ऑनलाईन पेड व्हेजेटेबल गार्डन क्लासेस….

online garden classes in hindi & marathi


उपलब्ध जागेत ऑरगॅनिक भाजीपाला उगवणे हे फार गरजेचे आहे. आपल्याकडे हे नाही ते नाही म्हणत आपण आरोग्याची हेळसांड करत तर नाही ना याचा खरं विचार केला पाहिजे. खरं तर आम्ही भाज्या नाही उगवत औषधे उगवतो. कारण विषमुक्त भाजी हे औषधासारखंच काम करतय. पण हे आपल्याला ते खाल्यानंतर लक्षात येते. औषधं ही कमी प्रमाणात लागतात. तसेच घरी उगवलेल्या भाज्या या औषधाप्रमाणेच कमी असल्यातरी पुरतात. तसेच त्यांचे कच्चे स्वरूपात सलाड म्हणून खाणं गरजेचं आहे.

 या संबधी वेळोवेळी प्रत्यक्ष फेस टू फेस कार्यशाळा घेण्यात येतात. पण कोरोना संसर्ग आजारामुळे हे मागील दोन वर्ष टाळण्यात आले. वेळोवेळी इच्छुकांकडून विचारणा होत असल्यामुळे गच्चीवरची बाग व्दारे  Online व्हेजेटेबल गार्डन क्लासेस स्वरूपात घेण्यात येणार  आहेत.

गच्चीवरची बागेव्दारे लवकर zoom वर vegetable Gardening consultation / class / tuition.

स्वरूपः कोंटुबिक किंवा व्यक्तिगत मार्गदर्शन

४५ मिनंटाचे एक सेशन असेल असे पाच सेशन होतील, त्यात सविस्तर पणे सहभागीला विषय समजून सांगण्यात येईल.

विषय खालील प्रमाणे असतील.

  • बाग फुलवण्यासाठीचे उपलब्ध पर्याय, त्यासाठी असलेल्या गरजेच्या गोष्टी
  • खत (द्राव्य व विद्राव्य) व खत निर्मिती आणि त्याचा वापर
  • कीड व कीडनियंत्रके बनवणे
  • बि बियाणे व त्याची लागवड ( सविस्तर)
  • इतर काळजी, महत्वाचे मुद्दे,

( प्रत्येक सत्रात आपणास पडलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिले जातील.)

सहभागी फी ही संपूर्णतः २५०० असेन. (व्यक्तिगत / कुटुंबातील व्यक्तिसाठी)

क्लासची वेळ आपल्या वेळेनुसार असेन, प्रत्येक बैठकीत मागील Follow up घेण्यात येईल.

आपल्याला पुढे वर्षभर मोबाईल किंवा व्हाट्सअप मार्गदर्शन करण्यात येईल.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. 9850569644

जिवामृत कसे बनवावे…

जिवामृतसाठी कसे तयार करावे.


खालील फोटोत दाखवल्याप्रमाणे जिवामृत बनवण्यासाठी लागणारे साहित्य वापरावे.

दोन दिवस त्यास सकाळ संध्याकाळ घडाळ्याच्या काट्या प्रमाणे एकदा व त्याच्या उलट ते फिरवावे, सावलीत ठेवावे.

एक लिटर द्रावणाला पाच लिटर पाणी टाकून कुंडीला पुरेल एवढे द्रावण द्यावे.

गाय संगोपन…


गच्चीवरील बाग फुलवता फुलवता आम्ही किचन गार्डन व त्या अनुषंगाने शेती संबधीही मार्गदर्शन करत असतो. बरेचदा विषमुक्त शेती कशी करावी या संबधी विचारणा होत असते.

शक्य असल्यास प्रत्यक्ष फार्मवर भेट देवून त्यांना सांगत असतो किंवा त्यांना दूरध्वनीवर मार्गदर्शन करत असतो. यातील नेहमीचा व कळीचा मुद्दा असतो तो म्हणजे शेती करायची तर एकादी देशी गाय पाळणे फार गरजेचे आहे. मग ती दुध देणारी नसली तरी चालेल अगदी भाकड गाय असली तरी चालेल. पण लोक नेहमी दावा करतात की आम्ही त्यांना सांभाळू शकलो नाही तर, त्यांना त्रास झाला तर, त्यांची सेवा नाही करता आली तर…

अशा मंडळीना एक सांगायचे आहे की आपण आहे त्या परिस्थितीत आपल्या आईला, वडीलांना सांभाळतोच ना. आपण जे खातो ते पण तेच खातात. आपण जेथे राहतो तेथेच ते पण राहतात. त्यावेळेस आपण म्हणतो का की त्यांची सेवा करता येत नाही म्हणून त्याची वृध्दाश्रमात पाठवणी करतो. नाही ना.. कारण ते आपल्याजवळ अधिक आनंदी व सुखी असणार आहेत.

तसेच गायीचे आहे. तुम्ही आहात तसे आहे त्या परिस्थितीत त्यांना सांभाळा तुम्हाला शक्य होईल तेवढी सेवा करा. खूप काही खर्चाची गरज नाही. कारण आज त्यांना सांभाळू शकलो नाही तर ती उद्या कत्तल खाण्यात जाणारचं आहे. त्यांना दत्तक घेवून होईल तेवढी सेवा करायची हे योग्य की त्यांना दत्तक न घेताच वार्यावर सोडणे योग्य. ते तुम्हीच ठरवा. अर्थात गो पालन तुम्हाला कोणतेही उत्पन्न नको असेल तरी करू शकता पण शेती असेल तर नक्की करा. मग ति रासायनिक असो की विषमुक्त शेती. कारण गायीचे शेण व गोमुत्र हे जमीनीच्या स्वास्थासाठी फार गरजेचे आहे. तिच्या चारापाण्याचा होणारा खर्च हा सहजतेने तिच्या शेण व गोमुत्रातून निघू शकतो एवढी ती लाभदायी असते. थोडक्यात परवडत असते. मग आणखी काय हवयं.

गायीला काय लागते. दोन वेळेस चारा पाणी, एक डोक्यालर सावली मिळावी म्हणून छप्पर असलेला गोठा व स्वच्छ जागा. शक्य असल्यास गुंठा दोन गुठ्यांची मोकळी जागा. रात्रनिवासासाठी तिचा गोठा हा जागा योग्य उतार देवून सिमेंटचा कोबा केलेला असावा. त्यांना मातीच्या गोठ्यात ठेवू नका. कारण चिखलात तिच्या पायाला इजा होण्याची शक्यता असते. आजही आदीवासी भागात महिना महिना पाऊस चालू असतो तेव्हा त्यांना गोठ्यात बांधून ठेवतात. वरून छप्पर गळके असते. त्यात खाली चिखल शेण, मुत्राचा चिखल असतो. शक्यतो असे टाळा. गोठ्याची जमीन ही हजार बाराशे पेक्षा अधिक खर्च येत नाही. तसेच छप्परसाठीही एवढा खर्च येत नाही. फक्त ईच्छा शक्ती हवी. गायीचा गोठा कसा करायचा या बद्दल तुम्हाला फोनवर मार्गदर्शन करू. शहरात असाल तर गायीसाठी चार्यांचा संग्रह करायची गरज नाही. त्यांच्यासाठी उसाची कुट्टी मिळते. घरचा भाजीपाल्याच्या काड्या मिळतात. नाहीच मिळाल्यातर फळांच्या दुकानावरची फळे, भाजीपाल्याच्या दुकानावरचा भाजीपाला मिळतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या. त्यांना चौरस आहार कसा मिळेल याचा विचार करा. जे उपलब्ध आहेच तेच भरवू नका. त्यात समतोल असला पाहिजे. गायीसाठी धान्यांचे कुट्ट्यारही मिळते. ज्यात गव्हाचा कोंडा, तुरीचा भूसा, कापसाची पेंड, शेंगदाणा ढेप मिळते. त्यांचाही वापर करा.

आपल्याकडे शेती असेल तर बघायलाच नको. मका, घास, भूईमुग, मूगाचा पाला, उगणारे गवतही त्यांचासाठी खाद्य म्हणून वापरता येते.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

आम्ही खालील मो. क्रंमाकावरून व्हाट्सअपवर गार्डेन अपडेटस पाठवत असतो.

8087475242 व 9850569644 या दोनही क्रमांकावर वेगवेगळे अपडेटस देत असतो. आपल्याला हे अपडेट्स मिळतात ना याची खात्री करा व संपर्कात रहा.

शेतीचे प्रकार किती…


विषमुक्त शेती करायची म्हणजे शेती नेमकी काय आहे. ति कितीप्रकारे केली जाते. हे सांगणारा हा व्हि़डीओ.

बियाणांची लागवड कशी करावी.

परसबागेत बियाणांची लागवड कशी करावी याबद्दल बरेचदा माहिती नसते. ति कशी करावी, किती अंतरावर करावी यासाठी लेखात माहिती दिली आहे.


परसबागेत बियाणांची लागवड कशी करावी याबद्दल बरेचदा माहिती नसते. ति कशी करावी, किती अंतरावर करावी यासाठी लेखात माहिती दिली आहे.

पालेभाजीः

पालक व आंबट चुकाः  पालक ही पालेभाजी आहे. पालेभाजींना चार इंच खोलीची जागा पुरेशी असते.

पालक ही एका चौरस फूटांत पाच ठिकाणी लाव्याव्यात. एका ठिकाणी दोन बिया चिमटीत घेवून पेरभर मातीत पेराव्यात. आंबट चुका ही पालकासारखीच दिसणारी भाजी आहे. याची चव मात्र आंबट असते. शिवाय ही जमीनीलगत पसरट वाढते.

धने व शेफूः धने व शेफू ही पालेभाजी आहे. यासही चार इंच खोलीची जागा पुरेशी आहे. एका चौरस फूटाला चार चार बोटांच्या अतरांवर लागवड करावेत. एका चिमटीत पाच पाच बिया घेवून त्यांची पेरभर मातीत बिया रूजवाव्यात.

लाल माठ व हिरवा माठः लाल माठ हिरवा माठाचे बियाणे हे आकाराने बारिक असते. यांची उंची ही २-३ फूट एवढी वाढत असते. पालेभाजी हवी असल्यास एका चौरस फूटांला चिमटी भर बियाणे घेवून ते मातीवर जेवणावर मिठ टाकल्या सारखे चौफेर विखरून द्यावे. मातीखाली दाबायची गरज नाही.

धान्य वर्गीय बियाणे...

ज्वारी, बाजरी, मकाः मका हे धान्य वर्गीय असते. योग्य पोषण मिळाल्यास त्यास पेरा पेरावर कणीस धरले जातात.

मक्यास चार इंच खोलीची जागाही पुरेशी असते. किंवा गच्चीवरच बाग संशोधीत एरो ब्रिक्स बेड मधेही लागवड करता येते. मक्याचे बि हे एका चौरस फूटाला दोन दोन लागवड कराव्यात. बागेत ज्वारी, बाजरी लागवड करतांना एका चौरस फूटाला चार चार बियाणे पेरावेत.

वेलवर्गीय बियाणेः डांगर, वाल, दोडके, गिलके, दुधी भोपळा, कारले, चवळी, काकडी या प्रकारच्या  वेलवर्गीय बियाणे हे चार इंच मातीच्या खोलीत अथवा एरोब्रिक्स बेडमध्ये उत्तम प्रकारे येतात.  वेलाची वाढ छान होते. कारण त्यास पसरट जागा लागते. एका जागेवर शक्यतो २-२ बिया पेराव्यात. यांची रोपे तयार करण्याची गरज नसते. तसेच यास नर्सरी बॅग्ज मधे बियाणे लागवड करून रोपे  वाढवावीत. अशी रोपे वाढलेली  बॅग बेड अथवा जमीनीवर ठेवून दयाव्यात. म्हणजे मूळ ही तळापासून बाहेर येवून खालील मातीत वाढतात. डांगर ही जमीनीवर पसरणारी वेल आहे. फळ जड असल्यामुळे त्यास मांडावर पसरवणे जरा आव्हानात्मक असते. पण मांडवावर चढवल्यास फळास हवेशीर टोपली बांधावी. म्हणजे फळाला आधार मिळून ते चांगले वाढते.

कंदमुळे ः मूळा, बिट या सारखी कंदवर्गीय बियाणे ही चार ते सहा इंचाच्या अंतरावर लागवड करावीत.

एका चौरस फूटालां चार बियाणांची लागवड करावी. यात शक्यतो एक- एक बियाणे टोकावे. म्हणजे कंदमुळांना वाढीस वाव मिळतो.

गाजर हे जमीनीवर विखरून टाकावे. त्यास मातीमधे मिक्स करावे.  काही रोपे दाटीवाटीने आल्यास त्यांना विरळ करून घ्यावे. जमल्यास दुसरीकडेही त्याची लागवड करता येते.

बटाटेः छोटे आकारातील बटाट्यांची निवड करावी. शक्यतो ज्यास डोळे आले आहेत असे निवडावेत. अखंड लावावेत. किंवा मोठ्या आकारातील असल्यास त्याचे चार भाग काप करावेत. कापलेला भाग जमिनीत एक इंच खोल गाडावा.

कांदापातः काद्याची पात मिळवण्यासाठी पात आलेले जुनाट कांदे लागवड करू शकता.  मध्यम आकाराचे किंवा मूठीत बसेल एवढ्या आकाराचे कांदे हे लागवड करता येतात.  शक्यतो छोटे कांदे लावणे टाळावे. कांद्याचे मूळ हे जमीनीकडे असावे. कांद्यावर एक- दोन इंच माती येईल या स्वरूपात तो मातीत लागवड करावा.

लसूणपातः लसणाची पात घरच्या घरी पिकवता येते.  अखंड लसणाच्या एक – एक पाकळी मोकळी करावी. त्याचे मूळ हे जमीनीकडे ठेवूनच त्यास मातीत एक इंच टोकावे. शेंडा वरील बाजूस राहील याची काळजी घ्यावी.

झुडूप वर्गीय पालेभाज्याः

करडई, आंबाडी ही २-३ फूटांपर्यंत वाढणारी भाजी आहे. याचे लागवड ही एका चौरस फुटाला चार बियाणेंच लावावेत. शक्य झाल्यास एक – एक बियाणे लावल्यास झाडांची योग्य वाढ होवून त्यातून भरपूर पालेभाजी मिळते.

मोहरीः मोहरी ही पालेभाजी आहे. एका चौरस फूटाला चार ठिकाणी एक एक बियाणे मातीवर टाकावे.. अथवा त्यास परसरून द्यावे.

चाकवतः चाकवत हे बियाणे मोहरी सारखे बारिक असते. यासही एका चौरस फूटाला चिमटीत बसेल एवढेच बियाणे वर वर टाकावे.

फळ व फूल भाज्याः मिरची वांगे, टोमॅटो, फ्लावर, कॅबेजः यांची बियाणे मातीत पेरावीत, रोपे साधारण एक बोटा एवढे उंच झाल्यावर त्यांची  दुसर्या जागेवर पुर्नलागवड करावी. यांची लागवड ही एका चौरस फूटाला एक एक रोप मध्यभागी लागवड करावी. व त्याच्या आजूबाजूला पालेभाजींच्या बियाणांची लागवड करता येते.

भेंडी व गवारः हे फळवर्गीय भाज्या आहेत. यांच्या एक एक बियाणे हे एका चोरसफूटाला चार बाजूला चार व मध्यभागी एक अशा पाच बियाणांची लागवड करावी.

बियाणे लागवडी बद्दलची काही सुवर्णसुत्रेः

वेलवर्गीय बियाणे हे जमीनीला समांतर मातीखाली टोकावे. साधारणतः एक इंच आतमधे म्हणजे पेरभर जमीनीत राहिल याची काळजी घ्यावी. बारिक बियाणे असल्यास त्यास मातीवर पसरावे.

कोणतेही बियाणे हे सात ते पंधरा दिवसात उगवून येते. उगवून न आल्यास त्याची दुबार पेरणी करावी.

तण व बियाणांची सुरवातीची वाढ लक्षात नाही आल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा. बियाणे उगवून येण्यास वाफस्याची गरज असते. अधिक व संततधार पावसात काही बियाणे रूजवून येत नाही.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

भाजीपाला उगवण्याची ही पध्दत फार उपयोगी | गच्चीवर असावी सुंदर भाजीपाल्याची बाग | Roof Top Farming


रताळी , एकदा कच्ची खाल्ली तर भूक लागणार नाही | Health Tips | Sweet Potato | शक्करकंद


गच्चीवर रताळी लागवड करणे सहज सोपे आहे. आरोग्यदाय़ी, भूक शमवणारे, तंतूमय पदार्थात उच्च स्थान असलेले तसेच जमीनीची उत्पादन क्षमता वाढणारी वनस्पती आपल्या प्रत्येकाच्या गच्चीवर असलीच पाहिजे. रताळी सेवनाचे फायदे, त्याची लागवड व काळजी विषयी…

organicfood | terracefarming | Sandeep Chavan | A Organic Vegetable Farmer | Special Story @ InstaFarm


ScrappyNewsService | goodfood | Rooftop Organic Gardening | Good Food | Scrappy News


%d bloggers like this: