गच्चीवरची बाग म्हणजे काय?
गच्चीवरची बाग म्हणजे शहरातील गच्ची, बाल्कनी येथे रसायन मुक्त भाजीपाला निर्मिती संदर्भात व्यावसायिक सेवा देणारी उद्मशील उपक्रम आहे. नाशिकमधील शहरी शेती व कचरा व्यवस्थापनात पर्यायाने निसर्ग संवर्धानात मूलभूत बदल घडवून आणणारी, जाणीव जागृती करणारी अग्रेसर उद्मशीलता बाळगलेले कुटुंब आहे.
=============================================================================
गच्चीवरची बागेच्या कार्यांची व्याप्ती काय आहे?
गच्चीवरची बाग ही पाच क्षेत्रात काम करत आहे. Grow, Guide, Build, Products sale & services भाज्याची निर्मिती, त्यासाठी मार्गदर्शन, भाजीपाल्याच्या बागांची उभारणी करणे, त्यासंबधी गरजेची उत्पादने तयार करणे व विक्री करणे व या संदर्भात सेवा दिली जाते.
============================================================================
Grow म्हणजे काय?
ग्रो म्हणजे उगवणे, इच्छुंक व्यक्तिंच्या घरी रसायनमुक्त भाज्या उगवून देणे, त्यांच्या निर्मितीसाठी संसाधनाची जुळवाजुळव करणे, पोषक वातावरण तयार करणे. गच्चीत, बाल्कनीत, जमीनीवर विटांचे वाफे, प्लास्टिक क्रेटस, ग्रो बॅग्ज इ. साधनात विषमुक्त भाज्या उगवण्या संदर्भात गच्चीवरची बाग सेवा देते.
============================================================================
Guide म्हणजे काय?
गाईड म्हणजे मार्गदर्शन करणे. इच्छुक व्यक्तिंच्या घरी भाजीपाला निर्मितीसाठी त्या कुटुंबातील सदस्यांना बाग संगोपनासाठी प्रेरीत करणे, निसर्ग विषयक ज्ञान संपन्न करणे. कचरा व्यवस्थापन, कीड नियंत्रण, बिज प्रक्रिया या विषयीचे मार्गदर्शन करणे. या अंतर्गत आम्ही त्या कुटुंबाचे स्लाईड शो प्रझेंटेशन व्दारे कार्यशाळा घेतली जाते. शंकाचे निरसन केले जाते. या विषयी यूट्यूबवर माहितीपट बनवणे, संकेतस्थळावर लेख लिहणे, गृहभेटी देणे तसेच पुस्तक, वर्तमानपत्रात लेख मालिका प्रकाशीत करून इच्छुकांना शिक्षित करणे होय.
============================================================================
Products म्हणजे काय?
गच्चीवरची बाग व्दारे भाजापाला फुलवतांना जे काही नैसर्गिक संसाधने, कीड नियंत्रणे, विविध द्राव्य, विद्राव्य खतांची, कचरा व्यवस्थापनासाठी कंपोस्टर्सची गरज असते ति आम्ही स्वतःच निर्मिती करतो. त्यामुळे त्यांच्या परिणामकारतेविषयी १०० टक्के खात्री बाळगता येते. १०० शुध्दता त्यात जोपासली जाते. या विषयीची उपयोगीता ही वारंवार विविध पातळीवर अभ्यासून पाहिली जाते. त्यामुळे फुलांची, फळांची, भाजीपाल्याची बाग संगोपनात महत्वाची भूमिका बजावली जाते.
==========================================================================
Sales म्हणजे काय?
Grow, Guide, Build, Products अंतर्गत जे काही निर्मिती होते तिची Online, Offline, विक्री केली जाते. मागणी केलेले साहित्य घरपोहोच पोहचवली जाते. तसेच नाशिक शहरात गच्चीवरची बाग व्दारे गार्डेनिंग शॉपी रन करण्यासाठी आमंत्रित करत आहोत.
===============================================================================
Services म्हणजे काय?
या अंतर्गत आम्ही लोकांना निशुल्क फोनवर मार्गदर्शन करतो. तसेच वरील साहित्य हे घरपोहोच पोहचवली जातात. तसेच आंबा व नारळाच्या झाडंसाठी विशेष मार्गदर्शन केले जाते.
======================================================================
गच्चीवरची बागेव्दारे आणखी काय काम केले जातात?
गच्चीवरची बाग व्दारे घर, घर परिसर, बाग बगीचा, कंपनी येथील जैविक कचरा व्यवस्थापन, शहरी शेती, विषमुक्त शेती, फार्म हाऊस डेव्हलपमेंटसाठी मार्गदर्शन केले जाते. शाळामधील आठवी व नववीच्या वर्गांना परसबागेवर प्रात्यक्षिक, प्रयोगातून निसर्ग विषयक मार्गदर्शन केले जाते. तसेच ग्रामिण भागात विषमुक्त शेतीसाठी पुरूष व महिला बचत गटाला प्रशिक्षण दिले जाते.
=============================================================================
भाजीपाला निर्मितीसाठी गच्चीवरची बागेची भूमिका काय असते?
इच्छुकांना भाजीपाल्याची बाग फुलवायची असेल तर त्यांना Pre Setup visit केली जाते. त्यात त्यांना असलेल्या शंकाचे निरसन केले जाते. त्यांनंतर संबधीत जागेची पाहणी करून अंदाजपत्रक दिले जाते. ते मान्य झाले की भाजीपाल्याचे सेटअप उभारणी केली जाते. त्यानंतर त्यांची कार्यशाळा घेतली जाते. त्यात संपूर्णतः मार्गदर्शन केले जाते. बाग संगोपनात आमची भूमिका ही पितृत्वाची असते. तर इच्छुकांची भूमिका ही मातृत्वाची असते.
============================================================================
गच्चीवरची बागेचा या कामातील अनूभव किती वर्षाचा आहे.?
गच्चीवरची बाग सण २००० पासून या विषयावर प्रयोग करत आहे. २०१३ पासून हा एक पर्यावरणीय उद्मशीलता म्हणून त्यास आजतागत त्यास आकार देण्याच प्रयत्न करत आहोत. इच्छुकांन भाजीपाला बाग पहाण्याचा एक प्रात्यक्षिक प्रकल्प तयार केला आहे.
===========================================================================
गच्चीवरची बागचे ऑफिस आहे का?
गच्चीवरची बागेचे असे ऑफिस नाही आहे. पण इच्छुकांना बघता येईल, अभ्यासता येईल अशी एक नमुनेदार बाग तयार केली आहे. तसेच ही सेवा इच्छुकांपर्यंत पोहचवण्यासाठी, पुरवण्यासाठी आवश्यक तो संसाधनाचा साठा, शेणखत व गोमुत्रासाठी देशी गायीचे पालन, मातीची, पॉटींग मिक्स साठीची साठवणूक अशा विविध गोष्टीसाठी बॅकग्रांऊड वर्क साठी गच्चीवरची बाग एक्सटेंशन तयार केले आहे. तेथे इच्छुक मंडळी येणे साहित्य खरेदी करू शकता तसेच मार्गरदर्शनही केले जाते.
============================================================================
गच्चीवरची बागेचे काम पाहणारी किती जणांची टीम आहे?
गच्चीवरची बाग या उद्मशीलतेचे ध्यैय असलेले या कुटुंबातील सदस्य हेच या उपक्रमाची ही टीम आहे. या कुटुंबात पाच लोक असून प्रत्येकाची कामे ही कौशल्यानुसार, आवडीनुसार विभागलेली आहेत. या सर्वांना बांधून ठेवणारी संचालक अथवा समन्वयाचे काम पाहणरी व्यत्ती ही संदीप चव्हाण हे आहेत. गरजेनुसार बाहेरील काही व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
=============================================================================
गच्चीवरची बाग किती लोकांपर्यंत पोहचली आहे?
गच्चीवरची बाग नाशिक ही साधारण २०१३ पासून कार्यरत असून डिसें. २०२० पर्यंत साधारण पंधरा लाख लोकांपर्यंत पोहचली आहे. यात देशभरातील विविध राज्य, महाराष्ट्रातील विविध जिल्हे व नाशिक या प्रत्येक पातळीवर पोहच झाली आहे. नाशिक शहरात मुख्यतः पाचशे घरामधे प्रत्यक्ष बागा फुलवल्या आहेत.
या कामात विविध पातळीवर लोक जुळले जातात व नव्याने येत असताता. जसे की काहींना फोनवर निशुल्क माहिती दिली जाते. जे संपर्कात आहेत. त्यांना समाज माध्यमांव्दारे बागे संदर्भात माहिती पाठवली जाते. ज्यांना बाग फुलवायची ते सातत्याने सोबत असतात.
=============================================================================
गच्चीवरची बागेचे संकेस्थळं आहे का?
गच्चीवरची बागेचे चार संकेतस्थळ आहेत.
- https://www.gacchivarchibaug.in/
- https://www.sandeep-chavan.in/
- https://organic-vegetable-terrace-garden.com/
- https://www.chat-par-khet.com/
- ===========================================================================
लॉकडाऊनचा या उपक्रमावर काही परिणाम झाला का?
हो नक्कीच झाला आहे. आधीच उद्योग म्हणून पाहतांना काही गरजेच्या गोष्टी होत्या. जसे की छप्पर असलेले जागा, गाय पालन, कामासाठी, साहित्य वाहतूकीसाठी गाडी, या साठी संपूर्णतः वैयक्तिक कर्ज घेवून गच्चीवरची बागेची वाटचाल नव्हे तारेवरची कसरत चालली होती. त्यात लॉकडाऊन झाल्यामुळे कर्जाचा डोंगर व तगादा वाढत चालला आहे काही अंशी जोर पकडणारी गाडी आता चढावावर लागली आहे.
=============================================================================
इच्छुक लोक मदत करू शकता?
पर्यावरणा संदर्भात जागृत असलेली मंडळी या पर्यावरणीय उद्मशिलतेला आपआपल्या परिने हातभार लावू शकता. लॉकडाऊनमुळे कर्ज फेडण्यासाठी कर्ज घेण्याची वेळ आली आहे. ति आणखीच वाढू नये म्हणून आपआपल्या परिने आर्थिक मदत करण्याचे आवाहन करत आहोत. ही मदत उसनवारीने पैशाच्या रूपातही चालू शकते. जी आम्ही दर महिण्यास परतफेड करण्याचे आश्वासन देत आहे. आमच्याकडील साहित्य खरेदी करावे. आमचे काम इतरांपर्यंत पोहचवण्याचीही मदत करत शकता.
===========================================================================
घरी भाज्या पिकवण्यासाठी किती जागा हवी?
साधारण चार माणसांसाठी शंभर चौरस फूटांची गरज असते. साधारण पंचवीस बाय चार या लांबी रूंदीचा विटारचून हौद तयार केला जातो. त्यात दहा टक्के माती वापरली जाते. नव्वद टक्के हा नैसर्गिक काडी कचरा, पालापाचोळा हा वापरला जातो.
=============================================================================
आठवड्याला किती भाज्या येतात?
आपण बागेला पाणी देण्याचे काम केले तरी आठवड्याला चार भाज्या सहजतेने मिळतात. आपण यात लक्ष घातले, रोज दहा मिनिटे सकाळ सायंकाळ दिले तर आपल्याला रोज भाजी मिळते. तरीही अवकळी पाऊस, वातावरणातील उष्मा, गारवा याचा परिणाम हा होतच असतो.
==============================================================================
साधारण हा खर्च किती असतो?
विटांचा वाफा, बि बियाणं, गार्डन केअर बास्केट याचां सर्व खर्च पकडून आपणास साधारण तिमाहीचा प्रति चौरसाचा खर्च हा पंधरा ते विस रूपये असतो. जो आपल्याला त्याच्या दुप्पट किमतीचा व आपल्या डोळ्यासमोर उगवलेला विषमुक्त भाजीपाला मिळवून देतो.
=============================================================================
घरी भाज्या पिकवणे हे खरचं परवडते का ?
विषमुक्त भाजीपाला घरी पिकवणे हे आर्थिक दृष्टया परवडत नाही.. खरयं आहे हे … आर्थिक दृष्ट्या हे महागडेच जाते.. पण आपण असा विचार करून एकतर या विषयात हात घालत नाही. नि बाजारातील विषारी फरावणी असलेल्या, बेचव नि कोणतही सत्व नसलेल्या भाज्या आपण सेवण करतो नि भविष्यातील आजारांना आपण आमंत्रित करतो. पण हा निर्णय सार्या कुटुंबालाच घातक ठरतो.
आम्ही नेहमी सांगतो की चार चाकी गाडी घेणे परवडते का? बारकाईने विचार केला तर नाही परवडत. एकतर त्यात लाखाची गुंतवणूक करा, तिचे देखभालीचा खर्च, सरकारी कर नि सर्वात शेवटी तिला लागणारे इंधन.. याचे निट गणीत मांडले तर रोज स्पेशल केलेली रिक्षा अथवा ओला उबेर नक्की परवडेल. यात शंकाच नाही.
तरी आपण गाडी का खरेदी करतो. एकतर आपण करत असलेला प्रवास हा सुरक्षित असणे गरजेचे आहे. (आता कोरोना काळात तर हे अधिकच महत्वाचे झाले आहे) हव्या त्या वेळेत आपण हवे तेथे प्रवास करू शकतो. थांबू शकतो व सर्वात महत्वाचे मह्णजे आपला सोन्यासारखा वेळ वाचतो. कुणावर विसबून राहण्याची गरजच पडत नाही.
आम्ही गच्चीवरची बाग व्दारे एरो ब्रिक्स बेड तयार करून दिला जातो. निसंशय त्याची गुंतवणूक आपल्याला महाग वाटेल. पण ती एकदम करतो म्हणून महाग वाटते. खर तर या बेडचा खर्च हा तिमाहीत दोन वर्षासाठी विभागला तर हा खर्च बाजारातील भाजीईतकाच येतो. व तेही विषमुक्त भाज्या. शिवाय निसर्गाचा सहवास व आता धावपळीच्या युगात ताण तणाव कमी करणारा आनंद.
खरं पाहिल तर बाजारातील भाजी हे उदाः दहा रू किलो भेटते. पण ति भाजी खरंच दहा रूपये किमत असू शकते का ? तर नाही. भाज्या उत्पादन करणारी उत्पादक मंडळी म्हणजे शेतकर्यात स्पर्धा असते. भाजी हा नाशंवत माल असल्यामुळे तो वेळेत विकणे हे फार गरजचे आहे. नाही तर मुद्दलही निघत नाही. हे त्यांचे एकप्रकारे समाजाने केलेले शोषणच म्हटले पाहिजे. तसेच कमी वेळात भाजीपाला उगवेनही पण त्यासाठी निसर्गाने फार मोठी किमंत रसायनाच्या वापरामुले मोजलेली असते. ति गृहीत धरतच नाही. असो.
आम्ही असे म्हणतो की आम्ही भाज्या नाही उगवत, आम्ही औषधं उगवतो. मला एक सांगा आपण दवाखान्यात डॉ. फी असेन, मेडीकल वरील औषधे असतील तेथे घासाघिस करतो का… एकादे औषध परवडत नाही म्हणून विकत घेतच नाही. असे होत नाही. ते असेल त्या किमतीत विकत घ्यावेच लागते. मग आपले अन्न हे जर औषध आहे तर मग त्याच्या सेवनात आपण एवढी तरतूद का करतो. त्यामुळे विषमुक्त भाज्या उगवणे हे फार गरजेचे आहे. जो आपला भविष्यातील आजारपणांचा खर्च वाचवतो.
आपल्याला चार चाकी गाडी परवडत नसली तरी तिच्या छुप्या फायंद्याचा विचार करता ति विकत घेणेच हेच फार महत्वाचे आहे. तसेच गच्चीवरची बाग व्दारे जे एरो ब्रिक्स बेड तयार केले जातात त्याचे डोळ्यांना दिसेन, बोटावर मोजता येतील असे फायंदे फार कमी आहेत. पण छुपे फायंद्याचा विचार करता ते परवडणारेच आहे.
आता अमूक खर्चात भरपूर व पैसे वसूल भाज्या उत्पादन होतील का हा नेहमीचा प्रश्न असतो. तर हे त्या त्या ठिकाणच्या वातावरण, तेथील तापमान, आपण दिलेला वेळ व आपण किती लवकर शिकता या कौशल्यावर अवलंबून असतो. कंपनी सुध्दा नेहमी गाडीचा अव्हरेज हा आयडिल परिस्थीतीवर अवलंबून आहे असे सांगतो. खड्डेमय रस्ता असेन तर आपली कितीही सोन्याची ब्रॅंडेड गाडी असो तिचा अव्हेरेज हा कमी होणारच शिवाय देखभालीचा खर्च हा वाढणारच असो…
तर आम्ही एरोब्रिक्स बेड हे आपल्याकडे उपलब्ध जागे नुसार तयार करून देतो. थोडक्यात प्रत्येक ठिकाणचा बेड हा गाडी कस्टमाईज करावी तसे करून देतो. त्यात इंधन अर्थात खते देणे, त्याची देखभाल अर्थात त्यात किड नियंत्रण करणे इं कामे खर्च येतोच. शिवाय आपण स्वतःहून काम करत असाल तर त्यात मजूरी ही येतेच. पण यात आनंद असतो. नि हा आनंद म्हणजे शेती करण्याचा आनंद हा पैशात मोजता येत नाही…
शिवाय बागेसाठी लागणारी खते, औषधे हे दरवेळेस विकत आणलेच पाहिजे असे नाही. ते तुम्ही घरी सुध्दा तयार करू शकतात. म्हणजे सारासार असा की आपल्याला इच्छा असेल तर आपण सहजेतेने( सुरवातीला आमची मदत) घेवून घरच्या घरी भाज्या परवडणार्या भाज्या पिकवू शकतो.
एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. घरी भाज्या उगवणे हे जीवन कौशल्य आहे. जे आपल्या प्रत्येकाला शिवावेच लागणार आहे. कोरोनाची साथीचा काळ ही एक संधी आहे. हाताशी वेळ आहे. त्यामुळे हे कौशल्य शिकून जीवनभर त्याची अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे. शिवाय साथ गेली तरी वाढता शहरीकरणाची गती पाहता, जीवनशैली पहाता आपल्याला हे जीवन कौशल्य कधी ना कधी आत्मसात करावे लागणारच आहे.
तुम्हाला भाज्या उगवण्यासाठी फार मोठी गोष्ट करायाची गरज नाही. सुरवातीपासून सारे प्रयोग तुम्हाला करायची गरज नाही. आम्ही हे सारे प्रयोग मागील २० वर्षात करून झाले आहेत. तुम्ही आमच्या खांद्यावर (अनुभवांचा उपयोग करून) पाय ठेवून पुढे जावू शकता. भाज्या उगवण्याचे ज्ञान व विज्ञान आमच्याकडून एकदा समजून घेतले तर तुम्हाला हा खडतर वाटणारा प्रवास सोपा व सहज, आनंददायी ठरेन. फक्त आम्हाला संपर्क करा. तुम्हाला सहजतेने उगवता येतील अशी काही उत्पादने तयार केली आहे. अगदी दोन मिनिटात मॅगी बनवण्यासारखी…
आमच्या सेवा व उत्पादनांविषयी सविस्तर माहितीसाठी
http://www.gacchivarchibaug.in
Products ची लिस्ट
Products Sales & Services – गच्चीवरची बाग नाशिक (organic-vegetable-terrace-garden.com)
You must log in to post a comment.