कंपोस्टींग गुरू असणे गरजेचे

मुळातच कंपोस्टींग ही पांरपरिक पध्दत आहे. व फक्त कंपोस्टींग केल्यानेच कचरा व्यवस्थापन होईल असे नाही. ते गरजेचे आहेच. पण कचरा व्यवस्थापनासाठी विविध मार्ग उपलब्ध असल्यास त्यात लोकसहभाग वाढतो. हे आमच्या आजवरच्या कामातून लक्षात आले आहे.


गच्चीवरची बाग हा पर्यावरणपुरक व्यवसाय जाने २०२२ मधे १० व्या वर्षात पदार्पण करत आहे. या दहावर्षात आम्ही गारबेज टू गार्डन ही संकल्पना लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला व त्याला पर्यावरणीय संवेदनशील असणार्या मंडळीनी भरभरून प्रतिसाद दिला. या दहा वर्षात नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक मराठी व हिंदी बंधू व भगीनीपर्यंत पोहचता आले. नुसत्या नाशिकरापर्यंतच हा विषय पोहचला नाहीतर त्यातून पाच हजार लोकांनी तो अंगीकारला आहे. त्यातून जवळपास दीड हजार मंडळी कचरा व्यवस्थापनात सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.

जैविक अर्थात कुजणारा नैसर्गिक कचरा हा बाग फुलवतांना तर वापरला जातोच पण त्याचे खत, कंपोस्टपण करणे हे गरजेचे आहे. कारण त्यातून झाडें, बांग यांच्यासाठी वरखताची गरज भागून जाते.

मुळातच कंपोस्टींग ही पांरपरिक पध्दत आहे. व फक्त कंपोस्टींग केल्यानेच कचरा व्यवस्थापन होईल असे नाही. ते गरजेचे आहेच. पण कचरा व्यवस्थापनासाठी विविध मार्ग उपलब्ध असल्यास त्यात लोकसहभाग वाढतो. हे आमच्या आजवरच्या कामातून लक्षात आले आहे.

हे विविध मार्ग कोणते…

  • कुजणार्या, नैसर्गिक कचर्याचे उपलब्ध साधनांत कंपोस्टींग करणे.
  • नैसर्गिक कचरा वाळवून तो कुंड्या व वाफे भरण्यासाठी करणे
  • वाळलेल्या कचर्याचे परसबाग तयार करण्यासाठी वापर करणे
  • ओल्या कचर्याचा डिरेक्ट फिडींग म्हणून कुंड्याना, झाडांना देणे
  • वाळलेल्या कचर्याचे बिशकॉम बनवणे. ( पालापाचोळ्याचा चुरा तयार करणे)

नैसर्गिक कचरा हा अनेक प्रकारचा असतो. त्यात जेवढे प्रकार तेवढे त्याचे परिमाण, त्याची गुणवत्ता, त्यांचे विरजनाचे आयुष्य, त्यांची कंपोस्टीग व वापरण्याच्या पध्दती या वेगवेगळ्या असतात. उठ सूठ त्याच खत बनवणं म्हणजे फक्त हरबर्याच्या डाळीचे भज्या तळण्यासारखं आहे. खरंतर हरबरा डाळीचे अनेक पदार्थ तयार होतात. तसेच नैसर्गिक कचर्याचे सुध्दा अनेक पध्दतीने उपयोग करता येतात. हे अजून बर्यांच जणांच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे.

अशा कचर्याचा विविधतेने वापर करतांना त्यांना वेळोवेळी मार्गदर्शनाची गरज लागते व ति आम्ही गच्चीवरची बाग व्दारे परिपूर्ण करतो. एकतर कचरा म्हटले की त्या बद्दलचा तिटकारा, भिती वाटते. कारण एकतर ते घरा जवळ ठेवा. काही आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले तर काय करायचं ही भिती प्रचंड असते. त्यावर त्यांना मार्गदर्शनाची गरज लागते. असे झालेले खत हे वरखत म्हणून कुंड्याना वरचेवर देणे गरजेचे आहे. कुंड्या भरण्यासाठी मातीत ते मिसळवणे गरजेचे असते.

बरेचदा मंडळी झाडांना खत हवे म्हणून एकाच प्रकारचे खत वापरतात. ते विकत आणतात. पण होम कंपोस्टींग करणेही गरजेचे आहे. व ते सहज शक्य आहे. उदाः बदाम हे आरोग्यासाठी चांगले आहेत व ते रोज खाणे परवडले तरी आपण रोज खातो का… नाही ना… मग शेणखत हे चांगले आहे म्हणून केवळ तेच बागेला वापरले तर चालेल का असे सांगून झाडांनाही विविध खतांची गरज असते हे पटवून देतो. व त्याचा परिणाम दिसू लागला की लोक होम कंपोस्टींगला सुरवात करतात.

तसेच हरबरा डाळ ही सारख्याच वजनाची, सारखेच पाणी टाकून आपण खुल्या पातेल्यात, मातीच्या भांडयात व कुकुर मधे शिजवली तर त्यांची चव सारखीच असेन का, त्यातील सत्व हे सारख्याच प्रमाणात उपलब्ध होतील का… तर नाही ना…

मग होम कंपोस्टींग करतांना ही साधनात सुध्दा विविधता असणे गरजेचे आहे. उदाः कचरा वाळवणे, त्याचे प्लॅंन्ट फिडींग करणे तसेच होम कंपोस्टींह हे  प्लास्टिक ड्रम, मातीचा माठ, विटांचा वाफा अशा साधनांची विविधता लागते.

एकाच प्रकारच्या साधनात एकाच प्रकारचे खत सातत्याने करत राहिलो तर एकाच प्रकारचे जिवाणू मातीत प्रविष्ट होत राहतात. परिणामी मातीचा सामू स्थिर होतो. व त्यातून अपेक्षीत परिणाम दिसून येत नाही. म्हणून साधन हे बदलत राहणे गरजेचे आहे.

कंपोस्टींग करतांना अनंत अडचणी येत असतात. त्यात वैज्ञानिक पध्दतीचा वापर करणे फार गरजेचे आहे. फक्त कानो कानी आलेली माहिती गोळा करून कंपोस्टींग करणे म्हणजे अंधश्र्ध्दा बाळगण्यासारखे आहे ज्यातून वेळेचा, पैशाचा अपव्यय तर आहेच शिवाय मनस्ताप करून घेण्यासारखं आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे कल्चर, जिवाणू लागतात. अर्थात ते अगदी घरातल्या स्वयंपाक घरातही उपलब्ध असतात. पण या सार्यांना मर्यांदा असते. तर बाजारात मिळणारे अनेक कंपोस्टींग कल्चर आहेत. पण ते फत्त उपलब्ध असते. अडचणी आल्याकी त्यावर कस्टमर सर्व्हिस नसते वा  म्यूनुअल नसते. या सार्यांचा विचार करता तुम्हाला कंपोस्टींग गुरू असणे गरजेचे आहे.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक.

Home Composter


Includes: 

1 Composter, 

2 Gardening tools, 

2 Months Composting Powder, 

1 Powder container, 

3 visits ( 1st visit for home delivery and demo, 2nd visit  after 1 month for rotation and 3rd visit after two months for removing the compost)

Mob:8007411800

गांडूळखत हे ताजे का असावे व इतर खतातील फरक…


गांडूळखत हे ताजे का असावे व इतर खतातील फरक… ( Difference Between organic Fertilser )

बरेचदा आपण हौशी बागप्रेमी गच्चीवरील बागेला विविध खते पुरवत असतो. या खतांमधे शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खतांचा समावेश असतो. या तिनही खतांमधे बराच फरक आहे. एकाद्या आजारी पेशंटला आपण चांगल खावू घाला असे म्हटले की आपण फळं, नारळपाणी असे देतो सहसा जे आपल्या रोजच्या आहारात कमी असते. पण बागेतील आजारी, रूसलेल्या झाडांना चांगली खते द्या असे म्हटले की मंडळी नेहमी जी खतं देतात त्यातीलच खतांचा डोस वाढवतात. हे चुकीचे आहे. त्यांना खतांमधे वेगळेपण गरजेचे असते.

कंपोस्टखत हे एसिडिक ( Acidic) असते. ते फुल झाडांना, फळ येणार्या झाडांना गरजेचे असते. तर गांडूळखत हे गांडूळांनी तयार केलेले असते. असा नैसर्गिक कचरा जो अर्धेवट कुजलेला असतो तो गांडूळ खातात व त्यांची जी विष्टा असते त्यास गांडूळखत असे म्हणतात. या खतात झाडांना जी खनिजद्रवे गरजेची असतात ती त्यातून मिळतात. बरेचदा मंडळी सुकलेले गांडूळखत वापरतात. मित्रांनो जे खत कोरडे झाले आहे. ते त्यात गांडूळांची अंडी कशी जिवंत राहतील किंवा त्यातील जे पोषण द्रवे असतात ही हवेत विरून जातात. त्यामुळे गांडूळखत हे नेहमी निमओले, ताजे असावे. म्हणजे त्यातील अंडी ही जिवंत राहतात. तसेच त्यातील घटक पाण्यात विरघळून ते झाडांना मिळतात.

शेणखत हे गांडूळांचे उत्तम अन्न आहे. एकतर ते मऊसूत व कुजलेले असल्यामुळे ते पचवू शकतात. त्यांचे ते आवडते अन्न असते.

बागेत शेणखत टाकल्यामुळे बागेत गांडुळांची संख्या वाढते. त्यांचा आकारसुध्दा वाढतो. तसेच झाडांच्या फळांचा आकार वाढतो.

त्यामुळे एक गोष्ट लक्षात येते. आपल्याला फक्त झाडाना पोषण देवून चालत नाही. मातीतील जे काही सुक्ष्म जिवाणू, गांडूळे आहेत त्यांनाही पोषक ठरतील असे अन्न द्रवे (खतं) देणं गरजेचे असते.

वर्मी कंपोस्टः वर्मी कंपोस्ट व वर्मी कल्चर व गांडूळखत हे वेगवेगळे आहे. वर्मी कंपोस्ट म्हणजे नैसर्गिक कचर्याचे खत बनवतांना आपण जर गांडूळाचा वापर केला असेल तर वर्मी + कंपोस्ट बनते. तयार कंपोस्ट खत हे गांडूळांचे खाद्य नाही. कारण कंपोस्ट म्हणजे पूर्णपणे कूजलेला पालापाचोळा होय. त्यामुळे त्याचा वापर केला तरी त्यात गांडूळे उत्तम प्रकारे वाढू शकत नाही.

वर्मी कल्चर म्हणजे एकाद्या खताच्या प्रकल्पात आपल्याला गांडूळं प्रविष्ट करावयाचे असल्यास त्यास वर्मीकल्चर असे म्हणतात.

गांडूळखत हे वर सांगतीलेच आहे.  तेव्हा. आपल्या कुडींत वाफ्यात कशा पध्दतीने गांडूळे तयार होतील, ते वाढीस लागतील अशी कृती करा.

खतातील प्रकार ओळखायला शिका. झाडांना कोणत्या काळात काय गरजेचे आहे त्यानुसार खतांचा वापर करा.

आम्ही खालील मो. क्रंमाकावरून व्हाट्सअपवर गार्डेन अपडेटस पाठवत असतो.

8087475242 व 9850569644 या दोनही क्रमांकावर वेगवेगळे अपडेटस देत असतो. आपल्याला हे अपडेट्स मिळतात ना याची खात्री करा व संपर्कात रहा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

सफाई ? | सफाई का मतलब | सब चिंजो का फायेदमंद ईस्तेमाल | पूरानी चिंजे ना फेके ऊसे घमले बनांए


पर्यावरणपुरक कामासाठी गच्चीवरची बागेला सातपूर MIDC  नाशिक परिसरात जागा हवी आहे.

एकादी जूनी कंपनी असल्यास तिची स्वच्छता ठेवणे, राखणारी करणे, झाडे जगवणे इ. कामे करू. आम्ही यासाठी आमचे स्वतःचे योगदान देवू.  आपणास विनंती आहे की आम्ही पर्यावरण काम पुढे जाण्यासाठी संघर्ष करत आहोत. चेहरा हा व्यावसायिक असला तरी आमचा पिंड हा सामाजिक आहे. त्यामुळे कृपया हा लेख नाशिकमधील मित्र, आप्तेष्ठांना पाठवा.


व्यावसायिक जोड दिली आहे. आतापर्यंत गरजेचे भांडवल आम्ही वैयक्तिक कर्जाऊ रक्कम घेवून उभे करत आहोत. विविध माध्यमांव्दारे लोकांना निशुल्क व कमीत कमी खर्चात सेवा पुरवत आहोत. काम जसे जसे लोकांपर्यंत पोहचत आहे तसे तसे त्याची व्याप्ती वाढत चालली आहे. सध्या गच्चीवरची बाग एक्सटेन्शंन ही जागा कमी पडत आहे. ( २५ बाय ५० फूटाचे पत्र्याचे शेड व एकल गो पालनसाठी (५० बाय साठ फूटांचा प्लॉट- खरं तो आपला नाही) .

जसे जसे काम वाढत चालले आहे तसे तसे जागेची कमतरता भासत आहे. जागा कमी असल्यामुळे कमी जागेत अधिक पर्यावरणाचा संसार थाटतांना बराच वेळ खर्च होत आहे. सध्या या जागेत खालील प्रमाणे उपक्रम राबवत आहोत.

  • देशी गोपालन ( गोठा)
  • जिवामृत, ह्यमिक जल, दशपर्णी बनवणे
  • गायीच्या शेणाचे खताचा प्रकल्प
  • सुका पालापाचोळा (मर्यादीत स्वरूपात) संग्रहीत करणे
  • विटां व बागेसाठी गरजेची खत, माती संग्रहीत करणे
  • पालापाचोळ्याचा चुरा संग्रहीत करणे
  • यासाठी रिकाम्या सिमेंटच्या गोण्या, रिकाम्या बाटल्या, कॅन यांचा संग्रह आहे.
  • बाग प्रेमींना उपयुक्त साहित्याचे छोटासा sale Display ( मांडण्या) आहेत.
  • भाजीपाल्याची रोपे मर्यादीत स्वरूपात तयार करणे.
  • गाडी पार्किंग
  • कृषी ग्रंथालय

भविष्यात मोठी जागा भेटल्यास वरील उपक्रमांची व्याप्ती वाढवण्यासोबतच खालील उपक्रम राबवण्याची इच्छा आहे.

  • भटक्या देशी गायींचे संवर्धन व पालन करणे
  • बारमाही किचन गार्डन सेटअप तयार करणे
  • बारमाही टेरेस गार्डेन सेटअप तयार करणे
  • बारमाही सेंद्रिय शेतीचे प्रयोग करणे
  • कचरा व्यवस्थापनाची विविध प्रारूपे तयार करणे
  • फळबाग तयार करणे
  • इच्छुकांना पर्यावरण कामात लोक सहभाग घेता येतील असे कचरा व्यवस्थापन व शेतीचे प्रयोग.
  • शाळांच्या अभ्यास सहली वाढवणे
  • गोपालनासाठी आवश्यक चारा निर्मिती करणे
  • औद्योगीक क्षेत्रात होणारी पानगळ ही मोठ्या प्रमाणात संग्रहीत करणे व त्यावर प्रक्रिया करणे
  • लोक सहभागासोबत स्थानिक प्रशासनाला ( कचरा व्यवस्थापनात मार्दर्शक होईल) असे प्रयोग उभे करणे.
  • स्थानिक रोपांची व औषधी वनस्पतींचे गार्डेन तयार करणे ( जे मोफत दिले जाईल)

यासाठी आम्हाला सातपूर MIDC  नाशिक परिसरात कमीत कमी ६००० चौरस फुटांची व जास्तीची जागा हवी आहे.

एकादी जूनी कंपनी असल्यास तिची स्वच्छता ठेवणे, राखणारी करणे, झाडे जगवणे इ. कामे करू. आम्ही यासाठी आमचे स्वतःचे योगदान देवू.  आपणास विनंती आहे की आम्ही पर्यावरण काम पुढे जाण्यासाठी संघर्ष करत आहोत. चेहरा हा व्यावसायिक असला तरी आमचा पिंड हा सामाजिक आहे. त्यामुळे कृपया हा लेख नाशिकमधील मित्र, आप्तेष्ठांना पाठवा.

http://www.gacchivarchibaug.in

Eco Friendly Holi | कचरामुक्त जीवन | Best From Waste | पर्यावरणीय उपक्रम | इच्छा तेथे मार्ग | होळी

पर्यावरण वाचविण्यासाठी आपण प्रत्येक जण योगदान देवू शकतो फक्त हवी इच्छा ! इच्छा तेथे मार्ग असतो. सुरवातीला एकला चलो रे चा नारा देत संदीप चव्हाण यांनी केलेली सुरवात ही आज रचनात्मक व सृजनशील पर्यावरणाची चळवळ गच्चीवरची बागेच्या रूपाने घरोघऱी फुलत आहे. नाशिक आकाशवाणीवर घेतलेली ही मुलाखत…


KITCHEN Waste composter : space Maker


img-20191111-wa0010_orig

किचन वे्स्टचे व्यवस्थापन करणे हे फार गरजेचे आहे. आपलाच मोलाचा व फायदाचे अनमोल कचरा टाकाऊ म्हणून फेकून देतो. व घरच्या झाडांसाठी खत विकत आणतो. चित्रात दाखवलेला single Drum composter मधे आपण किचन वेस्टचे व्यवस्थापन सहजतेने करू शकतो. यात वैशिष्टय पूर्ण असे कंपोस्टीग कल्चर वापरले जातेच पण कंपोस्टींग पावडर म्हणून BISHCOM चा वापर केला जातो. इतर कंपोस्टर पेक्षा हा गतीने व अधिकचा कचरा जिरवतो. हा कसा वापरावयचा, काय काळजी घ्यावी हे आम्ही घरी येवून सांगतो. या कंपोस्टर सोबत आपणास खालील गोष्टी पुरवल्या जातात.

१) १०० लिटर ड्रम with Stand, packking Clip with cover cap 2) 3 Types of Culture for speedy composting 3) Iron Huck for cultivate daily waste 4) plastic collector 5) 2 types of Ground material , 6) Composting powder 7) Aeration pipe

आपली मागणी नोंद झाली की आपणास पहिल्यांदा सदर ड्रम कसा वापरावा याचा डेमो दिला जातो. तसेच पहिल्यांदा भरला की तो रिकमा कसा करावा या विषयीही माहिती सांगण्यासाठी येतो. ( नााशिक मधे घरपोहेच सेवा दिली जाते) बाहेरगावी आपल्याला बाय ट्रान्सपोर्टे ने पाठवले जाते.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

http://www.gacchivarchibaug.in

Devil DIGESTER : Home Composter


5652293All in One गार्डन वेस्ट कंपोस्टरः हा  एक २०० लिटर ड्रमचा सेटअप असतो. आपल्या टेरेस, अपार्टमेंटमधील उपलब्ध जागा , निर्माण होणारा पालापोचोळा याची गरज तपासून प्रत्यक्ष पाहणीत सुचविण्यात येतो. त्यासाठी काय काय काळजी घ्यायची, काय करणे गरजेचे आहे हे सांगितले जाते. यास डेव्हिल-डायजेस्टर म्हटले जाते. अगदी मोठ्या प्रमाणात व गतीने ओल्या सुक्या पालापाचोळ्याचे खतात रूपांतर केले जाते. या तून दररोज व्हर्मीवाँश, ह्यूमिक अँसिड, इंजाईम हे द्रवस्वरूपात मिळते.  या सेटअपमुळे आपली colony  स्मोक फ्री राखता येते. .नाशिकमध्ये या कंपोस्टर घरपोहोच दिले जातात. यासाठी एकदाच आर्थिक गुंतवणूक करण्याची गरज असते. तयार होणारे खत आपण संग्रहीत करू शकता. या प्रकारच्या सेटअप मध्ये तयार केलेल्या खतात उत्तम प्रकारच्या भाज्या घेता येतात. तसेच नैसर्गीक कचर्याचीही व्यवस्था लावता येते.

अशा सेटअपमधे तयार केलेले खत हे ७५० ते १००० किलो खत एका वेळेस निघते. त्यास वर्षभर रिकामा करण्याची गरज नसते.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

Aerio Composter


intex-aqua-lions-x1-26042019-120019-copy-copy_orig

Aerio Composter म्हणजे विटांचा कोणतेही बांधकाम न करता तयार केलेला हौद होय. याचे वैशिष्टय म्हणजे हे जमीनीच्या वर तयार करता येतो. यातील पाचही बाजूने आतील उष्णता जाण्यास, हवा खेळती राहण्यास मदत होते. त्यामुळे त्याचे उत्तम प्रकारे खत तयार होते. खड्यात उतरून मजूरांची, मानवी श्रमांची जी गरज लागते ती या ठिकाणी लागत नाही. एकटा माणूस टॅक्टरभर खत दुसरी कडे सहज टाकू शकतो. तसेच हा एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणीही स्थानांतर करता येते. विटांसाठी होणारी आर्थिक गुतंवणूक ही वाया जात नाही. 

पालापाचोळा, किचन वेस्ट (फरमेंनटेड), खरकटे पाणी, गार्डेन वेस्ट, गायी, म्हशीचे  शेण असा सारा कचरा कंपोस्ट करण्याचा सोपा मार्ग म्हणजे Bricks Composter होय. याची उंची कमीत कमी २ फूट ते जास्तीत जास्त ६ फूट  घेता येते. तसेच त्याची लांबी रूंदी ही ३ बाय ३  ते ६ बाय ६ फूट इतकी घेता येते. हे भिंतीलगत सी व एल आकारात व खुल्या जागेत चौरस आकारात तयार करता येतात. कंपोस्टिंग होण्यास सोपेअसते. तसेच त्याचा कोणताही  दुर्गंधी येत  नाही. वास येत नाही.

आपल्या मागणीनुसार जागेची पडताळणी करून असे हौद नाशिक मधे तयार करून देतो. 

आम्ही शेणखतकसे तयार करतो वाचा

 

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. 

Natural potting mix (Biomass shredding compost Material) BISHCOM

potting mix (Biomass shredding compost) हे असं मटेरिअल आहे जे कधी पाहिलं नव्हत. त्याचा उपयोग करून पहा.. भाज्याच भाज्या…


potting mix (Biomass shredding compost Material)

IMG_0825 copy

आपणास माहीतच आहे की गच्चीवरची बाग मागील १२ वर्षापासून भाजीपाला निर्मितीमधे काम करत आहे. बाग काम हे सहज सोपे व्हावे म्हणून आम्ही नवनविन प्रयोग व उत्पादने तयार करत आहोत.  कुंडी वजनाला हलकी, रोपनां पोषक ठरेन व ति पण बराच काळ चालेल यासाठी आम्ही विशिष्ट पध्दत वापरत होतो. ती पध्दत आम्ही अजूनही काही सेटअप मधे वापरत आहोतच. तसेच ही पध्दत  आता सर्वदूर सुरू झालीय य़ाचा आनंदही वाटतो.

त्यात नारळाच्या शेंड्या, पालापाचोळा असे ऐंशी टक्के व खत आणि माती विस टक्के प्रमाण वापरतो. ति पध्दत कुंडयानां निरंतर खताचा पुरवठा करतेच. पण दिर्घकाळ चालले. नैसर्गिक संसाधने तीच आहेत  पण त्यात आता नवीन गोष्टीचा  थोडक्यात इंप्रुव्हमेंट केली आहे.  थोडक्यात वरील सार्या गोष्टीचा आम्ही चुरा करून घेतो. जेव्हां त्याचा बारीक चुरा  करून बघितल्या व त्याचे प्रयोग करून बघितले. विशेषतः यात भाजीपाला लागवड करून पाहिला. त्याचे छान परिणाम समोर आलेत. आपण ते पहावयास येवू शकता.

यालाच आम्ही BISHCOM असे म्हणतो.  यात वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करतो. थोडक्यात आम्ही Potting Mix तयार केले आहे.  Natural potting mix (Biomass shredding compost Material) याचे फायदे…

अक्षय्यपात्र - Copy

  • मातीत मिश्त्रण करून टाकल्यास योग्य तो वाफसा तयार होतो. (वाफसा मुळे रोपांची वाढ छान होते)
  • अन्न मुळ्या वाढून झाड व  फळ वाढीचा वेग वाढतो.
  • फक्त माती व खत टाकल्यामुळे कुंडी जड होते. potting mix (Biomass shredding compost Material) टाकल्यामुळे कुंडी हलकी होते.
  • पाण्याचा योग्य तो निचरा होतो.
  • बियाणे अंकुरण्याचा वेग व प्रमाण वाढते.

  • कोकोपीटला उत्तम पर्याय. ( कोकोपीट का नको याचा सकाळ वर्तमान पत्रात प्रसिध्द झालेला  लेख वाचा) 
  • झाडांच्या मुळाशी, कुंडीच्या पृष्ठभागावर टाकल्यास पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.
  • Aerobic composting करतांना लाकडाच्या भुसा ऐवजी Biomass shredding compost वापरल्यास Home Composting गतीने होते. कारण Natural Potting Mix BISHCOM हे कंपोस्ट करतांना वापरलं तर ओल्या कचऱ्यातील पाणी शोषण करून moisture maintain करण्यास मदत करते.
  • तुम्ही २० टक्के माती, १० टक्के विविध खतं व ७० टक्के Shredding material compost एकत्र करून वापरू शकता
IMG_0820 copy
Potting Mix

Natural Potting Mix २० Kg packing उपलब्ध…. 

हे मॅझीकल Potting Mix ३ प्रकारात उपलब्ध आहेत.

१) प्लॅटिनम २) गोल्डन ३ सिल्व्हर

विस्तर पुढील प्रमाणे….

३) सिल्व्हर या प्रकारात फक्त Biomass Shredding Compost Material BISHCOM मिळेल. ( 20 Kg Packing bag X 16/- kg= 320/- + Dilevery charges in nashik 50/- 

हे खत आहे का? हो, use as mulching, fertilizer, potting mix, composting powder, असा विविधतेने वापर करता येतो

२) गोल्डन या प्रकारात BISHCOM ( 20 Kg Packing bag X 16/- kg= 320/-  + लाल माती 100/- सिमेंटच्या आकाराची बॅग्जस  मिश्त्रण मिळेल Dilevery charges in nashik 50/- 

१) प्लॅटिनम या प्रकारत BISHCOM + लाल माती+ व नैसर्गिक खते ( शेणखत निमपेंड, तंबाखू पावडर यांचे योग्य प्रमाणात मिश्त्रण मिळेल.

( 20 Kg Packing bag X 16/- kg= 320/- , माती 100/- विविध खतं 16 kg, 475/- Dilevery charges in nashik 50/- to 250/- 

वरील मिश्त्रण तुम्हीही तयार करू शकता. किंवा आपणास तयार हवे असेन तर फक्त प्लॅटिनम प्रकारातील potting Mix मिळेल.

प्लॅटिनम प्रकारातील potting Mix हे अन्नपूर्णा बॅग असेन तर २५०/- प्रमाणे व होलसेल हवे असेल तर २० लिटर  रंगाची बादली भरून ३०० रू. + Dilevery charges वेगळे. 

प्लॅटिनम प्रकारातील potting Mixer हेच अन्नपूर्णा बॅग मधे वापरले जाते. 

 

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. 9850569644

 

Waste: व्यवस्थापन, विकेंद्रीकरण व लोकसहभाग….


नाशिक हे आपले आवडते शहर आहे. त्याला स्मार्ट सिटी म्हणून विकसीत करायचे मान्य झाले आहे. मुळातच नाशिक शहराला स्मार्ट बनायला बर्याच काही शक्यता आहेत. स्मार्ट सिटी म्हणून बरेच मुद्यावर चर्चा, कार्यशाळा संपन्न झाल्यात..

स्मार्ट सिटी विकास होण्यासाठी शहरातील कचरा व्यवस्थापन हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कचरा प्रश्नाला संबधीत किंवा तिला सोडवण्यासाठीची जी काही वर्तमान पध्दत आहे तिच्यात आमुलाग्र बदल घडवून आणणे गरजेचे आहे. हे बदल तीन प्रकारे घडवू शकतात. या तीन गोष्टी म्हणजे कचरा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण, बहुपर्यायी लोकसहभाग….

1)व्यवस्थापनः सध्या कचर्याची विल्हेवाट लावली जातेय. या विल्हेवाटीवर आज प्रशासन करोडो रूपये खर्च करत आहेत. एक म्हणजे कचर्याचे विल्हेवाटी ऐवजी व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. या दोन संकल्पनेत मोठा गभितार्थ आहे. विल्हेवाटीत प्रश्न संपवला अशी भावना असते पण प्रत्यक्षात त्यातून अनेक उपप्रश्नांची उत्पत्ती होत जाते. जे आज घंटागाडी प्रश्न, सफाई कामगार प्रश्न, डंपीग ग्रांऊड प्रश्न असे आहेत. व्यवस्थापन ही निरंतर प्रक्रिया आहे आणि स्वंयभू असते. . त्यावर अनेक पातळीवर एकाच वेळीस काम करता येते व त्यातून येणारे रिर्टन हे कायम स्वरूपी असतात. मुळात ते अबादीत तर असतात पण ते परिवतनशील सुध्दा असतात. अशी ही व्यवस्थापनाची संकल्पना कचरा प्रश्नाबाबत लागू केली पाहिजे.

2)विकेंद्रीकरणः व्यवस्थापनाचाच भाग पण त्यास ठळक व स्वंतत्र्यपणे पाहता येईल असा मुद्दा म्हणजे कचर्याचे विकेंद्रीकरण होय. सध्या कचरा विविध ठिकाणाहून गोळा करणे, तो साठवणे (नव्हे सडवणे) त्यासाठी अनेक अर्थांचे अर्थकारण साधने हे नियंत्रित केले पाहिजे थोडक्यात कचरा जेथे तयार होतोय तेथेच तो जिरवला पाहिजे.. त्या जिरवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले पाहिजेत.

3)बहुपर्यायी लोकसहभागः कचरा व्यवस्थापनात लोकसहभाग महत्वाचा आहे. लोकसहभाग वाढावा यासाठी स्मार्ट पर्याय शोधले जाणार आहेत. पण हा पर्याय पण एकच एक असून चालणार नाही.. त्यासाठी अनेक पर्यायांची गरज आहे. शहरातल्या एकाद्या मुद्यावर परिवर्तन गरजेचे आहे असे मानल्यास त्यात लोकसहभाग खूपच महत्वाचा आहे. एकादे ध्येय साध्य करण्यासाठी लोकसहभाग हे साधन असले तरी ते काही यांत्रिक साधन नाही आहे. ते एक जीवंत प्रक्रिया आहे. त्यात अनेक भावभावना, समज-गैरसमज, हेवे-दावे, फायदा- तोटा, मान-सन्मान असे सारेच काही आले.. हा मुद्दा लक्षात घेवूया…

नेमकं येथेच गच्चीवरची बाग हे महत्वाचे काम करत आहे. कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा हा निकाली काढण्यासाठी लोकसहभागानेच काम करत आहे. वरील तीनही मुद्यांचे येथे एक चांगले व्यावहरिक गणित व सहभागाचे मेतकूट जमून येते ते कसे पाहूया…

राव (प्रशासन) न करी ते गाव करी… ही म्हण प्रख्यात आहेच. याच्या मुळाशी लोकसहभाग हे तत्व आहेत. एकाद्या मुद्यावर लोकांचा सहभाग कधी वाढतो असा विचार करूया… तर लोक सहभाग जेव्हांच वाढतो जेव्हा लोकांचा त्यातून फायदा होवू शकतो. कचरा व्यवस्थापनातून गच्चीवरची बाग फूलवून इच्छुक विषमुक्त भाजीपाला, फळे आहे त्याजागेत फुलवू शकतात. गच्चीवरची बागेने खूप उपयोगशील तंत्र विकसीत केले आहे. 20 टक्के माती व 80 टक्के कचरा वापरून छान पणे घरच्याघरी भाजीपाला पिकवू शकतो.

लोकांना रासायिनक भाज्या, फळे यांचे तोटे लक्षात येवू लागले आहे. बाजारात सेंद्रीयभाजीपाला मिळतो खरा पण त्याची खात्री पाहता लोकांना घरीच भाजीपाला पिकवणे हे महत्वाचे वाटू लागले आहे. तसेच घरीच बाग फुलवून बाग बगीचा फुलवण्याचा आनंदही घेता येईल..जो आजच्या धावपळीच्या जीवनात निसर्गाच्या जवळ जाणे खूप महत्वाचे आहे. ते त्यातून साध्य होते. त्यामुळे गच्चीवरची बाग फुलवणे हे गरजेचे वाटू लागले आहे. गच्चीवरच्या बागेने हे तंत्र खूपच सोप्प तंत्र विकसीत केले आहे. उपलब्ध जागा, उपलब्ध वस्तूत, उपलब्ध नैसर्गिक संसाधनात ही बाग फूलवता येते.

कचरा व्यवस्थापनात गच्चीवरची बाग सल्ला, प्रशिक्षण, जन जागृती, सोशल मीडियावर मोफत मार्गदर्शन करत आहे. घरघूती पातळीवर लोकांनी कमीत कमी खर्चात कचरा व्यवस्थापन करावे यासाठी विविध उपाय सुचिवले जातात. ज्यांना जो उपाय पटेल, रोजच्या कामातून करणे सोपे वाटेल तो त्यांनी अवलंबावा यासाठी मार्गदशर्न केले जाते. जेष्ठ नागरिक, तरूण, महिलामंडळे यांना गटानुसार किंवा कार्यशाळा घेतल्या जातात.

असे ही साधी सोप्या तंत्राची गच्चीवरची बाग आपण ही फूलवू शकता.

संदीप क. चव्हाण, नाशिक. www.gacchivarchibaug.in contact & wts app: 9850569644

Needs to equipments/ funds


vertical garden 1 1 (1098)संदीप चव्हाण, नाशिक, महाराष्ट्र में रहते है। पिछले चार साल से गारबेज टू गार्डन तंत्र को लेकर नाशिक में जहर से मुक्त सब्जिया और बागवानी बनाने के लिए लोगोंको प्रेरीत करते है। उनका सपना है की लोग अपने छोटी छोटी कौशिसे व्दारा जहर मुक्त सब्जिया घरपर ही उंगाये, पर्यावरण का खयाल रखे और निसर्ग के साथ जुडे रहे। इसलिए खेती की जरूरू नही है। शहर में जो भी जगह उपलब्ध है जैसे की (पंराडा, टेरेस, बाल्कनी, विंडो) उसीमें उपलब्ध नैसर्गिक संसाधनो (किचन वेस्ट, सुखे पत्ते,)  के साथ और जो भी उपलब्ध वस्तूंए में बागवानी करने के लिए प्रेरीत करते है। आज शहर में डंपीग ग्रांऊड की समस्या बढ रही है। अगर लोगों ने इस तरह किचन वेस्ट का जगह ही पर उसका सुखाकर इस्तेमाल किया तो डंपीग ग्रांऊड की समस्या नही रहेगी। और यह एक कारगर व आसान तरीका है। किचन वेस्ट का कंपोस्टिंग बनाने की कोई जरूरी नही.. ऐसा उनका कहना है। खाद बनाना यह प्राकृतिक के खिलाफ है और उसमें समय का गवाना है यह उनका मानना है।

इसलिए वह पिछले १२ साल से प्रयत्न कर कर रहे है। इस प्रयत्नों के पिछले चार साल में अपने परिवार के लिए उपजिवाका का माध्यम बनाया है। उनके साथ उनका परिवार और दो लोगों को भी रोजगार की प्राप्ती होती है।

जहर मुक्त खेती की आज बहूत जरूरी है। इसके बारे में लोगों को जागृत करना और निसर्ग के प्रती उनका सहयोग लेना जरूरी समजते है। इसलिए उन्होंने एक देशी नस्ल की गाय पाली है। उसीके गोमुत्र और गोबर से टेरेस फार्मिंग में उपयोग करते है।  इस काम को गती मिलने के लिए लंबे प्रयोसो के बाद एक चार पैयावाली गाडी खरेदी है। उसीसे थोडा आसानी हो गयी है। लेकीन यह सब कर्जा है। और कुछ कुछ करना है। उसके लिए और कर्जा मिलना मुश्किल है। और उनके सपने की कडी में कुछ साधनों की कमतरता है। अगर निचे नमुद कियें हुंए साधन का जुगाड हो जाता है तो  में पर्यावरण के क्षेत्र में लोगोंका और बडी मात्रा में सहयोग ले सकत है। और अपनी सिंमेंट की निस्तेज वंसुधरा को हरे हरे रंग के कुछ रंग भरना चाहते है।

  • Petrol Shredder machine 65000/- छत पर बागवानी के लिए 80 % बायोमास ( नारियल के छिलके, गन्ने का छिलके, पेड पौध्दे के पत्ते, सुका हुआ किचन वेस्ट और 20%  मिट्टी और खाद का उपयोग करते है। उपरोक्त मशीन व्दारा जो भि बायोमास लोगोव्दारा फेका या जलाया जाता है। उनको क्रश करके उपयोग कर सकते है। इससे दो फायदे है। एक  कम जगह में जादा से जादा संग्रहीत कर सकते है। और ट्रान्सपोर्ट के लिए सुविधा होगी।
  • किताब प्रकाशन 75000/- अब गच्चीवरची बाग ( टेरेस फार्मिंग) ये किताब की व्दितीय आवृत्ती प्रकाशीत करना चाहते है। जो स्वः एक प्रशिक्षण पुस्तिका की तरह होगी। ताकी इसे पढकर इच्छुक लोंग अपने घरपे ही किताब पढकर छत पर बागवानी कर सकते है। इससे पर्यावरण के क्षेत्र में बढा काम खडा रह सकता है।
  • बफींग machine 10000/- मंदीर से जमा किए नारियल के कठीण कवच से मैं किचेन्स बनाना चाहते है। कुछ चिंजे हातोसेही बनायी है इसमें बहोत सारा वक्त लग जाता है। उपरी मशीन अगर मिल गयी तो मैं कोकोनट शेल से अलग अलग चिंजे बना सकते है। जो पर्यावरण पुरक होगी। और स्थानिक महिलांए के लिए रोजगार की प्राप्ती होगी।

Total amt: 150000/-(1.5 lakh)

उनके कार्यपर युट्यूब पर एक फिल्म है उसे हर रोज २५० लोग देखते है। इसी विषय में मैने लोकसत्ता इस वर्तमान पत्र में एक साल कॉलम लिखा है। इसी काम की विविध माध्यमों व्दारो समाचार पत्र में जीवन परिचय प्रकाशित हुए है।

www.gacchivarchibaug.in

www.youtube.com

 

 

waste don’t waste


0 (49).jpg

कचरा निर्मीती ही आजच्या आधुनिक जीवनशैलीची ने दिलेला शाप आहे. त्यामुळे सर्वदूर पसरलेल्या जल, जंगल, जमीन, जन आणि जनावरांच्या आरोग्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. पण  प्रत्येक शापाला उपशाप असतो तसेच कचर्याचेही आहे.

बरेचदा कचरा निर्मीतीमागे नाईलाज व काही चुकीच्या सवयीमुळेही कचर्याचा प्रश्न बिकट झाला आहे. जेथे प्रश्न आहेत.तेथे उत्तर हमखास असतातच.  थोडं आपल्याला एक पाऊल उचलावं लागतं एवढचं. कचर्याची सध्या विल्हेवाट लावली जाते. पण हा द्राविडीप्राणायम झाला. कचर्याचे व्यवस्थापन केले की त्यातून आपल्याला बरेच फायदेपण मिळातात. आज सर्वत्र स्वच्छता अभियान चालले आहे. चांगलेच आहे. पण याचा मतितार्थ पाहिला तर काय आपल्या अंगणातला कचरा हा दुसर्याच्या अंगणात जावून टाकणे असा आहे. म्हणजेच डंपीग ग्रांऊड वर जमा करणे होय.

कचर्याचा प्रश्नाला येथूनच सुरवात होते. आपण करतो ती सफाई असे मजेशीर नाव देतो. पण सफाई शब्दाची फोड केली तर सब चिंजोंका फायदेमंद ईस्तेमाल. हे आपण करतो का. तर नाही… कचर्याची दुसरी पायरी आहे त्यांचे केंद्रीकरण करणे होय. म्हणजे कचरा जिथे तयार होतो त्याचे संकलन करायचे व त्यासाठी आपलाच कररूपी पैसा दावणीला बांधून तो कचरा डंपीग ग्रांऊडवर जमा करणे. आता डंपीग ग्रांऊड, सफाई कामगार, तेथील जीवन एकदा अनुभवले की कळते की आधुनिकतेने वेगळ्या सामाजिक, आर्थिक विषमतेंना जन्म दिला आहे. असो… तर मूळ कचरा या प्रश्नांच्या उपायावर आपण बोलूया… कचरा हा विविध प्रकारचा असतो. काहीना पूर्नवापराचे मुल्य असते तर काहीनां नसते. काही कचरा हा विघटनशील, जैविक, नैसर्गिक असतो तर काही विघटनशील नसतो. सर्वात भयंकर प्रश्न निर्माण होतो तो नैसर्गिक कचर्याचे म्हणजेच घरातील व घर परिसरातील कचरा. किचनवेस्ट(यात प्रकार पडतात १. ग्रीन किचन वेस्ट व २.वेस्ट कूकड् फूड ३. खरकटे पाणी ४. पालापाचोळा)

आता याची विल्हेवाट लावणे सोपे आहे. पण त्याचा डंपीग ग्रांऊड पर्यंतचा प्रवास किळसवाणा असतो. पण त्याचे व्यवस्थापण हे आनंददायी, सृजनशील, पर्यावरण जपणारे आहे. विल्हेवाटीत जबाबदारी दुसर्याची व वेळ वाचवणारी ठरते तर व्यवस्थापनात जबाबदारी आपली स्वतःची व वेळ खर्च करणारी ठरते.

तर लेखात आपण व्यवस्थापनाचा मुद्दा कसा आनंददायी, आरोग्यदायी, पर्यावरण जपणारा आहे ते आपण पाहूया…

पहिल्यापासूनच स्वच्छतेची आवड होती. आंगण ओटा स्वच्छ करून कचरा जाळण्यापेक्षा त्याच खत करायचे. तेथे असंख्य मुंग्या जमा व्हायच्या .. आपल्या कचर्यात आफ्रीकन अंन्टस सारख्या मुंग्या जमा होतात, कोणकोणते किडे जमा होतात याचा अभ्यास मला खूप आवडायचा. त्यांच्या शिस्तबध्द रांगा, त्यांच्या एकमेंकाना भेटून होणारा संवाद या बद्दल बरीच कुतुहलता होती. हा माझ्या लहाणपणीचा छंदच होता. मोठा होत गेलो तसा शहरीकरणाचे काय काय प्रश्न असतात याची मला ओढ लागली. त्यात मला कचरा या प्रश्नाने अधिक आर्कषीत केले. त्याबद्दल विचार सुरू झाला. या शहरातल्या कचर्यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे व तो असा पाहिजे की त्यात प्रत्येकाचा सहभाग तयार व्हावा…असा ठाम निश्चय झाला. मध्यतंरी जागतीकीकरणामुळे समाज जीवनावर काय काय परिणाम होतील याचा अभ्यास सुरू झाला. अभ्यासांती असं लक्षात आलं की सर्वात जास्त शेतकरी वर्ग भरडला जाणार. एका दाण्यांच हजार दाण्यांच दान करणार्या जमीनीत बाहेरच (खत, फवारणी, बियाणं असं सार काही) विकत आणून शेती करणार, पिकवणार व बाजारात गेलं की मातीमोल (हं माती सुध्दा काही तरी उगवून परत करते) नव्हे कवडीच्या मोलात ते विकलं जाणार तर शेती परवडणार कशी… आपले पूर्वज शेती कशी करायची… असाही विचार मनात कुठेतरी सुरू झाला..

या सार्यां प्रश्नांच्या गुंत्यात अडकून काही होणार नाही. काही तरी सुरवात करूया.. असं म्हणून घरचा कचर्यावर विविध प्रयोग सुरू केले. खत करून पाहिलं. लोकांना सांगीतले तर  कचर्याचे खत करून झाडांना टाकण्यात त्यांना काही स्वारस्य नव्हतं. मग दुसरा काही तरी शोधलं पाहिजे. असा विचार सुरू झाला. एका बाजूला शेती करायची मनाने उचल खाल्ली. शेती करूया.. पण शेती काही कोणी देईना.. शेतात मोठ मोठी अवजारे, रासायनिक खते फवारणी न वापरता शेती करणार असं म्हटलं की वेड्यात काढलं जायचं. तोही मार्ग खुंटला..

करायचं काय... रो हाऊस घेतलं.  छतावरचं  शेती करूया.. बघू जमत का.. आणि योगायोग शेतीची आवड, कचर्याच्या प्रश्नांची उत्तरे मला मिळाली. अनेक अनुभव घेतले. शहरात शेती व ति पण गच्चीवर करता येते याचे अनेक अनुभव घेतले. प्रयोग केले. व अनुभवांच पुस्तक तयार केलं… नि सुरू झाला. गच्चीवरची बाग या संकल्पेनेचा प्रवास.. अडीशे स्व्केअर फूटा पासून सुरू झालेला माझा प्रवास आता सर्विहस व्हॅन पर्यंत आला. पूर्णवेळ काम करून रोजगाराचं एक साधन तर झालंच पण इतरांच्या घरात कचर्यातून भाज्या पिकू लागल्या.. पिकवून देवू लागलो… अगदी सुरवातीला विस टक्के माती व एंशी टक्के नैसर्गिक कचर्याचा वापर करून घरच्या घरी उपलब्ध जागेत( टेरेस, बाल्कनी, विंडो ग्रील, घराभोवतालची जागा व उपलब्ध साधनात ( दुधाच्या पिशवी पासून ते लेडीज पर्स पर्यंत, नारळाच्या करवटी पासून ते टायर पर्यंत) व उपलब्ध नैसर्गिक संसाधनात ( नारळाच्या शेंड्या, पालापाचोळा, वाळवलेला किचन वेस्ट,) आपल्याला भाजीपाल्याची बाग फुलवता येते. लोकांना खत तयार करा हे सांगण पटत नाही. पण आजच्या रासायनिक उत्पादनामुळे होणारे विविध आजारांचे प्रमाण पाहता कचर्यातून विषमुक्त नैसर्गिक पध्दतीने भाजीपाला पिकवता येतो.

तर कचरा व्यवस्थापन किती सोप्प आहे हे मी सांगणार आहे. कचरा फेकायचा नाही असं आपण म्हटलं की त्याचं खत करायचं असा पहिला सरळ धोपट मार्ग आपल्याला सुचतो. पण खरचं कचर्याचे खत करायची गरज आहे का असं कधी आपण स्वतःला विचारलं … नसेलच.. मी विचारलं व त्यातून अनेक सुत्र लक्षात येत गेली. झाडांना खताची गरज ही फक्त आपल्या जेवणात तेल, मीठ, मिरची, लोणंच जेवढं असते तेवढंच खताची गरज आहे मग खंडीने तयार का करायचे. हाही प्रश्न आहे. असो ..

ग्रीन किचन वेस्टः घरातील निघणारा ग्रीन किचन वेस्ट जो विघटनशील, ओला, नैसर्गिक, जैविक असतो असा कचरा वाळवून घेणं ही सर्वात महत्वाची नैसर्गिक पहिली पायरी आहे. हा कचरा वाळवून तो कुंड्या, वाफ्यात भरायचा. तळाशी नारळाच्या शेंड्या व सर्वात वरती  माती टाकायची, बी लावायचे. एकाद्या रोपांची हुंडी लावयची… बस… झाडं उत्साहाने वाढतात. म्हणजेच सुक्या कचर्याची एक घडी बसवून दिली की पुढचे काम निसर्ग आपोआप करतो. म्हणजेच सुक्या कचर्याच्या कंपोस्टीग ( कुजण्याच्या) प्रक्रियेत झाडं चांगली वाढतात.

ग्रीन किचन वेस्ट लवकरात लवकर सुकावायचा असेल तर त्याचे बारिक काम करून घ्या.. उन्हात टाका. त्याचे तासा दोन तासात निर्जलीकरण होते. या प्रक्रियेत कुठेही कचर्याला दुंर्गध येत नाही. कचरा हा प्लास्टिक बॅग, डस्ट बिन या मध्ये डांबून ठेवला तदर कचर्याला वास येतो. वाळलेल्या ग्रीन किचन वेस्ट हे माठात, डस्ट बीन, रांजन, सच्छिद्र बॅग, गोणीत टाकून त्यावर थोडे थोडे पाणी, ताक पाणी, गोमुत्र पाणी, असे शिपंडत राहिले की त्याचे ४०-४५ दिवसात छान खत तयार होते.

वेस्ट कुकड्ड फूडः य़ाचे व्यवस्थापन हे कौशल्यपूर्ण भाग आहे. हा तो हळू हळू आत्मसात होत जातो. तर कूकड फूड हे ग्रीन वेस्ट पेक्षा अधिक काळ पाणी धरून ठेवते. ते ही वाळवले तर त्याचा परिणाम हा शेणखतापेक्षाही उत्तम येतो. तर कूकड फूडचा सोप्पा उपाय म्हणजे त्यास आबंवणे व त्या आबंवलेल्या द्रावणात पुन्हा पाणी टाकून त्याच वापर कुंड्याना, झाडांना करायचा. खरकटे अन्न, पाणी  आंबवण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. भांडे धुतो तेथे डस्टबिन मध्ये साबण विहरहीत पाणी संकलन करायचे ते आठवड्या भरात भरते. ते नैसर्गिक रित्याच आंबण्याची प्रक्रीया होते. बरीच मंडळीना एवढ्या द्रावणाची गरज लागणार नाही. त्यांनी आपल्याला लागेल तेवढे खरकटे अन्न पाणी हे आबंवायचे व ते महिना पंधरा दिवसातून एकदा झाडांना टाकायचे.

पालापापाचोळाः घर परिसरात, बंगला, शाळा, कंपनी  परिसारात बरीच पानगळती होते. ही पाने कचरा म्हणून सर्रास जाळली जातात. व त्यापासून प्रदुर्षनात भर टाकली जाते. सकाळी स्वच्छ हवा घेण्यासाठी फिरायला गेले की हमखास धुर आपण नाका तोंडात भरून येतो. असा हा पालापोचोळयाचा विविध तर्हेने बागेत उपयोग करता येतो. त्याचे उत्तम खत बनवता येते. सुका पालापाचोळा हा कुंड्या व वाफे भरण्यासाठी करता येतो. तसेच एकादा ड्रमला तळाशी छिद्र पाडावे. त्यात नारळाच्या शेंड्या टाकाव्यात व त्यावर सुकापालापाचोळा भरावा. त्यावर रोज थोडे थोडे पाणी शिपडांवे.  तळाशी बाहेर येणारे पाणी झाडांना टाकावे. त्याचे परिणाम छान येतात. तसेच चार- सहा महिण्यात ड्रम मध्ये छान कंपोस्ट तयार होते त्याच वापर आपण बागेत करू शकतो.

असा हा सुका पालापाचोळा हा जमीनीवरील, शेतातील झाडांच्या बुंध्याशी व कुंड्या, वाफ्याच्या पृष्ठभागावर पसरवला तर त्यात गांडूळे हे वाढू लागतात. त्यामुळे झाडे, कुंड्यातील रोपे हे टवटवीत होतात.

असा हा कचरा व्यवस्थापनाचा अध्याय. त्याचे प्रयोग आपल्या घरी नक्की करून पाहावेत.  व घरच्या घरी विषमुक्त भाजीपाला पिकवावा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

निशुल्क मार्गदर्शनासाठी संपर्कः ९८५०५६९६४४

www.gacchivarchibaug.in

 

%d bloggers like this: