नाशिकची नित्या पाटील हिने गच्चीवरची बाग हा विषय निवडून डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत रजत पदक विजेती ठरली. तिचे गच्चीवरची बागेबद्दलचे अभिमत..
योजकः तत्र दुर्लभः Meaning is “The Person Who can see the Utility of Things & use them properly is rare”
घराच्या टेरेसवर तशी तर बाग फुलवली जाते ती फुलांची, शोभेच्या झाडांची पण गच्चीवर पालेभाज्या पिकवणे ही नवी पध्दत नाशिकच्या संदीप चव्हाण यांनी त्यांच्या प्रयोगातुन दाखवून दिली आहे. जैविक खते , टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तु वापरून ही बाग कमी खर्चिक आणि इको फ्रेंडली आहे.
Dr. Bagicha… E book on Organic Vegetable Terrace Gardening… grow your Chemicale Free own food at your home
घरच्या घरी भाजीपाला कशा उगवायाच्या याचे मागर्दशर्न करणारी पुस्तक थेट आपल्या मोबाईल व संगणकावर ई स्वरूपात…
गच्चीवरची बाग व्दारे Dr. Bagicha हे ई-पुस्तक आपल्या हाती देतांना विशेष आनंद होत आहे. कोव्हीड- १९ या आजारामुळे lockdown झाले आहे. आपल्या प्रत्येकाच्या वेळ आहे. या काळात वेळ सत्कारणी लावण्याचे अनेक पर्याय हाताशी आहेत. त्यातील एक पर्याय म्हणजे घरीच विषमुक्त भाज्या उगवणे. त्यासाठी अनेक फोन येत आहेत. पण प्रत्यक्ष रूपात आपल्याहाती छापिल पुस्तक पोहचवणे अवघड आहे. तसेच या काळात गच्चीवरची बाग उपक्रम आर्थिक दृष्टया अडचणीत आला आहे. त्यास हातभार लागावा म्हणून या पुस्तकाची निर्मिती केली आहे. वरील दोनही गरजा लक्षात घेवून Dr. Bagicha हे ई-पुस्तक तयार करण्यात आले आहे.
पुस्तकाचे पहिली पाच पाने पाठवत आहोत. ते वाचून आपण 9850569644 या क्रंमाकावर गुगल पे / Instamojo चा वापर करू शकता. पुस्तकाच्या दुसर्या पानावर त्याचे सहभाग मुल्य नोंदवण्यास आले आहे. तसेच महत्वाची सुचना केली आहे. सहकार्याच्या अपेक्षेत..
शहरी शेतीच्या प्रसारासाठी आयुष्य झोकून दिलेला तरुण
एखादा धनसंपन्न असलेला मनुष्य आजारपणाला कंटाळलेला, अंथरुणावर खिळलेला असेल आणि त्याला विचारलं की खरी संपत्ती कोणती तर तो निशंकपणाने सांगेल की, आरोग्य हीच खरी संपदा आहे. “आरोग्यम् धनसंपदा”. आरोग्य चांगले असेल तर धन संपत्तीत वाढ होईल. आधुनिक युगात माणूस हा आनंद व सुखाच्या शोधात असतो. सुखासाठी साधन, संपत्ती मिळवण्यासाठी धडपड करतो. तो पैशाने श्रीमंत, स्थिर होतोही, पण आपले अनमोल असे आरोग्य गमावून बसतो. ना खाण्यापिण्याकडे लक्ष, ना रोजच्या व्यायामाकडे. त्यातच आपण खात असलेले अन्न ही रसायनं टाकून पिकवलेलं असेल तर “थाली में जहर”च!
शेतीचं जसं जस यांत्रिकीकरण होऊ लागलं तसतसं अन्नधान्य पिकवण्यासाठी रासायनिक खते व रासायनिक कीटकनाशंकाचा वापर वाढू लागला. ज्या भाकरीच्या श्वाश्वतीत तो धडपडू लागला. त्या विषारी भाकरीनेच त्याचा घास कधी घेतला हे त्याच त्यालाच कळलं नाही. कधी ऐकले नाहीत असे आजार व त्याला जोगोजागी कर्करोग होऊ लागले. बरं हे मानव प्राण्यापुरतच मर्यादित राहिलं नाही, तर जल, जंगल, जमीन, पशू, पक्षी यांनाही मारक होऊ लागलं. त्यातच वाढत्या शहरीकरणामुळे डंपिंग ग्रांऊड वाढू लागलेत.
माणसं शहरात नाही तर कचर्याच्या कुंडीत राहू लागलेत असे म्हटले तरी चालेल. यावर उपाय काय? यावर असा उपाय पाहिजे, जो लोकांना मनापासून पटला पाहिजे. त्यात लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. नुसता सहभाग नाही. तनमनधन देवून तो सहभाग घेता आला पाहिजे. हे शक्य आहे का? हो शक्य आहे. ही गोष्ट आहे नाशिकच्या तरुणांची, फक्त गोष्ट नाही, तर उद्योगारंभातील एका टप्यावरची. यशोगाथा ‘स्मार्ट उदयोजक’च्या वाचकांसाठी.
आमीर खान निर्मित ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात शेतीमध्ये रसायनांचा वाढता वापर व त्याचे दुष्परिणाम यावर एक भाग होता. या भागातून प्रेरणा घेत नाशिकच्या संदीप चव्हाण यांनी आपली शेतीची, निसर्गाची, कचरा व्यवस्थापनाची आवड व छंदाचे रूपांतर उद्योगात करून व्यवसायाची मुहर्तमेढ रोवली. उद्योगाचं नाव ठेवलं ‘गच्चीवरची बाग’.
गाव मागच्या पिढीतच सुटलं होतं, पण गावाची, शेतीची ओढ कायमच. त्यातच आयुष्याच्या एका टप्प्यावर जाणवलं की आपल्याला शहरातील व त्यातल्या त्यात माध्यमांतील नोकरीपेक्षा शेतीत आवड जास्त आहे. नोकरीत एक तप पूर्ण झालं होतं, पण त्यातील हेवदावे, स्पर्धा कधीच संपणारी नव्हती व हे सारे रात्रदिवंस कष्ट हे नेमके कुणासाठी हा यक्ष प्रश्न उभा राहिला आणि एक दिवस नोकरीला राम राम ठोकला.
आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचं याचा विचार केला. तेव्हा लक्षात आलं की आपल्याला निसर्गाची खूप आवड आहे. शेती केली पाहिजे. त्यातच पुणे, मुंबई, नाशिकात कचरा वेचणार्यांचा प्रश्न ऐरणीवर होता. नाशिकचे डंपिंग ग्रांऊडही एकदा पालथ घालून झालं. त्यातून आपला ओला कचरा आजपासून फेकायचा नाही असा मनाशी निश्चय करून वैयक्तिक पातळीवर विविध प्रयोग पूर्वीच सुरू झाले होते. या कचर्याचं काहीतरी करू म्हणून केलेली सुरुवातच यशस्वीतेत होत गेली. विविध प्रयोगांना हाती यश लागलं आणि त्यातून सुरू झाला गच्चीवरची बागेचा प्रयोग.
विदेशी पाहुण्यांना ‘गच्चीवरची बाग’ समजावून देताना संदीप चव्हाण
बाजारातून काहीही विकत आणायचं नाही. हे विकत आणणंच खरं तर शेतकर्याला व शेतीला संपवत आहे, या निष्कर्षापर्यंत पोहोचलेला अभ्यास आता प्रत्यक्ष कृतीत आणण्याची वेळ होती. ती सिद्ध झालीसुद्धा. ‘गारबेज टू गार्डन’ अशी संकल्पना घेवून घरच्या घरीच रसायनमुक्त भाजीपाला कसा पिकवायचा या विषयी प्रयोग यशस्वी झाले. या अनुभवातून ‘गच्चीवरची बाग’ हे पुस्तकही प्रकाशीत झालं.
पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला. ही गोष्ट आहे २०१४ मधली. विविध वर्तमानपत्रांव्दारे नाशिकमधे जागृती झाली. आता तर सोशल मीडियामुळे याला चांगला प्रतिसाद मिळतोय. उदयोजकतेचे धडे वाचताना एक गोष्ट कळली की एखादा व्यवसाय व्यवसाय म्हणून साकारताना तो १ हजार दिवस चालवून पाहावा. जमला, टिकला तर तो अंगाखांद्यावर खेळवावा. झालंही तेच पहिली तीन वर्षं याला चांगला प्रतिसाद मिळाला.
हे फक्त त्यांच्याशी चर्चा करताना समजून येते. तर अशा अनुभवाधारावर गच्चीवरची बाग हे पुस्तक प्रकाशीत झालं. अशा अनुभवाआधारीत पुस्तक विक्रीतून घरोघरी पे कंन्सलटंसी सुरू झाली. कंन्सलटंसीतून २० टक्के माती व ८० टक्के पालापाचोळातून भाजापाल्याची बाग फुलूवून देण्याचे काम सुरू झाले. त्यातून नैसर्गिक खते, गोपालन, त्याआधारित कीटकनियंत्रके यांची निर्मिती सुरू झाली व सुरू झाला आवडीच्या उद्योगाच्या शिडात हवा भरण्याचं काम.
३१ मार्च २०१९ ला ‘गच्चीवरची बाग’ला सहा वर्ष पूर्ण झाली. सातव्या वर्षात पदार्पण झालंय. एकाट्याच्या खांद्यावर पेलण्याचं उद्योग धनुष्य आता सात जणांच्या खाद्यांवर वाटलं गेलंय. ताफ्यात आता छोटा हत्ती आहे. देशी गाय आहे आणि हे सारं करण्यासाटी छोटी हक्काची जागा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुभावाचं ज्ञान, जे अक्षय्य आहे. थायलंड, झिम्बांव्बे या देशातील विषमुक्त शेती, किचन गार्डनसोबत भारतातील विविध शेती प्रयोगांचाही प्रत्यक्ष भेटीतून अभ्यास करत या संकल्पनेचा पाया रचला गेला. घरच्या बागेत पिकवलेल्या भाज्यांतून, आलेल्या अनुभावतून ‘गच्चीवरची बाग’ पुस्तकाची पहिली आवृत्ती संपून दुसरी आवृत्ती प्रकाशीत झालीय.
सोबत “तुम्हाला माहीत आहे का?” या दुसर्या पुस्तकाचीही जोरदार विक्री सुरू आहे. “तुम्हाला माहित आहे का?” हे पुस्तक म्हणजे संदीप चव्हाण यांनी गच्चीवरची बाग या विषयावर घेतलेल्या कार्यशाळांमध्ये सांगितलेलं आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन या विषयीचे मुद्दे संकलित करण्यात आले आहेत. हे पुस्तक वाचतांना तर आपण त्यांची कार्यशाळाच अनुभवत आहोत असे वाटते. जे वाचकांसाठी आय ओपनींग ठरावं.
संदीप चव्हाण यांनी नाशिकमध्ये पाचशे घरांत भाजीपाला पिकवण्याचे काम सुरू केले आहे. दहा हजारांपेक्षा अधिक लोकांना बाग फुलवण्यास प्रेरीत केले आहे व तितकीच लोक रोज संपर्कात असतात. बाग-कचरा व्यवस्थापनाविषयी प्रश्न विचारतात. त्यांच्या कामाची विविध दृकश्राव्य तसेच मुद्रित माध्यमांनी त्यांच्या कार्याची दखल तर घेतली आहे. सध्या www.gacchivarchibaug.in व www.organic-vegetable-terrace-garden.com अशी दोन संकेतस्थळे आहेत. यावर आपण नक्कीच भेट देवून अधिक माहिती जाणून घेवू शकता व त्यांच्या संपर्कात राहू शकता.
लेखाच्या आरंभी असलेले स्वलिखीत, स्वअनुभवीत, स्वः चिंतीत असलेल्या बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन संदर्भातील मोजक्या समर्पक शव्दातीत, बागप्रेमीनी फेसबूकवर लाईक्स केलेल्या मराठी- हिंदी भाषेतील डोळे उघडणार्या व कृतीला प्रवृत्त करणार्या ६३६ बोधपर वाक्यांचा संग्रह असलेले तुम्हाला माहित आहे का? पुस्तक. फक्त २०० रू. ( पोस्ट खर्चासहित)
पर्यावरणपुरक काम विस्तारण्यासाठी अनेक जाहिरात संस्था निमंत्रीत करत असतात. आपल्या कार्यक्रमाची पेड जाहिरात करून इच्छुकांपर्यंत पोहचण्यापेक्षा इच्छुकांचाच थेट फायदा कसा होईल, या साठी काही करता येईल का या विचारातून ही भाग्यवंत योजना आम्ही आणली आहे.
आता जिंका सोनं, रोख बक्षीसं व गार्डन कीट गीफ्टस…
दिव्य मराठी, नाशिक या आघाडीच्या वृत्तपत्रासोबत २०१४ या वर्षी गच्चीवरची बाग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला मिळालेल्या अद्भूतपूर्व प्रदिसाद व यशानंतर भाजीपाला व बाग प्रेमीसाठी बक्षीसांची नवीन बाग प्रोत्साहन योजना आम्ही घेवून आलो आहोत. भाग्यवंत विजेत्यांना मिळणार ५ ग्रॅम सोनं, रोख बक्षीसं व गार्डेन कीट स्वरूपातील गीफ्ट्स मिळणार आहेत.
घर म्हटलं की त्याच्या टापटीप, सौंदर्यात, त्याच्या देखभालीत महिलांचा सहभाग हा कौतुकास्पद असतो. त्याच बरोबर आपल्या घरातल्यांची सर्वतोपरी आरोग्याची काळजी घेणं हे सुध्दा त्यात आलंच. घराचे, घरातले व सभोतालचे सौदर्यं वाढावे यासाठी आपण सुंदर झाडांची, फुलांची बाग फुलवतो. त्याच बरोबर आरोग्यदायी भाज्या फुलवणारी बाग सुध्दा फुलवतो. रासायनिक खत व फवारणीमुळे बाजारात मिळणार्या भाज्या या बेचव व गंभीर आजारांना आमंत्रित करणार्या असतात. या जाणीवेतूनच आपण घरच्या घरी भाज्या पिकवण्याचे, बागेला नैसर्गिक खत, द्राव्य खतं व फवारणी करत असतो. निसर्गाच्या काळजीसोबत आपल्याला आपल्या घरच्यांची काळजी करत असतो.
या सार्या पर्यावरण पुरक मुद्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून गच्चीवरची बाग नाशिकच्या बागप्रेमीच्या भाग्यवंत विजेत्यांना, सोनं, रोख बक्षीसं व गार्डन कीट –गीफ्टस जिंकण्याची संधी घेवून येत आहे.
गच्चीवरची बाग नाशिकमधे गेल्या सहा वर्षापासून पूर्णवेळ भाजीपाला उगवून देण्याचे तंत्र, मंत्र, ज्ञान-विज्ञान बाग प्रेमींना शिकवत आहोत व ते प्रत्यक्षात आणत सुध्दा आहोत. या सार्या निसर्ग संवर्धनाच्या कार्यात नाशिककर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या जोडले गेले आहेत. त्यांच्या सहकार्यानेच गच्चीवरची बाग हा सामाजिक उद्मशील उपक्रम पुढे जात आहे. मागील सहा वर्षात आमच्या सोबत जवळपास सहा प्रकारचे बागप्रेमी कुटुंब जोडले गेले आहेत.
विटांच्या वाफेत भाजीपाल्याची बाग फुलवणे…
पूर्वी केलेल्या विटांच्या वाफेचे पूर्नभरण करणे…
कुंड्या रिपॅटींग करणे….
बागेचे व्यवस्थापन करणे….
नैसर्गिक खत, द्राव्य खतं व बागेसंदर्भातील साहित्य खरेदी करणे.
रेफरंस मार्केटींग करणे…
या सहा प्रकारात वर्ग बाग प्रेमी वर्ग तयार झाले आहेत. या सहाही प्रकारातील बागप्रेमींना आम्ही बक्षीसं जिंकण्याची संधी घेवून आलो आहोत.
भाग्यवंत विजेत्यांची योजना का करत आहोत.
आम्ही गेल्या सहा वर्षापासून नाशिकमधे भाजीपाला पिकवून देण्यासाठी कार्यरत आहोत. आम्हाला आमचे कामाचे महत्व समजून घेत व त्याला व्यावसायिकतेची जोड दिल्यामुळे हे पर्यावरणपुरक काम विस्तारण्यासाठी अनेक जाहिरात संस्था निमंत्रीत करत असतात. आपल्या कार्यक्रमाची पेड जाहिरात करून इच्छुकांपर्यंत पोहचण्यापेक्षा इच्छुकांचाच थेट फायदा कसा होईल, या साठी काही करता येईल का या विचारातून ही भाग्यवंत योजना आम्ही आणली आहे.
विटांच्या वाफेत बाग फुलवणेः विटांच्या वाफ्यात आपण फोर लेअर फार्मिंग (पालेभाज्या उत्पादन करू शकता. यात २० टक्के माती व ८० टक्के पालापाचोळाचा वापर केला जातो. आपण गुंतवणूक केलेल्या वेळेच्या गुणोत्तरात आपण भाज्यां मिळवू शकता. या योजनेत आपल्या घराच्या आजूबाजूला, टेरेसवर आपण किमान १०० चौरसफूटांची भाजीपाल्याची बागचे सेटअप इंन्स्टॅलेशन करून त्यात भाज्या पिकवणे, फूलवणे गरजेचे आहे.
पूर्वी केलेल्या विटांच्या वाफेचे पूर्नभरण करणेः मागील सहा वर्षात विटांच्या वाफ्यात भाजीपाला पिकवणारे अनेक समाधानी कुटुंब आहेत. पण ही वाफे पुन्हा नव्याने व आमच्या पध्दतीने भरणे गरजेचे असते. म्हणजे त्यातून भाज्या उत्पादनांचे चक्र अव्याहत सुरू राहते. त्यांना या निमित्ताने विटांचे वाफ्यांचे आमच्याकडून पूर्नभरण करता येईल.
कुंड्या रिपॅटींग करणेः वर्षानुवर्ष आपल्याकडे बाग कुंड्यामधे बाग फुलवलेली असते. कुंड्या मातीने जड झालेल्या असतात. त्यातील एकादे झाडे मेले तरच आपण कुंडी नव्याने भरली जाते. पण आमच्या तंत्राप्रमाणे ५० ते ७० टक्के माती काढून जूनेच झाडं किंवा नव्याने झाडे लागवड केली जातात. कुंड्या वजनाने हलक्या होतात. बाग तजेलदार, हिरवीगार व फुलाने बहरते. या योजनेनुसार आपण आपली बाग रिपॅटींग आमच्याकडून करून घेवू शकता.
बागेचे व्यवस्थापन पहाणेः आम्ही नाशिकमधील गॅलरी, बाल्कनी, विंडो गार्डन, टेरस गार्डन व किचन गार्डनचे व्यवस्थापन पाहतो. दर पंधरा दिवसांनी किंवा महिण्याने याची विषमुक्त पध्दतीने बागेचे व्यवस्थापन करत असतो. यातील व्यवस्थापनात सातत्य असणे गरजेचे असते.
नैसर्गिक खत, द्राव्य खतं व बागेसंदर्भातील साहित्य खरेदी करणेः काही बाग प्रेमी जागेच्या अभावी व वेळेच्या उपलब्धतेनुसार आपली छोटी बाग स्वतःच फुलवत असतात. त्यासाठी लागणारे नैसर्गिक खत, द्राव्य खते व इतर साहित्य आम्ही पुरवत असतो. थोडक्यात ते आमच्याकडून वर्षभर काही ना काही खरेदी करत असतात. त्यांना सुध्दा वर्षाखेर खरेदीवर सुट मिळणार आहेत.
रेफरंस मार्केटिंग… आम्ही पर्यावरण संरक्षणासाठी लोकसहभागाने काम करत आहोत. घरच्या कचर्याचे खत करा असं सांगण्यापेक्षा त्याचे व्यवस्थापन करा व त्यातून विषमुक्त भाज्या पिकवा असे पटवून दिल्यानंतर लोक सहभाग वाढलेला आहे. गारबेज टू गार्डन असेलेली ही संकल्पना आपल्या नाशिकरांना, महाराष्ट्र व भारतभरातील बाग प्रेमींना आवडेलेली आहे. त्यांनी केलेल्या कामाचे कौतुकांतूनच गच्चीवरची बाग हा उपक्रम वाढत चालला आहे. आता या पुढे या योजनेत सहभागी करून आपल्यालाही त्यांचाही फायदा देणार आहोत. या अतंर्गत आपल्याला पांईट नुसार गुणांकन केले जाईल व त्याच्या एकून संखेनुसार पांईट्सधारकांना रिटर्न गीफ्ट मिळणार आहे. हे रिर्टन गीफ्ट हे गार्डन कीट स्वरूपात असेल.
वरील सर्व भाग्यवंत विजेत्यानी आमचे कडून भाजीपाला, बाग फुलवून घ्यावी. तसेच या सोबत आम्ही वेळोवेळी बागे संदर्भात येणार्या अडचणीत तंत्र- मंत्र, ज्ञान- विज्ञान समजून सांगणरच आहोत. थोडक्यात शिकवणं हे सुरू राहणारचं आहे.
विटांच्या वाफेत बाग फुलवणेः दोन भाग्यवंत विजेत्यास अनुक्रमे ३ व २ ग्रॅम असे एकून ५ ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र (दोन वाट्या व मनी) देण्यात येईल.
पूर्वी केलेल्या विटांच्या वाफेचे पूर्नभरण करणेः दोन भाग्यवंत विजेत्यास रिपॅटींग साहित्य खर्चावर ५० टक्के सवलत किंवा १०००-१००० रूपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल.
कुंड्या रिपॅटींग करणेः दोन भाग्यवंत विजेत्यास बागे संदर्भात उपयुक्त असे १००० रूपयांचे साहित्य देण्यात येईल.
बागेचे व्यवस्थापन पहाणेः दोन भाग्यवंत विजेत्यास एका वेळेचे बाग व्यवस्थापन निशुल्क करून देण्यात येईल. किंवा ५००- ५०० रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल.
नैसर्गिक खत, द्राव्य खतं व बागेसंदर्भातील साहित्य खरेदी करणेः दोन भाग्यवंत विजेत्यास वर्षभराच्या साहित्य खरेदीवर १० टक्के सवलत देण्यात येईल. (पैसे स्वरूपात किंवा गार्डन किट स्वरूपात)
रेफरंस मार्केटिंगः दोन भाग्यवंत स्पर्धकांना पांईट नुसार १०००- १००० रूपयांचे रोख रक्कम किंवा तेवढ्याच किमतीचे गार्डन गीफ्ट देण्यात यईल.
स्पर्धेची सुरवात येत्या १ जून पासून २०१९ पासून होणार आहे. त्याचा बक्षीस, रोख रक्कम व गीफ्टस वितरण ५ जून २०२० परर्यावरण दिनाच्या रोजी होईल.
१ते ६ प्रकारातील दोन भाग्यवंत विजत्यांची निवड ५ जून २०२० रोजी आपल्या समक्ष चिठ्ठी निवडून केली जाईल. जे ५ जून रोजी २०२० रोजी गैरहजर असतील त्यांच्या बदली दुसरी चिठ्टी निवड करून तेथेच बक्षीस दिले जाईल.
६ व्या प्रकारातील स्पर्धकांचे रेफरंस मार्केटिंग बद्दलचे पांईट वर्षभर नोंद केली जाईल व त्याचा मासिक अहवाल आपल्याला पाठवला जाईल. त्यांची अग्रक्रमांनुसार पाच स्पर्धकांतून दोन भाग्यवंत विजेत्यांची निवड ही चिठ्ठी उचलून केली जाईल. ६ व्या प्रकारात नाशिक बाहेरील व्यक्तिही सहभागी होऊ शकतात.
६ व्या प्रकारातील स्पर्धकांना खालील मुद्दयानुरूप १-१ पांईट व एक बोनस पांईट असे १० पांईट्स चा एक रिवार्ड दिले जातील. ज्यांचे रिवार्ड जास्त त्या पाच स्पर्धाकांमधे भाग्यवंताची निवड केली जाईल.
Experience & Knowledge Sharing specific on our Efforts
Donation to our work or Deshi cow
Purchase material from us (books, seed, Garden kit, Extra)
Want to arrange Pay seminar
Forward on social media (Facebook & Wts app Groups)
Inform to reporter
Arrange Social Camping
Write article on our work
Subscription, join, follow or Members on Social media & websites
कुटुंब किंवा कुटुंबातील एकच स्पर्धक आपले नाव व १ ते ६ या पैकी एकाच योजनेत नोंदवावे,
आपला सहभाग १ जून २०१९ पासून wts app 9850569644 या क्रंमाकावर नोंदू शकता.
आपल्याला सविस्तर माहिती फोनवर दिली जाईल. १-४ योजनेतील बागेसंदर्भातील माहिती व योजनेतील सहभागबदद्ल आपल्याला Pay Consultancy – on site दिली जाईल.
सुंदर नाशिक – हरित नाशिक करण्यासाठी या योजनेत प्रायोजक म्हणून म्हणून इच्छुक व्यक्ति, दुकानदार सहभागी होवू शकता. (त्यांच्या व्यवसायाची जाहिरात आमच्या सोशल मिडीयावर जोडलेल्या हजारों ग्राहकमित्रापर्यंत पोहचवता येईल)
👆वरील link ही गच्चीवरची बाग नाशिक ची आहे. आपण या site वर click करून आपला review नोंदवावा. आपल्या या एका प्रयत्नाने आम्ही करत असलेले पर्यावरण पुरक काम व निःशुल्क मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल.
संदीप चव्हाण नाशिक.
“पाटा, वरंवटा, चुल्हीवरचा स्वयंपाक, घरचा भाजीपाला कुटुंबाचे आरोग्य राखणं, हे पूर्णवेळ काम, पण आपण ते अर्धावेळपण करत नाही…”
आईच्या हाताने बनवलेल्या जेवणाला किती चव असायची, आजही गावात, एकाद्या खेड्यात, मळ्यात शेतात गेले तर तेथील जेवण किती चविष्ट लागते. आपल्या डोक्यात काही गंध, चवी या कायम स्वरूपी या नोंद झालेल्या असतात. पूर्वी जेवण बनवण्यास बराच वेळ लागायचा. आजच्या घडीला तर कंटाळवाणं काम… खरच आहे ते… पण पूर्वी आजच्या सारखी स्वंयपाक घरात अदयावत अशी साधने नव्हती. सारी कामे ही हाताने, यंत्राच्या पण श्रम शक्तीचा वापर करून तयार केले जायचे. साध्या चार हिरव्या मिरच्या, चार लसणाच्या पाकळ्या, थोडं मीठ टाकून दगडावर किंवा दगडाच्या खलबत्यात ठेसून खाल्ला तरी अप्रतिम चव असायची. एवढचं काय, सकाळी अंगोळीसाठी पाणी तापलं चुल्हीतल्या गरम राखेच्या फुफाट्याच चार हिरव्या मिरची भाजून त्यावर तेल मीठ टाकलं तरी चव लागायची.. आज मेलं भाजीत कुणाकुणाचे मसाले वापरले तरी अन्नाला चव नसते. चव असेलच कशी… कारण भाज्या रसायनं वापरून उगवलेली असतात अर्थातच या सार्यासाठी आपण वेळ देतो का व दिला तर किती हा मोठा प्रश्न आहे.
स्मार्ट किचन मधे अत्याधुनिक यंत्राचा शिरकाव झाला. वेळ वाचला.. तो वेळ आपण नोकरी, उदयोग धंदयासाठी देवू केला. पण आयुष्याची गोळाबेरीज ही सारी अनारोग्यात खर्च होते. कारण आपण यात आपले व आपले कुटुंबाचे आरोग्यच विसरलो. कारण जेवण हा जगण्याचा अविभाज्य भाग आहे हे विसरलो. अन्न हे पूर्ण ब्रम्ह पण त्यासाठीच्या सार्याच गोष्टी आपण आऊट सोर्स करू लागलो. मग त्यातली गुणवत्ता संपुष्टात आली. ( बघा घरी आलेली स्वयंपाकीन बाई किती घाईने स्वयंपाक करते) अर्थातच महिलावंर इतर कामाची जबाबदारी वाढलीत हे खरं आहे. पण त्या सार्या बदल्यात आपल्याला काय मिळतेय. आयुष्याची संध्याकाळ मु. पो. दवाखाना.. असतो. जितके लवकर उगवलं जातं, तितक्याच लवकर शिजवलं जातं, तितक्याच लवकर आयुष्याची दोरी झिजते सुध्दा… कारण स्वयंपाक करणे याला आपण कितीसा वेळ देतोय.
जेवणासाठी पाटा वरवंटा वापरणे, चुल्हीवर स्वयंपाक करणे, त्यासाठी आपल्याच अंगणात पिकवलेला विषमुक्त भाजीपाला खाणे हे तर सर्वात चांगल. या सार्या कामासाठी आपण पूर्ण वेळ दिलाच पाहिजे. तो महिलांनीच द्यावा या मताचा मी अजिबात नाही. स्वयंपाक करणे हे भलेही पारंपारीकरित्या आजही महिलांचेच काम असले तरी आधुनिक जिवनशैलीत ही जबाबदारी पुरूष किंवा महिला यापैकी एकाने अंगावर घेतलीच पाहिजे तरच आपण व आपले कुटुंब हे निरोगी राखू शकतो.
लेख आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर करा.
लेखाच्या आरंभी असलेले स्वलिखीत, स्वअनुभवीत, स्वः चिंतीत असलेल्या बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन संदर्भातील मोजक्या समर्पक शव्दातीत, बागप्रेमीनी फेसबूकवर लाईक्स केलेल्या मराठी- हिंदी भाषेतील डोळे उघडणार्या व कृतीला प्रवृत्त करणार्या ६३६ बोधपर वाक्यांचा संग्रह असलेले तुम्हाला माहित आहे का? पुस्तक. फक्त २०० रू. ( पोस्ट खर्चासहित)
“What is Swacch Bharat abhiyaan? We take garbage from our area and dump it somewhere else or we burn it which causes pollution. Instead we must use it in this way for producing something. I hardly buy any vegetables. My family eats chemical-free food daily,” Sandeep added.
A Nashik resident has developed a unique terrace garden where he produces organic vegetables.
Sandeep Chavan, with minimal investment, claims to get maximum benefit from his garden. He uses bio-waste as feritliser for his garden and all the used plastic bottles as containers for some tiny plants. Sandeep uses just 2 kg of sand for growing the vegetables. He uses foliage, coconut extract and solid kitchen waste in place of sand. All these materials, he said, has high capacity to hold water.
Sandeep informed iamin that he does not buy any fertiliser for his plants, he himself produces it. “I collect sugarcane extract, coconut extract, liquid kitchen waste, and earthworms in a big drum which has an opening at its base. By adding liquid kitchen waste daily for a period of six months, I produce a liquid fertiliser,” Sandeep said.
He grows different types of vegetables like brinjals, tomatoes, chillies, pumpkins, onions, coriander, curry leaves and much more. He has also created a Facebook group, where he regularly posts about his garden and thus encourages others to follow suit.
“What is Swacch Bharat abhiyaan? We take garbage from our area and dump it somewhere else or we burn it which causes pollution. Instead we must use it in this way for producing something. I hardly buy any vegetables. My family eats chemical-free food daily,” Sandeep added.
गच्चीवरची बाग हे प्रातिनिधीक नाव आहे. त्यास विविध नावाने ओळखले जाते. पूर्वी यास परसबाग असे म्हटले जात असे.. त्यावरून किचन गार्डन ही संज्ञा नावारूपाला आली. पण जस जसे शहराभोवती लोकसंख्येची दाटी वाढू लागली. त्याप्रमाणे हीच संकल्पना विविध नावाने ओळखली जावू लागली. ही संकल्पना जागा, वस्तूच्या उपलब्धतेनुसार, तिच्या आकारमानानुसार त्यास विविध बिरूदे लागली…जसे की शहरी शेती, टेरेस गार्डन किंवा टेरेस फार्मिंग, विंडो गार्डन, कुंड्यामधील बाग, बाल्कनी गार्डन, सज्जा पर सब्जी, छत पर खेत.. बॅकयार्ड फार्मिंग…वन स्टेप स्व्केअर फार्मिंग,मल्टी लेअर फार्मिंग, रूफ टऑफ गार्डर्निंग , व्हर्टिकल गार्डिनिनग अशी विविध नावे… विविध रूपं… असो.. महत्वाचा भाग म्हणजे तुमच्या कडे उलब्ध जागेत, उपलब्ध वस्तूत उपलब्ध नैसर्गिक संसाधनात आपल्याला सहज सोपी बाग फुलवता येते. खूप काही करायची मूळात गरजचं नसते. सारं काम करतो तो निसर्ग.. आपण फक्त त्याची फक्त छानसी घडी बसवून दयायची…निमित्त मात्र व्हायचे… या विषयी आपण मागील दोन लेखामध्ये सविस्तर पाहिलेच आहे… तर या लेखात आपण गच्चीवरची बाग ही सर्वस्पर्शी वैश्विक संकल्पना कशी आहे ते समजून घेवू या..
आज पर्यावरण हा बर्निंग इश्यू आहे… ग्लोबल पातळीवर असे अनेक प्रश्न आहेत..पण त्याची पाळमूळ पाहीली तर ती लोकलच आहेत हे विसरून चालणार नाही.. म्हणजेच ग्लोबल प्रश्नाना लोकल उत्तरे शोधली पाहिजेत…गच्चीवरची बाग हे ग्लोबल प्रश्नाला दिलेलं लोकल स्वरूपातलं रामबाण उत्तर आहे असे मला ठामपणे वाटते. यातील तत्वाचा परामर्ष घेतला तरी त्यावरून या संकल्पनेची व्याप्ती सहज लक्षात येईल… कचरा व्यवस्थापन, भूसंवर्धन, विषमुक्त-रसायनमुक्त अन्न निर्मिती, निखळ मंनोरंजन, निसर्गाची साथसंगत.
गारबेज टू गार्डन...हे पहिले तत्व…कचरा नव्हे कांचन ही म्हण आपण पूर्वापार चालू आहे. आज शहरात जैविक कचर्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कचर्याच्या विल्हेवाटीत प्रशासनाचा खूप पैसा खर्च होत आहे. अशा कुजणार्या कचर्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा व्यवस्थापन केले तर नक्कीच त्यातून अमुल्य असा फायदा होतो. खत बनवणार्या खर्चिक साधनांना फाटा देत सोपे सोपे उपाय अंमलात आणले तर आपण सहजतेने… शिकत शिकत घरच्या ओल्या, सुक्या कचर्याचे छान खत काय एक प्रकारे उत्पादक मातीच तयार करू शकतो. अशा प्रकारे पैसा वाचला तर त्याचा फायदा नक्कीच शहरातल्या इतर विकास कामांना होईल याची खात्री वाटते.
भूसंवर्धनः आज कुंड्यामध्ये शंभर टक्के माती वापरली जाते. त्यापेक्षा पालापाचोळा, नारळाच्य शेंड्या, वाळलेलं किचन वेस्ट, घरी बनवलेलं खत याचा वापर केला तर माती फक्त पंधरा ते वीसच टक्के वापरावी लागते. तिही पहिल्या प्रयत्नांत… नंतर मातीची गरजच पडत नाही… आज नाशिक शहराचा विचार केला तर जैवविवधतेने नटलेल्या त्र्यंबकश्वेरच्या पर्वत खोदले जातात. शहर सुशोभित केले जातात. काही वर्षानंतर ही माती फेकून दिली जाते. पुन्हा नवी माती ट्रक भरून आणली जाते. यात मातीचा वरचा थर खरवडला जातो. पावसाचे पाणी त्यामुळे साचत नाही. पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहून नदया, नाले , धरणे यात येवून साचते… असे अनेक प्रकारे आपण निसर्गाचे नुकसान करत असतो. तेव्हा.. गच्चीवरची बाग साकारण्याचे तंत्र वापरात आणले तर बर्याच प्रमाणात आपण पर्यावरणाचे संरक्षण करू शकतो.
स्मोक फ्री सोसायटी, कॅलनी… आज सकाळच्या वेळेत लोक शुध्द हवा घेण्यासाठी सकाळी सकळी रपेट मारतात. पण नेमक्या याच वेळेस म.न.पा. कर्मचारी पालापाचोळा जाळतांना दिसतात व आपण धुर घेवून घरी परततो. अशा पाल्यापाचोळ्याचेही छान खत तयार करता येते. त्यापासून माती तयार करता येते…
रसायमुक्त अन्नः आज बाजारात रसायनयुक्त खते, औषधे मारून भरमसाठ व कमी वेळात भाजीपाला पिकवला जातो. असा हा भाजीपाला आपलं आयुष्य कमी करतो तसेच विविध आजारांना आमंत्रण देतो..किंबहूना यमसदनाच्या न परतणार्या वारीला पाठवायची गुपचूप तयारी करतो. आजच्या अन्नात पहिल्यासारखी चव, कस राहिला नाही हे आपण सारेच मान्य करतो.. असा हा भाजीपाला आपल्या डोळ्यासमोर व नैसर्गीक पध्दतीने पिकवता आला तर… नक्कीच आपण सुदृढ आयुष्य जगू शकतो… आणि असा भाजीपाला पिकवणे शक्य आहे…अशा विविध उपयोग व अर्थ सामावलेली गच्चीवरची बाग ही खर्या अर्थाने सर्वस्पर्शी वैश्विक संकलन्पा आहे असे आवर्जून सांगावसे वाटते.
संदीप चव्हाण, नाशिक, महाराष्ट्र में रहते है। पिछले चार साल से गारबेज टू गार्डन तंत्र को लेकर नाशिक में जहर से मुक्त सब्जिया और बागवानी बनाने के लिए लोगोंको प्रेरीत करते है। उनका सपना है की लोग अपने छोटी छोटी कौशिसे व्दारा जहर मुक्त सब्जिया घरपर ही उंगाये, पर्यावरण का खयाल रखे और निसर्ग के साथ जुडे रहे। इसलिए खेती की जरूरू नही है। शहर में जो भी जगह उपलब्ध है जैसे की (पंराडा, टेरेस, बाल्कनी, विंडो) उसीमें उपलब्ध नैसर्गिक संसाधनो (किचन वेस्ट, सुखे पत्ते,) के साथ और जो भी उपलब्ध वस्तूंए में बागवानी करने के लिए प्रेरीत करते है। आज शहर में डंपीग ग्रांऊड की समस्या बढ रही है। अगर लोगों ने इस तरह किचन वेस्ट का जगह ही पर उसका सुखाकर इस्तेमाल किया तो डंपीग ग्रांऊड की समस्या नही रहेगी। और यह एक कारगर व आसान तरीका है। किचन वेस्ट का कंपोस्टिंग बनाने की कोई जरूरी नही.. ऐसा उनका कहना है। खाद बनाना यह प्राकृतिक के खिलाफ है और उसमें समय का गवाना है यह उनका मानना है।
इसलिए वह पिछले १२ साल से प्रयत्न कर कर रहे है। इस प्रयत्नों के पिछले चार साल में अपने परिवार के लिए उपजिवाका का माध्यम बनाया है। उनके साथ उनका परिवार और दो लोगों को भी रोजगार की प्राप्ती होती है।
जहर मुक्त खेती की आज बहूत जरूरी है। इसके बारे में लोगों को जागृत करना और निसर्ग के प्रती उनका सहयोग लेना जरूरी समजते है। इसलिए उन्होंने एक देशी नस्ल की गाय पाली है। उसीके गोमुत्र और गोबर से टेरेस फार्मिंग में उपयोग करते है। इस काम को गती मिलने के लिए लंबे प्रयोसो के बाद एक चार पैयावाली गाडी खरेदी है। उसीसे थोडा आसानी हो गयी है। लेकीन यह सब कर्जा है। और कुछ कुछ करना है। उसके लिए और कर्जा मिलना मुश्किल है। और उनके सपने की कडी में कुछ साधनों की कमतरता है। अगर निचे नमुद कियें हुंए साधन का जुगाड हो जाता है तो में पर्यावरण के क्षेत्र में लोगोंका और बडी मात्रा में सहयोग ले सकत है। और अपनी सिंमेंट की निस्तेज वंसुधरा को हरे हरे रंग के कुछ रंग भरना चाहते है।
Petrol Shredder machine 65000/- छत पर बागवानी के लिए 80 % बायोमास ( नारियल के छिलके, गन्ने का छिलके, पेड पौध्दे के पत्ते, सुका हुआ किचन वेस्ट और 20% मिट्टी और खाद का उपयोग करते है। उपरोक्त मशीन व्दारा जो भि बायोमास लोगोव्दारा फेका या जलाया जाता है। उनको क्रश करके उपयोग कर सकते है। इससे दो फायदे है। एक कम जगह में जादा से जादा संग्रहीत कर सकते है। और ट्रान्सपोर्ट के लिए सुविधा होगी।
किताब प्रकाशन 75000/- अब गच्चीवरची बाग ( टेरेस फार्मिंग) ये किताब की व्दितीय आवृत्ती प्रकाशीत करना चाहते है। जो स्वः एक प्रशिक्षण पुस्तिका की तरह होगी। ताकी इसे पढकर इच्छुक लोंग अपने घरपे ही किताब पढकर छत पर बागवानी कर सकते है। इससे पर्यावरण के क्षेत्र में बढा काम खडा रह सकता है।
बफींग machine 10000/- मंदीर से जमा किए नारियल के कठीण कवच से मैं किचेन्स बनाना चाहते है। कुछ चिंजे हातोसेही बनायी है इसमें बहोत सारा वक्त लग जाता है। उपरी मशीन अगर मिल गयी तो मैं कोकोनट शेल से अलग अलग चिंजे बना सकते है। जो पर्यावरण पुरक होगी। और स्थानिक महिलांए के लिए रोजगार की प्राप्ती होगी।
Total amt: 150000/-(1.5 lakh)
उनके कार्यपर युट्यूब पर एक फिल्म है उसे हर रोज २५० लोग देखते है। इसी विषय में मैने लोकसत्ता इस वर्तमान पत्र में एक साल कॉलम लिखा है। इसी काम की विविध माध्यमों व्दारो समाचार पत्र में जीवन परिचय प्रकाशित हुए है।
You must be logged in to post a comment.