे. थोडक्यात फुलांची बाग फुलवायची म्हणजे आळशांची हौस आहे. जसे शेती ज्यांना जमत नाही. आवडत नाही. त्यांनी ऊस लागवड करून द्यावा. पाणी देत रहा. कापणीला आला की तोही इतरांकडून घ्या. बाकी मातीची काय माती होते हे डोळ्यावर पट्टी बांधलेल्या मंडळीना काय कळणार.. असो.
ई पुस्तकं उपलब्ध…
शेती, निसर्ग, जिवनशैली, जगणं हे सारं शिकायचं म्हणजे आधी कृतीतून ते समजून घेतले पाहिजे. आणि ते समजून घेण्यासाठी एका काडातून क्रांती हे पुस्तक वाचले पाहिजे. आजच्या धावपळीच्या, इंस्टंटच्या जमान्यात संयम कुणाकडे आहे. प्रत्येक गोष्ट फायद्या तोट्यात मोजून पाहतो आपण. पण निसर्ग, शेती, गच्चीवरची बाग म्हणजे यंत्र नाही आहे. इनपुट दिले की आऊटपुट मिळते. तो निसर्ग आहे. त्याच्या कलाने आपण गेलो तर आपल्याला तो भरभरून देणार आहे. पण त्याला समजून तर घ्या आधी…
बागेला किती पाणी द्यावे बागेला कधी पाणी द्यावे या विषयी बरेच प्रश्न असतात. तसेच त्याविषयी विविध मत प्रवाह आहेत. अर्थात हे सारे कुंडीत काय भरले आहे. प्रचलीत पध्दत म्हणते माती व खत वापरणे व दुसर्या दोन पध्दती ज्या गच्चीवरची बागेने विकसीत केल्या आहेत. पहिली पध्दतः नारळ शेंड्या, पालापाचोळा व २० टक्के माती व दुसरी पध्दत म्हमजे बिशकॉम वापरून भरली आहे यावर निर्भर आहे. या पध्दतीवर पाण्याची प्रमाण, त्याची वेळ ठरवता येते. येथे साधारण पाणी देण्याची वेळ कोणती या विषयी चर्चा करणार आहे.
पाण्याचे लाड कमी करा.. लेख वाचा..
बागेला पाणी देणे हे फार महत्वाचे व कौशल्याचे काम आहे. कारण पाण्यामुळेच मातीत असलेल्या घटकांचे वाफसा म्हणजे गंध तयार होतो व त्यातून झाडे आपले पोषण मिळवत असतात. खरं तर बागेला पाणी मोसमानुसार किती द्यावे या बद्दल मी मागे सकाळ मधील लेखात या विषयी सविस्तर सांगितले आहेच. तर बाग व आपलं नातं हे आई व लहान मुलांसारखे असेल तर पाणी देणं योग्यपणे जमते. आईला कसे कळते की बाळाला तहान लागली, भूक लागली, झोप लागली, भिती वाटते की काही टोचतय. हे ति बिनचूक समजू लागते तसेच आपल्या बागेला किती पाणी द्यावे हे तुमचे निरिक्षण पक्के असेन तर समजू लागते. येथे मुद्दा आहे. पाणी कधी दयावे. पाणी देण्याच्या दोन वेळा सहसा आपण पाळतो. एकदा सकाळी सहा ते दहा व दुपारी पाच ते सात..
पण या वेळेत पाणी दिल्यावर काही परिणाम लक्षात आले आहे.
एकतर सकाळी पाणी देणे म्हणजे भूक न लागताच (कामाला सुरू लागण्याआधीच, कार्यप्रवण होण्याआधीच) झाडांनाच जेवू घातल्यासारखे आहे. या मुळे पाण्याचे योग्य तर्हेने वापर होत नाही. सकाळी दहा नंतर या पाण्याचा त्यांना उपयोग होतो तो पर्यंत झाडांची मुळं ही पाण्यात थोडक्यात थंडाव्यात पाय बुडवून ठेवण्यासारखे आहे. पाण्याचा संसर्ग हा मुळांना होण्याची शक्यता असते. सायंकाळी पाणी देणे म्हणजे झाडांना काम नसतांना त्यांना जेवू घातल्यासारखे आहे. येथे त्यांना अर्जिर्ण होण्याची शक्यता असते. तसेच वर सांगितल्याप्रमाणे पाण्याचा संसर्ग हा मुळांना होण्याची शक्यता असते. वरील दोनही वेळेस पाणी दिल्याने झाडं ही रोगांना बळी पडलेली दिसली.
मग यावर उपाय काय..
बागेला पाणी देण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी दहा नंतर देणे. कारण या काळात वातावरणात उष्मा वाढतो. कुंडीतील मातीत वाफसा तयार होण्यास गती मिळते. हीच वेळ झाडांना सुर्यप्रकाशात अन्न तयार करण्याची असते. अशा वेळेस त्यांना पाणी देणे गरजेचे आहे. म्हणजे दिलेले पाणी कुंडीतील माती पडल्याबरोबरच त्याचा उपयोग, वापर व्हायला सुरूवात होते. म्हणजे पाणी हे मुळांजवळ साठून राहत नाही. तसेच वाफसाव्दारे निर्माण होणारा गंधांची प्रक्रिया योग्य प्रकारे होते. या वेळेस पाणी दिल्याने झाडांची वाढ चांगली झालेली दिसली. तसेच रोगराई पासून दूर राहिलेली दिसली.
याला एक शेतीचा दाखला पण आहे. पन्नास शंभर वर्षापूर्वी मोटेने पाणी दिले जायचे. सकाळी शेतात गेल्यावर सुरूवातीची कामे आटोपली की घरून न्याहरी यायची ती खाऊन झाली की शेताला पाणी दिले जायचे ते दुपार जेवणापर्यंत त्यांनतर आराम व शेतातील इतर कामे केली जायची. आपले पूर्वज फार हुशार होते. त्यांनी शेतीही निसर्ग समजून केली. म्हणून अनेक वर्ष ते पिढ्यापिढ्या ते चालत आले. आताच्या आधुनिक युगात हे ज्ञान कालबाह्य ठरवण्यात आपण यशस्वी झालो नि पायावर कीड नाशकांचा धोडां पाडून घेतलाय. असो.
तेव्हा नक्की हा प्रयोग करून पहा… तुम्हालाही काही नाविण्य आढळल्यास नक्की कळवा.
खरं तर ही दोनही कारणांना वैज्ञानिक मूळाधार नाही. कारण ही वर वर विचार करता ती सहज मनात येणारी कारणे आहेत. खरं तर पावसाळ्यातही खतं देण्याची गरज असते. यात दोन प्रकार येतात.
पावसाळ्यात बागेला खतं द्यावीत की नाही या बाबत बरेच लोकांच्या मनात व्दिधा मनस्थिती असते. याची कारणे म्हणजे पावसाळ्यात सर्वत्रच जीवसृष्टी बहरते. त्याला मिळणारे नैसर्गिक पाणी व वातावरण तयार झाल्यामुळे आपसुकच बहरतात मग कशाला द्या खतं पाणी असा एक विचार मनात असतो. तर दुसरे कारण म्हणजे दिलेली खते वाहूनच जाणार आहेत मग कशाला द्यावीत खतं. असा एका दुसरा विचार असतो. (पुढे वाचा)
खरं तर ही दोनही कारणांना वैज्ञानिक मूळाधार नाही. कारण ही वर वर विचार करता ती सहज मनात येणारी कारणे आहेत. खरं तर पावसाळ्यातही खतं देण्याची गरज असते. यात दोन प्रकार येतात.
एक कुंड्या किंवा वाफ्यामधील बाग व दुसरे म्हणजे जमीनीवरील बाग होय. कुंड्या किंवा वाफ्यामधे झाडांना एक ठराविक अवकाश असतो. त्यांना गरज असली तरी मुळं कुंडी बाहेर जावून अन्न शोधू शकत नाही. तसेच पावसामुळे जी काही त्या कुंडीत पोषण द्रवे असतात ति वाहून जाण्याची शक्यताच अधिक असते. अशा वेळेस त्यांना खतं पाणी देणे गरजेचे असते. तरच दिलेल्या खतांची मात्रा बिनचूक लागू पडते. कारण या काळात नैसर्गिक पाण्यामुळे कुंडीतील मातीचा कण न कण भिजलेला असतो. त्यामुळे खतं हे सर्वदूर पोहचायला मदत तर होतेच तसेच मातीत नैसर्गिक जिवाणूची निर्मिती होत असते. त्यांना पोषक म्हणून खतं देणे म्हणजे त्या सुक्ष्म जिवांना अन्न पूरवणे होय. जे मृत पावल्यानंतर त्यांचे खत झाडांना मिळणार आहे.
तसेच या काळात वातावरण अनुकूल असल्यामुळे रोपांची वाढ झपाट्याने होते. अशा वेळेस त्यांना अन्न संग्रहीत करण्यासाठी नवीन खतांची गरज लागते. खतंच दिली नाहीतर ते संचयीत अन्न वापरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कुंडीतील झाडांना पावसाळ्यातही खतं देणे फार गरजेचे आहे. (पुढे वाचा)
तसेच जमीनीवरील झाडांना तर पावसाळ्यात खतं पाणी देणे फार गरजेचे असते. कारण एक तर खोलवर झाडांभोवतालची जमीन ही भिजलेली असते. त्यामुळे दिलेली खंत ही खोलवर म्हणजे मुळांपर्यंत सर्वदूर पोहचतात. मातीतील गांडूळांना नैसर्गिक खतांची (शेणखत, निंमपेंड) गरज असते. त्यांचे पोषण उत्तम झाले तरच ते कार्यरत राहतात. तसेच त्यांची विष्टा ही म्हणजे गांडूळ खत लागू पडते. ताजे गांडूळखत हे सर्व खतांमधे उत्तम ठरते. कारण त्यातील पोषण द्रव्यांचे अंश पुन्हा मुळापर्यंत पावसाच्या पाण्यामुळे पोहचण्यास मदत होते. (पुढे वाचा)
आता या काळात कोणती खते द्यावीत असा विचार आपल्या मनात येत असतात.
पावसाळ्यात द्राव्य खतं व विद्राव्य खतं दोन्हीही द्यावीत. कारण द्राव्य खते ही टॉनिक सारखी काम करतात. ते लगेच लागू पडतात. कुंड्या मधे द्राव्य खत देतांना पावसाची उघडीप असणे फार गरजेचे आहे. संततधार पाऊस असल्यास खतं देणे टाळावे. तो पैशाचा अपव्यय ठरेन. मात्र जमीनीवर असलेल्या झाडांना खतांत केलेली गुंतवणूक ही फायदेशीरच ठरते. कारण पाणी खाली खोल मुरत असते. येथे मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ति म्हणजे आपल्या बागेतील पाणी वाहून जात नाही ना याची खबरदारी घ्यायला हवी. बागेत पडणारे पावसाचे पाणी हे बागेतच मुरवायला शिका. कारण आपण देत असलेले नळाचे पाणी हे सहसा फिल्टर होऊन येते. त्यातील नैसर्गिक घटकांवर प्रक्रिया झाल्यामुळे झाडांना पोषक अशी द्रवे नष्ट झालेली असतात. बोअरवेलचे पाणी देत असाल तर उत्तमच आहे. (पुढे वाचा)
लेंडी खत, शेणखत (उकीरड्यावरचे नको ते अर्धे कच्चे असते), निंमपेंड ही उत्तम ठरते. कारण ही खतं गांडूळांना फार आवडतात. तसेच ते पावसाच्या पाण्यात हळू हळू झिरपतात. त्यामुळे या खतांचा वापर आवश्यक करावा.
द्राव्य खतांमधे जिवामृत, गोमुत्र पाणी, ह्यूमिक जलचा अवश्यक वापर करावा. त्यांच्या वापरामुळे झाडांना ताबडतोब ऊर्जा प्रदान होते. एक गोष्ट लक्षात घ्या. पावसाळ्यात प्रत्येक झाडांचा पर्णसंभार वाढतो. जेवढा पर्णसंभार वाढणार आहे तेवढे दिलेल्या खतांचे अन्नात रूंपातरीत होऊन खोडात संग्रहीत होणार आहे. त्यामुळे पुढील काळात त्याचे फुल, फळांच्या रूपात परतावा मिळणार आहे. तेव्हां पावसाळ्यातही द्राव्य व विद्राव्य खतांचा वापर आवश्यक करावा.
आम्ही खालील मो. क्रंमाकावरून व्हाट्सअपवर गार्डेन अपडेटस पाठवत असतो.
8087475242 व 9850569644 या दोनही क्रमांकावर वेगवेगळे अपडेटस देत असतो. आपल्याला हे अपडेट्स मिळतात ना याची खात्री करा व संपर्कात रहा.
उंदीर घुशीना औषध टाकतांना ते सरसकट सर्व टाकू नये. त्यातील किंचीतसा भाग रोज टाकावा. म्हणजे १०० ग्रॅमची वडी असल्यास त्यातील केवळ एक ग्रॅम रोज भाग टाकावा. यामुळे होते असे की रोज इतकेच चविष्ट ( विष) मिळाले म्हणून ते रोज खाण्याची सवय लागते. तसेच त्यांचा त्यांना एकदम त्रास होत नाही. त्यामुळे ते रोज खाण्यास सरसावतात. पण हे विष रोज थोडे थोडे खाल्ल्यामुळे त्याचा सावकास पण खात्रीने त्यांच्या मेदुंच्या गतीवर परिणाम व्हायला सुरवात होते. (उंदीर घुशीचे औषधे हे मेंदुवर परिणाम करतात) व हळू हळू त्यांची कार्यक्षमता कमी होत जाते व त्यात ते सात दिवसात गतप्राण होतात.
जमीनीवर परसबाग असली किंवा कंपोस्टीग खड्डा असल्यास आपल्याला उंदीर घुशीचा त्रास हा असतोच. विशेषतः खरकट्या अन्नााचा परसबागेत आपण डिरेक्ट वापर करत असाल तर हा त्रास जाणवणारच. त्यासाठी खरकटे अन्न हे फंरमेंट करून घ्यायला हवे. आंबवलेले पाण्याला किंवा खरकट्या अन्नाला उंदीर घुशी लागत नाही.
आता उंदीर घुशी मारणे हे हत्या होऊ शकते. पण ते मानवी जिवितास धोका निर्माण करू शकतात. शिवाय महामारी आणू शकतात. कारण ते उपद्रवी असतात. कोवळी रोपे कुरतडणे, अळूंची कंद खाणे, परसबागेतील फळे खाणे, बिया खाणे, बिळ करून ठेवणे हा त्याचा उद्योग. बरेचदा यावर उपाय म्हणून आपण दुकानातून, मेडीकल मधून विविध औषधे आणतो व ति टाकून पहातो पण उपाय काही होत नाही. खर्च मात्र वाया जातो. तसे पाहिले तर औषधे ही जालीम असतात. ति जालीम नसती तर ति विकली गेली नसतीच. खरे तर आपले प्रमाण बदलते किंवा त्याचे पध्दत तरी.
आपण या लेखातून हे नेमकं काय तंत्र आहे समजून घेणार आहोत.
उंदीर घुशीना औषध टाकतांना ते सरसकट सर्व टाकू नये. त्यातील किंचीतसा भाग रोज टाकावा. म्हणजे १०० ग्रॅमची वडी असल्यास त्यातील केवळ एक ग्रॅम रोज भाग टाकावा. यामुळे होते असे की रोज इतकेच चविष्ट ( विष) मिळाले म्हणून ते रोज खाण्याची सवय लागते. तसेच त्यांचा त्यांना एकदम त्रास होत नाही. त्यामुळे ते रोज खाण्यास सरसावतात. पण हे विष रोज थोडे थोडे खाल्ल्यामुळे त्याचा सावकास पण खात्रीने त्यांच्या मेदुंच्या गतीवर परिणाम व्हायला सुरवात होते. (उंदीर घुशीचे औषधे हे मेंदुवर परिणाम करतात) व हळू हळू त्यांची कार्यक्षमता कमी होत जाते व त्यात ते सात दिवसात गतप्राण होतात.
तसेच हे औषध टाकतांना यात आपल्या बोटांचा स्पर्श होणार नाही याची सावधगिरी बाळगा. कारण या अन्नाला मानवी स्पर्श आहे याचा त्यांना गंध आल्यास उंदीर घुशी ते औषध वा अन्न खात नाही.
तसेच हे औषध काही दिवस एकाच ठिकाणी ठेवा. तेथील खाणे बंद झाले किंवा खाल्ले नाही तर त्याची जागा बदलवा. त्यात पावसाचे पाणी जाणार नाही याची काळजी घ्या.
तसेच या औषधामधे विविधता असणे गरजेचे आहे. औषधाचे तयार केक येतात. गव्हाच्या दाण्यांना किंवा अन्न पदार्थात मिसळता येणारी पावडर स्वरूपातील काही औषधे येतात. तसेच यांना पकडण्यासाठी चिकट सापळे असतात. चिवट द्रव्य लावलेल्या प्लास्टिक पॅड्सला ते चिकटतात. पण हा उपाय खर्चिक असतो. तरी पण तोही कधी कधी अवंलबांवा लागतो.
सफेद रंगाच्या डांबर गोळ्या पसरून ठेवल्यास उंदीर घुशी येत नाही. बिळांमधे केसांचा गुंता किंवा पुजका टाकावा. म्हणजे ते उकरत नाही.
बर हे सारे एकदाच औषधे टाकली म्हणजे काम संपते असे नाही. मेलेल्या उंदीर, घुशींची जागा हे नवीन उंदीर घुशी घेत असतात. त्यामुळे वरचे वर या औषधांचा उपयोग करणे फार गरजेचे असते.
पावडर स्वरूपातील औषध वापरण्याची रेसीपीः पावडर स्वरूपात जे औषध मिळते. त्यासाठी वाळलेले झिंगे – छोटे मोठे कोणतेही चालतील ,यास सुकट असेही म्हणतात ते मुठभर घ्यावेत. ते एका ताटलीत टाकून त्यावर गोडतेल टाकावे. त्यावर ही विषारी पावडर पसरून द्यावी. एका कोपर्यात हे औषध ठेवून द्यावे. हे सारे करतांना हॅंड ग्लोव्हजचा वापर करावा.
सुकटच्या जागेवर पिठाचे गोळेही या पध्दतीने तयार करता येतात. पण उंदीर घुशींना पिठापेक्षा सुकट जास्त आवडतं. हे औषध टाकल्यावर पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत झाकून ठेवावेत. कारण हे औषध खाल्ले की कोरड पडते. व उंदीर घुशींचा गुदमरून गतप्राण होतात.
पेड पौधे जब सुकने, मरने के स्थितीमें हो उस वक्त पत्ते पिले पडते है। चिंतीत होना स्वाभाविक है। लेकीन सही कारण का अनुमान लगा नही लेते तब तक चिंतीत होना व्यर्थ है।
WHY GREEN LEAVES TURN IN YELLOWISH
बारिश के मोसम में पेड पौधे के पत्ते पिले पडते है। बागप्रेमी अक्सर पत्तों के पिला पडने से चिंतीत होते है। खासकर पेड पौधे जब सुकने, मरने के स्थितीमें हो उस वक्त पत्ते पिले पडते है। चिंतीत होना स्वाभाविक है। लेकीन सही कारण का अनुमान लगा नही लेते तब तक चिंतीत होना व्यर्थ है। पत्ते पिला पडने के अनेक कारण है। उसके क्या क्या कारण होते है। उसे प्राथमिकता के साथ अगर आप निष्कर्ष करेगें तो उसका पता चल जाता है।
घोंघा का नियंत्रण कैसे करे
अगर बारिश के मोसम के बाद पत्ते पिल्ले पड रहे है तो समझो उनको खाद की जरूरी है। मिट्टी के उपजावू तत्वों में असंतुलन आ गया है। अक्सर बारिश के वजह से मिट्टी के सुक्ष्म तत्व बह जाते है। उनको खाद के रूप में या टॉनिक के रूप में पर्यांप्त मात्रा में खाद देना जरूरी है। तो तरूंत उचीत मात्रा में (एक चौरस फूट के लिए अधा या पाव किलो गोबर खाद डालना जरूरी है। अगर आपके पास गोबरखाद, कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट है तो उसको एक साथ मिला ले या एक सिमीत कालावधी के बाद अलग अलग ही दे सकते है। ) बारिश में अक्सर द्रव्य liquid खाद देना जरूरी है क्यूं की जमीन निचे तक पानी से गिली रहती है। उसके साथ द्राव्य खादों की मात्रा सर्वदूर पहूंच जाती है।
खाद के प्रकार और उनके उपयोग
ऑक्टोबर हिट में तो पत्ते का पिला पडना आम बात है। ईस मोसम में उनको कडी धूप या तापमान से बचाना चाहिए। इसके लिए जालीदार हरा कपडा आता है। ५० प्रतिशत धूप निचे आने वाले जालीदार कपडो का चयन करे या खाद के रूप में ह्यूमिक जल का ईस्तेमाल करे ईससे ऑक्टोबर हिट से बगीचा का रक्षण भी होगा और उत्पादन भी बढेगा। ह्यूमिक जल के ईस्तेमाल के बाद आपके जालीदार हरा कपडा लगाने की जरूरत नही ।
पत्तो का पिला पडना ईसके और भी कही कारण होते है। अगर पत्ते जड से पिले पड रहे है तो समझो वो अभि परिपक्क हो गये है। उनको निकालकर मिट्टी में दबा दे। या उसको कैची से छोटे छोटे तुकडे करके उसको भी मिट्टी में मिला दे। उससे इसका खाद बन जाएगा। खाद का अभाव दूर हो जाएगा।
दो मोसम के बिच में पौधो की पाचक व्यवस्था बदलती रहती है। वो मोसम नुसार खुद में बदलाव लाते है। कारण एक, ज्यादा बारिश में या दुसरा थंडी के मोसम में परावर्तित होने के मध्यकाल में भी पत्ते पिले पडते है। झडते है। जैसा थंडी के मोसम के बाद कडी धूप सहने के लिए पेड पौधो को पत्तों का नया बहार आता है। यह स्वाभाविक है।
घमलों को कैसे भरे
पेड पौधों को पाणी की मात्रा कम होने कारण भी पत्ते पिले पडते है। आप पाणी के वारंवारिता बढा दिजिए। या ज्यादा पाणी देने के कारण भी पिले पडते है। ज्यादा पानी देने से पत्ते पिले पड रहे है तो जड सडने की संभावना होती है। ऐसे स्थिती में पौधा मर जाता है।
बारिश का पाणी treated नहीं होता. वह पाणी पौधे सह लेते है लेकीन घमले अगर पाणी ठिक तरह drain नहीं हो रहा, ठहर जाता है तो पौधा जड के सडने के कारण भी पत्ते पिले होते है।
उपर बताएं कारणो में कोई कारण या दर्शक हो तो तुरंत उपाय किजिए। अनाश्यक चिंता करने की जरूरत नही। पेड पौधे को जड को किडा लगेने से भी पत्ते पिले पडते है। ऐसे स्थिती में आपको निमखली का समय समय में ईस्तेमाल करना जरूरी है।
खाद की विविधता को और कौनसा खाद किस समय देने के लिए ये लेख आवश्य पढे। Garden Care Basket
बागेत मुंग्या झाल्यात त्याचे कारणे व त्यावरील नैसर्गिक उपाय समजून घ्या.. अन्यथा ….
बागेत मुंग्या झाल्यात.. कारणे व उपाय
कुंडीत, वाफ्यात मुंग्या होणे ही नेहमीची तक्रार म्हणून त्याकडे पाहिले जाते. मुग्या या दोन प्रकारच्या असतात. त्यात काळ्या मुंग्या व लाल रंगाच्या मुंग्या.. मुंगी ही शेती क्षेत्रात मित्र किटकात गणणा होते. घरा भोवती, टेरेसवर बाग असते. त्यात मुंग्या झाल्या की घाबरायला होते. त्या घरात आल्या तर…
पण बागेत कुंडीत मुळात मुंग्या का होतात याचा मागोवा घेतला पाहिजे. त्याचे महत्व समजून घेतले पाहिजे. आपल्या दंतकथामधे सुध्दा कबुतर व मुंगीच नात सांगितल आहे. अर्थातच सारेच जिव जंतू, किडे मकोडे, पशू पक्षी हे सारेच जैवविविधतेच्या अन्न प्रक्रियेतील साखळीचा भाग आहे. जिव जिवस्य जिवनम् हे तत्व लक्षात घेतले पाहिजे. जिव सृष्टीतल्या एकाही जिवाचा खात्मा झाला तर अन्न साखळी खंडीत होते व त्यातून नवे जैविक संकट उभे राहते. जे आपण सध्या कोरोनाच्या विषाणूरूपात अनुभवत आहोत.. ( या विषयावर नविन लेखाचा प्रपंच होईल.) (पुढे वाचा)़
तर रासायनिक शेतीत सारेच मित्र व शत्रू किटक हे मारून टाकले जातात. तर नैसर्गिक, सेंद्रिय, वनशेतीत या सार्यांना मुख्यत उपद्रवी किटकांना पिटाळून लावले जाते किंवा त्यांचे नियंत्रण केले जाते.
तर मुंग्या या नेहमी काम करत असतात त्या अन्नाच्या शोधात असतात. त्या वनस्पतीच्या वाळलेल्या मुळांचा संग्रह करतात. कारण कोणतेही वाळलेले मुळात साखरेचे प्रमाण असते. तसेच ते तृणधान्य अर्थातच बिज अन्न म्हणून गोळा करतात. तसेच पांढरा मावा ज्याला गोडवा असतो. त्याचेही त्या वहन अथवा संग्रह करत असतात. फक्त पांढर्या माव्याला वाहून नेतात म्हणून त्यांना उपद्रवी मानले जाते.पण हे चूक आहे. मुळातच पांढरा मावा का लागतो याच्या मुळाशी गेले पाहिजे. (पुढे वाचा)
तर आपण जेव्हां बाग तयार करतो. गच्च मातीने कुंडी भरली असेन तर कालांतराने त्यातील माती अधिक घट्ट होते. वनस्पतीचे काही मुळ वाळून जातात. अशा रिकाम्या कुंडीला बराच काळ पाणी दिलेले नसते. अशा वेळेस त्या मुळांभोवती असलेली साखर गोळ करतात. व तेथेच अन्न व सुरक्षा मिळाल्यामुळे तेथे अंडी घालतात. बरेचदा कुंडीत झाड जिवंत असले व पुरेसे पाणी, त्यात वाफसा नसेल अशा वेळेसही त्यात मुंग्या कोरड्या जागेत आपले घर तयार करतात. कारण पुरेशा पाण्याअभावीसुध्दा वनस्पतीच्या मुळ्या तेथे वाळलेल्या असतात. खरं तर कुंड्यांना , बागेला पाणी नसणे , विलंब होणे हे सुचवण्याचे काम मुंग्या करत असतात. त्यामुळे बागेला कुंड्याना पाणी दिले की लगेच मुंग्या गायब होतात. मुंग्या या विशेषतः माती उकरण्याचे वर खाली करण्याचे विना पैशानी काम करतात. त्यामुळे त्यांना मित्र किटक मानले जाते.
मुंग्या या पाणी जमीनीखाली पाणी शोधणार्या संशोधक असतात. जमीनीखाली पाण्याचा योग्य साठा असल्यास त्या ठिकाणी ते वारूळ बनवतात. व एका रांगेत वारूळ असलेल्या रेषेत पाण्याचा भूमीगत साठा असतो. त्यामुळे त्यांना मारू नये. वाळवीला खाण्याचे काम मुंग्या करतात. त्यामुळे त्याही दृष्टीने ते आपले मित्र किटक आहेत. (पुढे वाचा)
मुंग्याना मारण्यासाठी अनेक रासायनिक उपाय आहेत. पण मुंग्या मारू नये.. त्यांना दूर करावे. त्यासाठी बागेत, वेखंडाची पावडर मिळते. ती चिमूटभर टाकल्यास त्या गायब होतात. तसेच पावाचा तुक़डा ठेवल्यास त्यास असंख्य मुंग्या लागतात. एकदा का त्यांचा पावावर हल्ला झाला की तो पाव उचलून बाहेर फेकून देवू शकतात.
आपण नेहमीच बागेत काम करत असाल तर मुंग्या तुम्हाला चावणार नाही. कारण त्यांना आपला गंध माहित असतो. किंवा त्यांचा एवढा त्रास होत नाही. शिवाय मधमाशा, मुंग्या या बिनविषारी असतात. त्या चावल्या तर खूप काही त्रास होत नाही. चावल्या तर त्यावर कांद्याचे साल चोळावे खाजवेची तिव्रता कमी होते.
आपल्या ज्योतिष शाश्त्रात मुंग्याना साखर खावू घातल्यास कर्ज कमी होते. साखर जावूच द्या पण त्यांना मारू तरी नका. असे माझे आवाहन आहे.
आपल्या लेख आवडल्यास नक्की शेअर, लाईक व कंमेंट करा.
घर, बंगला असो वा अपार्टमेंट येथे जागा उपलब्ध असेल तर हमखास आंब्याचे व नारळाचे झाड हे लागवड केले जाते. आंबा व नारळ हे झाड हे स्वतःच्या बळावर सुरवातीला छान फळे देतात. रोग प्रतिकार शक्ती असल्यामुळे रोग, किडीपासून दूर सुध्दा राहते. जसा जसा आंबा व नारळाचे झाड वयस्कर होऊ लागते तसे तसे तो विविध रोगांना, किडींना, आजारांना बळी पडतो. याची काळजी कशी घ्यावयाची या बद्दलचा लेख प्रपंच…
How to Care all time of Mango tree?
घर, बंगला असो वा अपार्टमेंट येथे जागा उपलब्ध असेल तर हमखास आंब्याचे व नारळाचे झाड हे लागवड केले जाते. आंबा व नारळ हे झाड हे स्वतःच्या बळावर सुरवातीला छान फळे देतात. रोग प्रतिकार शक्ती असल्यामुळे रोग, किडीपासून दूर सुध्दा राहते. जसा जसा आंबा व नारळाचे झाड वयस्कर होऊ लागते तसे तसे तो विविध रोगांना, किडींना, आजारांना बळी पडतो. याची काळजी कशी घ्यावयाची या बद्दलचा लेख प्रपंच…
आंबा हा कलमी असेल तर त्याचे सुरवातीला चार वर्ष मोहोर आला तरी त्याचे फळ काढून टाकावे. फळ धरल्यास झाडाचे खोड हे मजबूत होत नाही. झाडांचे खोड हे अन्न संग्रहीत करण्याचे काम करत असते. त्यामुळे त्याची वाढ, आकार कसा वाढेल याची काळजी घेणे हे सर्वात महत्वाचे असते. त्यामुळे आंब्याची दरवर्षी कंटीग करावी म्हणजे त्याचा फांद्याचा पसारा, वाढ ही नियंत्रीत होते पर्यायाने त्याचे अन्नसाठा करण्यासाठी खोडाचा आकार वाढू लागतो. (पुढे वाचा)
नारळाचा झाडात विविध प्रकार आहेत. सध्या सिंगापूरी जातीचे बुटके झाड असते. यास पाच सहा वर्षात नारळे येतात. योग्य वयात यास मोहर येतो पण नारळ पकडेले जात नाही. नारळ पकडले तरी विविध अवस्थेत ते गळू लागतात.
एकदा का आंबे व नारळा या झाडांना फळे येऊ लागली की त्यांना पुढील प्रमाणे खते व फवारणी करावी. पावसाळ्यात केवळ लेंडी खत, शेणखत टाकावे. लेंडी खत हे उष्ण असते. त्यामुळे पावसाच्या पाण्याचे त्याचा अर्क हा मुळा पर्यंत सर्वदूर पोहचतो. व त्याचा खाद्यान्न म्हणून त्यास पोषण मिळते.
नारळाला व आंब्याला कधीही उकीरड्यावरचे शेणखत वापरू नये. शेणखत वापरावयाचे असल्यास पुढील दुव्यावरील माहितीप्रमाणे तयार झालेलेच शेणखत वापरावे. शेणखता बद्द्लचा लेख सविस्तर लेख या दुव्यावर वाचा.. कारण उकीरडयावरील शेणखतात हुमणी अळीचे अस्तित्व असते. ही अळी खोडकीडा म्हणूनही ओळखली जाते. ती भल्या मोठ्या झाडांच्या खोडाला लागली तर झाड सात दिवसात सुकवू शकते. त्यामुळे नेहमी लेंडीखत वापरावे. (पुढे वाचा)
तसेच दर महिण्याला आंब्याला व नारळाला निबोंळी पेंड, तंबाखू डस्ट वापरावी. खोड कीडा असल्यास नियंत्रीत होते. इतर वेळेस द्रव्य खत म्हणून जिवामृताचा वापर करावा. दरमहिण्यास ५ लिटर वापरावे. जिवामृतात पोषणमुल्य असल्यामुळे झाडांची वाढ, फुटवा, पर्यायाने फळांची संख्या, आकार व गोडी वाढण्यास मदत होते.
आंबा कितीही जूना असला व त्यास फळधारणा होत असल्यास कधीही १०० टक्के छाटणी करू नये. छाटणी ही दरवर्षी २५ टक्केच करावी. कारण जेथे छाटणी होते तेथे आंबा एक वर्ष लागत नाही. त्यामुळे २५ टक्के छाटणी केल्यास किमान ७५ टक्के तरी फळ दरवर्षी मिळते. असे २५-२५ टक्के प्रमाणे छाटणीचे वर्तुळ चालू ठेवावे. छाटणी ही पावसाच्या पंधरा दिवस आधी करावी. आंबा नारळ ही झाडे चार वर्षाच्या पुढे असेल तर नारळ व आंब्याला जून पासून ते फेब्रुवारी पर्यंत पाणी देवू नये. निसर्गतः मिळाले तर हरकत नाही. कैरी सुपारी एवढी झाली की त्यास पोषणासाठी पाणी सुरू करावे. त्यानंतर आंबा उतरवल्यानंतर पाणी देवू नये.
आंब्याच्या खोडाला दिवाळीत चूना व गेरूचे पट्टे द्यावेत. त्यामुळे कीड नियंत्रणास मदत होते. खोडाचे आयुष्य वाढते. तसेच रंग देतांना पिस्त्याच्या टरफलासारखे किडीचे सुरक्षा कवच असते. ते विळ्याने खरडून काढावे. त्यात हिरव्या रंगाची काटेरी गुल्या (अळी) असते. त्यास स्पर्श झाल्यास प्रचंड खाज येते. त्यामुळे हे काम सावकाश व सावधानतेने करावे. तसेच या किडी पानावर पसरल्या असल्यास त्यास वेचून चेचून टाकाव्यात. उंचावर असल्यास लसूण, मिरची, तंबाखूचे पाणी फवारावे. म्हणजे कीडीचा नायनाट होतो. (पुढे वाचा)
बरेचदा गेरू चूना न लावल्यामुळे किंवा आंब्याकडे दुर्लक्ष झाल्यास आंब्याला भूरूड ही कीड लागण्याची शक्यता असते. ही कीड खोड, फांद्याच्या आतील गाभा पोखरण्याचे काम करते. बरेचदा वरच्या सालीला तडे, चिरे गेलेले काळपट, तेलकट चिरा दिसतात. व एकाद्या जागेवर शेणासारखा चुरा पडलेला दिसतो. अशा वेळेस विळ्याने सालीचा भाग खरडून काढावा. जिथे फांदीच्या वा खोडाच्या गाभ्याला खोल खड्डा दिसल्यास अशा वेळेस सायकलच्या स्पोकने त्यास मधे वारंवार टोचावे. म्हणजे त्याने आतील किड ही मरून जाते. पण बरेचदा कीड जिवंत राहण्याची शक्यता असते. अशा वेळेस खोल खड्डयातील भूसा काढू घ्यावा त्यात इंजेक्शने पेट्रोलने भरावे व त्यावर मातीचा लेप द्यावा. पेट्रोलच्या वासाने कीड मरून जाते. कीडचा भूसा टाकण्याचे प्रमाण बंद झाल्यास कीड मेली आहे असे समजावे.
नारळ व आंब्याच्या आवतीभोवती पावसाच्या अगोदर छान खोदून घ्यावे. म्हणजे मुळाना प्राणवायू मिळतो. हवा खेळती असल्यामुळे कीड नियंत्रण होण्यास मदत होते व खोडाचे आयुष्य वाढते. झाडांना पाणी हे आळ करून कधीच देवू नये. ते दोन झाडांच्या मधे द्यावे. कारण अन्न मुळ्या या खोडापासून दूर असतात. (पुढे वाचा)
शक्य झाल्यास आंब्यांना ०.५ एच पी मोटरने फवारणी करावी.ही फवारणी जिवामृताची असल्यास उत्तम… त्यामुळे आंब्यावर येणारी फंगल कीड नियंत्रीत होते. तसेच अन्न बनण्याची प्रक्रिया जलद होते. आंब्याचे आरोग्य उत्तम राखता येते फवारणी ही आंबा उतरवल्यानंतर तसेच छाटणी झाल्यानंतर सुरू करावी व ती मोहोर येईपर्यंत करावी. मोहोर लागला की फवारणी बंद करावी. नारळाच्या झाडाला इंजेक्शन देऊ नये. हे फसवे असतात. त्याचा काहीही उपयोग होत नाही.
वरील Practices या गेल्या तीन वर्षापासून आम्ही एका बंगल्यातील पाच आंब्यासाठी करत आहोत. आता त्याचा सकारात्मक परिणाम येवू लागला आहे. फळांचा आकार, संख्या वाढते आहे.
नारळाच्या झाडाला इंजेक्शन देऊ नये. हे फसवे असतात. त्याचा काहीही उपयोग होत नाही.
लेख आवडल्यास लेखाखाली कंमेंटस, लाईक व follow-up, Share करायला विसरू नका.
तो फक्त आपल्या बागेचे पालकत्व स्विकारू शकतो. बागेचे मातृत्व हे त्या त्या कुटुंबानेच स्विकारायचे असते. मधल्या काळात बागेची काळजी हे कुटुंबानेच घेतली पाहिजे. तरच आपली बाग छान, टवटवीत व सुंदर होईल.
बागेत फवारणी, केव्हां, कधी..कशी.…
निसर्गाला जपण्यासाठी आपण घरा, दारात फळा, फुलांची व भाजीपाल्याची बाग फुलवतो. रासायनिक खते व रासायनिक फवारणी सोडून देणे हे तर सर्वात्तम अशी निसर्गाची सेवा म्हटली पाहिजे. त्याएवजी आपण नैसर्गिक किडनियंकं फवारणे सर्वात्तम आहे. रासायनिक खतं ही कीडनाशक आहेत तर नैसर्गिक औषधे फवारणे हे कीडनियंत्रक म्हणून वापरता येतात.
कीड नियंत्रक व कीड नाशक यात दोन टोकांचे अंतर आहे. कीडनियंत्रण म्हणजे कीडीला पळवून लावणे, तिच्या प्रजनन चक्राच्या गतीत बाधा आणणे किंवा गती कमी करणे होय. तर कीड नाशक म्हणजे कीड संपवून टाकणे, मारून टाकणे, तिचा नाश करणे. कीडीचा नाश करणे एका अर्थाने जैवविवधतेत केवळ बाधाच नाही तर ती साखळीच तोडून टाकण्यासारखे आहे. जीव जीवस्य जीवनम् ही आपली संस्कृती आहे. ती रासायनिक फवारण्याने नष्ट होते. त्याने मातीतील सुक्ष्म जीवांणूचाही नाश होतो. व माती नापिक बनते.
तर कीड नियंत्रणात त्यांना ठराविक पिकावरून हाकलून लावले जाते. त्यांची घरे ही मोठ्या झाडांवर, जंगली झुडुपांवर आहे. त्यांना आमच्या बागेत लुडबुड करू नये म्हणून मारलेले उग्र वासाचे, गंधाचे द्रव म्हणजे कीड नियंत्रक होय. कीड ही उग्र गंधाला धोका समजते. उग्र गंधामुळे त्याच्या प्रजनन चक्रात बिघाड होतो. तर अशी उग्रवासाची कीड नियंत्रकं हो घरच्या घरी तयार करता येतात.
तर आपण कीड नियंत्रकांची माहिती घेवू या..
गोमुत्र हे उग्र, तिव्र गंधाचे नैसर्गिक द्रव्य आहे. जीवामृत हे नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले उच्च जीवाणू युक्त द्रावण आहे. दशपर्णी सुध्दा हे उग्र व विविध गंधाचे कडवट द्रावण आहे. या सार्यामुळे कोणत्याही सजीव प्राण्याला धोका पोहचत नाही. जेवढा रासायनिक फवारणीमुळे पोहचतो.
आज रासायनिक कीडनाशकांची तिव्रता वाढत चाललीय पण कीड मरत नाही. उलट ती वाढत जाते. याचे कारण म्हणजे कीडींचे आयुष्य हे अल्पकाळ असते. पहिल्या पिढीने पचवलेले थोडेफार विष हे पुढील पिढी जास्त प्रमाणात पचवू लागते. म्हणूनच एन्डोसंल्फान, राऊंडअप सारखी इतर कीड व तण नाशकांची तिव्रता वाढवूनही कीड जात नाही. माणसं नुसती गंधाने मरतात पण कीड नाही. हे सत्य समोर आले आहे.
याच तंत्रात कीड नियंत्रक हे प्रभावी ठरतात. पण त्यातही विविधता असणं गरजेचं आहे. आपण फक्त बागेला एकच प्रकारचे कीड नियंत्रक वापरत असाल तर ते चूकीचे आहे. कारण काही काळ कीड त्याला प्रतिसाद देईलही पण पुन्हा ती वाढू लागेल. कारण आधीच्या पिढीने ते पचवायची क्षमता मिळवलेली असते. अशा वेळेस आपणास दर पंधरा दिवसांनी वेगवेगळी फवारणी केली पाहिजे.
गोमुत्र पाणी २) जीवामृत पाणी ३) चुना पाणी ४) हिंग पाणी ५) साधे पाणी ६) निमार्क फवारणी ७) निमतेल-साबणाचे मिश्त्रण किंवा फक्त साबण पाणी फवारणी (पालेभाजीवर करू नये) ८) लिंबू पाणी इत्यादी.
अशारितीने फवारणीत विविधता ठेवल्यास कीड ही नियंत्रणात, आटोक्यात राहते. ठराविक कालावधीनंतर ओळखू न येणारा गंध आल्याने त्या आपले मुक्कामाचे ठिकाण इतरत्र हलवतात.
जीवामृत फवारणी ही सुर्योद्य ते सुर्यास्त दरम्यान करावी कारण ते संजीवक म्हणून काम करत असते. त्यातील जीवाणूंची संख्या ही केवळ उन्हातच वाढते. तर फवारणी ही सायंकाळी ५-६ वाजेनंतर करावी. कारण त्याचा तिव्र गंध हा उन्हाच्या प्रखरतेत सुकून जात नाही किंवा त्याचे बाष्फीभवन होत नाही. तसेच बरीचसी कीड ही निशाचर असते म्हणजे रात्रीच्या वेळेस त्या अन्न शोधण्यासाठी बाहेर पडतात.
महत्वाचे म्हणजे फवारणी हेच केवळ बागेतील कीड नियंत्रणाचे तंत्र नाही हे आवर्जून लक्षात घ्या.. आपण अर्जिणावर किंवा असीडिटी वर औषध घेताहेत नि खाणं चालूच ठेवलं तर औषधाचा परिणाम होत नाही तसेच झाडाला पाणी जास्त होणं, पाण्याची योग्य वाफसा न होणारी घट्ट माती मुळाशी असणं, पाणी योग्य रित्या निचरा न होणं हे लक्षणेही लक्षात घेवून त्यावर उपाय करणं गरजेचं आहे.
तसेच कीड नियंत्रण हे करतांना कीड कोणती आहे हे लक्षात घेणं गरजेचे आहे. रसशोषक कीड, पानं खाणारी कीड (अळी) की विषाणूजन्य कीड आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यांचा ठराविक असा काळ नसतो. त्यामुळे वरील कीडनियंत्रक ही आलटून पालटून फवारल्यास कीडीच्या त्रासापासून मुक्तता होते. तसेच मित्र कीटक ओळखता आली पाहिजेत. मुंग्या, मधमाशा, गांडूळ, कंपोस्ट खतातील कीडे ही आपली मित्र आहे. काही मंडळी कीडमुक्त मातीत झाडे जगवतात. अशी माती ही कालातरांने निर्जीव व नापिक बनते. सुपिक माती बनवण्यासाठी निसर्गाला हजारो वर्ष लागलीत. ही माती सुंगधी व सुपिक बनण्यासाठी हजारो सुक्ष्म जीवांचे, कीडीचे खतात रूपंतार झालेले असते. हे विसरता कामा नये.
सारीच कामे माळ्याने करावीत असे मुळीच नाही. तो फक्त आपल्या बागेचे पालकत्व स्विकारू शकतो. बागेचे मातृत्व हे त्या त्या कुटुंबानेच स्विकारायचे असते. मधल्या काळात बागेची काळजी हे कुटुंबानेच घेतली पाहिजे. तरच आपली बाग छान, टवटवीत व सुंदर होईल.
हां जी ! आज के आधुनिक दौर में सेहत एक इन्वेस्टमेंट और जरुरत ऐसी मशीन है. सेहत सलामत रहेगी तभी हम कमा सकते हैं या उसका उपभोग ले पायेंगे.
इसको अच्छा पोषण देना जरूरी है . वह आसान भी है.
उपलब्ध नैसर्गिक संसाधन और उपलब्ध जगह पर हम आसानी से केमिकल फ्री सब्जींया उगा सकते है.
बाजार मे मिलने वाली सब्जींया केमिकल युक्त होने के कारण पोषण मूल्य का अभाव होता है इससे हमे अलग अलग बिमारीयां होती है. हलाकी इसका परिणाम स्लो पॉईझन जैसा काम करता है.
बाजार की सब्जींमे ना स्वाद होता है , ना खाने का समाधान. यही जानकर हमने पिछले 23 साल मे रोज लगने वाली सब्जींया हम घरपर ही उगा रहे है और उगा के दे रहे है.
इसी अनुभव, ग्यान और कौशल्य को हम व्हेजिटेबल गार्डनिंग कोर्स द्वारा आपके साथ बाटना चाहते है. यह कोर्स एक साल का है. हर हफ्ते मे एक सेशन होगा. जिसेसे आप आसानी से सब्जी उगांने की हर बात सिख सकते है.
Offer सिमित काल के लिये हैं.
Vegetable gardening course
Weekly sessions Pre uploaded module videos +12 module live sessions
48 QnA session
52 personal call support
One year membership
Limited seats & prise will be High after 18 Feb 2023..