दोन ध्रुवावरच नातं..


वैशालीच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळे सर्वांनाच धक्का बसला. कोणतीही चुक नसतांना दुचाकीला मागून येणार्या चालकाने कार ठोकली. व रस्त्यावरील या अपघातात मागील मेंदूला जबर मार लागून रक्तश्राव झाला. व तेथे श्वासाची माळ तुटली. ( २१ जाने. २०२२) महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिने आणि मी जोडलेल्या मित्र मंडळींकडून सांत्वनाचे शब्द माझ्यापर्यंत पोहोचले. खरं म्हणजे आम्हा दोघांचे आयुष्य संघर्षमय होते. पण तिची आणि माझी भेट झाली आणि आमच्या समाधानी आयुष्याला सुरुवात झाली. माझ्या उमेदीच्या काळात माझ्या जवळ शिक्षण, घर, शिल्लक यातील काहीही नसताना केवळ हिम्मत, उमेद व व सामाजिक मूल्यांच्या या जोरावर तिने मला पसंत केले. एकमेकांसोबत जगताना फार साधेपणाने जगलो. साध्या पध्दतीने कोर्ट मॅरेज केले. ति जशी आयुष्यात अचानक आली तशीच निघून गेली. काही बोलणं नाही. निरोप घेण नाही. पहाणं सुध्दा झालं नाही. असं दुख्य वैराच्याही वाटेला कधी येवू नये.

गच्चीवरची बाग नाशिक संचालक वैशाली राऊत.

आमच्या वयात फक्त १३ मह्णिण्यांचे अतंर होते. तिची सोबत की पंधरा वर्षाची होती पण आम्ही एकमेकांना समृद्ध करत होतो. ती पत्नी जरी असली तरी तिला मित्रासारखे स्वातंत्र्य होते. आमचे गुणदोष, कमतरता आम्ही एकमेकांना दाखवत असलो तरी प्रेम मात्र नितांत होते. आम्हा दोघांची सामाजिक व कौटुंबिक पार्श्वभूमी, स्वभाव, आवडी निवडी, सवयी, कौशल्य, जगण्याकडे, आरोग्यकडे पाहण्याचा दृष्टिकोनात आम्ही विरुद्ध टोक होतो. पण आम्ही एकमेकांना जपत होतो. गच्चीवरची बाग एका स्थिर टप्प्यावर आल्यानंतर तिने तिच्या पूर्वीच्या आवडीच्या महिला संघटन या कामाला सुरुवात केली होती.

तिच्या सोबती मुळेच मी या सिमेंटच्या जंगलात गच्चीवरची बाग फुलवता आली. तिनेच माझ्या आयुष्याच्या उजाड माळरानाचे हिरव्यागार सृष्टीत रूपांतर केलं. शून्यातून ही संकल्पना उभी करतांना आर्थिक अडचणींना फार तोंड द्यावे लागले. आदल्या रात्री ती मला म्हणाली की आपल्याकडे खूप पैसे येईल चिंता करू नको. आपल्याकडे काहीच नसताना खूप सारे उभे केले. असा ती धीर द्यायची.

आयुष्याच्या वाटेवर कधीतरी सोडून जाणारच आहोत. फक्त हे जाणं मागेपुढे असतं एवढाच काय तो फरक असतो. पण तिचे जाणे काळजाला चिरून गेलं. तिला विसरणं शक्यच नाही पण प्रयत्न करतोय. तिची जागा जगातील कोणतीही स्त्री घेऊ शकणार नाही. पुनर्जन्म असेनच तर तिने माझीच निवड करावी. अशी तिला विनंती करतो.

अपघातानंतरही ती ज्या अवस्थेत असती त्या अवस्थेत तिला सांभाळण्याची माझी तयारी होती. पण नियतीने तिला शेवटचे हातात हात घेउन बोलण्याची संधी पण दिली नाही. तिच्या नसण्याने आयुष्याची हिरवळ व गच्चीवरची बाग ही करपून गेलीय. न्याय तरी कुणाकडे मागायचा… असे बरच काही आहे पण तूर्तास एवढेच.

या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही जेव्हां केव्हां नाशिक हुन संगमनेर/पुण्याला जाल तेव्हा कर्ह घाटात काही अंकुरित होणाऱ्या बिया नक्की तिथे टाकाव्यात. जेणेकरून तिथे हिरवळ राहील. पक्षांना कीटकांना त्यातून आनंद व अन्न मिळेल. वैशालीला इतरांना करून घालण्यात फार आनंद वाटायचा. बियाण्यात तृणधान्य, तेलबियांचा बिया यांचा समावेश करावा. ही तिच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल.

गच्चीवरची बागेच्या संघर्षमय प्रवासात तिने मांडलेले विचार या फिल्म लिंक देत आहे.

-संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक

दहाव्या वर्षात पदार्पण करतेय गच्चीवरची बाग.


गच्चीवरची बाग आता नऊ वर्षाची पूर्ण होतेय. मार्च २०२१ पासून दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे.

फक्त ऐकले होते शहरी शेती केली जाते. पण ति कशी करतात. काय करतात. काहीच माहित नव्हते. २००५ पासूनच प्रयोगांना सुरूवात झाली होती. पण त्याही आधी मला कचरा व्यवस्थापनात विशेष रूची होती. पुणे मुंबई सारखी नाशिकची स्थिती होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो. त्यात नाशिककरांचा सहभाग कसा घेवू शकतो हाच तो काय विचार होता. होम कंपोस्टींगवर प्रयोग करता करता नैसर्गिक, विषमुक्त, रसायनमुक्त भाज्या पिकवण्याकडे अर्थात शेती कडे कल वाढला. पण कंपोस्टींग विषय काही डोक्यातून जात नव्हता. प्रयोग करता करता चिंतनातून या दोनांची सांगड घातली गेली नि मागे वळून पाहिलेच नाही. प्रत्येक प्रयोग यशस्वी होत गेला. गच्चीवरची बाग पुस्तक प्रकाशीत केले. नि याला पूर्णवेळ देवून अर्थाजनाचे साधन होईल याचा कधीही विचार नव्हता. पण बागप्रेमीचा पाठींबा मिळत गेला. भांडवल गुंतवून हळू हळू व्यवसायात अर्थात पूर्ण वेळ काम करण्याचे ठरवण्यात आले.

आज आम्ही तीन विषयात काम करत आहोत.

कंपोस्टींग…

यात होम कंपोस्टींग, झाडपाल्याचे कंपोस्टींग, गुरा ढोरांच्या शेणाचे कंपोस्टींग करत आहोत. हे सारे जैविक कंपोस्टींग करण्यासाठी विविध प्रकारचे सेटअप तयार केले आहे. जे कचर्याच्या स्वभाव, आकार, उपलब्ध जागा, दिला जाणारा वेळ, पैशाची गुंतवणूक व उपलब्ध जागा या नुसार तयार केले आहेत.

गार्डेनिंग...

या विषयात आम्ही ऑरगॅनिक पध्दतीने भाजीपाला उत्पादन, फुलझाडे व फळझाडांचे संगोपन व वाढ, उत्पादनावर काम करत आलो आहोत.

स्पेस डेकोरेशेन …

या विषयात विविध उपलब्ध जागेत निसर्गाचे सानिध्य कशा प्रकारे तयार करता येईल या विषयी हॅंडमेड उत्पादने तयार केली जातात. व त्यात निसर्ग फुलवला जातोय.

आज गच्चीवरची बाग नाशिकचे काम पाच विभागात करत आहे.

Grow : ऑरगॅनिक पध्दतीने भाज्या उगवतो व उगवून देतो.

Guide : यासाठी इच्छुकांना विविध सोशल मिडीयाव्दारे मार्गदर्शन करतो.

Build: भाज्या उगवण्यासाठी उपलब्ध जागेनुसार सेटअप तयार करतो.

Products : ऑरगॅनिक भाज्या उगवण्यासाठी लागणारे संबधित गोष्टीचे उत्पादनं करतो.

Sale N : ही उत्पादनांची आम्ही ऑनलाईन ऑफलाईन विक्री करतो.

Services : उपलब्ध जागेत फळझाडे, फुलझाडे, भाजीपाला उत्पादनांसाठी सेवा सुविधा पुरवितो.

हे विभाग जसे जसे वाढत गेले. तस तसे आमच्या कामाचा विस्तार होत गेला. आजमितीला पाच ठिकाणी आमचे काम विस्तारत आहे. अर्थात ही अशी ठिकाणं आहेत जेथे आमचे काम तुम्हाला पहाता येईल, अनुभवता येईल.

Garden Lab..

गार्डन लॅब म्हणजे आमचे स्वतःचे टेरेस ज्यावर आम्ही आमच्यासाठी ऑरगॅनिक भाज्या उगवतो. ज्यात विविध तर्हेचे प्रयोग केले जातात.

Garden Studio…

गार्डेन स्टुडिओ ज्यात वरील कामासाठी लागणारे साहित्य संग्रह, रोजचे काम, उत्पादनाचे डिस्पले केले जाते. हा स्टुडिओचा आम्ही विविध तर्हेने वापर करत असतो. थोडक्यात ज्याला मल्टीपर्पज स्पेस असे म्हणू शकतो.

Garden Digital…

वरील कामकाज चालण्यासाठी ई माध्यमांव्दारे लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यात सातत्याने जाणीव जागृती होण्यासाठी व्हिडीओ, लेख, पोस्ट करणे असे कामकाज चालते. थोडक्यात यात आम्ही जाहिरात व मार्केटिंग हे विषय हाताळले जातात.

Garden Shopy…

गच्चीवरची बागेव्दारे जे काही उत्पादने केली जातात. ती इतर जिल्हा, राज्यात पोहचण्यासाठी फ्रांचाईजी स्वरूपात गार्डेन शॉपी तयार करण्यात येत आहेत. ज्यात स्थानिकांना सहजतेने गच्चीवरची बागेची उत्पादने खरेदी करता येतील व सहकार्यांना रोजगार मिळेल या उद्देशाने सुरू आहे.

Garden community…

गार्डेन कम्यूनिटी म्हणजे आम्ही ज्यांच्या घरी भाजीपाल्याच्या बाग तयार करून दिल्या आहेत ते कुटुंब होय. आजपर्यत आम्ही साडेसातशे ठिकाणी भाजीपाल्याचे उपलब्ध जागे नुसार सेटअप बिल्ड करून दिल्या आहेत. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते.

ईथ पर्यंत प्रवास हा आमच्या एकट्याचा नव्हताच. व पुढचा प्रवास ही एकट्याने करण्यासारखा नाही. हे काम लोकांपर्यत पोहचण्यासाठी प्रत्येकाने आपाआपले पर्यावरणीय सहभाग व पुढाकार नोंदवला आहे. त्या ज्ञात अज्ञात व्यक्तिचां गच्चीवरची बाग मनापासून ऋणी आहे. कारण हा फक्त व्यवसाय (प्रोफेशन) नाही तर पर्यावरण संवर्धनासाठी आमची आस (पॅशन) आहे. ज्यात आपण सारेच हातात हात घालून आरोग्य, पर्यावरण संरक्षणाच्या  क्षितीजाकडे जात आहोत.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

झिम्बाब्वे देशातील आठवणी…

आपल्याकडे पोलीओ निर्मुलनाची मोहीम चालवली जाते त्याप्रमाणे या देशात राष्ट्रीय स्तरावर कुपोषण निर्मलनासाठी परसबाग हा कार्यक्रम राबवला जातो. सध्या आपल्याकडे कागदोपत्री का होईना शालेय स्तरावर राबवले जात आहेत.


गच्चीवची बाग मार्च २०२२ मधे दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. केवळ एक संकल्पना डोक्यात आली. त्यावर कलेकलेने काम करत गेलो. आज गच्चीवरची भाजीपाल्याची बाग ही पाच विभागात जोमाने काम करत आहे. Grow, Guide, Build, Products Sale N Services… हे आमच्या कामाची पाच बोटे आहेत. ज्याने आम्ही निसर्गाच्या संवर्धनासोबत लोकांच्या, जमीनीच्या आरोग्याचं काम करत आहोत.

Videos

पण याची सुरूवात ही दैवाने आमच्या हातून खूप आधीच करून घेतली याचे फार मोठे अप्रुप वाटते. अर्थात त्याची सुरूवात ही २००१ पासूनच झाली होती. २००१ ते २०१३ पर्यंत शेती, शहरी शेती, कचरा व्यवस्थापन या विषयात माहिती, ज्ञान, अनुभव मिळत गेले व २०१३ या वर्षा गच्चीवरची बागेचा जन्म झाला.

२००१ ते २०१३ या एक बारा वर्षाच्या साधनेत अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. त्यातीलच एक देश म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील झिम्बाब्वे. २००५ या वर्षी या देशात परसबाग प्रकल्पासाठी एक महिना राहिलो. तेथील अनुभव तुम्हाला या लेखात सांगणार आहे.

अखंड दक्षिण आफ्रिका खंडाचे सार्वभौमत्व संपवून ब्रिटीशांनी या देशाचे तुकडे केले. अंत्यत गरीब देश. आपल्याकडे सेनसेक्सचा आलेख वर खाली होतो तेव्हां सोन्यांचे भाव कमी जास्त होतात. पण तिकडे पावाच्या लादीचे भाव कमी जास्त होतात. एवढा अर्थव्यवस्था ढासळेली आहे. काळा पैसा बोकाळलेला, भष्ट्राचार वाढलेला. तेथे २००५ पूर्वी खिशात पैसे घेवून गेले तर पिशवी भर साखर यायची. नि आता पिशवीभर पैसे घेवून गेले तर खिशात मावेल एवढी साखर येत नाही.  असो.

तेथे पैसा अर्थव्यवस्थेत फिरत नाही. म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे ते घरीच ठेवतात. बॅंकेत ठेवत नाही. तेथे भारतीय व्यापारांबद्दल विशेष राग होता. कारण ही मंडळी तेथे गादीमधे पैसा भरून ठेवत असत.

तेथे परकीय चलन बदलवण्याचा अनूभव तर फारच सिनेस्टाईल आहे. आपल्याकडे परकीय चलन बदलावयाचे म्हणजे काही सुरक्षीत व मान्यता प्राप्त ठिकाणे असतात. तेथे मला एका गाडीत बसवून नेण्यात आले. गाडी एका गल्लीच्या कोपर्यात उभी केली. काचा बंद असलेल्या गाडीत एक माणूस आला. किती चेंज हवय म्हणून विचारले. पैसे बदलवण्यात आहे. कोणतीही पावती नाही, नोंद नाही. असा हा कारभार..

तेथे कुफुंडा नावाची सामाजिक संस्था होती. तेथेच राहण्याची व्यवस्था होती. झिम्बाब्वे या देशाची राजधानी हरारे. (जेथे क्रिकेटचे स्टेडियम आहे) या हरारे पासून ३५ कि.मी. अतंरावर हे ठिकाण होते.

आपल्याकडे पोलीओ निर्मुलनाची मोहीम चालवली जाते त्याप्रमाणे या देशात राष्ट्रीय स्तरावर कुपोषण निर्मलनासाठी परसबाग हा कार्यक्रम राबवला जातो. सध्या आपल्याकडे कागदोपत्री का होईना शालेय स्तरावर

तेथे पहाल तिकडे गवताळ प्रदेश. म्हणजे जंगल नष्ट झालेली. झाडंच नसल्यामुळे उपजिविकेचे कोणतेच साधन नाही. त्याच ब्रिटीशांची सत्ता. स्थानिक लोक गुलाम म्हणून तेथे राबत असत. कोणतेही शिक्षण नाही. पारंपरिक ज्ञानाचे कोणतेही वहन पुढच्या पिढीत झाले नाही. शेती कशी करायची याची माहिती नाही. जेव्हां. ब्रिटीश देश सोडून गेले तेव्हा तेथील स्थानिकांनी शेतीतील साधने विकून टाकली. नि कंगाल झाले. मका तिकडे पिकतो पण मक्याचा फक्त फॅक्टरीत पाव बनतो एवढेच माहित. आपल्याकडे मक्याचे किती पदार्थ होतात.

तेथील एका बाजारात गेलो होतो. तेव्हां माझी सुरक्षा व्हावी म्हणून मला एका गाडीतच बसून ठेवण्यात आले. कारण मारहाण करून लुबाडण्याची शक्यता होती. त्यांचा व माझा रंग सारखाच. फक्त चेहरेपट्टीत फरक होता. पण एक फरक विशेष होता. डोक्यावरचे केस. त्यांचे केस कुरळे होते. व माझे केस हे सरळ होते.

मी त्यांच्या डोक्याकडे कौतुकाने पहात असत तर ते माझ्याकडे संशयाने पाहत असत. 

तेथील संस्थेच्या व बाजूच्या गावातील लोकांसाठी पोषण आहराचा कार्यक्रम राबवला जात असे. तेथे परसबागेत भाजीपाला पिकवला जात असे, त्याचे दर आठवड्याला सामूहिक भोजन ठेवले जायचे. त्यांना परसबागा कशा फुलवायच्या याची माहिती व तेथे पिकलेल्या भाज्यांची चव दिली जायची. माझी शेतीतील आवड पाहून मला लग्नासाठी मुलगी व शेतजमीन देण्याची ऑफर आली होती. पण मला माझा देशच प्रिय होता किंवा गच्चीवरची बागच्या रूपात काम उभे रहावे अशी दैवाची ईच्छा असावी.

तेथे ड्राय टॉयलेटची संकल्पना होती. म्हणजे एक मजली उंचीच्या घराववर शौचास जायचे. तेथे मल व मूत्र वेगळे होणारे भांडे असे. तेथील मैला हा तळाशी (खालील खोलीत) पडत असे. कालांतराने त्याचे सोनखत तयार झालेले असे. त्याचा वापर परसबागेत केला जात असे. आपण भारतियांनी जगाला सोनखत शब्द दिला पण तो तेथे प्रत्यक्षात अबलंबला जातोय. भाज्या चवदार व भरभरून येत असे.

तेथील सामुहिक जेवणाच्या वेळेस लोक आपल्यासारखे समोरासमोर बसून खात नसतं. ते आपआपले अन्न ताट ओसंडून वाहून जाईल एवढे वाढून घेत व कुणाला दिसणार नाही अशा प्रकारे पाठ करून बका बका खात असत. गरिबीच तेवढी होती.

तेथे झाडे नसलेल्या गवताळ प्रदेशात एक वास्तू होती. आपल्याकडे पूर्वी गुरांसाठी कोडंवाडे असत. त्या प्रकारे गाव बसेल एवढा परिसरात गोलाकार भिंत बाधलेली होती. जंगली प्राण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून. अर्थात आपले पूर्वज अशा गावातून पुढे जगभर पसरली, येथेच राहत असावीत याची प्रचिती आली. आता तेथे केवळ स्मारक म्हणून घोषीत केले होते. त्याचा आकार, बांधणीची ठेवण प्राचिनच होती. पण दगडी बांधकाम अलिकडचे होते. त्यातील काही ताडाची झाडे तशीच संरक्षीत केलेली होती. तेथे मुतारे नावांचे गाव होते. वाचून गंमत वाटली होती.

तेथे लोक पोषण आहाराबद्दलचा राष्ट्रीय कार्यक्रम, तेथील तंत्र समजून घेण्यासाठी गेलो होतो. दैवाने ही संधी दिली. त्याचे संचित हे गच्चीवरच्या बागेच्या रूपात आज नाशिकमधे आकाराला आले.

आता एवढेच.. बाकी अनुभव पुढील लेखात…

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

गार्डन केअर शॉपी : इच्छुक विक्रेत्यांसाठी सुवर्ण संधी…

येणार्या अनिश्चित काळासाठी होम डिलेव्हरीला प्राधान्य असणार आहे. गच्चीवरची बाग गार्डन केअर शॉपी सोबत तुमचा इतरकाही घरून चालणार्या उद्योगांना मदत होणार आहे.)  कृषी उद्योग असल्यामुळे कोणत्याही दुकान परवान्याची गरज नाही.)


गार्डन केअर शॉपी : इच्छुक विक्रेत्यांसाठी सुवर्ण संधी…

गच्चीवरची (रसायनमुक्त भाजीपाला) बाग हा पर्यावरण पुरक उदयोगास मार्च २०२१ रोजी आठ वर्ष पूर्ण होऊन नवव्या पदार्पण केले आहे. नाशिककरांना बागेची असलेली आवड, रसायमुक्त भाज्या निर्मितीची आस, आणि कचरा व्यवस्थापनाची धरलेली कास  या तीन गोष्टीनी गच्चीवरची बागेचे बालपण जोपासत आता संवेदनशील असे पालकत्वही स्विकारले आहे. म्हणूनच गच्चीवरची बागेने नवव्या वर्षात पदार्पण केले आहे.  आम्ही मागील आठ वर्षात विविध समाज माध्यमांव्दारे रसायनमुक्त भाजीपाला निर्मिती, गारबेज टू गार्डेन याव्दारे पर्यावरण संवर्धना विषयी जन जागृती करत आहोतच. म्हणूनच Grow,  Guide, Build, Products & sale या पाच वर्क एरिया व्दारे कामाचा, विक्रिचा व लोकसहभागाचा व्याप वाढतच चालला आहे. थोडक्यात मागणी वाढत चालली आहे. पण आम्ही नाशिकच्या एका टोकाला असल्यामुळे बाग प्रेमींना इच्छा असूनही आमचे साहित्य त्यांच्या पर्यंत पोहचवणे अवघड होते कधी कधी शक्य होत नाही. किंवा वेळ लागतो. पण झाडांना वेळेवर खाऊ पिऊ दिले तर ते आपल्याला योग्य तो आनंदाचा परतावा देतात जो पैशात मोजणे अशक्य आहे. पण पर्यावरणासाठी नाशिककरांनी हा घेतलेला पुढाकार फार ठळक व स्पष्ट आहेच. म्हणून आम्ही इथपर्यंत पोहचलो आहोत. (पुढे वाचा)

तर वरील सर्व मुदयांचा विचार करता.. आम्ही नाशिक शहरात गच्चीवरची बागेचे विविध नगरात गार्डन केअर शॉपी सुरू करत आहोत. कारण एकतर स्थानिक बाग प्रेमीना  आमची उत्पादनांची सहज उपलब्धता व्हावी तसेच लॉकडाऊन मधे गच्चीवरची बागेवर आलेले आर्थिक संकटाला तोंड देता यावे हा हेतू तर आहेच पण शिवाय यात इतर छोट्या दुकानदारांना, गृहुद्योग करणार्या महिलांना रोजगार मिळावा हा ही हेतू लक्षात घेतला आहे. कारण करोनामुळे अथवा नंतर येणारे आर्थिक संकट हे फार मोठे व खोलवर जखमा करणारे  असणार आहे. जे आम्ही सध्या लॉकडाऊनचे आर्थिक संकट आम्ही अनुभवतो आहोतच. या आर्थिक झळीत इतरांनाही दोन पैसे मिळवून कमी करता यावी अशी प्रामाणिक इच्छा आहे.

आम्ही आमच्या उत्पादनाच्या किमती या मागील सात वर्ष स्थिर ठेवल्या होत्या यापुढे दरवर्षी या किमती १ रू. यूनिट (लिटर, किलो, नग) प्रमाणे वाढवले होते. पण यात आम्ही Lock down Bumper Offer सुरू केलीच आहे. मग त्यात इच्छुक विक्रेत्यांना का सहभागी करून घेवू नये हा विचार प्रामुख्याने मनात आला. त्यामुळे आम्ही इच्छुक विक्रेत्यांना गच्चीवरची बाग गार्डेन केअर शॉपी सुरू करण्यासाठी (प्रथम येणार्यास प्राधान्य या तत्वावर ) आमंत्रीत करत आहोत. (पुढे वाचा)

इच्छुक विक्रेत्यांना आम्ही विक्रि करतो त्या किमतीतच विक्री करण्याची विनंती असेन. पण आपण यात स्थानिक उपलब्धता रक्कम (L.A.C – Local Availability Charges) तुमच्या सोयी नुसार आकारू शकता. तसेच घरपोहोच पोचवण्याचे चार्जेस (H.D.C-  Home delivery  Charges तुम्हाला ग्राहकाशी ठरवून आकारता येईल. (आमची उत्पादने इच्छुक विक्रेत्यांना काय किमतीने मिळेल  हे प्रत्यक्ष भेटीत सांगू. आमची उत्पादने आपल्या विक्री नुसार Gacchivarchi Baug Extension येथून घेवून जाणे बंधनकारक असेन.

जागा किती हवी?

पाऊस पाणी, ऊन लागणारी नाही असे छोटेसे शेड असावे. मांडणी असेलतरी उत्तम.. तुमचा पूर्वीपासून घरूनच काही विक्री होत असेन अशा मंडळीना प्राधान्य असेन. कारण हा जोडधंदा म्हणून करता येणार आहे.  आम्हाला Display वैगेरेची आवश्यकता नाही. ग्राहकांना उत्पादन वापरा विषयी शंका निरसन, माहिती, वैगेरे हवे असल्यास संदीप चव्हाण यांच्या व्दारे दिली जाईल. आम्ही दूरध्वनी व्दारे सपोर्ट करू. (पुढे वाचा)

तुमच्या शॉपीची जाहिरात अशी होणार…

आपल्या गच्चीवरची बाग शॉपीची जाहिरात आमच्या संकेतस्थळ, समाज माध्यमांव्दारे करणार आहोत. तसेच Google My Business वर तुमची गच्चीवरची बाग शॉपी लिंक केली जाईल.  तसेच आमच्याशी पूर्वीच जोडलेले किंवा नव्याने येणारे ग्राहक हे तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शिवाय आमच्या व्दारे कचरा व्यवस्थापन, कौटुंबिक मार्गदर्शन कार्यशाळा, भाजीपाला सेटअप या विषयी काहीही सेवा पुरवायाचे असल्यास आमच्या व्दारे त्या पुरविल्या जातील. पण आपण संदर्भ मिळवून दिलेले ग्राहकांची मागणीची पूर्तता पूर्ण झाल्यावर आमच्या एकूण रकमेच्या ठराविक टक्केवारी इच्छुक विक्रेत्यांना अदा केली जाणार आहे.

आमच्या कडील उत्पादने हे घाऊक किमतीत (तुम्हाल जेवढे नग, लिटर, प्रति, किलो) विकत घेतल्या नंतर ग्राहकांकडूनच आपण स्वतःच त्याचे पेमेंट रिसिव्ह करू शकता. आम्ही फत्त मार्गदर्शक असू.. (पुढे वाचा)

जोड धंदा का म्हणून करावा.

येणार्या अनिश्चित काळासाठी होम डिलेव्हरीला प्राधान्य असणार आहे. गच्चीवरची बाग गार्डन केअर शॉपी सोबत तुमचा इतरकाही घरून चालणार्या उद्योगांना मदत होणार आहे.)  कृषी उद्योग असल्यामुळे कोणत्याही दुकान परवान्याची गरज नाही.)

आम्ही इच्छुक विक्रेत्या सोबत दिर्घकाळ व्यावसायिक नातं तयार करू इच्छितो. जे कायम पारदर्शकता विश्वास व नाविण्यतेवर अवलंबून असेन.

Order Now By submit Form

उत्पादनांची यादी

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

कोरोना महामारी, लॉकडाऊन , त्याचा परिणाम व गच्चीवरची बागेचे प्रयत्न…

तुम्हाला शक्य झाल्यास हा लेख प्रसारित करावा. लोकांपर्यंत पोहचवा. आम्हाला मदत किती होईल याची खात्री नाही पण आम्ही करत असलेले पर्यावरण संवर्धनाचे प्रयत्न लोकांपर्यंत पोहचावे हा प्रयत्न आहे. कारण या पर्यावरणीय उपक्रमाचे आम्ही केवळ जबाबदारी घेतली आहे. पण त्याचे खरे मालक नाशिककर व सर्वदूर पसरलेले बाग प्रेमीच आहे.


धन्यवाद नाशिककर.

कोरोना मुळे उद्दभवलेल्या आर्थिक संकटाच्या लेखातून जी मनाची घुसमट व्यक्त केली ते वाचून आपण आमच्याशी संपर्क साधला, विचारपूस केली या बद्दल खूप बरे वाटले. मनावर असलेले मणांच ओझ थोडं हलक झाल्या सारखे वाटले. आपण आमच्यासाठी प्रयत्न करत आहात हाच मोठा आधार वाटतो आहे. इच्छुकांनी मदतीचा हात देऊ केला आहेच पण सोबत तुम्ही या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी काय काय इतर उपाय योजना तयार केली आहे. अशीही विचारणा केली आहे.

हे आर्थिक संकट टाळण्यासाठी आम्ही खालील प्रकारे प्रयत्न करत आहोत.

१) आर्थिक हातभार उचलण्यासाठी इच्छुकांना आवाहन केले आहे.

२) सकाळ , लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रकाशीत झालेले लेख हे पी.डी.एफ स्वरूपात व कमी किमतीत INSTAMOJO STORE

वर इच्छुंकांना उपलब्ध करून देणे , या विषयावर व्यक्तिगत मार्गदर्शन करत असेलला कचरा व्यवस्थापनावर लिखाण करणे त्याचे पि.डी. एफ स्वरूपात पुस्तक लिखाणास घेणे

सज्जा पर सब्जी या हिंदी पुस्तकाचे लिखाण करणे व त्याचेही पि.डी . एफ . पुस्तक करत आहोत. जेणे करून त्यातून काही उत्पन्नाचे मार्ग खुले होतील.

३) दैनंदिन खर्च भागवता यावा म्हणून lock Down Bumper Offer तयार केली आहे.

४) गच्चीवरची बाग व्दारे गार्डेन केअर शॉपी मधे तयार करणे

५) यू ट्यूब व्दारे आम्ही बागे संदर्भात विविध व्हिडीओ अपलोड करत आहोत. यात आमच्या Home Grow Vegetable Services गच्चीवरची बाग या चॅनेलला Subscribe, Like, Share , comments केल्यास त्यातून शाश्वत उत्पन्न मिळवता येईल. ज्यातून आमच्या या पॅशनला आणखी जोपासता येईल.

निशुल्क मार्गदर्शनासाठी डिजीटल प्रेझेन्स लेख वाचा

६) गच्चीवरची बागेच्या सेवा सुविधा भविष्यात आणखी स्वस्तः होणार

या सहा धोरणाव्दारे आम्ही कोरोना महामारीची आम्हा कुटुंबियावर जाणवलेली तिव्रता कमी करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

तुम्हाला शक्य झाल्यास हा लेख प्रसारित करावा. लोकांपर्यंत पोहचवा. आम्हाला मदत किती होईल याची खात्री नाही पण आम्ही करत असलेले पर्यावरण संवर्धनाचे प्रयत्न लोकांपर्यंत पोहचावे हा प्रयत्न आहे. कारण या पर्यावरणीय उपक्रमाचे आम्ही केवळ जबाबदारी घेतली आहे. पण त्याचे खरे मालक नाशिककर व सर्वदूर पसरलेले बाग प्रेमीच आहे.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

http://www.gacchivarchibaug.in

9850569644 / 8087475242

आमचा निशुल्क मार्गदर्शन करणारा उपक्रम व डिजीटल प्रेझेन्स

या समाज माध्यमांमधे फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम, संकेतस्थळ याचा उपयोग करत आलो आहोत. संकेतस्थळ हे आपल्याला हवे तेथे हवे तसे अपडेट करता यावे म्हणून ते स्वतः शिकून घेतले आहे. आमचे गच्चीवरची बाग हे काम वाढवण्यात वरील समाज माध्यमांवरील लोकांचा फार मोलाचा वाटा आहे.


गच्चीवरची बागेने सुरवातीपासून लोकांमधे गारबेज टू गार्डन या विषय पोहचावा. त्यांच्यामधे पर्यावरण संवर्धनाची आवड तयार व्हावी म्हणून आम्ही कचरा व्यवस्थापन, बागेत रसायनमुक्त उत्पादनाचा वापर आणि विषमुक्त भाज्यांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सुरवातीपासूनच फक्त प्रयोग व पुस्तकांमधे ज्ञान संग्रह न करता आमचे उपक्रम हे विविध समाज माध्यमांव्दारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. (पुढे वाचा)

या समाज माध्यमांमधे फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम, संकेतस्थळ याचा उपयोग करत आलो आहोत. संकेतस्थळ हे आपल्याला हवे तेथे हवे तसे अपडेट करता यावे म्हणून ते स्वतः शिकून घेतले आहे. आमचे गच्चीवरची बाग हे काम वाढवण्यात वरील समाज माध्यमांवरील लोकांचा फार मोलाचा वाटा आहे.

यूट्यूब या माध्यमांकडे जरा उशीराच लक्ष गेले. ते एक शाश्वत उत्पन्नाचे साधन होऊ शकते. पण त्याची कौशल्य शुटिंग, एडिटींग इ. कौशल्य विकसीत करण्यास वेळच मिळाला नाही. पण आता जाने. २०२१ पासून आम्ही या माध्यमांकडे आवर्जून लक्ष घातले आहे. त्यावर विविध व्हिडीओ आता अपलोड करत आहोत.

आपल्याला विनंती आहे की आमच्या Home Grow Vegetable services गच्चीवरची बाग या चॅनेलला आवश्यक Subscribe, Like, Share व Comments करा. जेणे करून ही उपयुक्त माहिती लोकांपर्य पोहचवता येईल.

https://www.youtube.com/channel/UCIUZVOtKaSvV1DqTmFnKR5Q/videos

इतर माध्यमांवरही आपण आहात पण आवर्जून Like व Share करा म्हणजे ही माहिती लोकांपर्यंत पोहचवता येईल.

बरीच मंडळी आमच्या समाज माध्यमांशी जोडलेली आहेत. पण केवळ like, share न केल्यामुळे त्यांना आमच्या पोस्ट दिसत नाही. ते का दिसत नाही या विषयी येथे क्लिक करा.

तर आम्ही लोकांना घरच्या घरी भाज्या उगवण्या संदर्भात, कचरा व्यवस्थापन संदर्भात माहिती निशुल्क प्रदान करत आहोत.

तर त्यांनाही आमच्या उपक्रमाचा उपयोग होईल.

आमची उपस्थिती असलेली खालील समाज माध्यमांना भेट द्या व जोडून घ्या..

YouTube मराठीत (vegetable garden updates साठी) https://www.youtube.com/channel/UCIUZVOtKaSvV1DqTmFnKR5Q

YouTube हिंदी में
https://www.youtube.com/channel/UCfPH1NBIAeXcYk3DQUBnSlg

facebook page “गच्चीवरची बाग नाशिक Page”
http://bit.ly/2NutaGb

Google My Bussiness

https://organic-vegetable-terrace-garden.business.site/

Tweeter link

Check out organic Vegetable Terrace Garden (गच्चीवरची बाग) (@orvetega): https://twitter.com/orvetega?s=09

*Instagram*
https://www.instagram.com/gacchivarchi_baug/

Mo no/ Wts app/ wts app call
8087475242 9850569644

https://www.gacchivarchibaug.in

https://www.sandeep-chavan.in

https://www.chat-par-khet.com

https://atomic-temporary-145492773.wpcomstaging.com

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक.

करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटात गच्चीवरची बाग

कृपया लेख वाचण्यासाठी  आपला थोडा वेळ हवाय.. आपला दिलेला वेळ आमच्यासाठी खूप मोलाचा असेन. आपणास आम्ही मदतीचे आव्हान करत आहोत. पण खरं सांगायचे तर मदतीबरोबर आपल्या संवेदनशीलतेचीही गरज आहे. कारण आपल्याला सांगावे की नाही या विचार मागील महिण्यापासून करतोय पण ते लेखाव्दारे सांगायचे ठरवले आहे.


कृपया लेख वाचण्यासाठी  आपला थोडा वेळ हवाय.. आपला दिलेला वेळ आमच्यासाठी खूप मोलाचा असेन. आपणास आम्ही मदतीचे आव्हान करत आहोत. पण खरं सांगायचे तर मदतीबरोबर आपल्या संवेदनशीलतेचीही गरज आहे. कारण आपल्याला सांगावे की नाही या विचार मागील महिण्यापासून करतोय पण ते लेखाव्दारे सांगायचे ठरवले आहे.

आपण सारेच आज एका विचित्र संकाटातून मार्ग काढत आहोत. आज एक वर्ष पूर्ण होत आहे. पहिली कोरानाची लाट संपत नाही तर दुसरीने हाहाकार माजवला आहे. घरात किंवा शेजारी एक तरी माणूस आजाराने ग्रस्त आहे किंवा घाबरलेला आहे. घरातून बाहेर पडावे तर कोरोनाशी कुठे गाठ पडेल याचा भरोवसा नाही. घरात रहावे तर हाता तोंडाची गाठ पडणे दुरापस्त झालेय. हाता तोंडांची गाठ पडेनही. आहे ते खाता येते. पण रात्रीची झोप उडाली कारण दिवसा कामात मन रमवता येते. पण अंधार सक्तिचा आराम करावयास लावतो. पण झोपेत पूर्वीसारखा निवांतपणा राहिला नाही. कारण बॅंकाकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांच्या तगादा चालू झालाय. मागील वर्षी तीन महिने कर्ज वसूली बंद होती म्हणून निवांत होतो. त्याची कसर मधल्या काळात काही अंशी भरून काढता आली. पण आता तो दिलासा यावेळेस नाही.  उपलब्ध वेळेचा आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणे हे आजच्या घडीला आमच्यासाठी तरी फायद्याचे आहे.  प्रत्येकाने लस टोचून घेतली तरच कोरोनावर मात करता येईल. पण येते दोन तीन महिने तरी हे चित्र दृष्टीक्षेपात येईल असे वाटत नाही. तो पर्यंत दिवस कसे काढायचे हा मोठा प्रश्न आहे. कोरोनाची लाट संपेलही पण येणारे आर्थिक संकट हे महाभंयकर असणार आहे. याचा अनुभव आता यायला लागला आहे.

गच्चीवरची बागेला या वर्षी आठ वर्ष पूर्ण झालेत. पर्यावरणाला उद्योजकतेची जोड देतांना जे जे करणे शक्य होते ते आम्ही प्रामाणिक पणे करण्याचा प्रयत्न केला. असेल तेव्हढी आर्थिक ताकद पणाला लावून पैसे उभे केले. कर्ज काढले. २०१९ संपे पर्यंत गाडी कुठे रूळावर आली होती. सन २०२० पासून फक्त कर्ज फेडणेच एवढाच संकल्प हाती घेतला आणि कोरोनाने उचल खाल्ली. मागील वर्ष आम्ही मित्रांकडून उधार उसनवारी करून कर्जाचे हप्ते फेडले. पण २०२१ मधे फक्त वर्षाचे पान ओलांडले परिस्थिती तिच आहे. बाहेर पडावे तर कोराना गाठणार. म्हणून १ एप्रिलपासून घरीच आहोत. कारण उपचारासाठीच पैसे नाहीत तर फिरायचे कशाला? मागील वर्षी मदत केलेल्या मित्रांकडेच पुन्हा पैसे कसे मागायचे ? बॅंक नवीन कर्ज दयायला तयार नाही. कारण त्यांचेच परतफेड बाकी आहे.

आमच्याकडे आता एकच पर्याय उरलाय. गच्चीवरची बागेचा आर्थिक कणा असलेली आमचा छोटा हत्ती विकणे. पण गाडी विकली तर पुन्हा पर्यावरणाचे हे काम उभे राहणार नाही.  रोजगार उभा करतांना पै पै गुंतवणूक केली. सुदैवाने व्यसनांवर व आजारपणावर खर्च नाही. उद्योगाला लागत असलेला पैसा कमीच पडत गेला. कारण या उद्योगाची सुरवात शुन्य संकल्पनेपासून झाली होती. इच्छा, तळमळ आणि अनुभव हेच काय ते भांडवल होते. सारे पै पै गोळा करून उभे केलेय. खरतर कोरानाची भिती आहेच. पण कोरोना चांगल्या पर्यावरणीय उपक्रमाचा पहिला घास घेणार आहे. हे नक्की झालयं. कारण ही संकल्पना रक्ताचे पाणी करून फुलवली आहे. ति आता डोळ्यासमोर विरून जाणार त्यामुळे आम्ही चिंतेत आहोत.

कामे चालूच आहेत..

माहे एप्रिल २०२० पासून घरी आहोत. पण घरी बसून आमची कामे चालूच आहेत. संकेतस्थळ अपडेट करणे, भाजीपाल्यावर व्हिडीओ बनवणे, लेख लिहणे, मागील काही वर्षात लोकसत्ता, सकाळ वृत्तपत्रात प्रकाशीत झालेले लेखांचे पी.डी.एफ. स्वरूपात पुस्तक तयार करणे. ति इच्छुकांना कमी किमतीत उपलब्ध करून दिली आहेत. उत्पादनांच्या किमती कमी केल्या आहेत. पण घेणाराच नाही तरी उत्पन्न कुठून येणार. डिजीटल स्वरूपातली  अशी कामे घरी बसून चालूच आहोत. फक्त पैसा मिळवून देणारी कामे बंद आहेत. तसेच आम्ही घरी राहूनही इच्छुंकाचे प्रबोधन व्हावे म्हणून बागेविषयी अपडेट्स पाठवत आहोत. येणार्या कॉल्सला प्रतिसाद देत आहोत. थोडक्यात लाॉकडाऊनमधे भाज्या कशा पिकवाव्यात या बद्दल निशु्ल्क मार्गदर्शन आहोत.

आम्ही या लेखाव्दारे आपल्याला आवाहन करतो की आम्हाला ही कठीण वेळ काढण्यासाठी आर्थिक मदत करावी. ति आपणास आम्ही नक्की परत करू. मला माहीत आहे आपण प्रत्येकजण आर्थिक विवेचनेत आहोत. पण आम्ही आमच्या संकल्पनेला मरताना खरचं नाही पाहू शकतं. ही मदत तुम्हाला जेवढं थोडं देता येईल तेव्हढीच हवी आहे. मदत एकाकडूनच यावी अशीही अपेक्षा नाही ति सर्वाकडून थोडी थोडी यावी. असे वाटतेय. मी आपणास मदतीसाठी आग्रह नाही करू शकणार पण हा लेख इतरांपर्यत समाज माध्यमांव्दारे पाठवावी हि विनंती. कदाचित कुणीतरी आम्हाला मदत करतील. संकल्पना जगली वाचली तरच पुढे उभे राहता येईल एका पर्यावरण पुरक उद्योजकचेचा आर्थिक श्वास आता संपत आलाय. एवढेच आपल्याला सांगू इच्छितो.

धन्यवाद.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग. नाशिक.

9850569644 / 8087475242

http://www.gacchivarchibaug.in

Instamojo Store

https://www.instamojo.com/gacchivarchi_baug/

Personal & Work Profile…


 

20151111_081256-2 - Copy.jpgMr. Sandeep K. Chavan, Nashik Birth: June 1, 1979 Education: Journalism Job graph: …
A) Working with Nashik based Media Organization (2001 to 2013)
1) Working with Media Resource Center & grassroots level coordination with Farmer, children, women & youth group for self directing learning process.
2) Zero Waste Project (Creation) concept creation, program layout and implementation-experience (2005)
Co-authoring for 8 pocket-size books on Environmental issues (2005) Medium Resource Centers- Consequent to Project Chief Responsibility (2009 to 2013)
3) Hands on involvement in the Gacchi Varchi Baug project (from 2001 till date)
4) Visited Thailand (2003) for a study tour of organic farming methods that was organised for farmers engaged in experimental farming methods in organic farming from Maharashtra.
5) Waste Management, Kitchen Garden Concept – sharing experience techniques and methods techniques in Zimbabwe (2005)
6) Garden West, Kitchen West Management, Various Experiments and Studies in the Gacchi Varchi Baug (2005-2013)
7) Publishing of the Gacchi Varchi Baug book and stepping into Social Enterpreneurship (2013)
8) Introduction of the Gacchi Varchi Baugcompetition (2014)
9) Conducting Guidance Workshops on the concept Garbage to Garden for different age groups and sharing insights through social media.

B) Interview and broadcast on audio media
1) Produced a five minute documentary on Zero-Waste urban farming theme (2005)
2) Interview in the youth program by the Nashik Radio Center on waste management issues (2005)
3) Created a document on Sajja Par Sabzi through the Organic Farming Association of India (OFAI) (Jan 2015)
4) Participated and presented the Garbage to Garden Concept on Mi Marathi Channel (February 2012) in their Zero Trash, Reduce Trash Program
5) Broadcasting of 10-Minute special programme in the news bulletin SEHERNAMA and AGROVAN (April 2015) on the channel SAAM Marathi
6) Broadcasting of 8 hours in 40 minute episodes by the Nashik AIR radio station (June 2015) on Gacchi Varchi Bagh and repeat broadcast in 2016
7) Two minutes news feature on Zee 24 hours (March 2016)
8) Interview for the concept of Green Surroundings at the Mumbai AIR Center (Nov. 16)
9) Introduction of article and work in the Diwali issue of Panini and Aahuti respectively (Nov. 16)
10) Mumbai Akashvani Campus – Interview on November 16
11) Interview with for vishwas Radio ( Local FM Channel) JAN 2016 to DEC 2017
12) Terrace Garden workshop with maharashtra Times, Nshik. 2017

C) Print media releases
1) Periodical news and circulars released from time to time in Divine Marathi, Loksatta, Lokmat, Lokmat Times, Agrovan, Maharashtra Times, Times of India, DNA-Online, Sakal, Punyanagari, Leader, Gakri.
2) Loksatta – Chaturanga, in this survey, in the Gacchi Varchi Bagh Sadar from feb 2015 Dec 2015

D) Gacchi Varchi Bagh Workshops and guidance of 3700 people in Nashik, Alibaug, Panvel, Morvi, Gujarat (Gujarat), Talegaon Dabhade and Chakan Pune. Guidance for 5,000 people through social media. Face to face guidance to people through Ganpati Mandals, Mahila Mandals, Senior Citizen Centers, Savings Groups
E) Active participation in the foundation laying of the social movement Jivan Utsav

F) Honer & Awards
1) Professional Service Award by Rotary Club of Ambad, Nashik (Oct. 2014)
2) Vasundhara Mitra Award by Kirloskar Vasundhara International Film Festival (July 2015)
3) Felicitation by Vimukta Stree Manch (August 16)

4) Nirmal Gram Nirman Kendra -Sanman 2020

 

%d bloggers like this: