शिवाय बाजारात मिळणार्या कंपोस्टर पेक्षा हा मेंन्टन्स फ्री आहे. याचा अर्थ असा की तो बाजारातील कंपोस्टर हा दोन महिण्यात भरत असेल तर यास भरावयाला चार महिने लागतात. कारण यात टाकलेला कचरा हा वेगाने डिकंपोस्ट होतो. म्हणजेच तो लवकर खाली बसत जातो.
आपण कंपोस्टर्स घेतल्या नंतर या विषयीची काळजी कशी घ्यावी, तंत्र व मंत्र सांगीतले जाणार आहेत. या कंपोस्टर्स सोबत चाळणी, हॅंडल ( कचरा विरळणी करण्यासाठी) स्टॅंड, सुपडी, ब्रश देण्यात येतो. पाच पट वेगाने कंपोस्टींग तयार करणारे कल्चर व कंपोस्टींग पावडरही दिली जाते. हा ड्रम सिंगल असून त्यास जाळी असलेले झाकण आहे. याची क्षमता ५० लिटर आहे. योग्य प्रकारे आपणास कंपोस्टिंग शिकवण्यास मदत करण्यात येते.
| ![]() गार्डन वेस्ट कंपोस्टरः हा सेटअप टेरेस, अपार्टमेंटमधील उपलब्ध जागा , निर्माण होणारा पालापोचोळा याची गरज तपासून प्रत्यक्ष पाहणीत सुचविण्यात येतो. त्यासाठी काय काय काळजी घ्यायची, काय करणे गरजेचे आहे हे सांगितले जाते. यास डेव्हिल-डायजेस्टर म्हटले जाते. अगदी मोठ्या प्रमाणात व गतीने ओल्या सुक्या पालापाचोळ्याचे खतात रूपांतर केले जाते. या तून दररोज व्हर्मीवाँश, ह्यूमिक अँसिड, इंजाईम हे द्रवस्वरूपात मिळते. या सेटअपमुळे आपली गल्ली स्मोक फ्री राखता येते. .नाशिकमध्ये या कंपोस्टर घरपोहोच दिले जातात. यासाठी एकदाच आर्थिक गुंतवणूक करण्याची गरज असते. तयार होणारे खत आपण संग्रहीत करू शकता. या प्रकारच्या सेटअप मध्ये तयार केलेल्या खतात उत्तम प्रकारच्या भाज्या घेता येतात. तसेच नैसर्गीक कचर्याचीही व्यवस्था लावता येत
|
All in one Waste composter – Devil Digester विकसीत केला आहे. त्याचीच नवीन आवृत्ती म्हणजे “ग्रोव्हर कम कंपोस्टर” आम्ही विकसीत केला आहे. बाजारातील कंपोस्टरच्या किमती एवढा आहे. त्यात आपण रोजचा कचरा डंम्प करू शकता. तसेच त्यात कंपोस्टींग करता करता त्यात पालेभाजी, फळभाजी (वांगी, टोमॅटो, मिरची) वेलवर्गीय व एकादे वर्षायु झाड उगवू शकता. ( उदाः शेवगा, पपई) हा २०० लिटर क्षमतेचा ड्रम असून त्याला ५२ कप्पे करण्यात आले आहेत.
त्यात आपण सलाडसाठी उपयुक्त अशा भारतीय व विदेशी पालेभाज्यांची लागवड करू शकता. प्रत्येकी ५ किंवा १० कप्प्यात आपण एक भाजी या प्रमाणे १० प्रकारच्या भाज्या लागवड करू शकता. वरील भागात वर्षायु झाड लागवड करू शकता. तसेच उर्वरीत २ कप्प्यात वेलवर्गीय बियांची लागवड करू शकता.
कसे काम करते…. या ड्रमला बाहेरील बाजूस कपाच्या आकाराचे ५२ कप्पे केले असून त्यात ते चौफेर आहेत.
वरील बाजू कडून म्हणजे ड्रमच्या मधोमध एक पाईप दिलेला असून त्यात रोजचे खरकटे अन्न, हिरवा कचरा आपण त्यात टाकू शकता. तळाशी त्याला छिद्र दिलेले असून त्यातून पाण्याचा निचरा होतो. निचरा होणारे पाणी पुन्हा वापरू शकता. यात उत्तम प्रकारे यात पालेभाज्यांची निर्मिती होते. Details Read

पालापाचोळा, किचन वेस्ट( फरमेंनटेड), खरकटे पाणी, शेण असा सारा कचरा कंपोस्ट करण्याचा सोपा मार्ग म्हणजे Bricks Composter होय.
याची उंची २ फूट ते ६ फूट घेता येते. तसेच त्याची लांबी रूंदी ही ४ बाय४ ते ८ बाय ८फूट इतकी घेता येते.
कंपोस्टिंग होण्यास सोपे. कोणतीही दुर्गंधी नाही. वास नाही.
You must log in to post a comment.