HOW TO GROW cauliflower IN KITCHEN GARDEN
रसायन मुक्त भाज्या खाणे ही आजची गरज झाली आहे. आपल्याबागेत वाफ्या मधे अथवा कुंड्यामधे, ग्रो बॅग मधे सुध्दा भाज्या येतात. त्यातीलच एक फुलभाजी म्हणजे फ्लॉवर. सहा ते आठ इंच खोली असलेल्या कोणत्याही साधनात फ्लॉवर ही भाजी घेता येते. फ्लॉवर बदद्ल बरीच प्रश्न असतात.
- फ्लॉवर कसा लावावा…
उत्तरः फ्लॉवर लागवड ही बियापासून करता येते. त्याचे बियाणे हे मोहरीच्या दाण्याएवढे असते. त्याची रोपे तयार करून त्या रोपास दुसर्या जागेवर पुर्नलागवड केल्यास लवकर वाढतात. तसेच भाजीपाला नर्सरीत तयार रोपे मिळतात. त्याची लागवड सोपी असते. तसेच रोपाची म्हणजे बियाणांची जन्मअवस्था ते बाल्यावस्थेतील काळजी मिटते.
- फ्लॉवर कापल्या नंतर त्यास पुन्हा किंवा खोडाला पुन्हा प्लॉवर येतात का?
उत्तर : तयार झालेला फ्लॉवर काढून घेतल्या नंतर त्याच ठिकाणी फ्लॉवर येत नाही. पण त्याच्या खोडाला पुन्हा असंख्य फुटवे फूटतात. त्यातील निवडक फुटवे वाढवून त्यास प्लॉवर येतात. पण याची गती मंदावेलेली असते. तसेच त्याचा आकारही लहान झालेला असतो. हो येतात. पण भरपूर शेणखत टाकल्यास वाढ होते.
- घरी उगवलेल्या फ्लॉवरचा रंग बदलतो.
उत्तरः घरी उगवलेला प्लावर हा योग्य वेळेत त्यास काढून घेतले नाही, उशीर केला तर त्याचा रंग पांढर्या शुभ्रतेकडून फिकट गुलाबी होतो. त्याचा प्रवास हा परिपक्वतेकडे जातो. म्हणजेच फुल येऊन बियाणं तयार होण्याची प्रक्रिया सुरू असते. त्या फुलाची बांधणी ही सैल होते. त्यात अंतर तयार व्हायला लागते. याही अवस्थेतील फ्लॉवर काढून त्यास सेवन करता येते.
बरेचदी मंडळीना तो तयार झाला की नाही हे उमजत नाही. त्यामुळे फुल मोठे होईल याची वाट पहात बसतात. आपले निरिक्षण उत्तम असेल तर एकाद्या आठवड्यात फुलांची काहीच वाढ झाली नाही तर तो पोषणाअभावी म्हणा किंवा इतर कारणामुळे त्याची वाढ खुटलेली असते. अशा परिस्थितीत योग्य वेळ व संधी साधून फुल भाजीसाठी काढून घ्यावे. बरेचदा परिपक्कतेची अवस्था प्रखर उन व तापमानात लवकर गाठली जाते. त्यामुळे त्यास खुल्या आकाशात माहे फ्रेब्रुवारीपर्यंत वाढवावा. किंवा त्यास फ्रेब्रुवारी नंतर सच्छिद्र हिरवे कापडाचा मांडव करावा. फ्लॉवर ही फुलभाजी अर्धेवेळ उन्हातही छान फुलतो.
वाचा फ्लॉवरच्या पानांचे सुप कसे तयार करावे…
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
You must be logged in to post a comment.