फ्लॉवरच्या ( फुलकोबी) पानांचे सुप..

या भाज्यांची पाने बाजारात मिळत नाही. कारण त्याला काही बाजारमुल्य नाही. पण पोषण मुल्य भरपूर असते. आणि बाजारात मिळाले तरी त्यावरील विषारी औषधांची फवारणी व उग्र वासानेच मळमळायला होते.  तर आपण खातो त्या भाज्यांची कशाप्रकारे जेवणात उपयोग करावा याची माहिती


HOW TO MAKE SOUP OF FLOWER LEAFS

फ्लॉवरच्या ( फुलकोबी) पानांचे सुप…

Photo by Kaboompics .com from Pexels
Photo by Kaboompics .com from Pexels

आपण रोजच्या खाण्याबाबत बारिकाईने विचार केला तर लक्षात येईल की आपण त्याच त्याच ठराविक भाज्या खात असतो. रानभाज्या तर डोळ्यांना दिसत नाही. आपल्या बागेत उगल्या तर त्या ओळखू येत नाही. पण बाजारातील भाज्यांचे इतर अवशेष उदाः फ्लॉवरची पाने, रताळीची पाने, मुळ्याची पाने, बिटची पाने यांचीपण रोजच्या आहारात उपयोग करू शकतो. पण माहिती अभावी ते वाया जाते. अर्थात या भाज्यांची पाने बाजारात मिळत नाही. कारण त्याला काही बाजारमुल्य नाही. पण पोषण मुल्य भरपूर असते. आणि बाजारात मिळाले तरी त्यावरील विषारी औषधांची फवारणी व उग्र वासानेच मळमळायला होते. तर आपण खातो त्या भाज्यांची कशाप्रकारे जेवणात उपयोग करावा याची माहिती आपल्यासाठी देत आहे.

घरी उगवलेला फ्लॉवर हा आकाराने छोटा व त्यास तयार होण्यास वेळ लागला तरी तो फारच चविष्ठ असतो. कधी कधी कुटुंबातील सदस्य संख्या जास्त असेल वर घरचा फ्लॉवर आकाराने छोटा असेन तर त्यात फ्लॉवरची पाने बारिक चिरून टाकली व नेहमीसारखी भाजी केली तर त्याची चव बेजबाब.. त्याला दुसरा शब्दच नाही. एकदा खाऊन पहा.. नि कळवा त्याची चव कशी होती.

फ्लॉवरच्या पानांचे सुप (Sup) सुध्दा छान लागते. जेवणाच्या आधी त्याचे सेवन केल्याने भूक वाढते. पचन उत्तम प्रकारे होते. अर्थात भाजी व सुपसाठी सरसकट सारीच पाने घेवू नये. कोवळी पानांची निवड करावी. फ्लॉवर येणे बाकी असेन तर पाने कमी खुडावित म्हणजे फ्लॉवर वाढीसाठी ते ठेवणे गरजेचे आहे व निब्बर, जाड पाने घेतली तर तर ते बेचव लागण्याची शक्यता असते. त्यामुळे फ्लॉवरच्या कंदाजवळील व फुलाजवळील पाने घेवू नये..

पहिल्यांदा सुप करत असाल तर ते प्रथम तुमच्यासाठी करा.. तुम्हाला व घरच्यांना थोडे थोडे चव चाखायला द्या.. त्यांना आवडले की त्याचे प्रमाण वाढवू शकता.. नाहीतर आपल्या एकट्यालाच डोक्यावर घेवून अंगोळ करण्याची वेळ यायची… असो…

सुप बनवण्यीची प्रक्रिया.. आपल्या एकट्या पुरते ग्लासभर सुप करावयाचे असल्यास निवडक पाने घ्यावीत. स्वच्छ धुवून बारिक चिरावीत.( चिरल्या नंतर ती मुठ दीड मुठ असावीत) त्यात टोमॅटो. चविपुरती मिरची, अगदी किंचीतसे मिठ, आठ दहा मेथीचे दाने व बारीक चिरलेली पाने मिक्सर मधे क्रश करावीत. छान पेस्ट तयार झाली की कढईत, पातेल्यात जिरे मोहरीची फोडणी द्यावी त्यात बारिक केलेली पेस्ट, मिठ, दोन चार लंवगा व मॅगी मसाला टाकून मंद आसेवर छान गदगदू द्यावी. त्यानंतर त्यात पाणी वाढवावे. छान उकळी द्यावी. सुप तयार.

सावधानः बाजारात मिळणार्या फ्लॉवर पानांचा सुपसाठी वापर करू नये.

आपल्याला लेख व रेसीपी आवडल्यास नक्की कळवा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. Call/message/ wts app call 9850569644/ 8087475242

# Indian_recipe, #Sup

कॅकट्स व संक्यूलंटस साठी कोणते पॉटींग मिक्स वापरावे?
होम कंपोस्टींग कसे करावे?

How to avoid this Five types of dangerous Foods …

वरील पाचही पदार्थ हे विविध महागडी आजारपण वाढवण्यास मुख्यतः काम करत आहेत. बरेचदा डॉ. हे पदार्थ कमीतकमी सेवन करण्याचे सुचवतात.


cropped-cropped-1-38-2

How to avoid this Five types of dangerous Foods …

गच्चीवरची बाग, नाशिक व्दारे घरच्या घरी नैसर्गिक पध्दतीने अर्थातच रसयानमुक्त पध्दतीने भाज्या पिकवून देतो व त्यासाठी आम्ही मार्गदर्शन ही करतो.
पण या भाज्या घरी पिकवल्याने नेमका आपल्या आरोग्यात काय बदल होतो ते येथे नमूद करणार आहे. घरी पिकवलेल्या भाज्यांचे सेवन केल्याने पाच प्रकारचे खाद्यपदार्थ हे आपल्या जेवणातून हळू हळू कमी होतात व नंतर बाद होतात. जे आज सर्वाथाने विषारी आहेत. किंवा विषं टाकूनच आपल्या खाण्यातून पोटात जातात.

 

१)साखरः घरच्या भाज्या सेवन होत असल्या की आपल्या रोजचा चहातील साखर ही कमी कमी होत जाते. मी याचा अनुभव स्वतः घेतला आहे. किंवा इतरांच्या घरी चहा घेतांना त्यात साखर अधिक प्रमाणात वापरल्याचे लक्षात येते. तसेच बरेचदा paid Consultancy साठी जातो तेव्हा तेथील चहा, कॉफीतील साखरेचे प्रमाण जास्त असते. तेथे भाजीपाला लागवड केल्यानंतर काही महिण्यांनी चहातील साखरेचे प्रमाणात लक्षात येईल एवढे कमी झाल्याचे आढळून आले आहे. कारण नैसर्गिक पध्दतीने पिकवलेल्या भाज्या, फळातून आपल्याला सर्व प्रकारचे अन्नतत्व मिळत असल्यामुळे कुत्रिम साखर सेवन करण्याची इच्छा होत नाही. तोच अनुभव गुळ सेवनाबद्दल आला. साखर ही सफेद रंगाच्या पदार्थात येते. जे अधिक रसायने वापरून तयार करण्यात येते. आपल्याला साखर टाळावयाची असल्यास शक्यतो गुळ खावा…

२)दूधः दुध हे हाडांच्या मजबूतीसाठी गरजेचे आहे. पण आता A2, A1 दुधांचा फरक शास्त्रज्ञांनी स्पष्ट करून सांगीतला आहे. देशी गायीचा दूध हे आधुनिक आजार वाढवण्यास पुरक ठरताहेत. आणि गावरान, देशी गायीचे दूध सर्वत्र उपलब्ध होत नाही. आणि झालेच तर ते बरेचदा हारमोन्स वाढीचे इंजेक्शन दिल्यामुळे ते शरिरालाही घातक ठरतेय. पण घरच्या भाज्यांचे सेवन केल्यास दुध सेवन करण्याची इच्छा होत नाही. हा फरक मुख्यत्वे स्वानुभवावरून लक्षात आला आहे.

३)मासांहारः आज मासांहाराचे प्रमाण समाजात वाढलेले आहे. त्यामुळे मागणी तसा पुरवठा करण्यासाठी इंजेक्शनं देवून त्यांची अत्पावधीत जिवांची वाढ करतात. व ते लोकांना खावू घातले जाते. पण घरच्या भाज्या सेवन सुरू झाले तसे दर आठवड्याला होणारा मांसाहार हा महिण्यावर गेला नंतर तो बंदच झाला. आता इच्छा होत नाही.. ही कमाल फक्त घरच्या भाज्यांनीच केली आहे हे मी सांगू शकतो.

४)मीठः आज आहारात मीठाचे प्रमाण वाढले आहे. जे काही फास्टफूड आहेत त्यात प्रचंड प्रमाणात मीठ टाकलेले असते. घरच्या भाज्या सेवन केल्याने आहारातील मीठ सुध्दा कमी कमी होत गेले याचा अनुभव मला व माझ्या कुटुंबियांना आला आहे. किंबहूना वरून अतिरिक्त मीठ घेण्याची गरज पडत नाही. अतिरिक्त मीठ सेवनामुळे तब्बेत वाढतच नाही तर अंगाला सुज दिसते.

५)शेल्फ फूडला सुट्टीः घरच्या भाज्या सेवन केल्याने बेकरी प्रोडक्टस,जंक फूडस, पॅकेट्स फूड, तळलेले पदार्थ यांनाही आपोआप फाटा फुटतो. याचाही अनुभव आला आहे.
वरील पाचही पदार्थ हे विविध महागडी आजारपण वाढवण्यास मुख्यतः काम करत आहेत. बरेचदा डॉ. हे पदार्थ कमीतकमी सेवन करण्याचे सुचवतात.

घरच्या भाज्या खाल्यांने सर्व प्रकारचे नैसर्गिक तत्व त्यात आल्याने रात्रीची झोप शांत लागते व दिवसभर उत्साहही जाणवतो. छोट्या छोट्या आजारांना गुडबाय म्हटले जाते. थोडक्यात आपला दवाखाण्याचा खर्च वाचतो व त्याचा अनुभव माझे कुटुंब घेत आहे.
घरी उगवलेली भाजी ही थोडी असली तरी ती समाधानाने पुरते याचाही अनुभव बरेचदा घेतला आहे. आता नविन प्रयोग सुरू केला आहे. घरी उगवलेल्या भाज्यांची भाजी रात्री केली ती खाल्ली, व उरलेली भाजी पुन्ही सायंकाळी व रात्री खाल्ली तर आणखीच चवदार लागते याचा अनुभव येवू लागला आहे. शिवाय ती नासत नाही.
त्यामुळे आपल्याल शक्य असल्यास उपलब्ध जागेत जमेल तेवढ्या भाज्या पिकवा. त्यांचे आठवड्यातून एक-दोनदा सेवन झाले तरी ते औषधासारखे नक्कीच काम करू लागते.

गच्चीवरची बाग, नाशिक.
८०८७४७५२४२

https://organic-vegetable-terrace-garden.business.site/

👆वरील link ही गच्चीवरची बाग नाशिक ची आहे. आपण या site वर click करून आपला review नोंदवावा. आपल्या या एका प्रयत्नाने आम्ही करत असलेले पर्यावरण पुरक काम व निःशुल्क मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल.
संदीप चव्हाण नाशिक.

Fast Food? TMAK Book 5/636

घरचा पानकोबीची चव वेगळीच असते. एकदाच त्याची भाजी करा. यथासावकाश कॅबेज मोठा झाला. त्यांनी कढईत फोडणी दिली. घरातील मुलगी केवळ फोडणी दिल्याबरोबर भाजीच्या नुसत्या सुंगधाने तो तिला पहिल्यांदा खावासा वाटला. यातच घरच्या भाजीचे महत्व लक्षात येते.


menu-3206749_1280.jpgमुलं पालेभाज्या खायला नाक का मुरडतात? फास्ट फूड, जे अबाल वृध्दांना का आवडत? थोडा विचार तर करा… संदर्भः तुम्हाला माहित आहे का? पान. न.१२ कोट न. ५/६३६“अहो आमची मुलं भाज्या खायलाच नाही म्हणतात”. अशी प्रत्येक गृहदक्ष असलेल्या आईची तक्रार असते. आपण फक्त तक्रार करतो. त्यावर उपाय शोधत नाही. अर्थात त्यावर आजच्या बाजारातील उत्पादनांनी बेमालूम तोडगा काढलाय. मुलांना अमूक तमूक पोषणासाठी आमची उत्पादने वापरा. मग काय आपण ती रासायनिक दुधात देवून त्यांना वाढवत असतो. किंवा मुलांना समजायला लागल की दुकानात मिळाणारी दोन मिनटांत तयार होणारा किंवा पॅक्ड असणार्या उत्पादनांना बळी पडतात. त्यात “तेढा है लेकीन मेरा है” पासून तर कुरकुरे, चिप्स पासून सारेच आले. स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवून तयार केलेले पदार्थ व तेही कनिष्ठ अशा प्लास्टिकच्या वेष्टनात मिळायला लागलेत.बरं हे फक्त मूलंच खात नाही. आपल्या मोठ्यांच्या जिभेलाही त्याची चव लागली की ते खावेसे वाटते. बरं ते एवढंस खावून पोट भरणं सोडाच खाल्ल्याचे समाधानही मिळत नाही. अर्थातच त्यात त्यांनी अशा प्रकारचे रसायनं मिसळेली असतात. की ते खात रहावसं वाटतं. याला चटक लागणं नाही तर व्यसन लागणं म्हणतात. तर अशी ही उत्पादने वय झालेल्यांनाही आवडतात. जसे मूलांना कार्टुन बघावसं वाटतं तसेच वृध्दांनाही आवडतं. त्यातलं ढिशुम ढिशुम…पाहण्यातून अबाल वृध्द सारेच आनंद लुटतात. कारण लहान मूल व वृध्द मंडळी याची आवड निवड सारखीच होत जाते. काही वृध्द व्यक्ती तर दुकानात मिळणारी साखरेच्या गोळ्या खातांना पाहिली आहेत. असो…आपण कर्ते म्हणून याचा विचार केला पाहिजे. फक्त वयच तसं आहे म्हणून तो प्रश्न बाजूला सारण्यासारखा नाही. हे सारं चटपटीत खावंस वाटणं हे सारं रासायनिक प्रिर्झेव्हेटीवची कमाल आहे. जी आपल्याला घातक असतात. आपल्या परंपरेत असे फास्ट फूड नाहीच काहो? दोन मिनटातं तयार होणारी पदार्थ. शेवया, पोहे, मुरमुरे, ओली भेळ, राजगिरांचे लाडू… पण हे सारं आपण लक्षात कुठं घेतो. तर असो… मुद्दा होता. मुलं भाज्या खात नाही..माझा एक अनुभव आपल्याला सांगावासा वाटतो…दहा वर्षापूर्वी नुकतीच बागेला गच्चीवर सुरवात केली होती. टेरेसवरच्या बागेत चार टोमॅटो पिकले होते. ते खाली किचनमधे बायकोला आणून दिले. तिनेही नुकतेच बाजारातून टोमॅटो विकत आणले होते. बाजारातले व घरचे टोमॅटो तिने एकत्र करून फ्रिज मधे ठेवून दिले. माझा मुलगा बाहेर खेळून आला व त्याला टोमॅटो खावसा वाटला. बायकोने त्याला घाई गडबडीत हाताला आला तो टोमॅटो त्याच्या हातात दिला. त्याला तो खूप आवडला. त्याला दुसरा खावासां वाटला. तिने दुसरा दिला. पण या वेळेस त्याने तोंडातून थूंकून टाकला. छि… काय हा टोमॅटो, म्हणून खेळायला गेला.नंतर यावर घरात चर्चा झाली. मी जरा चौकशी केली असता. असे लक्षात आले की पहिला टोमॅटो त्याने जो खाल्ला, त्याला आवडला तो बागेलतला विषमुक्त होता. तर दुसरा हा बाजारातला होता. बघा मुलांना खाण्यांच्या बाबतीत जी नैसर्गिक चव आहे त्याला ते किती पटकन प्रतिक्रीया देतात. (बाजारातल्या भाज्या न खाणं म्हणजे त्याला चवच नसते हे मुख्य कारण आहे) आपण मोठ्यांच्या जिव्हा आता बोथट झाल्या आहेत. त्या त्या भाजीचे महत्व आहे म्हणून गिळलं नाही गेलं तरी ते पोटातं ढकलतो आहोत. नेमकं मुलाना काय आवडतं त्याचा कुत्रीम इंसेन्स पॅक्ड् फूड मधे बेमालूमपणे मिसळेला असतो. जो मोठ्यांच्या लक्षात येत नाही. पॅक्ड फूड खाण्यानेच भारतातील मूलांचे लठ्ठपणाचा आजार वाढतोय. गुबगुबीत असणं वेगळं व अंगावर सुज असणं वेगळं हे आपल्या लक्षात येत नाही किंवा जाणून बूजून त्याकडे दुर्लक्ष करत आहोत.घरच्या भाजीचा दुसरा एक अनुभव आहे. आम्ही एका ताईंच्या घरी भाजीपाल्याची बाग फूलवयाला सुरवात झाली. त्यात पान कोबी (कॅबेज) ही लागवड केला. पण घरातली आठवतील जाणारी मुलगी म्हणाली काका बागेत पान कोबी नका लावू. मला अजिबात आवडत नाही. त्या ताईही म्हणाल्या की जागा अडेल व तसेही कुणाला आवडत नाही म्हणून लागवड करूच नका. मी त्यांना आग्रह केला. घरचा पानकोबीची चव वेगळीच असते. एकदाच त्याची भाजी करा. यथासावकाश कॅबेज मोठा झाला. त्यांनी कढईत फोडणी दिली. घरातील मुलगी केवळ फोडणी दिल्याबरोबर भाजीच्या नुसत्या सुंगधाने तो तिला पहिल्यांदा खावासा वाटला. यातच घरच्या भाजीचे महत्व लक्षात येते.एकूणच काय हरकत आहे. चार कुंड्यामधे चार भाज्या लावयाला. आपल्याला निसर्गाची घडी बसवून दयावयाची आहे. बाकी सारं काम निसर्गच करणार आहे. माझा अनुभव असा सांगतो की घरचा एक टोमॅटो सुध्दा आपल्या जेवणातील वरण हे चवदार बनवू शकते. बघा… प्रयत्न करून. जमेलच.

लेख आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर करा.cc tmak COVER.jpg

लेखाच्या आरंभी असलेले स्वलिखीत, स्वअनुभवीत, स्वः चिंतीत असलेल्या बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन संदर्भातील मोजक्या समर्पक शव्दातीत, बागप्रेमीनी फेसबूकवर लाईक्स केलेल्या मराठी- हिंदी भाषेतील डोळे उघडणार्या व कृतीला प्रवृत्त करणार्या ६३६ बोधपर वाक्यांचा संग्रह असलेले तुम्हाला माहित आहे का? पुस्तक. फक्त २०० रू. ( पोस्ट खर्चासहित)पुस्तक माहिती- (PDF Download)पुस्तक माहिती (Video)Online खरेदीसाठी लिंक पहा..पुस्तकाबद्दलची या पूर्वी प्रकाशीत झालेली माहिती वाचा…http://www.gacchivarchibaug.inटीपः अशाच टीप्स वाचण्यासाठी व्हाट्स अप करा… ९८५०५६९६४४

वाचकांची प्रतिक्रिया

%d bloggers like this: