धन्यवाद, नाशिककर व महाराष्ट्रातील बागप्रेमी.

गच्चीवरची बाग नाशिक उत्पादनांची खालील प्रमाणे दर आकारणी असेन..

जिवामृत , ह्युमिक जल ,गोईत्र २२ रू. लि. तंबाखू पावजर, निमपेंड ५२ रू. किलो. शेणखत २२ रू. किलो. बिशकॉम १६ रू. किलो. ग्रो बॅग्जस २२ रू. प्रतिनग, कंपोस्टींग १०२ किलो, दशपर्णी २६ रू. लिटर. . तसेच नाशिक शहरात डिलेव्हरी चार्चेस ५० ते ५०० रू. असेन.


धन्यवाद, नाशिककर व महाराष्ट्रातील बागप्रेमी.

आपण गच्चीवरची बाग, नाशिक या पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमाला पाठबळ देत आहात. आपल्याला मिळून एक रसायनमुक्त, प्रदुर्षणमुक्त जग तयार करण्यासाठी वाटचाल चालू आहे. गच्चीवरची बाग मार्च २०२२ मधे दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे.

मागील काही वर्षाच्या संघर्षात तुम्ही आम्हाला मोलाची साथ दिली. धैर्य दिले. प्रोत्साहन दिले. आपण आमच्यावर दाखवलेला विश्वास हाच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. अर्थात हे सारे काम एकट्या दुकट्याचे नव्हते. आपण दिलेला पै न पै आम्ही याच कामासाठी गुंतवला आहे.

कारण हे फक्त प्रोफेशन नसून आमच्यासाठी पॅशन (आस) आहे.

मागील प्रत्येक वर्षा आम्ही काहीतरी योजीले व ते साध्य करण्यासाठी तण, मन, धन आम्ही सत्करणी लावले. अर्थात यात काही दानशूर लोकांचा, पर्यावरण प्रेमीचा सहभाग आहेच.

शुन्य संकल्पेनेपासून जन्माला आलेला उपक्रम रांगायला, बाळस धरायला व आता चालायला लागला आहे. गच्चीवरची बाग आता नऊ वर्षाची झालीय. तर दहाव्या वर्षात आता पदार्पण करतांना आता पुढील मार्गक्रमण हे डिजिटल मार्केटिंगसाठी (थोडक्यात पायाला आता स्केटींग लावून) करण्याचे योजिले आहे. अर्थात यातही आता तुमचा सहभाग हवाय. आमचे व्हर्च्यूल मिडीयावरील काम आता तुम्हाला जमेल तसे लोकांपर्यत पोहचवायचे आहे. मला खात्री आहे त्यासाठी तुम्ही मदत करालच.

२०२२ हे वर्ष आमच्यासाठी फार मोलाचे ठरणार आहे. कारण नुकतेच मागील दोन वर्ष कोरोनाच्या नजर कैदेत होतो. आर्थिक पातळीवर तारेवरची कसरत चालू राहिली. त्यामुळेच आता हे काम सोशल मिडीयाचे स्केटींग घालून वेगाने पूर्ण करायचे आहे. तेव्हा जुळून रहा.

फक्त वर्ष बदलतय. आम्ही नाही. आमचे तुमच्याशी नाते तसेच आहे. Grow, guide, Build, Products Sale N Services….

मागील वर्षी ठरवल्या प्रमाणे या वर्षी सुध्दा ( १ जाने.२०२२ पासून) उत्पादनावरील प्रत्येक युनिट मागे लिटर, किलो, प्रतीनगा मागे १ रू. वाढवत आहोत. तसेच 5% GST आकारण्यात येण्याची शक्यता आहे. आकाशाला भिडणारे पेट्रोल डिझेल भाव पहाता आपण ही डिलेव्हरीसाठी येणारा खर्च उचलावा अशी नम्र विनंती करतो.

गच्चीवरची बाग नाशिक उत्पादनांची खालील प्रमाणे दर आकारणी असेन..

जिवामृत , ह्युमिक जल ,गोईत्र २२ रू. लि. तंबाखू पावडर, निमपेंड ५२ रू. किलो. शेणखत २२ रू. किलो. बिशकॉम १६ रू. किलो. ग्रो बॅग्जस २२ रू. प्रतिनग, कंपोस्टींग १०२ किलो, दशपर्णी २६ रू. लिटर. . तसेच नाशिक शहरात डिलेव्हरी चार्चेस ५० ते ५०० रू. असेन.

अधिक माहितीसाठी गुगलवर सर्च करा..

आमचे गच्चीवरची बाग नाशिक Page हे लाईक करा. तसेच You Tube Channel subscribe करा.

8087475242 व 9850569644 या दोनही क्रमांकावर वेगवेगळे अपडेटस देत असतो. आपल्याला हे अपडेट्स मिळतात ना याची खात्री करा व संपर्कात रहा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

Gachchivarchi-baug success story


sandip-chavan-gachchivarchi-baug-nashik

Gachchivarchi-baug success story

शहरी शेतीच्या प्रसारासाठी आयुष्य झोकून दिलेला तरुण

एखादा धनसंपन्न असलेला मनुष्य आजारपणाला कंटाळलेला, अंथरुणावर खिळलेला असेल आणि त्याला विचारलं की खरी संपत्ती कोणती तर तो निशंकपणाने सांगेल की, आरोग्य हीच खरी संपदा आहे. “आरोग्यम् धनसंपदा”. आरोग्य चांगले असेल तर धन संपत्तीत वाढ होईल. आधुनिक युगात माणूस हा आनंद व सुखाच्या शोधात असतो. सुखासाठी साधन, संपत्ती मिळवण्यासाठी धडपड करतो. तो पैशाने श्रीमंत, स्थिर होतोही, पण आपले अनमोल असे आरोग्य गमावून बसतो. ना खाण्यापिण्याकडे लक्ष, ना रोजच्या व्यायामाकडे. त्यातच आपण खात असलेले अन्न ही रसायनं टाकून पिकवलेलं असेल तर “थाली में जहर”च!

शेतीचं जसं जस यांत्रिकीकरण होऊ लागलं तसतसं अन्नधान्य पिकवण्यासाठी रासायनिक खते व रासायनिक कीटकनाशंकाचा वापर वाढू लागला. ज्या भाकरीच्या श्वाश्वतीत तो धडपडू लागला. त्या विषारी भाकरीनेच त्याचा घास कधी घेतला हे त्याच त्यालाच कळलं नाही. कधी ऐकले नाहीत असे आजार व त्याला जोगोजागी कर्करोग होऊ लागले. बरं हे मानव प्राण्यापुरतच मर्यादित राहिलं नाही, तर जल, जंगल, जमीन, पशू, पक्षी यांनाही मारक होऊ लागलं. त्यातच वाढत्या शहरीकरणामुळे डंपिंग ग्रांऊड वाढू लागलेत.

माणसं शहरात नाही तर कचर्‍याच्या कुंडीत राहू लागलेत असे म्हटले तरी चालेल. यावर उपाय काय? यावर असा उपाय पाहिजे, जो लोकांना मनापासून पटला पाहिजे. त्यात लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. नुसता सहभाग नाही. तनमनधन देवून तो सहभाग घेता आला पाहिजे. हे शक्य आहे का? हो शक्य आहे. ही गोष्ट आहे नाशिकच्या तरुणांची, फक्त गोष्ट नाही, तर उद्योगारंभातील एका टप्यावरची. यशोगाथा ‘स्मार्ट उदयोजक’च्या वाचकांसाठी.

gachchivarchi-baug2

आमीर खान निर्मित ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात शेतीमध्ये रसायनांचा वाढता वापर व त्याचे दुष्परिणाम यावर एक भाग होता. या भागातून प्रेरणा घेत नाशिकच्या संदीप चव्हाण यांनी आपली शेतीची, निसर्गाची, कचरा व्यवस्थापनाची आवड व छंदाचे रूपांतर उद्योगात करून व्यवसायाची मुहर्तमेढ रोवली. उद्योगाचं नाव ठेवलं ‘गच्चीवरची बाग’.

गाव मागच्या पिढीतच सुटलं होतं, पण गावाची, शेतीची ओढ कायमच. त्यातच आयुष्याच्या एका टप्प्यावर जाणवलं की आपल्याला शहरातील व त्यातल्या त्यात माध्यमांतील नोकरीपेक्षा शेतीत आवड जास्त आहे. नोकरीत एक तप पूर्ण झालं होतं, पण त्यातील हेवदावे, स्पर्धा कधीच संपणारी नव्हती व हे सारे रात्रदिवंस कष्ट हे नेमके कुणासाठी हा यक्ष प्रश्न उभा राहिला आणि एक दिवस नोकरीला राम राम ठोकला.

आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचं याचा विचार केला. तेव्हा लक्षात आलं की आपल्याला निसर्गाची खूप आवड आहे. शेती केली पाहिजे. त्यातच पुणे, मुंबई, नाशिकात कचरा वेचणार्‍यांचा प्रश्न ऐरणीवर होता. नाशिकचे डंपिंग ग्रांऊडही एकदा पालथ घालून झालं. त्यातून आपला ओला कचरा आजपासून फेकायचा नाही असा मनाशी निश्चय करून वैयक्तिक पातळीवर विविध प्रयोग पूर्वीच सुरू झाले होते. या कचर्‍याचं काहीतरी करू म्हणून केलेली सुरुवातच यशस्वीतेत होत गेली. विविध प्रयोगांना हाती यश लागलं आणि त्यातून सुरू झाला गच्चीवरची बागेचा प्रयोग.

विदेशी पाहुण्यांना ‘गच्चीवरची बाग’ समजावून देताना संदीप चव्हाण

बाजारातून काहीही विकत आणायचं नाही. हे विकत आणणंच खरं तर शेतकर्‍याला व शेतीला संपवत आहे, या निष्कर्षापर्यंत पोहोचलेला अभ्यास आता प्रत्यक्ष कृतीत आणण्याची वेळ होती. ती सिद्ध झालीसुद्धा. ‘गारबेज टू गार्डन’ अशी संकल्पना घेवून घरच्या घरीच रसायनमुक्त भाजीपाला कसा पिकवायचा या विषयी प्रयोग यशस्वी झाले. या अनुभवातून ‘गच्चीवरची बाग’ हे पुस्तकही प्रकाशीत झालं.

पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला. ही गोष्ट आहे २०१४ मधली. विविध वर्तमानपत्रांव्दारे नाशिकमधे जागृती झाली. आता तर सोशल मीडियामुळे याला चांगला प्रतिसाद मिळतोय. उदयोजकतेचे धडे वाचताना एक गोष्ट कळली की एखादा व्यवसाय व्यवसाय म्हणून साकारताना तो १ हजार दिवस चालवून पाहावा. जमला, टिकला तर तो अंगाखांद्यावर खेळवावा. झालंही तेच पहिली तीन वर्षं याला चांगला प्रतिसाद मिळाला.

हे फक्त त्यांच्याशी चर्चा करताना समजून येते. तर अशा अनुभवाधारावर गच्चीवरची बाग हे पुस्तक प्रकाशीत झालं. अशा अनुभवाआधारीत पुस्तक विक्रीतून घरोघरी पे कंन्सलटंसी सुरू झाली. कंन्सलटंसीतून २० टक्के माती व ८० टक्के पालापाचोळातून भाजापाल्याची बाग फुलूवून देण्याचे काम सुरू झाले. त्यातून नैसर्गिक खते, गोपालन, त्याआधारित कीटकनियंत्रके यांची निर्मिती सुरू झाली व सुरू झाला आवडीच्या उद्योगाच्या शिडात हवा भरण्याचं काम.

gachchivarchi-baug6

३१ मार्च २०१९ ला ‘गच्चीवरची बाग’ला सहा वर्ष पूर्ण झाली. सातव्या वर्षात पदार्पण झालंय. एकाट्याच्या खांद्यावर पेलण्याचं उद्योग धनुष्य आता सात जणांच्या खाद्यांवर वाटलं गेलंय. ताफ्यात आता छोटा हत्ती आहे. देशी गाय आहे आणि हे सारं करण्यासाटी छोटी हक्काची जागा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुभावाचं ज्ञान, जे अक्षय्य आहे. थायलंड, झिम्बांव्बे या देशातील विषमुक्त शेती, किचन गार्डनसोबत भारतातील विविध शेती प्रयोगांचाही प्रत्यक्ष भेटीतून अभ्यास करत या संकल्पनेचा पाया रचला गेला. घरच्या बागेत पिकवलेल्या भाज्यांतून, आलेल्या अनुभावतून ‘गच्चीवरची बाग’ पुस्तकाची पहिली आवृत्ती संपून दुसरी आवृत्ती प्रकाशीत झालीय.

सोबत “तुम्हाला माहीत आहे का?” या दुसर्‍या पुस्तकाचीही जोरदार विक्री सुरू आहे. “तुम्हाला माहित आहे का?” हे पुस्तक म्हणजे संदीप चव्हाण यांनी गच्चीवरची बाग या विषयावर घेतलेल्या कार्यशाळांमध्ये सांगितलेलं आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन या विषयीचे मुद्दे संकलित करण्यात आले आहेत. हे पुस्तक वाचतांना तर आपण त्यांची कार्यशाळाच अनुभवत आहोत असे वाटते. जे वाचकांसाठी आय ओपनींग ठरावं.

संदीप चव्हाण यांनी नाशिकमध्ये पाचशे घरांत भाजीपाला पिकवण्याचे काम सुरू केले आहे. दहा हजारांपेक्षा अधिक लोकांना बाग फुलवण्यास प्रेरीत केले आहे व तितकीच लोक रोज संपर्कात असतात. बाग-कचरा व्यवस्थापनाविषयी प्रश्न विचारतात. त्यांच्या कामाची विविध दृकश्राव्य तसेच मुद्रित माध्यमांनी त्यांच्या कार्याची दखल तर घेतली आहे. सध्या www.gacchivarchibaug.in व www.organic-vegetable-terrace-garden.com अशी दोन संकेतस्थळे आहेत. यावर आपण नक्कीच भेट देवून अधिक माहिती जाणून घेवू शकता व त्यांच्या संपर्कात राहू शकता.

साभारः मूळ लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

 

============================================================================पालापाचोळा, किचन वेस्ट, चला फुलवूया बगीचा बेस्ट. घरच्या घरी फुलवा भाजीपाल्याचा मळा… घरच्या घरी भाजीपाल्याची बाग फुलवण्यासाठी वाचणीय, उपयुक्त, संग्रही ठेवावं, वाढदिवसाला भेट द्यावी अशी गच्चीवरची बाग पुस्तिका… २४० रू. बाय पोस्ट घरपोहोच… 9850569644

============================================================================

लेखाच्या आरंभी असलेले स्वलिखीत, स्वअनुभवीत, स्वः चिंतीत असलेल्या बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन संदर्भातील मोजक्या समर्पक शव्दातीत, बागप्रेमीनी फेसबूकवर लाईक्स केलेल्या मराठी- हिंदी भाषेतील डोळे उघडणार्या व कृतीला प्रवृत्त करणार्या ६३६ बोधपर वाक्यांचा संग्रह असलेले तुम्हाला माहित आहे का? पुस्तक. फक्त २०० रू. ( पोस्ट खर्चासहित)

========================================================================

https://organic-vegetable-terrace-garden.business.site/

 

स्मार्ट उदयोजक वरील माहिती


 ठिकाण : नाशिक ई-मेल : sandeepkchavan79@gmail.com भ्रमणध्वनी : ९८५०५६९६४४ विद्यमान जिल्हा : नाशिक शिक्षण : B.A. M.C.J. कंपनीचे नाव : गच्चीवरची बाग उत्पादने/सेवा : सेंद्रिय भाज्यांची गच्चीवरील बाग गच्चीवरची बाग म्हणजे शहर, गाव यातील उपलब्ध जागेत, उपलब्ध वस्तूत, उपलब्ध नैसर्गिक स्त्रोतांव्दारे शुन्य खर्चात सेंद्रिय पध्दतीने घरच्या घरी भाजीपाला पिकवणे होय. या विषयी इच्छुकांना सोशल मिडीयाव्दारे मोफत मार्गदर्शन करणे त्यातून इच्छुकांना प्रेरीत करणे होय. माझ्या या आयुष्याबद्दल, जगण्याबद्दल तसेच या समाजाबद्दल माझं सुध्दा एक स्वप्न आहे. आज माझे स्वप्न आपल्याला सांगण्याची योग्य वेळ आहे असे मला वाटते. कारण येत्या 31 मार्च 2016 रोजी गच्चीवरची बाग या सामाजिक उद्मशीलतेला एक हजार दिवस पूर्ण होत आहेत. कोणत्याही नव्या संकल्पनेला एक हजार दिवस पूर्ण होणे ही उद्मशीलतेच्या जगात मोठी गोष्ठ मानली जाते. गच्चीवरची बाग या सामाजिक उद्मशीलतेला आकार देतांना अनेक मित्रांनी, मैत्रणींनी, समवयस्क, विचारवंत, समाज सुधारक, पर्यावरण प्रेमी, उद्योजक, पत्रकार, प्राध्यापक, गृहणी, जेष्ठ नागरीकांनी मदत केली आहे. प्रथम मी समाजातील सर्वच घटकांचे आभार व्यक्त करतो. या सामाजिक संकल्पनेला सुरवात करतांना उपजीवकेचा मुद्दा लक्षात घेतला होताच पण त्याला एक उद्मशीलतेचे मुल्य जोडले जाईल की नाही, लोक त्याचे किती स्वागत करतील याची शंका मात्र मनात होतीच. पण ती शंका निरर्थक होती असे आज मागे वळून बघतांना वाटते. अर्थात याचे सारे श्रेय समाजाचेच आहे. अशा या गच्चीवरची बागे विषयी माझे स्वप्न पुढीलप्रमाणे…. गारबेज टू गार्डन अर्थात कचर्यातून इच्छुकांना गच्चीवरची बाग फुलवण्यासंदर्भात फेसबूक, व्हॉटसऑप सारख्या सोशल मिडीयाव्दारे मोफत मार्गदर्शन करणे, लोकांनी घरच्या घऱी भाजीपाला पिकवण्यासंदर्भात सहज सोपे समजेल असे साधे पण विज्ञान आधारीत तंत्र विकसीत करणे, शुन्य खर्च, शुन्य देखभाल व बाजारमुक्त साधनांचा वापर करणे, त्याविषयीचे ज्ञान उपलब्ध करून देणं. यासाठी उपलब्ध जागा, उपलब्ध वस्तू व उपलब्ध नैसर्गिक स्त्रोताव्दारे बाग फूलवणे… ज्याव्दारे परिसर स्वच्छता तर साधली जाईल पण त्यातून नैसर्गिक पध्दतीने भाजीपाल्याची बाग फुलवता येईल. भाजीपाल्याची बाग फुलवण्यात थोडे श्रम घेतले तर त्याबदल्यात 100 टक्के आनंद, समाधान मिळेलच. बोनस म्हणून रसायनमुक्त भाजीपाला सेवन करता येईल. लोकांना चांगले, सकस अन्न खायाला मिळावे व त्यासाठी लोकांनी स्वतःच प्रयोगशील व्हावे यासाठी प्रेरीत करणे. चांगल्या अन्नाच्या सेवनाने शाकाहार वाढीस लागतो. त्यामुळे भविष्यात शाकाहार वाढावा यासाठी प्रयत्तरत आहे. परिसर स्वच्छ ठेवा असे सांगीतले तर लोक ही हजार सबबी सांगतील पण सुका ओला कचर्याचे वैज्ञानिक पध्दतीने व्यवस्थापन केल्यास त्यातून निसर्ग फूलवता येतो. तसेच काही केल्याने काही मिळतय आणि तेही आरोग्यदायी आहे असे पटल्यावर लोक कृतीशील होतात. अशी ही गच्चीवरची बाग घराघरात पोहचायवयांचे माझे स्वप्न आहे. येत्या काळात गच्चीवरची बाग हे साधे सोपे तंत्र शिकवणारे स्वःअनुभवाधारीत पुस्तक घराघरापर्यंत पोहचवणे, तसेच इच्छुकांना भाजीपाला बाग फुलवून देणे, किचन व गार्डन वेस्ट व्यवस्थापनाच्या विविध सोप्या, बिन खर्चिक उपाय शोधणे व या सार्या उपक्रमातून लोकांना शिकतं करणे हे माझे स्वप्न आहे. घरातील व परिसरातील कचरा व्यवस्थापन करून एक जबाबदार, सुजाण नागरिक म्हणून आपले कर्तव्य निभवावे असे मला वाटते. आपले आयुष्य हे निरोगी व आरोग्यदायी व्हावं तसेच आयुष्य वाढावं …या धावपळीच्या जगात निसर्गालाच आपला मित्र बनवून त्यात आपले अशांत मन शांत करावे. त्यासाठी निसर्ग हाच सर्वेत्तम उपाय ठरावा. तसेच वाढत्या शहरातील सिमेंटच्या जंगल हे हिरवेगार व्हावे असे स्वप्न आहे व हे जीवन रंगीत, चवदार, आरोग्यदायी, हिरवेगार, टवटवीत व्हावे व या आनंदयात्रेत समाजानेही सहप्रवासी व्हावे हे माझं स्वप्न आहे. अर्थात ही स्वप्न साखळी एकमेंकात गुफंली आहे. याची पहिली कडी अर्थात गच्चीवरची बाग फुलवण्यातूनच होणार आहे. ती प्रत्येक शहऱातील प्रत्येक घरात, गच्चीवर फुलावी हे स्वप्न घेवून मी काम करत आहे. अर्थात यात आपलीही मदत हवीच आहे.

सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://wp.me/p4g3S9-2NYपरिचय : जन्म दिनांक : ६ जानेवारी, १९७९ जन्म ठिकाण : नाशिक ई-मेल : sandeepkchavan79@gmail.com भ्रमणध्वनी : ९८५०५६९६४४ विद्यमान जिल्हा : नाशिक शिक्षण : B.A. M.C.J. कंपनीचे नाव : गच्चीवरची बाग उत्पादने/सेवा : सेंद्रिय भाज्यांची गच्चीवरील बाग गच्चीवरची बाग म्हणजे शहर, गाव यातील उपलब्ध जागेत, उपलब्ध वस्तूत, उपलब्ध नैसर्गिक स्त्रोतांव्दारे शुन्य खर्चात सेंद्रिय पध्दतीने घरच्या घरी भाजीपाला पिकवणे होय. या विषयी इच्छुकांना सोशल मिडीयाव्दारे मोफत मार्गदर्शन करणे त्यातून इच्छुकांना प्रेरीत करणे होय. माझ्या या आयुष्याबद्दल, जगण्याबद्दल तसेच या समाजाबद्दल माझं सुध्दा एक स्वप्न आहे. आज माझे स्वप्न आपल्याला सांगण्याची योग्य वेळ आहे असे मला वाटते. कारण येत्या 31 मार्च 2016 रोजी गच्चीवरची बाग या सामाजिक उद्मशीलतेला एक हजार दिवस पूर्ण होत आहेत. कोणत्याही नव्या संकल्पनेला एक हजार दिवस पूर्ण होणे ही उद्मशीलतेच्या जगात मोठी गोष्ठ मानली जाते. गच्चीवरची बाग या सामाजिक उद्मशीलतेला आकार देतांना अनेक मित्रांनी, मैत्रणींनी, समवयस्क, विचारवंत, समाज सुधारक, पर्यावरण प्रेमी, उद्योजक, पत्रकार, प्राध्यापक, गृहणी, जेष्ठ नागरीकांनी मदत केली आहे. प्रथम मी समाजातील सर्वच घटकांचे आभार व्यक्त करतो. या सामाजिक संकल्पनेला सुरवात करतांना उपजीवकेचा मुद्दा लक्षात घेतला होताच पण त्याला एक उद्मशीलतेचे मुल्य जोडले जाईल की नाही, लोक त्याचे किती स्वागत करतील याची शंका मात्र मनात होतीच. पण ती शंका निरर्थक होती असे आज मागे वळून बघतांना वाटते. अर्थात याचे सारे श्रेय समाजाचेच आहे. अशा या गच्चीवरची बागे विषयी माझे स्वप्न पुढीलप्रमाणे…. गारबेज टू गार्डन अर्थात कचर्यातून इच्छुकांना गच्चीवरची बाग फुलवण्यासंदर्भात फेसबूक, व्हॉटसऑप सारख्या सोशल मिडीयाव्दारे मोफत मार्गदर्शन करणे, लोकांनी घरच्या घऱी भाजीपाला पिकवण्यासंदर्भात सहज सोपे समजेल असे साधे पण विज्ञान आधारीत तंत्र विकसीत करणे, शुन्य खर्च, शुन्य देखभाल व बाजारमुक्त साधनांचा वापर करणे, त्याविषयीचे ज्ञान उपलब्ध करून देणं. यासाठी उपलब्ध जागा, उपलब्ध वस्तू व उपलब्ध नैसर्गिक स्त्रोताव्दारे बाग फूलवणे… ज्याव्दारे परिसर स्वच्छता तर साधली जाईल पण त्यातून नैसर्गिक पध्दतीने भाजीपाल्याची बाग फुलवता येईल. भाजीपाल्याची बाग फुलवण्यात थोडे श्रम घेतले तर त्याबदल्यात 100 टक्के आनंद, समाधान मिळेलच. बोनस म्हणून रसायनमुक्त भाजीपाला सेवन करता येईल. लोकांना चांगले, सकस अन्न खायाला मिळावे व त्यासाठी लोकांनी स्वतःच प्रयोगशील व्हावे यासाठी प्रेरीत करणे. चांगल्या अन्नाच्या सेवनाने शाकाहार वाढीस लागतो. त्यामुळे भविष्यात शाकाहार वाढावा यासाठी प्रयत्तरत आहे. परिसर स्वच्छ ठेवा असे सांगीतले तर लोक ही हजार सबबी सांगतील पण सुका ओला कचर्याचे वैज्ञानिक पध्दतीने व्यवस्थापन केल्यास त्यातून निसर्ग फूलवता येतो. तसेच काही केल्याने काही मिळतय आणि तेही आरोग्यदायी आहे असे पटल्यावर लोक कृतीशील होतात. अशी ही गच्चीवरची बाग घराघरात पोहचायवयांचे माझे स्वप्न आहे. येत्या काळात गच्चीवरची बाग हे साधे सोपे तंत्र शिकवणारे स्वःअनुभवाधारीत पुस्तक घराघरापर्यंत पोहचवणे, तसेच इच्छुकांना भाजीपाला बाग फुलवून देणे, किचन व गार्डन वेस्ट व्यवस्थापनाच्या विविध सोप्या, बिन खर्चिक उपाय शोधणे व या सार्या उपक्रमातून लोकांना शिकतं करणे हे माझे स्वप्न आहे. घरातील व परिसरातील कचरा व्यवस्थापन करून एक जबाबदार, सुजाण नागरिक म्हणून आपले कर्तव्य निभवावे असे मला वाटते. आपले आयुष्य हे निरोगी व आरोग्यदायी व्हावं तसेच आयुष्य वाढावं …या धावपळीच्या जगात निसर्गालाच आपला मित्र बनवून त्यात आपले अशांत मन शांत करावे. त्यासाठी निसर्ग हाच सर्वेत्तम उपाय ठरावा. तसेच वाढत्या शहरातील सिमेंटच्या जंगल हे हिरवेगार व्हावे असे स्वप्न आहे व हे जीवन रंगीत, चवदार, आरोग्यदायी, हिरवेगार, टवटवीत व्हावे व या आनंदयात्रेत समाजानेही सहप्रवासी व्हावे हे माझं स्वप्न आहे. अर्थात ही स्वप्न साखळी एकमेंकात गुफंली आहे. याची पहिली कडी अर्थात गच्चीवरची बाग फुलवण्यातूनच होणार आहे. ती प्रत्येक शहऱातील प्रत्येक घरात, गच्चीवर फुलावी हे स्वप्न घेवून मी काम करत आहे. अर्थात यात आपलीही मदत हवीच आहे.

आणखी वाचा…

About Us…

गोगलगाय उपद्रवी किडा…

झा़डांचे टॉनिक जिवामृत

Not Only Consultancy …Much more

गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…

गच्चीवरच्या बागेला खतपाणी…

ऑनलाईन खरेदी करा..

गच्चीवरच्या बागेचे  शिका तंत्र

पुस्तकः तुम्हाला माहित आहे का?

टेलेग्राम वर गच्चीवरची बाग..

बहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…

कार्यशाळेनंतर  स्टाॅलवर मिळणार्या  गोष्टी…

गच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा

विकास पिडीया वर गच्चीवरची बाग

गच्चीवरची बाग म्हणजे काय रे भाऊ…

Personal Work & Profile

कार्यपरिचय

i Have Dream

माझे स्वप्न…

%d bloggers like this: