Need Your helping Hands

img118.jpg

Need Your Helping Hand…

गच्चीवरची बाग हा उपक्रम आम्ही नाशिक मधे रूजवतोय. फक्त नाशिकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांपर्यंत हा विषय पोहचवत आहोत. या कामात गेल्या सहा वर्षापासून पूर्णवेळ काम करत आहोत.

हे फक्त आमचे Profession नाही तर passion आहे. या अंतर्गत आम्ही Social Entrepreneurship प्रमाणे काम करत आहोत. म्हणजे पर्यावरण, लोकांची आवड किंबहूना आजच्या काळाजी गरज आहे म्हणून तिला एका बाजूला चळवळीचे स्वरूप देत आहोत. आज Social Media वर जे काही gardening बद्दल दिसत आहे त्याची सुरवात आम्ही खूप आधीच केली होती. अर्थात ते सारे आमच्यामुळे सुरू झाले किंवा आहे असा अजिबात दावा नाही. पण या सार्यात आमचाही काही वाटा आहे हे मात्र नक्कीच म्हणता येईल. तर Social Entrepreneurship प्रमाणे काम करत आहोत. म्हणजे पर्यावरण, लोकांची आवड किंबहूना आजच्या काळाजी गरज आहे म्हणून आम्ही सामाजिक बांधिलकी जपता जपता त्यास व्यवसाय म्हणूनही विकसीत करत आहोत.

सामाजिक बांधीलकी म्हणून पुढील काही उपक्रम निशुल्क पणे पोहचवत आहोत.

 • कुंटुंबाने घरी येऊन गच्चीवरची बागे विषयी मार्गदर्शन करणे
 • इच्छुकांना Social Media वर निशुल्क मार्गदर्शन करणे
 • जेष्ठांना घरी जावून अत्यल्प दरात किंवा निशुल्क मार्गदर्शन करणे
 • विद्यार्थांना पर्यावरणीय Projects माहिती देणे किंवा मार्गदर्शन करणे
 • मराठी वाचकांना मराठीत बागेविषयी लेख लिहणे ( दोन संकेतस्थळा व्दारे)
 • वृत्तपत्रांसोबत किंवा सामाजिक संस्था, गटासोबत निशुल्क कार्यशाळा घेणे.

आम्ही वरील सारी कामे निशुल्क करत आहोत. कारण समाजाचे आपण काही देणे लागतो. या विचारातूनच आम्ही वरील काम करत आहोत.

या व्यतिरिक्त आम्ही काही सेवा व उत्पादन विक्री करत आहोत. त्यातून माझ्या कुटुंबाची, मदतनिसाची, गायीची व एकूण हा पर्यावरण विचाराचा जागृती रथ चालवत आहोत.

आम्ही देत असलेल्या सेवा व उत्पादन ही अगदी कमी किमतीत असूनही ति नव बागप्रेमीनां महाग वाटते. (काही जाणकार, संवदेनशील व्यक्ती, कुटुंब यास अपवाद आहेत) म्हणून आम्ही आमच्या उत्पादनांची व सेवांच्या किमती या गेल्या चार वर्षापासून स्थिर ठेवल्या आहेत. हेतू एवढाच की पर्यावरण रक्षणाचा व शिक्षणाचा विचार लोकांपर्यत पोहचवा. या विचाराला व्यवसायाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण अनेक आघाड्यावर दमछाक होत आहे.

या आघाड्या म्हणजे बागेसंदर्भात विविध प्रयोग करणे, घरच्या टेरेस गार्डनचे, सामाजिक हेतूचे व व्यवसायीक आघाड्याचे व्यवस्थापन बघणे, Social Media सांभाळणे, तसेच उत्पनाचा मुख्य स्त्रोत म्हणजे इच्छुकांच्या बागेचे व्यवस्थापन करून देणे, यात स्वतः लक्ष घालून, पुढाकार घेवून मदतनिसासोबत काम करणे, तसेच इच्छुक कुटुंबाला मार्गदर्शन करणे, वारंवार भेटी देणे. दोन कामातील प्रवासात वेळ खर्च होणे.. यात बराच वेळ खर्च होतो. त्यामुळे उत्पनाचा मुख्य मार्ग असूनही… त्यावर कधी कधी वरील निशुल्क पुरवल्या जाणार्या सेवामुळे आमच्या उत्पन्नात कमतरता येते. या सार्याचां मागील तीन वर्षापासून आम्ही हिशोब ठेवला तेव्हा लक्षात आले की हा पर्यावरण विचार पोहचवण्यासाठी उभे केलेले संसाधने (यंत्र, पुस्तक, गाय, गोठा, गाडी) यातील गुंतवणूक ही मोठी झाली आहे. येणारे उत्पन्न व गुंतवलेली रक्कम (अर्थात ही कर्जावूच आहे) यात महिण्याला खर्च व उत्पन यात २० ते ३० हजाराचा फरक येतो आहे.

आमचे खालील प्रमाणे खर्च होतात.

 • Social Media वर निशुल्क मार्गदर्शन (फोन करणे, प्रश्नांना उत्तरे देणे, संकेतस्थळावर लेख प्रकाशीत करणे) या कामी इंटरनेट सेवेवर साधारण महिण्याला २५०० रू. खर्च येतो. (या संकेतस्थळावर रोज तीनशे लोक भेट देतात. कारण दोनशे पेक्षा अधिक लेख सर्वांसाठी विनामुल्य वाचणास उपलब्ध आहेत. या वर्षी ३६५ लेख उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. वाचकांनी लेखाप्रती जी काही आर्थिक मदत करण्याची इच्छा असेल ती करू शकता. Phone Pay 9850569644)
 • गाय संगोपनः विषमुक्त अन्न निर्मितीसाठी गोमुत्र व गोमय(गाईचे शेण) हे गरजेचे असते. त्यासाठी देशी, स्थानिक गायीचे संगोपन- पालन पोषण करण्यात येते. गाय, गायीचे वासरू, गायीचा दवाखाना, रोजचा चारा पाणी व व्यवस्थापनासाठी महिण्याला ५००० खर्च आहे.
 • जागृती रथ( Awareness Van) ही गाडी लोकांमधे गारबेज टू गार्डन हा संदेश पोहचावा म्हणून जागृती रथ व गच्चीवरची बाग व्दारे पुरवल्या जाणार्या सेवा सुविधासाठी अशा बहुपयोगी उद्देशाने उपयोगात आणली जाते. तिचा सध्या EMI Paid होत आहे. त्याचा महिण्याला खर्च 6500 रू. आहे.तसेच महिण्याकाठी १५०० रू डिझेडचा खर्च होतो. तसेच वर्षाला त्याचा परवाना नुतनीकरण करणे (२५०००) , जाहिरातीचे पोस्टर ( १००००) असा खर्च आहे.
 • नवनविन प्रयोग करणे, त्याकामी विविध संसाधने वापरणे ( Drilling Machine, Shredding machine) इतर काही साहित्यांची गरज असते. त्यापोटी महिना 2500 खर्च असतो.
 • gacchivarchibaug.inwww.organic-vegetable-terrace-garden.com अशी दोन संकेतस्थळे मी स्वतःहून विकसीत करत आहे. त्याचा वार्षिक खर्च साधारण १५००० असा आहे.
 • घरचे टेरेस गार्डन, गायीचा गोठा, गोडावून कम वर्कशॅप( पालापाचोळा, माती, कंपोस्टीग, कचरा व्यवस्थापन, लालमाती इ. चा संग्रह) रोजची बाग व्यवस्थापनाची शहरातील कामे करण्याकरीता एक मदतनीस आहे. आम्ही त्यांना सन्मानपूर्वक असा रोजगार देतो. त्याचा मासिक खर्च साधारण १०००० आहे.
 • या सार्या कामांना गती व खेळते भांडवल मिळावे यासाठी वेळोवेळी काही खाजगी आर्थ पुरवठादार संस्थाकडून कर्ज घेण्यात आले आहे. त्याचीही परतफेड होत आहे.

असा हा पर्यावरणाचा रथ चालवण्यासाठी खर्च होत आहे. आपण, आपल्यामंडळाकडून या कामी काही आर्थिक मदत झाल्यास आम्हाला आनंदच वाटेल. आपल्याकडून मिळालेला मदतीतून झालेल्या खर्चाचा हिशोबही ठेवला जाईल. हे कामच माझे व्यसन आहे. त्यामुळे दुसरे “खाण्यापिण्या”चे कोणतेही व्यसन नाही. त्यामुळे आपण दिलेला मदतीचा पै पै हा केवळ याच कामासाठी वापरला जाणार आहे.

मला खात्री आहे. आपण मदतीमुळे हे काम अधिक लोकांपर्यत पोहचेल. कारण हा उपक्रम पूर्णतः स्वःउत्पान्नावर चालवणे अजून तरी शक्य होत नाहीये. कारण त्यापोटी येणारा खर्च हा इतरांना सेवा- उत्पादन विक्रीची किमत वाढ ही परवडण्याजोगी नाही. किंवा त्यासाठी खर्च करावा लागतो याची मानसिकता अजून सर्वथा झालेली नाही. आज या विषयाची आवड, तळमळ, गरज सर्वांनाच आहे. पण हे पर्यावरण कर्तव्य करतांना जे सामाजिक भान व व्यावसायिकता सांभाळतांना समाजाच्या विविध स्तरातून विरूध्द टोकाच्या प्रतिक्रिया आहेत.

१) इतके समाजकारण करून नका २) खूपच व्यावसायीक आहात.

या प्रतिक्रिया असणारच आहेत. त्यामुळेच ही तारेवरची कसरत करतांना समतोल साधण्यासाठी आपल्या आर्थिक मदतीची निंनात गरज आहे. मला खात्री आहे या मदतीचा आधार खूप काळ लागणार नाही. जनाजनार्दन आमचे कार्य व व्यावसायिकता यास भरभरून प्रतिसाद देतील फक्त थोडी कळ सोसणे गरजेचे आहे. तेव्हा आमचा हा उपक्रम तुम्हाला आवडत असेन, आपण कुठे ना कुठे त्याचे लाभदायी असाल तर आपण आपल्याला जी जमेल, जेवढी जमेल तेवढी मदत करा. आपला स्नेह असा वृध्दीगंत होत राहो.

आमची कोणतीही संस्था नाही. त्यामुळे या पर्यावरण कार्याला मदत होत नाही. कारण संस्थेचा कारभार चालवणे , पहाणे हे वेळेच्या व पैशाच्या गुंतवणूकीमुळे ते शक्य नाही. संस्थेचा कागदावरील दैनदिंन कारभारापेक्षा प्रत्यक्षात निसर्गाची सेवा करणे हे मला अधिक भावते.

भविष्यातील उपक्रमः

 • लोकसत्ता –चतुंरग पुरवणीत ४८ लेखांची लेखमाला प्रकाशीत झाली आहे. तिचे मराठी, इग्रंजी भाषेत पुस्तक रूपात प्रकाशन करावयाचे आहे.
 • भाजी बाजारात लोकांपर्यत गच्चीवरची बाग हा विषय पोहचवण्यासाठी फिल्म प्रदर्शीत करणे
 • आठवी व नववीच्या वर्गासाठी प्रबोधन वर्ग घेणे व शाळेत गच्चीवरची बाग फुलवणे
 • इच्छुकांसाठी प्रात्यक्षिक व प्रबोधन वर्ग घेणे

आमचे प्रयोग, प्रयत्न, प्रत्यक्ष काम, अडचणी, भविष्यातील योजना आपण पहावयास येवू शकता.

आपण आमच्या Products N Garden Services चा लाभ घेवू शकता किंवा घेण्यासाठी ईतरांना प्रेरीत करू शकता.

9850569644 / 8087475242

www.gacchivarchibaug.in

उदयोजक म्हणून प्रकाशीत झालेली कहाणी वाचा

स्वबोध अंकातील पानभर गोष्टः वाचा….

website
http://www.gacchivarchibaug.in

 

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Grow Organic
error: Content is protected !!
%d bloggers like this: