होम कंपोस्टींग लाईव्ह सेशन भाग २ होम कंपोस्टींग

येत्या रविवारी १९ संप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते १२ वाजे दरम्यान होम कंपोस्टींग या विषयावर लाईव्ह सेशन होणार आहे.


यूटयूबवर लाईव्ह सेशन With गच्चीवरची बाग, नाशिक.

लाईव्ह सेशन भाग २

विषयः होम कंपोस्टींग गतीने कसे करावे.

येत्या रविवारी १९ संप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते १२ वाजे दरम्यान होम कंपोस्टींग या विषयावर लाईव्ह सेशन होणार आहे. यात आपण खालील प्रमाणे विषय समजून सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कचरा व्यवस्थापन की विल्हेवाट यातील फरक, सोपे काय आहे?

नैसर्गिक कचरा (किचन वेस्ट, गार्डेन वेस्ट, खरकटे अन्न असे प्रकार

कचर्याचा स्वभाव, नेचर, वैशिष्टय, प्रक्रिया..

चुकीच्या पध्दती, समजूती व प्रॅक्टीसेस..(माती, पालापाचोळा, सर्वच एकत्र करणे)

अभ्यासाचा अभाव…

होम कंपोस्टींगचे साधने, गतीने कंपोस्टीग करण्यासाठी त्याची काळजी, गोमय कल्चरचा वापर कसा करावा.

अशा मुद्यावर चर्चा करण्यात येणार आहे.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

लाईव्ह सेशन भाग १: कुड्या अशा भरा… (व्हिडीओ)
All in one composting setup

Home composting Culture

Home composting art


Join us telephonic Topics


I am Feeling proud of this forum  for give a chance to interact with other city farmers.

u can listen my interview …

Agriculture Information connects growers, buyers, and experts.

We are one of the earliest (founded in 2000) agriculture website on the internet. We have more than 300,000 members using this platform.

The information on this website is also available as print magazines in various languages.

Our discussion forums have more than 100,000 individuals threads and posts on thousands of agriculture-related topics.

We conduct online meetings and discussions with successful (and not successful!) agriculture entrepreneurs, farmers and business people. They talk about their experiences. You can also join these meetings from wherever you are and participate in the discussions.

We are one of the most respected, independent agriculture media platform in India today. We are pro-farmer, not funded by any university or corporate with a vested interest. We carry interviews and articles with a wide range of people ranging from actual growers, entrepreneurs, academic experts, professionals and senior political leaders.

Agriculture Information is headed by Kartik Isvarmurti, a graduate of Delhi School of Economics and Oxford University, UK.

 

agri information post

Details Here

 

 

 

 

 

 

 

listen Audio Interview ...

Home composting and kitchen gardening workshop

सर्वात महत्वाचे म्हणजे रासायनिक भाज्यांना चवच नसते अशी चव हरवलेले आपण शहरातली माणसे हॉटेलचे जेवण जवळ करतात पण यातून योग्य पोषण मिळतच नाही. खरं पोषण आणि खरं खरी चव अनुभवायची असेल तर घरच्या घरी भाजीपाला पिकवणे याशिवाय दुसरा पर्याय नाही.


Home composting and kitchen gardening workshop

विषमुक्त भाजीपाला ही काळाची गरज झाली आहे. योग्य पोषणाअभावी आधुनिक जगातील सुख सुविधा व आरोग्य सुविधा यांचा योग्य तो परिणाम यावा यावयास वेळ लागतो. रासायनिक भाजीपाला हा आरोग्याला घातकच आहे हे आता सर्वमान्य होत आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रासायनिक भाज्यांना चवच नसते अशी चव हरवलेले आपण शहरातली माणसे हॉटेलचे जेवण जवळ करतात पण यातून योग्य पोषण मिळतच नाही. खरं पोषण आणि खरं खरी चव अनुभवायची असेल तर घरच्या घरी भाजीपाला पिकवणे याशिवाय दुसरा पर्याय नाही. घरचा भाजीपाला म्हटलं की पहिल्यांदा आपल्या डोक्यात येतं की त्यात खूप खर्च लागेल पण हा केवळ गैरसमज असून आपण वेळ दिला, त्याचे विज्ञान, निसर्गचक्र समजून घेतलं तर सहजरीत्या घरच्या घरी भाजीपाला पिकवू शकतो आणि त्याचा जोडीला होम कंपोस्टिंग हे खूप महत्त्वाचं आहे म्हणूनच गच्चीवरची बाग नाशिक व महाराष्ट्र टाइम्स नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मागील दोन वर्षातील ही चौथी कार्यशाळा संपन्न करत आहोत येत्या 6 ऑक्टोबर 2019 रविवार रोजी नाशिक येथे संपन्न होणार आहे. या कार्यशाळेत लोकसत्ता ह्या वर्तमानपत्रातील गच्चीवरची बाग या सदराचे व गच्चीवरची बाग पुस्तकाचे लेखक संदीप चव्हाण हे स्वतः स्लाईड शो द्वारे मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळे नंतरही ही आपण त्यांच्याशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून भाजीपाला निर्मिती व कंपोस्टिंग साठीचे मार्गदर्शन मिळवू शकता. तर आपण सहकुटुंब सहभागी व्हावे या अपेक्षेने. http://www.gacchivarchibaug.in

9850569644/8087475242


Home composting and जे kitchen gardening workshop

Chemical free food is necessary of this era. Lack of proper & origin nutrition takes time to bring about the right effects of the well-being and health care of the modern world. It is becoming increasingly common that chemicals are dangerous to health, and most importantly, people in the city who miss the taste of chemicals have no taste, but they do not get proper nutrition. There is no choice but to cook homemade vegetables if you want to experience true nutrition and true taste.
Home vegetable said that it comes to our head for the first time, it will cost a lot, but it is only a misunderstanding and if we give the time, understanding the nature and nature of the cycle, we can easily grow vegetables in our house and home composting is very important for the couple. This is the fourth workshop in the last two years in collaboration with Maharashtra Times Nashik doing nuns.
It will be held on Sunday, October 6, 2019 in Nashik. The workshop will be directed by Sandip Chavan, author of the Gachivarchari Bagh column in the newspaper Lokasatta, and Sandeep Chavan, the author of the Gachchivar Bagh book. After the workshop you can also contact them through social media and get guidance on vegetable production and composting. So expect you to join a family.

http://www.gacchivarchibaug.in

9850569644/8087475242

कोंथीबिर / धने लागवड कशी करावी?

हा लेख वाचा.. आपल्याला फायदा होईल. विषमुक्त पध्दतीने उगवलेल्या कोंथबिरीच्या दोन काड्या आपल्या जेवणातील पदार्थांची चव बदलवू शकते. शिवाय ती आरोग्यदायी सुध्दा ठरते. तर  घरच्या घरी कोथंबिर मिळवण्यासाठी आपल्याला धने पेरले पाहिजेत. त्याची निवड, बिजप्रक्रिया, त्याची पेरणी, त्याची काळजी कशी घ्यावी हे सांगणारा लेख.


500_F_12234084_pX70w4Hy2tEzkjPqcUzxf79YVo1E6fSl

How to Grow Coriander at Home….

कोंथीबिर कशी लागवड करावी…

जेवणातील पदार्थाची चव वाढवण्यासाठी कोंथबिर ही महत्वाची वनस्पती आहे. तिच्या कच्च्या सेवनाने बरेच काही आरोग्यदायी फायदेसुध्दा आहेत. बाजारात मिळणारी कोंथंबिर ही रासायनिक खते, फवारणी करून कमी कालावधीत वाढवलेली असते त्यामुळे ती बचकभर (मूठभर) टाकली तरी चव येत नाही, त्याचा सुंगध तर दूरची गोष्ट.. पण घरी विषमुक्त पध्दतीने उगवलेल्या कोंथबिरीच्या दोन काड्या आपल्या जेवणातील पदार्थांची चव बदलवू शकते. शिवाय ती आरोग्यदायी सुध्दा ठरते. तर घरच्या घरी कोथंबिर मिळवण्यासाठी आपल्याला धने पेरले पाहिजेत. त्याची निवड, बिजप्रक्रिया, त्याची पेरणी, त्याची काळजी कशी घ्यावी हे सांगणारा लेख..

धने निवडः बरेचदा आपण घरात फोडणीसाठी वापरले जातात ते धने पेरतो. काही वेळेस ते येतात काही वेळेस नाही. असा बर्याच जणांचा अनुभव आहे. प्रथमतः त्याची निवड महत्वाची आहे. स्वयंपाक घरात वापरात येणारे धने हे हिरवट रंगाचे असतात. ते बियाणं म्हणून पूर्नलागवडीस योग्य नसतात. कारण त्यांची बिज म्हणून पूर्णतः वाढ झालेली नसते. त्यामुळे ही धने पेरण्यायोग्य नसतात.

कोथबिरीसाठी धने हे मोठे ज्वारीच्या दाण्यासारखे टप्पोरे, खाकी रंगाचे असावेत. बियाणांच्या दुकानात ते मिळतात. बरेचदा खाकी रंगाचे धने वाण्याच्य दुकानात सुध्दा मिळातात. त्या धन्यांना गव्हाच्या चाळणीने चाळून घ्यावेत. म्हणजे बारिक आकाराचे धने हे घरात वापरावेत व मोठे आकाराचे पेरण्यासाठी योग्य असतात.

पहिल्यांदा निवडलेल्या धन्यांना भरडून घ्यावेत. ते व्दीदल असतात. अखंड पेरले तर त्यातून अंकूर येण्यास बराच काळ लागतो. त्यामुळे त्यास हलक्या हाताचा दाब देवून, वाटीने किंवा ताटडीने भरडून घ्यावेत. पायात चप्पल घालूनही भरडता येतात. तर बिजसंस्कार करण्यापूर्वी धने भरडून घेणे गरजेचे आहे.

बिजप्रक्रिया, कोणतही बियाणं पेरतांना त्यावर बिजसंस्कार होणे गरजेचे आहे. ती खालील प्रमाणे करता येते.

  • भरडेलेले धने सकाळी साध्या किंवा कोमट पाण्यात दिवसभर भिजवावे व मातीत पेरावे.
  • भरडेलेल्या धन्यांना चुना (हरबरादाण्याएवढा चुना) व कपभर पाण्यात तास दोन तास भिजवावा व त्यास मातीत पेरावे.
  • भरडेलेले धने वाटीत पाणी घेवून दिवसभर उन्हात ठेवावे व नंतर मातीत पेरावे.
  • गोमुत्र पाण्यात तीन चार तास भिजवावे हे नंतर मातीत पेरावे.
  • जिवामृत असल्यास भरडलेल्या धन्यांना जिवामृत चोळून वाळू द्यावे व नंतर मातीत पेरावे.
  • gardening course

पेरण्याची प्रक्रिया ही सायंकाळी करावी. म्हणजे ते रात्रभर मातीत स्थिर होतात.

धने मातीत पेरण्याची पध्दत…

  • वरील प्रकारात भिजवलेले धने मातीत पेरावयाचे असल्यास त्यास सरी पध्दतीने दोन दोन दाने एका ओळीत सोडत एक इंच मातीचा थर द्यावा.
  • किंवा चार चार दाने चिमटीत पकडून ते मातीत एक इंच खोल जातील व त्यात ठराविक अंतर ठेवत पेरावे.
  • भरडेलेले कोरडे धने मातीत पेरावयाचे असल्यास त्यास इच्छित कुंडीत चमचे दोने चमचे पेरावेत त्यावर पाणी शिंपडून दूध काला करतो त्याप्रमाणे हलक्या बोटांनी त्यात मातीत कुस्करावेत. म्हणजे माती, पाण्यांचा धन्यांशी संयोग होवून ते लवकर उगवून येतात.
  • कोरडे भरडलेले धने चिमटीत पकडून ते मातीत एक इंच खोल जातील व त्यात ठराविक अंतर ठेवत पेरता येतात.

घ्यावयाची काळजी…

  • धने पेरल्यानंतर त्यास हाताने पाणी शिंपडून द्यावे. व सात-आठ दिवस त्यास ओलावा मिळेल याची काळजी घ्यावी. शक्य झाल्यास त्यास कडक उन्हात ठेवणे टाळावे. उनसावली चालेल. कारण धन्याचे अंकुर हे नाजूक असतात. त्यास कडक उनं लागले तर ते सुकून जातात.
  • आपण आपल्या परिसरात पहिल्यांदा धने पेरत असाल तर त्यास चिमण्यापासून वाचावे. कारण कोवळे अंकूर हे त्यांचे औषध असते. आपल्या डोळ्यांना दिसणार नाही असे छोटे अंकूरित बिज ते चोचीने टिपत फस्त करतात.

बरेचदा संकरीत धने हे बोटावएवढे झाले की मान टाकतात किंवा ते अधिक वाढत नाही. अशा वेळेस त्यांना योग्य वेळेला खूडून, उपटून, मुळासहित स्वच्छ धूवून ते वापरावी. गावठी धने असल्यस त्याचे देठ जाड असते. त्यामुळे त्यास वर वर कापत वापरावी. पुन्हा देठांना पाने येतात. घरच्या बागेत आपल्याला वर्षभर धने पेरता येतात. फक्त एकदा पिक घेवून झाले की माती कडकडीत उन्हात वाळवावी. त्यात कंपोस्ट, गांडूळ खत मिसळावे म्हणजे नवे धने पेरता येतात. वरील सर्व प्रयत्न करूनही धने उगवले नाहीतर वाण्याचं दुकान बदलावं थोडक्यात बिज नवे घ्यावे.

टीपः बाजारात मल्टीकट ( पुर्नतोडणी करता येणारी कोंथबींर) वाणाचे छोट्या आकाराचे धने मिळतात. त्यांना भिजवू अथवा भरडू नये ते पेरण्यासाठी अखंड वापरावेत. चिमटीत धरता येईल एवढे चार चार दाणे घेवून ते पेरभर मातीत (सांयकाळच्या वेळेस) चार चार बोटाच्या अंतरावर पेरावेत.

आपल्याला लेख आवडला तर नावासहित शेअर करा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

www.gacchivarchibaug.in

 9850569644

===========================================

*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. महाराष्ट्र. इंडिया से.. 9850569644

Grower Cum composter

सलाडसाठी उपयुक्त अशा भारतीय व विदेशी पालेभाज्यांची लागवड करू शकता. प्रत्येकी ५ किंवा १० कप्प्यात आपण एक भाजी या प्रमाणे १० प्रकारच्या भाज्या लागवड करू शकता. वरील भागात वर्षायु झाड लागवड करू शकता. तसेच उर्वरीत २ कप्प्यात वेलवर्गीय बियांची लागवड करू शकता.


Copy of Copy of Picture 003 copy copy

Grower Cum composter by गच्चीवरची बाग

गच्चीवरची बाग नाशिक हा participatory environmental activities गेल्या सात वर्षापासून नाशिक मधे व महाराष्ट्रात रूजवत आहोत. आम्ही पूर्णवेळ प्रत्यक्ष भाजीपाल्याच्या बागा फूलवून देण्याचे काम करत आहेत. या विषयी आम्ही वेगवेगळे प्रयोग करून पाहतो. ते विविध ठिकाणी रूजवून पाहतो. त्यातीलच एक प्रयोग आपल्यासाठी देत आहोत.

बाजारात सध्या कंपोस्टर यंत्राची धूम आहे. घरच्या कचर्याचे कंपोस्टींग हे गरजेचेच आहे. ते प्रत्येकाने आपले पर्यावरणीय कर्तव्य म्हणून पार पाडलेच पाहिजे. पण बाजारातील कंपोस्टर हे फक्त हिरव्या कचर्याचे खतात रूंपातर म्हणजेच त्याचे व्यवस्थापन करणेसाठी उपलब्ध आहेत. आम्ही याही पूर्वी गच्चीवरची बागेने All in one Waste composter – Devil Digester विकसीत केला आहे.

त्याचीच नवीन आवृत्ती म्हणजे “ग्रोव्हर कम कंपोस्टर” आम्ही विकसीत केला आहे. बाजारातील कंपोस्टरच्या किमती एवढा आहे. त्यात आपण रोजचा कचरा डंम्प करू शकता. तसेच त्यात कंपोस्टींग करता करता त्यात पालेभाजी, फळभाजी (वांगी, टोमॅटो, मिरची) वेलवर्गीय व एकादे वर्षायु झाड उगवू शकता. ( उदाः शेवगा, पपई) हा २०० लिटर क्षमतेचा ड्रम असून त्याला ५२ कप्पे करण्यात आले आहेत.

त्यात आपण सलाडसाठी उपयुक्त अशा भारतीय व विदेशी पालेभाज्यांची लागवड करू शकता. प्रत्येकी ५ किंवा १० कप्प्यात आपण एक भाजी या प्रमाणे १० प्रकारच्या भाज्या लागवड करू शकता. वरील भागात वर्षायु झाड लागवड करू शकता. तसेच उर्वरीत २ कप्प्यात वेलवर्गीय बियांची लागवड करू शकता.

कसे काम करते…. या ड्रमला बाहेरील बाजूस कपाच्या आकाराचे ५२ कप्पे केले असून त्यात ते चौफेर आहेत.

वरील बाजू कडून म्हणजे ड्रमच्या मधोमध एक पाईप दिलेला असून त्यात रोजचे खरकटे अन्न, हिरवा कचरा आपण त्यात टाकू शकता. तळाशी त्याला छिद्र दिलेले असून त्यातून पाण्याचा निचरा होतो. निचरा होणारे पाणी पुन्हा वापरू शकता. यात उत्तम प्रकारे यात पालेभाज्यांची निर्मिती होते.

याला चौफेर उन्हाची गरज असते. ते आपण बाल्कनीत, टेरेस व अंगणात मधोमध ठेवू शकता. यात गांडूळ सोडलेली असल्यामुळे कंपोस्टींगचे ते खत बनवतात. व तेच खत रोपांना पुरवतात. यात थोडी सोय सुविधा केल्यास त्यास सहजतेने फिरवता येताे. पण फिरवणे शक्य नसल्यास अर्ध्या भागात ऊन येत नसल्यास तेथे Exotics भाज्या सहजतेने उगवता येतात.

आपल्याला “ग्रोव्हर कम कंपोस्टर” पहावयाचा असल्यास नक्कीच आमच्या बागेला भेट देवू शकता.

गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक.

www.gacchivarchibaug.in

गच्चीवरची बाग updates साठी गच्चीवरची बाग नाशिक page like करा ..

Gold भी…Saving भी…

पर्यावरणपुरक काम विस्तारण्यासाठी अनेक जाहिरात संस्था निमंत्रीत करत असतात. आपल्या कार्यक्रमाची पेड जाहिरात करून इच्छुकांपर्यंत पोहचण्यापेक्षा इच्छुकांचाच थेट फायदा कसा होईल, या साठी काही करता येईल का या विचारातून ही भाग्यवंत योजना आम्ही आणली आहे.


piggy-bank-2889046_1280.jpg

आता जिंका सोनं, रोख बक्षीसं व गार्डन कीट गीफ्टस…

दिव्य मराठी, नाशिक या आघाडीच्या वृत्तपत्रासोबत २०१४ या वर्षी गच्चीवरची बाग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला मिळालेल्या अद्भूतपूर्व प्रदिसाद व यशानंतर भाजीपाला व बाग प्रेमीसाठी बक्षीसांची नवीन बाग प्रोत्साहन योजना आम्ही घेवून आलो आहोत. भाग्यवंत विजेत्यांना मिळणार ५ ग्रॅम सोनं, रोख बक्षीसं व गार्डेन कीट स्वरूपातील गीफ्ट्स मिळणार आहेत.

घर म्हटलं की त्याच्या टापटीप, सौंदर्यात, त्याच्या देखभालीत महिलांचा सहभाग हा कौतुकास्पद असतो. त्याच बरोबर आपल्या घरातल्यांची सर्वतोपरी आरोग्याची काळजी घेणं हे सुध्दा त्यात आलंच. घराचे, घरातले व सभोतालचे सौदर्यं वाढावे यासाठी आपण सुंदर झाडांची, फुलांची बाग फुलवतो. त्याच बरोबर आरोग्यदायी भाज्या फुलवणारी बाग सुध्दा फुलवतो. रासायनिक खत व फवारणीमुळे बाजारात मिळणार्या भाज्या या बेचव व गंभीर आजारांना आमंत्रित करणार्या असतात. या जाणीवेतूनच आपण घरच्या घरी भाज्या पिकवण्याचे, बागेला नैसर्गिक खत, द्राव्य खतं व फवारणी करत असतो. निसर्गाच्या काळजीसोबत आपल्याला आपल्या घरच्यांची काळजी करत असतो.

या सार्या पर्यावरण पुरक मुद्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून गच्चीवरची बाग नाशिकच्या बागप्रेमीच्या भाग्यवंत विजेत्यांना, सोनं, रोख बक्षीसं व गार्डन कीट –गीफ्टस जिंकण्याची संधी घेवून येत आहे.

गच्चीवरची बाग नाशिकमधे गेल्या सहा वर्षापासून पूर्णवेळ भाजीपाला उगवून देण्याचे तंत्र, मंत्र, ज्ञान-विज्ञान बाग प्रेमींना शिकवत आहोत व ते प्रत्यक्षात आणत सुध्दा आहोत. या सार्या निसर्ग संवर्धनाच्या कार्यात नाशिककर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या जोडले गेले आहेत. त्यांच्या सहकार्यानेच गच्चीवरची बाग हा सामाजिक उद्मशील उपक्रम पुढे जात आहे. मागील सहा वर्षात आमच्या सोबत जवळपास सहा प्रकारचे बागप्रेमी कुटुंब जोडले गेले आहेत.

  • विटांच्या वाफेत भाजीपाल्याची बाग फुलवणे…
  • पूर्वी केलेल्या विटांच्या वाफेचे पूर्नभरण करणे…
  • कुंड्या रिपॅटींग करणे….
  • बागेचे व्यवस्थापन करणे….
  • नैसर्गिक खत, द्राव्य खतं व बागेसंदर्भातील साहित्य खरेदी करणे.
  • रेफरंस मार्केटींग करणे…

या सहा प्रकारात वर्ग बाग प्रेमी वर्ग तयार झाले आहेत. या सहाही प्रकारातील बागप्रेमींना आम्ही बक्षीसं जिंकण्याची संधी घेवून आलो आहोत.


भाग्यवंत विजेत्यांची योजना का करत आहोत.

आम्ही गेल्या सहा वर्षापासून नाशिकमधे भाजीपाला पिकवून देण्यासाठी कार्यरत आहोत. आम्हाला आमचे कामाचे महत्व समजून घेत व त्याला व्यावसायिकतेची जोड दिल्यामुळे हे पर्यावरणपुरक काम विस्तारण्यासाठी अनेक जाहिरात संस्था निमंत्रीत करत असतात. आपल्या कार्यक्रमाची पेड जाहिरात करून इच्छुकांपर्यंत पोहचण्यापेक्षा इच्छुकांचाच थेट फायदा कसा होईल, या साठी काही करता येईल का या विचारातून ही भाग्यवंत योजना आम्ही आणली आहे.

  • विटांच्या वाफेत बाग फुलवणेः विटांच्या वाफ्यात आपण फोर लेअर फार्मिंग (पालेभाज्या उत्पादन करू शकता. यात २० टक्के माती व ८० टक्के पालापाचोळाचा वापर केला जातो. आपण गुंतवणूक केलेल्या वेळेच्या गुणोत्तरात आपण भाज्यां मिळवू शकता. या योजनेत आपल्या घराच्या आजूबाजूला, टेरेसवर आपण किमान १०० चौरसफूटांची भाजीपाल्याची बागचे सेटअप इंन्स्टॅलेशन करून त्यात भाज्या पिकवणे, फूलवणे गरजेचे आहे.
  • पूर्वी केलेल्या विटांच्या वाफेचे पूर्नभरण करणेः मागील सहा वर्षात विटांच्या वाफ्यात भाजीपाला पिकवणारे अनेक समाधानी कुटुंब आहेत. पण ही वाफे पुन्हा नव्याने व आमच्या पध्दतीने भरणे गरजेचे असते. म्हणजे त्यातून भाज्या उत्पादनांचे चक्र अव्याहत सुरू राहते. त्यांना या निमित्ताने विटांचे वाफ्यांचे आमच्याकडून पूर्नभरण करता येईल.
  • कुंड्या रिपॅटींग करणेः वर्षानुवर्ष आपल्याकडे बाग कुंड्यामधे बाग फुलवलेली असते. कुंड्या मातीने जड झालेल्या असतात. त्यातील एकादे झाडे मेले तरच आपण कुंडी नव्याने भरली जाते. पण आमच्या तंत्राप्रमाणे ५० ते ७० टक्के माती काढून जूनेच झाडं किंवा नव्याने झाडे लागवड केली जातात. कुंड्या वजनाने हलक्या होतात. बाग तजेलदार, हिरवीगार व फुलाने बहरते. या योजनेनुसार आपण आपली बाग रिपॅटींग आमच्याकडून करून घेवू शकता.
  • बागेचे व्यवस्थापन पहाणेः आम्ही नाशिकमधील गॅलरी, बाल्कनी, विंडो गार्डन, टेरस गार्डन व किचन गार्डनचे व्यवस्थापन पाहतो. दर पंधरा दिवसांनी किंवा महिण्याने याची विषमुक्त पध्दतीने बागेचे व्यवस्थापन करत असतो. यातील व्यवस्थापनात सातत्य असणे गरजेचे असते.
  • नैसर्गिक खत, द्राव्य खतं व बागेसंदर्भातील साहित्य खरेदी करणेः काही बाग प्रेमी जागेच्या अभावी व वेळेच्या उपलब्धतेनुसार आपली छोटी बाग स्वतःच फुलवत असतात. त्यासाठी लागणारे नैसर्गिक खत, द्राव्य खते व इतर साहित्य आम्ही पुरवत असतो. थोडक्यात ते आमच्याकडून वर्षभर काही ना काही खरेदी करत असतात. त्यांना सुध्दा वर्षाखेर खरेदीवर सुट मिळणार आहेत.
  • रेफरंस मार्केटिंग… आम्ही पर्यावरण संरक्षणासाठी लोकसहभागाने काम करत आहोत. घरच्या कचर्याचे खत करा असं सांगण्यापेक्षा त्याचे व्यवस्थापन करा व त्यातून विषमुक्त भाज्या पिकवा असे पटवून दिल्यानंतर लोक सहभाग वाढलेला आहे. गारबेज टू गार्डन असेलेली ही संकल्पना आपल्या नाशिकरांना, महाराष्ट्र व भारतभरातील बाग प्रेमींना आवडेलेली आहे. त्यांनी केलेल्या कामाचे कौतुकांतूनच गच्चीवरची बाग हा उपक्रम वाढत चालला आहे. आता या पुढे या योजनेत सहभागी करून आपल्यालाही त्यांचाही फायदा देणार आहोत. या अतंर्गत आपल्याला पांईट नुसार गुणांकन केले जाईल व त्याच्या एकून संखेनुसार पांईट्सधारकांना रिटर्न गीफ्ट मिळणार आहे. हे रिर्टन गीफ्ट हे गार्डन कीट स्वरूपात असेल.

वरील सर्व भाग्यवंत विजेत्यानी आमचे कडून भाजीपाला, बाग फुलवून घ्यावी. तसेच या सोबत आम्ही वेळोवेळी बागे संदर्भात येणार्या अडचणीत तंत्र- मंत्र, ज्ञान- विज्ञान समजून सांगणरच आहोत. थोडक्यात शिकवणं हे सुरू राहणारचं आहे.

  • विटांच्या वाफेत बाग फुलवणेः दोन भाग्यवंत विजेत्यास अनुक्रमे ३ व २ ग्रॅम असे एकून ५ ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र (दोन वाट्या व मनी) देण्यात येईल.
  • पूर्वी केलेल्या विटांच्या वाफेचे पूर्नभरण करणेः दोन भाग्यवंत विजेत्यास रिपॅटींग साहित्य खर्चावर ५० टक्के सवलत किंवा १०००-१००० रूपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल.
  • कुंड्या रिपॅटींग करणेः दोन भाग्यवंत विजेत्यास बागे संदर्भात उपयुक्त असे १००० रूपयांचे साहित्य देण्यात येईल.
  • बागेचे व्यवस्थापन पहाणेः दोन भाग्यवंत विजेत्यास एका वेळेचे बाग व्यवस्थापन निशुल्क करून देण्यात येईल. किंवा ५००- ५०० रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल.
  • नैसर्गिक खत, द्राव्य खतं व बागेसंदर्भातील साहित्य खरेदी करणेः दोन भाग्यवंत विजेत्यास वर्षभराच्या साहित्य खरेदीवर १० टक्के सवलत देण्यात येईल. (पैसे स्वरूपात किंवा गार्डन किट स्वरूपात)
  • रेफरंस मार्केटिंगः दोन भाग्यवंत स्पर्धकांना पांईट नुसार १०००- १००० रूपयांचे रोख रक्कम किंवा तेवढ्याच किमतीचे गार्डन गीफ्ट देण्यात यईल.

स्पर्धेची सुरवात येत्या १ जून पासून २०१९ पासून होणार आहे. त्याचा बक्षीस, रोख रक्कम व गीफ्टस वितरण ५ जून २०२० परर्यावरण दिनाच्या रोजी होईल.

१ते ६ प्रकारातील दोन भाग्यवंत विजत्यांची निवड ५ जून २०२० रोजी आपल्या समक्ष चिठ्ठी निवडून केली जाईल. जे ५ जून रोजी २०२० रोजी गैरहजर असतील त्यांच्या बदली दुसरी चिठ्टी निवड करून तेथेच बक्षीस दिले जाईल.

६ व्या प्रकारातील स्पर्धकांचे रेफरंस मार्केटिंग बद्दलचे पांईट वर्षभर नोंद केली जाईल व त्याचा मासिक अहवाल आपल्याला पाठवला जाईल. त्यांची अग्रक्रमांनुसार पाच स्पर्धकांतून दोन भाग्यवंत विजेत्यांची निवड ही चिठ्ठी उचलून केली जाईल. ६ व्या प्रकारात नाशिक बाहेरील व्यक्तिही सहभागी होऊ शकतात.

६ व्या प्रकारातील स्पर्धकांना खालील मुद्दयानुरूप १-१ पांईट व एक बोनस पांईट असे १० पांईट्स चा एक रिवार्ड दिले जातील. ज्यांचे रिवार्ड जास्त त्या पाच स्पर्धाकांमधे भाग्यवंताची निवड केली जाईल.

  • Experience & Knowledge Sharing specific on our Efforts
  • Donation to our work or Deshi cow
  • Purchase material from us (books, seed, Garden kit, Extra)
  • Want to arrange Pay seminar
  • Forward on social media (Facebook & Wts app Groups)
  • Inform to reporter
  • Arrange Social Camping
  • Write article on our work
  • Subscription, join, follow or Members on Social media & websites

कुटुंब किंवा कुटुंबातील एकच स्पर्धक आपले नाव व १ ते ६ या पैकी एकाच योजनेत नोंदवावे,

आपला सहभाग १ जून २०१९ पासून wts app 9850569644 या क्रंमाकावर नोंदू शकता.

आपल्याला सविस्तर माहिती फोनवर दिली जाईल. १-४ योजनेतील बागेसंदर्भातील माहिती व योजनेतील सहभागबदद्ल आपल्याला Pay Consultancy – on site दिली जाईल.

सुंदर नाशिक – हरित नाशिक करण्यासाठी या योजनेत प्रायोजक म्हणून म्हणून इच्छुक व्यक्ति, दुकानदार सहभागी होवू शकता. (त्यांच्या व्यवसायाची जाहिरात आमच्या सोशल मिडीयावर जोडलेल्या हजारों ग्राहकमित्रापर्यंत पोहचवता येईल)

More Information:

संदीप क. चव्हाण, नाशिक.

www.gacchivarchibaug.in www.organic-vegetable-terrace-garden.com

https://gacchivarchibaug.business.site

wts app: 9850569644 call : 8087475242

website
http://www.gacchivarchibaug.in

website https://atomic-temporary-145492773.wpcomstaging.com

profile
https://about.me/sandeepchavan

cover story https://udyojak.org/gachchivarchi-baug-success-story/

YouTube https://www.youtube.com/channel/UCIUZVOtKaSvV1DqTmFnKR5Q

facebook page
https://www.facebook.com/%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-page-163326204300631/

my link http://www.mylinq.in/9850569644

https://organic-vegetable-terrace-garden.business.site/

👆वरील link ही गच्चीवरची बाग नाशिक ची आहे. आपण या site वर click करून आपला review नोंदवावा. आपल्या या एका प्रयत्नाने आम्ही करत असलेले पर्यावरण पुरक काम व निःशुल्क मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल.
संदीप चव्हाण नाशिक.

Garden material wts app sale goup

आपली फळा, फुलांची, भाजीपाल्याची  बाग हिरवीगार, टवटवीत व शाश्वत रितीने वाढावी तसेच ती रसायनमुक्त असावी असे वाटेत असल्यास आपण  या ग्रुपमधे सहभागी होऊ शकतता.


vertical garden 1 1 (18)

आपली फळा, फुलांची, भाजीपाल्याची बाग हिरवीगार, टवटवीत व शाश्वत रितीने वाढावी तसेच ती रसायनमुक्त असावी असे वाटेत असल्यास आपण या ग्रुपमधे सहभागी होऊ शकतता. गच्चीवरची बाग, नाशिक या ग्रुपव्दारे बागकाम साहित्य विक्री हेतूसाठी ग्रुप तयार करण्यात आला आहे.

या ग्रुपमधे स्वतः अॅडमीन – संदीप चव्हाण आहेत व केवळ तेच संदेश पाठवू शकतील. ही विक्री केवळ नाशिक व नाशिकरोड परिसरासाठी उपलब्ध होणार आहे. आपणास ग्रुपच्या नावानुसार (एरिया नुसार नावे दिली आहेत) आपण स्वतःहून सहभागी होऊ शकतात. आपल्याला ग्रुप मधे सहभागी न होता वैयक्तिक संदेश हवे असल्यास गच्चीवरची बाग –संदीप चव्हाण 9850569644 यांच्याशी जोडू शकता.

नाशिक व नाशिकरोड वगळता इतर कुणास सहभागी होण्याची इच्छा असल्यास वरील मो. क्रंमाकावर संपर्क करावा.तसेच बागेसंबधी आपणास काही चौकशी करावयाची असल्यास संपर्क साधू शकता. (फोनवर निशुल्क मार्गदर्शन केले जाईल)

एकापेक्षा अधिक ग्रुप मधे सहभागी झालेले आढळल्यास ग्रुपमधून वजा करण्यात येईल याची नोंद घ्यावी.विक्रीसाठी काय काय उपलब्ध आहे. याची यादी आम्ही वेळ, ठिकाण (पत्ता) दिंनाक यानुसार प्रकाशीत करू.

साहित्य वापराविषयी माहिती साठी 9850569644 संपर्क साधावा.

ठरलेली ठिकाणेः नाशिक शहरः आकाशवाणी केंद्र, पंचवटी, मेरी म्हसरूळ, गोविंद नगर, इंदीरा नगर, पाथर्डी फाटा, नाशिकरोडः उपनगर, बिटको पांईट( दत्त मंदीर रोड)

विक्री साठी साहित्य यादी…

१) जिवामृत – १ लिटर २० रू. ( संजीवक व फवारणी- कीड नियंत्रण)

२) देशी गायीचे गोमुत्र १ लिटर २० रू. ( संजीवक व फवारणी- कीड नियंत्रण)

३) दशपर्णी १ लिटर ५० रू. लिटर ( फक्त फवारणी- कीड नियंत्रण)

४) वर्मी वाॅश १ लिटर ५० रू लिटर ( संजीवक व फवारणी- कीड नियंत्रण)

५) तंबाखू पावडर १ किलो . ५० रू. ( वर खत व कीड नियंत्रण)

६) निमपेंड १ किलो 6० रू. (वर खत व कीड नियंत्रण)

७) उत्तम प्रतीचे खत ( कंपोस्ट, शेणखत व उपजावू मातीयुक्त खत एकत्रीत) ५ किलो. १०० रू.

८) पुस्तकः गच्चीवरची बाग (Version:1, Edition 2) २५० रू.

९) पुस्तक ः तुुम्हाला माहित आहे का? (Version:1, Edition 1) २०० रू.

१०) राख ः १ किलो. ५० रू. (वर खत व कीड नियंत्रण)

११) घरच्या घरी कंपोस्ट खत तयारकरण्यासाठी बायोकल्चर १ किलो. १००रू.

१२) कंपोस्ट खत २ किलो. ४० रू. ( वर खत)

१३) गांडूळ खत २ किलो. ४० रू. ( वर खत)

१४) नर्सरी बॅग्ज १२ नग १८० रू.

१५) मातीची गोणी ( २ पाट्या) ६०)

वरील साहित्य घरपोहोच डिलेव्हरी चार्जेस व्दारे पोहचवले जातील.

Aera नुसार Wts app Group वर Join होण्यासाठी ….

१) आकाशवाणी केंद्र, गंगापूर रोड.

२) पंचवटी परिसर, नाशिक

३) मेरी म्हसरूळ, नाशिक

४) गोविंद नगर, नाशिक

५) इंदीरा नगर, नाशिक

६) पाथर्डी फाटा, नाशिक

नाशिकरोडः

१) उपनगर, नाशिक रोड

२) बिटको पांईट( दत्त मंदीर रोड)

More information _

www.gacchivarchibaug.in

www.organic-vegegatble-terrace-garden.com

Needs to equipments/ funds


vertical garden 1 1 (1098)संदीप चव्हाण, नाशिक, महाराष्ट्र में रहते है। पिछले चार साल से गारबेज टू गार्डन तंत्र को लेकर नाशिक में जहर से मुक्त सब्जिया और बागवानी बनाने के लिए लोगोंको प्रेरीत करते है। उनका सपना है की लोग अपने छोटी छोटी कौशिसे व्दारा जहर मुक्त सब्जिया घरपर ही उंगाये, पर्यावरण का खयाल रखे और निसर्ग के साथ जुडे रहे। इसलिए खेती की जरूरू नही है। शहर में जो भी जगह उपलब्ध है जैसे की (पंराडा, टेरेस, बाल्कनी, विंडो) उसीमें उपलब्ध नैसर्गिक संसाधनो (किचन वेस्ट, सुखे पत्ते,)  के साथ और जो भी उपलब्ध वस्तूंए में बागवानी करने के लिए प्रेरीत करते है। आज शहर में डंपीग ग्रांऊड की समस्या बढ रही है। अगर लोगों ने इस तरह किचन वेस्ट का जगह ही पर उसका सुखाकर इस्तेमाल किया तो डंपीग ग्रांऊड की समस्या नही रहेगी। और यह एक कारगर व आसान तरीका है। किचन वेस्ट का कंपोस्टिंग बनाने की कोई जरूरी नही.. ऐसा उनका कहना है। खाद बनाना यह प्राकृतिक के खिलाफ है और उसमें समय का गवाना है यह उनका मानना है।

इसलिए वह पिछले १२ साल से प्रयत्न कर कर रहे है। इस प्रयत्नों के पिछले चार साल में अपने परिवार के लिए उपजिवाका का माध्यम बनाया है। उनके साथ उनका परिवार और दो लोगों को भी रोजगार की प्राप्ती होती है।

जहर मुक्त खेती की आज बहूत जरूरी है। इसके बारे में लोगों को जागृत करना और निसर्ग के प्रती उनका सहयोग लेना जरूरी समजते है। इसलिए उन्होंने एक देशी नस्ल की गाय पाली है। उसीके गोमुत्र और गोबर से टेरेस फार्मिंग में उपयोग करते है।  इस काम को गती मिलने के लिए लंबे प्रयोसो के बाद एक चार पैयावाली गाडी खरेदी है। उसीसे थोडा आसानी हो गयी है। लेकीन यह सब कर्जा है। और कुछ कुछ करना है। उसके लिए और कर्जा मिलना मुश्किल है। और उनके सपने की कडी में कुछ साधनों की कमतरता है। अगर निचे नमुद कियें हुंए साधन का जुगाड हो जाता है तो  में पर्यावरण के क्षेत्र में लोगोंका और बडी मात्रा में सहयोग ले सकत है। और अपनी सिंमेंट की निस्तेज वंसुधरा को हरे हरे रंग के कुछ रंग भरना चाहते है।

  • Petrol Shredder machine 65000/- छत पर बागवानी के लिए 80 % बायोमास ( नारियल के छिलके, गन्ने का छिलके, पेड पौध्दे के पत्ते, सुका हुआ किचन वेस्ट और 20%  मिट्टी और खाद का उपयोग करते है। उपरोक्त मशीन व्दारा जो भि बायोमास लोगोव्दारा फेका या जलाया जाता है। उनको क्रश करके उपयोग कर सकते है। इससे दो फायदे है। एक  कम जगह में जादा से जादा संग्रहीत कर सकते है। और ट्रान्सपोर्ट के लिए सुविधा होगी।
  • किताब प्रकाशन 75000/- अब गच्चीवरची बाग ( टेरेस फार्मिंग) ये किताब की व्दितीय आवृत्ती प्रकाशीत करना चाहते है। जो स्वः एक प्रशिक्षण पुस्तिका की तरह होगी। ताकी इसे पढकर इच्छुक लोंग अपने घरपे ही किताब पढकर छत पर बागवानी कर सकते है। इससे पर्यावरण के क्षेत्र में बढा काम खडा रह सकता है।
  • बफींग machine 10000/- मंदीर से जमा किए नारियल के कठीण कवच से मैं किचेन्स बनाना चाहते है। कुछ चिंजे हातोसेही बनायी है इसमें बहोत सारा वक्त लग जाता है। उपरी मशीन अगर मिल गयी तो मैं कोकोनट शेल से अलग अलग चिंजे बना सकते है। जो पर्यावरण पुरक होगी। और स्थानिक महिलांए के लिए रोजगार की प्राप्ती होगी।

Total amt: 150000/-(1.5 lakh)

उनके कार्यपर युट्यूब पर एक फिल्म है उसे हर रोज २५० लोग देखते है। इसी विषय में मैने लोकसत्ता इस वर्तमान पत्र में एक साल कॉलम लिखा है। इसी काम की विविध माध्यमों व्दारो समाचार पत्र में जीवन परिचय प्रकाशित हुए है।

www.gacchivarchibaug.in

www.youtube.com

 

 

%d bloggers like this: