Grow, Guide, Build, Products, sale N Services for Home Grow Vegetable Services
Books
गच्चीवरची बाग…पुस्तक द्वितीय आवृत्ती, २०१९.
पालापाचोळा, किचन वेस्ट चला फुलवू या बगीचा बेस्ट.
गच्चीवरची बाग… पुस्तक घरच्या घरी भाजीपाल्याची बाग फुलवायची कशी… या बागेचे लोकल टू ग्लोबल परिमाणात गच्चीवर बाग का फुलवणे गरजेचे आहे. पर्यावरणीय काय महत्व आहे.. या विषयी वाचकाचा दृष्टीकोन घडवत छोट्या छोट्यातंत्राचा वापर करत हे पुस्तक वाचकामध्ये बाग फुलवण्याविषयी आत्मविश्वास तयार केला जातो. या पुस्तकाचा पुस्तक परिक्षण लोकसत्ता, दिव्यमराठी, महाराष्ट्र टाईम्स, अँग्रोवन या आघाडीच्या, वर्तमानपत्रात परीक्षण
कमीत कमी साधनांत घरच्या घरी उगवता येणार्या भाज्या, त्याचे महत्व, घरातील उपलब्ध बियांणाची, खताची कीड नियंत्रकांची माहिती असलेले छोटे खानी पुस्तक…
सदर पुस्तक मराठी भाषेत प्रकाशीत करण्यात आले आहे. या पुस्तकात Lockdown च्या काळात आपल्या हाती कोणतेही संसाधने नसतांना Garbage to Garden म्हणजेच घरच्या टाकाऊ वस्तूत आपण भाजीपाला उगवू शकतो. त्या वस्तू कोणकोणत्या असतात. त्याची निवड कशी करावी. तसेच त्यासाठी लागणारे तसेच किचन वेस्टचे व्यवस्थापन केल्यास त्यातून छान असे कंपोस्ट खत तयार करू शकतो. या पुस्तकात एकूण पाच लेख लिहिले असून त्यातून घरच्या घरी औषधासारख्या भाज्यांची निर्मिती सहतेने करता येते. तसेच या पुस्तकातील लेखात कीड नियंत्रणासाठी काय करावे? बियाणं कशी मिळवावीत. तसेच covid-19 च्या काळात आपण आपले मनस्वास्थ कसे टिकवावे, त्यात निसर्ग कसा मदत करतो याचा सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. संदीप चव्हाण हे भारतातील महाराष्ट्रातील नाशिक शहरात गच्चीवरची बाग ही संकल्पना रूजवत आहेत. त्यासाठी Grow , Guide, Products sales & Services’ पुरवतात. त्यांनी लोकसत्ता- चतुरंग या पुरवणीत गच्चीवरची बाग या विषयीचे वर्षभर सदर लेखन केले आहे. तसेच सध्या नाशिकच्या सकाळ व्दारे हिरवे स्वप्न या सदरात सध्या लेखन सुरू आहेत. त्यांनी आतापर्यंत गच्चीवरची बाग (व्दीतीय आवृत्ती), डॉ. बगीचा –ई बुक प्रकाशीत केले आहे. सदर लेख हे सकाळ –नाशिक वृत्तपत्रात या पूर्वीही प्रकाशीत झाले आहेत
कचरा व्यवस्थापन, पर्यावऱण, आरोग्य, लोकसहभाग, भाजीपाल्याची बाग, निसर्ग अशा विविध विषयावर “घंटो का ग्यान मिनंटो में” थोडक्यात आपली डोळे उघडणारी ही वाक्ये तुम्हाला माहित आहे का या पुस्तिकेव्दारे देण्याचा प्रयत्न केला आहे. काम करता करता चिंतनातून सुचणारी वाक्य सुरवातीला फेसबुकवर प्रकाशित करत गेलो. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या वाक्यांचे पुस्तक रूपात दिले आहे. छापिल मुळ पुस्तकाची किमंत 240 रू असून पी.डी तुम्हाला माहित आहे का ? E Book
You must be logged in to post a comment.