
Annapurna Bags
For
Producing
Organic Vegetables
अन्नपूर्णा बॅग संबधी लाईव्ह सेमीनार लवकरच… Wts app वर लिंक पाठवली जाईल.

Organic भाजीपाला उत्पादन झाले सोपे
उपलब्ध जागेत organic भाजीपाला उगवता आला तर? किती चांगले होईल ना.. शिवाय ही बॅग्ज्स रेडी टू ग्रो असेल तर भारीच ना.. माती आणा, खत आणा, कामासाठी माणूस बघा, नाहीतर स्वतःच काम करा.. बियाणं लावा. त्यापेक्षा पेरायला तयार अशा बॅग्जस असेल तर लयंच भारी. ते सुध्दा बिशकॉम पॉटींग मिक्सर सोबत व योग्य खताचा समावेश असलेली अन्नपूर्णा बॅग्जस.. चला तर पाहूया..
अन्नपूर्णा बॅग्जस म्हणजे काय?

अन्नपूर्णा बॅग्जस ही रेडी टू सो, रेडी टू ग्रो, पेरण्यासाठी तयार अशी बॅग्जस आहे. त्यात खताचा इतर चार खतांचा समावेश असलेली बॅग आहे. तुम्हाला फक्त Order करायची आहे. BISHCOM -Potting Mix चा व पहिले दोन महिने खत देण्याची गरज नाही. चांगली काळजी घेतली तर वर्षानुवर्ष चालते. थोडक्यात cool Gardening साठीचे हे Hot Product आहे.
अन्नपूर्णा बॅग्जसची बाग ?

अन्नपूर्णा बॅगची ही घरच्या पुरता organic भाजीपाला देणारी ही बाग आहे. संपूर्णतः ही नवीन संकल्पना आहे. आपण ही बॅग्ज सहतेने हाताळू शकता. उचलू शकता. Bishcom या potting mix चा वापर केल्यामुळे ही बॅग वजनाला हलकी होते. सहजतेने तुम्ही repotting करू शकता.
कोणत्या कोणत्या भाज्या घेता येतात?

जवळपास ३५ प्रकारच्या भाज्यांचे यात उत्पादन घेता येते. पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय , कंदमुळे व एक्सोटिक्स भाज्यापण उगवता येतात. पालेभाज्यामधे पालक, कोंथबिर, मेथी, शेफू, अंबाडी, आंबटचुका, तांदुळका, हिरवामाठ, लालमाठ, तर फळभाज्यामधे वांगी, टोमॅटो, चेरी टोमॅटो, भेंडी, गवार, मिरची, सिमला मिरची, फ्रेंच बिन्स इ. कंदमुळामधे आलं, रताळी, गाजर, सफेद व लाल मुळा इ. वेलवर्गीयांत तोंडली, काकडी, कारले. इ. तर एक्सोटिक्स मधे झुकीनी, सेलेरी, लेट्यूस, रेड कॅबेज, तर इतर भाज्यांमधे फुलकोबी, पत्ताकोबी, नवलकोल इ. उत्पादन सहजतेने घेता येते.
किती जागा लागते?

अन्नपूर्णा बॅग्जचा सेटअप तयार करण्यासाठी जागेची तशी कोणतीच अट नाही. फक्त स्वच्छ ऊन येणे गरजेचे आहे. हा सेटअप अगदी दहा बॅगांपासून ते शंभर बॅगापर्यंत सेटअप तयार करता येतो. सर्वोत्तम जागा म्हणजे गच्ची अर्थात टेरेस होय. त्यानंतर बाल्कनी म्हणजे सज्जा, विंडो ग्रील म्हणजे बॉक्स ग्रीलची जागा सुध्दा चालू शकते. आपल्याकडे ऊन किती येते व किती वेळेसाठी यावर कोणता भाजीपाला उत्पादन येणार ते ठरते.
नाशिकसाठी कोणत्या सेवा पुरवतो?

तुम्हाला आमचे उत्पादन आवडले की आम्हाला बोलवा. आमचे Exicutive आपल्याशी संपर्क करून आपल्या वेळेनुसार साईट व्हिजीट करतील. तेथे आपल्या प्रश्नांचे, शंकाचे निरसन होईल. आपल्या गरजांचे , आपल्याकडील वेळेचे याचा सारासर अंदाज करून आपल्याला खर्चाचे तपशील पाठवले जातील. त्यांनतर रेडी टू ग्रो बॅग्जस आपल्याला अपेक्षीत जागेत सेट करून देतील. त्यानंतर आपल्याला महिना पंधरा दिवसातून भेट दिली जाईल. त्यात खत पाणी पुरवले जाईल. आपल्याला संंपूर्ण प्रशिक्षीत करणे, निसर्ग समजून सांगणे ही आमची जबाबदारी असेन. एकदा आपल्याला भाज्यांची चव व आवड तयार झाली की आपण स्वतःही ते करू शकता. तसेच त्यानंतरही आपल्याला वेळोवेळी व्हाट्सअप वर मार्गदर्शन केले जाईल.
इतर शहरांसाठी कोणत्या सेवा देतो?
अन्नपूर्णा बॅग्जही वजनाला हलकी असली तरी ती बाहेरगावी पाठवता येत नाही. साधारण ती ५ ते ९ किलो वजनाची असते. तुम्हाला या बॅग्जस गच्चीवरची बाग, नाशिक येथील फर्म अर्थात वर्कशॉप येथून संकलन करता येईल. मुबंई पुण्याला कुणी येणार जाणार असेल तर त्यांच्याकडे पाठवता येईल. आपण अन्नपूर्णा बॅगेचा सेटअप घेवून गेलात तर त्यानंतरही घरघुती खत व औषध फवारणी कशी करावी या विषयी मोबाईल वरून मार्गदर्शन केले जाते.
तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे?

अन्नपूर्णा बॅग्जचा सेटअप करण्यास उत्सुक असाल तर आम्हाला संपर्क करा. सेटअप तयार झाल्यानंतर आपल्याला फक्त पाणी द्यायचे आहे. आमच्या संपर्कात रहायचे आहे. जेणेकरून आपल्याला सेवा सुविधा, मार्गदर्शन वेळोवेळी पुरवता येईल.
आमचे वापरकर्ते काय म्हणतात? पहा व्हिडीओस…
काही पडलेले प्रश्न…
बॅगची साईज किती आहे ? बॅगची साईज ही १० लिटर क्षमतेची आहे. १२ बाय १२ बाय १२ म्हणजे लांबी रूंदी उंची होय. भरल्यानंतर ही साधारण ९ बाय ९ इंचाची होते.
बॅगेचे आयुष्य किती? बॅग आमच्या पध्दतीने भरली असल्यास व निट काळजी घेतली तर तिचे आयुष्य हे साधारण ३६५० दिवस आहे. म्हणजे १० वर्ष टिकू शकते.
अधिक माहितीसाठी खालील PDF वरील मुद्यांवर Click करा…
पूर्नवापर करू शकतो का? नक्कीच एक पिक साधारण तीन महिण्याचे असते. त्यानंतर बॅगेतील माती काढून वाळवून घ्यावी. ( ऑक्टोबर, फेब्रुवारी, मे-जून दरम्यान माती वाळवता येते. त्यानंतर त्यात बिशकॉम व खत मिक्स करून पुन्हा बॅग भरावी. त्यात रोपे किंवा इतर बियाणं लागवड करावी.
अधिक माहितीसाठी PDF Download करा.
