घरीच फ्लावर ही फुलभाजी उगवायची कशी, काळजी कशी घ्यायाची.. त्या बद्दल वाचा.
HOW TO GROW cauliflower IN KITCHEN GARDEN
रसायन मुक्त भाज्या खाणे ही आजची गरज झाली आहे. आपल्याबागेत वाफ्या मधे अथवा कुंड्यामधे, ग्रो बॅग मधे सुध्दा भाज्या येतात. त्यातीलच एक फुलभाजी म्हणजे फ्लॉवर. सहा ते आठ इंच खोली असलेल्या कोणत्याही साधनात फ्लॉवर ही भाजी घेता येते. फ्लॉवर बदद्ल बरीच प्रश्न असतात.
फ्लॉवर कसा लावावा…
उत्तरः फ्लॉवर लागवड ही बियापासून करता येते. त्याचे बियाणे हे मोहरीच्या दाण्याएवढे असते. त्याची रोपे तयार करून त्या रोपास दुसर्या जागेवर पुर्नलागवड केल्यास लवकर वाढतात. तसेच भाजीपाला नर्सरीत तयार रोपे मिळतात. त्याची लागवड सोपी असते. तसेच रोपाची म्हणजे बियाणांची जन्मअवस्था ते बाल्यावस्थेतील काळजी मिटते.
फूल कोबी घरी कसा पिकवावा?
फ्लॉवर कापल्या नंतर त्यास पुन्हा किंवा खोडाला पुन्हा प्लॉवर येतात का?
उत्तर : तयार झालेला फ्लॉवर काढून घेतल्या नंतर त्याच ठिकाणी फ्लॉवर येत नाही. पण त्याच्या खोडाला पुन्हा असंख्य फुटवे फूटतात. त्यातील निवडक फुटवे वाढवून त्यास प्लॉवर येतात. पण याची गती मंदावेलेली असते. तसेच त्याचा आकारही लहान झालेला असतो. हो येतात. पण भरपूर शेणखत टाकल्यास वाढ होते.
भविष्य का सुपर फूड फॅक्टरी…
घरी उगवलेल्या फ्लॉवरचा रंग बदलतो.
उत्तरः घरी उगवलेला प्लावर हा योग्य वेळेत त्यास काढून घेतले नाही, उशीर केला तर त्याचा रंग पांढर्या शुभ्रतेकडून फिकट गुलाबी होतो. त्याचा प्रवास हा परिपक्वतेकडे जातो. म्हणजेच फुल येऊन बियाणं तयार होण्याची प्रक्रिया सुरू असते. त्या फुलाची बांधणी ही सैल होते. त्यात अंतर तयार व्हायला लागते. याही अवस्थेतील फ्लॉवर काढून त्यास सेवन करता येते.
प्रतिकार शक्ति वाढवणारी तांदुळका भाजी विषयीची माहिती
बरेचदी मंडळीना तो तयार झाला की नाही हे उमजत नाही. त्यामुळे फुल मोठे होईल याची वाट पहात बसतात. आपले निरिक्षण उत्तम असेल तर एकाद्या आठवड्यात फुलांची काहीच वाढ झाली नाही तर तो पोषणाअभावी म्हणा किंवा इतर कारणामुळे त्याची वाढ खुटलेली असते. अशा परिस्थितीत योग्य वेळ व संधी साधून फुल भाजीसाठी काढून घ्यावे. बरेचदा परिपक्कतेची अवस्था प्रखर उन व तापमानात लवकर गाठली जाते. त्यामुळे त्यास खुल्या आकाशात माहे फ्रेब्रुवारीपर्यंत वाढवावा. किंवा त्यास फ्रेब्रुवारी नंतर सच्छिद्र हिरवे कापडाचा मांडव करावा. फ्लॉवर ही फुलभाजी अर्धेवेळ उन्हातही छान फुलतो.
अळूचे कंद उकडून खाता येतात. छान बटाट्या सारखे लागतात. कधी कधी वरचे साल सोलल्यानंतर चिकट पापुद्रा हाती येतो. तो बाजूला करावी. यात उष्मांकाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते सेवन केल्यामुळे लवकर भूक लागत नाही. अळूच्या भाजीसोबत गव्हाची पोळी, सफेद भातावर छान लागते. त्यावर साजूक तुपाची धार असल्यास अस्सल जेवणाची रंगत येते.
परसबागेत आपण लागवड करत असलेल्या भाज्या या नेहमीच्याच असतात तर कधी अनोळखी असतात. अनोळखी या अर्थाने की त्या खरं तर रानभाज्या असतात. पण केवळ माहित नसल्यामुळे आपण त्या तण, गवत म्हणून फेकून देतो. खरं तर त्या अगदी पोषक असतात, त्या शरिराला उपयुक्त असतात. या सदरात आपल्याला ओळखीच्या व अनोळखी भाज्यांची ओळख, लागवड त्यांच्या पंचागाची भाजी.. त्याचे महत्व व रेसेपी देण्यात येणार आहे.
लागवड कशी करावी…..
अळूची पाने ही घरच्या बागेत, परसबागेत सहजपणे उगवता येतात. शहरीकरण नव्हते तेव्हा मोरीच्या पाण्यावर त्या सहजपणे पोसल्या जात असत. अर्थातच तेव्हांची मोरी सुध्दा आजच्या सारखी रसायनांनी दुषीत झालेली नव्हती. थोडक्यात आजच्या गटारी सुध्दा गटारधर्माला विसरल्या आहेत. असो. तर अळूची पाने टेरेसवर विविध साधनात, नर्सरी बॅगेत, शुद्ध पाण्यावर सुध्दा पोसल्या जातात. ग. बा. पध्दतीने बॅग भरली तरी त्यात अळूचे कंद पोसली जातातच पण पानांचा आकारही वाढतो.(ग. बा. पध्दत म्हणजे कुंडीत नारळाच्या शेंड्या, पालापाचोळा, व माती असे थर द्यावेत) ( पुढे वाचा)
घरच्या कुंडीत वडीचे व भाजीचे अळूच्या पानांची लागवड करता येते. गच्चीवर स्वच्छ पाण्यात यांची वाढ करता येते. कुंडी ही पालापाचोळ्याने भरलेली असल्यास त्यात अळू छान वाढतात. कुंडीत माती घट्ट झाली असता पानांचा आकार लहान होत जातो. अशा वेळेस कुंडीची नव्याने भरून घ्यावी. अथवा अळूचे कंद हे प्लास्टिक बॅगेत ठेवून त्यास सात ते पंधरा दिवस वाफ द्यावी म्हणजे त्याची लागवड केल्यास पानांचा आकार वाढतो.
या भाजीला बाजारात मागणी असल्यामुळे रेल्वेच्या, गटारीच्या दुषित पाण्यात वाढवल्या जातात. किंवा शेतात विषरी खते टाकून भरभर वाढवली जातात. त्यामुळे ही भाजी घरीच उगवलेली उत्तम. त्यासाठी १८ बाय १२ इंचाची व १२ इंच खोलगट अशी कुंडी वापरणे योग्य, किंवा माठ, बादली, टब मधेही वाढवता येतात.
वडीचे अळूस जमीन, पाणी योग्य प्रमाणात मिळाल्यास या पानांची लांबी ही तीन ते चार फूट तयार होते. घाबरून जावू नये. या एकाच पानात घराला पुरेल एवढी एका वेळेची भाजी किंवा वड्या तयार होतात. ( पुढे वाचा)
अळूची भाजी… अळूची भाजी यात दोन प्रकार असतात. एक वडीचे अळू व दुसरी भाजीचे अळू.
वडीचे अळू.. वडीचे अळू हे लांबट , गर्द हिरवा, निळसर दिसतात. थोडक्यात कृष्ण रंगाचे असतात. वडीचे अळू खाजरे म्हणजे घशाला खवखवणारे नसतात.
वड्या कशी तयार कराव्यातः बेसन पिठात जिरे, मिठ टाकून भजीसारखे पिठ तयार करावे. ते पानांवर बोटांनी लावून त्यावर पाने पिठाने चिटकवत जावे. पानांमधे थोडे थोडे तिळ टाकावेत. थोडक्यात पुड तयार करावेत. यांचा रोल तयार होईल असे पाहावे. त्यास धागा बांधता आल्यास उत्तम. या पध्दतीने रोल कुकुर च्या डब्ब्यात ठेवून वाफवून घ्यावे. वाफवलेले रोल गार झाल्यानंतर सुरीने कापून घ्यावेत. अशा गोलाकार वड्या तळून किंवा तव्यावर परतून आपण त्या आठवडाभर फ्रिज मधे ठेवू शकता. अळूच्या पानात तंतुयुक्तता ( फायबर) जास्त असल्यामुळे ते पचनास हलके असतात. अळूच्या पानांच्या सेवनाने मुतखडा बरा होता.
भाजी कशी तयार करावी…
सामग्रीः हरबर्याची डाळ, चिंच, लाल वाळलेल्या मिरच्या, शेंगदाणे, अळूची पाने.
गरेजनुसार अळूची पाने चिरून घ्यावीत. गरजेनुसार त्यात हरबरा दाळ, चिंच, लाल वाळलेल्या मिरच्या (अखंड किंवा तोडून) शेंगदाणे, जाड मिठ टाकून शिजवून घ्यावी. अळूच्या खालील लांबलचक देठपण सोलून म्हणजे शिरा काढून त्याचे तुकडे करून ते भाजीत शिजवू शकता.
शिजवलेल्या भाजीतून एक चर्तुथांश भाजी मिक्सरमधे बारीक करून घ्यावी. भाजीला अळण देण्यासाठी उपयुक्त ठरते. कढईत तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी द्यावी. त्यात मिक्सरमधून दळून घेतलेली भाजी हे फोडणीत टाकावी. त्याला थोडी शिजवू द्यावी. त्यानंतर उर्वरीत भाजी टाकून मिक्स करावी. गरजेनुसार पातळ करावी. वडीच्या अळूची भाजी करतांना त्यात भाजीचे अळूची पानेही मिक्स करता येतात. वडीच्या अळूत भाजीचे अळू मिक्स केल्याने भाजीला खाजरेपणा येत नाही. पण पानांचे प्रमाण हे समप्रमाण असावे.
भाजीचे अळू… ही पाने गोलाकार व हिरवट रंगाची असतात. यांची शक्यतो वडी बनवू नये. माल मसाला कमी पडल्यास घशाला खाज येण्याची शक्यता असते. भाजीच्या अळूंची भाजीच करावी. कारण भाजीत वापरलेली चिंच व शिजवल्यामुळे त्यातील खाजरेपणा निघून जातो.
अळूचे कंद उकडून खाता येतात. छान बटाट्या सारखे लागतात. कधी कधी वरचे साल सोलल्यानंतर चिकट पापुद्रा हाती येतो. तो बाजूला करावी. यात उष्मांकाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते सेवन केल्यामुळे लवकर भूक लागत नाही. अळूच्या भाजीसोबत गव्हाची पोळी, सफेद भातावर छान लागते. त्यावर साजूक तुपाची धार असल्यास अस्सल जेवणाची रंगत येते. आठवड्यातून एकदा याप्रमाणे वडी व भाजी असे दोनदा करता येते.
सावधानः अळू सदृश्य ही काही रंगीत अळूची पाने किंवा शोभेच्या वनस्पती असतात. यांची खात्री करूनच भाजी करावी.
लेख आवडल्यास नावासहित शेअर, लाईक व कॉमेंट करा.
टीपः नाशिककरांसाठी वडीच्या अळूच्या तयार हुंड्या विकत मिळतील.
👆वरील link ही गच्चीवरची बाग नाशिक ची आहे. आपण या site वर click करून आपला review नोंदवावा. आपल्या या एका प्रयत्नाने आम्ही करत असलेले पर्यावरण पुरक काम व निःशुल्क मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल. संदीप चव्हाण नाशिक.
You must be logged in to post a comment.