ही पृथ्वी समस्त जिवांचे पालनपोषण करू शकते पण एका व्यक्तिचा लोभ पूर्ण करू शकत नाही. – महात्मा मो.क.गांधी
नुकताच वसुंधरा दिन साजरा झाला. वसुंधरेला बहूप्रसवा सुध्दा म्हणतात. कणाकणातून ति अन्नांची, जिवांची निर्मिती करत असते. पण सो कॉल्ड हुशार माणसाने या सर्वांचा जवळपास सत्यानाश करून टाकलाय. सगळीकडे जंगल तोड, मोजक्या झाडांची पूर्नलागवड. वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे, वाढत्या औद्योगीकीरणामुळे घटत चाललेले शेती क्षेत्र. या सर्वांचा परिपाक म्हणजे वाढते तापमान. आपल्याला काय पुढील पिढीलाही काय चाललय हे कळेनासं झालयं. ज्यांना कळतंय त्यांना वळत नाही. वळालं तर सातत्यता नाही.
वसुंधरा जैसे थे होणे अशक्य आहे. पण त्याला वेळीच उपाय नाही केला तर मागे फिरणे शक्य नाही. बरे पुढेच जायचे म्हणजे कडेलोटच आहे. एकप्रकारे ठरवून केलेली आत्महत्या होय. या सर्वांचे कारण म्हणजे प्रदुर्षीत होत चालेली माती. आपल्याला कसे सर्व इंस्टंट हवेय. तूप खाल्ले की रूप आले पाहिजे. इनपुट दिले की लगेच आऊटपूट पाहिजे. या सार्या हट्टहासापायी आपण मातीचा पोत, मातीची सुपिकता गमावत आहोत. हे झाले अनैसर्गिक खते वापरामुळे तर होतच आहे. पण औद्योगीकीरण, रोजच्या जिवनात वापरले जाणारे विविध रसायने यामुळे पाणीही प्रदुर्षीत होत आहे. ते मातित मिसळले की मातीही खराब होते. मातीतील आपण प्रदुर्षण रोखले तर धरणीमाता बहुप्रसवा गुणधर्मानुसार ति तिचे पूर्नजिवन नक्कीच करू शकते.
मानवी वस्त्या या सुपिक जमीनीच्या लगत वसत गेल्या वाढत गेल्या. आता सुपिकता फक्त अमेझॉनच्या खोर्यातच पहायला मिळेल. कारण आज तिथे तरी मानवी हस्तक्षेप फार कमी आहे. पूर्वीतर ही सुपिक माती सर्वत्र रहात होती. त्यातून अनेक जिव तयार होत होतेच. शिवाय त्यांच्या संगोपनासाठी अन्नही ही मातीच तर तयार करत होती. अर्थात अन्न मिळवण्यासाठी संघर्ष हा प्रत्येक जिवाला करत लागत होता. आहे.. पण किमान अन्न तरी उपलब्ध होते. आज अन्नच काय पाणी मिळणे सुध्दा दुरापास्त झालेय. कारण ते पुरवणारी नैसर्गिक व्यवस्थाच ऑक्सीजनवर आली आहे.
माती सुपिक असली तर नैसर्गिकरित्या पडणार्या पावसाच्या पाण्याचे व्यवस्थितरित्या जिरते. पाण्याला योग्य गती असली की तिच्या सहयोगाने जिवसृष्टी हिरवीगार होऊ लागते. उघडे बोडके डोंगर, टेकड्या, डांबरट रस्ते यामुळे आता पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले. बदाबदा पडणारा पाणी न साचता, झिरपता वाहून जाते. पर्यायाने पूरसुध्दा येतो.
आज शेतात, घरपरिसरात, गच्चीवर माती सुपिक कशी बनेल याच्या जर उपाययोजना केल्या तर नक्कीच आपण पाणी जिरवू शकतो. माती सुपिक बनवण्यासाठी जमिनीवर जास्तीत जास्त पालापाचोळ्याचे आच्छादन द्या. कुंड्या भरण्यासाठी पालापाचोळा किंवा त्याचा चुरा (बिशकॉम) वापरा. मातीतील सुक्ष्मजीव वाढीस पोषक वातावरण तयार करा. मातीत कोणतेही रसायने मिसळू नका. कारण त्यांच्या वापरामुळे सुक्ष्मजीव हे मरून जातात. पर्यायाने माती ही निर्जीव होते. माती निर्जिव झाली की झाडं, रोपं उगत नाही. पर्यायाने त्यावर अबलंबून जिवांचे अन्न तयार होत नाही.
सुपीक मातीची लक्षणे पुढीलप्रमाणे समजून घेता येतील.
पूर्वी गर्भारपणात शेतातील काळी माती ही खाल्ली जायची. जखम झाली की त्यावर माती चोळली जायची. तसेच मातीनेच बरेच त्वचारोग हे बरे केले जायचे ज्याला मडबाथ असे म्हणतात. गांजली माशी चावली की त्या आग होणाऱ्या त्याच्यावर तुळशी खालची माती वापरली जायची. कारण असे सुपीक माती मध्येच उपकारक असे सूक्ष्मजीव असायचे जे आपल्याला आरोग्यासाठी उपयोगी ठरत असत. गावाकडे वळवाचा पाऊस पडला की सुगंध यायचा, तो सुगंध आपण हरवून बसलो आहोत पण आता मातीची प्रदूषित झाल्यामुळे अनेक गोष्टींवर बंधने आलेले आहेत आणि त्याचे दुष्परिणाम पण जाणवत आहेत.
चला तर मग माती वाचवूया.. वंसुधरेला सजवू या…
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
9850569644 / 8087475242
www,gacchivarchibaug.in
You must be logged in to post a comment.