हायड्रोफोनिक्स का नको


Why not Hydroponics?

आज घरीच विषमुक्त भाज्या पिकवणे फार गरजेचे झाले आहे. आहे त्या जागेत येईल त्या भाज्या विषमुक्त भाज्या पिकवणे हे औषधासमान आहे. बरेचदा वेगळा प्रयोग म्हणून घरी खाण्यासाठी Hydroponics या तंत्राचा वापर करू इच्छितात. Hydroponics म्हणजे प्लास्टिक पाईच्या विशिष्ट रचना करून त्यामधे वाहत्या पाणी सोडले जाते. त्या वाहत्या पाण्यात काही अंशी द्राव्य खते ( विशेषतः रासायनिक खते) टाकून त्यात पालेभाज्यांचे, सलाड वर्गीय भाज्यांचे उत्पादन घेतले जाते.

मुळात या प्रकारच्या भाजीपाला उत्पादनाला आम्ही विरोध करतो कारण मुळात या ज्या पदार्थाचां वापर होतो तो म्हणजे केवळ पाणी, रासायनिक खते व प्लास्टिकच्या पाईपचा वापर. यातील प्लास्टिक पाईप जेव्हां गरम होतो तेव्हां त्यातून घातक रसायने  पाण्यात मिक्स होतात व त्यावर भाज्या पोसल्या जातात. प्लास्टिक पाईप असो वा वस्तू यातून गरम पदार्थाचे जे काही रसायनाचे सेवन होते त्यातून आधुनिक आजार जडतात.

तज्ञांच्या मते प्लास्टिकच्या बादलीत जे काही गरम पाण्याने अंगोळ करतो त्यातून टाईप टू प्रकारचा डायबेटीस होतो. आता विचार करा… साधे गरम पाणी अंगावरून घेतल्याने आजार होत असेन तर सेवनाने किती आजार होतील याचा विचार केलेला बरा..

Hydroponics ही पध्दत परदेशात उत्तम प्रकारे काम  करते व त्यात जे काही उगवले जाईल ते विषमुक्त असेनही. कारण त्यांच्याकडे वातावरण हे थंड आहे. तसेच मानव प्राण्याची संरचना  पंचमहाभूतांनी बनलेली आहे. त्याने असेच अन्न सेवन करावे जे या पंचमहाभूतांनी बनलेले असावे. Hydroponics या प्रकारात मातीचा अभाव असतो. त्यामुळे ते झाडं, वनस्पती, भाजीपाला यात कितीसे सत्व असणार. त्यामुळे Hydroponics या तंत्रांने उगवलेला भाजीपाला हा प्रयोग म्हणून, व्यवसाय म्हणून नक्कीच करावा. कारण Hydroponics तंत्राने उगवलेला भाजीपाला हा आपल्या आठवडी आहारातील एकाद पदार्थ असावा. सातही दिवस त्याचे जेवण नसावे. तसेच आपणास विक्री करावयाची अथवा व्यवसाय करायचा असेन तर नक्की करावा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग,नाशिक.,

Roots VEGETABLES


6 (10)

भारतीय उपखंडात येणार्या सर्व प्रकारचे कंदमुळे आपण गच्चीवर उगवू शकतो. या मधे कांदा, लसूण, रताळी, सुरण, बटाटा, आलं, हळद, गाजर, बिट, शेंगदाने उगवू शकतो. यातील काही बियापासून त्यांची उगवण करता येते किंवा त्यांचा काही डोळे असलेला भाग पूर्नलागवड करून त्याची वाढ करू शकतो. या सार्या प्रकारासाठी नऊ इंच उंचीचा वाफा पूरेसा ठरतो.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

%d bloggers like this: