दान एक रूपयाचे – पर्यावरण संवर्धनाचे


गच्चीवरची बाग ही पर्यावरण संवर्धन करणारी उद्मशीलता आहे. मार्च २०२२ मधे दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. एकादं बिज आकाशातून येवून मातीत पडावं. नि त्याला काळाने प्रतिकूलतेपासून झाकलं जावं. व योग्य वातावण मिळावं. त्याच कुणीतरी पालकत्व स्विकारावं या प्रमाणे गच्चीवरची बागेचे बिजाचे २००१ मधेच नाशिकच्या मातीत धुळपेरणी झाली. ते २०१३ पासून अंकुरल व रूजलं व त्याचं आम्ही पूर्णवेळ पालकत्व स्विकारले. याचे पूर्णवेळ पालकत्व स्विकारतांना पर्यावरण प्रेमीनी स्वागत केलं कारण लोकांच्या प्रश्नांना शंकाना कुणीतरी पूर्णवेळ उत्तर देणारं हवं होते. तर या बिजाने अंकुरण्यापासूनच नाशिककरांना आपलेसे केले. अंकुरण्यापासूनचा हा प्रवास आता रोपट्या पर्यंत म्हणजे दहाव्या वर्षात प्रदार्पण करत आहे. गच्चीवरची ऑरगॅनिक भाजीपाल्याची बागेचा डेमो प्रयोग, गच्चीवरची बाग एक्सटेंशन व व्हर्च्युअल प्रझेन्स या तिन ठिकाणी काम करतांना या रोपट्याला पाच फांद्या डवरल्या. त्या म्हणजे Grow, guide, Build, Products, Sales N Services…

हा सारा डोलारा आता बर्यापैकी बहरू लागला लागला. पण मध्यतंरी कोरोनाच्या वावटळीमधे कोडमडायला आलं होते. पण त्याला नाशिककरांनी, पर्यावरणप्रेमीनी जोर लावून तुटू दिलं नाही. खरं तर गच्चीवरची बाग हे पर्यावरण प्रदुर्षनाच्या सागरात आत्मशोधाला निघालेले जहाज आहे. त्याचा जाब विचारायला कुणीतरी असावं असा म्होरक्या मी आहे. पण याला पुढे नेण्याची, वल्हवण्याची ताकद लावणारे नाशिककर व पर्यावरण प्रेमी आहे. मी फक्त नाममात्र. खर श्रेय तुम्हा सगळ्याचे आहे.

कोरोना संकटात वाकलेल्या फांद्या तुटता तुटता वाचल्या पण जखमा अजून ओल्या आहेत. येत्या काही महिण्यात किंवा वर्षभरात त्या बर्या होतील. आम्ही तशी पावले उचलली आहेत. आम्ही नेहमी सांगत आलो की आम्ही बाय प्रोफेशन हे करत असलो तरी आमची पर्यावरण संवर्धनाची ही पॅशन (आस) आहे. आपल्याकडून सातत्याने वरील पाच फांद्याव्दारे सुर्यप्रकाश मिळत आहे. म्हणूनच तर जगण्यासाठी अन्न तयार होतेय.

यातील सर्वात महत्वाचा भाग आहे. लोकांना मार्गदर्शन Guide करणे होय. ते आम्ही युट्यूब ( Home Grow vegetable Services- गच्चीवरची बाग नाशिक) , कंन्टेन्ट ब्लॉग www.organic-vegetable-terrace-garden.com या व तसेच व्हाट्सअपच्या माध्यमांतून करत आहोत. होम कंपोस्टींग व घरी भाज्या उगवणे हे मुख्य काम आहे. त्या संदर्भात लोकांना वाचता येईल, डोळ्यांवर विश्वास बसेन असे काम उभे करत आहोत.

यातील सर्वात महत्वाचे म्हणजे कंन्टेन्ट ब्लॉगला दरवर्षी भेट देणार्या वाचकांची संख्या पन्नास हजाराच्या घरात पोहचली आहे. या वर पाचशे पेक्षा अधिक लेख व २५० पेक्षा व्हिडीओस आहेत. हे संकेतस्थळ चालविण्यासाठी वर्षाचा खर्च पंचवीस हजार आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपणास हा लेख, किंवा युट्यूबवरील व्हिडीओ आवड्यास आपण फक्त कमीत कमी एक रूपया व तेथून पुढे रक्कम तुमच्या ऐच्छिकतेनुसार डोनेट करावा. जेणेकरून आमचा उत्साह वाढेल. (वाचन अर्थात पर्यावरण दान कर्त्त्याची यादी आम्ही संकेतस्थळावर वेळोवेळी प्रकाशीत करणार आहोत.) तसेच त्यातून निर्माण होणारा पैसा हा संकेतस्थळ जिवंत (चालू वर्ष व पुढील वर्ष) रहाण्यासाठी वापरता येईल. तेव्हा कृपया हा लेख इतरांनाही पाठवा. त्यासाठी आमचे प्रयत्न वर दिलेल्या संकेतस्थळावर जावून तपासून शकता.

(सदर उपक्रम हा आपल्या पुढील पिढीसाठी आकार घेत आहे. कारण यात आरोग्य, पर्यावरण, सामाजिक प्रश्नावर काम करणारा आहे. तसेच जल, जंगल जमीन या विषयीच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. अशी सर्वव्यापी संकल्पना जगवणे, टिकवणे फक्त गावकरांच्या हाती आहे. कारण राव त्यांच्या पुढील पिढ्या मजबूत करण्यात गुल आहे. त्यामुळे रावं न करी ते गावकरी म्हणून जगनाथ्थाच्या हाती हा रथ सोपवत आहे. आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

सोबत QR कोड देत आहे. किंवा (9850569644 G Pay, Phone Pay) किंवा UPI id देत आहे.

लॉकडाऊन में घर पे सब्जीया कैसे उगाएं


लॉकडाऊन में घर पर कैसे उगांए ताजी सब्जियां…

उमर साठ साल, नाशिक के एक नगर में रहने वाला बुर्जुग दामंत्प, उन्होंने लॉकडाऊन के सोलावे दिन की सुबह सुबह मोबाईल पर संपर्क कर के कहा… की हम आपके बहोत शुक्रगुजार है की आपने घर पर सब्जीया उंगाने का जो सेटअप लगाकर गये. उनसे हमें हर रोज ताजी सब्जियां मिल रही है। भले वो हमारे लिए एकाद सब्जी हप्ते में दुबारा मिलती है। लेकीन हम खुश है। बाहर मिलने वाली संसर्गजन्य भी हो सकती है।

ये सुनकर बहोत अच्छा लगा.. वैसे मेरे घर पर भी गर परही उगायी सब्जीया बनाई जा रही है। बाहर के पूर्तता पर निर्भय नही है।

वैसे तो लॉकडाऊन कितने दिन रहेगा, कहां कहां रहेगा इसका कुछ अंदाज नही है। शायद ये कालावधी बढ भी सकता है। उसका अनुशासन करना भी जरूरी है।  हात न धोने की गैर जिम्मेदारी से जान से हात धोना पडता है। असल में लॉकडाऊन का मतसलब है की बाहर कोई चिज से संपर्क में नही आना. लेकीन हम सब्जीया लेके समझकर भी अजांन बन लेते है। (आगे पढे) 

तो ऐसे कठीण समय पर घर पर सब्जीया उगा सकते है। उसके बारे में बताने वालाही हूं लेकीन उसी के साथ दिए हुऐ www.gacchivarchibaug.in  www.organic-vegetable-terrace-garden.com संकेतस्थल पर जाकर जादा जानकारी ले सकते है।

हम तो पहेलेसे ही रसायनमुक्त सब्जीयो का पक्ष लेके चल रहे है। लेकीन समय इतना कठीण है की रासायनिक खाद, औषधियों से भरी सब्जी चल जाएगी.. लेगी कोरोना से संसंर्गमुक्त हो सकती है क्या… तो ईसका जबाब नही है। कुछ कह नही सकते. अगर ऐसा है तो हमे बेझिझक घर पर सब्जीयां उगानीही चाहिए. लेकीन करे कैसे ये बडा सवाल उत्पन्न हो गया है।

ईसकेलिए मिट्टी चाहिए, खाद चाहिए, घमले, ग्रो बॅग चाहिए, और तो और बिज तो चाहिए. बाप रे बाप… लिस्ट तो बढती जा रही है। इस कठीण समय पर हम बाहर निकल नही सकते. सारासर हे मुमकीन नही है ये भावना आ सकती है. लेकीन ईस निराशा को निकाल दिजिए.

आप के पास दूध की २५० एम. एल. की बॅग से लेकर लेडीज पर्स को लेकर जो भी उसका घमला  या ग्रो बॅग के रूप में ईस्तेमाल कर सकते है. ध्यान रहे चिंज कौनसी भी हो उसे निचे छेद होना जरूरी है। ईससे जादा दिया हुआ पानी निकलने में मद्दत होगी. (आगे पढे) 

इसी साधनों में मंदीर में फोडे जाने वाले नारियल के क्यायर डाले. ये नही मिले तो एक एम.एम. की चौडाई वाले सुकी हुई डालियां डाले उसके उपर सुके पत्ते, या सुका हुआ किचन वेस्ट डाले. हात या पांव से दबांए और सबसे उपर दो ईंच मिट्टी डाले. अगर मिट्टी नही है तो आपके पुराने घमलोंमेंसे थोडी थोडी निकाल सकते है। इस तरह अगर घमला भरा जाएंगा तो आपके पास जिस आकार का घमला है। उसी मिट्टी में हम लगबग ४-५ घमले भर जाएगें.

घर मेंही कंपोस्ट बनाने की कौशीस करे.

महिने भर तय्यार होने वाली सब्जीयां

 • मेथी, धनियां, मोहरी
 • गेहुं को सुबह बिगाएं, श्याम को जमीन में बो दे और सात दिन के बात उसका ज्यूस बनाएं. सेहत के लिए अच्छा है. ऐसा रोज करे.
 • चना बो दे . चन आने का मोसम तो नही है लेकीन उसकी पत्तो की सब्जी बना सकते है।
 • प्याज, लहसून और बटाटे को बो दे … आपको प्याज से पत्ती की हर महिने सब्जी बना सकते है. वो तीन महिने चलेंगी.
 • पोथी या आरवी के पत्ते की आप स्वादिष्ट सब्जी बना सकते है।
 • और भी सब्जीयां मिट्टीसे पनप जाती है। उसकी जानकारी ले. वो शायद जंगल में उगने वाली लेकीन खाने जैसी सब्जीयां हो सकती हे।
 • अगर आपके बागवानी में सब्जीयां ज्यादा हो रही हो या आपके पास ईस कठीन समय में घर पर आने वाली मुक्त सब्जीया काटकर धुप में सुका ले तो उसे निर्जलीकरण Drying (dehydrating) कर ले. ताकी वो बारिश में काम आएगी.
 • पालक, गाजर, मुली, बिट का जड लगाकर उसके पत्ते के पराठे बना सकते है।
 • बाजार में मिलनेवाले पके, गले हुए बैंगन, टमाटर, मिरची जैसी जो बी सब्जीयां है उसका बिज निकाल के छांव में सुका ले..उसके महिनेभर में पौधे बना ले…

आपका लॉकडाऊन में खाने की समस्या को कुछ सिमा तक आसान कर सकते है।

सज्जा पर सब्जी हिंदी यू ट्यूब चॅनेल 

कुछ सवाल हो तो जरूर पुछे.

संदीप चव्हाण, सज्जा पर सब्जी. नाशिक.

9850569644

गार्डन केअर शॉपी : इच्छुक विक्रेत्यांसाठी सुवर्ण संधी…


गार्डन केअर शॉपी : इच्छुक विक्रेत्यांसाठी सुवर्ण संधी…

गच्चीवरची (रसायनमुक्त भाजीपाला) बाग हा पर्यावरण पुरक उदयोगास मार्च २०२१ रोजी आठ वर्ष पूर्ण होऊन नवव्या पदार्पण केले आहे. नाशिककरांना बागेची असलेली आवड, रसायमुक्त भाज्या निर्मितीची आस, आणि कचरा व्यवस्थापनाची धरलेली कास  या तीन गोष्टीनी गच्चीवरची बागेचे बालपण जोपासत आता संवेदनशील असे पालकत्वही स्विकारले आहे. म्हणूनच गच्चीवरची बागेने नवव्या वर्षात पदार्पण केले आहे.  आम्ही मागील आठ वर्षात विविध समाज माध्यमांव्दारे रसायनमुक्त भाजीपाला निर्मिती, गारबेज टू गार्डेन याव्दारे पर्यावरण संवर्धना विषयी जन जागृती करत आहोतच. म्हणूनच Grow,  Guide, Build, Products & sale या पाच वर्क एरिया व्दारे कामाचा, विक्रिचा व लोकसहभागाचा व्याप वाढतच चालला आहे. थोडक्यात मागणी वाढत चालली आहे. पण आम्ही नाशिकच्या एका टोकाला असल्यामुळे बाग प्रेमींना इच्छा असूनही आमचे साहित्य त्यांच्या पर्यंत पोहचवणे अवघड होते कधी कधी शक्य होत नाही. किंवा वेळ लागतो. पण झाडांना वेळेवर खाऊ पिऊ दिले तर ते आपल्याला योग्य तो आनंदाचा परतावा देतात जो पैशात मोजणे अशक्य आहे. पण पर्यावरणासाठी नाशिककरांनी हा घेतलेला पुढाकार फार ठळक व स्पष्ट आहेच. म्हणून आम्ही इथपर्यंत पोहचलो आहोत. (पुढे वाचा)

तर वरील सर्व मुदयांचा विचार करता.. आम्ही नाशिक शहरात गच्चीवरची बागेचे विविध नगरात गार्डन केअर शॉपी सुरू करत आहोत. कारण एकतर स्थानिक बाग प्रेमीना  आमची उत्पादनांची सहज उपलब्धता व्हावी तसेच लॉकडाऊन मधे गच्चीवरची बागेवर आलेले आर्थिक संकटाला तोंड देता यावे हा हेतू तर आहेच पण शिवाय यात इतर छोट्या दुकानदारांना, गृहुद्योग करणार्या महिलांना रोजगार मिळावा हा ही हेतू लक्षात घेतला आहे. कारण करोनामुळे अथवा नंतर येणारे आर्थिक संकट हे फार मोठे व खोलवर जखमा करणारे  असणार आहे. जे आम्ही सध्या लॉकडाऊनचे आर्थिक संकट आम्ही अनुभवतो आहोतच. या आर्थिक झळीत इतरांनाही दोन पैसे मिळवून कमी करता यावी अशी प्रामाणिक इच्छा आहे.

आम्ही आमच्या उत्पादनाच्या किमती या मागील सात वर्ष स्थिर ठेवल्या होत्या यापुढे दरवर्षी या किमती १ रू. यूनिट (लिटर, किलो, नग) प्रमाणे वाढवले होते. पण यात आम्ही Lock down Bumper Offer सुरू केलीच आहे. मग त्यात इच्छुक विक्रेत्यांना का सहभागी करून घेवू नये हा विचार प्रामुख्याने मनात आला. त्यामुळे आम्ही इच्छुक विक्रेत्यांना गच्चीवरची बाग गार्डेन केअर शॉपी सुरू करण्यासाठी (प्रथम येणार्यास प्राधान्य या तत्वावर ) आमंत्रीत करत आहोत. (पुढे वाचा)

इच्छुक विक्रेत्यांना आम्ही विक्रि करतो त्या किमतीतच विक्री करण्याची विनंती असेन. पण आपण यात स्थानिक उपलब्धता रक्कम (L.A.C – Local Availability Charges) तुमच्या सोयी नुसार आकारू शकता. तसेच घरपोहोच पोचवण्याचे चार्जेस (H.D.C-  Home delivery  Charges तुम्हाला ग्राहकाशी ठरवून आकारता येईल. (आमची उत्पादने इच्छुक विक्रेत्यांना काय किमतीने मिळेल  हे प्रत्यक्ष भेटीत सांगू. आमची उत्पादने आपल्या विक्री नुसार Gacchivarchi Baug Extension येथून घेवून जाणे बंधनकारक असेन.

जागा किती हवी?

पाऊस पाणी, ऊन लागणारी नाही असे छोटेसे शेड असावे. मांडणी असेलतरी उत्तम.. तुमचा पूर्वीपासून घरूनच काही विक्री होत असेन अशा मंडळीना प्राधान्य असेन. कारण हा जोडधंदा म्हणून करता येणार आहे.  आम्हाला Display वैगेरेची आवश्यकता नाही. ग्राहकांना उत्पादन वापरा विषयी शंका निरसन, माहिती, वैगेरे हवे असल्यास संदीप चव्हाण यांच्या व्दारे दिली जाईल. आम्ही दूरध्वनी व्दारे सपोर्ट करू. (पुढे वाचा)

तुमच्या शॉपीची जाहिरात अशी होणार…

आपल्या गच्चीवरची बाग शॉपीची जाहिरात आमच्या संकेतस्थळ, समाज माध्यमांव्दारे करणार आहोत. तसेच Google My Business वर तुमची गच्चीवरची बाग शॉपी लिंक केली जाईल.  तसेच आमच्याशी पूर्वीच जोडलेले किंवा नव्याने येणारे ग्राहक हे तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शिवाय आमच्या व्दारे कचरा व्यवस्थापन, कौटुंबिक मार्गदर्शन कार्यशाळा, भाजीपाला सेटअप या विषयी काहीही सेवा पुरवायाचे असल्यास आमच्या व्दारे त्या पुरविल्या जातील. पण आपण संदर्भ मिळवून दिलेले ग्राहकांची मागणीची पूर्तता पूर्ण झाल्यावर आमच्या एकूण रकमेच्या ठराविक टक्केवारी इच्छुक विक्रेत्यांना अदा केली जाणार आहे.

आमच्या कडील उत्पादने हे घाऊक किमतीत (तुम्हाल जेवढे नग, लिटर, प्रति, किलो) विकत घेतल्या नंतर ग्राहकांकडूनच आपण स्वतःच त्याचे पेमेंट रिसिव्ह करू शकता. आम्ही फत्त मार्गदर्शक असू.. (पुढे वाचा)

जोड धंदा का म्हणून करावा.

येणार्या अनिश्चित काळासाठी होम डिलेव्हरीला प्राधान्य असणार आहे. गच्चीवरची बाग गार्डन केअर शॉपी सोबत तुमचा इतरकाही घरून चालणार्या उद्योगांना मदत होणार आहे.)  कृषी उद्योग असल्यामुळे कोणत्याही दुकान परवान्याची गरज नाही.)

आम्ही इच्छुक विक्रेत्या सोबत दिर्घकाळ व्यावसायिक नातं तयार करू इच्छितो. जे कायम पारदर्शकता विश्वास व नाविण्यतेवर अवलंबून असेन.

Order Now By submit Form

उत्पादनांची यादी

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

भविष्यात गच्चीवरची बागेची सेवा, उत्पादनांच्या किमती आणखी कमी होणार…


भविष्यात गच्चीवरची बागेची सेवा, उत्पादनांच्या किमती आणखी कमी होणार…

गच्चीवरची बागेचा मेरू दंड हा गारबेज टू गार्डन हाच आहे. इच्छुकांना सोशल मिडीयाव्दारे निशुल्क मार्गदर्शन करणे, इच्छुकांना आमची बागदर्शन करतांना निशुल्क शंका निरसन करणे, वर्तमान पत्रांसाठी निशुल्क लिखाण करणे आणि व्हिडीओव्दारे निशुल्क मार्गदर्शन करत आहोत. कारण आमच्यासाठी हे केवळ प्रोफेशन नसून पॅशन आहे.

ही सेवा सर्वासाठी उपलब्ध आहेच कारण आम्ही समाजाचेही देणं लागतो. गच्चीवरची बागे व्दारे दिल्या जाणार्या सेवा सुविधा या आज माफक किमतीत देत आहेत. ज्या काही इच्छुकांना महागड्या वाटतात. वाटू शकतात. पण आताच्या किमती सुध्दा या मागील सात वर्ष स्थिर होत्या. आणि त्यात वाढ फक्त ही युनिट मागे ( लिटर, प्रत, पाकीट, किलो मागे) एक रूपयाच दरवर्ष वाढवत आहोत.

पण याही किमती आम्ही येत्या दोन वर्षात ५० टक्के कमी करणार आहोत. कारण हा विचार, हा पर्यावरण संवर्धनाचा धागा व लोकांच्या आरोग्याचा वसा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नाशिकला हिरवेगार करण्याचे स्वप्न आहे.

सध्या हा पर्यावरणीय रोजगार उभा करतांना आम्ही तन, धन वापरले आहे. २०१३ पासून शुन्य संकल्पनेपासून सुरू झालेला प्रवास आता हे काम पूर्ण करण्यासाठी झेप घेण्यास तयार झाले आहे. आम्हाला, गाय, गोठा, शेड ( स्टोएरेज) गाडी, पुस्तके, संकेतस्थळ असी गरजेची चौकट पूर्ण झाली आहे. आमचे घर आणि उद्योग हा एकच आहे. सध्या ही चौकट पूर्ण करण्यासाठी आम्ही शक्य तेथून विविध कर्ज घेत उदयोग उभारला आहे. या कर्जाची रक्कम जवळपास १८ लाखापर्यंत आहे. हे कर्जातील काही मुळ रक्कम ही येत्या तीन वर्षात संपणारच आहे. तर काही रक्कम ही दिर्घकाळ असणार आहे. आम्ही सुरवाती पासूनच या संकल्पनेचे संपूर्ण पालकत्व समाजातील दातृत्वाने एकहाती स्विकारावे यासाठी प्रयत्नात आहोत. आजही कोणी ही पालकत्व स्विकारले तर आम्हाला आमच्या सोयी सुविधा या आजच्या दरापेक्षा ५० टक्के कपात करून पुरवता येणार आहे. शिवाय महिला बचत गट, युवकांना रोजगारही निर्माण करून दिला जाणार आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यातून जो काही पर्यावरण संवर्धनात लोकसहभाग वेगाने वाढता येईल.

आम्हाला खूप काही मोठ्या घरांची आता हौस नाही. गच्चीवरच्या बागेतूनच शेती करण्याचे समाधान मिळत आहे त्यामुळे वेगळी शेती आता घेण्याची इच्छा नाही. सध्याचे Gacchivarchi Baug Extension जागा कमी पडते आहे. पण कुणी सेवाभावी वृत्तीने दिली तरच तेथे शिफ्ट होणार आहोत. नाहीतर आज्न्म तेथूनच कारभार करण्याची इच्छा आहे. मुलाचे शिक्षणावर फार काही खर्चाची शक्यता कमीच आहे. काऱण आम्ही त्याला खर्चिक शिक्षणापेक्षा self-Directed Learning वर भर देत आहोत. त्यामुळे या रोजच्या जगण्याच्या खर्चा व्यतिरिक्त फार काही व वेगळी गुतंवणून नसणार आहे. त्यामुळे   सध्या  आमच्या डोक्यावरील हे कर्ज एक हाती फेडले गेले तर आम्ही आमची पुस्तके, सेवा, उत्पादने ही कमीत कमी किमतीत देणार आहोत. जे सर्वदूर पोहचू शकेल.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग. नाशिक.

http://www.gacchivarchibaug.in

कोरोना महामारी, लॉकडाऊन , त्याचा परिणाम व गच्चीवरची बागेचे प्रयत्न…


धन्यवाद नाशिककर.

कोरोना मुळे उद्दभवलेल्या आर्थिक संकटाच्या लेखातून जी मनाची घुसमट व्यक्त केली ते वाचून आपण आमच्याशी संपर्क साधला, विचारपूस केली या बद्दल खूप बरे वाटले. मनावर असलेले मणांच ओझ थोडं हलक झाल्या सारखे वाटले. आपण आमच्यासाठी प्रयत्न करत आहात हाच मोठा आधार वाटतो आहे. इच्छुकांनी मदतीचा हात देऊ केला आहेच पण सोबत तुम्ही या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी काय काय इतर उपाय योजना तयार केली आहे. अशीही विचारणा केली आहे.

हे आर्थिक संकट टाळण्यासाठी आम्ही खालील प्रकारे प्रयत्न करत आहोत.

१) आर्थिक हातभार उचलण्यासाठी इच्छुकांना आवाहन केले आहे.

२) सकाळ , लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रकाशीत झालेले लेख हे पी.डी.एफ स्वरूपात व कमी किमतीत INSTAMOJO STORE

वर इच्छुंकांना उपलब्ध करून देणे , या विषयावर व्यक्तिगत मार्गदर्शन करत असेलला कचरा व्यवस्थापनावर लिखाण करणे त्याचे पि.डी. एफ स्वरूपात पुस्तक लिखाणास घेणे

सज्जा पर सब्जी या हिंदी पुस्तकाचे लिखाण करणे व त्याचेही पि.डी . एफ . पुस्तक करत आहोत. जेणे करून त्यातून काही उत्पन्नाचे मार्ग खुले होतील.

३) दैनंदिन खर्च भागवता यावा म्हणून lock Down Bumper Offer तयार केली आहे.

४) गच्चीवरची बाग व्दारे गार्डेन केअर शॉपी मधे तयार करणे

५) यू ट्यूब व्दारे आम्ही बागे संदर्भात विविध व्हिडीओ अपलोड करत आहोत. यात आमच्या Home Grow Vegetable Services गच्चीवरची बाग या चॅनेलला Subscribe, Like, Share , comments केल्यास त्यातून शाश्वत उत्पन्न मिळवता येईल. ज्यातून आमच्या या पॅशनला आणखी जोपासता येईल.

निशुल्क मार्गदर्शनासाठी डिजीटल प्रेझेन्स लेख वाचा

६) गच्चीवरची बागेच्या सेवा सुविधा भविष्यात आणखी स्वस्तः होणार

या सहा धोरणाव्दारे आम्ही कोरोना महामारीची आम्हा कुटुंबियावर जाणवलेली तिव्रता कमी करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

तुम्हाला शक्य झाल्यास हा लेख प्रसारित करावा. लोकांपर्यंत पोहचवा. आम्हाला मदत किती होईल याची खात्री नाही पण आम्ही करत असलेले पर्यावरण संवर्धनाचे प्रयत्न लोकांपर्यंत पोहचावे हा प्रयत्न आहे. कारण या पर्यावरणीय उपक्रमाचे आम्ही केवळ जबाबदारी घेतली आहे. पण त्याचे खरे मालक नाशिककर व सर्वदूर पसरलेले बाग प्रेमीच आहे.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

http://www.gacchivarchibaug.in

9850569644 / 8087475242

आमचा निशुल्क मार्गदर्शन करणारा उपक्रम व डिजीटल प्रेझेन्स


गच्चीवरची बागेने सुरवातीपासून लोकांमधे गारबेज टू गार्डन या विषय पोहचावा. त्यांच्यामधे पर्यावरण संवर्धनाची आवड तयार व्हावी म्हणून आम्ही कचरा व्यवस्थापन, बागेत रसायनमुक्त उत्पादनाचा वापर आणि विषमुक्त भाज्यांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सुरवातीपासूनच फक्त प्रयोग व पुस्तकांमधे ज्ञान संग्रह न करता आमचे उपक्रम हे विविध समाज माध्यमांव्दारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. (पुढे वाचा)

या समाज माध्यमांमधे फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम, संकेतस्थळ याचा उपयोग करत आलो आहोत. संकेतस्थळ हे आपल्याला हवे तेथे हवे तसे अपडेट करता यावे म्हणून ते स्वतः शिकून घेतले आहे. आमचे गच्चीवरची बाग हे काम वाढवण्यात वरील समाज माध्यमांवरील लोकांचा फार मोलाचा वाटा आहे.

यूट्यूब या माध्यमांकडे जरा उशीराच लक्ष गेले. ते एक शाश्वत उत्पन्नाचे साधन होऊ शकते. पण त्याची कौशल्य शुटिंग, एडिटींग इ. कौशल्य विकसीत करण्यास वेळच मिळाला नाही. पण आता जाने. २०२१ पासून आम्ही या माध्यमांकडे आवर्जून लक्ष घातले आहे. त्यावर विविध व्हिडीओ आता अपलोड करत आहोत.

आपल्याला विनंती आहे की आमच्या Home Grow Vegetable services गच्चीवरची बाग या चॅनेलला आवश्यक Subscribe, Like, Share व Comments करा. जेणे करून ही उपयुक्त माहिती लोकांपर्य पोहचवता येईल.

https://www.youtube.com/channel/UCIUZVOtKaSvV1DqTmFnKR5Q/videos

इतर माध्यमांवरही आपण आहात पण आवर्जून Like व Share करा म्हणजे ही माहिती लोकांपर्यंत पोहचवता येईल.

बरीच मंडळी आमच्या समाज माध्यमांशी जोडलेली आहेत. पण केवळ like, share न केल्यामुळे त्यांना आमच्या पोस्ट दिसत नाही. ते का दिसत नाही या विषयी येथे क्लिक करा.

तर आम्ही लोकांना घरच्या घरी भाज्या उगवण्या संदर्भात, कचरा व्यवस्थापन संदर्भात माहिती निशुल्क प्रदान करत आहोत.

तर त्यांनाही आमच्या उपक्रमाचा उपयोग होईल.

आमची उपस्थिती असलेली खालील समाज माध्यमांना भेट द्या व जोडून घ्या..

YouTube मराठीत (vegetable garden updates साठी) https://www.youtube.com/channel/UCIUZVOtKaSvV1DqTmFnKR5Q

YouTube हिंदी में
https://www.youtube.com/channel/UCfPH1NBIAeXcYk3DQUBnSlg

facebook page “गच्चीवरची बाग नाशिक Page”
http://bit.ly/2NutaGb

Google My Bussiness

https://organic-vegetable-terrace-garden.business.site/

Tweeter link

Check out organic Vegetable Terrace Garden (गच्चीवरची बाग) (@orvetega): https://twitter.com/orvetega?s=09

*Instagram*
https://www.instagram.com/gacchivarchi_baug/

Mo no/ Wts app/ wts app call
8087475242 9850569644

https://www.gacchivarchibaug.in

https://www.sandeep-chavan.in

https://www.chat-par-khet.com

https://atomic-temporary-145492773.wpcomstaging.com

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक.

Lockdown : 2 Bumper offer


Lockdown : 2 Bumper offer

कोरोना महामारी मुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी गच्चीवरची बागे तर्फे विक्री होणार्या उत्पादने ही उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीत विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आमच्या उत्पादनाच्या सविस्तर माहितीसाठी www.gacchivarchibaug.in हे संकेतस्थळ अभ्यासावे.

 उत्पदनांचे मुळ विक्री किमत व आताची कमी केलेली रक्कम यांची यादी खालील प्रमाणे

(सदर उत्पादनातील काही उत्पादने ही डिजिटल स्वरूपात आहेत. तर पुस्तके, ग्रो बॅग्जस, बियाणे ही  ही  बाय पोस्ट ने पाठवली जातील. बाकीची उत्पादने ही आपल्याला गच्चीवरची बाग एक्सटेंशन येथून आपल्याला घेवून जावे लागतील, कारण कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे आम्हाला आमची उत्पादने १५ मे पर्यंत घरपोहोच पोहचवता येणार नाहीत)

 • Bishcom ( Potting Mix) 15 Kg –  Offer Price 10 Kg
 • गच्चीवरची बाग छापिल पुस्तक (पोस्ट खर्चा सहित 240/-) – offer Price 140/-
 • तुम्हाला माहित आहे का ? छापिल पुस्तक (पोस्ट खर्चा सहित 240/-) – offer Price 140/-
 • डॉ. बगीचा (पी.डी.एफ) 150/- Offer Price 99/-
 • तुम्हाला माहित आहे का ? ( पी.डी.एफ) 150/- Offer Price 99/-
 • जिवामृत, गोमुत्र, ह्युमिक जल, फ्रुट इंजाईम 21 रू. प्रति लिटर – Offer Price 11/- प्रति लिटर.
 • दशपर्णी 25 रू. लिटर Offer Price 15 रू. लिटर.
 • ग्रो बॅग्जस 16/- प्रति नग
 • भाजीपाला बियाणे 11 रू.
 • निमपेंड 51 रू किलो.
 • तंबाखू पावडर 51 रू. किलो.
 • लाल माती सिमेंट गोणी भरून 120 रू. Offer Price 100/-

टीपः वरील साहित्य आपल्याला हवे असल्यास पण आता घेवून जाणे शक्य नसल्यास तर तुम्ही साहित्याची यादी प्रमाणे आगाऊ पेमेंट करता येईल. त्याची तुम्हाला पावतीपण देण्यात येईल. तुमच्या सवडीने ते केव्हांही घेवून जाता येईल.

घरपोहोच पोहचवणे शक्य झाल्यास पूर्वीचीच किंमत + डिलेव्हरी चार्जेस आकारले जातील

 • Online स्वरूपात तुमच्या कुंटुबासाठी गच्चीवरची बाग ही कार्यशाळा आयोजीत करता येईल. त्याची 2500/- ऐवजी 1500 रू. फी असेन. (एक तास)

वरील उत्पादने नाशिक अथवा नाशिक बाहेरील व्यक्तिनां व्यवसायीक स्वरूपात विक्रि करावयास दयावयाची आहेत. त्यांनी कृपया संपर्क साधावा. इच्छुकांना केवळ वस्तूची विक्री केली तरी चालणार आहेत. वस्तूच्या वापरा विषयी अथवा ग्राहकांच्या समाधानासाठी आमच्याकडून सेंट्रल सपोर्ट केला जाईल.

आमच्या समोर उभ्या असलेल्या आर्थिक आव्हानांसाठी व तुमच्या सकारात्मक प्रतिसादासाठी वाचा

पुढील लेख वाचा

करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटात गच्चीवरची बाग

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक

9850569644 / 8087475242

करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटात गच्चीवरची बाग


कृपया लेख वाचण्यासाठी  आपला थोडा वेळ हवाय.. आपला दिलेला वेळ आमच्यासाठी खूप मोलाचा असेन. आपणास आम्ही मदतीचे आव्हान करत आहोत. पण खरं सांगायचे तर मदतीबरोबर आपल्या संवेदनशीलतेचीही गरज आहे. कारण आपल्याला सांगावे की नाही या विचार मागील महिण्यापासून करतोय पण ते लेखाव्दारे सांगायचे ठरवले आहे.

आपण सारेच आज एका विचित्र संकाटातून मार्ग काढत आहोत. आज एक वर्ष पूर्ण होत आहे. पहिली कोरानाची लाट संपत नाही तर दुसरीने हाहाकार माजवला आहे. घरात किंवा शेजारी एक तरी माणूस आजाराने ग्रस्त आहे किंवा घाबरलेला आहे. घरातून बाहेर पडावे तर कोरोनाशी कुठे गाठ पडेल याचा भरोवसा नाही. घरात रहावे तर हाता तोंडाची गाठ पडणे दुरापस्त झालेय. हाता तोंडांची गाठ पडेनही. आहे ते खाता येते. पण रात्रीची झोप उडाली कारण दिवसा कामात मन रमवता येते. पण अंधार सक्तिचा आराम करावयास लावतो. पण झोपेत पूर्वीसारखा निवांतपणा राहिला नाही. कारण बॅंकाकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांच्या तगादा चालू झालाय. मागील वर्षी तीन महिने कर्ज वसूली बंद होती म्हणून निवांत होतो. त्याची कसर मधल्या काळात काही अंशी भरून काढता आली. पण आता तो दिलासा यावेळेस नाही.  उपलब्ध वेळेचा आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणे हे आजच्या घडीला आमच्यासाठी तरी फायद्याचे आहे.  प्रत्येकाने लस टोचून घेतली तरच कोरोनावर मात करता येईल. पण येते दोन तीन महिने तरी हे चित्र दृष्टीक्षेपात येईल असे वाटत नाही. तो पर्यंत दिवस कसे काढायचे हा मोठा प्रश्न आहे. कोरोनाची लाट संपेलही पण येणारे आर्थिक संकट हे महाभंयकर असणार आहे. याचा अनुभव आता यायला लागला आहे.

गच्चीवरची बागेला या वर्षी आठ वर्ष पूर्ण झालेत. पर्यावरणाला उद्योजकतेची जोड देतांना जे जे करणे शक्य होते ते आम्ही प्रामाणिक पणे करण्याचा प्रयत्न केला. असेल तेव्हढी आर्थिक ताकद पणाला लावून पैसे उभे केले. कर्ज काढले. २०१९ संपे पर्यंत गाडी कुठे रूळावर आली होती. सन २०२० पासून फक्त कर्ज फेडणेच एवढाच संकल्प हाती घेतला आणि कोरोनाने उचल खाल्ली. मागील वर्ष आम्ही मित्रांकडून उधार उसनवारी करून कर्जाचे हप्ते फेडले. पण २०२१ मधे फक्त वर्षाचे पान ओलांडले परिस्थिती तिच आहे. बाहेर पडावे तर कोराना गाठणार. म्हणून १ एप्रिलपासून घरीच आहोत. कारण उपचारासाठीच पैसे नाहीत तर फिरायचे कशाला? मागील वर्षी मदत केलेल्या मित्रांकडेच पुन्हा पैसे कसे मागायचे ? बॅंक नवीन कर्ज दयायला तयार नाही. कारण त्यांचेच परतफेड बाकी आहे.

आमच्याकडे आता एकच पर्याय उरलाय. गच्चीवरची बागेचा आर्थिक कणा असलेली आमचा छोटा हत्ती विकणे. पण गाडी विकली तर पुन्हा पर्यावरणाचे हे काम उभे राहणार नाही.  रोजगार उभा करतांना पै पै गुंतवणूक केली. सुदैवाने व्यसनांवर व आजारपणावर खर्च नाही. उद्योगाला लागत असलेला पैसा कमीच पडत गेला. कारण या उद्योगाची सुरवात शुन्य संकल्पनेपासून झाली होती. इच्छा, तळमळ आणि अनुभव हेच काय ते भांडवल होते. सारे पै पै गोळा करून उभे केलेय. खरतर कोरानाची भिती आहेच. पण कोरोना चांगल्या पर्यावरणीय उपक्रमाचा पहिला घास घेणार आहे. हे नक्की झालयं. कारण ही संकल्पना रक्ताचे पाणी करून फुलवली आहे. ति आता डोळ्यासमोर विरून जाणार त्यामुळे आम्ही चिंतेत आहोत.

कामे चालूच आहेत..

माहे एप्रिल २०२० पासून घरी आहोत. पण घरी बसून आमची कामे चालूच आहेत. संकेतस्थळ अपडेट करणे, भाजीपाल्यावर व्हिडीओ बनवणे, लेख लिहणे, मागील काही वर्षात लोकसत्ता, सकाळ वृत्तपत्रात प्रकाशीत झालेले लेखांचे पी.डी.एफ. स्वरूपात पुस्तक तयार करणे. ति इच्छुकांना कमी किमतीत उपलब्ध करून दिली आहेत. उत्पादनांच्या किमती कमी केल्या आहेत. पण घेणाराच नाही तरी उत्पन्न कुठून येणार. डिजीटल स्वरूपातली  अशी कामे घरी बसून चालूच आहोत. फक्त पैसा मिळवून देणारी कामे बंद आहेत. तसेच आम्ही घरी राहूनही इच्छुंकाचे प्रबोधन व्हावे म्हणून बागेविषयी अपडेट्स पाठवत आहोत. येणार्या कॉल्सला प्रतिसाद देत आहोत. थोडक्यात लाॉकडाऊनमधे भाज्या कशा पिकवाव्यात या बद्दल निशु्ल्क मार्गदर्शन आहोत.

आम्ही या लेखाव्दारे आपल्याला आवाहन करतो की आम्हाला ही कठीण वेळ काढण्यासाठी आर्थिक मदत करावी. ति आपणास आम्ही नक्की परत करू. मला माहीत आहे आपण प्रत्येकजण आर्थिक विवेचनेत आहोत. पण आम्ही आमच्या संकल्पनेला मरताना खरचं नाही पाहू शकतं. ही मदत तुम्हाला जेवढं थोडं देता येईल तेव्हढीच हवी आहे. मदत एकाकडूनच यावी अशीही अपेक्षा नाही ति सर्वाकडून थोडी थोडी यावी. असे वाटतेय. मी आपणास मदतीसाठी आग्रह नाही करू शकणार पण हा लेख इतरांपर्यत समाज माध्यमांव्दारे पाठवावी हि विनंती. कदाचित कुणीतरी आम्हाला मदत करतील. संकल्पना जगली वाचली तरच पुढे उभे राहता येईल एका पर्यावरण पुरक उद्योजकचेचा आर्थिक श्वास आता संपत आलाय. एवढेच आपल्याला सांगू इच्छितो.

धन्यवाद.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग. नाशिक.

9850569644 / 8087475242

http://www.gacchivarchibaug.in

Instamojo Store

https://www.instamojo.com/gacchivarchi_baug/

घरी भाज्या पिकवणे हे खरचं परवडते का ?


घरी भाज्या पिकवणे हे खरचं परवडते का ?

विषमुक्त भाजीपाला घरी पिकवणे हे आर्थिक दृष्टया परवडत नाही..  खरयं आहे हे … आर्थिक दृष्ट्या हे महागडेच जाते.. पण आपण असा विचार करून एकतर या विषयात हात घालत नाही. नि बाजारातील विषारी फरावणी असलेल्या, बेचव नि कोणतही सत्व नसलेल्या भाज्या आपण सेवण करतो नि भविष्यातील आजारांना आपण आमंत्रित करतो. पण हा निर्णय सार्या कुटुंबालाच घातक ठरतो.

आम्ही नेहमी सांगतो की चार चाकी गाडी घेणे परवडते का? बारकाईने विचार केला तर नाही परवडत. एकतर त्यात लाखाची गुंतवणूक करा, तिचे देखभालीचा खर्च, सरकारी कर नि सर्वात शेवटी तिला लागणारे इंधन.. याचे निट गणीत मांडले तर रोज स्पेशल केलेली रिक्षा अथवा ओला उबेर नक्की परवडेल. यात शंकाच नाही.

तरी आपण गाडी का खरेदी करतो. एकतर आपण करत असलेला प्रवास हा सुरक्षित असणे गरजेचे आहे.  (आता कोरोना काळात तर हे अधिकच महत्वाचे झाले आहे) हव्या त्या वेळेत आपण हवे तेथे प्रवास करू शकतो. थांबू शकतो व सर्वात महत्वाचे मह्णजे आपला सोन्यासारखा वेळ वाचतो. कुणावर विसबून राहण्याची गरजच पडत नाही.

आम्ही गच्चीवरची बाग व्दारे एरो ब्रिक्स बेड तयार करून दिला जातो. निसंशय त्याची गुंतवणूक आपल्याला महाग वाटेल. पण ती एकदम करतो म्हणून महाग वाटते. खर तर या बेडचा खर्च हा तिमाहीत दोन वर्षासाठी विभागला तर हा खर्च बाजारातील भाजीईतकाच येतो. व तेही विषमुक्त भाज्या. शिवाय निसर्गाचा सहवास व आता धावपळीच्या युगात ताण तणाव कमी करणारा आनंद.

खरं पाहिल तर बाजारातील भाजी हे उदाः दहा रू किलो भेटते. पण ति भाजी खरंच दहा रूपये किमत असू शकते का ? तर नाही.  भाज्या उत्पादन करणारी उत्पादक मंडळी म्हणजे शेतकर्यात स्पर्धा असते. भाजी हा नाशंवत माल असल्यामुळे तो वेळेत विकणे हे फार गरजचे आहे. नाही तर मुद्दलही निघत नाही. हे त्यांचे एकप्रकारे समाजाने केलेले शोषणच म्हटले पाहिजे. तसेच कमी वेळात भाजीपाला उगवेनही पण त्यासाठी निसर्गाने फार मोठी किमंत रसायनाच्या वापरामुले मोजलेली असते. ति गृहीत धरतच नाही. असो.

आम्ही असे म्हणतो की आम्ही भाज्या नाही उगवत, आम्ही औषधं  उगवतो.  मला एक सांगा आपण दवाखान्यात डॉ. फी असेन, मेडीकल वरील औषधे असतील तेथे घासाघिस करतो का… एकादे औषध परवडत नाही म्हणून विकत घेतच नाही. असे होत नाही. ते असेल त्या किमतीत विकत घ्यावेच लागते. मग आपले अन्न हे जर औषध आहे तर मग त्याच्या सेवनात आपण एवढी तरतूद का करतो. त्यामुळे विषमुक्त भाज्या उगवणे हे फार गरजेचे आहे. जो आपला भविष्यातील आजारपणांचा खर्च वाचवतो.

आपल्याला चार चाकी गाडी परवडत नसली तरी तिच्या छुप्या फायंद्याचा विचार करता ति विकत घेणेच हेच फार महत्वाचे आहे. तसेच गच्चीवरची बाग व्दारे जे एरो ब्रिक्स बेड तयार केले जातात त्याचे डोळ्यांना दिसेन, बोटावर मोजता येतील असे फायंदे फार कमी आहेत. पण छुपे फायंद्याचा विचार करता ते परवडणारेच आहे.

आता अमूक खर्चात भरपूर व पैसे वसूल भाज्या उत्पादन होतील का हा नेहमीचा प्रश्न असतो. तर हे त्या त्या ठिकाणच्या वातावरण, तेथील तापमान, आपण दिलेला वेळ व आपण किती लवकर शिकता या कौशल्यावर अवलंबून असतो. कंपनी सुध्दा नेहमी गाडीचा अव्हरेज हा आयडिल परिस्थीतीवर अवलंबून आहे असे सांगतो. खड्डेमय रस्ता असेन तर आपली कितीही सोन्याची ब्रॅंडेड गाडी असो तिचा अव्हेरेज हा कमी होणारच शिवाय देखभालीचा खर्च हा वाढणारच असो…

तर आम्ही एरोब्रिक्स बेड हे आपल्याकडे उपलब्ध जागे नुसार तयार करून देतो. थोडक्यात प्रत्येक ठिकाणचा बेड हा गाडी कस्टमाईज करावी तसे करून देतो. त्यात इंधन अर्थात खते देणे, त्याची देखभाल अर्थात त्यात किड नियंत्रण  करणे इं कामे खर्च येतोच. शिवाय आपण स्वतःहून काम करत असाल तर त्यात मजूरी ही येतेच. पण यात आनंद असतो. नि हा आनंद म्हणजे शेती करण्याचा आनंद हा पैशात मोजता येत नाही…

शिवाय बागेसाठी लागणारी खते, औषधे हे दरवेळेस विकत आणलेच पाहिजे असे नाही. ते तुम्ही घरी सुध्दा तयार करू शकतात. म्हणजे सारासार असा की आपल्याला इच्छा असेल तर आपण सहजेतेने( सुरवातीला आमची मदत) घेवून घरच्या घरी भाज्या परवडणार्या भाज्या पिकवू शकतो.

एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. घरी भाज्या उगवणे  हे जीवन कौशल्य आहे. जे आपल्या प्रत्येकाला शिवावेच लागणार आहे. कोरोनाची साथीचा काळ ही एक संधी आहे. हाताशी वेळ आहे. त्यामुळे हे कौशल्य शिकून जीवनभर त्याची अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे. शिवाय साथ गेली तरी वाढता शहरीकरणाची गती पाहता, जीवनशैली पहाता आपल्याला हे जीवन कौशल्य कधी ना कधी आत्मसात करावे लागणारच आहे.

तुम्हाला भाज्या उगवण्यासाठी फार मोठी गोष्ट करायाची गरज नाही. सुरवातीपासून सारे प्रयोग तुम्हाला करायची गरज नाही. आम्ही हे सारे प्रयोग मागील २० वर्षात करून झाले आहेत. तुम्ही आमच्या खांद्यावर (अनुभवांचा उपयोग करून) पाय ठेवून पुढे जावू शकता. भाज्या उगवण्याचे ज्ञान व विज्ञान आमच्याकडून एकदा समजून घेतले तर तुम्हाला हा खडतर वाटणारा प्रवास सोपा व सहज, आनंददायी ठरेन. फक्त आम्हाला संपर्क करा. तुम्हाला सहजतेने उगवता येतील अशी काही उत्पादने तयार केली आहे. अगदी दोन मिनिटात मॅगी बनवण्यासारखी…

आमच्या सेवा व उत्पादनांविषयी सविस्तर माहितीसाठी

http://www.gacchivarchibaug.in

Lock down Inspiration Film Making winner


World Kitchen garden Day..

गच्चीवरची बाग नाशिक मधे गेल्या आठ वर्षापासून सातत्याने पर्यावरण संवर्धनात काम करत आहे. Grow, Guide, and Build, Products Sale & Services या पाच प्रकारची कार्यक्षेत्र लक्षात घेवून लोकांना प्रयोग, प्रशिक्षण, प्रकल्प, सेवा व साहित्य उपलब्ध करून दिले आहे. ही संपूर्ण प्रक्रियेचा कणा हा गारेबज टू गार्डेन असा आहे. कमीत कमी मातीत घरातील व बागेतील कचर्याचे सृजनशील व्यवस्थापन करत विषमुक्त भाजीपाला पिकवण्याचे काम अविरत करत आहोत.

मार्गर्दशनाचा भाग म्हणून lock downच्या काळात Lock down Inspiration Film Making या स्पर्धेचे आयोजन केले होते. यात जवळपास ५०० लोकांनी सहभाग नोंदवला होता. ज्यांनी सहभाग घेतला त्यातील काही निवडक दोन कुटुंबाची यात निवड झाली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत महिला प्रतिनिधीचा समावेश होता.

या स्पर्धेत एक प्रथम क्रमांक विजेता व उत्तेजनार्थ विजेता असे दोनच क्रमवारी ठरली होती पण.. आमच्या हाती आलेल्या माहितीपटातून दोनही स्पर्धेकांना संयुक्त पध्दतीने प्रथम क्रंमाकाचे विजेता घोषीत करावे लागले. कारण दोघीचा सहभाग, त्यासाठी घेतलेले कष्ट, वय, आवड यांचा विचार करता त्यांच्यात उत्तेजनार्थ ठरवणे फार अवघड होते.

प्रथम क्रंमाकाचे संयुक्त विजेते हे नित्या पाटील, नाशिक व अनुष्का कशाळकर, नाशिक असे आहेत.

यांनी बनवलेला माहितीपटाची लिंक सोबत देत आहोतच…

अनुष्का कशाळकर ही दहावीची विद्यार्थीनी. आई बांबाना शेतीची, निसर्गाची पूर्वीपासूनची आवड. शासकीय कामानिमित्त अगदी जंगलाच्या सहवासात झाडं, झुडपे, फुलात रमलेले हे कुटुंब. पण शहरात आल्यावर झाडांशिवाय कसे राहणार? जागा आहेच कुठे.. अरूंद रस्ते.. उंच उंच ईमारती त्यांच्यामुळे आहे त्या अंगणात पुरेसा प्रकाशही येत नाही. मग पर्याय गच्चीचाच… त्याच्या तनूजा ही आनंद निकेतन या प्रयोगशील शाळेची कृतीशील व उत्साही विद्यार्थिनी.. तर तनुजा व कुटुंब निसर्गाचा आनंद तर घेत आहेतच शिवाय चविष्ट, रसदार, अशा विषमुक्त भाज्यांचेही उत्पादन घेत आहेत.

तर नित्या पाटील ही सहावीची विद्यार्थिनी. दोघेही पालक वैदयकिय सेवेत कार्यरत आहेत. नित्या ही सिंब्वायसिस या शाळेची विद्यार्थीनी. मितभाषी, उत्सुक. विविध उपक्रमात सहभागी होणारी, निसर्गासोबत रमणारी, त्यातील किटकांचा अभ्यास करणारी. आजूबाजूच्या प्रश्नांची जाण, त्यामुळे ती वयाच्या पाचव्या वर्षापासून फटाके फोडत नाही. कारण त्यामुळे आपल्या भूमातेचे संरक्षण होते. तिन नुकतच HOMI BHABHA YOUNG SCIENTIST EXAM उत्तीर्ण झाली. त्याल तिला चांदीचे पदक देवून गौरवण्यात आले ..

तिने या परिक्षेत शहरी शेतीचा अभ्यास केला होता. त्यासाठी गच्चीवरची बाग, नाशिक ची निवड केली. तिने प्रकल्प संशोधन केले. त्यातूनच तिने काही घरी प्रयोग केले, त्यातून तिला बागेची आवड निर्माण  झाली व गच्चीवर तिनेही बाग फुलवली…

या स्पर्धेत विजेत्यांना काय देणार हे गुलदस्त्यात असूनही त्यांनी सहभाग घेतला याचे कौतुक वाटते. बरेचदा मंडळी काय व किती मिळतयं यावर सहभाग अंबलबून असतो. पण Lockdown Inspiration Film Making स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतलाच पण त्यांच्या कुटुंबियांनीही त्यांना भक्कम पाठबळ दिले. त्यांना गच्चीवरची बाग तर्फे सलाम… गच्चीवर बाग फुलवून निसर्गाजवळ जाण्याचा, त्याला समजून घेण्याच्या या प्रयत्नात आपण सर्वेच सहभागी झाला या बदद्ल धन्यवाद मांडतो. विजेत्यांना त्याचे बक्षीस लवकरच देण्यात येईल… अशा रितीने WORLD KITCHEN GARDEN DAY संपन्न केला.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

घरच्या घरी फुलवा भाज्यांचा मळा


गच्चीवरची बाग |digi
 

घरच्या घरी फुलवा भाज्यांचा मळा

करोना काळात असे करा व्यवस्थापन

Gokul Pawar

Gokul Pawar

 

नाशिक |Nashik

करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रतिबंधित क्षेत्रे वाढत आहेत. लोकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, भाजीपाला सारखा हाताळू नये, भाजी घ्यायला एकदम गर्दी करू नये असे आवाहन यंत्रणा वारंवार करत आहे. आपल्या कुटुंबापुरता भाजीपाला घराच्या गच्चीत उगवण्यासाठी हा अत्यंत योग्य काळ आहे, असे मत ‘गच्चीवरची बाग’चे संचालक संदीप चव्हाण यांनी केले आहे.

सहज पिकवा भाज्या !

आता राज्यात ‘ अनलॉक महाराष्ट्र’ मोहीम सुरु झाली आहे. पण करोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा काळात संसर्गित भाज्या आपल्या घरी आल्या तर? किंवा आपण संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आलो तर? त्यापॆक्षा भाज्या घरीच उगवल्या तर? घरी भाज्या पिकवणे अवघड नाही. त्यासाठी माती, पालापाचोळा, कंपोस्ट खत अशी थोडीशी पूर्वतयारी करावी लागते. पावसाळा सुरु आहे. त्यामुळे पालापाचोळा मिळणे अवघड आहे. त्यामुळे सध्याच्या काळापुरते आवश्यक कंपोस्ट खत नर्सरीतून आणले तरी चालेल.

घराच्या बाल्कनी, खिडकी, गॅलरी, उपलब्ध वस्तू उदाहरणार्थ प्लास्टिक कापड, बादल्या, टब, गोणपाट, तेलाचे डबे, शीतपेयाच्या किंवा पाण्याच्या बाटल्या असल्या तरी त्यात तुम्ही भाज्या पिकवू शकता. तुमच्याकडे ४ इंच खोली असलेल्या सव्वा लिटर पाण्याच्या बाटल्या असली तरी त्यात सुद्धा अंबाडी, पालक, आंबटचुका अशा पालेभाज्या लावू शकता. चार बाटल्यांमध्ये पालेभाज्यांची रोपे लावली तर दोन जणांपुरती पालेभाजी सहज मिळते. १ फूट लांबीरुंदीच्या आणि ४ इंच खोल असलेल्या कुंडीत देखील दोन माणसांची पालेभाजी सहज उगवते असेहीते म्हणाले.

अशी करा कुंडी तयार !

तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या साधनाच्या तळाशी नारळाच्या शेंड्या, त्यावर किचनवेस्ट/ पालापाचोळा दाबून भरा. थोडी माती टाका. झाली कुंडी तयार. एखाद्या कुंडीत झाडं नसेल तर त्यातील माती वापरा. बियाणे पेरा आणि साधारणतः महिनाभरात आपण उगवलेल्या भाज्या खायचा आनंद घ्या. लॉकडाऊनमुळे जो वेळ मिळाला आहे तो अधिकाधिक या आपल्या गच्चीवरच्या बागेसाठी द्या.

आपण गच्चीतल्या बागेत सर्वच भाज्या पिकवू शकतो. पालेभाज्या साधारणतः सव्वा महिन्यात तर कांदापात महिनाभरात येते. या रोपांना सतत उन्हाची गरज नसते. थोडे ऊन, थोडी सावली अशी जागा चालते. सकाळचे उब मिळाले तरी पुरते. खूप जास्त पाणी घातलेले चालत नाही. कीड दिसते आहे का याचे वारंवार निरीक्षण करावे लागते. तिचे नियंत्रण घरच्या घरी करता येते. देशी गायीचे गोमूत्र थोडेसे सौम्य करून, ते नसेल तर आंबट किंवा खराब ताक, हिंगाचे पाणी यांची पंधरा दिवसातून एकदा फवारणी केली तरी किडीचे नियंत्रण होते.

घरचे बियाणे !

बियाणे किंवा रोपे विकत मिळतात. पण तेव्ढ्यासाठीही बाहेर जायचे नसेल तर महिनाभरात भाज्या येतील अशा घरच्या बियाणांचा वापर करता येतो. मेथी, धने , मोहरी पेरा. थोडेफार पालकांचे बिज असेल तर पेरा. किंवा बाजारातून पालक जूडी मिळाल्यास पाने काढून त्याची खोडासहित लागवड करा. महिनाभरात पालक तयार होईल. कांदा, लसून लागवड करा. महिनाभरात कांद्यांची पात मिळेल.

तांदुळका, लाल माठ ही सहज येणारी वनस्पती आहे. थोडं बियाणं मिळालं, किंवा एकादे रोपे मिळाले तर ते वाढवा. गाजर, मुळा, बिट याचें खोड पुन्हा मातीत लावा. त्याच्या पानांपासून पराठे तयार करता येतात. मिरची, टोमॅटो, वांगी, बटाटे, वेलवर्गीय ( वाल, भोपळा, गिलके, दोडके, तोंडलीचा वेल ) यांची लागवड करा. घरच्या घरी भाज्या पिकवण्याचा आनंद सगळ्यांनी घ्यावा असे मला वाटते.

 

Attractive , Affordable & Effective Cotton Mask


स्टेप (STEP) फाऊंडेशन, नाशिक, महिला निर्मित उद्योग…

WhatsApp Image 2020-06-15 at 6.50.35 PM

स्वतःचा शोध घेत समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा उराशी बाळगत समाजकार्याचे शिक्षण घेत दोन तरूणांनी पदवी घेतल्यानंतर समाजसेवा करण्याचे व्रत हाती घेतले.  सातत्यांने संपर्कातील लोकांना मदत करत आणी मदत घेत, समाजधुरीणांची, समाजकार्य महाविद्यालयातील जाणकार प्राध्यापकाचे मार्दर्शन घेत, समाजातील विविध अनुभवी लोकांना एकत्र करत त्यांची मोट बांधली. त्यातून स्टेप फाऊंडेशन नावाची, Social Transformation & Environment  Protection Foundation, Nashik या नावाने संस्था नोंदणी झाली.

आणि सुरू झाले कामाचे झपाटलेपण…  जेथून मिळेल, जे मिळेल ते पदरात घेत, वेळ प्रसंगी पदरमोड करत समाजसेवा सुरू झाली. कुठेही दोन पैसे बाजूला ठेवण्याची हाव नाही.. संस्था उभी करणे म्हणजे केवळ काम करणे, नाव लोकांपर्यत पोहचवणे एवढेच नसते. तर त्यासाठी आर्थिक पाठबळाची निंतात गरज असते. पण समाजसेवेच्या व्रतात बेधुंद झालेल्या या तरूणांना कोण सांगणार.. कोल्हापूरचा पूर आला… आव्हान करत मदत गोळा झाली. रात्रदिंवस राबून, वेगेवेगळ्या माध्यामांतून साहित्य गोळा केले. ते खरच गरंजवतांच्या पदरात पडावे म्हणून पुरग्रस्त गावाचां प्रवास करत तेथे पोहचले. तसेच कोरोनामुळे अनेक लोक घरातच अडकून पडले. त्यांना दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था करतांनाही अशीच धावपळ केली. कुठेही नोंदणी नाही, गाजावाजा नाही. कितीजनांची जेवले या संख्येपेक्षा असंख्य जनांनी रोजच आर्शिवाद दिले त्याचे समाधान चेहर्यावर सदासर्वदा फुललेले…

संस्थातंर्गत २५ महिला बचत गटांची बाधंणी झाली. बचत गटांतील महिलांच्या हाताला काम मिळावे, सन्मानाने स्वंयरोजगार मिळावा म्हणून मेस चालू केली. कचरा वेचक महिलांची घरची चुल पेटावी म्हणून गच्चीवरची बाग या पर्यावरण उदयोगाशी जोडून घेत., रोजगार देण्याचा प्रयत्न होत आहे.  जानकारांशी बोलत, सल्ला मसलत करत बचत गटाच्या महिलांना महत्वाचा नवीन रोजगार उभा राहतोय.. तो म्हणजे कापडाचे मास्क व कापडी पिशव्या शिवणे..

आज नाशिक मधील विविध आर्थिक स्तरातील महिलांना त्यांचे कौशल्य, तळमळ हेरत त्यांच्या हाताना काम मिळत आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर विविध रंगी मास्क शिवले. त्याला वापरकर्त्याची प्रचंड पसंती मिळत आहे.

छान रंगात, पुरेशा आकाराचे, कॉटनच्या कापडाचे हे मास्क आपणही वापरून पहा…बरेचदा दुकानावर पिशव्या टांगाव्यात तशा स्वरूपात मास्क टांगलेले दिसतात. धुळीने भरतात, नको नको त्या लोकांचे हात लागतात. स्टेप फाऊंडेशने याचा विचार करत सुंदर असे कमी खर्चाचे पॅकींग केले आहे. आपली छोटीशी खरेदी त्यांचा आत्मविश्वास वाढेल तसेच Work From Home करत कोरोनाच्या युध्दातील रणरागीनी ठराव्यात.. त्यासाठी आपली मदत मोलाची ठरणार आहे. तेव्हा.. आजच आपली मागणी नोंदवा…

स्टेप(STEP) फाऊंडेशन, नाशिक, महिला निर्मित उद्योग

आमच्या उत्पादनाचे वैशिष्ट्य…

O कॉटनच्या जाड कापडाचे , पुरेश्या आकाराचे मास्क उपलब्ध.

O वेगवेगळ्या रंगात व प्रकारात उपलब्ध.

O सुरक्षित व आकर्षक पॅकिंग.

O वाजवी दारात (ना नफा ना तोटा) उपलब्ध.

O टिकाऊ धुवून परत परत वापरण्या योग्य.

O आपली गरज, आवडीनुसार सुबकआकारात  मास्क तयार करून मिळतील.

आपल्या मागणीनुसार मास्क व कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यात येईल.  नाशिक शहरात 100 मास्क च्या पुढे घरपोच सुविधा  उपलब्ध, नाशिक शहराच्या बाहेर पाठवण्याची व्यवस्था.

आपली मागणी आजच नोंदवा

दिपक देवरे 9021909337,  वैशाली राऊत 8378942769, गोकुळ मेदगे 9011800838

 

Garlic, jaggery, water , Homemade medicine in Covid-19


health-benefits-of-garlic-main-image-700-350

Experiment: Growth resistance power Garlic, jaggery, water , Homemade medicine in Covid-19

लेख काळजी पूर्वक वाचा… हे तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला फायदयाचे ठरू शकेन.

कोरोना मुळे लॉकडाऊन सुरू झाले नि आपल्याच घरी आपण कैद करून घेतले. तॉ इतारांच्या संपर्कात न येण हाच त्यावर एक उपाय होता व आहे. मनाचे स्वास्थ जपण्यासाठी स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात गुंतूवून घेणे हा मात्रा रामबाण उपाय ठरला. ह झाले मनाचे पण शरिराचे काय.. म्हणून आपल्याला खोकला, सर्दी, ताप येवू देवू नये म्हणून काय करता येईल याचा विचार केला. त्यावर घरगुती औषध काय करावं याचा प्रयत्न केला. या आधि ताप, सर्दी, कफ, खोकलावर घरच्या घरी उपचार केलेच होते. बाजाराती उठसूठ प्रतिजैविके ( Antibiotics) घेणे मी बर्याच अंशी टाळत असतो. त्यामुळे ताप, सर्दी, कफ, खोकला ( तासकखो) नियंत्रणाबाबत अनुभव गाठीशी होता.

पण हे आता निकराने टाळले पाहिजे शिवाय प्रतिकार शक्ती वाढवणे ही गरजेचे होते. म्हणून प्रतिकार शक्ती वाढावी, घसा स्वच्छ रहावा म्हणून रात्री लसूण खाऊन पाहिला. त्यावर पाणी पिऊन झोपलो. सकाळी घसा तर खाकरणे बंद झालेच. मग हा प्रयोग रोज रात्री करू लागलो. पण खरच एका लसणाने फरक पडेल का म्हणून चार पाच लसणाच्या पाकळ्या खाल्या. पण लसून खूपच तिखट लागला. म्हणून त्यासोबत एका रात्री गुळाचा खडा खाऊन पाहिला. तसाच दुसरा विचार म्हणजे लसणाच्या गुणधर्माला गुळ हा अनेक पटीने वाढवतो. म्हणून लसूण गुळ व त्यावर पाणी पिऊन पिलो. त्या रात्री खूपच छान झोप लागली. शरिर ताजेतवाणे झाले. मग काय.. रोजच हा प्रयोग रात्री सुरू झाला. एकदा भर दुपारी जेवण झाल्या नंतर हाच प्रयोग केला. त्या दुपारीपण पण छान झोप लागली. लसूण- गुळ खाल्या नंतर असे लश्रात आले की झोप तर लागतेच पण मेंदुही स्थिर राहतो. चिडचिड झाली नाही. मग काय रोज दुपार रात्री जेवणानंतर लसून-गुळ खाऊन पाणी पिऊ लागलो. मागील लॉकडाऊनच्या काळात एकही शिकं आली नाही. ताप, सर्दी, कफ, खोकला झाला नाही.

मला असे वाटते कदाचित हा प्रयोग आपल्या आर्युवेदामधेही असेनही. पण तो अपघाताने त्याचा पुन्हा प्रयोग केला. आपणही हा प्रयोग करून पहा. लसणाचा तोंडाला दुर्गंध येईन. पण गुळ पाणी सेवनाने हा गंध कमी होतो. तसेही तोडांवर मास्क लावल्यामुळे व कोरानामुळे आपल्याजवळ घरच्या व्यक्तिरिक्त कोणा फिरकत नाही. हा प्रयोग आपणही करून पहा. आपल्यालाही त्याचा काही प्रत्यय काय येतो तो कळवा.

टीपः ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी हा प्रयोग जपून करावा… तसेच हा प्रयोग माझ्या वैयक्तिक पातळीवर केला आहे. त्यातून कोणताही अफवेचा प्रयत्न नाही. फक्त माझा अनुभव येथे मांडतो आहे. पटलं तर घ्या. नाहीतर सोडून द्या..

कदाचित या प्रयोगाचा उल्लेख आयुर्वेदात असेनही. तोही कळवा किंवा हा प्रयोग नवीन असेन तर त्याचे विविध भाषेत भाषांतर करा. इतरांना पाठवा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग. नाशिक.

Annapurna Bags : Ready to Sow Bag

विशेष

पावसाळा आला की कसा बाग कामासाठी हुरूप येतो. प्रत्येकालाच घरा भोवती फुलांची, भाज्यांची बाग फुलवाविशी वाटते. एवढचं काय तर वरणाच्या फोडणीला टोमॅटो, कड्डीपत्ता मिळावा याची आपण गरज ओळखतो. त्यानुसार आपण भाजीपालासाठी प्रयत्न करतो. या सर्व संसाधनाची जमवाजमव करणे जरा अवघड वाटते म्हणून आपण तो नादच नको म्हणूनच बाग काम सोपे व्हावे म्हणून आम्ही अन्नपूर्णा बॅग्जस हे उत्पादन घेवून आलो आहोत. जणू काही या कूल आयडीयासाठी हॉट प्रोटक्ट..

.आमचे व्हेजेटेबल ब्रिक्स गार्डेनही आपण साकारू शकता पण त्यासाठी मोठ्या गच्चीची गरज असते. पण ज्यांच्याकडे फक्त गॅलरी आहे, विंडो ग्रील आहे त्यांच्यासाठी हे उत्पादन आम्ही घेवून आलो आहोत. अन्नपूर्णा बॅग म्ह्णजे बिया पेरा, भाज्या वाढवा व कापणी करा, मिळवा.. होय. जी आपल्याला लॉकडाऊन  काळात घरच्या घरी भाज्या मिळवण्यासाठी मदतगार झाली आहे.

कारण बाहेर जाणे म्हणजे संसर्गाची शक्यता वाढते. म्हणून या लॉकडाऊनच्या काळात व धावपळीच्या जगण्यात घरी भाज्या उगवण्यासाठी बरीच संसाधने गोळा करवी लागतात. पण हे सारे करूनही भाजी उगवण्याची भट्टी जमूनच येईल याची खात्री नाही. त्यामुळे आम्ही अन्नपूर्णा बॅग हे उत्पादन आणले आहे.

 

हे उत्पादन आता सर्वांचे आवडीचे व कौतुकास पात्र होत आहे.   आपल्याला या कुंड्या घरी घेवून जाऊन फक्त पाणी द्यावयाचे आहे. उन, वार्याची काळजी घ्यावयाची आहे. काही अडचण आल्यास व्हाट्स अप मार्गदर्शन केले जाईलच. गार्डेन केअर कीट आपण आमच्या कडून खरेदी करू शकता किंवा तुम्ही पण घरच्या घरी बागेची काळजी घेणारे औषधे तयार करू शकता. रेडी टू हार्व्हेस्ट क्रेट्स मिळतील. अन्नपूर्णा Bag size ही रिकामी असतांनाच १६ बाय १६ इंच. तर भरल्यानंतर १२x 8 inch असते. १० लिटर क्षमतेची..काळ्या रंगाची.प्लास्टीक बॅग असून ति नर्सरीतील रोपे वाढीसाठी वापरली जातात.

या अन्नपूर्णा बॅगेत आपण पालेभाजी, कंदमुळं व फळभाजीची लागवड तर करू शकतातच पण फुलझाडे ही छान वाढतात. दोन किंवा तीन महिण्याचे एक पिक निघाले की माती वाळवून घेणे गरजेचे आहे. माती का वाळवून घ्यावी या विषयी यावर क्लिक करून लेख वाचा 

या बॅगमधील एकदा माती वाळवून घेतली की त्यात थोडे बिशकॉम, खत मिसळा व ही बॅग पुन्हा वापरण्यासाठी तयार होते.आम के आम गुटलींयोके दाम.. म्हणजे ३०० रूपयातील या रेडी टू सो बॅग वापरल्यानंतर पहिल्या तीन महिण्यात आपल्याला  ऑरगॅनिक भाजी तर मिळणारच ( ३० रू प्रमाणे ३ भाज्या मिळणार ९० रू.  त्यातूनच आपल्याला आठ किलो खतासारखी सुपिक माती मिळणार २२ रू. प्रमाणे १७६ रू. व सात वर्ष टिकणारी बॅग- २२ रू. म्हणजे सौदा फायदे का  है ना बॉस. बस नजर पारखी चाहिएं…  ज्याला समजलं त्याला उमजलं…  फायदा कसा याची बेरीज  करून पहा…  बागेतून जो आनंद मिळणार, घरची भाजी खावून तोंडाला जी चव येणार, मनाला समाधान होणार.. त्याची किंमत नाय करता येणार … तरी करून पहा… अन्नपू्र्णा बॅगेची काळजी कशी घ्यावी… वाचा सविस्तर लेख.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

Free Fresh Green Grow Kit Project


vertical garden 1 1 (75)

एक गोष्ट सांगतो. त्या गोष्टीचा व मांडणी केलेल्या Grow Kit प्रकल्पाची संकल्पना अवलंबून आहे.

एक तरूण असतो. तो एकटाच असतो. त्याला कोणतेही कुटुंब नसते. त्यामुळे तो या गावातून त्या गावात भटकत असे. एकदा त्याची भेट तळ्याशेजारी राहणार्या मासे पकडणार्या कोळ्याशी होते. तो तरूण कोळ्याकडे भुकेने व्याकुळ होत जेवणाची मागणी करतो. कोळी त्याला जेवण देतो व विचारपूस करतो. चौकशीतून त्याला असे कळते की तो तरूण समज आल्यापासून असाच गावोगावी फिरत आहे व आपली पोटाची भूक भागवत आहे. कोळी त्याला तेथेच राहण्यास सांगतो. त्याला दुसर्या दिवसापासून मासे पकडण्यास घेवून जातो. त्याला मासेमारी करायची कशी, जाळ फेकायंच कसे, मासे विकायचे कसे हे सारे शिकवतो व एक दिवस त्याच्या पायावर उभा करतो. आता तो तरूण जीवन कौशल्य शिकल्यामुळे कुणाकडेही भाकरीसाठी हात पुढे करत नाही. तो त्याची भाकरी मिळवू लागतो.

वरील गोष्टी प्रमाणेच Lockdown मधे लोकांना भाज्या पुरवण्यापेक्षा, भाजी मंडईत बोलावून त्यांना संसर्गीत करण्यापेक्षा घरीच भाज्या पिकवायचे काही मंडळीना शिकवले, प्रेरीत केले तरी बर्याच अंशी या विषाणूच्या प्रसारावर लगाम लावता येईल.

लॉकडाऊन हे आज नाही तर उद्या संपेलच. पण ते पूर्णतः कधी संपेल काही सांगता येत नाही. भले त्याची धम कमी होईल पण तिव्रता ही जाणवणारच आहे. काल देश व्यापी Lockdown होते ते संपूण ते फक्त राज्यव्यापी राहिले, ते ही संपूण ते तालुका, शहर, गाव व्यापी राहिले असे करत करत ते त्या त्या कॉलनी पुरता राहील. आणि पुन्हा कदाचित उद्रेक वाढला तर व्याप्तीही वाढवली जाऊ शकते. कारण सध्या तरी प्राप्त परिस्थितीत हाच रामबाण उपाय आहे. असो तर Lockdown हे राहणारच आहे. Hunger Free Community हे Millennium Developmentचे उद्दीष्ट आहे.

लोकांना Lockdown मधे सहजतेने राहता येईल असे सोयी करणे गरजेचे आहे. त्यांना औषधे, खाणपान पुरवणे हे आलेच. पण एवढेच पुरेसे आहे. तर नाही. त्यांच्याकडे असलेला वेळेचा सद्पयोग करत त्यांना व्यस्त ठेवणे हे सुध्दा मानसिक पातळीवर मोठे आव्हान आहे. केवळ इंटरनेट फ्री करून चालणार नाही.. तर त्यांच्या मन, मेंदू व हातांना काम दिले पाहिजे. तर यासाठी स्थानिक प्रशासनाने भाजीपाला उत्पादनासाठी Growing kit दिले पाहिजे. त्यांना भाजीपाला बाग तयार करण्यासाठी प्रेरीत केले पाहिजे. कारण भाजी मंडईत होणारी गर्दी व तिचा प्रादुर्भाव पाहता घऱीच भाज्या उगवणे हे गरजेचे आहे.

आज अनेकांचे फोन येताहेत सर आपल्याकडून सेटअप उभा करून घेतला असता तर आज बाहेर जाण्याची वेळ आली नसती. घरीच भाज्या उगवल्या असत्या. अशी अनेकांनी इच्छा असेन पण माहिती अभावी ती पोहचू शकत नाही. ती पोहचवली पाहिजे.

Growing Kit म्हणजे काय… या मधे अपार्टमेंट राहणारी व्यक्ती ही केंद्र मानली तर तिच्या कडे विंडो गार्डेनिंग साठी, खिडकी किंवा बाल्कनी मिळून थोढीफार जागा असते. बरेचदा इच्छा असूनही त्यांनी घरी भाज्या उगवणे शक्य नाही. त्यासाठी त्यांना विशिष्ट आकाराच्या ग्रो बॅग्ज, बियाणे, Potting Mix , सोबत एक हे सारं करण्याविषयीची माहितीपुस्तिका तसेच या विषयावर मार्गदर्शन करणारी व्यक्तिची नावे ( त्यांची संमती घेवून) देण्यात यावी.

हे काम स्थानिक प्रशासनाने करावे, किंवा या विषयावर गच्चीवरची बाग सारखा काम करणार्या संस्था वा उद्योगाव्दारे व्दारे अशा किटचे वितरण करण्यात यावे.

अशा Growing Kit साठी गच्चीवरची बाग प्रयत्न करणार आहे. ही तयार Ready to Sow ( पेरण्यास तयार) बॅग असेन. इच्छुकांची व यासाठी लागणार्या साहित्य दान करणार्याची यादी तयार करून हे किट Indian Post ने पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे.

त्यासाठी दानशुरांनी खालील प्रमाणे साहित्याची, खर्चाची मदत करावी ही विनंती.

 • १२ बाय १२ इंच आकाराच्या ग्रो बॅग्ज
 • भाजी पाल्याच्या बिया. नव्या, जून्या कोणत्याही चालतील. (जुन्या असतील तर त्याची निवड करून त्यावर बिजसंस्कार करून ते वाटले जातील)
 • Potting Mix चा खर्च (यामुळे बजन हलके होईल. व Ready to Sow बॅग बाय पोस्ट ने पाठवायला सोपे जाईल.
 • टपाल खर्च साधारण (60 ते 80 Kg असतो. ) एक बॅग ही एक किलोची किंवा त्येपेक्षा कमी वजनाची बनवण्याचा प्रयत्न केला जाईल.
 • ई-माहिती पुस्तिका पुरवण्यात येईल. ( घरच्या कचर्यापासून खत कसे तयार करावे, बिज कसे लागवड करावे, कीड नियंत्रण कशी करावी या संदर्भात माहिती देण्यात येईल.)
 • यासाठी कोणतीही मजूरी आकारण्यात येणार नाही.

वाचा… Lockdown Inspiratuin activity -1

दानशुरांनी यासाठी साहित्य वा लागणारा खर्च करण्यासाठी पैसे रूपात मदत केली तरी चालेल.

ही सारी प्रक्रिया गुगल फॉर्म व्दारे तयार करण्यात येईल.

Lockdown 0.1 काय आहे वाचले का..

आपल्याला ही संकल्पना आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर व कॉमेंट्स करा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

 

सहश्त्रकातील धैय व गच्चीवरची बाग


Millennium-Development-and-Sustainable-Development-Goalsगारबेज टू गार्डन… Millennium Development Goal

संयुक्त राष्ट्र संघाने या सहस्त्राकात विकसीत व विसनशील देशांनी साध्य करावयाची काही मार्गदर्शक धैये ठरवून दिली होती. ज्याची मुदत २०१५ होती.  जी संघाच्या १९३ सदस्य देशांना स्वैच्छिक होती. खर तर त्यांनी १७ ध्यैयांना मान्यता दिली होती. पण यातील एकही ध्यैय एकाही राष्ट्राला काही अंशानेही गाठता आले नाही. त्याची कारणे शोधणे हा वेगळा विषय आहे. पण ही ध्यैय आता २०३० पर्य़ंत गाठण्याची ठरवले आहे. ( तो पर्यंत आपण बरेच काही गमावलेले असू) त्यातील ध्यैये व त्यांच्या अंतर्गत येणारी उदिष्टे जरा आतंरजाळ्यावर (Millennium Development Goal) शोधून पाहिली, त्याचा खोलात जाऊन अभ्यास केला तर त्याचा व आपण गारबेज टू गार्डन असलेली गच्चीवरची बाग या पर्यावरण पुरक संकल्पनेची गरज व महत्व सहज लक्षात येईल. आम्ही विश्वासाने सांगतो की गच्चीवरची बाग हा उपक्रमासारखे जागतिक पातळीवर चालत असलेले उपक्रम हे संयुक्त राष्ट्राने ठरवून दिलेल्या ध्यैये आणि उदिष्ट गाठण्यासाठी बर्याचं अंशी मदत करत आहे.

अर्थात ही सुरवात आहे. बर्याच देशांतील शहरात शहरी शेतीचे उपक्रम सुरू सुध्दा झाले आहेत. संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेली या सहस्त्रकातील ध्यैये ही गच्चीवरची बाग अर्थात शहरीशेतीशी संलग्न आहेत. भूक निर्मुलन, चांगले आरोग्य, शुध्द पाणी आणि आरोग्यदायी स्वच्छता, नुतनी करण्याजोगी स्वस्त ऊर्जा, रोजगार, सर्क्युलर इकोनॉमी, शाश्वत शहरे व समाज, उपलब्ध साधनांचा जबाबदारी पूर्वक वापर, हवामानाचा परिणाम, जमिनाचा शाश्वत उपयोग, सेव्ह सॉईल,  बहुविविधता (वनस्पती, कीड) आणि शाश्वत विकासासाठी जनभागीदारी… अशी ही उदिष्टे आहेत. सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय भागात विभागली आहेत. आणि गच्चीवरची बाग उपक्रम या गोष्टींना परिघावरच नव्हे तर आतील गर्भापर्यंत स्पर्श करते हे आवर्जून सांगावेसे वाटते. विशेष म्हणजे ही लोक चळवळ होऊ घातली आहे.  राव न करी गाव करी ही आपल्याकडील प्रचलित म्हण आहे.

क्यूबा सारख्या देशावर जेव्हा आर्थिक निर्बंध आलीत तेव्हा तेथील लोकांनी आपलं अन्न हे दारं, खिडक्या, अंगणात उगवली होती. तसेच सध्या वॉश (water, sanitation & Health) नावाचा उपक्रम विकसन देशात राबवला जात आहे. त्यात पाणी , स्वच्छता व आरोग्य हे मुद्दे आहेत. वरील दोनही उदाःहरणातील ही सारी मुद्दे एकमेंकाशी संलग्न, एकमेकांवर परस्पर अवलंबून आहेत.  ही वरील सारी उदिष्टात आपण प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला तरी एका टिटवीने समुद्र आटवला  या म्हणी प्रमाणे एका उपक्रमाने जागतिक प्रश्नांना उत्तर ठरेल. हा खारीचा वाटा अर्थातच गारबेज टू गार्डन असा शहरी शेतीचा, गच्चीवरची बाग फुलवून आपण उचलू शकता.

प्रगतशील देशातील निवडक चौकात भाजीपाला लागवड करण्यात आला आहे. जो त्याची कुणीही काळजी घेऊ शकतो व त्यातील भाजीपाला घेवू शकतो. हे होईल का हो आपल्याकडे?  रस्त्याच्या दुभाजकात जैविक काडीकचरा सहजतेने जिरवता येऊ शकतो शिवाय त्यावर माती कमी लागेल. परदेशात कचरा हा प्रश्नच नाही आहे. कचरा हा उदयोग आहे. मोठी इंडस्ट्री आहे. पण त्याची सुरवात ही स्वंयशिस्तीने होते. जी व्यवस्था ठरवली जाते त्यात सुधारणा करण्याची नागरिकांत व  प्रशासनातही धमक असते. आपल्याकडे सर्वत्र इच्छेचाच अभाव असतो.

गच्चीवरची बाग ही संकल्पना खरं तर शहरासाठी उपयुक्त आहेत. गारबेज टू गार्डेन हा त्याचा आत्मा आहेच. कचरा ही अशी गोष्ट आहे जी सर्वोतोपरी वापरात आणली तर त्याचं सोनं करता येऊ शकतं तर दुर्लेक्ष झालं तर त्याचा राक्षसही होऊ शकतो. फक्त त्याला वापरावयाचे कसे याचे तंत्र, त्याची वैज्ञानिक मांडणी, महत्व लोकांपर्यंत पोहचलं पाहिजे. मुळातच एकादी गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला नेहमीच अनुकुल वातावरण, परिस्थिती असेन असे कधीच नसते. ते तसे असते तर त्या साध्यात आपल्याला मजा, गंमत व शिकायला मिळणारच नाही. जितकी परिस्थतीती प्रतिकुल तितक्या मानवी विचाराच्या, कल्पनेच्या, कृतीच्या कक्षा विस्तारत जातात. निसर्ग तर प्रतिकूल परिस्थीतही फुलण्यास तयार असतो. येथील प्रत्येक गोष्ट मग ती दृष्य असो अदृष्य असो ती पंचमहाभूताशी म्हणजे पृथ्वी (जमीन),आप (पाणी अथवा जल), तेज (अग्नी), वायु, आकाश येथे सातत्याने सुक्ष्म बदल घडताहेत. प्रत्येक कण नव्याने घडतो, बिघडतो. यामागील या महाभूतांच्या अस्तित्वामुळेच तर जीव जगला आहे व जगणार आहे. हे निसर्गाचे नैसर्गिकरित्या अध्यात्म आपल्यात रूजलं तरच मानवी मनोविकास होणार आहे नाहीतर वैज्ञानिक दृष्ट्या प्रगतशील असू मन मनाने आपण अजूनही अप्रगत काळात आहोत असे समजून घेतले पाहिजे.

या सहस्त्रकाची धैये गाठणे हे फक्त सरकारचे काम नाही. ते प्रत्येक नागरिकाचे आहे. बस त्यासाठी रोज आपला थोडासा वेळ देणं गरजेचे आहे. इच्छा तेथे मार्ग असतो. आपल्या स्थानिक प्रयत्नांनी जगाला भेडसवणारे प्रश्न सुटत असतील तर नक्कीच त्यात  सहभाग घेतला पाहिजे. परदेशात जागतिक परसबाग दिन साजरा केला जातो. (World Kitchen Garden Day) प्रत्येक वर्षाच्या ऑगस्ट महिण्यातील चोथ्या रविवारी,  त्यांच्याकडे परसबाग फुलवणे हा राष्ट्रीय कार्यक्रम असतो. आपल्याकडे पोलीओ डोस हा जसा असतो तसा… प्रत्येक शाळेत, वाडी- वस्तीवर सोनखताव्दारे परसबाग फुलवली जाते. याचा अनुभव झिम्बॉब्वे या देशात प्रत्यक्ष राहून मला अभ्यासण्याची संधी मिळाली होती.  आपल्याकडेही प्रत्येक अंगणवाडी, शाळा येथील मोकळ्याजागेत परसबाग तयार कराव्यात असे फक्त म्हटलं आहे. नाशिक मधील आनंद निकेतन शाळा या विषयाकडे गांभीर्याने पाहत असून मुलांना शिकतं करण्याचा प्रयत्न करत आहे. ३६० अंशाच्या व्याप्तीव्दारे  सर्वस्पर्शी असलेली ही संकल्पना आपण लक्षात घेतली तर  आपण नाशिककर खूप मोठ्या बदलाचे भागीदार व साक्षीदार होऊ यात शंका नाही.

यासाठी गच्चीवरची बाग गेल्या दहा वर्षापासून Grow, Guide, Build, Products, Sale & Services व्दारे काम करत आहे. 

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

टीप ः सदर लेख सकाळ नाशिक व्दारे हिरवे स्वप्न या सदरात प्रकाशीत झालेल्या लेख मालिकेतील एक लेख आहे.

Lockdown inspiration Film Competition


Lockdown Inspiration Mobile Film स्पर्धेला मुदत वाढ… देण्यात आली आहे.. संपूर्ण लेख वाचा..

पाचशे लोकांनी या स्पर्थेत सहभाग घेतला आहे. आपण सहभाग घेतला का .. नसेल तर आजच घ्या.. खास लोकांच्या आग्रहास्तव मुदत वाढ…

filithon - CopyLockdown inspiration Home Composting & Vegetable Gardening Film Competition

वेळ नाही म्हणून बर्याच गोष्टी मनात असूनही साध्य करता येत नाही. पण Lockdown मुळे वेळ नाही असं म्हणायलाच तशी जागाही उरली नाही.  घरातील बरीच कामे आटोपली असतील त्यामुळे हाताशी काही ना काही वेळ असल्यामुळे. आता थोडं अवती भवती काही करता येईल का याचा विचार करत असालच.. तसाही आताशी Lockdown 32 वा दिवस आहे. अजून  Lockdown  मुळे आलेली बंदी उठायला बराच वेळ आहे. तो पर्यंत बरच काही करायचं आहे किंबहुना करता येईल..

तर चला मग… निसर्गाने आपल्याला दिलेला वेळ सत्कारणी लावूया. आपल्या पदरात तो देत असलेलं दान चित्रबध्द करू या..

तर करायचं एकच.. आपल्या घऱी कचरा व्यवस्थापन (कंपोस्टीगं) व भाजीपाला, फुलांची बाग फुलवता का.. जर यातील कोणतीही एक गोष्ट करत असाल तर लागा कामाला. ..आपल्या घरी कंपोस्टीग, गार्डेनिंग चे  विडीओ पाठवा… त्यात आपले अनुभव, प्रयत्न सांगा…  पहिल्या १५ निवडक माहितीपटांना “गच्चीवरची बाग नाशिक page”  प्रसिध्दी देण्यात येईल. तसेच जागतिक परसबाग दिनाच्या दिवशी प्रथम क्रमांकास व उत्तेजनार्थ रोख पारितोषिक देण्यात येईल.  (August 4th Sunday) येईल.

 • एकाच कुटुंबाला / व्यक्तिला कंपोस्टीगं व गार्डेनिंग या दोन्हीत एकदाच सहभाग घेता येईल.
 • कुटुंबाने / व्यक्तिने प्रवेशिका भरणे गरजेचे आहे.
 • कचरा व्यवस्थापनासाठी कंपोस्टर हा घरी व स्वतः बनवलेला असावा (कंपनी, संस्थेचा नसावा, एकादे साधन, वस्तू बाजारातून विकत आणलेली असली तरी त्यात वापरेलेले कंपोस्टींग तंत्रज्ञान हे स्वतः विकसीत केलेले असावे)
 • घरी फुलवलेली बाग ही भाजीपाला किंवा फुलांची असावी. (जमीन, बाल्कनी, टेरेस, विंडो ग्रील)
 • आपला व्हिडीओ / स्लाईड शो फिल्म 3 मिनिटांपेक्षा अधिक नसावा.
 • माहितीपटावर सुरवातीला व शेवटी “गच्चीवरची बाग, नाशिक आयोजीत” नामोल्लेख असावा.
 • अधिक माहिती साठी “गच्चीवरची बाग नाशिक page” join करा… व भविष्यातील अपडेटस मिळवा..
 • आपल्या माहितीपटात कंपोस्टींग व गार्डेनिंग बद्दल माहिती, प्रयत्न, संघर्ष, नाविण्यता असावी.
 • कंपोस्टींग व गार्डेनिंग बद्दल एकत्रित फिल्म असेल तरी चालेल.
 • नोंदणी ३० जूलै २०२० पर्यंत… व फिल्म जमा करणे १६ ऑगस्ट २०२० पर्यंत आवश्यक आहे. 
 • जगभरातील कोणीही व्यक्ति सहभागी होऊ शकतात.

सदर लेख अधिकाधिक शेअर करा.. निसर्गाचं उतराई होऊया…

Google Form भरून पाठवा..त्यासाठी येथे Click करा..

Lokcdown 0.2 वाचले का… 

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

Return Gift to nature – Lockdown


4fd_0लॉकडाऊनच्या काळात आपल्या हाती बराचसा वेळ असण्याची शक्यता आहे. या काळात काय करायचे हे ठरलेले असेलही व त्या बरहुकुम आपण आपला दिवसाचा उपयोग करत असू या बद्दल शंकाच नाही.

मला या लेखाव्दारे आपले लक्ष विशेष मुद्याकडे वेधण्याचा प्रयत्न करणार आहे. तो म्हणजे रोपवाटीका…

कारण पावसाळा जवळ येतो आहे. त्यामुळे वृक्ष लागवड ही दर वर्षाप्रमाणे करावी लागणार आहेत. वृक्षलागवडीचा कार्यक्रम माहे डिसेंबर जानेवारी पर्यंत चालतो. पण पावसाळा हा उत्तम असतो. तर लॉकडाऊनच्या काळात सरकारी व खाजगी सार्याच रोपवाटीका बंद असणार आहेत. त्यामुळे आपल्या प्रत्येकालाच आपल्या गार्डेनचा काही भाग झाडांच्या नवीन रोपांसाठी देणे गरजेचे आहे. आता त्यासाठी काय काय करणे व कोणत्या टप्प्यावर करणे गरजेचे आहे हे लक्षात घेवूया..

 

 • बियाणं किंवा रोपाची यादी
 • हुंडी कशी बनवावी
 • त्याचे संगोपन कसे करावे.
 • पाणी कसे द्यावे.
 • समन्वय

 

 • बियाणं किंवा रोपाची यादीः आवळा, आंबा, सिताफळ, बेहडा, उंबर, पिपंळ, वड, चिंच, बोर, विलायती चिंच, रूद्राक्ष, निंब, कडीपत्ता, अशोक, जांभूळ, बेल, पेरू, लिंबू , पपई , चंदन, बकुळ, पारिजातक. पांगरा, पळस, कंदब, सप्तपर्णी,सोनचाफा अशी अनेक झाडाची यादी करता येईल. काही बियांपासून रूजतात तर दूधाळ झाडे ही फांद्यापासून रूजतात. तसेच आपल्या परिसरात काही झाडे असल्यास त्यांच्या बियाणं गोळा करून त्यांचीही रोपवाटीका तयार करू शकतात.
 • बिज रोपनः आपल्या कडे फळे असल्यास त्याच्या बियाणं काढून, पाण्याने स्वच्छ धुवा, त्यास सावलीत वाळवा. त्यातील सशक्त, जड, आकाराने मोठ्या, भरीव बियांचा निवड करा. त्यांना दिवसभर पाण्यात भिजवा रात्री त्याचे प्लास्टिक पिशवीत (हुंडी) रोपन करा.
 • हुंडी कशी बनवावी. काळ्या रंगाची प्लास्टिक बॅग असल्यास उत्तम. उपलब्ध नसल्यास दुधाच्या पिशव्या पण चालतील हे ही नसेल तर पाणी पिण्याच्या बाटल्या, डब्बे, काहीही चालेल. यास तळाशी छिद्र पाडावेत. त्यात नारळाच्या शेड्या, पालापाचोळा थोडा टाकावा. त्यात माती, खत टाकून भरून घ्यावेत. त्यास थोडे आपटून घ्यावे. म्हणजे माती घट्ट बसेल.
 • त्याचे संगोपन कसे करावेः बिज किती मोठं आहे या नुसार त्यास त्याच्या आकाराच्या ३ पट खाली रूजवा. तर दुधाळ फांद्या असतील तर त्यास ती इंच खोल, फांदीला तिरपा छाट देवून रूजवाव्यात. मातीच्या वर ही ३ इंचच असावी. अधिक उंची असल्यास वाळतात. रोज पाणी द्या. उष्ण वारा लागत असल्यास आडोसा तयार करा. सावली तयार करा.
 • पाणी कसे द्यावेः गरजेनुसार दोन वेळेस पाणी देण्याची गरज असल्यास नक्कीच द्यावी. पाणी हे झारी पध्दतीने द्यावेत. म्हणजे हुंडीतील माती पाण्याच्या वेग व दाबाने बाहेर फेकली जाणार नाही. कारण बरेचदा बिजही माती बरोबर बाहेर फेकले जाण्याची शक्यता असते.

 

 • समन्वय आपण रोपवाटीका वाढवाता आहात. त्यात कशा कशाची झाडे आहेत. त्याची संख्या किती आहे. त्याची वाढ किती झाली आहे. याची माहीती आपल्या समाज माध्यमावरील गटात पोहचवा. किंवा आपल्या परिसरातील वृक्षप्रेमी असलेल्या व्यक्तिच्या किंवा गटाच्या संपर्कात रहा. म्हणजे आपण उगवलेली रोपे ही त्यांना उपयोगात येतील. तसेच शाळामधे संपर्क करू शकता.

 

तसेच येणार्या काळात जागा, हवामान उपलब्ध असतील पण रोपे उपलब्ध राहणार नाही असे होऊ नये म्हणून वरील झाडांव्यतिरिक्त ही बागेतील झुडुपांची रोपे तयार करू शकतात. व त्याची देवाण घेवाण करता येऊ शकते. कारण काही काळ तरी हे नर्सरीत उपलब्ध होणार नाहीत किंवा महाग होण्याची शक्यता असेल.  हे सारे काम निसर्गाने आपल्यासाठी सुदृढ आयुष्यासाठी दिलेल्या भेटीची छोटी परतफेड करावयाची आहे. असं हे निसर्ग धन त्याच त्याला परत करूया… कारण आपल्याकडे काहीना काही वेळ आहे.

 

आपल्याला लेख आवडल्यास नक्कीच शेअर करा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक

9850569644, 8087475242

 

gardening in lockdown Free E-book


लॉकडाऊनच्या काळात गार्डेनिंग कसे करावे. gardening in locdown book  Free E- Book साठी येथे Click करा.

OLBBZ50.jpgVegetable Garden bricks Set up

कोव्हीड-१९ च्या उद्रेकामुळे काही गोष्टी स्पष्ट झाल्यात त्यात आपल्या मानवी मर्यादा काय आहेत हेही लक्षात आलयं. मी स्वतः काय करायचं, कुटुंबाने काय करायचं, प्रशासन काय करणार, सरकार काय करणार.. अशा प्रत्येक पातळीवर आपल्याला ताकदी व कमतरता लक्षात आल्या आहेत. आणि पुढेही येत राहितील. विज्ञान, श्रध्दा, अंधश्रधा यांच्या परिसिमांची ओळख झाली. यातून भविष्यात काय करता येईल याचा सर्वांगीन विचार करणे गरजेचे आहे. बरं हे शेवटचं, आकाशातून एकदाच आलेलं संकट नाही. हे वारंवार येत राहणार, खरं तर ही सुरवात आहे जैविक युध्दाची म्हणा किंवा निसर्गाने माणसाविरूध्द पुकारलेला असहकार म्हणा. जगायचं असेल तर सर्वांगीन गोष्टीचा मुळातून विचार करावा लागणार आहे. आमुलाग्र बदल करावा लागणार आहे.

अर्थव्यवस्था, राहणीमान, रोजगार, दळणवळण, शिक्षण,खाणपान, कृषी यात आमुलाग्र बदल केला गेला तरच माणसाला जगता येणार आहे. कदाचित असं होणारही नाही. पण ही एक संधी आहे आपल्याला बदलण्याची, व्यवस्था बदलाची. प्रत्येक विषयातील तज्ञ त्यांची प्रत्येकाची मते, विचार, चिंता मांडतीलच. त्याचा ज्याच्या त्याच्या परिने उपयोग करणे हिताचे ठरेल.

या सर्वातील महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. तो अन्न निर्मीतीचा. असे संसर्गीत असणारे आजार केवळ घरात बसून दूर होणार नाही. त्यासाठी कोणत्याही बाहेरील वस्तूला स्पर्श टाळणे हे खरे गमक आहे. पण ते आपण किती पाळतो… शुन्य.. असो. असा प्रसंग पहिल्यादांच आपल्यावर आला आहे. चुकत माकत, धाडस करत शिकत आहोत. पण सुटका नाही हे लक्षात घ्या..

उद्या समजा विलगकीरण व्हायची वेळ आली तर आपण खान पानाच्या दृष्टीने स्वावलंबीत होणं खूप गरजेचं आहे. धान्याची एवढी रोज गरज लागत नाही. पण भाज्यांची गरज रोजच असते. त्यातून भाजी, ज्यूस, सूप तयार करता येतं. जे पोषणाला फायदेशीर ठरते. इतर दिवसांमधेही ती असतेच म्हणा.. इतर दिवसात आम्ही ओरडून सांगत होतो की रासायनिक भाज्या खाऊ नका… प्रतिकार शक्ती कमी होते. आजारांना आमंत्रण देणारं घर होते. पण आता सांगावे लागेल. संसंर्गजन्य भाज्या घेणे टाळा.

INTEX AQUA LIONS X1+_09022019_103643.jpgआम्ही या विषयावर गेल्या १५ वर्षापासून काम करत आहोत. सातत्याने त्यात प्रयोग, संशोधन करत आहोत. वेगवेगळ्या मांध्यमांचा वापर करत लोकांचे प्रबोधन करत आहोत. लोकांना निसर्गाजवळ नेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण अन्नच असं सेवन करायचं की तेच औषध असेन. प्रतिकार शक्तीच जर आदीम मानवासारखी असेन तर आयुष्यही वाढेलच पण आजारालाही दूर ठेवेन हे तर आपण मान्य केले पाहिजे. या आधि आपण काय काय प्रकारच अन्न, औषधे आपण सेवन केली आहेत. विरूध्द आहार सेवन झाला आहे. कोव्ही१९ सारखे विषाणू आपण पूर्वीच सेवन केलेल्या बाहेरील औषधाला, प्रक्रियायुक्त अन्नाला पुरक तर ठरली नाहीत ना… अशी शंका येते. असो..

आम्ही करत असलेल्या कामाचे या आजारामुळे बर्यांच अंशी महत्व अधोरेखीत झाले आहे. किंबहुना त्याची गरज वाढली आहे. Grow Guide, Products and Services या प्रत्येक विभागात आम्ही एकूण ५२ प्रकारचे उत्पादने आहेत. यातील सर्वात महत्वाचे म्हणजे भाजिपाल्याचा विटांचा सेटअप लावणे. इतर साधनातही भाजीपाला उगवता येतो पण त्या मानाने विटांचा वाफा हा खूप अर्थाने फायदेशीर व उपयुक्त ठरतो.

भाजीपाल्याचा सेटअप म्हणजे गच्चीवर प्लॅस्टीक अंथरूण, त्यावर तिन विटांचा रचला जातो. लांबी रूंदी सोयीनुसार असते. त्यात ८० टक्के जैविक कचरा व २० टक्के माती व खत वापरले जाते. हा सेट अप १ ते ३ वर्ष चालतो. आम्ही महाराष्ट्रात माहिती व पुस्तक विक्री, कार्यशाळा, सेमीनार या व्दारे दीड लाख लोकांपर्यंत पोहचलो आहोत. तर नाशिक मधे अशा प्रकारचे सेटअप ५०० घरांमधे लावले आहेत. तुम्हालाही असे सेटअप आपल्या घरी करायचे असल्यास नक्कीच संपर्क करा.

विटाचे वाफा किमान १०० चौरस फूट असावा. २५ फूट बाय ४ फूटसाठी खालील प्रमाणे कमाल खर्च प्रस्तावित असतो. कमी होऊ शकतो.

 • ४ इंच उंचीचा वाफा (वर्षभर चालणार, फळभाजी, पालेभाजी लागवड करता येणार)

खर्च 75 रू. प्रति चौरस फूट

 • ८ इंच उंचीचा वाफा (२ वर्ष चालणार, फळभाजी, पालेभाजी, वेलवर्गीय लागवड करता येणार) 150 रू. प्रति चौरस फूट
 • १२ इंच उंचीचा वाफा. (३ वर्ष चालणार, फळभाजी, पालेभाजी, वेलवर्गीय, कंदमुळे, व पपई, शेवगा लागवड करता येणार .) 175 रू. प्रति चौरस फूट..

या व्यतिरिक्त आम्ही कचरा व्यवस्थापनाच्या जागेची उपलब्धता, कचर्याचे प्रमाण, आपल्याकडील वेळ, संसाधने यानुसार विविध मॉडेल्स तयार केले आहेत. काहीमधे आपण कचरा व्यवस्थापन व भाज्या एकाच वेळेस उगवता येईल अशी सुविधा आहे.

टीपः नाशिक मधे आपल्याला अशा प्रकारची बाग तयार करावयाची असल्यास आजच ADVANCE BOOKING करून ठेवा.. कारण lOCKDOWN संपल्यानंतर आपल्याला सेवा देण्यास उशीर होऊ शकतो. त्यातच पावसाळा सुरू होणार आहे. बरेचदा पाऊस सुरू झाला की आम्हाला संपर्क केला जातो पण सेटअप तयार करण्याचे कामाचे तीन महिने आधिच BOOKING झालेले असते. सेवा सुविधा पुरवता येत नाही.

आमच्या संकेत स्थळांना भेट द्या. http://www.gacchivarchibaug.in

अधिक माहितीसाठी

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. 9850569644/ 8087475242

lesson from COVID 19


2corona_20_2012345_0कोव्हीड -१९ पासून काय शिकलात?

कोरोना व्हायरस जगभरात थैमान घातल्यानंतर योग्य काळजी मुळे, सोशल डिन्संटींग  व आयसोलेशन मुळे तो आटोक्यात आला आहेच. पण हा आजार आटोक्त्यायात येण्चीयाची  मूळ कारणे पण लक्षात घेतली पाहिजे.

याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत.

 • स्वच्छ व प्राणवायू युक्त हवा
 • प्रतिकार शक्ती (आहार)

कोव्हीड १९ चा प्रवास ( नोव्हेंबर १९-चीन ते आजतागत )  लक्षात घेतला तर अशा ठिकाणी जास्त वाढलेला दिसतो ज्याठिकाणी अधिक व दाट लोकवस्ती (वर्दळ) आहे. सोबत असा ठिकाणं किंवा शहरं आहेत ज्या ठिकाणी वाहनामुळे, उद्योगामुळे कार्बन उर्त्सजन व धुळीचे (बांधकाम) प्रमाण अधिक आहे.

आयसोलेशन व सोशल डिटन्स्टींग  ही  मानवी उपाय योजना असली तरी स्वच्छ व प्राणवायू युक्त हवा व प्रतिकार शक्ती (आहार) नैसर्गिक कारणामुळे तो आटोक्यात आला आहे.  खर तर हा अपघात असण्याची शक्यता असली तरी जैविक युध्दाचे चाचपणी (मॉकड्रील) म्हणण्यासही बराच वाव आहे. याचा अर्थ असा होतो कि भविष्यात असे अपघात होणारच नाही असेही म्हणता येणार नाही व युध्द असल्यास ते येथेच थांबले असेही म्हणता येणार नाही. त्यामुळे भविष्यात लॉकडाऊनला वारंवार व अनिश्चित काळासाठीही सामोरे जावे लागू शकते याची  विचार आजच करून ठेवला पाहिजे.. त्या दृष्टीने आजच काही दिर्घकालीन उपाय योजना केल्या पाहिजेत.

त्यातील आम्ही करत असलेल्या गच्चीवरची भाजीपाल्याची  बाग या चष्म्यातून पाहिल्यास काही गोष्टी स्पष्ट दिसतात. ज्या लेखाच्या वरील गोष्टीशी पुरक आहेत.

 • आपल्या घर परिसरात, बाल्कनीत, गच्चीवर भाजीपाल्याची बाग फुलवणे होय. यातून दोन गोष्टी साध्य होतात. एकतर ही प्राणवायू तयार करणारी Privet Oxygen Hub आहेत. ज्याचा आम्ही कोणत्याही वेळेस त्याचा उपयोग करू शकतो. दुसर असे की आपल्याला संसर्गमुक्त भाज्या व त्यासुध्दा रसायनमुक्त मिळू शकतात. आजच्या कठीण परिस्थीतीने हे स्पष्ट केले की आपल्या हाती पैसा असला तरी वेळेवर भाजीसुध्दा विकत घेता येत नाही. त्यामुळे घरी भाज्या पिकवणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
 • कोव्हीड-१९ या आजारापासून, वाचण्याचे प्रमाण अशाच लोकांमधे अधिक आहेत. ज्यांच्यामधे प्रतिकार शक्ती अधिक आहे. अर्थात वयोवृध्दांनासुध्दा योग्य आहार म्हणजे पोषक घटक असलेला, रसायनमुक्त आहार मिळाल्यास ते सुध्दा या विषाणूशी लढा देवू शकतात. आजच्या रासायनिक कृषी पध्दतीत आपल्याला कमी कालावधीत तयार झालेला पोषक घटकांचा अभाव असलेले अन्न सेवन करत आहोत. त्यामुळे त्यातून प्रतिकार शक्ती वाढत नाही. त्यामुळे आपण घरीच पिकवलेल्या भाज्या खाल्या तर नक्कीच त्याचा फायदा होईल.

तर भविष्यात आजच या विषयात तन, मन, धनाने गुंतवणूक करा.. त्यातून  ज्ञान , माहिती मिळवू शकता तसेच भाजीपाला बागेचा सेटअप इंन्स्टॉल करून शिकू शकता.

भाजीपाला सेटविषयीअधिक माहितीसाठी वाचा..

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक., 9850569644

Dirty Gloves – save life


 

लॉकडाऊनच्या काळात काय करायचे हा प्रश्न असेनच. आम्ही ही संगीत चित्रफित  बनवली आहे. आपल्याला ही फिल्म आवडली का. का आवडली व त्यातून तुम्हाला काय संदेश मिळाला. कृपया नक्की कळवा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

How to overcome Stress in Lock-down


unnamedHow to overcome Stress in Lock down

लाॅकडाऊनच्या काळात मानसिक संतूलन कसे साधाल?

लॉकडाऊन वाढलाय. हळू हळू दिवस जसे पुढे जावू लागलेय तसं तसं कंटाळा येणे, चिंडचिड होणे, राग येणे हे आता सुरू झालं आहे. छोटे गोष्टींत वाद होताहेत. यावर उपाय काय.. घरातल्या घऱात स्वतःला कशात तरी व्यस्त करणे हे पर्याय आपण शोधलेय. त्याचाही कंटाळा आला असेल. खर तर आरामच इतका झालाय की आता त्याचा विट आला आहे. बाहेरही जाणं जोखमीचं आहे. तर करायचं काय.. जे मला घरात बसूनच करता येईल. व त्याने मनावरील ताण कमी करता येईल.

आपल्या मनावरील ताण निसर्गच कमी करू शकणार आहे. काऱण आपण स्वतःला सिमेंटच्या खुराड्यात कोंडून घेतलयं. आणि आपली पाळमुळे आहेत ती निसर्गात, जंगलात. जल, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश यां पंच महाभूतीशी. तसेच त्याची अनुभूती स्पर्श, गंध, चव, ऐकणे, पहाणे या पंचेइंद्रीयांशी जोडलेले आहे. त्यामुळे या Lockdown च्या काळात आपल्याला पुन्हा निसर्गाशी जोडून घ्यावेच लागणार आहे.

कारण बागेत आपल्या पंचेद्रीयांना जागृत करून पंचमहाभूतांशी जोडता येते. त्यासाठी काही टिप्स सांगतो.

 • एकादे साधनं घ्या, त्यात थोडी माती भरा, स्वंयपाक घरातील कोणतेही बिज लावून पहा. त्याला रोज पाणी द्या. त्यांच्या अंकुरण्याचा, त्याच्या वाढीचा आनंद घ्या. हा आनंद म्हणजे सृजनाचा, नवनिर्मितीचा असतो. जो जगण्याला उभारी देतो.
 • घरी गच्चीत, बाल्कनीत, खिडकीत कुंड्या लावल्या असतील तर साफसफाई, पाणी देणे, काडीकचरा गोळा करणे. कंटीग्स करणे अशी त्यात काम करा. प्रसन्न वाटेल.
 • बागेत काहीच काम नसेल तर बागेशी गप्पा मारा. रोज ओळीने एकादे झाडं घेवून ते झाडं आपल्याला का आवडतयं. त्याला कुरवाळा, त्याचा स्पर्श अनुभवा. आपल्याला लगेच त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचा अनुभव येईल. एकदे पान तोडून (माहीत असलेल्या झाडांचीच) त्याची थोडीशी चव चाखून बघा. नाकाला गंध देवून बघा. उदाः तुळस, बेझील तसेच बागेत, कुंडीत माती उकरून त्या मातीचा गंध घेवून बघा. गंध हा सुध्दा मनावरील ताण कमी करण्यास मदत करत असतो.
 • बागेत नुसंत सकाळ, सांयकाळ खूर्ची टाकून बसा. चहा कॉफी घोटघोट घेतल्यास उत्तम. कुटुंबाशी गप्पा करा. पण शक्य झाल्यास एकटे, निवांत बसा. झाडांवर पडणारे उन, प्रकाश अनुभवा. कारण हा प्रकाश आपल्यतील अनंत कोटीच्या गुंतागुंतीच्या मेंदुला साध घालतो. त्याला आराम देण्याचं काम प्रकाश करत असतो. थोडक्यात प्रकाश हा मुड (भावना तयार करण्याचे काम करत असतो) बनवत असतो. उदाः एकाद्या उंच टोकावरून हिरव्यागार जंगलाकडे पाहतो. हिरव्याच रंगाच्या हजारो छटा असतात. पण त्या आपल्याला आनंद, विचारांच्या खोलीचा आनंद देतात. रंग एकच मग हजारो छटा कशा तयार होतात. त्याला कारण असतो. प्रकाश. काही पांनामधून सुर्यप्रकाश हा परावर्तीत होतो किवा आरपार जातो तेव्हा त्यातून असंख्य अशा विविध व बर्याच पध्दतीच्या छटा तयार होतात. त्या मनाला, मेंदुला आनंदाचे आरामाचे संदेश देतात. कृत्रीम प्रकाशात(रात्रीचा) याची मजा कमी असते. बागेतील झाडांवर पडलेला प्रकाश हा परावर्तीत, आरपार पध्दतीत कसा दिसतो याचे सुक्ष्म निरिक्षण करा.
 • बागेला पाणी द्या… नुसतं बागेला पाणी देतांना नळी झाड व कुंडीच्या आळ्यात धरू नका. झाडांवर तुषार सिंचन करा. काही आपल्याही अंगावर उडवून घ्या. बागेतील झाडांच्या पानावर असलेली धूळ तर निघून जाईल. पण आपल्या मनावर साचलेली थोडीशी मरगळ रूपी धूळ निघून जाईन.
 • आपल्या बागेत निवंडूग, संकुल्टंस इतर झाडे असल्यास त्याची वेगवेगळ्या नैसर्गिक प्रकाश झोतात. फोटो काढा, ते शेअर करा. संग्रहीत करून ठेवा. कंटाळा अधिकच वाढला तर मोबाईल व संगणकावर ते पुन्हा पहाता येतात.  

थोडक्यात आपल्यातील पंचेद्रीयांना  पंचमहाभूतांशी जोडायचे आहे. आणि त्यासाठी निसर्ग, बाग, झाडं हीच खरी मित्र आहेत.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. 9850569644

लॉकडाऊन में घर पर कैसे उगांए ताजी सब्जियां…


लॉकडाऊन में घर पर कैसे उगांए ताजी सब्जियां…

उमर साठ साल, नाशिक के एक नगर में रहने वाला बुर्जुग दामंत्प, उन्होंने लॉकडाऊन के सोलावे दिन की सुबह सुबह मोबाईल पर संपर्क कर के कहा… की हम आपके बहोत शुक्रगुजार है की आपने घर पर सब्जीया उंगाने का जो सेटअप लगाकर गये. उनसे हमें हर रोज ताजी सब्जियां मिल रही है। भले वो हमारे लिए एकाद सब्जी हप्ते में दुबारा मिलती है। लेकीन हम खुश है। बाहर मिलने वाली संसर्गजन्य भी हो सकती है।

ये सुनकर बहोत अच्छा लगा.. वैसे मेरे घर पर भी गर परही उगायी सब्जीया बनाई जा रही है। बाहर के पूर्तता पर निर्भय नही है।

वैसे तो लॉकडाऊन कितने दिन रहेगा, कहां कहां रहेगा इसका कुछ अंदाज नही है। शायद ये कालावधी बढ भी सकता है। उसका अनुशासन करना भी जरूरी है।  हात न धोने की गैर जिम्मेदारी से जान से हात धोना पडता है। असल में लॉकडाऊन का मतसलब है की बाहर कोई चिज से संपर्क में नही आना. लेकीन हम सब्जीया लेके समझकर भी अजांन बन लेते है।

तो ऐसे कठीण समय पर घर पर सब्जीया उगा सकते है। उसके बारे में बताने वालाही हूं लेकीन उसी के साथ दिए हुऐ www.gacchivarchibaug.in  www.organic-vegetable-terrace-garden.com संकेतस्थल पर जाकर जादा जानकारी ले सकते है।

हम तो पहेलेसे ही रसायनमुक्त सब्जीयो का पक्ष लेके चल रहे है। लेकीन समय इतना कठीण है की रासायनिक खाद, औषधियों से भरी सब्जी चल जाएगी.. लेगी कोरोना से संसंर्गमुक्त हो सकती है क्या… तो ईसका जबाब नही है। कुछ कह नही सकते. अगर ऐसा है तो हमे बेझिझक घर पर सब्जीयां उगानीही चाहिए. लेकीन करे कैसे ये बडा सवाल उत्पन्न हो गया है।

ईसकेलिए मिट्टी चाहिए, खाद चाहिए, घमले, ग्रो बॅग चाहिए, और तो और बिज तो चाहिए. बाप रे बाप… लिस्ट तो बढती जा रही है। इस कठीण समय पर हम बाहर निकल नही सकते. सारासर हे मुमकीन नही है ये भावना आ सकती है. लेकीन ईस निराशा को निकाल दिजिए.

आप के पास दूध की २५० एम. एल. की बॅग से लेकर लेडीज पर्स को लेकर जो भी उसका घमला  या ग्रो बॅग के रूप में ईस्तेमाल कर सकते है. ध्यान रहे चिंज कौनसी भी हो उसे निचे छेद होना जरूरी है। ईससे जादा दिया हुआ पानी निकलने में मद्दत होगी.

इसी साधनों में मंदीर में फोडे जाने वाले नारियल के क्यायर डाले. ये नही मिले तो एक एम.एम. की चौडाई वाले सुकी हुई डालियां डाले उसके उपर सुके पत्ते, या सुका हुआ किचन वेस्ट डाले. हात या पांव से दबांए और सबसे उपर दो ईंच मिट्टी डाले. अगर मिट्टी नही है तो आपके पुराने घमलोंमेंसे थोडी थोडी निकाल सकते है। इस तरह अगर घमला भरा जाएंगा तो आपके पास जिस आकार का घमला है। उसी मिट्टी में हम लगबग ४-५ घमले भर जाएगें.

घर मेंही कंपोस्ट बनाने की कौशीस करे.

महिने भर तय्यार होने वाली सब्जीयां

 • मेथी, धनियां, मोहरी
 • गेहुं को सुबह बिगाएं, श्याम को जमीन में बो दे और सात दिन के बात उसका ज्यूस बनाएं. सेहत के लिए अच्छा है. ऐसा रोज करे.
 • चना बो दे . चन आने का मोसम तो नही है लेकीन उसकी पत्तो की सब्जी बना सकते है।
 • प्याज, लहसून और बटाटे को बो दे … आपको प्याज से पत्ती की हर महिने सब्जी बना सकते है. वो तीन महिने चलेंगी.
 • पोथी या आरवी के पत्ते की आप स्वादिष्ट सब्जी बना सकते है।
 • और भी सब्जीयां मिट्टीसे पनप जाती है। उसकी जानकारी ले. वो शायद जंगल में उगने वाली लेकीन खाने जैसी सब्जीयां हो सकती हे।
 • अगर आपके बागवानी में सब्जीयां ज्यादा हो रही हो या आपके पास ईस कठीन समय में घर पर आने वाली मुक्त सब्जीया काटकर धुप में सुका ले तो उसे निर्जलीकरण Drying (dehydrating) कर ले. ताकी वो बारिश में काम आएगी.
 • पालक, गाजर, मुली, बिट का जड लगाकर उसके पत्ते के पराठे बना सकते है।
 • बाजार में मिलनेवाले पके, गले हुए बैंगन, टमाटर, मिरची जैसी जो बी सब्जीयां है उसका बिज निकाल के छांव में सुका ले..उसके महिनेभर में पौधे बना ले…

आपका लॉकडाऊन में खाने की समस्या को कुछ सिमा तक आसान कर सकते है।

कुछ सवाल हो तो जरूर पुछे.

संदीप चव्हाण, सज्जा पर सब्जी. नाशिक.

9850569644

How to make Home fertilizer in lockdown


प्रथम तुमचे अभिनंदन, कोरोनाच्या संसंर्गापासू वाचण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात आपण घऱीच भाज्या उगवण्याचा प्रयत्न करत आहात. आपण सुरावत केली नसेल तर कालच्या लेखातून आपणास कळवले आहेच की सुरवात कशी करावी. तर आजच्या लेखात जे पूर्वीपासून बाग तयार केली आहे पण आता खतांची गरज आहे. अशा दोघांसाठी हा लेख गरजेचा आहे. आपण रासायनिक खताऐवजी नैसर्गिक खत वापरावयास प्राधान्य देत असतो. पण त्याची उपलब्धता सध्या होऊ शकत नाही. खत नाहीत म्हणून हातावर हात ठेवून बसू नका… आपल्या हाती अनेक पर्याय आहेत जे सहज घरच्या घरी सहज तयार करता येतात.

आपल्याकडे खत म्हणून वापरता येईल असे बरीच साधने उपलब्ध आहेत.

 • हिरवा कचरा (Pre cooked) सुरीने बारिक करून त्यास वाळवून घ्या… कुंडीतील, वाफ्यातील फळभाज्यांच्या, फुलांच्या झाडाभोवती त्याचे अच्छादन करा. पाण्याचे बाष्फीभवन कमी होईल. तसेच त्याचे झिरपून द्रव्य स्वरूपातले खत होमोपॅथीक स्वरूपात मिळत राहिल.
 • हिरवा कचरा बारिक तुकडे करून (वाळलेला किंवा ओला) प्रसादासारखा प्रत्येक कुंडीच्या मातीखाली दाबा. त्याने खत तयार होण्याची प्रक्रिया सुरू होईल.
 • खरकटे अन्न असल्यास त्यास सात दिवस आंबवा. त्यात पाच पट पाणी टाकून प्रत्येक झाडांना खोडापासून दूर म्हणजेच कुंडीच्या बाहेरील कडेस द्यावे.
 • घरातील हिरवा कचरा मिक्सर मधे बारिक करून त्यात दुप्पट पाणी टाकून ते झाडांना द्यावे.
 • ताक, नासलेले दूध, तांदुळाचे पाणी, गुळांचे पाणी सुध्दा आपण खत म्हणून वापरू शकता.
 • घरातला कचरा एका हवा बंद पिशवीत, डब्बा, पाण्याच्या बाटलीत पाणी न टाकता पॅक करा. ति सावलीत ठेवा. महिनाभरात त्याचे अनएरोबिक पधद्तीने खत तयार होईल. लक्षात ठेवा. पिशवीला, डब्याला, बाटलीला छोटे सुध्दा छिद्र नको. हवा, प्रकाश जायला नको.
 • कुंडीतील झाडांचा पिवळा झालेला पालापाचोळा, फुले त्याच कुंडीत कैचीने बारिक करून मातीत दाबा. उदाः गुलाबाचा पाला, वाळलेली फुले गुलाबाच्याच कुंडीत टाका. खताचा एक स्त्रोत तयार होईल.
 • मल्टीलेअर लागवड करा. उदाः गुलाबाच्या कुंडीत कांदा लावा, मोगर्यात मिरची लागवड करा. जास्वंदीच्या कुंडीत पालक लावा. एकमेंकांना ते मातीत व मातीच्या वर सहकार्य करतात.
 • अग्नी होत्राची राख, अगरबत्तीची राख खत म्हणून वापरता येईल. त्याचा प्रत्येक कुंडीत चमचा भर वापर करावा.
 • द्राव्य खत व विद्राव्य खत ही सात –सात दिवसाच्या अंतराने द्यावीत. हे एकाच वेळेस देवू नये. त्याचा आराखडा तयार करून त्याच्या नोंदी ठेवाव्यात .
 • https://youtu.be/i6xs1WSNF1w

टीपः १) काही महाशय (फेसबूक व व्हॉट्सअप वरील एडमीन) लेख आवडला तर स्वतःच्या नावाने कट पेस्ट करून पुढे पाठवतात. तर कधी लेखा खालील नावं, व संकेतस्थळ गायब करतात. कृपया लेख आहे तसा पाठवा. आम्ही आमच्या संकेतस्थळाव्दारे महत्वाची माहिती लोकांना देण्याचा प्रयत्न करत असतो. जी त्यांना पुढील आयुष्यभरासाठी उपयोगी ठरणार आहे.

२) सध्या सकाळ या वृत्तपत्रात हिरवे स्वप्न नावाने लेख माला प्रकाशीत होत आहे. ( दर मंगळवारी) आवश्यक वाचा. व कळवा…

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग. नाशिक.

How to Grow vegetable at home in lockdown


 1 (43)लॉकडाऊन काळात घरीच भाज्या कशी उगवाव्यात...

वय वर्ष साठी पार केलेले अश्विन नगर, पाथर्डी फाटा, नाशिक येथील जोडेपे.  कुलकर्णी आजीनीं आज सकाळी सकाळी फोन केला. विचारपूस केली. काय कसे चाललें. खरं तर  फोनला रेंज नव्हती तरी त्यांच तुटकं मुटक ऐकू येणांर्या शब्दांना हो हो करत होतो. त्यांनी आवर्जून सांगीतले की खर तर आम्ही तुम्हाला थॅंक्सं गिव्हींगसाठी फोन केला. म्हटलं. कशासाठी… तुम्ही भाज्यांचा सेटअप लावून गेलात. लॉकडाऊन झाल्यापासून आम्ही रोज घरचीच भाजी खात आहोत. भले आठवड्याला एकादी भाजी पुन्हा करावी लागते. पण बाहेरंचच भितीदायक वातावरण पाहता.. रोज घरची भाजी येणं हे खूप महत्वाचं झालयं.

हे ऐकूण खूप बरं वाटलं. माझ्याही घरी रोज भाज्या उगताहेत. काहीना काही हाती भाजी येत असते. अगदीच भाजीवाचून अडून राहिलयं. असं कधी झालं नाही. लॉकडाऊन अजून किती वाढेल याची खात्री नाही. हा आजार दिसतो तेव्हढा सोप्पा नाही… आता तरी घरीच भाज्या उगवायचं मनावर घ्या… रासायनिक भाज्या खाऊ नका म्हणून सांगत होतो आता संसर्गीत भाज्या खाऊ नका… हेही सांगावे लागेल. आम्ही ज्यांच्याकडे भाज्यांचे सेटअप लावून दिले किंवा आमचे या विषयावरील माहितीपुस्तक वाचून सराव करत आहेत. व रोज भाज्या मिळवत आहेत.

तर अशा कठीण प्रसंगी कमी साधनात भाज्या कशा उगवायच्या हे सांगत आहेच… पण अधिक माहितीसाठी www.gacchivarchibaug.in  www.organic-vegetable-terrace-garden.com  चा अभ्यास करा…

लॉकडाऊनच्या काळात बाजारात रासायनिक भाज्या असल्यातरी चालतील. पण  त्या संसर्गीत असतील तर घरात स्वतःला कोंडूंन घेण्यात काय अर्थ… त्यामुळे घरीच भाज्या उगवणे हा एक पर्याय आहे.. पण अशा कठीण स्थितीत काय करायचं.

आता माती नाही, खत नाही, बिया पण नाहीत. करायचं कसं. हातावर हात ठेवून बसू नका. जे काही साधनं उपलब्ध आहेत (लेडीज पर्स पासून दूधाच्या पिशव्यापर्यंत..) अशी साधने ज्यात काही सामावू शकेन.. तर अशा साधनात वाळवललें तळाशी नारळाच्या शेंड्या त्यावर किचनवेस्ट/ पालापाचोळा दाबून भरा, थोडी माती टाका… झाली कुंडी तयार… एकादी कुंडीत झाडं नसेन तर तिच माती वापरा.. वरील पध्दतीने कुंडी भरल्यास एका कुंडीतील मातीत ४-५ कुंड्या तयार होऊ शकेन…  घरीच कंपोस्टींग करा… कंपोस्टींग एंजन्ट शिवाय काहीही अडून राहत नाही. त्यांच विज्ञान शिका.. घरीच खत तयार करता येईल. हा वेळ अधिकाधिक  निसर्गासाठी द्या. बागेत सराव करा. घाम गाळा, बाहेरून कुठूनही पैसा येणार नाही. फक्त शेती, किचन गार्डन, टेरेस गार्डन,विंडो गार्डन साठी वेळ द्या.. त्याची माहिती मिळवा, अभ्यास करा. अंमलात आणा.. किमान भाजी तरी उगवता आली पाहिजे…

महिनाभरात भाज्या येतील अशा घरच्या बियाणांचा वापर करा…

 • मेथी, धने , मोहरी पेरा…
 • गहू पेरा… शरीराला पोषक रसाची गरज आहे… संसर्गीत भाज्या फळांपेक्षा घरीच उगवलेल्या तृण रसाचे ज्यूस प्या.. तंदुरूस्त राहाल.
 • हरबरे पेरा… आता या दिवसात हरबरे पिक येणार नाही पण पाल्यांची भाजी नक्की होईल.
 • पालकः थोडेफार पालकांचे बिज असेल तर पेरा. किंवा बाजारातून पालक जूडी मिळाल्यास पाने काढून त्याची खोडासहित लागवड करा. महिणाभरात पालक तयार होईल.
 • कांदा, लसून लागवड करा… महिनाभरात कांद्यांची पात मिळेल.
 • पुई शाक, भजीचं पान.. याचे एक बियाणं लावलं तरी महिनाभरात त्याचा वेल तयार होतो. त्याची आठवड्याला एक भाजी तयार होईल. याने एच. बी. वाढतो. यास बंगाल मधे पुईशाक, महाराष्ट्रात मायाळू असेही म्हणतात.
 • अळूची पाने… दोन प्रकारची अळू असतात. त्यांची वाढ ही या दिवसात छान होते. त्यांच्या वाढीवर व संख्यावाढीवर लक्ष द्या.. वड्या करून ठेवल्या तरी त्या बराच काळ टिकतात.
 • तांदुळका, माठला, लाल माठ ही सहज येणारी वनस्पती आहे. थोडं बियाणं मिळालं, किंवा एकादे रोपे मिळाले तर ते वाढवा. वाढत्या तपमानात ही भाजी छान बहरते.
 • गाजर, मुळा, बिट याचें खोड पुन्हा मातीत लावा. त्याच्या पानांपासून पराठे तयार करता येतात.
 • रान भाज्या कोणत्या आहेत. याचा अभ्यास करा… आपल्या बागेत येणारें तन ही रानभाजी असू शकते. ते नक्की आहे का याची खात्री करा.. त्याचा आहारात समावेश करा..
 • काही लोकांकडे घरच्या भाज्या जास्तीच्या येत असल्यास त्याचे निर्जलीकरण Drying (dehydrating) करून ठेवा. पावसाळ्यात त्याच कामास येतील.
 • बाहेरूण येणार्या भाज्यांचे निर्जलीकरण करून ठेवा… त्याचा उपयोग पावसाळ्यात होणार आहे. या वर्षीसुध्दा सलग पाऊस राहणार आहे.
 • पुढील तीन महिन्यात भाज्या येतील याचे नियोजन करा..मिरची, टोमॅटो, वांगी, बटाटे, वेलवर्गीय ( वाल, भोपळा, गिलके, दोडके, तोंडलीचा वेल ) यांची लागवड करा.. बियाणं पेरा…

काही अडचण असल्यास 9850569644 वर व्हॉट्सअप करा…

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

टीपः १) काही महाशय (फेसबूक व व्हॉट्सअप वरील एडमीन)  लेख आवडला तर स्वतःच्या नावाने कट पेस्ट करून पुढे पाठवतात. तर  कधी लेखा खालील नावं, व संकेतस्थळ गायब करतात.  कृपया लेख आहे तसा पाठवा. आम्ही आमच्या संकेतस्थळाव्दारे महत्वाची माहिती लोकांना देण्याचा प्रयत्न करत असतो. जी त्यांना पुढील आयुष्यभरासाठी उपयोगी ठरणार आहे.

२) सध्या सकाळ या वृत्तपत्रात हिरवे स्वप्न नावाने लेख माला प्रकाशीत होत आहे. ( दर मंगळवारी) आवश्यक वाचा. व कळवा…