बागकाम हा आपल्या प्रत्येकाचा आवडता छंद. मानसिक तानतणाव निवारण, स्वच्छ प्राणवायू, कचरा व्यवस्थान असे बरेच काही साध्य करता येते. काहीना फुलांची आवड, तर काहीना रंगीत पानांच्या झुडुपांची आवड, तर काहीनां विषमुक्त भाजीपाला निर्मितीची आवड, त्यातही कितीतरी प्रकार, वेडं लागत… बागकामांच. काही सुचतच नाही. हे एक टोक असतं तर दुसरं टोक म्हणजे करून करून थकलो की त्याचा परिणाम दिसत नसलं की दुर्लक्ष करतो. बागेतील श्रमाचे परिणाम दिसून यायला खर तर आपण बागकामाबद्दल व कचरा व्यवस्थापनाबद्दल निरिक्षर असतो. तर यात आताही साक्षर होण्याची गरज आहे का. असा प्रश्न पडणार.. हो.. साक्षर होणं हे फार गरजेचे असतो. नाहीतर दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं होतं. ( पुढे वाचा)
मुळात बागेतील झाडांना काय दिल्याने काय होतं याचीच मुळी कल्पना नसते. माळीकाम करणारी व्यक्ती सांगते म्हणून करत असतो. तेही सारी रसायने असतात. रसायनांच एक आहे.. ती मातीचे शोषण करतात. मातीत आहे तोपर्यंत बाग म्हणजे चार चांद… पण एकदा का त्याचे सत्व संपले की सुरवात होते मनाची फरफट… आपलीपण आणी झाडांचीपण…
रसायनांपेक्षा नैसर्गिक खते व औषधेही उशीरा का होईना पण चांगले परिणाम देवू लागतातच पण ते निरंतर टिकणारे असतात. गच्चीवरची बागेने याचा विचार करून आम्ही वापरत असलेले Garden Care material आता Garden Care Basket च्या स्वरूपात आणले आहे.
यात नैसर्गिक स्वरूपातील द्राव्य विद्राव्य खते आहेत. तसेच औषधेपण आहेत.
यात शेणखत, निमपेंड, राख, तंबाखू पावडर हे पावडर स्वरूपात आहेत तर गोमुत्र, जिवामृत, वर्मीवाश, इंजाईम आहेत. ज्याचा वापर किड नियंत्रणासाठीही होतो तर काहीचा वापर हा संजीवक म्हणूनही केला जातो.
या बास्केट मधील साहित्य आपल्या बागेला गरजेनुसार वापरली तर नक्कीच त्याचे पाचपट फायदे मिळतील. म्हणजे मासिक किंवा व्दैमासिक स्वरूपात ५२५ रू. आपण बागेला खर्च केला तर त्याचे पाचपट आपल्याला परिणाम दिसतील. थोडक्यात आपली भाजीपाल्याची बाग असल्यास २५०० रू. याचे भाजीपाला मिळेल.
यात ५ किलो शेणखत (१००रू) १ -१ किलो निमपेंड, राख, तंबाखू पावडर..(१५० रू.) व १-१ लिटर प्रमाणात फ्रुट इंजाईम, जिवामृत, गोमुत्र, वर्मीवाश, (१००रू) दशपर्णी (२५रू) यांचा समावेश आहे. तसेच १५० रू. किमतीचे १० किलो BISHCOM (Organic Potting Mix) सुध्दा आहे. ज्याचा उपयोग कुंड्या भरण्यासाठी व खत म्हणूनही वापर करू शकता.
बागेतील झाडांना खालील प्रमाणे आलटून पालटून खते, संजीवक द्रवे व कीड फवारणी करावी.
१ ला रविवार- खतः शेणखत संजीवकः गोमुत्र फवारणीः गोमुत्र
२रा रविवार खतः निमेपंड, संजीवकः जिवामृत फवारणीः जिवामृत
३रा रविवार खतः राख, संजीवकः वर्मीवाॅश फवारणीः वर्मीवाश
४ था रविवार खतः तंबाखू पावडर( कीड नियंत्रण व मुळकुज होऊ नये म्हणून) संजीवक फ्रुट इंजाईम फवारणीः दशपर्णी.
५ वा रविवार खतः कंपोस्ट खत, संजीवकः हिरवा कचरा, फळांच्या सालीचे आंबवलेले पाणी, फवारणीः गोमुत्र
अधिक माहतीसाठी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
You must log in to post a comment.