माती वाचवूया.. वंसुधरेला सजवू या

विशेष

ही पृथ्वी समस्त जिवांचे पालनपोषण करू शकते पण एका व्यक्तिचा लोभ पूर्ण करू शकत नाही. – महात्मा मो.क.गांधी

नुकताच वसुंधरा दिन साजरा झाला. वसुंधरेला बहूप्रसवा सुध्दा म्हणतात. कणाकणातून ति अन्नांची, जिवांची निर्मिती करत असते. पण सो कॉल्ड हुशार माणसाने या सर्वांचा जवळपास सत्यानाश करून टाकलाय. सगळीकडे जंगल तोड, मोजक्या झाडांची पूर्नलागवड. वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे, वाढत्या औद्योगीकीरणामुळे घटत चाललेले शेती क्षेत्र. या सर्वांचा परिपाक म्हणजे वाढते तापमान. आपल्याला काय पुढील पिढीलाही काय चाललय हे कळेनासं झालयं. ज्यांना कळतंय त्यांना वळत नाही. वळालं तर सातत्यता नाही.

वसुंधरा जैसे थे होणे अशक्य आहे. पण त्याला वेळीच उपाय नाही केला तर मागे फिरणे शक्य नाही. बरे पुढेच जायचे म्हणजे कडेलोटच आहे. एकप्रकारे ठरवून केलेली आत्महत्या होय. या सर्वांचे कारण म्हणजे प्रदुर्षीत होत चालेली माती. आपल्याला कसे सर्व इंस्टंट हवेय. तूप खाल्ले की रूप आले पाहिजे. इनपुट दिले की लगेच आऊटपूट पाहिजे. या सार्या हट्टहासापायी आपण मातीचा पोत, मातीची सुपिकता गमावत आहोत. हे झाले अनैसर्गिक खते वापरामुळे तर होतच आहे. पण औद्योगीकीरण, रोजच्या जिवनात वापरले जाणारे विविध रसायने यामुळे पाणीही प्रदुर्षीत होत आहे. ते मातित मिसळले की मातीही खराब होते. मातीतील आपण प्रदुर्षण रोखले तर धरणीमाता बहुप्रसवा गुणधर्मानुसार ति तिचे पूर्नजिवन नक्कीच करू शकते.

मानवी वस्त्या या सुपिक जमीनीच्या लगत वसत गेल्या वाढत गेल्या. आता सुपिकता फक्त अमेझॉनच्या खोर्यातच पहायला मिळेल. कारण आज तिथे तरी मानवी हस्तक्षेप फार कमी आहे. पूर्वीतर ही सुपिक माती सर्वत्र रहात होती. त्यातून अनेक जिव तयार होत होतेच. शिवाय त्यांच्या संगोपनासाठी अन्नही ही मातीच तर तयार करत होती. अर्थात अन्न मिळवण्यासाठी संघर्ष हा प्रत्येक जिवाला करत लागत होता. आहे.. पण किमान अन्न तरी उपलब्ध होते. आज अन्नच काय पाणी मिळणे सुध्दा दुरापास्त झालेय. कारण ते पुरवणारी नैसर्गिक व्यवस्थाच ऑक्सीजनवर आली आहे.

माती सुपिक असली तर नैसर्गिकरित्या पडणार्या पावसाच्या पाण्याचे व्यवस्थितरित्या जिरते. पाण्याला योग्य गती असली की तिच्या सहयोगाने जिवसृष्टी हिरवीगार होऊ लागते. उघडे बोडके डोंगर, टेकड्या, डांबरट रस्ते यामुळे आता पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले. बदाबदा पडणारा पाणी न साचता, झिरपता वाहून जाते. पर्यायाने पूरसुध्दा येतो.

आज शेतात, घरपरिसरात, गच्चीवर माती सुपिक कशी बनेल याच्या जर उपाययोजना केल्या तर नक्कीच आपण पाणी जिरवू शकतो. माती सुपिक बनवण्यासाठी जमिनीवर जास्तीत जास्त पालापाचोळ्याचे आच्छादन द्या. कुंड्या भरण्यासाठी पालापाचोळा किंवा त्याचा चुरा (बिशकॉम) वापरा. मातीतील सुक्ष्मजीव वाढीस पोषक वातावरण तयार करा. मातीत कोणतेही रसायने मिसळू नका. कारण त्यांच्या वापरामुळे सुक्ष्मजीव हे मरून जातात. पर्यायाने माती ही निर्जीव होते. माती निर्जिव झाली की झाडं, रोपं उगत नाही. पर्यायाने त्यावर अबलंबून जिवांचे अन्न तयार होत नाही.

सुपीक मातीची लक्षणे पुढीलप्रमाणे समजून घेता येतील.

पूर्वी गर्भारपणात शेतातील काळी माती ही खाल्ली जायची. जखम झाली की त्यावर माती चोळली जायची. तसेच मातीनेच बरेच त्वचारोग हे बरे केले जायचे ज्याला मडबाथ असे म्हणतात. गांजली माशी चावली की त्या आग होणाऱ्या त्याच्यावर तुळशी खालची माती वापरली जायची. कारण असे सुपीक माती मध्येच उपकारक असे सूक्ष्मजीव असायचे जे आपल्याला आरोग्यासाठी उपयोगी ठरत असत. गावाकडे वळवाचा पाऊस पडला की सुगंध यायचा, तो सुगंध आपण हरवून बसलो आहोत पण आता मातीची प्रदूषित झाल्यामुळे अनेक गोष्टींवर बंधने आलेले आहेत आणि त्याचे दुष्परिणाम पण जाणवत आहेत.

चला तर मग माती वाचवूया.. वंसुधरेला सजवू या…

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

9850569644 / 8087475242

www,gacchivarchibaug.in

बियाणे उगवून येण्याची न येण्याची कारणे


बियाणे उगवून येण्याची न येण्याची कारणे

बियांना संदर्भात बर्याच समज गैरसमज आहेत. या लेखातून तो काही अंशी दुर करण्याचा प्रयत्न करणार आहे.

बिज हे निसर्गाचे अमुल्य अशी सुक्ष्म रूपातील ठेव आहे. ज्याला आपण निसर्गाचा अंश म्हणू शकतो अथवा त्या त्या वनस्पतीचा वंश म्हणू शकतो.

बियाणे कोणतेही असो त्या संबधी बरेच समज, गैरसमज व प्रश्न पसरलेले आहेत.

समज गैरसमज व प्रश्न आहेत ते बघू या..

 • बियाणे वर्षभरांनंतर उगवेल का… अर्थात बियाणे जिंवत आहे की मृतवत…

हा समज काही अंशी खरा आहे… पण तो सर्वच बियाणांसंदर्भात लागू होत नाही. जे बियाणे वजनाला हलके व आकाराला मोठे असते. असे बियाणे हे बराच काळ एकाच ठिकाणी संग्रहीत असेल तर त्या ठिकाणी तेथील ओलावा, दमटपणामुळे त्या बियाणांमधे सुम्क्ष जिवाणूं आतून पोखरण्याची शक्यता असते. उदाः आपण ठेवणीतले कापड हे कालांतराने विरते. हे तर बियाणे आहे. अर्थात ते कुणाचेतरी अन्न आहे.  तसेच बियाणांवर बुरशी येते. काही कालांतराने पोचट होतात, कुजतात. काही बियाणांची वरील साल नाजूक असल्यामुळे गळून जाते. या सार्यांचा परिणाम हा बियाणे रुजण्यावर होत असतो. त्यामुळे ते बियाणे कोणत्या पिरस्थितीत, कुठे व कसे ठेवले आहे. त्याच्यावर काय परिणाम झाला आहे. हे पेरल्यानंतर ते उगवते की नाही हे करून पाहिल्यावरच लक्षात येते.

 • जे बियाणे पाण्यावर तंरगते ते बियाणे खराब…

हो बियाणे निवडी संदर्भात ही अट वापरली जाते. पण बियाणेंच जर निसर्गतः हलके असेल म्हणजे कोमट किंवा गरम पाण्याच्या घनतेपेक्षा त्याची घनता कमी असेन तर बियाणे जिवंत, ताजे असूनही ते तंरगणारच… उदाः आंबट चुका.. खुरसणी,

 • गावरान बियाणे चांगले…व उगवण क्षमता उत्तम असते.

गावरान बियाणे चांगलेच असते. पण नागपूरचे बियाणे हे नाशिकला पूर्णत ( Germination Rate)  व सर्वच बियाणे उगवणार नाही. कारण खुल्या आकाशात (Open Pollination)  वाढवले असल्यामुशे त्यास त्या त्या भौगोलिक जैवविविधता, तेथील तापमान, तेथील पिकाला दिला गेलेला पाण्याचा ताण, पाण्याची प्रतवारी तेथील शत्रु किंवा मित्र किटकांचा सहवास, त्याचे परागीभवन, तेथील रासयनिक खताचा वापर या सर्वाचा त्या त्या बियाणांवर परिणाम होत असतो. जसे की आईच्या पोटातल्या बाळावर त्या त्या परिस्थितीनुरूप, वातावरणानुसार परिणाम होतो आणि महत्वाचे म्हणजे आईची मानसिकता यावर गर्भावर संस्कार ठरत असतात. तेच बियाणंबाबत होत असते. त्यामुळे गावरान बियाणांचा हट्टहास हा चालत नाही.

बियाणे पेरणे हा प्रयोग आहे.. आम्ही परसबागेत बिया पेरतांना नेहमी एक सुत्र सांगतो ते म्हणजे बियाणे रूजण्यासाठी मातीचा पोत, मातीतील ओलावा, त्यातील वाफसा, उष्मा, उबदार पणा, बियांणाची गुणवत्ता, त्याच्या मागील पिढ्यांवर झालेली प्रक्रिया यावर बियाणे उगवून येत असते. त्यामुळे बियाणे हे सात ते पंधरा दिवसात नाही उगवून आले तर दुबार पेरणी करणे गरजेचे असते.

हायब्रिड बियाणे वाईटच… पण सर्वार्थाने नाही….

हाईब्रिड बियाणे हे वाईटच आहे. पण जेनेटिक पेक्षा बरे आहेत. आणि बियाणे हे कोणतेही असो त्याला दिले जाणारे खत पाणी हे जर नैसर्गिक, सेंद्रीय असेल तर त्याचे उत्पादन हे चांगले, खात्रीशीर असतेच. शिवाय त्याची चव सुध्दा अप्रतिम असते. हायब्रिड बियाणे हे त्या त्या वातावरणाला अनुकूल तरी असते. किंवा त्यावर त्या प्रकारे संस्कार केलेले असतात. त्यामुळे या बियाणांची रूजवण क्षमता चांगली असते.

बियाणे लाल, हिरव्या रंगाचे का असते….

बियाणांना कीड लागू नये म्हणून त्यावर हिरव्या किंवा लाल रंगाचे रसायनाचे आवरण दिलेले असते. तसेच बियाणांमधील फरक ओळखण्यासाठी सुध्दा रंगाचा वापर करण्यात येतो. उदाः पालक व बिट यां बियांणामधील फरक लवकर ओळखू येत नाही. अशा वेळेस बिट या बियाणांस लाल रंग दिलेला असतो.

घरातील बियाणे उगवून येत नाही…

घेतले बियाणे लावले की उगवेन या भ्रमात राहू नका. याची नक्की काहीच खात्री नसते. उदाः घऱातील मेथी, धने हे येतीलच याची शाश्वती नसते. कारण घरी वापरले जाणारे मेथी व धने व बियांणासाठी तयार करण्यात आलेले मेथी व धने यात जमीन अस्मानचा अंतर असते. ते कसे पाहूया…

जे किराणा दुकानात विकले जाते ते फक्त धान्य असते. एका फ्लॉटवर मेथी लावली आहे. त्यातील वाढीची अवस्था ही वेगवेगळी असते. त्यात बिज म्हणून पूर्णत वा अंशतः वाढ झालेली मेथी आहे. ती घरगुती वापरासाठी विकली जाते. पण बियांणासाठी असलेला मेथीचा प्लॉट हा पूर्णतः बिज तयार होई पर्यंत शेतातच असते. शिवाय बियाणांसाठी तयार केलेले बियाणांना वेगवेगळी चाचणी, चाळणी केली जाते. त्याची प्रतवारी ठरवली जाते. त्यामुळे आपल्याला बियाणे हे शंभर रू. किलो ही असते तर त्याच प्लॉटमधील तेच बियाणे पण उत्तम प्रकारचे बियाणे हे हजार रू. किलो ही असते.

महागडे  बियाणे आणले तरी त्याची प्रतवारी तयार करा…

बाजारात एकाच कंपनीचे, एकाच वजनाचे विस ते दोनश रूपयांपर्यत बियाणे मिळते. ते घरी आणले, बागेत लावले तरी सर्वच उगवणार नाही. त्याची आकारानुसार प्रतवारी तयार करा. चांगले असलेले बियाणे पेरा. म्हणजे शंभर टक्क उगवण क्षमता मिळेल.

आता या परिस्थितीत यावर उपाय काय…

 • वर सांगितल्या प्रमाणे बियाणे हे सात ते पंधरा दिवासांनी पुन्हा लागवड करणे.
 • बिज संस्कार करणे. ( गो ईत्र पाणी, कोमट दूध पाणी, सकाळी पाण्यात भिजवणे इ.)
 • बियाणांची योग्य वातावरणात रोपे तयार करणे व त्याचे दुसर्या जागेवर पुर्नलागवड करणे.
 • बियाणे हे लागवड करून पहाणे हा शेवटचा पर्याय आपल्या हातात असतो. त्याला काहीही पर्याय नाही.

या सर्वामधे निसर्ग कसा चमत्कार करेन याचा नेम नाही. आपला आजपर्यंत सारा अभ्यास, निष्कर्ष, अनुभव फोल ठरवण्याची क्षमता त्यात आहे. या संदर्भात

काही अनुभव सांगतो. एका घरी भाजीपाल्याची बाग फुलवत होतो. ताईंनी घरातील धने आणून दिले. आम्ही ते छान भरडून व्दिदल करून लावले. कालांतराने मूठभर बियाणांत चार पाच बियाणे उगवून आले. त्यानंतर बियाणे खराब आहे म्हणून ते मातीत फेकून दिले तर शंभर टक्के त्याची उगवण झाली. भेजा फ्राय झाला… येथे निष्कर्ष निघतो की उगवण्यासाठी योग्य वेळेची, तापमानाची, पाणी देण्याची गरज असते. त्यावर योग्य त्या जाडीच्या मातीचा थर देणेही गरजेचे असते.

एकदा… सारखच बियाणं आम्ही पंधरा दिवासाच्या अंतराने एकाच वाफ्यात लागवड केली. पंधरा दिवस आधी केलेले बियाणांची रोपे खुरटली होती. तर पंधरा दिवसांनी लागवड केलेल्या भेंडीच्या बियाणांची रोपे नंतर खांद्या पर्यंत पोहचली होती.

एकदा एका ठिकाणी गच्चीवरील बाग फुलवतांना त्या ताईनी बटाटे लावले. बटाटे दोन तळहातवर मावणार नाही असे मोठे होते. त्याचे चार तुकडे केले. मातीत लावले. चार महिने पाणी देवूनही ते होते तसेच होते. याचे कारण म्हणजे ते बटाटेच रासायनिक खतांवर तयार केलेले होते.

घरच्या बियाणांचे उत्पादन कमी होत गेले…

गच्चीवरची बाग फुलवंताना आम्ही गावरान बियाणांचा आग्रह धरत होतो. नेमाने काही वर्ष वाल, चवळी, भेंडी यांची बियाणे करत असे व पेरत असे. पण लक्षात आले की वर्षागणीक त्याचे उत्पादन कमी कमी होत गेले. याचा अर्थ बियाणे हे घरचे असले तरी त्यास शेतातील, जंगलातील, पंचक्रोशीतील जी काही बहुजैवविविधता गरजची असते ती आपल्याला पुरवता आली नाही. शिवाय दिवंसेदिवस वातावरणात वाढत जाणारी सुक्ष्म धुळ, धुलीकण हे सुध्दा बियाणांच्या परिपक्कवतेवर, त्याच्या उपजकतेचवर परिणाम करणारी ठरत आहे. उदाः वाढता रासायनिक अन्नाचा परिणाम हा पुरूषांच्या शुक्राणू व स्त्रीयांच्या स्त्री बिजांडावर परिणाम होताना दिसत आहेत. व त्याचा अंतीम परिणाम म्हणजे आपल्याकडील मुल आता चायनिज (कार्टून) दिसू लागली आहेत. असो.. त्याचा आणखी एक परिणाम म्हणजे आता प्रत्येक शहरात कृत्रीम गर्भधारणा करणारी सेंटर्स वाढलेली दिसतात.

असे अनेक गोष्टींचा बियाणांसंदर्भात अनुभव येत असतो. तसेच आपल्या कुंडीतील माती, मातीचा पोत, त्यातील वाफसा, खेळती हवा, पाण्याचे केलेले सिचंन याचाही परिणाम होतो. परिणामी बियाणे रूजत नाही.

तरीही माघार घ्यायची नाही. बियाणे पेरत रहाणे हा एकच पर्याय आपल्या हाती असतो. तेव्हां लगे रहो..

8087475242 व 9850569644 या दोनही क्रमांकावर वेगवेगळे अपडेटस देत असतो. आपल्याला हे अपडेट्स मिळतात ना याची खात्री करा व संपर्कात रहा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

गाय संगोपन…


गच्चीवरील बाग फुलवता फुलवता आम्ही किचन गार्डन व त्या अनुषंगाने शेती संबधीही मार्गदर्शन करत असतो. बरेचदा विषमुक्त शेती कशी करावी या संबधी विचारणा होत असते.

शक्य असल्यास प्रत्यक्ष फार्मवर भेट देवून त्यांना सांगत असतो किंवा त्यांना दूरध्वनीवर मार्गदर्शन करत असतो. यातील नेहमीचा व कळीचा मुद्दा असतो तो म्हणजे शेती करायची तर एकादी देशी गाय पाळणे फार गरजेचे आहे. मग ती दुध देणारी नसली तरी चालेल अगदी भाकड गाय असली तरी चालेल. पण लोक नेहमी दावा करतात की आम्ही त्यांना सांभाळू शकलो नाही तर, त्यांना त्रास झाला तर, त्यांची सेवा नाही करता आली तर…

अशा मंडळीना एक सांगायचे आहे की आपण आहे त्या परिस्थितीत आपल्या आईला, वडीलांना सांभाळतोच ना. आपण जे खातो ते पण तेच खातात. आपण जेथे राहतो तेथेच ते पण राहतात. त्यावेळेस आपण म्हणतो का की त्यांची सेवा करता येत नाही म्हणून त्याची वृध्दाश्रमात पाठवणी करतो. नाही ना.. कारण ते आपल्याजवळ अधिक आनंदी व सुखी असणार आहेत.

तसेच गायीचे आहे. तुम्ही आहात तसे आहे त्या परिस्थितीत त्यांना सांभाळा तुम्हाला शक्य होईल तेवढी सेवा करा. खूप काही खर्चाची गरज नाही. कारण आज त्यांना सांभाळू शकलो नाही तर ती उद्या कत्तल खाण्यात जाणारचं आहे. त्यांना दत्तक घेवून होईल तेवढी सेवा करायची हे योग्य की त्यांना दत्तक न घेताच वार्यावर सोडणे योग्य. ते तुम्हीच ठरवा. अर्थात गो पालन तुम्हाला कोणतेही उत्पन्न नको असेल तरी करू शकता पण शेती असेल तर नक्की करा. मग ति रासायनिक असो की विषमुक्त शेती. कारण गायीचे शेण व गोमुत्र हे जमीनीच्या स्वास्थासाठी फार गरजेचे आहे. तिच्या चारापाण्याचा होणारा खर्च हा सहजतेने तिच्या शेण व गोमुत्रातून निघू शकतो एवढी ती लाभदायी असते. थोडक्यात परवडत असते. मग आणखी काय हवयं.

गायीला काय लागते. दोन वेळेस चारा पाणी, एक डोक्यालर सावली मिळावी म्हणून छप्पर असलेला गोठा व स्वच्छ जागा. शक्य असल्यास गुंठा दोन गुठ्यांची मोकळी जागा. रात्रनिवासासाठी तिचा गोठा हा जागा योग्य उतार देवून सिमेंटचा कोबा केलेला असावा. त्यांना मातीच्या गोठ्यात ठेवू नका. कारण चिखलात तिच्या पायाला इजा होण्याची शक्यता असते. आजही आदीवासी भागात महिना महिना पाऊस चालू असतो तेव्हा त्यांना गोठ्यात बांधून ठेवतात. वरून छप्पर गळके असते. त्यात खाली चिखल शेण, मुत्राचा चिखल असतो. शक्यतो असे टाळा. गोठ्याची जमीन ही हजार बाराशे पेक्षा अधिक खर्च येत नाही. तसेच छप्परसाठीही एवढा खर्च येत नाही. फक्त ईच्छा शक्ती हवी. गायीचा गोठा कसा करायचा या बद्दल तुम्हाला फोनवर मार्गदर्शन करू. शहरात असाल तर गायीसाठी चार्यांचा संग्रह करायची गरज नाही. त्यांच्यासाठी उसाची कुट्टी मिळते. घरचा भाजीपाल्याच्या काड्या मिळतात. नाहीच मिळाल्यातर फळांच्या दुकानावरची फळे, भाजीपाल्याच्या दुकानावरचा भाजीपाला मिळतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या. त्यांना चौरस आहार कसा मिळेल याचा विचार करा. जे उपलब्ध आहेच तेच भरवू नका. त्यात समतोल असला पाहिजे. गायीसाठी धान्यांचे कुट्ट्यारही मिळते. ज्यात गव्हाचा कोंडा, तुरीचा भूसा, कापसाची पेंड, शेंगदाणा ढेप मिळते. त्यांचाही वापर करा.

आपल्याकडे शेती असेल तर बघायलाच नको. मका, घास, भूईमुग, मूगाचा पाला, उगणारे गवतही त्यांचासाठी खाद्य म्हणून वापरता येते.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

आम्ही खालील मो. क्रंमाकावरून व्हाट्सअपवर गार्डेन अपडेटस पाठवत असतो.

8087475242 व 9850569644 या दोनही क्रमांकावर वेगवेगळे अपडेटस देत असतो. आपल्याला हे अपडेट्स मिळतात ना याची खात्री करा व संपर्कात रहा.

पुदीना लागवड कशी करावी. Mint PLANTATION at home


पुदीना लागवड

पुदीनी तोंडाला चव आणणारी स्वादिष्ट वनस्पती आहे. तिच्या बहुविध गुणांमुळे तिचा समावेश हा भारतीय व्यजंनामधे जाणीव पूर्वक केला गेला आहे. पुदीना ही तापहारी वनस्पती आहे. त्यामुळे त्याचा वापर ताज्या भाजीत केला जातोच शिवाय त्याची चटणी सुध्दा केली जाते. ताप आल्यास त्याचा विविध प्रकारच्या काढ्यामधे त्याचा उपयोग केला जातो. किंबहूना त्याचा रस हा तळहाताला व तळपायांना सुध्दा लावला जातो.

पुदीना ही वनस्पती ही कमी पाण्यावर येणारी, भूआच्छादन करणारी थोडक्यात जमीनीवर पसरणारी वनस्पती आहे. शिवाय ही ड्रयूप होणारी ( लोबकळणरी) वनसप्ती सुध्दा आहे.

गोलाकार पसरट कुंड्या, पाण्याच्य बाटल्या, जमीनीवर त्याची लागवड केली जाते. पुदीनाला बाजारात प्रचंड मागणी आहे. पुदीना शेती ही रोकड मिळवून देणारी शेती आहे. त्याचा खाद्य पदार्थामधे होणारा वापर लक्षात घेता त्यास हॉटेलींग लाईन मधे प्रचंड मागणी आहे.

त्याचा मागणीचा विचार करता शेतकरी रसायने टाकून त्याचे उत्पादन वाढवतात पण रसायनांमुळे त्याची चव ही पाणचट तर होतेच. शिवाय त्याचे औषधी गुणधर्म सुध्दा कमी होतात.

त्यामुळे घरचा पुदीना हा चवदार, तिखट व औषधी गुणांनी समृध्द असतो. त्यामुळे त्याला घरीच लागवड करणे हे नेहमीच फायद्याचे ठरते.

पुदीनाची घरीच लागवड कशी करावी….

बाजारातून आणलेली पुदीण्याची जुडी निवडून घ्यावी. त्यातील आगपेटीच्या काडी एवढी जाड असलेली काडी ही पूर्नलागवडीयोग्य असते. अशा काड्यानां आपण खतयुक्त मातीत मातीला समातंर अशी अर्धी माती अर्धी आकाशाकडे लागवड करू शकता. या काड्या बोटा एवढ्या लांबीच्या असाव्यात. या काड्यांना छोचे केसतंतू सारखे मुळ्या सुध्दा असतात. असा मुळया असलेल्या काड्या रूजवण्यासाठी उत्तम ठरतात.

बरेचदा या काड्या बशीमधे चार पाच दिवस ठेवल्यास त्यास पांढर्या मुळ्या फूटतात. अशा मूळ्या फूटलेल्या काड्य मातीत लावाव्यात. काही दिवस कुंडी सावलीत ठेवावी. ( पुढे लेख वाचा)

बरेचदा पुदीण्याची पाने ही आखडली जातात. त्यास मुरडा पडणे असे म्हणतात. यासाठी या कुंडीला रिपॉटींग करणे गरजेचे असते. वरील रोग येण्याची दोन कारणे आहेत.

 • कुंडीला पाणी जास्त होते आहे हे लक्षात घ्यावे
 • कुंडीतील पाण्याचा निचरा योग्य तर्हेने होत नाही.

पुदीण्याची पाने मोठी होण्यासाठी नेहमी त्यास जमीनीपासून दोन इंच उंचीवर कापणी करत रहावी. म्हणजे नव्याने येणारे धुमारे हे गतीने वाढतात. तसेच पानांचा आकार वाढतो.

पुदीण्याला तुम्ही शित पेयांच्या बाटलीतही लागवड करू शकता. या बाटल्याचा खालील भाग कापून त्यात पुदीना लागवड तर करता येतेच शिवाय या बाटल्यांना आजूबाजूने ठराविक अंतरावर छिद्रे करून त्यात पुदीना लागवड केल्यास महिना दोन महिण्यात बाटलीच्या बाहेरील भाग पुदीन्याने बहरून येतो.

परसबागेत अधिकचा पुदिना तयार झाल्यास याची पावडर करून तुम्ही गरजेनुसार स्वयंपाक करतांना वापरू शकता.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

शेतीसाठी काटेरी कुंपन


शेती येणार्या काळाची गरज आहे. अतिसंपर्कामुळे कोव्हीड १९ हा पसरत आहे. अशा वेळेस आपली पूर्वीची शेत व शेतातील कुटुंब अशी विलगीकरणाची, कमी संपर्काची, स्वातंत्र्यतेची राहणी गरजेची ठरणार आहे. बरेचदा माळरानावर शेती उभी करतांना आपल्याला नैसर्गिक कुंपनाची गरज असते. नैसर्गिक कुंपने ही वनभिंतीचेही कामे करतात. ही नैसर्गिक कुंपनही विविध तर्हेने आपल्याला उपयोगी पडतात. डुक्करे, जनावरांपासून आपली शेती वाचवू शकतो. यास सजीव भिंत असेही म्हणतात. शक्यतो जनावरे खाणार नाहीत अशा या वनस्पती असतात.  वनभिंत तयार झाल्यामुळे आपली शेती उष्ण लाटेपासून वाचवता येते. ही वनभिंत किंवा संरक्षण भितीसाठी वेगवेगळ्या वनस्पती लागवड करतात येतात. प्रत्येकाची लागवड, काळजी, त्याला लागणारी जागा यात विविधता असते. पण त्यातील एकसमान सुत्र म्हणजे यांची लागवड ही पावसाळ्यात करावी तसेच यास जगण्यासाठी कमीत कमी पाणी लागते.

कुंपनासाठी खालील नैसर्गिक वनस्पतींची लागवच करावी.

 • घायपात : घायपात ही पसरट पाणांची तिक्ष्ण काट्याची टोकदार पाने असतात. यांची लागवड ही कंदापासून करता येते. काही घायपतांना फुलोरा येतो तेथूनही नवीन कंदासारखी पाने फुटतात त्याची रोपे करून लागवड करू शकतात.
 • सागर गोटा: ही काटेरी वेलवर्गीय वनस्पती आहे. या वेलीला आधार मिळाला तर ते वरच्या दिशेने वाढतात  नाहीतर स्वतःच एकमेंकावर फांद्या वाढवून त्याचे दाट काटेरी कुंपन तयार होते.
 • बांबू : शेती क्षेत्र मोठ असल्यास शेतीच्या कडेने बांबूची लागवड करता येते. हे दाट वाढते
 • विलायती चिंचा:  शेतीला नैसर्गिक भिंत ही विलायती चिंचाची सुध्दा लागवड करता येते.. फक्त या चिंचा काही उंचीवर तुम्हाला दरवर्षी ठराविक उंचीवर कापून त्याची काटे कुंपनाभोवती टाकता येतात.
 • करवंद: ही सुध्दा काटेरी व झुडुपवर्गीय वनस्पती कुंपनासाठी लागवड करू शकता.
 • बोगनवेल ( कागदी फुलं) ही सुध्दा काटेरी वेलवर्गीय वनस्पती आहे. रंगी बेरंगी फुलांमधे उपलब्ध असल्यामुळे कुंपनसुध्दा हे सुंदर व शोभिवंत बनवता येते.
 • मेंदी व डुरांटाः या दोनही वनस्पती या दोन्ही वनस्पती या काटेरी असतात. तसेच दाटीने वाढतात. शिवाय यांना हेज कटरचा वापर करून कुपनांला ऐच्छिक आकार, उंची देता येते.
 • घाणेरी: ही वनस्पती झुडुप वर्गीय असते. शिवाय याचा गंध उग्र असतोच. शिवाय त्याला जनावरेही खात नाहीत. तसेच याच्या काट्या हा जळावू असल्यातरी कणखर असतात. तसेच यांना बारिक दानेदार काटे असतात. त्यामुळे सहजतेने त्यांना पार करून अथवा काढून टाकणे शक्य नसते.
 • काटे कोरांटी या खूपच लहान पण काटेरी वनस्पती आहेत. त्यांचा सुध्दा वापर आपण कुंपनासाठी करू शकतात. विविध रंगाची फुले येत असल्यामुळे त्यामुळे कुंपनाची शोभा वाढते.
 • गावठी गुलाबः गावडी गुलाबांना सुध्दा काटेरी वेलवर्गीय असतो. त्यामुळे त्यालाही कुंपनाभोवती लागवड करू शकता.
 • पान साबर : काटेरी व पसरट पानांचे ही साबर वर्गातील एक काटेरी वनस्पती आहे. कमी पाण्यात वाढणारी, पानांनाच सुक्ष्म पण काटेरी साज असलेली वनस्पती ही कुंपनासाठी चांगली मानली जाते.

बरेचदा या वनस्पती लागवड केलेही जातात पण कालांतराने लागवड केलेल्या वनस्पती मोठ्या होतात व जमीनीलगत काहीच नसल्यामुळे त्यातून काही सरपटणार्या, छोट्या प्राण्यांची ये जा सुरू होते अशा वेळेस लाजाळूची लागवड करावी.

वरील वनस्पती या रुंद खोल व मोठे चर खोदून करावी म्हणजे पावसाळ्यात तेथे पाण्याची साठवण तर होतेच. त्यात त्याचा वनस्पतीचा वर्षानुवर्ष पालापाचोळा पडून त्याचे खत बनत असते.

तारेचे कुंपन केले तरी स्थानिक लोक, जनावरे ही टिकू देत नाही. त्यामुळे तारेच्या आधाराने आपण बोगनवेल, सागर गोटा यांची लागवड करू शकता.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक

आमच्या उत्पादनांच्या माहितीसाठी पहा…

http://www.gacchivarchibaug.in