फ्रेंच बिन्स ,घेवडा, श्रावण घेवडा, फरसबी


तुमच्या आमच्या आवडीची, बाग गच्चीवरची.

नमस्कार, मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक येथून.

आज आपण घेवडा या भाजीबद्दल माहिती घेणार आहोत.

फ्रेंच बिन्स यालाच आपल्याकडे घेवडा, श्रावण घेवडा, फरसबी असेही म्हटले जाते. फ्रेंच बीन हे शेंगवर्गीय  असल्याने हे चवीला अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असते. सफेद पुलाव करतांना याची छान चव लागते. तसेच बटाट्याच्या भाजीबरोबर याची चव तर अप्रतिमच…

याची लागवड जुलै, संप्टेबर व जाने मधे करावी. पर्यंत छान फळ धरतात. गुच्छाने शेंगा लागतात. कच्च्या खाल्यातरी मातीसारखी उत्तम चव लागते.

घेवड्याचे बिज. अर्धा सेंटीमिटर लांबीचे लांबट व टपोरे सफेत व लाल ठिपके असतात. याची लागवड एक चौरसफूटात चार चार बोटाच्या अंतरावर करावी. ही झुडुप वर्गीय फळभाजी आहे.  बि अति पावसात लावल्यामुळे कुजून गेल्यास पून्हा याची लागवड करावी. तसेच याच्या आजूबाजूला पालेभाजीची लागवड करू शकता. 

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. 9850569644

Advertisements
%d bloggers like this: