स्वच्छ सर्व्हेक्षण व आम्ही नाशिककर


माझं नाशिक स्वच्छ सर्व्हेक्षणात पहिल्या पाच मधेही येत नाही. मागील अनेक वर्षापासून आपण सारेच या एकाच वर्गात आहोत. पुढे जाणे सोडाच एका जागेवर स्थिरपण नाहीत. अर्थात यात फक्त स्थानिक प्रशासनच नाहीत तर नागरिकही जबाबदार आहेत. आणि हे संघटीत नाशिककर, कुटुंब म्हणून अपमानजनक आहेत. अर्थात हा अपमान किती मनावर घ्यायचा. घ्यायचा की नाही मुळातच हा नाशिककरांचा अपमान होण्यासारखा हा मुद्दा आहे का हा खरा प्रश्न आहे. असो. ज्याची त्याची दृष्टी वेगळी.  

पण पहिल्या पाच मधेही अजूनही आपण येत नाही याचा खेद वाटतोय. याची कारण काय काय असावीत या विषयी गेल्या पाच वर्षापासून यावर चिंतन करण्याची संधी मिळत गेली ति या लेखातून मांडत आहे.

कोरोना पूर्व व कोरोना नंतर असे या दोन प्रकारात आपल्या प्रत्येकाच्या जगाची विभागणी झाली. कोरोनानंतर सामान्य माणसे पोटासाठी धावत आहेत. मध्यमवर्गीय आपआपल्या काम धंद्यात बुडाले आहेत. सारे काही स्थिर स्थावर होत नाही तो पर्यंत तरी या अपमान मनाला लावून घेता येणार नाही. कारण सर सलामत तर पगडी पचास. पण प्रशासनाचे काय? ( ते पण कोरोना महामारी मधे व्यस्त होती खरी)  या दोन वर्षात बराच वेळ हाताशी होता. म्हणतात की कागदावरचं नियोजन केले की ते प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याआधीच पन्नास टक्के यशस्वी झालेले असते. अर्थात हे नियोजन म्हणजे फक्त टास्क झाली की टिकमार्क केल्यासारखे नसते. त्यातील प्रत्येक टास्क मधे एक समन्वय, त्याचा एकमेंकाशी असलेला संबध, त्याचे परस्परांवलंबन लक्षात येते व डोक्यात असलेली ढिगभर कामे छोटी व साध्य करता येण्यासारखी वाटू लागतात. ति त्या त्या वेळेत पूर्ण होतील याचा आत्मविश्वास तयार होतो नि दिवसाखेर ति पूर्ण झाल्याचा आनंद व समाधान मिळते.

या आनंद व समाधानात आजचे प्रशासन कमी पडतेय. ते भरपूर करताहेत पण दिवसाखेर आनंद व समाधानाचा अभाव आहे. एन्ड रिझल्ट दिसत नाही. त्यामुळे उत्साह वाटत नाही.  ढिगभर कामे साचतात. नियोजनाचा अभाव असल्यास त्याचा पसारा जाणवतो. व ते कधी कधी एकएकटे पूर्ण करावे लागते. व त्यात वर्षभर अभ्यास करूनही निकालाच्या नंतर कळते की आपण नापास आहोत. हीच गंमत स्वच्छ सर्व्हेक्षणात दरवर्षी होतोय. आपण जो पर्यंत प्रश्नांचा आऊट ऑफ बॉक्स विचार करत नाही तो पर्यंत यश हातात येणार नाही ही काळ्या दगडावरची रेष.

तर आपल्याला काय करावे लागेल. दोन पातळीवर, आघाडीवर हे काम करता येईल.

स्वच्छ सर्व्हेक्षात प्रशासनाचा पुढाकार व नागरिकांचा सहभाग घेणे गरजेचे आहे. केद्राने मुद्दे दिलेत तेवेढेच साध्य करून चालणार नाहीत किंवा ते तेवढ्यापुरतेच साध्य करूनही चालणार नाही . त्यात सातत्यता, निरतंरता कशी राहिल याचा विचार स्थानिक प्रशासनाने व पदाधिकार्यंनी केला पाहिजे.

विचार उत्तम होता. पण हाच विचार आपण इतर ठिकाणीही किंवा इतर बाबतीतही का करत नाही हा मुद्दा आहे. उदाः मनपाचे स्वच्छता कर्मचारी जोगोजागी कचरा गोळा करतात व पेटवून देतात. रोजचीच दिवाळी. दिवाळीतील प्रदुर्षणापेक्षा रोज जळणारा कचरा अधिक वातावरण दुषित करतो पण हे कोणी कुणाला सांगयाचं?. हे आरोग्य अधिकार्यांना दिसत नाही का.. दिसते ना.. पण कचरा उचलायलाच परवडत नाही. मुद्दा बरोबर आहे..  पण त्याला पर्याय नाही का…

स्वच्छता व पर्यावरण ही हातात हात घालून फिरणारं प्रेमी युगल आहे. स्वच्छ स्रर्व्हेक्षणात आपल्याला स्थान मिळावे म्हणून दिवाळीत फटाके फोडण्यास बंदी करण्यात येणार होती. पण नाही करता आली. करताही येणार नाही. ते सामान्यांच्या आंनदा सोबत आर्थिक चक्राशी जोडलेले गणित आहे. विचार उत्तम होता. पण हाच विचार आपण इतर ठिकाणीही किंवा इतर बाबतीतही का करत नाही हा मुद्दा आहे. उदाः मनपाचे स्वच्छता कर्मचारी जोगोजागी कचरा गोळा करतात व पेटवून देतात. रोजचीच दिवाळी. दिवाळीतील प्रदुर्षणापेक्षा रोज जळणारा कचरा अधिक वातावरण दुषित करतो पण हे कोण सांगणार. हे आरोग्य अधिकार्यांना दिसत नाही का.. दिसते ना.. पण कचरा उचलायला परवडत नाही. मुद्दा बरोबर आहे..  पण त्याला पर्याय नाही का… हे म्हणजे भूक लागली म्हणून दरोडा टाकण्यासारखे आहे. असो..

स्थानिक आरोग्य अधिकार्यांना मी गेल्या काही वर्षापासून पहातोय. ते फार व्यस्त असतात. कुठेही कचरा नको याची ते जिवापाड दक्षता घेतात. पण नागंरिकांनी कचरा करायचा व तो आवरला की नाही ते या अधिकार्यांनी कटाक्षाने पहावे. प्रश्न जैसा आहे तसाच आहेत. तिळमात्र फऱक पडललेला नाही. नागरिकांना जबाबदेही बनवले पाहिजे. नागरिकांनी घरातला, परिसरातला कचरा स्थानिक पातळवरचा कचरा अॅट सोर्स तो व्यवस्थापन झाला पाहिजे यासाठी प्रयत्नांची वारंवारिता वाढवली पाहिजे. त्यासाठी काय करता येईल याकडेही लक्ष दिले पाहिजे. उत्पानाचे मार्ग अनेक शोधले ते कार्यरत राहून चालत नाही. त्याचे मल्टीफिकेशन जसे गरजेचे आहे. तसेच स्व्छता ही मल्टीफिकेशन तंत्राने कशी दृतगतीने वाढत जाईल याचाही विचार करा.

नाशिकमधेच होम कंपोस्टींग वर काम करणार्या अनेक सामाजिक संस्था व व्यक्ति सोशली व प्रोफेशनली काम करत आहेत. त्यातील नफा तोटा, कमाई, मलई याचा विचार न करता त्यांची मोट बांधावी. या मंडळीना लोकांसमोर आणा. नागरिक कंपोस्टींग करण्यासाठी तयार आहेत. पण त्यांना येणार्या अडचणी, पडलेले प्रश्न याची उत्तरे देण्यासाठी प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून कुणी आहे का..सध्यातरी कुणीच नाही. तर अशा क्षेत्रात काम करणार्या मंडळीना स्वच्छतेचे दूत, संवादक, मदतनीस म्हणून त्यांच्या त्यांच्या परवानगीने त्याची नावे प्रशासनाच्या संकेतस्थळावर जाहिर करावेत. म्हणजे लोक त्यांची मदत सहजतेने घेवू शकतील. आता तर कुजणार्या कचर्याचे कंपोस्टींग करण्याची गरज नाही. तो वाळवून घेतला तर त्यात बागाही फुलवता येतात. यात पुणेकर पुढे आहेत. पुणे करांचे खरचं या बाबतीत पाय धूवून पिले पाहिजे. एवढे ते दक्ष व जागृत आहे. त्यात नागरिक व प्रशासन सुध्दा पण आपण नाशिकरमात्र कमी पडतोय. पण हे असे घरोघरी झाले तर घंटागाड्याच्या फेर्या कमी होतील. वजनाला कमी कचरा भरला तर कमाई व पर्यायाने मलई कमी होईल.  खाते मंडळीचा मेवा कमी होईल निवडणूकीचा फंड कसा गोळा करायचा याची बिच्च्यारांना चिंता सतावत असते. त्यात हे असे झाले तर आणखीनच पंचाईत. शिवाय कोरोना काळात ही खाते मंडळी जास्त भरडली गेली. देव त्यांच लवकर भले करो.  प्रशासनातील अधिकारी हे प्रामाणिक प्रयत्न करत असतात. पण ही खाते मंडळी त्यांनी जमू देतील तर शप्पथ. या दबावातून स्थानिक अधिकार्यांनी बाहेर पडले पाहिजे. त्याना जे वाटतं. तेच करायची एक वर्ष संधी द्या. नाशिक खरचं स्व्च्छ व सुंदर होईल. पहिल्या पाच काय देशात एक नंबर होईल.

तर स्व्छतेत व पर्यावरणात काम करणार्यांना मंडळीची एक मोट बांधा, ऑनलाईलस ऑफलाईन चर्चा सत्र घडवून आणा. अनेक माध्यमं आहेत. लोक फोन धरून स्क्रीन समोर बसलेलीच असतात. तेथे का नाही प्रशासन पोहचत. मल्टी टास्ककिंग संवेदनशिल महिला अधिकारी निवडा. आपण स्व्च्छतेत काय करू शकतो. याची माहिती विविध समाज माध्यमांवर देत रहावी. फक्त एकाच पर्यायावर थांबून चालणार नाही. अनेक आघाडीवर एकाच वेळेस अनेक हातांनी भिडावे लागेल.

त्यासाठी स्व्छता फेस्टीव्हल घडवून आणा. केवळ फ्लाॅवर फेस्टीव्हल घेवून स्व्छता होणार नाही त्यात स्व्छतेत काम करणार्या मंडळीना व्यासपिठ द्या, त्यांचा सत्कार करून आणा.. जेथे कुत्र चावतयं तेथेच उपचार करा आणि कुत्र्याचा बंदोबस्त करा. स्थानिक वॉर्ड, प्रभाग पातळीवर जागृती घडवून आणली पाहिजे. उदयोन्मुख, नवोउत्सुक नगसेवकांना हाती घेवून प्रचार प्रसार घडवून आणला पाहिजे. स्वच्छतेचा बार उडाल्या शिवाय स्व्छ सर्व्हेक्षणाचा रस्ता लख्ख दिसणार नाही.

कचर्याचे खत तयार करा असे सांगण्याचेही दिवस गेलेत. ते खंडीने कवडी मोलाच्या भावाने मिळतेय पण कचरा व्यवस्थापनेतून ऑरगॅनिक भाज्या उगवता येतात हे सिध्द केलेय. व त्यासाठी लोकसहभाग वाढवता येईल. तसेच अशा घरोघरी फुललेल्या बागा ऑक्सीजन तयार करतील. अशा बागा फुलवणार्यांना, होम कंपोस्टींग करणार्या व्यक्ती, संस्था, आस्थापनांना घरपट्टीत सवलत द्या. सरकारी इमारती, शाळा, कॉलेजेस यांच्या छत, जमीनीवरील जागा रिकाम्या आहेत. मनुष्यबळीही उपलब्ध आहे. त्यांना थोडी जबाबदारी दिली तर नाशिक हातोहाती स्वच्छ व सुंदर होईल. स्वच्छ सर्व्हेक्षणात काय काय मुदे परिक्षेचे वा परिक्षणाचे असतात यास जाहीर करा. ते लोकांपर्यंत पोहचवा.

औद्योगिक क्षेत्रातील रिकाम्या जागा, सरकारी जमिनी गार्डेनिंगसाठी, वृक्षारोपनासाठी खुल्या करा. रिकाम्या प्लॉटवर स्वच्छता नसेल तर जबरा कर बसवा. जेणे करून काही बेरोजगारांना काम मिळेल. वरील सारे मुद्देची माहिती गोळा करता येईल असे लोकसंवादाचे एॅप तयार करा. त्यावर रिवाॅर्डस द्या. या रिवर्र्ड्स मधून घरपट्टीत, पाणी पट्टीत सवलत द्या. विषयात काम करणार्या मंडळीनाच स्वच्छता दूत- एबेंसेडर निवडा. त्या त्या क्षेत्रातीलच लोक त्या त्या क्षेत्रासाठी योग्य वाटतात व नेमका संदेश लोकांपर्यत पोहचतो. याची काळजी घ्या.

सध्या टॉप टू बॉटम विचारांचे कृतीचे अभिसरण होतेय. ते बॉटम टू टॉप झाले पाहिजे म्हणजे खर्या अर्थाने लोकसहभाग वाढेल. नाहीतर ये रे माझ्या मागल्या, शिळ्या भाकरी चांगल्या यावरच समाधान मानावे लागेल. स्वच्छ सर्व्हेक्षणात आपण कुणाच्याच खिजगणीत नाही आहोत हे लक्षात घ्या. अधिकार्यांनी प्रयत्न करूनही यश मिळेत नसेल तर ते त्यांच्यासाठी अपमानजनक ठरते. त्यांच्या कारकिर्दिला उजाळा मिळत नाही. अर्थात हे काम एकट्या दुकट्याचे वा एकाच मार्गाने करता येणारे नाही. ते संघटीत व एकीचे काम आहे. चला तर हातात हात घेवू.. काय करता येईल याचा कृती आराखडा तयार करू. तो पर्यंत पुढील स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी सदिच्छा..

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

सफाई ? | सफाई का मतलब | सब चिंजो का फायेदमंद ईस्तेमाल | पूरानी चिंजे ना फेके ऊसे घमले बनांए


Swatch Bharat Abhiyan | स्वच्छ भारत अभियान |

खर तर या कामाची सुरवात सत्यमेव जयते या अमिरखान यांनी सादर केलेल्या कामातून सुरवात झाली आहे. या सार्या कामांची आमची एक घोषणा आहे. जी नेहमी आमच्या जागृती रथावर (टेम्पो) असते… “स्वच्छमेव जयते…. “


स्वच्छ भारत अभियानात आमचे योगदान…

गच्चीवरची बाग, नाशिक या पर्यावरणपुरक कामालानऊ वर्ष पूर्ण होत आहेत. मार्च २०२१ रोजी पूर्णवेळ कामाला सुरवात करून दहाव्या वर्षात पदार्पण करत आहोत. भाजीपाल्याची बाग छंद म्हणून सुरवात केली होती. पण नंतर त्या छंदास  पर्यावरण संवदेनशिलता, शेती, निसर्ग संवर्धन, कचरा व्यवस्थापन याची जोड मिळत आता गच्चीवरची बागेने सामाजिक उद्मशिलेतेचा आकार घेतला आहे. यात आम्ही Grow, Guide, Build, Products sale & Services पाच सुत्राव्दारे व्यवसायात बळ भरत आहोत. खरं तर या कामात अनेक बागप्रेमीचे, पर्यावरणासाठी काम करणारी मंडळीचा म्हणजे किचन वेस्ट (कचरा व्यवस्थापन) व घरी, दारी, गच्चीवर, अंगणात फुलांची वा भाज्यांची बाग फुलवणार्या मंडळीचा फार मोठा वाटा आहे. तसेच हे काम बाल्यावस्थेत असतांना हे काम लोकांपर्यंत पोहचवण्यासी विविध माध्यमांनी तोलामोलाची मदत केली आहे. आजही करत आहेत. लोकसत्ता, सकाळ मधे वर्षभर लिखाण झाले आहे.

खर तर या कामाची सुरवात सत्यमेव जयते या अमिरखान यांनी सादर केलेल्या कामातून सुरवात झाली आहे. या सार्या कामांची आमची एक घोषणा आहे. जी नेहमी आमच्या जागृती रथावर (टेम्पो) असते… “स्वच्छमेव जयते…. “

गच्चीवरची बाग नाशिक या उद्मशिलतेचा आत्मा हा गारबेज टू गार्डन असा आहे. कचरा व्यवस्थापनातून बाग फुलवावी हा आमचा मोटो आहे. गच्चीवरची बाग फुलवणे म्हणजे रसायन मुक्त भाज्या पिकवणे यासाठी तर आहेच पण त्यासोबत लोकांनी घरातील, अंगणातील, कचरा व्यवस्थापन करावे या बद्दल कौशल्य शिकवत आहोत. आमचे काम हे स्वच्छ भारत अभियानाचे महत्वाचे अंग आहे जे आम्ही पुढे नेत आहोत असे आवर्जून सांगावेसे वाटते.

स्वच्छ भारत अभियानाचे काम आम्ही पुढील पाच सुत्राव्दारे कसे पुढे नेत आहोत हे सांगण्याचा हा प्रयत्न…

 Grow: या अंतर्गत आम्ही गच्चीवर बाग फुलवतांना विटांचे वाफे तयार केले जातात. त्यासाठी आम्ही ९० टक्के पालापाचोळा, नारळाच्या शेंड्या, वाळलेल्या फांद्या वापरल्या जातात. हे अगदी २०१३ पासून आम्ही करत आहोत. हे वापरले तर भाज्या भरपूर प्रमाणात व चिवष्ट लागतात. कुंड्या भरण्यासाठी हीच पध्दत वापरली जाते. माती कमी वापरल्यामुळे जंगल परिसरातून, शेतातून येणारी लाल माती ही कमी प्रमाणात ओरबाडली जाते. त्यामुळे मृदा संवर्धन घडते. त्यातून पूर येणे, धरणक्षेत्रात गाळ साचणे याचे प्रमाण आपोआपच कमी होणार आहे.

आम्ही देशीगायीचे पालन केले आहे. घर परिसरातून निर्माण होणारा भाजीपाल्याचा कचरा आम्हाला आणून देतात. याचे गायीला खाद्य म्हणून  वापर करतो. त्याचे बारा तासात शेणात रूंपातर होते. अशा प्रकारे आम्ही भाजीपाल्याचा कचरा निर्मुलन  करत आहोत. परिसर स्वच्छ ठेवण्याचेही काम करत आहोत.

तसेच मोठ्या प्रमाणात मिळणारा पालापोचोळ्याचा चुरा करतो त्याला BISHCOM ( Biomass Sheding Compost Materil ) बनवत आहोत.

Guide:  लोकांनी 90:10 असे प्रमाण वापरून कुंड्यामधे वाफ्यामधे बाग फुलवावी यासाठी विविध समाज माध्यमांव्दारे जागृती घडवत आहोत. मार्गदर्शन करत आहोत गेल्या आठ वर्षात आम्ही साडेसात लोकांपर्यंत पोहचलो आहोत. विविध समाज माध्यमे म्हणजे प्रिन्टं मीडिया म्हणजे विविध वर्तमान पत्रात लेख, सदर प्रकाशित केले आहेत. दृक श्राव्य माध्यमांवर बातम्या प्रसारित झाल्या आहेत.  तसेच संवदेनशील युट्यूबर्सनी आमच्या कामावर व्हिडीओ बनवले आहोत. शिवाय व्हाट्स अप,  इंस्टाग्राम, लिंकीन,  या मायक्रोब्लॉगिंग व कार्यरत आहोत. यू ट्यूबवर तर १०० व्हिडीओ अपलोड केले आहेत. तसेच घरी व शॉपवर येणार्या मंडळीना प्रत्यक्ष भेटून बोलून कचरा व्यवस्थापन, कंपोस्टींग विषयी माहिती देत आहोत. दूरध्वनीवरही माहिती मार्गदर्शन केले जाते.

Build: आम्ही भाज्यांसाठी ब्रिक्स बेड तयार करून देतो शिवाय कंपोस्टींग साठी लागणारे एरो  ब्रिक्स बॉक्स  हा कंपोस्टरही तयार करून देतो. ज्यामधे ९० टक्के पालापाचोळाचा वापर केला जातो.

Products sales & Services: भाजीपाला उत्पादनासाठी लागणारा जैविक काडी कचरा हा आम्ही सातपूर या औद्योगीक क्षेत्रातून गोळा करतो. कंपन्याबाहेरील पालापाचोळा, मंदीरातील, गणेश उत्सवात निर्मल संकलनात मिळाणार्या नारळ शेंड्या गोळा करतो. नाशिक शहरात जे काही बागबगीचा देखभालीचे काम करतो. त्यात मिळणारा पालापाचोळा हा गोळा करून त्याचे खत करतो. त्याचा मोठ्या मशीन मधे दळून त्यापासून  Bishcom : Potting Mix तयार केले आहे.

घरच्या किचन वेस्टचे कंपोस्टींग करण्यासाठी कंपोस्टींग कल्चर तयार केले. जे माठ, बादली यात वापरून कंपोस्टींगची गती पाचपटीने वाढवू शकता. तसेच कंपोस्टर्सची निर्मिती करतो आहोत. तसेच जसा कचरा तसे कंपोस्टर्स याची काही डेमो तयार केले आहेत. जे विविध ठिकाणी त्याची बांधणी केली आहे.

पालापाचोळा, कचरा जाळू नका यासाठी जागृती घडवत विटांचे हौद तयार केले आहे. घरच्या खरकट्या अन्नाचे व्यवस्थापन कसे करावे. त्याचा खत म्हणून कसा वापर करावा हे लोकांना शिकवत आहोत. थोडक्यात कचरा हा डंपिग ग्रांऊडवर न जावू देता तो घरीच त्याचे व्यवस्थापन करावे यासाठी विविध समाज माध्यमांवर जागृती घडवत आहोत.

घरी गाय पाळल्यामुळे शेण आम्ही उघड्यावर न टाकता त्याचे वैज्ञानिक पध्दतीने व्यवस्थापन केल्यामुळे कुठेही दुर्गंधी, वास येत नाही. त्याचे ब्रिक्स बॉक्स मधे छोट्या जागेत व्यवस्थापन करतो. ज्याचा आदर्श हा म्हशीचा गोठा असलेल्या ठिकाणी करता येईल.

दखलः या कामाची दखल स्थानिक सातपूर विभागीय कार्यालयात घेण्यात आली आहे. सातपूर विभागीय कार्यालयात गच्चीवरची बाग व्दारे कंपोस्टींग या विषयावर एक दिवसीय व्याख्यान सादर करण्यात आले आहे. शिवाय वार्डनुसार स्वच्छता निरिक्षकासोबत कंपोस्टींग कसे करावे या बद्दल प्रभात भेटी व चर्चा केल्या आहेत. सच्छ भारत अभियानात दर वर्षी होणार्या सर्वेक्षणात आमच्या कामाला तज्ञ व्यक्तिकडून भेट दिली जाते.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक

www.gacchivarchibaug.in

माननिय अमिर खान, पत्रास कारण की..| Letter to Mr. Amir Khan | Swatchmev Jayate | Swatch Bhart Abhiyan | SMART CITY

या पत्राव्दारे मी आपल्याला विनंती करतो की पर्यावरण संवर्धनासाठी, कचरा व्यवस्थापनासाठी माझे व माझ्या कुटुंबाचे हे प्रयत्न पाहण्यासाठी नाशिकला गच्चीवरीची बागेला एकदा भेट द्या. आपल्याला एकदा प्रत्यक्ष भेटून आपण सादर केलेल्या सत्यमेव जयते या कार्यक्रमाने समाजात काय प्रेरणा दिली हे सांगायचे आहे. आम्ही फार कष्टाने मेहनतीने हे काम उभे केले आहे. Please एकदा आम्हा सर्वांना भेटायला या… आपल्या येण्याने आमच्या कुटुंबियांचा, मित्र परिवाराचा आत्मविश्वास वाढेल. आणखी काम करण्याची प्रेरणा मिळेल. कारण या कामाचे संपूर्णतः प्रेरणास्त्रोत आपणच आहात. आपली सत्यमेव जयतेची टीम आहे.


vhan-WA0016 (7).jpgमाननिय अमिर खान..

आपण एक महान कलावंत आहातच पण समाजाप्रती, सामाजिक प्रश्नांप्रती आपल्या अंगी असलेली संवदेनशिलता फार महत्वाची आहे. आपण सत्यमेव जयते या कार्यक्रमाव्दारे सादर केलेले सामाजिक प्रश्नावरील भाग, मुलाखती हे माझे आयुष्य घडवण्यात फार मोलाची मदत केली आहे. हे सांगण्यासाठीच हा पत्र प्रपंच….

मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक. वय वर्ष ४२, आपल्या पर्यंत पोहचण्याचा माझे काम पोहचवण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न फार कमी पडला असे जाणवतेय. पाणी फांऊडेशन मधील काही मित्रांव्दारे आपल्या पर्यंत गच्चीवरची बाग हे काम पोहचावे म्हणून शब्द टाकला. पण फळास आला नाही. हे पत्र आपल्यापर्यंत कसे व कधी पोहचेल हे मला माहित नाही. पण हे पत्र लिहावे असे बरेच दिवसापासून मनात ठरवत होतो. कदाचित हे ई-मायाजाल आपल्यापर्यंत हे पत्र पोहचेल हा विश्वास आहे.

हे पत्र लिहण्याचे कारण म्हणजे आपण २०१२ या वर्षी सामाजिक प्रश्नांबद्दल संवदेनशिलता वाढावी य़ासाठी सत्यमेव जयते हा कार्यक्रम प्रसारित केला. त्यातील सारे भाग मी डाऊनलोड करून ते जपून ठेवले होते. वारंवार पाहिले. त्यावेळेस इंटरनेट, मोबाईल घरोघरी पोहचलेले नव्हते. माझ्यापण घऱी नव्हते. आपण सादर केलेला कचरा व्यवस्थापनावरील एक भाग व Organic  V/s chemical Farming हे भाग पाहिले. विचार मंथन झाले. व त्यातून गारबेज टू गार्डन या संकल्पनेवर आधारीत गच्चीवरची बागेचा जन्म झाला. व हे काम सर्वार्थाने फुलवण्याची प्रेरणा मिळाली.

आपण सादर केलेला हा कार्यक्रम माझ्यासाठी Life Changing ठरलाय. हे फक्त आपल्याला या पत्रातून सांगायचे आहे. कदाचित हे आपण हा भाग सादर केला नसता, हा विषय निवडला नसता तर गच्चीवरची बाग या कामाची प्रेरणा मिळालीच नसती.

सफाई कामगार, घंटागाडी कामगार या मुद्यावर नाशिकमधे आंदोलन चालू होते. सफाई मित्रांच्या कहाण्या जवळून पाहिल्या, वाचल्या, त्यासोबत राहिलो. नाशिक मधील डंपीग ग्रांऊडला भेट दिली. तेथील विदारक परिस्थिती पाहिली. व कचरा व्यवस्थापन ही सरकार, प्रशासनापेक्षा लोकांची अधिक जबाबदारी आहे. विशेषतः कचरा जर मि निर्माण करतो तर त्याची विल्हेवाट नव्हे तर त्याचे व्यवस्थापन करणे ही माझीच जबाबदारी आहे या विचारातून प्रवासाला सुरवात झाली. या दरम्यान शेतकर्यासोबत सेंद्रियशेतीसाठीच्या कामाची संधी मिळाली.VINEL 2

लोकांना खत तयार करा असे सांगण्या पेक्षा काहीतरी नाविण्यपूर्ण दिले पाहिजे हा विचार करता करता रासायनिक शेतीमुळे आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम भयावय आहेत याची जाणीव झाली. घरी कचरा व्यवस्थापनावर प्रयोग सुरू झाले. रसायमुक्त अन्न निर्मितीसाठी या प्रयोगांचा फार मोठा फायदा झाला. कारण बाजारात मिळणारे अन्न, भाज्या या खात्रीशिर विषमुक्त असतील याची खात्री नाही. शेती मिळवण्याचा प्रयत्न केला पण मिळाली नाही. कुणीच देवू केली नाही. अशा वेळेस गच्चीवरच भाजीपाला उगवण्याचे प्रयत्न सुरू केले. या प्रयोगांना यश मिळत गेले. आता दहा टक्के माती वापरून आम्ही लोकांच्या गच्चीवर भाज्या उगवून देण्याचे काम करत आहोत. नंतर गच्चीवरची बाग नावाचे अनुभवाधारित पुस्तक प्रकाशित केले. लोकांना पुस्तक आवडू लागले पण त्यांना भाजीपाला फुलवण्यासाठी पालापाचोळा, नारळाच्या शेंड्या कोण गोळा करणार, त्या कोण आणून देणार म्हणून हे काम आम्हीच सुरू केले. त्यासाठी छोटा हत्ती (टेम्पो) घेतला. आता त्यावर आम्ही स्वच्छमेव जयते, स्वच्छभारत या टॅगलाईन व्दारे लोकांपर्यंत जागृती करत आहोत. येणार्या पिढ्यांना उपलब्ध जागेत विषमुक्त भाजीपाला पिकवावा म्हणून आम्ही पर्यावरण पुरक गच्चीवरची बाग या उद्मशिलेतेला सुरवात केली. त्यासाठी आम्ही देशी गायीचेही पालन केले. परिसरातील, बागेची देखभाल करतांना मिळणारा जैविक कचरा मशिनमधे बारिक करतो व त्यास कुंड्या भरतांना Potting Mix म्हणून वापरतोय. आता माती फक्त १० टक्के वापरतो व ९० टक्के जैविक कचरा वापरतो जो जाळला अथवा फेकला जातो. आता कामाचा व्याप खूपच वाढला आहे. आमचे काम पहावयास, त्याची यू ट्यूबवर फिल्म बनवण्यासाठी बरीच मंडळी येतात. आम्ही त्यांनी कचरा व्यवस्थापन व गारबेज टू गार्डन याची माहिती देत असतोच.

या पत्राव्दारे मी आपल्याला विनंती करतो की पर्यावरण संवर्धनासाठी, कचरा व्यवस्थापनासाठी माझे व माझ्या कुटुंबाचे हे प्रयत्न पाहण्यासाठी नाशिकला गच्चीवरीची बागेला एकदा भेट द्या. आपल्याला एकदा प्रत्यक्ष भेटून आपण सादर केलेल्या सत्यमेव जयते या कार्यक्रमाने समाजात काय प्रेरणा दिली हे सांगायचे आहे. आम्ही फार कष्टाने मेहनतीने हे काम उभे केले आहे. Please एकदा आम्हा सर्वांना भेटायला या… आपल्या येण्याने आमच्या कुटुंबियांचा, मित्र परिवाराचा आत्मविश्वास वाढेल. आणखी काम करण्याची प्रेरणा मिळेल. कारण या कामाचे संपूर्णतः प्रेरणास्त्रोत आपणच आहात. आपली सत्यमेव जयतेची टीम आहे.

मी वाचकांनाही विनंती करतो की हे पत्र माननिय अमिर खान यांच्या पर्यंत पोहचवण्यास मदत करावी. कारण हे पत्र तुम्ही पुढे पाठवलेतरच हे पोहचेल. मी एकटा एवढेच करू शकतो.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक.

www.gacchivarchibaug.in

www.sandeep-chavan.in

Home Grow Vegetable Services गच्चीवरची बाग, नाशिक – YouTube

9850569644 / 8087475242

cropped-img-20200610-wa0008.jpg

%d bloggers like this: