Aerio Bricks Rise bed


Grow Your Own Organic Vegetable at Your Eyesight

scientifically Proven Aerio Bricks Rise bed for growing organically 

wp-1549986396898.jpg

कोव्हीड-१९ च्या उद्रेकामुळे काही गोष्टी स्पष्ट झाल्यात त्यात आपल्या मानवी मर्यादा काय आहेत हेही लक्षात आलयं. मी स्वतः काय करायचं, कुटुंबाने काय करायचं, प्रशासन काय करणार, सरकार काय करणार.. अशा प्रत्येक पातळीवर आपल्याला ताकदी व कमतरता लक्षात आल्या आहेत. आणि पुढेही येत राहितील. विज्ञान, श्रध्दा, अंधश्रधा यांच्या परिसिमांची ओळख झाली. यातून भविष्यात काय करता येईल याचा सर्वांगीन विचार करणे गरजेचे आहे. बरं हे शेवटचं, आकाशातून एकदाच आलेलं संकट नाही. हे वारंवार येत राहणार, खरं तर ही सुरवात आहे जैविक युध्दाची म्हणा किंवा निसर्गाने माणसाविरूध्द पुकारलेला असहकार म्हणा. जगायचं असेल तर सर्वांगीन गोष्टीचा मुळातून विचार करावा लागणार आहे. आमुलाग्र बदल करावा लागणार आहे.

अर्थव्यवस्था, राहणीमान, रोजगार, दळणवळण, शिक्षण,खाणपान, कृषी यात आमुलाग्र बदल केला गेला तरच माणसाला जगता येणार आहे. कदाचित असं होणारही नाही. पण ही एक संधी आहे आपल्याला बदलण्याची, व्यवस्था बदलाची. प्रत्येक विषयातील तज्ञ त्यांची प्रत्येकाची मते, विचार, चिंता मांडतीलच. त्याचा ज्याच्या त्याच्या परिने उपयोग करणे हिताचे ठरेल.

या सर्वातील महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. तो अन्न निर्मीतीचा. असे संसर्गीत असणारे आजार केवळ घरात बसून दूर होणार नाही. त्यासाठी कोणत्याही बाहेरील वस्तूला स्पर्श टाळणे हे खरे गमक आहे. पण ते आपण किती पाळतो… शुन्य.. असो. असा प्रसंग पहिल्यादांच आपल्यावर आला आहे. चुकत माकत, धाडस करत शिकत आहोत. पण सुटका नाही हे लक्षात घ्या..

उद्या समजा विलगकीरण व्हायची वेळ आली तर आपण खान पानाच्या दृष्टीने स्वावलंबीत होणं खूप गरजेचं आहे. धान्याची एवढी रोज गरज लागत नाही. पण भाज्यांची गरज रोजच असते. त्यातून भाजी, ज्यूस, सूप तयार करता येतं. जे पोषणाला फायदेशीर ठरते. इतर दिवसांमधेही ती असतेच म्हणा.. इतर दिवसात आम्ही ओरडून सांगत होतो की रासायनिक भाज्या खाऊ नका… प्रतिकार शक्ती कमी होते. आजारांना आमंत्रण देणारं घर होते. पण आता सांगावे लागेल. संसंर्गजन्य भाज्या घेणे टाळा.

आम्ही या विषयावर गेल्या १५ वर्षापासून काम करत आहोत. सातत्याने त्यात प्रयोग, संशोधन करत आहोत. वेगवेगळ्या मांध्यमांचा वापर करत लोकांचे प्रबोधन करत आहोत. लोकांना निसर्गाजवळ नेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण अन्नच असं सेवन करायचं की तेच औषध असेन. प्रतिकार शक्तीच जर आदीम मानवासारखी असेन तर आयुष्यही वाढेलच पण आजारालाही दूर ठेवेन हे तर आपण मान्य केले पाहिजे. या आधि आपण काय काय प्रकारच अन्न, औषधे आपण सेवन केली आहेत. विरूध्द आहार सेवन झाला आहे. कोव्ही१९ सारखे विषाणू आपण पूर्वीच सेवन केलेल्या बाहेरील औषधाला, प्रक्रियायुक्त अन्नाला पुरक तर ठरली नाहीत ना… अशी शंका येते. असो..

आम्ही करत असलेल्या कामाचे या आजारामुळे बर्यांच अंशी महत्व अधोरेखीत झाले आहे. किंबहुना त्याची गरज वाढली आहे. Grow Guide, Products and Services या प्रत्येक विभागात आम्ही एकूण ५२ प्रकारचे उत्पादने आहेत. यातील सर्वात महत्वाचे म्हणजे भाजिपाल्याचा विटांचा सेटअप लावणे. इतर साधनातही भाजीपाला उगवता येतो पण त्या मानाने विटांचा वाफा हा खूप अर्थाने फायदेशीर व उपयुक्त ठरतो.

भाजीपाल्याचा सेटअप म्हणजे गच्चीवर प्लॅस्टीक अंथरूण, त्यावर तिन विटांचा रचला जातो. लांबी रूंदी सोयीनुसार असते. त्यात ८० टक्के जैविक कचरा व २० टक्के माती व खत वापरले जाते. हा सेट अप १ ते ३ वर्ष चालतो. आम्ही महाराष्ट्रात माहिती व पुस्तक विक्री, कार्यशाळा, सेमीनार या व्दारे दीड लाख लोकांपर्यंत पोहचलो आहोत. तर नाशिक मधे अशा प्रकारचे सेटअप ५०० घरांमधे लावले आहेत. तुम्हालाही असे सेटअप आपल्या घरी करायचे असल्यास नक्कीच संपर्क करा.

विटाचे वाफा किमान १०० चौरस फूट असावा. २५ फूट बाय ४ फूटसाठी खालील प्रमाणे कमाल खर्च प्रस्तावित असतो. कमी होऊ शकतो.

  • 3 इंच उंचीचा वाफा (वर्षभर चालणार, फळभाजी, पालेभाजी लागवड करता येणार)

खर्च 125 रू. प्रति चौरस फूट

  • 6 इंच उंचीचा वाफा (२ वर्ष चालणार, फळभाजी, पालेभाजी, वेलवर्गीय लागवड करता येणार) 175 रू. प्रति चौरस फूट
  • 9 इंच उंचीचा वाफा. (३ वर्ष चालणार, फळभाजी, पालेभाजी, वेलवर्गीय, कंदमुळे, व पपई, शेवगा लागवड करता येणार .) 250 रू. प्रति चौरस फूट..

या व्यतिरिक्त आम्ही कचरा व्यवस्थापनाच्या जागेची उपलब्धता, कचर्याचे प्रमाण, आपल्याकडील वेळ, संसाधने यानुसार विविध मॉडेल्स तयार केले आहेत. काहीमधे आपण कचरा व्यवस्थापन व भाज्या एकाच वेळेस उगवता येईल अशी सुविधा आहे.

टीपः नाशिक मधे आपल्याला अशा प्रकारची बाग तयार करावयाची असल्यास आजच ADVANCE BOOKING करून ठेवा.. कारण lOCKDOWN संपल्यानंतर आपल्याला सेवा देण्यास उशीर होऊ शकतो. त्यातच पावसाळा सुरू होणार आहे. बरेचदा पाऊस सुरू झाला की आम्हाला संपर्क केला जातो पण सेटअप तयार करण्याचे कामाचे तीन महिने आधिच BOOKING झालेले असते. सेवा सुविधा पुरवता येत नाही.

आमच्या संकेत स्थळांना भेट द्या. http://www.gacchivarchibaug.in

अधिक माहितीसाठी

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. 9850569644/ 8087475242

4 thoughts on “Aerio Bricks Rise bed

thank you for connect.. please join on wts app 9850569644

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: