पे करा व आजच तुमचे साहित्य बुक करून ठेवा…

मागील दहा वर्षात आमची उत्पादने प्रयोगाच्या ( Experiments)  त्याच्या परिणामकारकतेच्या, ( Effectiveness)  उपयोगीतेच्या ( Useful) कसोटीवर पारखून पहात होतो. तेव्हा त्यांची किंमत ही ना नफा ना तोटा या तत्वावर आम्ही विक्री करत होतो. थोडक्यात ही आरंभीची किंमत होती. (Welcome Price) पण येत्या काळात गच्चीवरची बाग या उपक्रमाची व्यापकता ( Scope, Reach) वाढवण्यासाठी (उदाः लाईव्ह वेबिनार, ( zoom webinar) तसेच वाढती महागाई, डिजीटल प्लॅटफार्मचे वाढते वार्षिक सभादत्व व मागील उत्पादनांच्या खर्चाची तूट भरून काढण्यासाठी आमच्या उत्पादनांच्या किंमती १ जाने . २०२३ पासून वाढवत आहोत.


नमस्कार, गच्चीवरची बाग, नाशिक.

तुमच्या आमच्या आवडीची

बाग गच्चीवरची…

गच्चीवरची बाग अर्थात रसायनमुक्त भाजीपाल्याची बाग.

गच्चीवरची बागेला दहा वर्ष ( 10thAnniversary) पूर्ण होऊन अकाराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. मागील दहा वर्षापासून पूर्णवेळ काम (full time work) करत आहोत. या दहावर्षात विविध समाज माध्यमांव्दारे, (social Media) वर्तमानपत्राव्दारे, ( news paper & Magazine)  ई पुस्तकांव्दारे, ( E Books) सेटअप बिल्डव्दारे ( vegetable Setup)  आम्ही आमचे अनुभव, ( Experience)  प्रयोग, ( experiments)  संसोधन, ( research)  उत्पादने पोहचवत आहोत. आम्ही साधारण एक कोटी लोकांपर्यंत पोहचलो

(Reach) आहोत. येत्या काळात आम्ही हिंदी व इंग्रजी भाषेतही आमची सेवा पुरवणार आहोत. त्यामुळे येत्याकाळात शंभर कोटी लोकांपर्यंत पोहचण्याचा मानस आहे.

रसायनमुक्त भाजीपाल्याची (Chemical Free Food)  ही काळाची गरज आहे. त्यामुळे आम्ही मागील दहा वर्षात जी काही उत्पादनं तयार केलीत. सहजरित्या भाजीपाला उत्पादनांसाठी (vegetable production)  त्याचा वापर करता येतो. असे टॉप फाईव्ह प्रोडक्ट ( Top Five Garden Products) व इतर उत्पादनांच्या किंमती ( Increase price) आता वाढवत आहोत.

मागील दहा वर्षात आमची उत्पादने प्रयोगाच्या ( Experiments)  त्याच्या परिणामकारकतेच्या, ( Effectiveness)  उपयोगीतेच्या ( Useful) कसोटीवर पारखून पहात होतो. तेव्हा त्यांची किंमत ही ना नफा ना तोटा या तत्वावर आम्ही विक्री करत होतो. थोडक्यात ही आरंभीची किंमत होती. (Welcome Price) पण येत्या काळात गच्चीवरची बाग या उपक्रमाची व्यापकता ( Scope, Reach) वाढवण्यासाठी (उदाः लाईव्ह वेबिनार, ( zoom webinar) तसेच वाढती महागाई, डिजीटल प्लॅटफार्मचे वाढते वार्षिक सभादत्व व मागील उत्पादनांच्या खर्चाची तूट भरून काढण्यासाठी आमच्या उत्पादनांच्या किंमती १ जाने . २०२३ पासून वाढवत आहोत.

आपणास या किंमती जास्त वाटू शकतात. पण व्यवसाय व लोकांना निशुल्क शिकवतांना तारेवरची कसरत होतेय.  तरी सुध्दा आपण ३१ डिसें. २२ पर्यंत आपण आपणास हवे असलेले साहित्य हे आहे त्याच किंमतीत आरक्षित ( Pre Book Offer)  करू शकता. हवं तर आपण मार्च २०२३ पर्यंत त्याचा स्विकार केला, किंवा घेवून गेलात तरी चालेल. पण यासाठी तुम्हाला ३१ डिसेंबर २२ पूर्वीच त्याची रक्कम अदा ( Payment) करावी लागेल.

टॉप फाईव्ह प्रोडक्टस ( आताच्या किमंती – २०२३ मधील किंमती)

अन्नपूर्णा बॅग्ज – ३५० रू. – ५०० रू. प्रति नग,

एरो ब्रिक्स बेड ३५०- ५०० रू. प्रति चौरस फूट

छापिल व ई पुस्तके. २५०- ५०० रू.,

बिशकॉम ( १६रू. शेणखत  २२ रू.)   ३२ रू. किलो.

इतर द्राव्य खतं.गोमुत्र, निम व करंज स्प्रे, जिवामृत २२ रू. – ३२ रू. लिटर

Annapurna Bags अन्नपूर्णा बॅग्ज्स काळजी कशी घ्यावी?


गच्चीवरची (ऑरगॅनिक भाजीपाल्याची) बाग ही सेंद्रीय पध्दतीने शहरी भागात उपलब्ध जागेत भाजीपाला उगवण्यासाठी काम करते. या व्दारे विविध स्तरांवर काम करत आहे. खरं तर हे पर्यावरण संवर्धनासोबत पर्यावरणीय सामाजिक उद्मशिलता म्हणून आम्ही विकसीत करत आहोत. म्हणजे पर्यावरणाचा विचार , संवर्धन करत त्यातून लोक आरोग्याचा, सुरक्षित अन्नाचा विचार करत लोकांना शिकवत आहोत. त्यांना रोजच्या कामातून वेळ काढत आपले अन्न हे आपण तयार करू शकतो यासाठी प्रेरीत करतो.

यासाठी विविध उत्पादने तयार करत असतो. यातीलच युनिक गार्डेन प्रोडक्ट म्हणजे अन्नपूर्णा बॅग्जस होय. छोट्या जागेत स्मार्ट पध्दतीने भाज्या उगवण्यासाठी या रेडी टू सो बॅग्जस फारच उपयुक्त ठरत आहेत.

या बॅग्जस मधे भाज्या उगवण्यासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे. अर्थात द्राव्य व विद्राव्य खतांची गार्डेन केअर बास्केट वापरणे बंधनकारक ठरते. किंवा त्यातील गोष्टी तुम्हाला तयार करून त्या वापरणे गरजेचे ठरते. याही व्यतिरित्क इतरही काळजी घेणे गरजेचे आहे. ती काळजी काय घ्यावी या बद्दलची माहिती पुढील प्रमाणे..

  • अन्नपूर्णा बॅग्जस मधे हवा खेळती रहावी यासाठी बिशकॉम पॉटींग मिक्स ने भरलेल्या असल्या तरी त्यात काही चुकांमुळे झाडांची मुळे खराब होतात.

यासाठी बॅग्जसखाली विटा ठेवाव्यात कारण टेरेस लगत असलेया बॅग्जस खाली ओलावा रहातो. तो ओलावा वाफेत रूपांतर होतो. तो बॅग्जस मधील मुळांना घातक असते. विटा खाली ठेवल्यामुळे हवा खेळती रहाते.

  • या बॅग्जला विळ्याने उकरी करण्याची गरज नाही. केवळ हाताच्या बोटांनी माती वर खाली करू शकता. तसेच बॅग्जला हाताच्या कडेने अथवा त्यास बुक्के मारले, थोपडले तरी बॅग्जस मधील माती सैल होते. मुळांशी हवा खेळती रहाते. हा सराव साधारण पाऊस संपल्यानंतर अथवा आठवड्यातून एकदा करावी.
  • यात तिनस्तरीय पिक लागवड करता येते. मध्यभागी फळभाजी लागवड करावी, आजूबाजूला पालेभाजी व कंदमुळेही लागवड करता येतात. मात्र वेळोवेळी वरील प्रमाणे काळजी घेणे गरजेचे असते.
  • एक पिक संपल्यानंर त्यातील संपूर्ण माती वाळवून माती वाळवून घेणे गरजेचे आहे. पुन्हा त्यात बिशकॉम व खत मिसळून पुन्हा भाज्या लागवड कराव्यात.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. 9850569644 / 8087475242

कृपया लेख वाचण्यासाठी थोडा वेळ द्या…

नमस्कार, मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. आपल्याला माहितीच आहे की गच्चीवरची बाग हा पर्यावरण संवर्धन करणारा उपक्रम आहे. मी आपल्याला खास अशा एका विनंतीसाठी हा लेख लिहीत आहे. कृपया थोडा वेळ काढून हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही विनंती.


नमस्कार, मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. आपल्याला माहितीच आहे की गच्चीवरची बाग हा पर्यावरण संवर्धन करणारा उपक्रम आहे. मी आपल्याला खास अशा एका विनंतीसाठी हा लेख लिहीत आहे. कृपया थोडा वेळ काढून हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही विनंती.

गच्चीवरची बाग नाशिक Grow, Guide, Build, Products, Sales N services या पाच विभागात काम करत आहे. (सध्या कोव्हीड १९ मुळे फक्त क्रं दोनचं काम Guide जोरात सुरू आहेत) तर लोकांना विविध माध्यमांव्दारे मार्गदर्शन करणे, त्यांचे शंका निरसन करणे, त्यांना घरी भाजीपाला उगवण्यासाठी व कचरा व्यवस्थापनासाठी प्रेरीत करणे हे काम सुरवातीपासूनच करत आहोत. पुढेही करत राहणार आहे.

विविध सोशल मिडीयावर लोकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत.  या माध्यमात You Tube हे व्यासपिठ सुध्दा येते. गच्चीवरची बाग विषयी काम सुरू झाले तेव्हां या माध्यमांकडे दुर्लक्ष झाले. अर्थात त्यातले काही कळत नाही, ते अवघड आहे, तांत्रिक साधनांची गरज असते. या मुळे त्यावर गच्चीवरची बाग विषयी व्हिडीओ टाकणे टाळत होतो. पण कोव्हीड १९ मुळे हाताशी वेळ मिळाला. तसेच जे टाळायचे होते ते करावेच लागले. म्हणजे यू ट्यूब चॅनलवर फिल्म विषयी शिकत, सवरत ते माध्मय लोकांपुढे न्यावे लागले. कारण लेख लिहणे हे सोपे व यात हातखंडा असला तरी लिखाण हे माध्यम सर्वांनाच आवडते असे नाही. पण यूट्यूब हे माध्यम सर्वांनाच आवडते.

या माध्यमाचे वैशिष्ट्य म्हणजे जितके लोक व्हिडीओ पाहतील त्यातून थेंब थेंब पैसे साचून पैशाच्या रूपात परतावा मिळतो. ( खरं तर पैशा पेक्षा ही प्रक्रिया एकदाची पूर्ण करणे गरजेचे आहे)आम्ही या माध्यमांवर काम करायला सुरवात केली. कारण यातून गच्चीवरची बाग या पर्यावरणीय उपक्रमाला आर्थिक हातभार लागेल म्हणून जानेवारी २०२१ पासून पूर्ण क्षमतेने सुरवात केली.  आता या कामाला नऊ महिने पूर्ण होताहेत.

या माध्यमातून पैसे मिळवायचे असतील तर काही अटी असतात. एक हजार सब्जक्राईबर पूर्ण होणे. तो आम्ही नुकताच पूर्ण केलाय. दुसरी अट असते. चार हजार तास पूर्ण करणे. त्यातील फक्त नऊ महिण्यात दीड हजार तास पूर्ण झाले आहे. येत्या शंभर दिवसात म्हणजे ३१ डिंसेंबर २०२१ पर्यंत अडीच हजार तास पूर्ण करायचे आहेत.

आणि त्यासाठी तुमची रोजच मदत लागणार आहे. कारण हे तीन महिण्यात पूर्ण झाले नाही तर पुन्हा नव्याने सुरवात करावी लागणार. आणि हे फार टफ वर्क आहे. त्यासाठी पुन्हा वेळ मिळणे कधीच शक्य होणार नाही.

हे अडीच हजार तास पूर्ण करण्यासाठी आपली पुढील प्रमाणे मदत हवी.

या यूट्यूब चॅनेलचे सब्सक्राईब्रर वाढीसाठी याचे सदसत्व घेणे.

Home Grow vegetable Services गच्चीवरची बाग, नाशिक व्दारे प्रकाशीत झालेले अथवा तुमच्या पर्यंत आलेले व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करणे,

व्हिडीओ खाली आपल्या प्रतिक्रिया देणे. (चांगली वाईट काही चालेल पण मनापासून द्या)

बरीच मडळी व्हाट्स अपवर प्रतिक्रिया नोदंवतात.

 या माध्यमांतून मिळणारी मदत ही पुढील कामासाठी वापरण्यात येणार आहे.

  • ई पुस्तके प्रिंन्ट स्वरूपात प्रकाशीत करणे
  • http://www.organic-vegetable –terrace-garden.com हे संकेतस्थळाचा खर्च (डोमेन नेम, होस्ट प्लेस, वाय फाय इ. खर्च भागवणे.) वर्षभऱाचा खर्च २५ हजार ईतका आहे. तो  आताच्या परिस्थिती पुढे नेणे अवघड खूपच अवघड झाले आहे.
  • फिल्म बनवण्यासाठी सध्या मित्राचा मोबाईल व कॅमेरा वापरतोय. तो स्वतःचा घेणे
  • एडिटिंग साठी लागमारे फिल्ममोरा सॉफ्टवेअर विकत घेणे.
  • ई पुस्तके प्रिंन्ट स्वरूपात प्रकाशीत करणे
  • http://www.organic-vegetable –terrace-garden.com हे संकेतस्थळाचा खर्च (डोमेन नेम, होस्ट प्लेस, वाय फाय इ. खर्च भागवणे.) वर्षभऱाचा खर्च २५ हजार ईतका आहे. तो  आताच्या परिस्थिती पुढे नेणे अवघड खूपच अवघड झाले आहे. पण हे संकेतस्थळ लोकांच्या पसंतीला उतरले आहे. तसेच खर्या अर्थाने मार्गदर्शक ठरत आहे.
  • फिल्म बनवण्यासाठी सध्या मित्राचा मोबाईल व कॅमेरा वापरतोय. तो स्वतःचा घेणे
  • एडिटिंग साठी लागमारे फिल्ममोरा सॉफ्टवेअर विकत घेणे.

गच्चीवरची बाग हा व्यावसायिकरित्या जरी चालवत असलो तरी त्यामागील खरे काम लोकांना शिक्षित करणे हाच आहे. व ते निशुल्क करत आहोत. खर ती आमची खाज (पॅशन) आहे. तिला जिवंत ठेवण्यासाठी प्लीज लेखात सांगितल्या प्रमाणे आमचा चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा. हे फक्त ३१ डिंसेबंर २०२१ पर्यतंच करायचे आहे.

हे आता नाही तर कधीच होणार नाही. आणि आम्ही पण या माध्यमांवर पुन्हा काम करणार नाही असे ठरवले आहे. कारण यात तन,मन, धन सारेच गुंतवले आहे. याहून जास्त गुंतवणूक आता होणार नाही. कारण वाढत्या वयात दृष्टी अधू होत चाललीय. तासन तास संगणकावर बसणे त्रासदायक होत आहे.

तेव्हां हे सारे तुमच्या प्रत्येकाच्या हातात आहे.

कारण हे पर्यावऱण संवर्धनाचे काम आहे. कृपया लेखात सांगीतल्या प्रमाणे मदत करावी. किमान हा लेख तरी इतरांपर्यत पोहचवा. ही कळकळीची विनंती.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

तुम्हाला माहित आहे का लेख माला…. लेख क्रं. 1-2

घंटो का ग्यान मिनंटो मे मिल जाए तो.. तो बात बन जांए,, आपले महानगर नाशिक आवृत्तीतील गच्चीवरची बाग विषयी … लेखमाला…


घंटो का ग्यान मिनंटो मे मिल जाए तो.. तो बात बन जांए,, असे आपले ब्रिद्र वाक्य आहे. ते खरंही आहे. आज काल वेळ कुणाकडे आहे. ग्रंथोपजिवी होण्यापेक्षा शब्दोजिवी होण्यात आपण धन्यता मानतो. त वरून तपेलं समजणारी आताची आपली आधुनिक माकडांची जमात. खूप काही हातातून निसटून चाललय. पण हरकत नाही. या धावपळीच्या युगातही आपल्याला थोड्या शब्दामधे बाग बगीचा, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, पर्यावरण या विषयी समर्पक शब्दात समजून सांगण्यासाठी येत आहे अनोखी लेखमाला. वाचत रहा आपले महानगर, नाशिक जिल्हा पानांवर

Other Videos

ऑसम ! घरच्या भाज्यांची चव म्हणजे ऑसम ! पहा संपूर्ण व्हिडीओ

तुम्ही यू ट्यूबवर आहात. आपली दर्शकांची संख्या वाढवायाचीय

व्हिडीओ चालला तर चांद तक नाही तर रात तक… अशी गंमत होते.
आपल्या यूट्यूबवरील दर्शकांची संख्या वाढवायची म्हणजे नव्याने यू ट्यूबवर येणार्या मंडळीसाठी हे मोठे आव्हान असते.


तुम्ही यू ट्यूबवर आहात. आपली दर्शकांची संख्या वाढवायाचीय,

How to increase subscribers & Viewers on YouTube Channel in Marathi

मग हे उपाय करून पहा..

आपल्या यूट्यूबवरील दर्शकांची संख्या वाढवायची म्हणजे नव्याने यू ट्यूबवर येणार्या मंडळीसाठी हे मोठे आव्हान असते. त्यातल्या त्यात आपल्याला आपला चॅनेल मॉनिटाईज (जाहिरातींचे पैशाच्या रूपात कमाई) करायचे असल्यास किमान एक हजार दर्शक व एका वर्षात ( कोणत्याही 365 दिवसात) दर्शकांनी चार हजार तास व्हिडीओ पाहणे गरजेच असते. हे करणे म्हणजे दिव्यच असते. कारण एकादा व्हिडीओ चालला तर चांद तक नाही तर रात तक… अशी गंमत होते.

अशा वेळेस आपल्याला वरील उदिष्ट्य साध्य करायचे असल्यास खालील गोष्टी करून पहा. आपल्याला त्याचाही नक्कीच फायदा होईल.

  • पहिले उदिष्ट हे एक हजार दर्शक मिळवण्याचे ठेवा. त्यासाठी आपल्याला छोटे छोटे व्हिडीओ संदेश देणारे बनवा. वीस सेंकदाचे व्हिडीओ हे मॉनिटाईज मधे म्हणजे कांऊटिगं हावर्स मधे पकडले जात नाही पण तुमचे दर्शक वाढवू शकता. कारण यावरच तुमचे दर्शक तुमच्या पुढील व्हिडीओला पहाण्यास उत्सुक होतात. ते त्यास सब्सक्राईब करतात.
  • नुसतेच छोटे व्हिडीओ बनवू नका. काही ठराविक कालाचेही व्हिडीओ बनवा.
  • तुमचे व्हीडीओ हे साधारण हजार दर्शकानी प्रत्येक व्हीडीओ पहावा असे अपेक्षीत धरले तर त्या प्रमाणात म्हणजे तुमच्याजवळील व्हिडीओची लांबी ही चाळीस तासांची तरी असावी. कारण नोंदवलेला प्रत्येक दर्शक हा तुमचे व्हीडिओ पाहिनच याची खात्री नसते. त्यातील काहीच जणांनी पाहतील असे गृहीत धरले तर तुमच्या व्हिडीओची लांबी वाढवणे गरजेचे ठरते.
  • यासाठी तुम्हाला एका ठराविक अंतराने व्हिडीओ अपलोड करणे गरजेचे ठरते.
  • आपल्याकडे कंटेट ब्लॉग असल्यास त्या लेखामधे आपले व्हिडिओ मर्ज करा. त्यावरूही तुमच्या चॅनेलचे दर्शक वाढीस मदत होते.
  • फेसबूक सारख्या पेजेसवर आपले व्हिडिओ शेड्यूल करा. म्हणजे ठराविक अंतराने ते दर्शकांपर्यंत पोहचू शकतील. व ते तुमच्या चॅनेल वर सभासदत्व घेतील.
  • आपले एकदा हजार दर्शक पूर्ण झाले की आपोआपोच आपले तास व दर्शकांची नोंदणी वाढीस लागते. पण येथे निवांत बसू नका. व्हिडीओ हे ठराविक अंतराने बनवणे व ते अपलोड करत राहणे फार गरजेचे असते. यामुळे तुमचे दर्शक हे चॅनेलला भेट देत राहतात. व्हिडीओ संगीतमय असल्यास ते त्यास पुन्हा पुन्हा पाहतात.
  • आपल्या सारखेच माहिती देणारी इतरांच्या चॅनेलवरील व्हिडीओ लाईक करा. त्यावर नोंदवलेल्या योग्य प्रतिक्रियांना लाईक्स करा.

ही माहिती वापरून पहा. आपले व्हिडीओचे दर्शक व संख्या वाढलेली नक्कीच दिसेल.

क्रिएटीव्ह मिडीया टीम, गच्चीवरची बाग, नाशिक.

Lockdown : 2 Bumper offer

कोरोना महामारी मुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी गच्चीवरची बागे तर्फे विक्री होणार्या उत्पादने ही उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीत विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


Lockdown : 2 Bumper offer

कोरोना महामारी मुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी गच्चीवरची बागे तर्फे विक्री होणार्या उत्पादने ही उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीत विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आमच्या उत्पादनाच्या सविस्तर माहितीसाठी www.gacchivarchibaug.in हे संकेतस्थळ अभ्यासावे.

 उत्पदनांचे मुळ विक्री किमत व आताची कमी केलेली रक्कम यांची यादी खालील प्रमाणे

(सदर उत्पादनातील काही उत्पादने ही डिजिटल स्वरूपात आहेत. तर पुस्तके, ग्रो बॅग्जस, बियाणे ही  ही  बाय पोस्ट ने पाठवली जातील. बाकीची उत्पादने ही आपल्याला गच्चीवरची बाग एक्सटेंशन येथून आपल्याला घेवून जावे लागतील, कारण कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे आम्हाला आमची उत्पादने १५ मे पर्यंत घरपोहोच पोहचवता येणार नाहीत)

  • Bishcom ( Potting Mix) 15 Kg –  Offer Price 10 Kg
  • गच्चीवरची बाग छापिल पुस्तक (पोस्ट खर्चा सहित 240/-) – offer Price 140/-
  • तुम्हाला माहित आहे का ? छापिल पुस्तक (पोस्ट खर्चा सहित 240/-) – offer Price 140/-
  • डॉ. बगीचा (पी.डी.एफ) 150/- Offer Price 99/-
  • तुम्हाला माहित आहे का ? ( पी.डी.एफ) 150/- Offer Price 99/-
  • जिवामृत, गोमुत्र, ह्युमिक जल, फ्रुट इंजाईम 21 रू. प्रति लिटर – Offer Price 11/- प्रति लिटर.
  • दशपर्णी 25 रू. लिटर Offer Price 15 रू. लिटर.
  • ग्रो बॅग्जस 16/- प्रति नग
  • भाजीपाला बियाणे 11 रू.
  • निमपेंड 51 रू किलो.
  • तंबाखू पावडर 51 रू. किलो.
  • लाल माती सिमेंट गोणी भरून 120 रू. Offer Price 100/-

टीपः वरील साहित्य आपल्याला हवे असल्यास पण आता घेवून जाणे शक्य नसल्यास तर तुम्ही साहित्याची यादी प्रमाणे आगाऊ पेमेंट करता येईल. त्याची तुम्हाला पावतीपण देण्यात येईल. तुमच्या सवडीने ते केव्हांही घेवून जाता येईल.

घरपोहोच पोहचवणे शक्य झाल्यास पूर्वीचीच किंमत + डिलेव्हरी चार्जेस आकारले जातील

  • Online स्वरूपात तुमच्या कुंटुबासाठी गच्चीवरची बाग ही कार्यशाळा आयोजीत करता येईल. त्याची 2500/- ऐवजी 1500 रू. फी असेन. (एक तास)

वरील उत्पादने नाशिक अथवा नाशिक बाहेरील व्यक्तिनां व्यवसायीक स्वरूपात विक्रि करावयास दयावयाची आहेत. त्यांनी कृपया संपर्क साधावा. इच्छुकांना केवळ वस्तूची विक्री केली तरी चालणार आहेत. वस्तूच्या वापरा विषयी अथवा ग्राहकांच्या समाधानासाठी आमच्याकडून सेंट्रल सपोर्ट केला जाईल.

आमच्या समोर उभ्या असलेल्या आर्थिक आव्हानांसाठी व तुमच्या सकारात्मक प्रतिसादासाठी वाचा

पुढील लेख वाचा

करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटात गच्चीवरची बाग

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक

9850569644 / 8087475242

Attractive , Affordable & Effective Cotton Mask

आज नाशिक मधील विविध आर्थिक स्तरातील महिलांना त्यांचे कौशल्य, तळमळ हेरत त्यांच्या हाताना काम मिळत आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर विविध रंगी मास्क शिवले. त्याला वापरकर्त्याची प्रचंड पसंती मिळत आहे.


स्टेप (STEP) फाऊंडेशन, नाशिक, महिला निर्मित उद्योग…

WhatsApp Image 2020-06-15 at 6.50.35 PM

स्वतःचा शोध घेत समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा उराशी बाळगत समाजकार्याचे शिक्षण घेत दोन तरूणांनी पदवी घेतल्यानंतर समाजसेवा करण्याचे व्रत हाती घेतले.  सातत्यांने संपर्कातील लोकांना मदत करत आणी मदत घेत, समाजधुरीणांची, समाजकार्य महाविद्यालयातील जाणकार प्राध्यापकाचे मार्दर्शन घेत, समाजातील विविध अनुभवी लोकांना एकत्र करत त्यांची मोट बांधली. त्यातून स्टेप फाऊंडेशन नावाची, Social Transformation & Environment  Protection Foundation, Nashik या नावाने संस्था नोंदणी झाली.

आणि सुरू झाले कामाचे झपाटलेपण…  जेथून मिळेल, जे मिळेल ते पदरात घेत, वेळ प्रसंगी पदरमोड करत समाजसेवा सुरू झाली. कुठेही दोन पैसे बाजूला ठेवण्याची हाव नाही.. संस्था उभी करणे म्हणजे केवळ काम करणे, नाव लोकांपर्यत पोहचवणे एवढेच नसते. तर त्यासाठी आर्थिक पाठबळाची निंतात गरज असते. पण समाजसेवेच्या व्रतात बेधुंद झालेल्या या तरूणांना कोण सांगणार.. कोल्हापूरचा पूर आला… आव्हान करत मदत गोळा झाली. रात्रदिंवस राबून, वेगेवेगळ्या माध्यामांतून साहित्य गोळा केले. ते खरच गरंजवतांच्या पदरात पडावे म्हणून पुरग्रस्त गावाचां प्रवास करत तेथे पोहचले. तसेच कोरोनामुळे अनेक लोक घरातच अडकून पडले. त्यांना दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था करतांनाही अशीच धावपळ केली. कुठेही नोंदणी नाही, गाजावाजा नाही. कितीजनांची जेवले या संख्येपेक्षा असंख्य जनांनी रोजच आर्शिवाद दिले त्याचे समाधान चेहर्यावर सदासर्वदा फुललेले…

संस्थातंर्गत २५ महिला बचत गटांची बाधंणी झाली. बचत गटांतील महिलांच्या हाताला काम मिळावे, सन्मानाने स्वंयरोजगार मिळावा म्हणून मेस चालू केली. कचरा वेचक महिलांची घरची चुल पेटावी म्हणून गच्चीवरची बाग या पर्यावरण उदयोगाशी जोडून घेत., रोजगार देण्याचा प्रयत्न होत आहे.  जानकारांशी बोलत, सल्ला मसलत करत बचत गटाच्या महिलांना महत्वाचा नवीन रोजगार उभा राहतोय.. तो म्हणजे कापडाचे मास्क व कापडी पिशव्या शिवणे..

आज नाशिक मधील विविध आर्थिक स्तरातील महिलांना त्यांचे कौशल्य, तळमळ हेरत त्यांच्या हाताना काम मिळत आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर विविध रंगी मास्क शिवले. त्याला वापरकर्त्याची प्रचंड पसंती मिळत आहे.

छान रंगात, पुरेशा आकाराचे, कॉटनच्या कापडाचे हे मास्क आपणही वापरून पहा…बरेचदा दुकानावर पिशव्या टांगाव्यात तशा स्वरूपात मास्क टांगलेले दिसतात. धुळीने भरतात, नको नको त्या लोकांचे हात लागतात. स्टेप फाऊंडेशने याचा विचार करत सुंदर असे कमी खर्चाचे पॅकींग केले आहे. आपली छोटीशी खरेदी त्यांचा आत्मविश्वास वाढेल तसेच Work From Home करत कोरोनाच्या युध्दातील रणरागीनी ठराव्यात.. त्यासाठी आपली मदत मोलाची ठरणार आहे. तेव्हा.. आजच आपली मागणी नोंदवा…

स्टेप(STEP) फाऊंडेशन, नाशिक, महिला निर्मित उद्योग

आमच्या उत्पादनाचे वैशिष्ट्य…

O कॉटनच्या जाड कापडाचे , पुरेश्या आकाराचे मास्क उपलब्ध.

O वेगवेगळ्या रंगात व प्रकारात उपलब्ध.

O सुरक्षित व आकर्षक पॅकिंग.

O वाजवी दारात (ना नफा ना तोटा) उपलब्ध.

O टिकाऊ धुवून परत परत वापरण्या योग्य.

O आपली गरज, आवडीनुसार सुबकआकारात  मास्क तयार करून मिळतील.

आपल्या मागणीनुसार मास्क व कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यात येईल.  नाशिक शहरात 100 मास्क च्या पुढे घरपोच सुविधा  उपलब्ध, नाशिक शहराच्या बाहेर पाठवण्याची व्यवस्था.

आपली मागणी आजच नोंदवा

दिपक देवरे 9021909337,  वैशाली राऊत 8378942769, गोकुळ मेदगे 9011800838

 

Sale ur products with us

तुम्ही हे संकेतस्थल अभ्यासले का.. कमी कालावधीत भेट देणार्याची संख्या पाहता नव उदयोजकासाठी जाहिरात कमी खर्चात जाहिरात करण्यासाठी फायेदशीर संकेतस्थळ आहे. ” जो दिखता है वही बिकता है”, हा आधुनिक जगाचा विक्रीचा महामंत्र आहे. त्यामुळे आपल्या उत्पादनाची जाहिरात येथे नक्की करा…


 

%d bloggers like this: