HOW TO MAKE SOUP OF FLOWER LEAFS

फ्लॉवरच्या ( फुलकोबी) पानांचे सुप…

Photo by Kaboompics .com from Pexels
Photo by Kaboompics .com from Pexels

आपण रोजच्या खाण्याबाबत बारिकाईने विचार केला तर लक्षात येईल की आपण त्याच त्याच ठराविक भाज्या खात असतो. रानभाज्या तर डोळ्यांना दिसत नाही. आपल्या बागेत उगल्या तर त्या ओळखू येत नाही. पण बाजारातील भाज्यांचे इतर अवशेष उदाः फ्लॉवरची पाने, रताळीची पाने, मुळ्याची पाने, बिटची पाने यांचीपण रोजच्या आहारात उपयोग करू शकतो. पण माहिती अभावी ते वाया जाते. अर्थात या भाज्यांची पाने बाजारात मिळत नाही. कारण त्याला काही बाजारमुल्य नाही. पण पोषण मुल्य भरपूर असते. आणि बाजारात मिळाले तरी त्यावरील विषारी औषधांची फवारणी व उग्र वासानेच मळमळायला होते. तर आपण खातो त्या भाज्यांची कशाप्रकारे जेवणात उपयोग करावा याची माहिती आपल्यासाठी देत आहे.

घरी उगवलेला फ्लॉवर हा आकाराने छोटा व त्यास तयार होण्यास वेळ लागला तरी तो फारच चविष्ठ असतो. कधी कधी कुटुंबातील सदस्य संख्या जास्त असेल वर घरचा फ्लॉवर आकाराने छोटा असेन तर त्यात फ्लॉवरची पाने बारिक चिरून टाकली व नेहमीसारखी भाजी केली तर त्याची चव बेजबाब.. त्याला दुसरा शब्दच नाही. एकदा खाऊन पहा.. नि कळवा त्याची चव कशी होती.

फ्लॉवरच्या पानांचे सुप (Sup) सुध्दा छान लागते. जेवणाच्या आधी त्याचे सेवन केल्याने भूक वाढते. पचन उत्तम प्रकारे होते. अर्थात भाजी व सुपसाठी सरसकट सारीच पाने घेवू नये. कोवळी पानांची निवड करावी. फ्लॉवर येणे बाकी असेन तर पाने कमी खुडावित म्हणजे फ्लॉवर वाढीसाठी ते ठेवणे गरजेचे आहे व निब्बर, जाड पाने घेतली तर तर ते बेचव लागण्याची शक्यता असते. त्यामुळे फ्लॉवरच्या कंदाजवळील व फुलाजवळील पाने घेवू नये..

पहिल्यांदा सुप करत असाल तर ते प्रथम तुमच्यासाठी करा.. तुम्हाला व घरच्यांना थोडे थोडे चव चाखायला द्या.. त्यांना आवडले की त्याचे प्रमाण वाढवू शकता.. नाहीतर आपल्या एकट्यालाच डोक्यावर घेवून अंगोळ करण्याची वेळ यायची… असो…

सुप बनवण्यीची प्रक्रिया.. आपल्या एकट्या पुरते ग्लासभर सुप करावयाचे असल्यास निवडक पाने घ्यावीत. स्वच्छ धुवून बारिक चिरावीत.( चिरल्या नंतर ती मुठ दीड मुठ असावीत) त्यात टोमॅटो. चविपुरती मिरची, अगदी किंचीतसे मिठ, आठ दहा मेथीचे दाने व बारीक चिरलेली पाने मिक्सर मधे क्रश करावीत. छान पेस्ट तयार झाली की कढईत, पातेल्यात जिरे मोहरीची फोडणी द्यावी त्यात बारिक केलेली पेस्ट, मिठ, दोन चार लंवगा व मॅगी मसाला टाकून मंद आसेवर छान गदगदू द्यावी. त्यानंतर त्यात पाणी वाढवावे. छान उकळी द्यावी. सुप तयार.

सावधानः बाजारात मिळणार्या फ्लॉवर पानांचा सुपसाठी वापर करू नये.

आपल्याला लेख व रेसीपी आवडल्यास नक्की कळवा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. Call/message/ wts app call 9850569644/ 8087475242

# Indian_recipe, #Sup

कॅकट्स व संक्यूलंटस साठी कोणते पॉटींग मिक्स वापरावे?
होम कंपोस्टींग कसे करावे?