fbpx

Gacchivarchi Baug : Grow Organic

Grow Organic Consulting & Green Bussiness Coaching (Gardening Course)

bishcom

Amezing Potting Mix

Biomass Shreding Compost Materaial (BISHCOM)

(

B

कोकोपीट पेक्षा उत्पादनशील व स्वस्त

बिशकॉम हे पालापाचोळ्याचा चुरा असलेले पॉटींग मिक्स आहे. जे कोकोपीट पेक्षा अधिक उत्पादनशील व अधिक वेळेपर्यंत परिणाम देत राहते. वजनाने हलके असल्यामुळे कुंड्याही हलक्या होतात. तसेच त्याचा इतर चार प्रकारेही वापर करता येतो. 1) Potting Mixer 2) Compost Khad 3) Mulching 4) Composting Mediem (Powder)


हे कसे तयार होते?

कुंडी भरण्यासाठी आम्ही गेल्या दहा वर्षापूर्वी नारळ शेंड्या व पालापोचोळा वापरला जायचा. पण त्यांचे कालांतराने कुजून मऊसूत मातीत रूंपातर व्हायचे त्यामुळे मुळांजवळ ओलावा राहिल्यामुळे रोपांची चांगली वाढ होत नव्हती. त्यामुळे सुका पालापाचोळ्यांचा चुरा तयार केला. त्यात जिवामृत व देशी गायीचे गोईत्र टाकून आंबवले जाते. त्यानंतर त्यास सावलीत वाळवून कुंड्या भरण्यासाठी उपयोग केला असता. त्याचा परिणाम हा उत्तमरित्या आला. सध्या आमच्या सोशल मिडीयावर प्रदर्शीत केलेल्या सर्व फिल्मस, रिल्स मधे दर्शविलेला भाजीपाला हा BISHCOM या पॉटींग मिक्सनेच तयार करण्यात आला आहे.


BISHCOM वापरल्यानंतर नेमकं काय होतेय ?


Bishcom वापरल्यामुळे कुंड्या वजनाला हलक्या होतातच पण शिवाय त्यातील माती ही भुरभुरीत राहते. कुंड्यामधील माती वर्षानुवर्ष बदलली जात नाही. त्यामुळे फक्त खत व माती वापरून भरलेली कुंडी कालांतराने दगड होते. पाणी जास्त धरून ठेवते. त्त्यामुळे झाडं ही दगावतात. म्हणूनच वर्षभरात कुंड्या RePotting होणे गरजेचे असते. त्यात १० टक्के माती , १० टक्के खत व ८० टक्के Bishcom वापरले तर माती उत्पादनशील तयार होते. हे सांगणारा हा व्हीडीओ….


बाग प्रेमींच कुंड्या भरतांना नेमकं चुकतं कुठे?

सहसा बाग प्रेमी व उत्साही मंडळी रंगी बेरंगी कुंड्या विकत घेतात. त्यांना असं वाटतं की रंगीत कुंड्यामुळेच झाडं चांगली वाढतात. हो, एक वेळ रंगीत कुंड्यामुळे बाग चांगली दिसेलही पण कुंड्यामधील झाडं ही तजेलदार, टवटवीत व फुलांनी बहरलेले असतील तरच बाग जिवंत वाटेल. कुंड्यां पेक्षा त्यात काय भरायचे हा महत्वाचा मुद्दा आहे. जसे की चांगले कपडे घातले म्हणजे मनुष्यांची पारख होत नाही. तो त्याच्या गुणांवरून ओळखला जातो. हा व्हिडीओ…


Bishcom वापरल्याची उदाहरणे…

बिशकॉम हे प्रत्येक हंगामात उत्तमरित्या काम करते. अगदी उन्हाळ्यात सुध्दा. भरभरून भाजीपाला येतो. ज्याला कळालं तो बिशकॉमच्या प्रेमात पडतो.

बिशकॉम व कोकोपीट मधील फरक..

कोकोपीट हे समान आकाराचे तुकडे असतात. जे एकदा कुजायला लागले की एकाच वेळेस त्याचे खतांत रूपांतर होते. खतयुक्त माती ही पाणी जास्त धरून ठेवते. त्यामुळे वनस्पंतीना विवध आजाराची लागण होते. अगदी मुळकुजपासून ते शेंड्याचा चुरडा होणे. यावर उपाय म्हणून बिशकॉम हे उत्तम ठरते. कारण याचा चुरा हा विविध आकाराचा व घनतेचा थोडक्यात वजनाचा असल्यामुळे या सर्वाची एकाच वेळेस कुजत नाही. पर्यायाने कुंडीत झाडे रोगांना बळी पडत नाही. त्यामुळे बाग ही सशक्त असते.


कोकोपीट बद्दल सकाळमधे प्रकाशीत झालेला लेख…Click करा.

Let’s make something beautiful together.


Join Our Whats app

बिशकॉम वापरायला तुम्हाला आवडेल का?

Like ?(required)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Ride on post Covide Effects Dangerous Food In INDIA Importance Of Organic Potato Importance Of Onion In Daily Life Importance of Garlic In Dialy Life
Ride on post Covide Effects Dangerous Food In INDIA Importance Of Organic Potato Importance Of Onion In Daily Life Importance of Garlic In Dialy Life
Ride on post Covide Effects Dangerous Food In INDIA Importance Of Organic Potato