बागेतील माती वाळवणे का गरजेचे आहे

आपले पूर्वज हे मोसमानुसार शेती करायचे तेव्हां शेतातील माती वाळवून घ्यायचे. काळी माती तर अधिक पाणी धरून ठेवते. तो तिचा गुणधर्मच आहे. त्यामुळे ही माती फेब्रुवारी महिण्यानंतर पावसाळ्यापर्यंत वाळवून घेत असत. कडक उन


भाजीपाल्याची बाग फुलवायाची म्हणजे काही कामे ही ठराविक वेळाने करणे फार गरजेचे असते.

त्यातील महत्वाचे काम म्हणजे बागेतील माती वाळवणे. विटांच्या वाफा असेल, अन्नपूर्णा बॅग असो वा कुंड्या असोत.

माती वाळवणे का गरजेचे आहे…

  • सातत्याने पाणी दिल्याने अथवा संततधार पावसामुळे कुंडी, वाफा, बॅग्जसमधील माती ही तळापासू त्यात मातीचे सुक्ष्म कण साचत जातात. तसेच सुक्ष्म कणांनी माती ही घट्ट होत जाते. माती घट्ट झाल्यामुळे ती कडक होत असते. (अर्थात बिशकॉम हे पॉंटीग मिक्स वापरल्यामुळे एवढी कडक होत नाही.) त्यात हवा खेळती असणे फार गरजेचे आहे. जेवढी हवा खेळती राहिल तेवढे पांढर्या मुळ्यांची संख्या वाढून फळधारणा चांगली होते. त्यामुळे कडक होणारी माती हे वाळवल्यानंतरच ति हलकी, भुसभुशीत होते. त्यामुळे माती वाळवणे गरजेचे आहे. माती भुसभुशीत नसेल तर मुळ्यांची वाढ ही चौफेर होत नाही. पर्यायाने झाडं हे खुरटून जाते.  पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते पर्याने अधिक पाण्यामुळे झाडे रोगांना बळी पडतात.
  •  कुंडी, वाफा अथवा बॅगेत आपण खतं पाणी देत असतो. खत ही वरच्या भागात अधिक असतात. तर खालील भागात पाणी दिल्यामुळे ते वाहून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे थरानुसार वेगवेगळे खतांची मात्रा साचण्याची शक्यता असते. तसेच तिची सुपिकतेचे भिन्न भिन्न थर बनतात. व भिन्न थरात झाडांची योग्यरित्या वाढ होत नाही. अशा वेळेस माती बाहेर काढून एकत्र करून वाळून घ्यावी. म्हणजे संपूर्णतः मातीत पोषकत्व हे पसरवता येते.
  • सततच्या पाण्यामुळे माती ही चिकट होते. अथवा त्यात पाणीजन्य सुक्ष्म विषाणूंची वाढ झालेली असते किंवा एकाच प्रकारच्या उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढल्यामुळे सुध्दा झाडांची वाढ पूर्ण क्षमतेने होत नाही. अशा वेळेस त्यातील सुक्ष्म विषाणू व जिवाणू हे माती उन्हात वाळवल्याने मृत पावतात. त्यांचे सुक्ष्म खत नंतरच्या झाडांना पोषक होते.

या वरील तिन कारणांमुळे माती वाळवणे हे फार गरजेचे आहे.

आपले पूर्वज हे मोसमानुसार शेती करायचे तेव्हां शेतातील माती वाळवून घ्यायचे. काळी माती तर अधिक पाणी धरून ठेवते. तो तिचा गुणधर्मच आहे. त्यामुळे ही माती फेब्रुवारी महिण्यानंतर पावसाळ्यापर्यंत वाळवून घेत असत. कडक उन लागल्यामुळे मातीतील विषाणू हे मृत पावतात. त्यांचे खत तयार होते. तसेच काळ्यामातीचे ढेकळे हे मोठे मोठे असतात. ऊन लागल्यामुळे त्यांचा आपोआप चुरा होतो. माती भुसभुशीत होते. पण सध्याच्या बारमाही शेती मुळे शेतीत कीड वाढण्याचे प्रमाण वाढले आहे तसेच माती चिकट होणे त्याचे ढेकळे होतात. म्हणूनच अधिक अश्वशक्तिचे  टॅक्ट्रर वापरले जाते आहेत. अर्थात रसायनांच्या वापरामुळेही हे होत आहे पण त्या खालोखाल कारण म्हणजे माती न वाळवणे हाच आहे.

वर्षायु झाडं असलेल्या कुंड्यातील माती ही वर्षा दोन वर्षातून पुर्नभरण करावे. पण भाजीपाल्याचे अन्नपूर्णा बॅग्जस व कुंड्यातील माती संपूर्णत वाळवणे गरजेचे आहे., विटांचा वाफा जशी जागा मिळेल तसे माती वाळवणे गरजेचे असते.

माती कधी वाळवावी….

साधरणतः माती वर्षातून तीन वेळा वाळवणे गरजेचे आहे.

  • ऑक्टोबर महिना… ऑक्टोबर महिण्यात कडक ऊन असते. ऑक्टोबर हिट मधे माती महिणाभर तरी वाळवून घ्यावी.
  • फेब्रुवारी महिण्यात माती वाळवावी.
  • मे किंवा जून महिण्यात माती वाळवावी. 

वाळलेल्या मातीत उत्तम प्रकारचे शेणखत, बिशकॉम हे पॉटींग मिक्स एकत्र करावे. कुंड्या व अन्नपूर्णे बॅग ही भरभरून भाजीपाला देतात.

गच्चीवरची बाग संशोधित एरो ब्रिक्स व्हेजेटेबल बेड म्हणजे विटांच्या वाफा हो दोन वर्षानी पुर्नभरण करणे गरजेचे आहे. पण बाराही महिने काहीना काही भाजीपाला असतोच. अशा वेळेस वाफेतील ठराविक तुकडा किंवा जागा सुचवलेल्या महिण्यात झाडे असतील तर त्याच्या आजूबाजूची माती वाळवून घ्यावी. त्यात बिशकॉम मिक्स करावे, किंवा तळाशी सुका पालापोचोळा किंवा वाळवलेले किचन वेस्टची भर टाकावी.

बागेतील जूनी माती फेकू नये…

बरेचदा कुंडीतील माती बदलावयाला सांगतात. म्हणजे आधिची माती ही फेकून देतात. पण तसे करू नका. कारण या मातीत आपण खते पाणी दिलेले असल्यामुळे माती फेकून दिल्यामुळे तो खर्च, मेहनत वाया जातो. अशा वेळेस माती वाळवणे शक्य नसल्यास ति काढून नवीन माती जरूर वापरा. पण आधिची माती वाळवून गोण्यात भरून ठेवा. म्हणजे ती परत आपल्याला वापरता येईल.

माती कशी वाळवावी…

कुंड्या, अन्नपूर्ण बॅगेतील माती बाहेर काढा. त्यातील ढेकळे फोडून घ्या. तिला उपलब्ध जागेच्या एका कोपर्यात ढिग करा, दोन चार दिवसातून त्यास फावड्याने वरखाली करा. कण नि कण कडक उन्हात वाळवून घ्या. माती हलकी व रिचार्ज होते.

आपल्याला लेख आवडला तर नक्कीच शेअर, लाईक व कॉमेंट करा.

या संकेतस्थळाचा वार्षिक खर्च हा जवळपास २५ हजार एवढा आहे. आमचे काम आपल्याला आवडल्यास संकेतस्थळ चालवण्यासाठी आर्थिक मदत करू शकता. किंवा यासाठी मदत करणार्या दानशूरापर्यंत हा संदेश पोहचावा ही विनंती…

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

आंबुशी रानभाजी

आपल्याच बागेत उगणारे तण हे तण नसून तो रानभाजी असू शकते. केवळ अज्ञानामुळे आपण ती फेकून देतो. अशाच एका आंबुशी गुणकारी रानभाजीची माहिती लेखात दिली आहे.


आंबुशी ही रानभाजी आहे. बारमाही येणारी ही जमीनीलगत (ground Cover) पसरणारी नाजूक वनस्पती आहे. तीन पाकळ्यासाऱखी आकर्षक पोपटी रंगाची दिसणारी पाने कालांतराने तपकीरी रंगाची होतात. ही जेथे ओलावा असतो त्याठिकाणी नेहमीच उगवून येते. खरं तर कुंड्या, जमीनीत येणारे हे तण म्हणून त्यास काढून टाकले जाते. चविला आंबट असणारी ही भाजी कच्ची खाल्ली तर उपयोगी असते. आंबुशी या भाजीला इंग्रजीत इंडीयन सॉरेल असेही म्हणतात. याची स्थानिक नावे ही वेगवेगळी आहेत. पण त्यास आबंटी, आंबुटी, आंबोती (गुजराती भाषेत)  चांगेरी, भुईपर्पटी, हिंदीत तिनपतीयाअसेही म्हणतात.

या हेतू ठेवून उगवता येत नाही. कारण निसर्गचे त्यांना वरदान आहे. अशा अनेक रानभाज्या आहेत ज्या आपण तण म्हणून काढून टाकतो. पण खरं तर त्या आपल्या आरोग्यासाठीच आपल्या परिसरात उगवलेल्या असतात. त्याचा अभ्यास करा.

आंबुशीच्या सेवनाने भूक वाढते. पचनास हलकी असते. क जिवनसत्व असेलेली ही भाजी आरोग्याला फार उपयुक्त आहे. याचे गुळपाण्यात सरबत फार चविष्ट लागते.

आपल्या बागेत येत असल्यास त्याचा उपयोग करा. भाजीत वापरता येते. तसेच त्याचा ठेचा सुध्दा चविष्ट लागतो.  इंटेरनेटवर आंबुशी नावाने शोधल्यास त्याच्या अनेक रेसीपी येतात.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

बियाणांची लागवड कशी करावी.

परसबागेत बियाणांची लागवड कशी करावी याबद्दल बरेचदा माहिती नसते. ति कशी करावी, किती अंतरावर करावी यासाठी लेखात माहिती दिली आहे.


परसबागेत बियाणांची लागवड कशी करावी याबद्दल बरेचदा माहिती नसते. ति कशी करावी, किती अंतरावर करावी यासाठी लेखात माहिती दिली आहे.

पालेभाजीः

पालक व आंबट चुकाः  पालक ही पालेभाजी आहे. पालेभाजींना चार इंच खोलीची जागा पुरेशी असते.

पालक ही एका चौरस फूटांत पाच ठिकाणी लाव्याव्यात. एका ठिकाणी दोन बिया चिमटीत घेवून पेरभर मातीत पेराव्यात. आंबट चुका ही पालकासारखीच दिसणारी भाजी आहे. याची चव मात्र आंबट असते. शिवाय ही जमीनीलगत पसरट वाढते.

धने व शेफूः धने व शेफू ही पालेभाजी आहे. यासही चार इंच खोलीची जागा पुरेशी आहे. एका चौरस फूटाला चार चार बोटांच्या अतरांवर लागवड करावेत. एका चिमटीत पाच पाच बिया घेवून त्यांची पेरभर मातीत बिया रूजवाव्यात.

लाल माठ व हिरवा माठः लाल माठ हिरवा माठाचे बियाणे हे आकाराने बारिक असते. यांची उंची ही २-३ फूट एवढी वाढत असते. पालेभाजी हवी असल्यास एका चौरस फूटांला चिमटी भर बियाणे घेवून ते मातीवर जेवणावर मिठ टाकल्या सारखे चौफेर विखरून द्यावे. मातीखाली दाबायची गरज नाही.

धान्य वर्गीय बियाणे...

ज्वारी, बाजरी, मकाः मका हे धान्य वर्गीय असते. योग्य पोषण मिळाल्यास त्यास पेरा पेरावर कणीस धरले जातात.

मक्यास चार इंच खोलीची जागाही पुरेशी असते. किंवा गच्चीवरच बाग संशोधीत एरो ब्रिक्स बेड मधेही लागवड करता येते. मक्याचे बि हे एका चौरस फूटाला दोन दोन लागवड कराव्यात. बागेत ज्वारी, बाजरी लागवड करतांना एका चौरस फूटाला चार चार बियाणे पेरावेत.

वेलवर्गीय बियाणेः डांगर, वाल, दोडके, गिलके, दुधी भोपळा, कारले, चवळी, काकडी या प्रकारच्या  वेलवर्गीय बियाणे हे चार इंच मातीच्या खोलीत अथवा एरोब्रिक्स बेडमध्ये उत्तम प्रकारे येतात.  वेलाची वाढ छान होते. कारण त्यास पसरट जागा लागते. एका जागेवर शक्यतो २-२ बिया पेराव्यात. यांची रोपे तयार करण्याची गरज नसते. तसेच यास नर्सरी बॅग्ज मधे बियाणे लागवड करून रोपे  वाढवावीत. अशी रोपे वाढलेली  बॅग बेड अथवा जमीनीवर ठेवून दयाव्यात. म्हणजे मूळ ही तळापासून बाहेर येवून खालील मातीत वाढतात. डांगर ही जमीनीवर पसरणारी वेल आहे. फळ जड असल्यामुळे त्यास मांडावर पसरवणे जरा आव्हानात्मक असते. पण मांडवावर चढवल्यास फळास हवेशीर टोपली बांधावी. म्हणजे फळाला आधार मिळून ते चांगले वाढते.

कंदमुळे ः मूळा, बिट या सारखी कंदवर्गीय बियाणे ही चार ते सहा इंचाच्या अंतरावर लागवड करावीत.

एका चौरस फूटालां चार बियाणांची लागवड करावी. यात शक्यतो एक- एक बियाणे टोकावे. म्हणजे कंदमुळांना वाढीस वाव मिळतो.

गाजर हे जमीनीवर विखरून टाकावे. त्यास मातीमधे मिक्स करावे.  काही रोपे दाटीवाटीने आल्यास त्यांना विरळ करून घ्यावे. जमल्यास दुसरीकडेही त्याची लागवड करता येते.

बटाटेः छोटे आकारातील बटाट्यांची निवड करावी. शक्यतो ज्यास डोळे आले आहेत असे निवडावेत. अखंड लावावेत. किंवा मोठ्या आकारातील असल्यास त्याचे चार भाग काप करावेत. कापलेला भाग जमिनीत एक इंच खोल गाडावा.

कांदापातः काद्याची पात मिळवण्यासाठी पात आलेले जुनाट कांदे लागवड करू शकता.  मध्यम आकाराचे किंवा मूठीत बसेल एवढ्या आकाराचे कांदे हे लागवड करता येतात.  शक्यतो छोटे कांदे लावणे टाळावे. कांद्याचे मूळ हे जमीनीकडे असावे. कांद्यावर एक- दोन इंच माती येईल या स्वरूपात तो मातीत लागवड करावा.

लसूणपातः लसणाची पात घरच्या घरी पिकवता येते.  अखंड लसणाच्या एक – एक पाकळी मोकळी करावी. त्याचे मूळ हे जमीनीकडे ठेवूनच त्यास मातीत एक इंच टोकावे. शेंडा वरील बाजूस राहील याची काळजी घ्यावी.

झुडूप वर्गीय पालेभाज्याः

करडई, आंबाडी ही २-३ फूटांपर्यंत वाढणारी भाजी आहे. याचे लागवड ही एका चौरस फुटाला चार बियाणेंच लावावेत. शक्य झाल्यास एक – एक बियाणे लावल्यास झाडांची योग्य वाढ होवून त्यातून भरपूर पालेभाजी मिळते.

मोहरीः मोहरी ही पालेभाजी आहे. एका चौरस फूटाला चार ठिकाणी एक एक बियाणे मातीवर टाकावे.. अथवा त्यास परसरून द्यावे.

चाकवतः चाकवत हे बियाणे मोहरी सारखे बारिक असते. यासही एका चौरस फूटाला चिमटीत बसेल एवढेच बियाणे वर वर टाकावे.

फळ व फूल भाज्याः मिरची वांगे, टोमॅटो, फ्लावर, कॅबेजः यांची बियाणे मातीत पेरावीत, रोपे साधारण एक बोटा एवढे उंच झाल्यावर त्यांची  दुसर्या जागेवर पुर्नलागवड करावी. यांची लागवड ही एका चौरस फूटाला एक एक रोप मध्यभागी लागवड करावी. व त्याच्या आजूबाजूला पालेभाजींच्या बियाणांची लागवड करता येते.

भेंडी व गवारः हे फळवर्गीय भाज्या आहेत. यांच्या एक एक बियाणे हे एका चोरसफूटाला चार बाजूला चार व मध्यभागी एक अशा पाच बियाणांची लागवड करावी.

बियाणे लागवडी बद्दलची काही सुवर्णसुत्रेः

वेलवर्गीय बियाणे हे जमीनीला समांतर मातीखाली टोकावे. साधारणतः एक इंच आतमधे म्हणजे पेरभर जमीनीत राहिल याची काळजी घ्यावी. बारिक बियाणे असल्यास त्यास मातीवर पसरावे.

कोणतेही बियाणे हे सात ते पंधरा दिवसात उगवून येते. उगवून न आल्यास त्याची दुबार पेरणी करावी.

तण व बियाणांची सुरवातीची वाढ लक्षात नाही आल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा. बियाणे उगवून येण्यास वाफस्याची गरज असते. अधिक व संततधार पावसात काही बियाणे रूजवून येत नाही.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

पुदीना लागवड कशी करावी. Mint PLANTATION at home

पुदीना ही औषधी वनस्पती आहे. तिच्या लागवडी विषयी जाणून घ्या. घरच्या घरी चवदार पुदीना कसा पिकवावा.


पुदीना लागवड

पुदीनी तोंडाला चव आणणारी स्वादिष्ट वनस्पती आहे. तिच्या बहुविध गुणांमुळे तिचा समावेश हा भारतीय व्यजंनामधे जाणीव पूर्वक केला गेला आहे. पुदीना ही तापहारी वनस्पती आहे. त्यामुळे त्याचा वापर ताज्या भाजीत केला जातोच शिवाय त्याची चटणी सुध्दा केली जाते. ताप आल्यास त्याचा विविध प्रकारच्या काढ्यामधे त्याचा उपयोग केला जातो. किंबहूना त्याचा रस हा तळहाताला व तळपायांना सुध्दा लावला जातो.

पुदीना ही वनस्पती ही कमी पाण्यावर येणारी, भूआच्छादन करणारी थोडक्यात जमीनीवर पसरणारी वनस्पती आहे. शिवाय ही ड्रयूप होणारी ( लोबकळणरी) वनसप्ती सुध्दा आहे.

गोलाकार पसरट कुंड्या, पाण्याच्य बाटल्या, जमीनीवर त्याची लागवड केली जाते. पुदीनाला बाजारात प्रचंड मागणी आहे. पुदीना शेती ही रोकड मिळवून देणारी शेती आहे. त्याचा खाद्य पदार्थामधे होणारा वापर लक्षात घेता त्यास हॉटेलींग लाईन मधे प्रचंड मागणी आहे.

त्याचा मागणीचा विचार करता शेतकरी रसायने टाकून त्याचे उत्पादन वाढवतात पण रसायनांमुळे त्याची चव ही पाणचट तर होतेच. शिवाय त्याचे औषधी गुणधर्म सुध्दा कमी होतात.

त्यामुळे घरचा पुदीना हा चवदार, तिखट व औषधी गुणांनी समृध्द असतो. त्यामुळे त्याला घरीच लागवड करणे हे नेहमीच फायद्याचे ठरते.

पुदीनाची घरीच लागवड कशी करावी….

बाजारातून आणलेली पुदीण्याची जुडी निवडून घ्यावी. त्यातील आगपेटीच्या काडी एवढी जाड असलेली काडी ही पूर्नलागवडीयोग्य असते. अशा काड्यानां आपण खतयुक्त मातीत मातीला समातंर अशी अर्धी माती अर्धी आकाशाकडे लागवड करू शकता. या काड्या बोटा एवढ्या लांबीच्या असाव्यात. या काड्यांना छोचे केसतंतू सारखे मुळ्या सुध्दा असतात. असा मुळया असलेल्या काड्या रूजवण्यासाठी उत्तम ठरतात.

बरेचदा या काड्या बशीमधे चार पाच दिवस ठेवल्यास त्यास पांढर्या मुळ्या फूटतात. अशा मूळ्या फूटलेल्या काड्य मातीत लावाव्यात. काही दिवस कुंडी सावलीत ठेवावी. ( पुढे लेख वाचा)

बरेचदा पुदीण्याची पाने ही आखडली जातात. त्यास मुरडा पडणे असे म्हणतात. यासाठी या कुंडीला रिपॉटींग करणे गरजेचे असते. वरील रोग येण्याची दोन कारणे आहेत.

  • कुंडीला पाणी जास्त होते आहे हे लक्षात घ्यावे
  • कुंडीतील पाण्याचा निचरा योग्य तर्हेने होत नाही.

पुदीण्याची पाने मोठी होण्यासाठी नेहमी त्यास जमीनीपासून दोन इंच उंचीवर कापणी करत रहावी. म्हणजे नव्याने येणारे धुमारे हे गतीने वाढतात. तसेच पानांचा आकार वाढतो.

पुदीण्याला तुम्ही शित पेयांच्या बाटलीतही लागवड करू शकता. या बाटल्याचा खालील भाग कापून त्यात पुदीना लागवड तर करता येतेच शिवाय या बाटल्यांना आजूबाजूने ठराविक अंतरावर छिद्रे करून त्यात पुदीना लागवड केल्यास महिना दोन महिण्यात बाटलीच्या बाहेरील भाग पुदीन्याने बहरून येतो.

परसबागेत अधिकचा पुदिना तयार झाल्यास याची पावडर करून तुम्ही गरजेनुसार स्वयंपाक करतांना वापरू शकता.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

अंबाडी सहजतेने आपल्या परसबागेत उगवता येते | अंबाडी | गोंगुरा के पत्ते | Ambadi


अंबाडी ही सहज उगणारी भाजी आहे. त्याचे अनेक उपयोग आहेत. केस, डोळे, पोटाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी अंबाडीची भाजी खाल्ली जाते

चंदन बटवा व चाकवत भाजीतील फरक ओळखा | चंदन बटुवा | चंदन बथुवा | रानभाजी | आर्युवेदिक भाजी |

चंदन बटवा प्रतिकार शक्ति वाढते, निरोगी राहण्यासाठी या भाजीचे सेवन फार महत्वाचे असते. शुक्रवर्धक म्हणून याचा फार मोठा उपयोग होतो. पोट स्वच्छ होते, ताकद व उर्जा मिळते. पोटाचे विविध आजार बरे होतात. मुतखड्यावर (किडनी स्टोनवर) रामबाण इलाज आहे. मासिक पाळीत उपयोग होतो.मुत्रामार्ग स्वच्छ होतो. पोटातील जंतू मरतात. त्वचा रोगात उपयोग होतो.


चंदन बटवा प्रतिकार शक्ति वाढते, निरोगी राहण्यासाठी या भाजीचे सेवन फार महत्वाचे असते. शुक्रवर्धक म्हणून याचा फार मोठा उपयोग होतो. पोट स्वच्छ होते, ताकद व उर्जा मिळते. पोटाचे विविध आजार बरे होतात. मुतखड्यावर (किडनी स्टोनवर) रामबाण इलाज आहे. मासिक पाळीत उपयोग होतो.मुत्रामार्ग स्वच्छ होतो. पोटातील जंतू मरतात. त्वचा रोगात उपयोग होतो.

*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. महाराष्ट्र. इंडिया से.. 9850569644

*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. महाराष्ट्र. इंडिया से.. 9850569644

Seeds Details

गच्चीवरची भाजीपाल्याची बाग फुलवण्यासाठी परवडणार्या किमंतीत बियाणे उपलब्ध


20/- per packets… Postege 40/- (All Over India)

1 गच्चीवरची बाग Bhindi Seeds copy copy भेंडी / भिंडी/ Okra/ lady Finger/ Bendi/ Bhindi

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 50 +

 

 

==========================================

8 गच्चीवरची बाग mula Seeds copy copy

मुळा / मुली/ Radish/ lady Finger/ Mula

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 100 +

============================================================

9 गच्चीवरची बाग Chavali SeedsBlack eyed beans / Cow Peas / चवळी/ Chavali

packet size – 1.5x 2 Inch  

seeds: 10+

 

 

============================================================

20 गच्चीवरची बाग Coriander Kothambir Seeds copy copy

Cilantro / Coriander leaves / कोथिंबिर /kothiMbir    

packet size – 3 x 2 Inch  

seeds: 500+ ( Multi cut)

लेखः धने लागवड कशी करावी….

============================================================

23 गच्चीवरची बाग palak Spinach Seeds copy copySpinach/ Palak/ पालक

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 100 +

 

 

============================================================14 गच्चीवरची बाग Pink Malbar Spinch Seeds copy copyRed Malabar Spinach/ लाल मायाळू/ Lal Mayalu

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 50 +

 

============================================================

13 गच्चीवरची बाग Green Malbar Spinch Seeds copy copy

Gree Malabar Spinach/ हिरवा मायाळू/Hirva Mayalu

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 20 +

 

============================================================

19 गच्चीवरची बाग Lal Math Seeds copy copyLal math/ Red Chawli leaves/ Red Amaranthus/ लाल माठ/ लाल चवली

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 200 +

 

============================================================

22 गच्चीवरची बाग Hirava Math Seeds copy copy

Hirva math/ Hari Chawli leaves/ Green Amaranthus/ हिरवा माठ/ हरी चवली

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 200 +

 

============================================================

24 गच्चीवरची बाग Beans wal Seeds copy copy

Beans/ Wal/ वाल

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 6 

 

 

============================================================

3 गच्चीवरची बाग Ambadi Seeds copy copy

अंबाडी / Ambadi / Hibiscus Cannabinols

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 25+ 

 

 

============================================================

21 गच्चीवरची बाग Methi Seeds copy copy

Methi / मेथी / Fenugreek

packet size – 3 x 2 Inch

seeds: 250+ ( Multi Cut)

============================================================

7 गच्चीवरची बाग Chilachi Seeds copy copy

Chilachi Baji/ Ghol/  घोळ/ Purslane

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 250+ 

 

 

 

==========================================================

6 गच्चीवरची बाग Shephu Seeds copy copy

Shephu / dill leaves /suva bhaji/ शेफूची भाजी

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 150+ 

 

 

======================================

चाकवत / Goosefoot/  Fat-hen/ Chenopodium album

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 150+ 

===========================================================

करडई/ SAFFLOWER 

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 50+ 

============================================================

श्रावण घेवडा / बिनीस  / फ्रेंच बीन्स / फरसबी

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 10

 

gardening course

*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. महाराष्ट्र. इंडिया से.. 9850569644

घरी फुलकोबी कशी फुलवाल

घरीच फ्लावर ही फुलभाजी उगवायची कशी, काळजी कशी घ्यायाची.. त्या बद्दल वाचा.


HOW TO GROW cauliflower IN KITCHEN GARDEN

रसायन मुक्त भाज्या खाणे ही आजची गरज झाली आहे. आपल्याबागेत वाफ्या मधे अथवा कुंड्यामधे, ग्रो बॅग मधे सुध्दा भाज्या येतात. त्यातीलच एक फुलभाजी म्हणजे फ्लॉवर. सहा ते आठ इंच खोली असलेल्या कोणत्याही साधनात फ्लॉवर ही भाजी घेता येते. फ्लॉवर बदद्ल बरीच प्रश्न असतात.

  • फ्लॉवर कसा लावावा…

उत्तरः फ्लॉवर लागवड ही बियापासून करता येते. त्याचे बियाणे हे मोहरीच्या दाण्याएवढे असते. त्याची रोपे तयार करून त्या रोपास दुसर्या जागेवर पुर्नलागवड केल्यास लवकर वाढतात. तसेच भाजीपाला नर्सरीत तयार रोपे मिळतात. त्याची लागवड सोपी असते. तसेच रोपाची म्हणजे बियाणांची जन्मअवस्था ते बाल्यावस्थेतील काळजी मिटते.

फूल कोबी घरी कसा पिकवावा?
  • फ्लॉवर कापल्या नंतर त्यास पुन्हा किंवा खोडाला पुन्हा प्लॉवर येतात का?

उत्तर : तयार झालेला फ्लॉवर काढून घेतल्या नंतर त्याच ठिकाणी फ्लॉवर येत नाही. पण त्याच्या खोडाला पुन्हा असंख्य फुटवे फूटतात. त्यातील निवडक फुटवे वाढवून त्यास प्लॉवर येतात. पण याची गती मंदावेलेली असते. तसेच त्याचा आकारही लहान झालेला असतो.  हो येतात. पण भरपूर शेणखत टाकल्यास वाढ होते.

भविष्य का सुपर फूड फॅक्टरी…
  • घरी उगवलेल्या फ्लॉवरचा रंग बदलतो.

उत्तरः घरी उगवलेला प्लावर हा योग्य वेळेत त्यास काढून घेतले नाही, उशीर केला तर त्याचा रंग पांढर्या शुभ्रतेकडून फिकट गुलाबी होतो. त्याचा प्रवास हा परिपक्वतेकडे जातो. म्हणजेच फुल येऊन बियाणं तयार होण्याची प्रक्रिया सुरू असते. त्या फुलाची बांधणी ही सैल होते. त्यात अंतर तयार व्हायला लागते. याही अवस्थेतील फ्लॉवर काढून त्यास सेवन करता येते.

प्रतिकार शक्ति वाढवणारी तांदुळका भाजी विषयीची माहिती

बरेचदी मंडळीना तो तयार झाला की नाही हे उमजत नाही. त्यामुळे फुल मोठे होईल याची वाट पहात बसतात. आपले निरिक्षण उत्तम असेल तर एकाद्या आठवड्यात फुलांची काहीच वाढ झाली नाही तर तो पोषणाअभावी म्हणा किंवा इतर कारणामुळे त्याची वाढ खुटलेली असते. अशा परिस्थितीत योग्य वेळ व संधी साधून फुल भाजीसाठी काढून घ्यावे. बरेचदा परिपक्कतेची अवस्था प्रखर उन व तापमानात लवकर गाठली जाते. त्यामुळे त्यास खुल्या आकाशात माहे फ्रेब्रुवारीपर्यंत वाढवावा. किंवा त्यास फ्रेब्रुवारी नंतर सच्छिद्र हिरवे कापडाचा मांडव करावा. फ्लॉवर ही फुलभाजी अर्धेवेळ उन्हातही छान फुलतो.

वाचा फ्लॉवरच्या पानांचे सुप कसे तयार करावे…

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

मायक्रो ग्रीन कसे उगवावे.. DIY KIt

Constant Support


Constant Support

Wts Group असेल तर आम्हाला त्यात Add करा अशा सुचनांचे आम्हाला रोज संदेश येत असतात. वैयक्तिगत सदस्यांचा आम्ही कोणताही व्हाट्स अप ग्रुप तयार केलेला नाही. कारण त्यात लोक विषय सोडून सारेच विषय चर्चीतात. त्यांना हाताळणे, मन सांभाळणे अवघड जाते. सर्वांनाच आम्ही वैयक्तिक क्रंमाकार बागेचे लेख, फोटोचे अपडेट पाठवत असतो. अशा पध्दतीने आम्ही लोकांना निरंतर सहाय्य करत आहोत. ( पुढे वाचा)

भाजीपाल्याच्या बागेत वेळ देणे फार गरजेचे असते. आपण जितका वेळ द्याल त्या प्रमाणात भाज्यांचे प्रमाण वाढते. हा वेळ नेमका कशा कशासाठी द्यावा लागतो हे आम्ही कौटुंबिक कार्यशाळेत समजून सांगतो. आपण जेवढे वेळ द्याल तेवढे आपले ज्ञान वाढत जाते. दर वेळेस पडलेले प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात. त्याची उत्त्तरे नाही मिळाली तर आम्ही त्यासाठी निरतंर मदत करत असतो. 9850569644 / 8087475242  या पैकी कोणत्याही एका मोबाईल वर wts app संदेश केल्यास आपणास प्रश्नांची उत्तरे दिली जातील. तसेच आपण आमच्या व्दारे गच्चीवर बाग फुलवल्यास आपल्या कौटुंबिक  सदस्यांच्या व्हाट्सग्रुप व्दारे मार्गदर्शन केले जाते. जेणे करून सर्वांनाच त्याव्दारे शिक्षीत केले जाते.  

तसेच आपणास एकाद्या वनस्पतीविषयी प्रश्न असल्यास त्यासाठी गुगल फॉर्म तयार केला आहे. ज्याव्दारे Plant Diagnosis & consultation केले जाते.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

Its TRULY GROW CHEMICAL free VEGETABLE


Sandeep Chavan with Home grow vegetable.
Sandeep Chavan with home Grow vegetable

आम्ही गच्चीवर बाग फुलवून देतो. पण हे सर्वच खरचं रसायमुक्त असते का… या साठी कोणतेच रासायनिक औषधे वापरली जात नाही का असे प्रश्न विचारली जातात.

हो हे खरयं. आम्ही वाफे भरण्यासाठी नैसर्गिक संसाधनाचा वापर केला जातो. त्यात सुरवातीला कुठेही व नंतरही भाज्या उगवतांना रासायनिक खताचा, औषधांचा वापर ही केला जात नाही. एक वेळ भाज्या कमी आल्या (खरे तर असे होत नाही) किंवा नाहीच आल्या तरी त्यात रसायनांचा वापर आम्ही करत नाही व करू देत नाही. कारण सुंगधी माती तयार होणे खूप गरजेचे असते. बरेचदा कीड वाढते अशा वेळेसही आम्ही गोमय आधारीत औषधांचा, किड वेचण्याचा, मानवी हस्तक्षेपाचा पर्याय निवडला जातो पण रासायनिक अंश कुठेही वापरली जात नाही. आम्ही पंचस्तरीय पध्दतीने भाज्याचे प्रकारांचे लागवड करतो. तसेच Vegetable Forest (भाजीपाल्यांचे जंगल) तयार करावयाचे तत्व वापरतो. जी पधद्त जंगलात निसर्ग वापरत असतो. तर अशा प्रकारे आम्ही नैसर्गिक पधद्तीने भाज्या उगवतो. म्हणूनच आम्ही आपल्या डोळ्यासमोर उगवून दिलेल्या भाज्या या चविष्ट व समाधान देणार्या व आरोग्यदायी असतात. ज्या आम्ही संजीवन औषध म्हणून उगवतो.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

Exotics Vegetables

How to Grow Exotics Vegetable


Exotics

Copy of Copy of Picture 003 copy copy

 

 

 

 

 

 

परदेशात थंड वातावरणात येणर्या Exotics प्रकारातील भाज्या आपण गच्चीवर घेवू शकतो. फक्त यासाठी तापमान कमी करावे लागते. फेब्रुवारी पर्यंत योग्य तापमान असल्यास अशा भाज्या खुल्या आकाशात घेवू शकतो. पण फेब्रुवारी नंतर ऊन वाढत. उष्ण हवा वाहू लागते. त्यावेळेस योग्य प्रमाणात बागेवर सच्छिद्र कापडाचे आवरण टाकले. उष्ण हवा आडवली तर आपण भाज्या घेवू शकतो. ग्रोअर कम कंपोस्टर मधे सुध्दा या भाज्या घेवू शकते. परदेशातील बर्याच भाज्या या सलाड- कोशिबीरीसाठी उपयुक्त ठरतात. ज्या आरोग्यदायी असतात. या प्रकारात लेट्यूस, रेड कॅबेज, झुकीनी, सेलरी, घेता येतात.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

Climbers Fruits


वेगवर्गीय भाज्या ..

IMG_20190324_225337_207.jpg

 

 

 

 

 

 

 

भारतीय उपखंडात येणार्या सर्व प्रकारच्या वेलवर्गीय भाज्या उत्तम प्रकारे घेवू शकतो. वेलवर्गात सर्वात जास्त फळभाज्यांचे प्रकार उपलब्ध तर आहेतच. पण गच्चीवर वाफे  पध्दतीत वेलवर्गीय भाज्या जोमाने फोफावतात व  येतात सुध्दा. शिवाय यांची संख्याने खंडीने भरावी एवढे उत्पन्न असते. बरेचदा तज्ञ डॉक्टर आपल्याला वेलर्गीय भाज्या खाण्याविषयी सल्ले देतात. या प्रकारात कारले, दुधी भोपळे, चक्की, डांगर (लाल भोपळा) पडवळ, तोंडली, काकडी, गिलके (घोसाळी) दोडके, वालाचे विविध प्रकार, वटाणे, हे उत्तम प्रकारे येतात. वेल वर्गीयांना चार इंच खोलीची जागा चालते पण ति लांबलचक असणे गरजेचे आहे. म्हणून गच्चीवर वाफे करणे गरजेचे असते. 

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

Six steps to Avoid Poisions vegetable

रोजच्या आहारातील रासायनिक भाज्यां टाळावयाच्या असतील तर या सहा उपाय वाचा.. आपल्याला नक्कीच जमण्यासारखे आहे.


सहाप्रकारे टाळू शकता विषारी भाज्यांचे सेवन...

Sandeep Chavan with Home grow vegetable.
Sandeep Chavan with home Grow vegetable

रासायनिक भाज्यांचे सेवनाने शरिराची प्रतिकार शक्ती कमी होते. आणि त्यामागे विविध आजार पिच्छा पुरवतात. या रासायनिक भाज्या रोजच्या जेवणात टाळावयाच्या असतील आपल्याला खालील प गोष्टी आवर्जून केल्याच पाहिजे. तरच आपले खाणं हे विषापासून दूर ठेवू शकतो.

1. रेड्यूसी फ्री भाज्या विकत घ्या.. रेड्यूसी फ्री म्हणजे शेती क्षेत्रात भाजीपाला उत्पादन वाढीसाठी जे काही रासायनिक खते, कीडनाशक वापरली जातात त्यांच्या अठ्ठेचाळीस तासाने भाजीपाला हा हा बाजारात विक्रीला आणला जावा असे आहे. रसायने फवारल्या नंतर जवळपास अठ्ठेचाळीस तासाने रसायनांचा प्रभाव हा कमी होतो. पर्यायाने लोक आपली भाजी कमीत कमी रसायने रसायने सेवन करतील असा हेतू असतो. पण कोणताही शेतकरी अठ्ठेचाळीस तास वाट पाहत नाही. कारण रासायनिक खते व फवारणीने उत्पादीत भाजीपाला हा वेगाने खराब होतो. सडतो. तसेच ताज्या भाज्यांना बाजारात मागणी असते किंवा त्यास लांबचा प्रवास करून इतर बाजारपेठेत पोहचावयाचे असते. त्यामुळे त्यास आदल्या दिवशी रसायनांची फवारणी करून भाजीपाला विकला जातो. पर्यायाने आपण एका अर्थाने अठ्ठेचाळीस तासात आपण विषारी अन्न पोटात गेलेले असते. त्यामुळे हा पर्याय आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतो. जितका शेतकरी छोटा तितके रसायनांचा वापर कमी असे काही लक्षात घेवून स्थानिक शेतकर्याकडून भाज्या विकत घेवू शकतो. पण त्याचीही खात्री नसते. हे लक्षात घेतले पाहिजे.

(पुढे वाचा) 

2. विषमुक्त भाज्याः तुम्हाला रोजच्या आहारात विषमुक्त भाज्यांची गरज असल्यास रसायनांचा वापर न करणारा, नैसर्गिक पध्दतीने भाजीपाला उत्पादन करणारा शेतकरी असेन तर त्याच्या कडून विषमुक्त भाज्या तुम्ही विकत घेवू शकता. पण त्यासाठी आपल्याला त्यास दत्तक घेणे गरजेचे आहे. थोडक्यात आपण त्यांच्या कौटुंबिक गरजा भागवणे व त्या बदल्यात रसायनमुक्त भाज्या व अन्नधान्य विकत घेणे असा होतो. किंवा अशा खात्रीलायक शेतकर्याकडून जास्त भावात भाज्या विकत घेता येतात.

3. शिळ्या भाज्या विकत घेणे… मी माझ्या एका सन्यांशी मित्रासोबत भाजी विकत घेण्यासाठी गेलो होतो. त्यावर गच्चीवरची भाजीपाला निर्मिती करणारी बाग हे काम चालू केले नव्हते. तो सन्यांशी मित्र शिळ्याभाज्या विकत घेत असे. मी त्याला ताज्या भाज्यांचे महत्व सांगतीले. तर त्याने सांगीतले की या भाज्या रसायनांवर उगवलेल्या असल्या तरी त्या शिळ्या झाल्यामुळे त्यांचा प्रभाव कमी झाला आहे. आणि त्या अनुषंगाने आपण कमीत कमी रसायन पोटात घेतो हे त्याने समजावून सांगतीले. तर शक्य असल्यास भाज्या शिळ्या विकत घ्या किंवा शिळ्या करून खाव्यात. उदाः फळभाज्या या २-३ दिवस टिकतात. आणि अनुभवाने सांगतो. अशा भाज्या चवीला ताज्या भाज्यांपेक्षा चिवष्ट लागतात. (पुढे वाचा) 

4. रंग, आकार, कीड लागलेल्या भाज्या…. बाजारातील ताज्या भाज्या घेण्याची वेळ आली तर रसायनांचा प्रभाव कमी असलेल्या भाज्या लगेच ओळखू य़ेतात. त्यांचा रंग हा काहीस उतरलेला निस्तेज असतो. मळकट असतो. तर त्यांचा आकार लहान असतो. तसेच त्या काही कोनात वाकलेल्या असतात. उदाः कारली, दूधी भोपळा हा आकाराने छोटा असतो. तर काही अंशी वाकडी झालेली असतात. बरेचदा त्याला कीड लागलेली असते. अशा भाज्यांचा कीडीचा भाग काढून टाकून आपण चांगल्या भाज्यांची भाजी करू शकतो. गवार, वांगी, गिलके, दोडके तसेच पाले भाज्यांमधे छोट्या पानांची, कमी उंचीची भाजी विकत घेवू शकतो. एकदा थायलंड येथे गेलो असता. तेथे कळाले की तेथे कीड,अळी पडलेला फूलकोबी लवकर विकला जातो.. काय कारण असेल… या विचार तुम्ही करा… (उत्तर नाही मिळाले तर फोन करा 9850569644)

5. वाळवलेल्या भाज्या … ताज्या भाज्यांपेक्षा वाळवलेल्या भाज्या या नेहमीच चांगल्या. कारण त्यात विषारी घटक हे बर्यांच अंशी कमी होत जातात. शिवाय त्या बाराही महिने कधीही खाता येतात. तसेच त्या निवडलेल्या व स्वच्छ ही असतात. भाज्या तुम्ही घरीसुध्दा सोप्या पध्दतीने वाळवू शकता. ( पुढे वाचा) 

6.  सर्वात चांगला व खात्रीलायक उपाय म्हणजे.. घरीच भाज्या पिकवा.. घरी पिकवलेल्या भाज्या या आपल्या डोळ्यासमोर उगवलेल्या असतात. अशा भाजीपाला बागेचे मातृत्व आपण स्विकारल्यामुळे आपल्या माहिती असते की आपण त्यात रासायनिक खते, औषधे टाकली आहेत की नाही. त्याला वाढीसाठी लागलेला वेळ आपल्याला माहित असतो. त्यामुळे आज तरी घरीच पिकवलेल्या भाज्यां या सर्वात खात्रीलायक आहेत. आणि आपण थोडी कष्टाची तयारी दाखवल्यास त्या घरच्या घरी उगवणे हे सहज सोपे आहे.

विषमुक्त भाज्यांसेवनासाठी उपाय नक्की करा.

गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक. 9850569644 8087475242

घरीच भाज्या पिकवण्यासाठी वाचा.. Books / E books

सिमला मिरची

सिमला मिरचीला लाल माती गरजेची असते. कारण सि.मि.ला ही कमी पाण्यात छान तयार होते. काळ्या मातीत लागवड केल्यास काळी माती पाणी धरून ठेवते व फळे येण्यास उशीर लागतो किंवा येतही नाही. तसेच पूर्ण वेळ उन्हात ठेवण्यापेक्षा अर्धवेळ उन्हात छान बाळसे धरते व फळधारणा होते.


सिमला मिरची/ Pepper / Capsicum/ सिमला मिर्च

सिमला मिरची ही आपल्या सर्वांच्याच आवडीची भाजी.. चायनिज पदार्थातही सिमलाचा वापर मुक्तहस्ताने केला जातो. सलाड म्हणूनही त्याचे कच्चे सेवन केले जाते. हिरवी, पिवळी, लाल या रंगात मिरची उपलब्ध होते. वजन स्थिर करण्यात ठेवण्यात सिमला मिरची मदत करते. कॅलरी अधिक मात्रेत नसल्यामुळे त्याचे बॅड कोलेस्ट्राल मधे रूपांतर होत नाही.

बाजारातील सिमला मिरची ही रसायने वापरून कमी कालावधीत तयार केलेली असते. त्यामुळे बरेचदा रसायनांचे अंश असतात. तसेच त्याची चव सुध्दा बेचव झालेली असते. तर चिवष्ठ सिमला मिरचीचा स्वाद व योग्य फायदे मिळवायचे असल्यास सिमला मिरची घरीच उगवेली उत्तम…

सिमला मिरची घरी लागवड करणे सोपे आहे.

बरेचदा त्याची तयार रोपे भाजीपाल्याच्या नर्सरीत मिळतात. घरी तयार करावयाचे असल्यास भाजीवाल्याडून पिकलेली मिरची घ्यावी. त्याचे बिज काढून सावलीत वाळवावे. त्याचे छोट्या कागदी कपामधे माती-खत- व नारळाच्या शेंड्याचा चुरा टाकावा व त्यापासूने रोपे तयार करावीत. छोटया रोपांनी बाळसे धरले की ति कुंडीत लागवड करावी.

सिमला मिरचीला लाल माती गरजेची असते. कारण सि.मि.ला ही कमी पाण्यात छान तयार होते. काळ्या मातीत लागवड केल्यास काळी माती पाणी धरून ठेवते व फळे येण्यास उशीर लागतो किंवा येतही नाही. तसेच पूर्ण वेळ उन्हात ठेवण्यापेक्षा अर्धवेळ उन्हात छान बाळसे धरते व फळधारणा होते.

सि.मि.चे पाने वळालीत, शेंड्या गच्च झाला तर समजावे कुंडीला पाणी जास्त होते. अशा वेळेस पाण्याचा ताण द्यावा. चुना पाणी फवारावे. पाणी अगदी मोजून मापून टाकले तरी चालते.

लेख उपयुक्त वाटल्यास नक्की share, Like & Comment करा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

 

 

Grower cum composter

आता करा घरचा कचरा घरीच कंपोस्ट सोबत मिळवा आठवड्याला एक पालेभाजी…

अधिक जाणून घेण्यासाठी 

Grower Cum composter

आमच्या संकेत स्थळावर मागील 250 दिवसात 11000 visiter व 17000 views मिळाले आहेत. 35 देशातील मराठी बंधू भगीनी संकेत स्थळाला भेट देतात. रोज नवनवीन माहिती देणारे संकेतस्थळ म्हणून आकार घेत आहे. आपण या संकेतस्थळावर आपल्या उत्पादनांची जाहिरात लेखाद्वारे करू शकता. दुकान, visiting card, product photo3 , 1video & 750 words असलेला लेख) आपल्या जाहिराती वजा लेखा ची लिंक जवळपास आमच्या सोबत social media वरील 30 हजार लोकांपर्यंत पोहोचवण्यात येईल.
आपणही link forward करून एकाच ठिकाणी माहिती पोहचू शकता. वर्षभराचे शुल्क  1090/- असेल. renewal 730/-

%d bloggers like this: