आता जिंका सोनं, रोख बक्षीसं व गार्डन कीट गीफ्टस…
दिव्य मराठी, नाशिक या आघाडीच्या वृत्तपत्रासोबत २०१४ या वर्षी गच्चीवरची बाग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला मिळालेल्या अद्भूतपूर्व प्रदिसाद व यशानंतर भाजीपाला व बाग प्रेमीसाठी बक्षीसांची नवीन बाग प्रोत्साहन योजना आम्ही घेवून आलो आहोत. भाग्यवंत विजेत्यांना मिळणार ५ ग्रॅम सोनं, रोख बक्षीसं व गार्डेन कीट स्वरूपातील गीफ्ट्स मिळणार आहेत.
घर म्हटलं की त्याच्या टापटीप, सौंदर्यात, त्याच्या देखभालीत महिलांचा सहभाग हा कौतुकास्पद असतो. त्याच बरोबर आपल्या घरातल्यांची सर्वतोपरी आरोग्याची काळजी घेणं हे सुध्दा त्यात आलंच. घराचे, घरातले व सभोतालचे सौदर्यं वाढावे यासाठी आपण सुंदर झाडांची, फुलांची बाग फुलवतो. त्याच बरोबर आरोग्यदायी भाज्या फुलवणारी बाग सुध्दा फुलवतो. रासायनिक खत व फवारणीमुळे बाजारात मिळणार्या भाज्या या बेचव व गंभीर आजारांना आमंत्रित करणार्या असतात. या जाणीवेतूनच आपण घरच्या घरी भाज्या पिकवण्याचे, बागेला नैसर्गिक खत, द्राव्य खतं व फवारणी करत असतो. निसर्गाच्या काळजीसोबत आपल्याला आपल्या घरच्यांची काळजी करत असतो.
या सार्या पर्यावरण पुरक मुद्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून गच्चीवरची बाग नाशिकच्या बागप्रेमीच्या भाग्यवंत विजेत्यांना, सोनं, रोख बक्षीसं व गार्डन कीट –गीफ्टस जिंकण्याची संधी घेवून येत आहे.
गच्चीवरची बाग नाशिकमधे गेल्या सहा वर्षापासून पूर्णवेळ भाजीपाला उगवून देण्याचे तंत्र, मंत्र, ज्ञान-विज्ञान बाग प्रेमींना शिकवत आहोत व ते प्रत्यक्षात आणत सुध्दा आहोत. या सार्या निसर्ग संवर्धनाच्या कार्यात नाशिककर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या जोडले गेले आहेत. त्यांच्या सहकार्यानेच गच्चीवरची बाग हा सामाजिक उद्मशील उपक्रम पुढे जात आहे. मागील सहा वर्षात आमच्या सोबत जवळपास सहा प्रकारचे बागप्रेमी कुटुंब जोडले गेले आहेत.
- विटांच्या वाफेत भाजीपाल्याची बाग फुलवणे…
- पूर्वी केलेल्या विटांच्या वाफेचे पूर्नभरण करणे…
- कुंड्या रिपॅटींग करणे….
- बागेचे व्यवस्थापन करणे….
- नैसर्गिक खत, द्राव्य खतं व बागेसंदर्भातील साहित्य खरेदी करणे.
- रेफरंस मार्केटींग करणे…
या सहा प्रकारात वर्ग बाग प्रेमी वर्ग तयार झाले आहेत. या सहाही प्रकारातील बागप्रेमींना आम्ही बक्षीसं जिंकण्याची संधी घेवून आलो आहोत.
भाग्यवंत विजेत्यांची योजना का करत आहोत.
आम्ही गेल्या सहा वर्षापासून नाशिकमधे भाजीपाला पिकवून देण्यासाठी कार्यरत आहोत. आम्हाला आमचे कामाचे महत्व समजून घेत व त्याला व्यावसायिकतेची जोड दिल्यामुळे हे पर्यावरणपुरक काम विस्तारण्यासाठी अनेक जाहिरात संस्था निमंत्रीत करत असतात. आपल्या कार्यक्रमाची पेड जाहिरात करून इच्छुकांपर्यंत पोहचण्यापेक्षा इच्छुकांचाच थेट फायदा कसा होईल, या साठी काही करता येईल का या विचारातून ही भाग्यवंत योजना आम्ही आणली आहे.
- विटांच्या वाफेत बाग फुलवणेः विटांच्या वाफ्यात आपण फोर लेअर फार्मिंग (पालेभाज्या उत्पादन करू शकता. यात २० टक्के माती व ८० टक्के पालापाचोळाचा वापर केला जातो. आपण गुंतवणूक केलेल्या वेळेच्या गुणोत्तरात आपण भाज्यां मिळवू शकता. या योजनेत आपल्या घराच्या आजूबाजूला, टेरेसवर आपण किमान १०० चौरसफूटांची भाजीपाल्याची बागचे सेटअप इंन्स्टॅलेशन करून त्यात भाज्या पिकवणे, फूलवणे गरजेचे आहे.
- पूर्वी केलेल्या विटांच्या वाफेचे पूर्नभरण करणेः मागील सहा वर्षात विटांच्या वाफ्यात भाजीपाला पिकवणारे अनेक समाधानी कुटुंब आहेत. पण ही वाफे पुन्हा नव्याने व आमच्या पध्दतीने भरणे गरजेचे असते. म्हणजे त्यातून भाज्या उत्पादनांचे चक्र अव्याहत सुरू राहते. त्यांना या निमित्ताने विटांचे वाफ्यांचे आमच्याकडून पूर्नभरण करता येईल.
- कुंड्या रिपॅटींग करणेः वर्षानुवर्ष आपल्याकडे बाग कुंड्यामधे बाग फुलवलेली असते. कुंड्या मातीने जड झालेल्या असतात. त्यातील एकादे झाडे मेले तरच आपण कुंडी नव्याने भरली जाते. पण आमच्या तंत्राप्रमाणे ५० ते ७० टक्के माती काढून जूनेच झाडं किंवा नव्याने झाडे लागवड केली जातात. कुंड्या वजनाने हलक्या होतात. बाग तजेलदार, हिरवीगार व फुलाने बहरते. या योजनेनुसार आपण आपली बाग रिपॅटींग आमच्याकडून करून घेवू शकता.
- बागेचे व्यवस्थापन पहाणेः आम्ही नाशिकमधील गॅलरी, बाल्कनी, विंडो गार्डन, टेरस गार्डन व किचन गार्डनचे व्यवस्थापन पाहतो. दर पंधरा दिवसांनी किंवा महिण्याने याची विषमुक्त पध्दतीने बागेचे व्यवस्थापन करत असतो. यातील व्यवस्थापनात सातत्य असणे गरजेचे असते.
- नैसर्गिक खत, द्राव्य खतं व बागेसंदर्भातील साहित्य खरेदी करणेः काही बाग प्रेमी जागेच्या अभावी व वेळेच्या उपलब्धतेनुसार आपली छोटी बाग स्वतःच फुलवत असतात. त्यासाठी लागणारे नैसर्गिक खत, द्राव्य खते व इतर साहित्य आम्ही पुरवत असतो. थोडक्यात ते आमच्याकडून वर्षभर काही ना काही खरेदी करत असतात. त्यांना सुध्दा वर्षाखेर खरेदीवर सुट मिळणार आहेत.
- रेफरंस मार्केटिंग… आम्ही पर्यावरण संरक्षणासाठी लोकसहभागाने काम करत आहोत. घरच्या कचर्याचे खत करा असं सांगण्यापेक्षा त्याचे व्यवस्थापन करा व त्यातून विषमुक्त भाज्या पिकवा असे पटवून दिल्यानंतर लोक सहभाग वाढलेला आहे. गारबेज टू गार्डन असेलेली ही संकल्पना आपल्या नाशिकरांना, महाराष्ट्र व भारतभरातील बाग प्रेमींना आवडेलेली आहे. त्यांनी केलेल्या कामाचे कौतुकांतूनच गच्चीवरची बाग हा उपक्रम वाढत चालला आहे. आता या पुढे या योजनेत सहभागी करून आपल्यालाही त्यांचाही फायदा देणार आहोत. या अतंर्गत आपल्याला पांईट नुसार गुणांकन केले जाईल व त्याच्या एकून संखेनुसार पांईट्सधारकांना रिटर्न गीफ्ट मिळणार आहे. हे रिर्टन गीफ्ट हे गार्डन कीट स्वरूपात असेल.
वरील सर्व भाग्यवंत विजेत्यानी आमचे कडून भाजीपाला, बाग फुलवून घ्यावी. तसेच या सोबत आम्ही वेळोवेळी बागे संदर्भात येणार्या अडचणीत तंत्र- मंत्र, ज्ञान- विज्ञान समजून सांगणरच आहोत. थोडक्यात शिकवणं हे सुरू राहणारचं आहे.
- विटांच्या वाफेत बाग फुलवणेः दोन भाग्यवंत विजेत्यास अनुक्रमे ३ व २ ग्रॅम असे एकून ५ ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र (दोन वाट्या व मनी) देण्यात येईल.
- पूर्वी केलेल्या विटांच्या वाफेचे पूर्नभरण करणेः दोन भाग्यवंत विजेत्यास रिपॅटींग साहित्य खर्चावर ५० टक्के सवलत किंवा १०००-१००० रूपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल.
- कुंड्या रिपॅटींग करणेः दोन भाग्यवंत विजेत्यास बागे संदर्भात उपयुक्त असे १००० रूपयांचे साहित्य देण्यात येईल.
- बागेचे व्यवस्थापन पहाणेः दोन भाग्यवंत विजेत्यास एका वेळेचे बाग व्यवस्थापन निशुल्क करून देण्यात येईल. किंवा ५००- ५०० रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल.
- नैसर्गिक खत, द्राव्य खतं व बागेसंदर्भातील साहित्य खरेदी करणेः दोन भाग्यवंत विजेत्यास वर्षभराच्या साहित्य खरेदीवर १० टक्के सवलत देण्यात येईल. (पैसे स्वरूपात किंवा गार्डन किट स्वरूपात)
- रेफरंस मार्केटिंगः दोन भाग्यवंत स्पर्धकांना पांईट नुसार १०००- १००० रूपयांचे रोख रक्कम किंवा तेवढ्याच किमतीचे गार्डन गीफ्ट देण्यात यईल.
स्पर्धेची सुरवात येत्या १ जून पासून २०१९ पासून होणार आहे. त्याचा बक्षीस, रोख रक्कम व गीफ्टस वितरण ५ जून २०२० परर्यावरण दिनाच्या रोजी होईल.
१ते ६ प्रकारातील दोन भाग्यवंत विजत्यांची निवड ५ जून २०२० रोजी आपल्या समक्ष चिठ्ठी निवडून केली जाईल. जे ५ जून रोजी २०२० रोजी गैरहजर असतील त्यांच्या बदली दुसरी चिठ्टी निवड करून तेथेच बक्षीस दिले जाईल.
६ व्या प्रकारातील स्पर्धकांचे रेफरंस मार्केटिंग बद्दलचे पांईट वर्षभर नोंद केली जाईल व त्याचा मासिक अहवाल आपल्याला पाठवला जाईल. त्यांची अग्रक्रमांनुसार पाच स्पर्धकांतून दोन भाग्यवंत विजेत्यांची निवड ही चिठ्ठी उचलून केली जाईल. ६ व्या प्रकारात नाशिक बाहेरील व्यक्तिही सहभागी होऊ शकतात.
६ व्या प्रकारातील स्पर्धकांना खालील मुद्दयानुरूप १-१ पांईट व एक बोनस पांईट असे १० पांईट्स चा एक रिवार्ड दिले जातील. ज्यांचे रिवार्ड जास्त त्या पाच स्पर्धाकांमधे भाग्यवंताची निवड केली जाईल.
- Experience & Knowledge Sharing specific on our Efforts
- Donation to our work or Deshi cow
- Purchase material from us (books, seed, Garden kit, Extra)
- Want to arrange Pay seminar
- Forward on social media (Facebook & Wts app Groups)
- Inform to reporter
- Arrange Social Camping
- Write article on our work
- Subscription, join, follow or Members on Social media & websites
कुटुंब किंवा कुटुंबातील एकच स्पर्धक आपले नाव व १ ते ६ या पैकी एकाच योजनेत नोंदवावे,
आपला सहभाग १ जून २०१९ पासून wts app 9850569644 या क्रंमाकावर नोंदू शकता.
आपल्याला सविस्तर माहिती फोनवर दिली जाईल. १-४ योजनेतील बागेसंदर्भातील माहिती व योजनेतील सहभागबदद्ल आपल्याला Pay Consultancy – on site दिली जाईल.
सुंदर नाशिक – हरित नाशिक करण्यासाठी या योजनेत प्रायोजक म्हणून म्हणून इच्छुक व्यक्ति, दुकानदार सहभागी होवू शकता. (त्यांच्या व्यवसायाची जाहिरात आमच्या सोशल मिडीयावर जोडलेल्या हजारों ग्राहकमित्रापर्यंत पोहचवता येईल)
More Information:
संदीप क. चव्हाण, नाशिक.
www.gacchivarchibaug.in www.organic-vegetable-terrace-garden.com
https://gacchivarchibaug.business.site
wts app: 9850569644 call : 8087475242
website
http://www.gacchivarchibaug.in
website https://atomic-temporary-145492773.wpcomstaging.com
profile
https://about.me/sandeepchavan
cover story https://udyojak.org/gachchivarchi-baug-success-story/
YouTube https://www.youtube.com/channel/UCIUZVOtKaSvV1DqTmFnKR5Q
my link http://www.mylinq.in/9850569644
https://organic-vegetable-terrace-garden.business.site/
👆वरील link ही गच्चीवरची बाग नाशिक ची आहे. आपण या site वर click करून आपला review नोंदवावा. आपल्या या एका प्रयत्नाने आम्ही करत असलेले पर्यावरण पुरक काम व निःशुल्क मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल.
संदीप चव्हाण नाशिक.