मु. पो. स्वयंपाक घर
“पाटा, वरंवटा, चुल्हीवरचा स्वयंपाक, घरचा भाजीपाला कुटुंबाचे आरोग्य राखणं, हे पूर्णवेळ काम, पण आपण ते अर्धावेळपण करत नाही…”
आईच्या हाताने बनवलेल्या जेवणाला किती चव असायची, आजही गावात, एकाद्या खेड्यात, मळ्यात शेतात गेले तर तेथील जेवण किती चविष्ट लागते. आपल्या डोक्यात काही गंध, चवी या कायम स्वरूपी या नोंद झालेल्या असतात. पूर्वी जेवण बनवण्यास बराच वेळ लागायचा. आजच्या घडीला तर कंटाळवाणं काम… खरच आहे ते… पण पूर्वी आजच्या सारखी स्वंयपाक घरात अदयावत अशी साधने नव्हती. सारी कामे ही हाताने, यंत्राच्या पण श्रम शक्तीचा वापर करून तयार केले जायचे. साध्या चार हिरव्या मिरच्या, चार लसणाच्या पाकळ्या, थोडं मीठ टाकून दगडावर किंवा दगडाच्या खलबत्यात ठेसून खाल्ला तरी अप्रतिम चव असायची. एवढचं काय, सकाळी अंगोळीसाठी पाणी तापलं चुल्हीतल्या गरम राखेच्या फुफाट्याच चार हिरव्या मिरची भाजून त्यावर तेल मीठ टाकलं तरी चव लागायची.. आज मेलं भाजीत कुणाकुणाचे मसाले वापरले तरी अन्नाला चव नसते. चव असेलच कशी… कारण भाज्या रसायनं वापरून उगवलेली असतात अर्थातच या सार्यासाठी आपण वेळ देतो का व दिला तर किती हा मोठा प्रश्न आहे.
स्मार्ट किचन मधे अत्याधुनिक यंत्राचा शिरकाव झाला. वेळ वाचला.. तो वेळ आपण नोकरी, उदयोग धंदयासाठी देवू केला. पण आयुष्याची गोळाबेरीज ही सारी अनारोग्यात खर्च होते. कारण आपण यात आपले व आपले कुटुंबाचे आरोग्यच विसरलो. कारण जेवण हा जगण्याचा अविभाज्य भाग आहे हे विसरलो. अन्न हे पूर्ण ब्रम्ह पण त्यासाठीच्या सार्याच गोष्टी आपण आऊट सोर्स करू लागलो. मग त्यातली गुणवत्ता संपुष्टात आली. ( बघा घरी आलेली स्वयंपाकीन बाई किती घाईने स्वयंपाक करते) अर्थातच महिलावंर इतर कामाची जबाबदारी वाढलीत हे खरं आहे. पण त्या सार्या बदल्यात आपल्याला काय मिळतेय. आयुष्याची संध्याकाळ मु. पो. दवाखाना.. असतो. जितके लवकर उगवलं जातं, तितक्याच लवकर शिजवलं जातं, तितक्याच लवकर आयुष्याची दोरी झिजते सुध्दा… कारण स्वयंपाक करणे याला आपण कितीसा वेळ देतोय.
जेवणासाठी पाटा वरवंटा वापरणे, चुल्हीवर स्वयंपाक करणे, त्यासाठी आपल्याच अंगणात पिकवलेला विषमुक्त भाजीपाला खाणे हे तर सर्वात चांगल. या सार्या कामासाठी आपण पूर्ण वेळ दिलाच पाहिजे. तो महिलांनीच द्यावा या मताचा मी अजिबात नाही. स्वयंपाक करणे हे भलेही पारंपारीकरित्या आजही महिलांचेच काम असले तरी आधुनिक जिवनशैलीत ही जबाबदारी पुरूष किंवा महिला यापैकी एकाने अंगावर घेतलीच पाहिजे तरच आपण व आपले कुटुंब हे निरोगी राखू शकतो.
लेख आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर करा.
लेखाच्या आरंभी असलेले स्वलिखीत, स्वअनुभवीत, स्वः चिंतीत असलेल्या बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन संदर्भातील मोजक्या समर्पक शव्दातीत, बागप्रेमीनी फेसबूकवर लाईक्स केलेल्या मराठी- हिंदी भाषेतील डोळे उघडणार्या व कृतीला प्रवृत्त करणार्या ६३६ बोधपर वाक्यांचा संग्रह असलेले तुम्हाला माहित आहे का? पुस्तक. फक्त २०० रू. ( पोस्ट खर्चासहित)
पुस्तक माहिती- (PDF Download) Book trailer: तुम्हाला माहित आहे का?
पुस्तकाबद्दलची या पूर्वी प्रकाशीत झालेली माहिती वाचा…
http://www.gacchivarchibaug.in
टीपः अशाच टीप्स वाचण्यासाठी व्हाट्स अप करा… ९८५०५६९६४४
Sharing….