Winter Gardening ? Start Now!

82 / 100 SEO Score

How to Start Winter Gardening at Home !

Winter Gardening Tips !

हिवाळ्यात घरगुती बाग कशी सुरू कराल?

हिवाळ्यात बाजारातील महागड्या भाज्यांवर अवलंबून राहू नका. घरच्या घरी बियाण्यांपासून ताज्या भाज्या आणि फुलं उगवा!” हिवाळ्यात ताज्या भाज्यांची मागणी वाढते, परंतु बाजारातील भाज्यांवर अवलंबून राहणं महागडं ठरू शकतं. “Winter Gardening ” ह्या लेखात घरच्या घरी बियाण्यांपासून हिवाळ्यात कसा ताज्या भाज्या आणि फुलं मिळवता येतील, ह्याचे मार्गदर्शन केले आहे. स्वयंपाकघरातील बियाणांपासून बागकाम सुरू करता येते. आपल्याला रसायनमुक्त आणि पोषणमूल्यांनी समृद्ध भाजीपाला मिळवता येईल. या लेखात हिवाळ्यातील बागकामाच्या महत्वाच्या टिप्स, समस्या आणि उत्तम पर्यायांचा समावेश आहे.

Winter Gardening

हिवाळा येतोय! घरच्या घरी भाजीपाला आणि फुले उगवायला शिका!

दिवाळी चा फराळ खाऊन आणि फटाके फोडून झालेत. आता काही पौष्टिक आणि सात्विक खान गरजेचं आहे. त्याच बरोबर हिवाळा जवळ येतोय, थंडीची चाहूल लागतेय, आणि आपल्यापैकी बरेच जण आपल्या बागेची तयारी करत असतील. परंतु या मोसमात स्थानिक बाजारातून भाजीपाला आणि फुलांच्या रोपांची खरेदी करणे अनेकदा महागडे आणि जोखमीचे ठरू शकते. या हिवाळ्यात तुम्हाला काहीतरी वेगळं हवं आहे का? आणि ते पण जास्त पैसे न गुंतवता. कारण आताच Back To Back सणामुळे खूप खर्च झालेला आहे. बाजारातून झाडं Plants आणण्याऐवजी आणि पैसे गुंतवण्यापेक्षा Investment तुमच्या स्वतःच्या घरात भाजीपाला आणि फुले उगवा!

⚠️ थांबा... हे वाचल्याशिवाय जाऊ नका
  • 👉 जागा कमी आहे म्हणून थांबला आहात का?
  • 👉 योग्य system नसल्यामुळे तुम्ही अडकले आहात का?
  • 👉 दररोज fresh organic भाजी खायला आवडेल का?
  • 👉 तुम्ही ready आहात का action घ्यायला?

तुमच्या स्वयंपाक घरातील उपलब्ध बीयांपासून ही प्रक्रिया सुरू करू शकता. फक्त थोडं नियोजन, काळजी , मेहनत, अभ्यास आणी खूप Interest ची गरज आहे. यामुळे तुम्हाला हिवाळ्यात ताज्या भाज्या आणि सुंदर फुलं सहज मिळवता येतील. चला, घरच्या घरी बागकाम Gardening सुरू करण्यासाठी बघुया , गच्चीवरची तूम्हाला कशी मदत करताय ते!

1. बाजारातून झाडं का आणू नयेत?

  • हिवाळयातील समस्याः बाजारातून (अर्थात Plant Nursury तील) झाडं, रोपं किंवा फुलं आणण्याची सवय अनेकांना आहे. मात्र, हिवाळ्यात Winter Gardening यामुळे काही समस्या उद्भवू शकतात. हिवाळ्यातील थंडीमुळे रोपं टिकत नाहीत. बाजारातून आणलेल्या झाडांची थंडीत काळजी घेणं कठीण असतं, कारण ती रोपं आधीच हवामानात होणाऱ्या बदलांना तोंड देत असतात.
  • महागडे दर: फुलं आणि भाज्यांची रोपं बाजारातून विकत घेणं खिशाला जड होऊ शकतं. कारण सर्वत्रच रोपांची खरेदीची लगबग सुरू होते. तसेच मागणी वाढली की पुरवठा साखळी अबादित राहण्यासाठी कोणत्याही झाडांची विक्री केली जाते.
  • रसायनांचा अतिरेकी वापर: बाजारातील रोपं बऱ्याचदा रसायनांव्दारे टिकवली जातात, ज्यामुळे ती नैसर्गिक chemical Free आणि शाश्वत Sustainable पद्धतीने वाढत नाहीत. याला पर्याय म्हणजे घरच्या घरी बियाण्यांपासून झाडं उगवणे. यामुळे तुम्हाला शुद्ध, रसायनमुक्त भाजीपाला आणि फुलं मिळतील.

2. घरच्या घरी बागकाम कसं सुरू कराल?

घरच्या घरी बागकामासाठी Home Gardening तुम्हाला फक्त काही बियाण्यांची Seeds गरज असते. आणि तुमचा घरात जिकडे सूर्यप्रकाश येणार आहे ती जागा थोडीशी मोकळी करून घ्या. त्यात बियाणं रूजवा. तुम्हाला बियाणे हवे असतील तर तुम्ही Eco Hub By Akanksha ह्या इंस्टा पेज वर जाऊन ऑर्डर करू शकता. तसेच तुमच्या स्वयंपाकघरातील निवडक काही बिया वापरू शकता. फक्त बियाणे नाहीच तर आपल्याकडे सगुणा Grow Bags देखील उपलब्ध आहेत. स्वयंपाकघरात अनेक उपयोगी बिया उपलब्ध असतात. त्या योग्य प्रकारे पेरल्या तर तुम्हाला उत्तम पिकं मिळतील.

3. तुमच्या स्वयंपाकघरातील ५ सर्वोत्तम बियाणं

  • A. मिरचीच्या बिया (Chili Seeds)
  • तुमच्या कडील लाल किंवा हिरव्या मिरच्यांच्या आत असलेल्या बिया निवडून ठेवा.
  • मिरची उगवण्यासाठी बिया थोड्या वेळ पाण्यात भिजवा.
  • छोटी कुंडी किंवा ट्रेमध्ये मातीत पेरा.
  • हिवाळ्यात थंडीतल्या सूर्यप्रकाशात ठेवा.
  • मिरच्याचं झाड लवकर वाढतं आणि सतत मिरच्या देतं.
  • B. टॉमेटोच्या बिया (Tomato Seeds)
  • ताज्या टॉमेटोच्या बिया स्वच्छ धुवून वाळवा.
  • आणि मातीत पेरा.
  • टॉमेटोचं झाड लवकर उगवतं आणि हिवाळ्यात चांगलं फळतं.
  • C. कोथिंबिरीच्या बिया (Coriander Seeds)
  • तुमच्या स्वयंपाकघरातील कोथिंबिरीच्या बिया म्हणजे धन्याच्या बिया वापरून तुम्हाला हिवाळ्यात ताजी कोथिंबीर मिळेल.
  • या बिया हाताने हलक्या चिरडून मातीत पेरा.
  • आठवड्याभरात छोटी कोवळी कोथिंबीर उगवेल.
  • D. मेथीच्या बिया (Fenugreek Seeds)
  • मेथीचे दाणे तुमच्या किचनमध्ये सहज सापडतील.
  • हे दाणे मातीत पेरल्यास आठवड्याभरात तुम्हाला मेथीची कोवळी पानं मिळतील,
  • जी पोषणमूल्यांनी समृद्ध असतात.
  • E. लसूणच्या कांद्याचे पाती (Garlic Cloves)
  • लसूणच्या कांद्याचे पाती उगवणं खूप सोपं आहे.
  • लसूणाची एखादी फोड मातीमध्ये पेरल्यावर थोड्याच दिवसांत तिच्या हिरव्या पाती उगवतात.
  • त्या भाजीसाठी वापरता येतात.

4. बागकामासाठी काही महत्त्वाचे टिप्स

  • A. योग्य कुंडी आणि मातीची निवड:
  • हलकी, पोषकद्रव्यांनी भरलेली माती वापरा.
  • कुंडीच्या तळाशी छोटे छिद्र असणे आवश्यक आहे.
  • जेणेकरून अतिरिक्त पाणी निचरा होईल.
  • B. प्रकाश आणि पाणी व्यवस्थापन:
  • – बियाण्यांना उगवण्यासाठी थोडा सूर्यप्रकाश आवश्यक असतो.
  • – जास्त पाणी देऊ नका, नाहीतर बियाणं कुजून जाईल.
  • C. सेंद्रिय खतांचा वापर करा:
  • घरातील ओल्या कचऱ्यापासून खत तयार करून वापरा.
  • त्याचा मल्चिंग म्हणून विविधतेने उपयोग कराय
  • D. थंड हवामानाची काळजी घ्या:
  • अत्यंत थंडीत झाडांना प्लास्टिकने झाकून ठेवा.
  • पुरेसे ऊन मिळावे म्हणून योग्य जागेवर स्थानांतरित करा.

5. घरगुती बागकामाचे फायदे

A. ताज्या भाज्यांची खात्री: स्वतःच्या बागेत उगवलेल्या भाज्या पूर्णतः ताज्या असतात.
B. आरोग्यासाठी फायदेशीर: रसायनमुक्त आणि नैसर्गिक अन्नपदार्थ मिळवता येतात.
C. पैशांची बचत: बाजारातील महागड्या फळभाज्यांवरचा खर्च वाचतो.
D. पर्यावरणपूरक उपक्रम: घरगुती बागकामामुळे प्लास्टिक पॅकेजिंगचा वापर कमी होतो.
E. मनःशांती मिळते: बागकाम हा तणाव कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे.

6. सारांश

या हिवाळ्यात बाजारातील फुले आणि भाज्यांवर अवलंबून न राहता, तुमच्या स्वयंपाकघरातील बियाण्यांचा उपयोग करून काहीतरी वेगळं करून पहा. बागकाम शिकण्याचा आणि घरगुती ताजी Winter Gardening उत्पादने मिळवण्याचा हा उत्तम काळ आहे. आहि ह्याच दिवसात तुम्ही पोषक खाल तर येणारे सगळे तातडीचे दिवस खूप आनंदात आणि निरोगी जातील तुमचं घर, तुमचं बगीचा! हिवाळ्यातील सृष्टी सौंदर्याचा आनंद घेत बागकाम करा आणि निसर्गाशी जवळीक साधा. आणि हा हिवाळा अजून आठवणमय बनवा गच्चीवरची बाग आणि Eco Hub By Akanksha सोबत मजेत घालावा

7. एग्रीकल्चरिस्ट आकांक्षा कांबळे

8. एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक

 बियाणं म्हणजे छोटं पण अतिशय शक्तिशाली गुंतवणूक आहे. योग्य पद्धतीने केली तर, या गुंतवणुकीतून आपल्याला अनेक पटींनी अधिक उत्पादन मिळू शकतं. तुमच्याकडे जर बागकामाची इच्छा असेल तर, नक्की सुरूवात करा. उपलब्ध साधनं, संसाधनं, आणि जागा यांचा योग्य वापर करून तुम्ही तुमच्या गच्चीवर किंवा अंगणात चांगल्या प्रकारे भाज्या उगवू शकता. फक्त थोडासा प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे. बियाण्यांबद्दल सविस्तर जाणून घ्या आणि आपल्या गार्डनिंग प्रवासात भरघोस यश मिळवा.

 व्हेजेटेबल्स सिड्स लिस्ट पाहण्यासाठी क्लिक करा.

WinterGardening, #HomeGarden, #FreshVeggies, #OrganicFarming, #KitchenSeeds, #WinterVeggies, #GardenTips, #ChemicalFree, #सेंद्रियबागकाम, #ताज्याभाज्या, #स्वयंपाकघरातीलबिया, #हिवाळ्यातीलबागकाम, #घरगुतीबाग

🚀 आता पुढचा निर्णय तुमचा
👉 तुम्ही फक्त लेख वाचून बागकाम करणार?
किंवा
👉 4-in-1 Grow Organic Combo Learning Pack
(Mini Course) व्दारे शिकणार?
🔥 पुढचा स्तर:
👉 Annual Detailed Course
📲 खरेदीसाठी WhatsApp वर type करा:
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
👉 WhatsApp वर पुढे जा

Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

10 OxyGen Plants