innovative way जुsssगाsssड…
गोष्ट किती खरी आहे माहीत नाही. विनोदांच्या अंगाने सांगितल्या गेलेल्या गोष्टीत खरं तर मोठा अर्थ होता. गोष्टीला मी गंभीरतेने घेतल्यामुळे त्याचा मोठा प्रभाव माझ्यावर व माझ्या कामावर पडला आणि गोष्टीत सांगितलेला अर्थानेच सारी गच्चीवरची बाग साकारली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
कोण्या एका देशात प्लास्टिक पाऊच मधे वेफर्स पॅकींग केले जात होते. काही पॅकेट्स मधे वेफर्स एेवजी हवा भरलीच जात होती. हे ओळखायचे कसे म्हणून तेथे सेन्साॅंर डेव्हलप केले होते. हे तंत्र खूपच महाग होते. तेथे आपल्या भारतीयाने वर उद्भवलेल्या अडचणीवर कल्पकतेने मात केली. जेथे वेफर्स पॅक होऊन बाहेर येत होते तेथे एक स्टॅंडचा पंखा चालू केला. वजनाने हलके, पण हवाच भरलेले पॅक हे हवेने उडून जावू लागले व वेफर्स असलेले जड पॅकेट्स पुढे पट्ट्यावर मोठ्या खोक्यात पॅँकीग होवू लागले. अशी ही सोपी कल्पना राबवली. जुगाड तंत्र वापरले. खरं तर जुगाड करणे गरजेचे आहे. जुगाडावरच तर सारं जग चालत आलयं असं माझ म्हणणं आहे.
जुगाड या शब्दाची oxford dictionaries मधे सुंदर व्याख्या दिली आहे… “A flexible approach to problem-solving that uses limited resources in an innovative way.”
गच्चीवरची बाग उद्योग म्हणून विकसीत करतांना अशाच विविध जुगाडी तंत्राचा वापर केला जातो. जेथे शक्य आहे तेथे आम्ही कमीत कमी खर्चातले तंत्र वापरले आहे. बाग फुलवण्यासाठी पालापाचोळा, वाळलेले किचन वेस्टचा वापर करणे, कंपोस्टींगसाठी माठाचा, बादल्यांचा वापर करणे, डेव्हील डायजेस्टर (आल इन वन वेस्ट) डेव्हलप करणे) कमी खर्चात व पाण्यात झाडांना ड्रीप करणे. उन्हाळ्यात बागेसाठी शेड बनवणे. कमी साहित्य वापरल्यामुळे कमीत कमी खर्चात हे काम पूर्ण होते. अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या सोप्या करून लोकांना सांगत आहोत. विकसीत केल्या आहेत. करत आहोत. अर्थात त्यात विज्ञान कसे काम करते हे समजून घेतले तर आपल्या अनेक पर्याय शोधता येतात. त्यातूनच आम्ही पर्यावरणाच्या संरक्षणासोबत, लोकांना शिकवत व सहभागी करत रोजगाराची पायभरणी करत आहोत.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. ९८५०५६९६४४
http://www.gacchivarchibaug.in
जुगाड, आर्टिकल , प्रॅक्टिकल आणि inspirational। मीही एक तयार केलेलं छोटं जुगाड सांगतो। माझ्या गच्चीतील बागेत मी जुना पाईप ला ड्रीप ची बटन लावली पण त्या पाण्यावर कंट्रोल
मिळत नव्हता। म्हणून त्या ऐवजी सलायन च्या वापरलेल्या पूर्ण ट्युब वापरल्या। त्यामुळे, 1. मेन ट्युब आणि कुंडीत अंतर असलं तरी पाणी देता येत 2. पाण्याचा पडणारा थेंब दिसतो। 3. फ्लो कंट्रोल करता येतो। (सलायन चा नॉब वापरून) । एकदम successful।
व्वा सर, खूपच छान, यालाच म्हणतात. टाकाऊतून टिकाऊ… छान. मो. 9850569644 wts app करा. मला तुमच्याशी बोलायला आवडेल.