ऑक्टोबर महिण्यात बागेत करावयाची कामे…


ऑक्टोबर महिण्यात बागेत करावयाची कामे…

ऑक्टोबर महिना हा बागेसाठी फार महत्वाचा आहे. कारण ऑक्टोबर महिना हा पावसाळा ऋतू संपून हिवाळा ऋतूची सुरवात होणार असते. हिवाळा हा पुढे फेब्रुवारी पर्यंत असतो. या काळात वातावरणातील तापमान बर्यापैकी खाली आलेले असते. या काळात नव्याने बिया रूजणे जरा अवघड असते. त्यासाठी निसर्गाने पावसाळी हवामानानंतर बिज अकुंरण्यासाठी ऑक्टोबर हिटची तरतूद केली आहे. असो..

तर या ऑक्टोबर महिण्यात पुढील प्रमाणे कामे करणे फार गरजेचे आहे.

माती वाळवून घ्या… पावसाळ्यात सतंतधार पावसामुळे म्हणा किंवा रिपरिपीमुळे माती घट्ट झालेली असते. काही भाजीपाला आता पूर्ण तयार होऊन निघालेला असतो. अर्थात काही कुंड्या, वाफ्यातील जागा रिकामी झालेली असते. अशा वेळेस नव्याने बिया लावण्यासाठी किंवा रोपे लावण्यासाठी माती ही वाळलेली असणे फार गरजेचे आहे. माती सतत ओली असल्यामुळे त्यात विषाणूची, मातीतील किडीची वाढ झालेली असते. ही वेळीच नियंत्रण होण्यासाठी माती वाळवणे गरजेचे आहे. माती वाळवण्यामुळे मातीत किड, विषाणू हे मरून जातात. त्यांचे जैवखत हे मातीत मिसळते व त्यांचे खत हे पुढील झाडांसाठी उपयुक्त ठरते. तसेच माती वाळवल्यामुळे बियाणं रूजवण्यासाठी पोषक जागा तयार होते. ओल्यामातीमुळे बियाणं हे रूजत नाही. कारण त्यात काही हानीकारक तत्वांची, रसायनांची गंधाची वाढ झालेली असते. त्यामुळे बियाणें शभंर टक्के रूजण्यासाठी माती वाळवणे गरजेचे आहे.

Advertisements

कोणत्या बियाणे लागवड कराल.. या महिण्यात सर्वच प्रकारच्या बियाण रूजण्यासाठी पोषक असते. तसेच पालक, धने, भेंडी, गवार, कारले या सारख्या नाजूक बियांसाठी ऑक्टोबर हिट पोषक असते. तसेच काकडी, ढेमसे, एक्सोटिक्स भाज्यांची बियाणे व रोपे रूजण्यासाठी पोषक आहेत.

रिपॉंटींग साठी योग्य काळः ऑक्टोबर नंतर तुम्ही जानेवारी पर्यंत कुठल्याही काळात जून्या झाडांची माती बदलावयाची असल्यास थोडक्यात रिपॉटींग साठी योग्य काळ असतो. कारण वातावरणातील गारव्यामुळे रिपॉटींग केलेल्या झाडांच्या मुळांना शॉक बसत नाही. थोडक्यात झाडे मरत नाही.

ही काळजी घ्या.. परतीचा पाऊस लांबला असेल अर्थात तो येत असेन तर थोडा धिऱ धरा. कारण वातावरणात उष्मा वाढलेला असला तरी येणार्या पावसामुळे बियाणे हे सडू शकते. तर कधी कधी ऊन पावसामुळे बियाणे जोमानेही रूजून येते. हे प्रयोग करत राहिले पाहिजे. एकाद्या वेळेस अपयश आले तर माघार घेवू नका.  पुन्हा पुन्हा बियाणे लागवड करत रहावी.

झाडांची कंटीग करावीः उन्हाळ्यात येणार्या फुलांच्या झाडांची आता कंटीग करण्याचा काळ योग्य आहे. वाढल्या तापमानामुळे त्यास जोमाने फुटवा येतो. उदाः मोगरा, गुलाब, कंदवर्गीय फुलेझाडे. इ. तसेच मोठ्या झाडांची हलकी छाटणी करणे गरजेचे असते.

आगावू खताची तरतूद आधीच करून ठेवाः पुढील काही महिण्यात झाडांची अन्न बनवण्याची प्रक्रिया ही मंदावलेली असते. अशा वेळेस त्यांना वरखतातून पोषक द्रव्ये, खतं देणे गरजेचे असते. अशा वेळेस हाताशी उत्तम प्रकारे शेणखत असणे गरजेचे असते.

संदीप चव्हाण, गच्चीवची बाग, नाशिक. 9850569644

TIPS FOR HOW TO CONTROL WEED IN GARDEN

 तण नियंत्रण नेहमीची कटकट म्हणा किंवा डोकेदुखी म्हणा. हे एक महत्वाचे काम शेतात, बाग बगीच्यातील कुंड्यात, वाफ्यात असते. तसेच लॅन्स लागवड केलेल्या जागेवर असते. तसे तण देई धन ही निसर्गाची देण आहे. पण लोकांनी त्याला तण खाई धन… अशीही उपेक्षा केली आहे. खर तर   तणाचे महत्व हे या लेखात दिलेच आहेच.


TIPS FOR HOW TO CONTROL WEED IN GARDEN

बागेतील तणाचे नियंत्रण कसे करावे.

तण नियंत्रण नेहमीची कटकट म्हणा किंवा डोकेदुखी म्हणा. हे एक महत्वाचे काम शेतात, बाग बगीच्यातील कुंड्यात, वाफ्यात असते. तसेच लॅन्स लागवड केलेल्या जागेवर असते. तसे तण देई धन ही निसर्गाची देण आहे. पण लोकांनी त्याला तण खाई धन… अशीही उपेक्षा केली आहे. खर तर तणाचे महत्व हे या लेखात दिलेच आहेच. ते एकदा वाचा…तरीही तण काढणे आवश्यक व गरजेचे असल्यास पुढील उपाय करू शकता.

  • बागेतील मोकळ्या जागेत तण उगवून आल्यास, मुख्यता पावसाळ्यात ते झपाट्याने वाढते अशा वेळेस काही काळ जर त्यावर प्लास्टिक आथंरूण ठेव्यल्यास गवत वजा तणाची वाढ खुंटते. तसेच जे उगवून येते ते सडून, खूरटून जाते. तणाच्या गवताला उब मिळाल्यामुळे त्याला अंकूर फुटतात. पण उन न लागल्यामुळे तेही सडून जाता. थोडक्यात तण नियंत्रण हे अशा पध्दतीने करता येते.
  • कुंड्यामधे गवत वाढत असल्यास ते वेळोवेळी त्याची निंदणी, खुरपणी व टुपणी झाली पाहीजे. बरेचदा गवत, तण वरचेवर ओरबडून घेतल्यास त्याचे मुळे तसेच मातीत असल्याकारणाने ते पुन्हा जोमाने वाढते. अशा वेळेस ते मुळापासून ते काढून टाकणे गरजेचे असते. (पुढे वाचा)

  • गवताची, तणाची उगवण ही बरेचदा बियाणांपासून होते तर काहीची फांद्यापासून त्याची रूजवण होते. गवत ओरबडतांना त्याचे छोटे छोटे तुकडे पुन्हा मातीत पडले तरी त्याची पूर्नलागवड, पुर्नरूजवण होते. छोटे तुकड्यातून पून्हा उगवणारे गवत किंवा अशा तणास काळजीपूर्वक त्यास मातीखाली, प्लास्टिकच्या पिशवीत दडपावे म्हणजे ते उगवून येत नाही.
  • काही तणांची रूजवण ही बियांणापासून होते. बरेचदा हे बियाणे डोळ्यांना दिसतपण नाही. तसेच त्याचा बिज परिपक्वतेचा कालावधी हा खूप कमी असल्यामुळे आपल्या नजरेतून तण सुटल्यास त्याचा बिजप्रसार हा जलद गतीने होतो. तसेच निसर्ग हा सर्वात जास्त प्रतिकार शक्ती, प्रतिकुलतेतही अनुकलता ही तण, गवत वर्गीय वनस्पतींना दिली आहे. कारण निसर्ग त्याची जमीनीला (उघडी पडलेली जमीन) झालेली जखम ही सुक्ष्म वनस्पतीच्या रूजवण करण्यातून तिच्या आच्छादनातून भरून काढत असते. हे सुक्ष्म विज्ञान प्रथमता लक्षात घेतले पाहिजे. (पुढे वाचा) 

  • तसेच तण हे बोटांच्या चिमटीत घेवून उपटता अथवा मुळापासून काढणे शक्य नसल्यास त्यास वाढू द्यावे. व बिज येणाच्या किंवा परिपक्वतेच्या आधीच त्यास काढून टाकावे. उदा. गाजर गवताला हा पर्याय खूप उत्तम असतो.
  • लाॅन्स व जमीनीतल तण मुळापासून काढण्यासाठी जमीनील खोलवर जाणारी खुरपे मिळतात. त्याचा वापर केल्यास लाॅन्स मधील तण हे मुळासहित नष्ट करता येते.
  • शक्य झाल्यास तण नाशक टाळावे कारण त्याची तिव्रता दिवेसंदिवस वाढत चालल्यामुळे विविध श्वसनाच्या आजारांची व कर्करोगाची शक्यता बळावली आहे. शक्य झाल्यास त्यास हाताने कापणे, खूरपणे हा सर्वात उत्तम व सुरक्षीत पर्याय आहे. (पुढे वाचा) 

  • शेतासारखे मोठे क्षेत्र असल्यास अशा ठिकाणी तण नियंत्रणासाठी मुग, उडीद. तुर अशा दाट व नाजूक पानांच्या कडधान्यांची लागवड करावी. म्हणजे सावली खाली तण उगवून येत नाही.
  • अयोग्य पद्धतीने तयार केलेल्या शेणखतामुळे ही बागेत तण वाढण्यास मदत होते योग्य रीतीने तयार केलेल्या शेणखत वापरणे विषय लेख वाचा. https://atomic-temporary-145492773.wpcomstaging.com/2019/03/14/fertiliser-choice-use/

लेख आवडल्यास, उपयोगी वाटल्यास नक्कीच Share, Like & Forward करा. किंवा आवडेल तेवढे payment करा. Google Pay 9850569644 . तुमच्या एका कृतीने आमचा कामावरील विश्वास वाढेलच पण पर्यावरण पुरक कार्याला हातभार लाभेल.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग. नाशिक. call 8087475242

वरील गच्चीवरची बाग पुस्तक व तुम्हाला माहित आहे का ही दोन 480 चे 2 पुस्तक 240/- रुपयात …
8087475242

%d bloggers like this: