TIPS FOR HOW TO CONTROL WEED IN GARDEN
बागेतील तणाचे नियंत्रण कसे करावे.
- 👉 तुम्ही अजूनही केमिकल भाज्या खात आहात का?
- 👉 छोट्या जागेतही भरपूर भाजी उगवू शकता हे माहित आहे का?
- 👉 तुमचं स्वतःचं garden असावं असं वाटतंय का?
- 👉 7 दिवसांत सुरुवात झाली तर तयार आहात का?
तण नियंत्रण नेहमीची कटकट म्हणा किंवा डोकेदुखी म्हणा. हे एक महत्वाचे काम शेतात, बाग बगीच्यातील कुंड्यात, वाफ्यात असते. तसेच लॅन्स लागवड केलेल्या जागेवर असते. तसे तण देई धन ही निसर्गाची देण आहे. पण लोकांनी त्याला तण खाई धन… अशीही उपेक्षा केली आहे. खर तर तणाचे महत्व हे या लेखात दिलेच आहेच. ते एकदा वाचा…तरीही तण काढणे आवश्यक व गरजेचे असल्यास पुढील उपाय करू शकता.
- बागेतील मोकळ्या जागेत तण उगवून आल्यास, मुख्यता पावसाळ्यात ते झपाट्याने वाढते अशा वेळेस काही काळ जर त्यावर प्लास्टिक आथंरूण ठेव्यल्यास गवत वजा तणाची वाढ खुंटते. तसेच जे उगवून येते ते सडून, खूरटून जाते. तणाच्या गवताला उब मिळाल्यामुळे त्याला अंकूर फुटतात. पण उन न लागल्यामुळे तेही सडून जाता. थोडक्यात तण नियंत्रण हे अशा पध्दतीने करता येते.
- कुंड्यामधे गवत वाढत असल्यास ते वेळोवेळी त्याची निंदणी, खुरपणी व टुपणी झाली पाहीजे. बरेचदा गवत, तण वरचेवर ओरबडून घेतल्यास त्याचे मुळे तसेच मातीत असल्याकारणाने ते पुन्हा जोमाने वाढते. अशा वेळेस ते मुळापासून ते काढून टाकणे गरजेचे असते. (पुढे वाचा)
- गवताची, तणाची उगवण ही बरेचदा बियाणांपासून होते तर काहीची फांद्यापासून त्याची रूजवण होते. गवत ओरबडतांना त्याचे छोटे छोटे तुकडे पुन्हा मातीत पडले तरी त्याची पूर्नलागवड, पुर्नरूजवण होते. छोटे तुकड्यातून पून्हा उगवणारे गवत किंवा अशा तणास काळजीपूर्वक त्यास मातीखाली, प्लास्टिकच्या पिशवीत दडपावे म्हणजे ते उगवून येत नाही.
- काही तणांची रूजवण ही बियांणापासून होते. बरेचदा हे बियाणे डोळ्यांना दिसतपण नाही. तसेच त्याचा बिज परिपक्वतेचा कालावधी हा खूप कमी असल्यामुळे आपल्या नजरेतून तण सुटल्यास त्याचा बिजप्रसार हा जलद गतीने होतो. तसेच निसर्ग हा सर्वात जास्त प्रतिकार शक्ती, प्रतिकुलतेतही अनुकलता ही तण, गवत वर्गीय वनस्पतींना दिली आहे. कारण निसर्ग त्याची जमीनीला (उघडी पडलेली जमीन) झालेली जखम ही सुक्ष्म वनस्पतीच्या रूजवण करण्यातून तिच्या आच्छादनातून भरून काढत असते. हे सुक्ष्म विज्ञान प्रथमता लक्षात घेतले पाहिजे. (पुढे वाचा)
- तसेच तण हे बोटांच्या चिमटीत घेवून उपटता अथवा मुळापासून काढणे शक्य नसल्यास त्यास वाढू द्यावे. व बिज येणाच्या किंवा परिपक्वतेच्या आधीच त्यास काढून टाकावे. उदा. गाजर गवताला हा पर्याय खूप उत्तम असतो.
- लाॅन्स व जमीनीतल तण मुळापासून काढण्यासाठी जमीनील खोलवर जाणारी खुरपे मिळतात. त्याचा वापर केल्यास लाॅन्स मधील तण हे मुळासहित नष्ट करता येते.
- शक्य झाल्यास तण नाशक टाळावे कारण त्याची तिव्रता दिवेसंदिवस वाढत चालल्यामुळे विविध श्वसनाच्या आजारांची व कर्करोगाची शक्यता बळावली आहे. शक्य झाल्यास त्यास हाताने कापणे, खूरपणे हा सर्वात उत्तम व सुरक्षीत पर्याय आहे. (पुढे वाचा)
- शेतासारखे मोठे क्षेत्र असल्यास अशा ठिकाणी तण नियंत्रणासाठी मुग, उडीद. तुर अशा दाट व नाजूक पानांच्या कडधान्यांची लागवड करावी. म्हणजे सावली खाली तण उगवून येत नाही.
- अयोग्य पद्धतीने तयार केलेल्या शेणखतामुळे ही बागेत तण वाढण्यास मदत होते योग्य रीतीने तयार केलेल्या शेणखत वापरणे विषय लेख वाचा. https://atomic-temporary-145492773.wpcomstaging.com/2019/03/14/fertiliser-choice-use/
लेख आवडल्यास, उपयोगी वाटल्यास नक्कीच Share, Like & Forward करा. किंवा आवडेल तेवढे payment करा. Google Pay . तुमच्या एका कृतीने आमचा कामावरील विश्वास वाढेलच पण पर्यावरण पुरक कार्याला हातभार लाभेल.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग. नाशिक. call

वरील गच्चीवरची बाग पुस्तक व तुम्हाला माहित आहे का ही दोन 480 चे 2 पुस्तक 240/- रुपयात …
(Mini Course) व्दारे शिकणार?
👉 Annual Detailed Course
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.
You must be logged in to post a comment.