ऑनलाईन पेड व्हेजेटेबल गार्डन क्लासेस….

online garden classes in hindi & marathi


उपलब्ध जागेत ऑरगॅनिक भाजीपाला उगवणे हे फार गरजेचे आहे. आपल्याकडे हे नाही ते नाही म्हणत आपण आरोग्याची हेळसांड करत तर नाही ना याचा खरं विचार केला पाहिजे. खरं तर आम्ही भाज्या नाही उगवत औषधे उगवतो. कारण विषमुक्त भाजी हे औषधासारखंच काम करतय. पण हे आपल्याला ते खाल्यानंतर लक्षात येते. औषधं ही कमी प्रमाणात लागतात. तसेच घरी उगवलेल्या भाज्या या औषधाप्रमाणेच कमी असल्यातरी पुरतात. तसेच त्यांचे कच्चे स्वरूपात सलाड म्हणून खाणं गरजेचं आहे.

 या संबधी वेळोवेळी प्रत्यक्ष फेस टू फेस कार्यशाळा घेण्यात येतात. पण कोरोना संसर्ग आजारामुळे हे मागील दोन वर्ष टाळण्यात आले. वेळोवेळी इच्छुकांकडून विचारणा होत असल्यामुळे गच्चीवरची बाग व्दारे  Online व्हेजेटेबल गार्डन क्लासेस स्वरूपात घेण्यात येणार  आहेत.

गच्चीवरची बागेव्दारे लवकर zoom वर vegetable Gardening consultation / class / tuition.

स्वरूपः कोंटुबिक किंवा व्यक्तिगत मार्गदर्शन

४५ मिनंटाचे एक सेशन असेल असे पाच सेशन होतील, त्यात सविस्तर पणे सहभागीला विषय समजून सांगण्यात येईल.

विषय खालील प्रमाणे असतील.

  • बाग फुलवण्यासाठीचे उपलब्ध पर्याय, त्यासाठी असलेल्या गरजेच्या गोष्टी
  • खत (द्राव्य व विद्राव्य) व खत निर्मिती आणि त्याचा वापर
  • कीड व कीडनियंत्रके बनवणे
  • बि बियाणे व त्याची लागवड ( सविस्तर)
  • इतर काळजी, महत्वाचे मुद्दे,

( प्रत्येक सत्रात आपणास पडलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिले जातील.)

सहभागी फी ही संपूर्णतः २५०० असेन. (व्यक्तिगत / कुटुंबातील व्यक्तिसाठी)

क्लासची वेळ आपल्या वेळेनुसार असेन, प्रत्येक बैठकीत मागील Follow up घेण्यात येईल.

आपल्याला पुढे वर्षभर मोबाईल किंवा व्हाट्सअप मार्गदर्शन करण्यात येईल.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. 9850569644

वंदणीय वासंती सोर मावशी


तेरवाच लस मिळवली. थकवा आल्यामुळे परवा सारी कामे हळूवार चालली होती. परवा दुपारी अजित भाऊचा फोन आला पण बोलण्याचे त्राण नसल्यामुळे तो काही उचलला नाही. नंतर फोन करून बोलूया म्हणून तसाच बाजूला ठेवला. कदाचीत तिच बातमी असावी. सहसा सकाळी उठून कधीच मोबाईल पाहत नाही. पण त्या दिवशी पाहिला.  जिवन उत्सव ग्रुपवर मेसेज पाहिले. सोर मावशी आपल्यात नाहीत. माझ्यासाठी हा धक्काच होता.  काही काळ शरीर एकदम गळाल्यासारखे झाले. डोळ्यात अश्रू दाटून आले. मावशीना श्रंध्दाजंली वाहिली. मोबाईल बंद केला पण गत काळातील त्यांच्या सोबतचा संवादाची, भेटीच्या क्षणांना भरती आली होती. आठवणीच्या उंच उंच लाटा येवून धडकट होत्या…

मावशीचे वय झाले होते. हे त्यांनाही माहीत होते. कोरोनाच्या आधी त्यांनी आम्हा तिघांना सहकुटुबं भेटायला ये,  नि जेवायला सुध्दा या.  आज येतो उद्या येतो. करत एकदाचे ठरले.

घरी पोहचलो. गप्पा झाल्यात. जेवणं झाली. छोटे छोटे खादीचे रूमाल आम्हाला भेट मिळाली. मावशीना परतीचे गिफ्ट म्हणून आम्ही काहीच आणलं नव्हत. काय द्यायचं हे सुचलंच नाही. कारण त्यांना चरख्यावरील सुतकताई हेच त्यांच गिफ्ट होते पण गेल्या पाच वर्षात त्याला स्पर्शही झाली नव्हता. मनात खंत होतीच. चरखा कसा आहे. तो चालू ठेव.  आता पुन्हा भेट कधी हे मलाही माहित नव्हते. त्यांनतर निर्मल ग्राम निर्माण केंद्रच्या भाऊ नावरेकर स्मृती दिनानिमित्त भेट झाली.

सतेज कांती, स्वच्छ शुभ्र कपडे, मोजके, स्पष्ट बोलणे. त्यां नेहमी माझी विचारपूस करत. कारण माझे आवडते माध्यमांतील काम सोडून पर्यावरणकामाला सुरूवात केली. होती. ठिक चाललय ना. पुरेसे पैसे येतातहेत ना याची ते आवर्जून चौकशी करत.

मध्यंतरी किशोर सोर यांच्या कडे चौकशी केली. थकल्या आहेत. ते साहजिकच होते. मावशीशी फोनवर बोलणे शक्यच नव्हते. कारण या वयात त्यांना आता त्रास देणं अवघड वाटतं होतं. कोरोना काळात त्यांना प्रत्यक्ष भेटणं टाळलं. पण मावशी सोबतची प्रत्येक भेट ही लख्खपणे आवठवत राहते.

सुजल झाला तेव्हा त्यांनी स्वतः हाताने विणून पायमोजे व स्वेटर दिले होते. ही बातमी सुजला सकाळी सकाळी सांगायची नाही. असं आम्ही दोघांनी ठरवलं. ति बातमी त्याला दुपारी सांगीतली. असं कसं झालं असे म्हणून त्यांने जोरात आरोळी ठोकली, मावशी आपल्यात नाही.  हे त्याला काही पटतं नव्हतं. पण त्याला काहीच इलाज नव्हता. संदीपची आई म्हणून त्यांना आईचा व आईला सोर मावशी बद्दल आपुलकी होती. आता मावशी आपल्यात नाही हे आता माझ्या आईला कसं कळवायचं हे फार अवघड वाटतयं.

मावशी तेवढ्याच प्रेमळ होत्या. लहान मोठ्यांच्या त्या मावशी होत्या. आई खालोखाल प्रेम हे मावशीवर होते याचा नेहमी प्रत्यय येतो. रक्ताच्या नात्यां नंतर ही सामाजिक उत्तरदायित्वाच्या रथाचे सारथ्थ करणारी मंडळी नेहमीच वंदनीय असतात. त्यातील एक सोर मावशी होत्या.

गांधीचे नेतृत्व हे किती खोलवर, मातृहद्यी होते याचा प्रत्यय त्यांच्याकडे पाहून यायचा. विनोबा, सानेगुरूजी याच्यांत तर हे रूजले होतेच. पण एका स्त्रीच्या रूपात गांधी पुन्हा भेटावा, आपल्याशी बोलावा गांधीना अनूभवता यावा. या अनुभवणार्या मंडळीत आपण पण एक आहोत. याचा नेहमी आनंद अभिमान वाटतो.

चरखा चालू ठेव. हे त्यांचे मागणे. गच्चीवरची बागेच्या कामात आता हे थोडं मागे पडलयं. घरातला एका कोपर्यात व मनातही चरखा तसाच पडून आहे. तो बंद होणार नाही. व्यावहारिक लोक त्याला उत्पन्नाचे साधन मानतात. पण चरखा हा केवळ उत्पन्न देणारा नाही. तो देवूही शकत नाही. त्यातून निघणारे सूत हा व्यवहार नाही. त्याच्या समोर बसून केलेली सुत कताई ही करूणेची, पर्यावरण रक्षणाची प्रार्थना आहे. असे मला वाटते. मूळातच जगातील कोणतेही यंत्र हे पुरेसा परतावा देवू शकत नाही. त्याला चिटकवलेला परतावा हा केवळ त्याचे बाय प्रोडक्ट असते. त्याच्या अंतस्थ हेतू हा त्याचा खरा परतावा असतो. पर्यावरणाचे काम मनाच्या अबोध कप्प्यात संचीत झालेले होते. ते वर आणण्याचे काम चरख्यावरील सुतकताईच्या साधनने  केले असे मला वाटते, गच्चीवरची बाग वाढत गेली. चरख्याचेच नवे रूप जणू. त्यातूनच उमलेलं हे काम. चरखा बंद झाला पण त्याला एकाग्रतेचे, चिकाटी, साधनेचे पोषणमुल्य आता कमी पडू लागलयं याची खात्री पटू लागलील.

चरख्यावरील सुतकताई चे प्रोडक्ट हे सूत नसून त्याच्या समोर बसून जे काही श्वासांची तंद्री लागते. एकाग्रता साधली जाते त्याकडे पहायला हवे. विपश्यनेच्या तंत्रानंतर जी काही एकाग्रतेची साधना असेन ती चरख्यावरील सूतकताईनेच मिळू शकते. असे मला जावणवले आहे.

मावशीना आपल्या कडून सूतकताई हवी होती. तो कधीही बंद होणार नाही हे माहित आहे पण चालू कधी करता येईल हे आता आपल्या प्रत्येकाला ठरवणे गरजेचे आहे.

कोरोना काळात आमच्या जिवन उत्सवच्या कुटुंबाना फार मोठे धक्के बसले आहे. आचवल ताई, संगीता ताई हे इनर सर्कल मधील मंडळी सोडून गेलीत. आपण प्रत्येक जण घरात सुरक्षित आहेत पण आम्हाला आपले जवळेची मंडळी दुरावलेचे धक्के फार बसले आहेत. हे धक्के एकएकट्यानांच सोसावे लागत आहे. एकत्र येवून एकमेंकाना आधार देणे कोरोनामुळे शक्य नाही. जी काही देवाणं घेवाणं होईल ती दूरध्वनीवर.

मावशी सोबत चरख्यावरील पुस्तक तयार करण्याचा योग आला. कमी शब्दात सुबक शब्द रचना असलेली ही पुस्तिका त्यांच्या अपेक्षे प्रमाणे तयार करता आली यात माझाही खारीचा वाटा होता याचा फार मला आनंद आहे.

 अशा अनेक आठवणी आहेत. ज्या मनात दाटून येतात. डोळे पाणावतात. आमच्या जिवन उत्सव मधील माळेतील एक मणी आज कमी झाला . आमचा मानसिक आधारवड हा कोसळलाय. पण मावशीचा, पर्यायाने गांधीचा चरखा खरचं चालू ठेवूया… पर्यावरण संरक्षणेची हा धागा तुटू देता कामा नये. हीच प्रार्थना.

संदीप चव्हाण, नाशिक..

घरच्या घरी फुलवा भाज्यांचा मळा

आपल्या कुटुंबापुरता भाजीपाला घराच्या गच्चीत उगवण्यासाठी हा अत्यंत योग्य काळ आहे, असे मत ‘गच्चीवरची बाग’चे संचालक संदीप चव्हाण यांनी केले आहे.


गच्चीवरची बाग |digi
 

घरच्या घरी फुलवा भाज्यांचा मळा

करोना काळात असे करा व्यवस्थापन

Gokul Pawar

Gokul Pawar

 

नाशिक |Nashik

करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रतिबंधित क्षेत्रे वाढत आहेत. लोकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, भाजीपाला सारखा हाताळू नये, भाजी घ्यायला एकदम गर्दी करू नये असे आवाहन यंत्रणा वारंवार करत आहे. आपल्या कुटुंबापुरता भाजीपाला घराच्या गच्चीत उगवण्यासाठी हा अत्यंत योग्य काळ आहे, असे मत ‘गच्चीवरची बाग’चे संचालक संदीप चव्हाण यांनी केले आहे.

सहज पिकवा भाज्या !

आता राज्यात ‘ अनलॉक महाराष्ट्र’ मोहीम सुरु झाली आहे. पण करोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा काळात संसर्गित भाज्या आपल्या घरी आल्या तर? किंवा आपण संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आलो तर? त्यापॆक्षा भाज्या घरीच उगवल्या तर? घरी भाज्या पिकवणे अवघड नाही. त्यासाठी माती, पालापाचोळा, कंपोस्ट खत अशी थोडीशी पूर्वतयारी करावी लागते. पावसाळा सुरु आहे. त्यामुळे पालापाचोळा मिळणे अवघड आहे. त्यामुळे सध्याच्या काळापुरते आवश्यक कंपोस्ट खत नर्सरीतून आणले तरी चालेल.

घराच्या बाल्कनी, खिडकी, गॅलरी, उपलब्ध वस्तू उदाहरणार्थ प्लास्टिक कापड, बादल्या, टब, गोणपाट, तेलाचे डबे, शीतपेयाच्या किंवा पाण्याच्या बाटल्या असल्या तरी त्यात तुम्ही भाज्या पिकवू शकता. तुमच्याकडे ४ इंच खोली असलेल्या सव्वा लिटर पाण्याच्या बाटल्या असली तरी त्यात सुद्धा अंबाडी, पालक, आंबटचुका अशा पालेभाज्या लावू शकता. चार बाटल्यांमध्ये पालेभाज्यांची रोपे लावली तर दोन जणांपुरती पालेभाजी सहज मिळते. १ फूट लांबीरुंदीच्या आणि ४ इंच खोल असलेल्या कुंडीत देखील दोन माणसांची पालेभाजी सहज उगवते असेहीते म्हणाले.

अशी करा कुंडी तयार !

तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या साधनाच्या तळाशी नारळाच्या शेंड्या, त्यावर किचनवेस्ट/ पालापाचोळा दाबून भरा. थोडी माती टाका. झाली कुंडी तयार. एखाद्या कुंडीत झाडं नसेल तर त्यातील माती वापरा. बियाणे पेरा आणि साधारणतः महिनाभरात आपण उगवलेल्या भाज्या खायचा आनंद घ्या. लॉकडाऊनमुळे जो वेळ मिळाला आहे तो अधिकाधिक या आपल्या गच्चीवरच्या बागेसाठी द्या.

आपण गच्चीतल्या बागेत सर्वच भाज्या पिकवू शकतो. पालेभाज्या साधारणतः सव्वा महिन्यात तर कांदापात महिनाभरात येते. या रोपांना सतत उन्हाची गरज नसते. थोडे ऊन, थोडी सावली अशी जागा चालते. सकाळचे उब मिळाले तरी पुरते. खूप जास्त पाणी घातलेले चालत नाही. कीड दिसते आहे का याचे वारंवार निरीक्षण करावे लागते. तिचे नियंत्रण घरच्या घरी करता येते. देशी गायीचे गोमूत्र थोडेसे सौम्य करून, ते नसेल तर आंबट किंवा खराब ताक, हिंगाचे पाणी यांची पंधरा दिवसातून एकदा फवारणी केली तरी किडीचे नियंत्रण होते.

घरचे बियाणे !

बियाणे किंवा रोपे विकत मिळतात. पण तेव्ढ्यासाठीही बाहेर जायचे नसेल तर महिनाभरात भाज्या येतील अशा घरच्या बियाणांचा वापर करता येतो. मेथी, धने , मोहरी पेरा. थोडेफार पालकांचे बिज असेल तर पेरा. किंवा बाजारातून पालक जूडी मिळाल्यास पाने काढून त्याची खोडासहित लागवड करा. महिनाभरात पालक तयार होईल. कांदा, लसून लागवड करा. महिनाभरात कांद्यांची पात मिळेल.

तांदुळका, लाल माठ ही सहज येणारी वनस्पती आहे. थोडं बियाणं मिळालं, किंवा एकादे रोपे मिळाले तर ते वाढवा. गाजर, मुळा, बिट याचें खोड पुन्हा मातीत लावा. त्याच्या पानांपासून पराठे तयार करता येतात. मिरची, टोमॅटो, वांगी, बटाटे, वेलवर्गीय ( वाल, भोपळा, गिलके, दोडके, तोंडलीचा वेल ) यांची लागवड करा. घरच्या घरी भाज्या पिकवण्याचा आनंद सगळ्यांनी घ्यावा असे मला वाटते.

 

Dr.Bagicha E-book

Dr. Bagicha… E book on Organic Vegetable Terrace Gardening… grow your Chemicale Free own food at your home


dr bagicha edited for saleघरच्या घरी भाजीपाला कशा उगवायाच्या याचे मागर्दशर्न करणारी पुस्तक थेट आपल्या मोबाईल व संगणकावर ई स्वरूपात…

गच्चीवरची  बाग व्दारे Dr. Bagicha हे ई-पुस्तक आपल्या हाती देतांना विशेष आनंद होत आहे. कोव्हीड- १९ या आजारामुळे lockdown झाले आहे. आपल्या प्रत्येकाच्या वेळ आहे. या काळात वेळ सत्कारणी लावण्याचे अनेक पर्याय हाताशी आहेत. त्यातील एक पर्याय म्हणजे घरीच विषमुक्त भाज्या उगवणे. त्यासाठी अनेक फोन येत आहेत. पण प्रत्यक्ष रूपात आपल्याहाती छापिल पुस्तक पोहचवणे अवघड आहे. तसेच या काळात गच्चीवरची बाग उपक्रम आर्थिक दृष्टया अडचणीत आला आहे. त्यास हातभार लागावा म्हणून या पुस्तकाची निर्मिती केली आहे. वरील दोनही गरजा लक्षात घेवून Dr. Bagicha हे ई-पुस्तक तयार करण्यात आले आहे.

पुस्तकाचे पहिली पाच पाने पाठवत आहोत. ते वाचून आपण 9850569644 या क्रंमाकावर गुगल पे / Instamojo चा वापर  करू शकता. पुस्तकाच्या दुसर्या पानावर त्याचे सहभाग मुल्य नोंदवण्यास आले आहे. तसेच महत्वाची सुचना केली आहे. सहकार्याच्या अपेक्षेत..

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

सुरवातीचे पाच पाने मिळवा dr. bagicha E-book1-5 pages

Beyond Corona virus disease (COVID-19)

एक झेन कथा सांगतो. एक शिकला सवरलेला व्यक्ती एका गावात फिरायला जातो. तेथे त्याला एक व्यक्ती दुपारचे जेवण आटोपून मस्त झाडाच्या गार सावलीत निवांत झोपलेला असतो. हा पर्यटक त्याला काही शब्द सुनावतो. अरे झोपलास काय. काहीतरी काम कर, ज्ञान मिळव, उद्योग (उठाठेव) कर, पैसे कमव, विकएंड ला फिरायला जा, मस्त आराम कर. मग तो गावकरी म्हणाला तेच तर करतोय…


Beyond Corona virus disease (COVID-19)

कोरोना … जसे जसे दिवस पुढे सरकाताहेत तसे तशी अनामिक भिती वाढत चाललीय. कुठे तोंड काढायची (दाखवायची) सोय राहिली नाही. कुणाच्या संपर्कात न येणे हाच एक खबरदारीचा उपाय आहे. पण ज्याची प्रतिकार शक्ती (जो बलवान असणार तोच जगेल हा तर निसर्गाचा नव्हे जंगलाचा नियम आहे) तो जगेल हे मात्र नक्की.

कोरोना विषाणू बदद्ल विचार करतो तेव्हा.. त्या विषयीचे अनेक पदर डोळ्यासमोर उलगडतात. प्रगतशील, वैज्ञानिक पध्दतीने व गतीने वेगाने बदल घडवून आणलेला माणूस प्राण्यासमोर केवळ ईश्वराला, निसर्ग देवतेला आर्त प्रार्थना करण्याशिवाय काही हातात उरलेले नाही. असे मला प्रकर्षाने जाणवते. इतकी हताश वेळ आपल्या सर्वावर आली आहे. युध्दस्थिती भासावी असे वातावरण तयार झाले आहे. आहे त्या परिस्थीतीला निपटून काढण्याची, त्याला सामोरे जायावयाची आपले शाश्त्रज्ञ, डॉक्टर मंडळी, लष्कर, समाजसेवक तयार आहेतच. पण ही वेळ माणसावर का यावी हाच खरा प्रश्न आहे.

सारा खेळ हा जिवाणू विषाणूंचा आहे. माणसाने सुरक्षीत वाटावे म्हणून अगदी उत्क्रांतीपासून त्याने पृथ्वीतलावरचे डोळ्यांना दिसेल ते हिंस्त्र प्राणी संपवत आणली. अगदी सुरक्षेचे टोक म्हणून त्याने माणसांच्या आक्रमक टोळ्यांचा नाश करत आला आहे. करत चालला आहे. पण हे सारे करतांना त्याने जिवाणू विषाणूंच्या जगताला कुठेही धक्का लावला नव्हता. या आधी महामारी, प्लेग सारखे साथीचे आजार आलेत, ते नंतर ओळखीचे होते,त्याची कारण सापडलीत.  पण ती फक्त पुनर्रावृत्ती होती. त्यामुळे त्यावर मात करता आली. पण तो जसा प्रगत होत गेला, यांत्रीक होत गेला तेव्हा अनेक नवे आजार सामोरे येवू लागले आहे. कारण मानव प्राण्याने विकासाच्या, उपभोगाच्या, सुख, सुविधाच्या नावाखाली जिवाणू व विषाणूंच्या परिसंस्थेला लावलेला धक्का आहे. कारण जिवाणू व विषाणू हे अल्पायुषी असतात. प्राप्त प्रतिकुल अनुकुल परिस्थितीत स्वतःला ते सुप्तावस्थेत अथवा प्रगत बनवू शकतात.  तसेच ते एकमेंकाना पुरक व नियंत्रीत करत असतात. तसेच हवेतील शुध्दता, त्यातील प्राणवायू, निसर्ग, या नुसार ते केवळ जन्म मृत्यू होत नसतो तर त्यात उत्क्रांत अवस्थे सोबत नव जिवाची निर्मीतीही असते. आत मूळ प्रश्न उरतो अशा विषाणूंना मारक, नियंत्रण करणारे असे जिवाणू नाहीतच का… नक्कीच असावेत. पण आपण ज्या पध्दतीने आजचे जीवन जगत आहोत त्यात आपण अगदी निरंक, अगदी निर्जंतूकपणे राहण्याचा, स्वच्छतेचा फोबीया घेवून जे जगत आहोत, वेगवेगळी रसायने वापरत आहोत. अगदी मातीतले गांडूळे संपवून टाकली. ज्या हाड नसलेल्या कोवळा जिवाला निसर्गाने स्टोन क्रशरची यंत्रणा बहाल केली आहे. तो जे जे खातो त्याची माती होते. त्यांच्या संपण्यानेही मातीतील विषाणूंचे अस्तित्व वाढले.  त्यामुळे जिवाणूंच्या अभावामुळे म्हणा किंवा रसायनांच्या स्वभावामुळे मुळे विषाणूंना मारक असे जिवाणू संपवत चालले आहोत.  माणसाची मातीशी नाळ तुटलीय. जंगल व निसर्गाशी नातं तुटलं. पंच महाभूतासोबत सहवास संपलाय. सकाळच्या सुर्योदयाची कोवळी किरण विसरलोत. पानाचा स्पर्श विसरलो, फुलांचा गंध विसरलोत. मातीचा स्वाद विसरलोय. तो शहरातील कुबट खोल्यात निवास करू लागलाय. असो… जगणं व जीवन शैली बदलावयाची गरज निर्माण झाली आहे हे मात्र नक्की…

आपल्याकडे या पूर्वीही महामारी येवून गेलीय. त्यावरही लोकांना मात केलीच होती ना… तेव्हा मात करण्याच्या काय पध्दती वापरल्या होत्या… याचा आपण विचारच करत नाही. जे जे उपाय आहेत ते केलेच पाहिडे. आज गोमुत्रावर टिका होतेय. पण गोमुत्र मासिक पाळीच्या काळात, लांब खोल्याच्या,कोंदट, कुंबट खोल्यात शिपडले जायचे. कारण ते विषाणूमारक होते म्हणूनच ना.  मलाही गोमुत्राचा अनुभव आला की, बागेत कीड नियंत्रक म्हणून (नाशक नाही) गोमुत्र फवारणी केली तर आपली श्वसनप्रक्रीयेची खोली (डेप्थ) वाढते. खोल, गंभीर, भरपूर श्वास घ्यावसा वाटणे. यातच सारे काही आले. जिवामृत हे बागेत खत व की नियंत्रक म्हणून वापरतो. पण मेलेल्या उंदारावर, सडलेल्या कचर्यावर टाकली तर त्याचा दुर्गंध नाहीसा होता. एवढेच काय मुतार्यामधील अमोनियाचा गंध ही नाहिसा करण्याची ताकद त्यात आहे. अर्थात सबकुछ गोमुत्र असे मला म्हणावयाचे नाही. ( पूर्वीच्या शुध्दतेत व आजच्या शुध्दतेत प्रचंड फरक आहे. कारण केवळ खाणंच नाही तर त्याचा सहवास, निवास सारंच बदललय)

हजारो वर्षापासून माणूस शिकत आहे. अनुभवाचे ज्ञानात रूपांतर करत आहे. त्याचे अनुभव, ज्ञान हे पिढ्यान पिढ्या पुढे नेत गेले. पण गेल्या ६०-७० वर्षात जी काही शालेय शिक्षणातून विज्ञानाचा बाहू झाला. नव्या पिढीने मागील पिढ्यांच्या अनुभवाना, ज्ञानालाच नव्हे तर शहाणपणाला सरळ सरळ खोटे, चुकीचे ठरवले गेले. येथेच आपल्या (wisdom) शहाणपणाची गोची झालीय. ज्ञान मिळाले पण त्याचं समायोजन, त्याचा समनव्य जो साधला गेला पाहिजे होता ते दूर्दैवाने झाला नाही.  गेला साठ सत्तर वर्षाचा काळ आहे मागील पिढ्याचे शहाणपण व नविन शिकलेल्या पिढ्याचे ज्ञान, विज्ञान याची गुफंन, सांगड घालता आली नाही. अर्थात सारेच बरोबर होते व सारेच चुकीचे होते हे दोन टोकांचे म्हणणे चुकीचे आहे. बंद घड्याळ ही दिवासातून दोन वेळेस बरोबर वेळ दाखवते हेही विसरून चालणार नाही. हे सारे नितांत समजून घेत पुढे गेले पाहिजे. सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून भारतीय संस्कृती कडे पाहिले जाते. पण मागील दोन तीन पिढ्यांच्या कालावधीत ते नामशेष झालय.

कोणताही अभ्यास करायचा नाही. इंस्टंट प्रतिक्रीया द्यायची. मत नोदवायचे. मग ते महापुरूष असो की आपले काही सण, रितीरिवाज असो. स्वांतत्र्य, आधुनिकता, प्रागतिक, पुरोगामी, धर्म, जातीच्या नावाखाली सारेच धोपटायचे.इतके उधळ कसे.. माझा मुलगा जेव्हा ईतर धर्माबद्दल, महापुरूषाबद्दल टोकांचे मत व्यक्त करतो. तेव्हा मी त्याला नेहमी सांगतो तू किती अभ्यास केला.. महात्मा गांधी बद्दल, नथुराम गोडसे बद्दल, आंबेडकराबद्दल, बुध्द- ईस्लाम, हिंदू धर्माबद्दल किती माहित आहे.  याचा आधी अभ्यास कर, त्याचे दाखले शोध, त्याची कार्यकारण भाव शोध, ईतिहासाचा शोध घे. त्या त्या प्राप्त परीस्थितीत ते ते तेव्हा योग्य होते. असे उथळ बोलून प्रतिक्रीया देणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास होतो. कोणता प्रतंप्रधान चांगला, त्याला आरे कारे म्हणणे ही आपली लायकीच नाही… पहिल्यांदा तिथ पर्यंत पोहचता येते का… पोहचण्याची, बरोबरी करण्याची ताकद असेल तरच त्याबद्दल बोलता येईल. असो… हे फक्त माणूस प्राण्याच्य उथळ स्वरूपाचं उदाहरण आहे. जे आपण स्वतःच्या अनुभवावर थोडक्यात सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करत असतो जो जिवनात सर्वत्र लागू पडतो.

देशी गायीला ३३ कोटी देव निवास करतात. देव ही संकल्पना मदत करणारी, उपकार करणारी, प्राण वाचवणारी असे आपण मानतो. तर थोड्या वेळासाठी देव म्हणजे जीव असा आपण लक्षात घेतला तर हे ३३ कोटी जीव (जिवाणू) निवास करतात. जे माणूसच नव्हे तर एकूण जल जंगल, जमीन, पशू, पक्षी यांना जगवणारे आहे.

मागे एक सत्यकथा वाचण्यात आली होती, अमेरिकेतीन कोणत्यातरी बेटावर असाच अनामिक आजार आला होता. त्या बेटावर ति लोक एका पाठोपाठ मरण पावली होती. त्याचा शोध घेतला तेव्हा त्यांना फक्त एक बेटावरंच कुटुंब जिवंत राहिल्याचा लक्षात आलं. तपास व अभ्यासाअंती असे लक्षात आले की त्यांच्या किचनमधे कांदा चिरून ठेवला होता. त्यामुळे तेथे आजार पसरला नव्हता. कांदा हा सुक्ष्म जिवांना आकर्षीत करत असतो. त्या चिरलेल्या कांद्यावर त्या विशिष्ट विषाणूं आढळून आले होते.

या जगात कोणतेही सजिव प्राणी नाही राहिला तरी जिवाणू, विषाणूंची दुनिया कायम राहणार आहे. घडणार बिघडणार आहे. फक्त आपल्या हातात हेच आहे की हे किती बिघडवायचे किती घडवायचे.. किती विकासाच्या, आधुनिक, आरामच्या, श्रम शुन्य जगण्याच्या आहारी जायचे.

एक झेन कथा सांगतो. एक शिकला सवरलेला व्यक्ती एका गावात फिरायला जातो. तेथे त्याला एक व्यक्ती दुपारचे जेवण आटोपून मस्त झाडाच्या गार सावलीत निवांत झोपलेला असतो. हा पर्यटक त्याला काही शब्द सुनावतो. अरे झोपलास काय. काहीतरी काम कर, ज्ञान मिळव, उद्योग (उठाठेव) कर, पैसे कमव, विकएंड ला फिरायला जा, मस्त आराम कर. मग तो गावकरी म्हणाला तेच तर करतोय…

हा निवांतपणा आपल्या आयुष्यात आहे का?  हा निवांतपणा तोही एकांतात अनुभवावा म्हणून कोरोना आपल्या सर्वाच्याच वाटेल्या आला आहे हे मात्र नक्की… त्या निमित्ताने का होईना… हा या धर्माचा, जातीचा, पक्षाचा. गरीब, श्रीमंत, स्त्री पुरूष, मित्र, शत्रु सारे सारे पाश गळून पडावेत, सर्वांनाच जगण्याच सुख वाटेला याव, नि माणूस म्हणून आपण पुढे जावे, हीच ईश्वर ( ते ही आपण वाटे पाडून घेतलेल्या) चरणी प्रार्थना करू शकतो.

सदर लेखातून कोणत्याही उपचार पध्दतीचा दावा करत नाही.. हे चिंतन आहे. विविधअंगाने विचार करण्याची, त्याची अंमलबजावणी करण्याची प्रत्येकात क्षमता आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर पशू, पक्षी यांच्या वर्तनात काही बदल जाणवतोय का.. याचे निरिक्षण गरजेचे आहे. का हे फक्त माणसालाच भोवतय.  ते माणासालाच भोवणार असेन तर नक्कीच आपलीच चुक आहे. चुकत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक.

%d bloggers like this: