How to Grow Banana in Garden
शहरी परसबागेत केळी लागवड करणे सहज शक्य आहे. पुरेसे ऊन व चांगले वाण शक्यतो वेलची केळी असल्यास त्यास भरभरून केळी येतात. आज काल बाजारातील केळी ही कार्बाईडच्या रसायनात भिजवून येतात. त्यामुळे कच्ची केळी ईच्छीत शहरात पोहचली की ते अर्ध्या रात्रीत पिकतात. आधीच रसायनांचा मारा करून उत्पादित केळी रसायनात बुडवून पिकलेल्या केळ्याच्या सेवनाने कफ होण्याची दाट शक्यता असते. आम्ही गच्चीवरची बाग, नाशिक म्हणून काम करतांना परसबागेत केळीलागवड करून देतो. त्यास भरभरून फळे आल्याची लक्षात आली आहेत. तिही संपूर्णतः रसायन मुक्त पध्दतीने…
केळास पूर्णवेळ उन्हाची गरज असते पण पुरेसे असेल तरी केळी छान येतात. उदाः केळी या रोपास पूर्व पश्चिम या दिशेत.. म्हणजे दक्षीण उत्तर यातील दोन मजली ईमारती किंवा बंगल्याच्या मधल्या भागात लावली तरी केळी छान येतात. केळास नारळाची, किंवा इतर झाडांची सावली नको.
एकदा रोप रूजले की त्यास खालून फुटवे येतात. केळ फळांची चांगली वाढ व्हावी म्हणून फक्त आजूबाजूच्या इतर खूंट काढून टाकले जातात. हे चुकीचे आहे. जितके फूटवे येत आहेत तितके नैसर्गिक रित्या येवू द्यावेत. ते नैसर्गिक रित्या केळीच्या फळधारणा केलेल्या खांबास आधार देतात. तुम्ही निरीक्षण करा… ज्या खांबाला केळी लागली आहेत. व ते ज्या बाजूला झूकणार आहे किंवा तोल जावू शकतो अशा बाजूने केळीचे खुंट येण्यास सुरवात होते. ते भविष्यात त्याचा आधार होणार असतात. त्यामुळे आजूबाजूचे केळीचे खूंट आजीबात काढू नये…
योग्य ते पोषण झाल्यास किंवा मिळाल्यास केळीचा खांब जाड होतो. टोकाची पाने नेहमीपेक्षा पण लक्षात येतील एवढी मोठी झाल्यास त्यास केळफूल येणार आहे असे समजावे. केळफूल जसे जसे फूलत जाते तसे तसे केळीचा खांबांचा तोल एकाबाजूला झुकू लागतो. अशा वेळेस त्यास केळफुलाजवळ व एक फूट खाली असा तारेचा, दोरीचा विरूध्द दिशेला ताण देवून आधार देवू शकतो. किंवा दोन बांबूची, बल्ल्यांची कैची करून त्यास आधार देता येतो. तसेच तार वापरतांना तिथे जूने जिन्स कापडाच्या बोळा किंवा जून्या गार्डन पाईपमधे तार टाकावी. तार तशीच बांधल्यास केळ्याच्या खांबात जावून केळ खांब कापण्याची शक्यता असते.
केळीच्या खूटांची चांगली वाढ झाली व त्यास केळी लागत नसल्यास पाण्याचा ताण दयावा. पण एकदा का केळीच्या बेटातील एकाद्या केळीला केळी लागलीत कि भरपूर पाणी द्यावे. त्यामुळे केळ खुंटांची व केळांची चांगली वाढ होते.
केळीला निमपेंड व जिवामृताचा वापर करावा. महिण्यातून एकदा करावा. थंडीच्या दिवसात शेणखताचा वापर करावा.
आफ्रिकेत एक महिना वास्तव्यास होतो तेव्हा तिथे लोक केळीच्या सालासहित केळी खात होती. आपल्याकडेही खात होती. पण मुबलकतेमुळे किंवा अज्ञानामुळे म्हना आपल्याकडेही ति प्रथा बंद झाली असावी. आता तर कळाले तरी बाजारातील केळी सालासहित खावू नये… कारण त्यावर रसायनांचा मारा असतो. घरची केळी असल्यास सालासहित खाण्यास हरकत नाही.
नैसर्गिक व सेंद्रीय पध्दतीने वाढवलेली वेलची केळात बिया तयार होतात. त्याची पूर्नलागवड होते. केळीला राखेचा वापर करू नये. केळ जळते. तर केळीला महिण्यातून एकदा १ रू. चूना पुडी व पाच लिटर पाणी दिल्यास केळी लागण्यास सुरवात होते. घरची केळी असतील तर त्या पानांचा जेवणासाठी वापर करावा. काऱण नसतांना पूजा पाठेसाठी देवून झाडांचे नुकसान करून घेवू नये.
केळीचे पाने मोठी असल्यामुळे शहरात केळीच्या पानावर धुळ जास्त साचते. त्यामुळे अन्न तयार होण्यास पर्यायाने फळ लागवडीस उशीर होतो. अशा वेळेस केळीचे झाड स्वच्छ पाण्याने महिण्यातून स्वच्छ धुवावे.
महिण्यातून एकदा जिवामृत पाण्याची फवारणी जरूर करावी.
केळीचा लंगोर काढल्यानंतर केळीच्या खांबाचे अवशेषाचे बारिक तुकडे करून ते केळी भोवतीच टाकावे अथवा कंपोस्टीगं करून पुन्हा त्या झाडासं खत द्यावे म्हणजे अतिरिक्त खताची शोधाशोध करावी लागत नाही. शक्य झाल्यास त्याचे केळ फळाचे सालं सुध्दा त्या केळीला द्यावेत.
बरेचदा केळ लागल्यानंतर केळफूल हे लांबत जाते. सुरवातीली केळीच्या फण्या लागतात. नंतर लागत नाही. फक्त केळीचे फुलं पुढे पुढे उमलत व वाढत जाते . अशा वेळेस केळ फूल कापून टाकण्याची प्रथा आहे. कारण काय तर केळी पोसल्या जात नाही. हे चुकीचे आहे. मुळातच केळीला पुरेसे उन मिळत नसल्या कारणाने मोजकेच केळीच्या फणी योग्य रित्या पोसल्या जाव्यात म्हणून केळ पुढील केळीची धारणा करत नाही. व केळफूल लाबंवल्यामुळे केळीच्या आकारावर परिणाम होत नाही. उलट केळफूल तसेच ठेवल्यामुळे केळीचा आकार वाढल्याचे लक्षात आले आहे.
केळीचा पिळवी अथवा वाळलेली पाने खेचून काढून नये. ती बुंद्यापर्यंत चिरत येतात. त्यापेक्षा जेथ पर्यत वाळले आहे तेथे धारदार चाकू विळ्याने कापून घ्यावीत. केळात हवा खेळती असल्यास पांढरा, काळा मावा लागत नाही.
बरेचदा केळीचा कंद लागवड करतांना त्यास कुठे पाण्याचा संसर्ग झाल्यास त्याचा शेंडा हा संकुचित होतो पानं छोटी होतात. अशा वेळेस जमीनीपासून बुंधा एक फुटावर कापावा. लगेचच पाणी देवू नये. छान पाने फुटल्यावर त्याचे खत पाण्याचे लाड करावेत.
बरेचदा केळीचे चांगले वाण मिळाल्यास केळी भरपूर लागतात. अशा वेळेस केळांचे वेफर्स करून ठेवावीत. शिकरण करता येते. ( शिकरणासाठी प्लास्टिक बॅगेतील रासायनिक दूध वापरू नये) आईस्क्रीम तयार करता येते. ( याच्या रेसिपी यू ट्यूबवर मिळतात)
लंगोरातील एकादी केळी जरी पिवळी झाली कि लंगोर पिकण्यास मदत होते. अशा वेळेस त्यास सावधपणे उतरवून त्यास गोणपाटात लंवग ठेवून पिकवावीत. लगेच पिकतात पण आपल्याला सावकाश संपवायची असतील तर लंवग ठेवू नये.
बरेचदा वादळ, वावटळी मुळे केळीचे खांब तुटण्याची शक्यता असते अशा वेळेस वार्याच्या झोतापासून त्यास वाचवावे. अपरिपक्क केळी असतांनाच खांब तुटल्यास कच्ची खेळी फेकून देवू नयेत. तिसुध्दा गोणपाटात पिकतात. चव मात्र थोडी वेगळी लागते एवढेच. पण त्यास सेवन करता येते.
केळ फुलांची भांजी करता येते. वेळखाऊ असली तरी भाजी चविष्ट असते.
गच्चीवरची बाग संदीप चव्हाण, नाशिक.
8087475242
You must be logged in to post a comment.