लेखः ५/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक

टेरेसप्रमाणे फ्लॅटच्या बाल्कनी/गॅलरीत अशी बाग फुलवता येईल. अगदी ५ बाय १० इतकी जागा असेल तरी चालते. अशा जागेच्या नियोजनासाठी शक्य असल्यास लोखंडी पायऱ्यांची मांडणी करून घ्यावी.


सदर लेख लोकसत्ता- चतुरंग पुरवणीत प्रकाशीत झाला आहे. जवळपास ३९ लेखांची लेखमाला प्रकाशीत झाली आहे. बाग प्रेमीसाठी सादर करत आहे.

4 (9).jpg५) गच्ची/गॅलरीतील बाग

५) गच्ची/गॅलरीतील बाग५) गच्ची/गॅलरीतील बाग

बाग फुलवण्यासाठी टेरेस हा सर्वोत्तम पर्याय आहे. स्वच्छ ऊन, स्वच्छ वारा व ऐसपस जागा, निवांतपणा ही टेरेसची वैशिष्टय़े असतात. टेरेसवर प्रतिकूल परिस्थिती (कडक ऊन, उष्ण वारा, माती नाही) असली तर ती नियंत्रित नक्की असते. टेरेसचे वॉटर प्रूफिंग केले असेल तर खबरदारी म्हणून ५०० मायक्रॉनचा प्लॅस्टिक पेपर सर्वात तळाशी वापरून, त्यावर सरळच्या सरळ लांब विटाचे वाफे साकारता येतात. टेरेसचे बांधकाम थोडे जुने किंवा गळतीची शक्यता वाटल्यास टेरेसवर १ इंच जाडीचा सिमेंट काँक्रीटचा थर द्यावा. त्यावर विटा रचाव्यात व त्यावर प्लॅस्टिक पेपर अंथरून विटांचे वाफे तयार करावेत.

टेरेसप्रमाणे फ्लॅटच्या बाल्कनी/गॅलरीत अशी बाग फुलवता येईल. अगदी ५ बाय १० इतकी जागा असेल तरी चालते. अशा जागेच्या नियोजनासाठी शक्य असल्यास लोखंडी पायऱ्यांची मांडणी करून घ्यावी. प्रत्येक पायरी ही ८ इंच रुंदीची असली तरी चालते. २ फुटांच्या रुंदीच्या मांडणीत ८ इंचाच्या ३ पायऱ्या करता येतात. येथे आयताकृती/सपाट बुडाच्या मातीच्या, प्लॅस्टिकच्या कुंडय़ा किंवा नर्सरी बॅगही रचून ठेवता येतात.

बाल्कनी/गॅलरीला सुरक्षा म्हणून लोखंडी ग्रिल लावता येते. याचाही कल्पकतेने वापर करून कुंडय़ा ठेवण्यासाठी पायरी किंवा कुंडी बसेल अशी गोल रिंग करून घ्यावी. कुंडय़ा, पिशव्या हलवताना सहजपणा येतो.

गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक.

आपल्याला लेख आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर करा.. आमच्या पर्यावरण कार्याचा, नावाचा उल्लेख करावा. ही विनंती…

व्हिडीओ पहाः देशी गाय-गच्चीवरची बाग नाशिक

============================================================================

टीपः १) सदर लेख लोकसत्ता- चतुरंग पुरवणीत पूर्व प्रकाशीत झाला आहे. जवळपास ३९ लेखांची लेखमाला प्रकाशीत झाली आहे. सदर लेखमालेचे पुस्तक रूपात (Version 2, Edition 1) प्रकाशीत करणेकामी सर्वप्रकारचे प्रकाशन संस्कार पूर्ण झाले आहेत. पंरतू पैशाअभावी पुस्तक प्रकाशीत करणे अडचणीचे आहे. पर्यावरण हेतूसाठी काही आर्थिक मदत करू इच्छित असल्यास आपले स्वागत आहे. आपले नाव आर्थिकमदत म्हणून पुस्तकात प्रकाशीत केले जाईल.. (आमची कोणतीही संस्था नाही. हे व्यक्तिगत व कौटुंबिक पातळीवर पर्यावरण संवर्धनाचे काम चालू आहे)

२) सद्य स्थितीत गच्चीवरची बाग (Version-1, Edition 2)- व्दितीय आवृत्ती हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. लोकसत्ता -चुंतुरंग पुरवणीत प्रकाशीत केलेले लेख हे ग.बा. २०१३ आवृत्तीपेक्षा वेगळया स्वरूपाची मांडणी केली आहे.

गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक.

https://organic-vegetable-terrace-garden.business.site/

👆वरील link ही गच्चीवरची बाग नाशिक ची आहे. आपण या site वर click करून आपला review नोंदवावा. आपल्या या एका प्रयत्नाने आम्ही करत असलेले पर्यावरण पुरक काम व निःशुल्क मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल.
संदीप चव्हाण नाशिक.

 

लेखः ४/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक

अर्थात आपली गरज काय आहे, हे निश्चित करणे गरजेचे आहे. तसेच बाग आपल्या स्वतच्या आनंदासाठी, समाधानासाठी फुलवायची आहे की केवळ हौस म्हणून याचाही विचार केला पाहिजे. कारण आपली गरज किती आहे यावरून बागेला आपल्याकडून महत्त्व दिलं जातं.


सदर लेख लोकसत्ता- चतुरंग पुरवणीत प्रकाशीत झाला आहे. जवळपास ३९ लेखांची लेखमाला प्रकाशीत झाली आहे. बाग प्रेमीसाठी सादर करत आहे.

बाग कोण व कशासाठी साकारू शकतं?

आपण गृहिणी असाल, निवृत्ती घेतली असेल, नोकरदार असाल, विद्यार्थी असाल. तर नक्की बाग साकारू शकता. झीरो बजेट व झीरो मेन्टेनन्स या आधारावर ‘गारबेज टू गार्डन’ हा टप्पा आपल्याला साकारता येतो. अर्थात आपल्या प्रत्येकाच्या वयोगटानुसार बागेचे महत्त्व व त्याची गरजही भिन्न भिन्न असते. जसे गृहिणींसाठी सात दिवसाचे विविध प्रकारच्या चवींचे चहा तयार करणे ही गरज असते किंवा रोजचे पदार्थ चविष्ट बनवणाऱ्या कढीपत्ता, कोथिंबीर, लिंबू , टोमॅटो, मिरची इ.गरज असेल किंवा अगदी आरोग्यदायी गव्हाच्या तृणरसपर्यंत आपल्याला घरची बाग फुलवता येते. देवपूजेला लागणाऱ्या फुलापानांपासून तर अगदी रोज रसायनमुक्त भाजीपाला उत्पादनापर्यंत आपल्याला मजल मारता येते. बाजारात मिळणाऱ्या त्याच त्याच भाज्यापासून तर रानभाज्यापर्यंत आपल्याला चव चाखता येते.

अर्थात आपली गरज काय आहे, हे निश्चित करणे गरजेचे आहे. तसेच बाग आपल्या स्वतच्या आनंदासाठी, समाधानासाठी फुलवायची आहे की केवळ हौस म्हणून याचाही विचार केला पाहिजे. कारण आपली गरज किती आहे यावरून बागेला आपल्याकडून महत्त्व दिलं जातं.

गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक.

आपल्याला लेख आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर करा.. आमच्या पर्यावरण कार्याचा, नावाचा उल्लेख करावा. ही विनंती…

व्हिडीओ पहाः Sandeep chavan Terrace Farming

============================================================================

टीपः १) सदर लेख लोकसत्ता- चतुरंग पुरवणीत पूर्व प्रकाशीत झाला आहे. जवळपास ४० लेखांची लेखमाला प्रकाशीत झाली आहे. सदर लेखमालेचे पुस्तक रूपात (Version 2, Edition 1) प्रकाशीत करणेकामी सर्वप्रकारचे प्रकाशन संस्कार पूर्ण झाले आहेत. पंरतू पैशाअभावी पुस्तक प्रकाशीत करणे अडचणीचे आहे. पर्यावरण हेतूसाठी काही आर्थिक मदत करू इच्छित असल्यास आपले स्वागत आहे. आपले नाव आर्थिकमदत म्हणून पुस्तकात प्रकाशीत केले जाईल.. (आमची कोणतीही संस्था नाही. हे व्यक्तिगत व कौटुंबिक पातळीवर पर्यावरण संवर्धनाचे काम चालू आहे)

२) सद्य स्थितीत गच्चीवरची बाग (Version-1, Edition 2)- व्दितीय आवृत्ती हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. लोकसत्ता -चुंतुरंग पुरवणीत प्रकाशीत केलेले लेख हे ग.बा. २०१३ आवृत्तीपेक्षा वेगळया स्वरूपाची मांडणी केली आहे.

IMG_20181114_190140_662

गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक.

http://www.gacchivarchibaug.in

Email: sandeepkchavan79@gmail.com

website
http://www.gacchivarchibaug.in

website https://atomic-temporary-145492773.wpcomstaging.com

profile
https://about.me/sandeepchavan

cover story https://udyojak.org/gachchivarchi-baug-success-story/

YouTube https://www.youtube.com/channel/UCIUZVOtKaSvV1DqTmFnKR5Q

facebook page

my link http://www.mylinq.in/9850569644

https://organic-vegetable-terrace-garden.business.site/

👆वरील link ही गच्चीवरची बाग नाशिक ची आहे. आपण या site वर click करून आपला review नोंदवावा. आपल्या या एका प्रयत्नाने आम्ही करत असलेले पर्यावरण पुरक काम व निःशुल्क मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल.
संदीप चव्हाण नाशिक.

लेखः ३/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक

अर्थात हे खतही विविध प्रकारे व सहज सोप्या-साध्या तंत्रातूनही साध्य करता येते. यातून ‘गारबेज टू गार्डन’ ही संकल्पनाही प्रत्यक्षात उतरवता येते. घरातील कचरा बागेसाठी व बागेतील उत्पन्न घरासाठी अशी चांगली सांगड घालता येते.


सदर लेख लोकसत्ता- चतुरंग पुरवणीत प्रकाशीत झाला आहे. जवळपास ४० लेखांची लेखमाला प्रकाशीत झाली आहे. बाग प्रेमीसाठी सादर करत आहे.

4 (14).jpg३) उपलब्ध नैसर्गिक संसाधने.(साधन संपत्तीः)

३) उपलब्ध नैसर्गिक संसाधने.(साधन संपत्तीः) ३) उपलब्ध नैसर्गिक संसाधने.(साधन संपत्तीः) ३) उपलब्ध नैसर्गिक संसाधने.(साधन संपत्तीः) ३) उपलब्ध नैसर्गिक संसाधने.(साधन संपत्तीः) ३) उपलब्ध नैसर्गिक संसाधने.(साधन संपत्तीः) ३) उपलब्ध नैसर्गिक संसाधने.(साधन संपत्तीः) ३) उपलब्ध नैसर्गिक संसाधने.(साधन संपत्तीः) ३) उपलब्ध नैसर्गिक संसाधने.(साधन संपत्तीः) उपलब्ध नसíगक संसाधने म्हणजे काय तर घरातील ओला नसíगक/ जैविक कुजणारा कचरा, परिसर व बागेतील सुका पालापाचोळा, नारळाच्या शेंडय़ा..रसवंतीवर मिळणारे उसाचे चिपाड, खरकटे पाणी अर्थात हे वापरावयाचे एक वेगळे व्यवस्थापन विज्ञान तर आहेच पण त्याचे घरच्या घरी उत्तम खतही तयार करता येते.

अर्थात हे खतही विविध प्रकारे व सहज सोप्या-साध्या तंत्रातूनही साध्य करता येते. यातून ‘गारबेज टू गार्डन’ ही संकल्पनाही प्रत्यक्षात उतरवता येते. घरातील कचरा बागेसाठी व बागेतील उत्पन्न घरासाठी अशी चांगली सांगड घालता येते. असा हा बाजार मुक्त पर्यायाचा विचार केल्यास आपली बाग आनंदाने फुलते, बहरते आणि त्याचा हळूहळू परतावा मिळू लागतो.

गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक.

आपल्याला लेख आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर करा.. आमच्या पर्यावरण कार्याचा, नावाचा उल्लेख करावा. ही विनंती…

व्हिडीओ पहाःZero waste-City Farming

============================================================================

टीपः १) सदर लेख लोकसत्ता- चतुरंग पुरवणीत पूर्व प्रकाशीत झाला आहे. जवळपास ४० लेखांची लेखमाला प्रकाशीत झाली आहे. सदर लेखमालेचे पुस्तक रूपात (Version 2, Edition 1) प्रकाशीत करणेकामी सर्वप्रकारचे प्रकाशन संस्कार पूर्ण झाले आहेत. पंरतू पैशाअभावी पुस्तक प्रकाशीत करणे अडचणीचे आहे. पर्यावरण हेतूसाठी काही आर्थिक मदत करू इच्छित असल्यास आपले स्वागत आहे. आपले नाव आर्थिकमदत म्हणून पुस्तकात प्रकाशीत केले जाईल.. (आमची कोणतीही संस्था नाही. हे व्यक्तिगत व कौटुंबिक पातळीवर पर्यावरण संवर्धनाचे काम चालू आहे)

२) सद्य स्थितीत गच्चीवरची बाग (Version-1, Edition 2)- व्दितीय आवृत्ती हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. लोकसत्ता -चुंतुरंग पुरवणीत प्रकाशीत केलेले लेख हे ग.बा. २०१३ आवृत्तीपेक्षा वेगळया स्वरूपाची मांडणी केली आहे.

गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक.

http://www.gacchivarchibaug.in

Email: sandeepkchavan79@gmail.com

website
http://www.gacchivarchibaug.in

website https://atomic-temporary-145492773.wpcomstaging.com

profile
https://about.me/sandeepchavan

cover story https://udyojak.org/gachchivarchi-baug-success-story/

YouTube https://www.youtube.com/channel/UCIUZVOtKaSvV1DqTmFnKR5Q

facebook page
https://www.facebook.com/%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-page-163326204300631/

my link http://www.mylinq.in/9850569644

https://organic-vegetable-terrace-garden.business.site/

👆वरील link ही गच्चीवरची बाग नाशिक ची आहे. आपण या site वर click करून आपला review नोंदवावा. आपल्या या एका प्रयत्नाने आम्ही करत असलेले पर्यावरण पुरक काम व निःशुल्क मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल.
संदीप चव्हाण नाशिक.

लेखः २/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक

फुलांची, फळझाडांची, भाजीपाल्याची बाग फुलवायची म्हणजे बागेसाठी प्रामुख्याने लाल माती, कोकोपीट, गांडूळ व इतर खते, तयार रोपे, बी- बियाणे आणणे, याशिवाय पर्याय नाही, असे आपण मानतो. पण यांना खूप सारे पर्याय आहेत व ते सहज साध्य आहेत.


सदर लेख लोकसत्ता- चतुरंग पुरवणीत प्रकाशीत झाला आहे. जवळपास ३९ लेखांची लेखमाला प्रकाशीत झाली आहे. बाग प्रेमीसाठी सादर करत आहे.

4 (15).jpg२)गच्चीवरची बाग – उपलब्ध जागा आणि वस्तू …

उपलब्ध जागाः कुंडीतील बाग फुलवण्यासाठी उपलब्ध जागा व वस्तू कोणत्या तर आपण राहतो त्या ठिकाणी जी जागा उपलब्ध असेल ती. उदा गच्ची, बाल्कनी, खिडकी, इमारतीतीलमधील जिना, फ्लॅटच्या दाराबाहेरील छोटासा कोपरा किंवा घर-बंगला-अपार्टमेंट, शाळा, कंपनीच्या परिसरातील कोणतीही उपलब्ध जागा.

उपलब्ध वस्तूः आता उपलब्ध वस्तू म्हणजे काय तर बाजारात प्लॅस्टिक, माती, सिमेंटच्या विविध आकाराच्या, रंगीबेरंगी कुंडय़ा व प्लॅस्टिकच्या बॅगाही उपलब्ध असतात. प्रथम आपल्याला कुठे बाग फुलवायची याचे नीट नियोजन करावे.. जागेचा अधिकाधिक वापर कसा करता येईल याचा विचार करावा.. व त्याप्रमाणे कुंडय़ाचे प्रकार, त्यातील सहज हाताळता येतील, अशा कुंडय़ाची किंवा पिशव्याची निवड करावी.

हा झाला एक सरळधोपट पण खर्चीक मार्ग.. आपल्याला आत्ताच यावर खर्च नाही करायचा, असे ठरवले असेल तर तसेही अनेक वस्तूंत बाग उत्तमरीत्या फुलवता येते.. दुधाची पिशवी, वेताचे करंडे, टोपल्या, तुटलेले टब, गळक्या बादल्या, माठ, प्लॅस्टिकचे उभे आडवे काप केलेले ड्रम, सिमेंटच्या गोण्या, विटांचे वाफे किंवा टाकाऊ बॅनर.. अगदी तुटलेल्या बेसिनपासून ते बुटापर्यंत व पाण्याच्या बाटलीपासून तर पाणी शुद्ध करणाऱ्या एखाद्या निकामी प्युरिफायपर्यंत.. कापडाच्या पिशवीपासून तर तेलाच्या डब्यापर्यंत.. अगदी केळीच्या कापलेल्या खांबापासून तर प्लॅस्टिकच्या तीन इंच पाइपापर्यंत.. व लाकडाच्या खोक्यापासून तर पृष्ठय़ापर्यंत.. म्हणूनच उपलब्ध जे जे.. ते ते आपले.

 फुलांची, फळझाडांची, भाजीपाल्याची बाग फुलवायची म्हणजे बागेसाठी प्रामुख्याने लाल माती, कोकोपीट, गांडूळ व इतर खते, तयार रोपे, बी- बियाणे आणणे, याशिवाय पर्याय नाही, असे आपण मानतो. पण यांना खूप सारे पर्याय आहेत व ते सहज साध्य आहेत.

गच्चीवरची बाग,  संदीप चव्हाण, नाशिक.

आपल्याला लेख आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर करा.. आमच्या पर्यावरण कार्याचा, नावाचा उल्लेख करावा. ही विनंती… 

व्हिडिओ पहाः Organic Terrace Farming by Sandip Chavhan, Nasik, Maharashtra

============================================================================

टीपः १) सदर लेख लोकसत्ता- चतुरंग पुरवणीत पूर्व प्रकाशीत झाला आहे.  जवळपास ४० लेखांची लेखमाला प्रकाशीत झाली आहे. सदर लेखमालेचे पुस्तक रूपात (Version 2, Edition 1) प्रकाशीत करणेकामी सर्वप्रकारचे प्रकाशन संस्कार पूर्ण झाले आहेत. पंरतू पैशाअभावी पुस्तक प्रकाशीत करणे अडचणीचे आहे. पर्यावरण हेतूसाठी काही आर्थिक मदत करू इच्छित असल्यास आपले स्वागत आहे.  आपले नाव आर्थिकमदत म्हणून पुस्तकात प्रकाशीत केले जाईल.. (आमची कोणतीही संस्था नाही. हे व्यक्तिगत व कौटुंबिक पातळीवर पर्यावरण संवर्धनाचे काम चालू आहे)

२) सद्य स्थितीत गच्चीवरची बाग (Version-1, Edition 2)- व्दितीय आवृत्ती हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. लोकसत्ता -चुंतुरंग पुरवणीत प्रकाशीत केलेले लेख हे ग.बा. २०१३ आवृत्तीपेक्षा वेगळया स्वरूपाची मांडणी केली आहे.  (सदर लेख  मालिका पुस्तक स्वरूपात – रंगीत आवृत्ती प्रकाशीत करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. आपण अर्थ सहाय्य केल्यास पुस्तिका इतरांपर्यंत पोहचवण्यास नक्कीच मदत होईल. आपले योगदान सन्मानपूर्वक पुस्तकाच्या प्रथम पानावर प्रकाशीत केले जाईल, आपले छोटेसे योगदान ही आमच्यासाठी बहूमुल्य असणार आहे)  

गच्चीवरची बाग,  संदीप चव्हाण, नाशिक.

http://www.gacchivarchibaug.in

Email: sandeepkchavan79@gmail.com

लेखः १/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक

खिडकीतून दूरवर दिसणारे किंवा बागेतील एखादे झाड किंवा इतरांच्या गॅलरीत  निरागसपणे डोलणारी रंगीबेरंगी फुलं पाहून.. आपल्याला थोडं निवांत वाटतं, मन सुखावतं.. डोळ्यांना बरं वाटतं.


सदर लेख लोकसत्ता- चतुरंग पुरवणीत प्रकाशीत झाला आहे. जवळपास ३९ लेखांची लेखमाला प्रकाशीत झाली आहे. बाग प्रेमीसाठी सादर करत आहे.

2 (44).jpg१)सुरवात…

शहरातील रोजच्या धावपळीचा, त्याच त्याच कामांचा ताण आणि शीण येतोच. मनाला विरंगुळा म्हणून कधी वाचन करतो तर कधी चित्र वाहिन्यांवर फेरफटका मारत असतो. पण मन.. मन तसंच राहातं.. एकटं.. उदास.. शिणलेलं.. काही तरी शोधत असतं.. पण सापडत नाही.. ते सैरभैर धावतच असतं. मनातले विचार काही वेळ का होईना पण बाजूला ठेवून निवांतपणा, आनंदाचे दोन क्षण अनुभवता येईल असं काही तरी हवं असतं. ते सापडतं..

खिडकीतून दूरवर दिसणारे किंवा बागेतील एखादे झाड किंवा इतरांच्या गॅलरीत निरागसपणे डोलणारी रंगीबेरंगी फुलं पाहून.. आपल्याला थोडं निवांत वाटतं, मन सुखावतं.. डोळ्यांना बरं वाटतं. आणि नकळत आपल्याकडेही असं एखादं कुंडीत फुलाचं झाडं असावं असा विचार मनात येतो..

विचार मनात आला की बुद्धी आपल्याला सावध करते. तर्क करून ते खोडून काढते.. कशाला कट कट.. कुंडय़ा आणा, झाडं आणा.. रोज रोज पाणी घाला.. खत घाला, कीड पडते.. बरं त्याविषयी विचारायला जावं तर कुणाला विचारावं असे एक ना अनेक प्रश्न.. जाऊ दे असं म्हणून.. खिडकीतून समोरचीच झाडं बघून विषय सोडून देतो.पण ही कुंडीतील बाग फुलवणं आपल्या, कुटुंबाच्या आरोग्यासाठी हितावह आहे. बाजारात रासायनिक खतांचा मारा झालेली भाज्या-फळे असताना, घरची ताजी-टवटवीत भाजी तीही सेंद्रिय पद्धतीने फुलवता येईल, हा विचारही करायला हवा ना! चला तर मग, घरच्या घरी सकस भाज्या कशा पिकवू शकतो ते पाहूया अधिक विस्तृतपणे.

गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक.

आपल्याला लेख आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर करा.. आमच्या पर्यावरण कार्याचा, नावाचा उल्लेख करावा. ही विनंती…

व्हीडिओ पहाः Nashik : Plantation On Roof top Of building

============================================================================

टीपः १) सदर लेख लोकसत्ता- चतुरंग पुरवणीत पूर्व प्रकाशीत झाला आहे. जवळपास ४० लेखांची लेखमाला प्रकाशीत झाली आहे. सदर लेखमालेचे पुस्तक रूपात (Version 2, Edition 1) प्रकाशीत करणेकामी सर्वप्रकारचे प्रकाशन संस्कार पूर्ण झाले आहेत. पंरतू पैशाअभावी पुस्तक प्रकाशीत करणे अडचणीचे आहे. पर्यावरण हेतूसाठी काही आर्थिक मदत करू इच्छित असल्यास आपले स्वागत आहे. आपले नाव आर्थिकमदत म्हणून छापिल पुस्तकात प्रकाशीत केले जाईल.. (आमची कोणतीही संस्था नाही. हे व्यक्तिगत व कौटुंबिक पातळीवर पर्यावरण संवर्धनाचे काम चालू आहे)

२) सद्य स्थितीत गच्चीवरची बाग (Version-1, Edition 2)- व्दितीय आवृत्ती हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. लोकसत्ता -चुंतुरंग पुरवणीत प्रकाशीत केलेले लेख हे ग.बा. २०१३ आवृत्तीपेक्षा वेगळया स्वरूपाची मांडणी केली आहे.

(सदर लेख  मालिका पुस्तक स्वरूपात – रंगीत आवृत्ती प्रकाशीत करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. आपण अर्थ सहाय्य केल्यास पुस्तिका इतरांपर्यंत पोहचवण्यास नक्कीच मदत होईल. आपले योगदान सन्मानपूर्वक पुस्तकाच्या प्रथम पानावर प्रकाशीत केले जाईल, आपले छोटेसे योगदान ही आमच्यासाठी बहूमुल्य असणार आहे)

गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक.

http://www.gacchivarchibaug.in

Email: sandeepkchavan79@gmail.com

Fast Food? TMAK Book 5/636

घरचा पानकोबीची चव वेगळीच असते. एकदाच त्याची भाजी करा. यथासावकाश कॅबेज मोठा झाला. त्यांनी कढईत फोडणी दिली. घरातील मुलगी केवळ फोडणी दिल्याबरोबर भाजीच्या नुसत्या सुंगधाने तो तिला पहिल्यांदा खावासा वाटला. यातच घरच्या भाजीचे महत्व लक्षात येते.


menu-3206749_1280.jpgमुलं पालेभाज्या खायला नाक का मुरडतात? फास्ट फूड, जे अबाल वृध्दांना का आवडत? थोडा विचार तर करा… संदर्भः तुम्हाला माहित आहे का? पान. न.१२ कोट न. ५/६३६“अहो आमची मुलं भाज्या खायलाच नाही म्हणतात”. अशी प्रत्येक गृहदक्ष असलेल्या आईची तक्रार असते. आपण फक्त तक्रार करतो. त्यावर उपाय शोधत नाही. अर्थात त्यावर आजच्या बाजारातील उत्पादनांनी बेमालूम तोडगा काढलाय. मुलांना अमूक तमूक पोषणासाठी आमची उत्पादने वापरा. मग काय आपण ती रासायनिक दुधात देवून त्यांना वाढवत असतो. किंवा मुलांना समजायला लागल की दुकानात मिळाणारी दोन मिनटांत तयार होणारा किंवा पॅक्ड असणार्या उत्पादनांना बळी पडतात. त्यात “तेढा है लेकीन मेरा है” पासून तर कुरकुरे, चिप्स पासून सारेच आले. स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवून तयार केलेले पदार्थ व तेही कनिष्ठ अशा प्लास्टिकच्या वेष्टनात मिळायला लागलेत.बरं हे फक्त मूलंच खात नाही. आपल्या मोठ्यांच्या जिभेलाही त्याची चव लागली की ते खावेसे वाटते. बरं ते एवढंस खावून पोट भरणं सोडाच खाल्ल्याचे समाधानही मिळत नाही. अर्थातच त्यात त्यांनी अशा प्रकारचे रसायनं मिसळेली असतात. की ते खात रहावसं वाटतं. याला चटक लागणं नाही तर व्यसन लागणं म्हणतात. तर अशी ही उत्पादने वय झालेल्यांनाही आवडतात. जसे मूलांना कार्टुन बघावसं वाटतं तसेच वृध्दांनाही आवडतं. त्यातलं ढिशुम ढिशुम…पाहण्यातून अबाल वृध्द सारेच आनंद लुटतात. कारण लहान मूल व वृध्द मंडळी याची आवड निवड सारखीच होत जाते. काही वृध्द व्यक्ती तर दुकानात मिळणारी साखरेच्या गोळ्या खातांना पाहिली आहेत. असो…आपण कर्ते म्हणून याचा विचार केला पाहिजे. फक्त वयच तसं आहे म्हणून तो प्रश्न बाजूला सारण्यासारखा नाही. हे सारं चटपटीत खावंस वाटणं हे सारं रासायनिक प्रिर्झेव्हेटीवची कमाल आहे. जी आपल्याला घातक असतात. आपल्या परंपरेत असे फास्ट फूड नाहीच काहो? दोन मिनटातं तयार होणारी पदार्थ. शेवया, पोहे, मुरमुरे, ओली भेळ, राजगिरांचे लाडू… पण हे सारं आपण लक्षात कुठं घेतो. तर असो… मुद्दा होता. मुलं भाज्या खात नाही..माझा एक अनुभव आपल्याला सांगावासा वाटतो…दहा वर्षापूर्वी नुकतीच बागेला गच्चीवर सुरवात केली होती. टेरेसवरच्या बागेत चार टोमॅटो पिकले होते. ते खाली किचनमधे बायकोला आणून दिले. तिनेही नुकतेच बाजारातून टोमॅटो विकत आणले होते. बाजारातले व घरचे टोमॅटो तिने एकत्र करून फ्रिज मधे ठेवून दिले. माझा मुलगा बाहेर खेळून आला व त्याला टोमॅटो खावसा वाटला. बायकोने त्याला घाई गडबडीत हाताला आला तो टोमॅटो त्याच्या हातात दिला. त्याला तो खूप आवडला. त्याला दुसरा खावासां वाटला. तिने दुसरा दिला. पण या वेळेस त्याने तोंडातून थूंकून टाकला. छि… काय हा टोमॅटो, म्हणून खेळायला गेला.नंतर यावर घरात चर्चा झाली. मी जरा चौकशी केली असता. असे लक्षात आले की पहिला टोमॅटो त्याने जो खाल्ला, त्याला आवडला तो बागेलतला विषमुक्त होता. तर दुसरा हा बाजारातला होता. बघा मुलांना खाण्यांच्या बाबतीत जी नैसर्गिक चव आहे त्याला ते किती पटकन प्रतिक्रीया देतात. (बाजारातल्या भाज्या न खाणं म्हणजे त्याला चवच नसते हे मुख्य कारण आहे) आपण मोठ्यांच्या जिव्हा आता बोथट झाल्या आहेत. त्या त्या भाजीचे महत्व आहे म्हणून गिळलं नाही गेलं तरी ते पोटातं ढकलतो आहोत. नेमकं मुलाना काय आवडतं त्याचा कुत्रीम इंसेन्स पॅक्ड् फूड मधे बेमालूमपणे मिसळेला असतो. जो मोठ्यांच्या लक्षात येत नाही. पॅक्ड फूड खाण्यानेच भारतातील मूलांचे लठ्ठपणाचा आजार वाढतोय. गुबगुबीत असणं वेगळं व अंगावर सुज असणं वेगळं हे आपल्या लक्षात येत नाही किंवा जाणून बूजून त्याकडे दुर्लक्ष करत आहोत.घरच्या भाजीचा दुसरा एक अनुभव आहे. आम्ही एका ताईंच्या घरी भाजीपाल्याची बाग फूलवयाला सुरवात झाली. त्यात पान कोबी (कॅबेज) ही लागवड केला. पण घरातली आठवतील जाणारी मुलगी म्हणाली काका बागेत पान कोबी नका लावू. मला अजिबात आवडत नाही. त्या ताईही म्हणाल्या की जागा अडेल व तसेही कुणाला आवडत नाही म्हणून लागवड करूच नका. मी त्यांना आग्रह केला. घरचा पानकोबीची चव वेगळीच असते. एकदाच त्याची भाजी करा. यथासावकाश कॅबेज मोठा झाला. त्यांनी कढईत फोडणी दिली. घरातील मुलगी केवळ फोडणी दिल्याबरोबर भाजीच्या नुसत्या सुंगधाने तो तिला पहिल्यांदा खावासा वाटला. यातच घरच्या भाजीचे महत्व लक्षात येते.एकूणच काय हरकत आहे. चार कुंड्यामधे चार भाज्या लावयाला. आपल्याला निसर्गाची घडी बसवून दयावयाची आहे. बाकी सारं काम निसर्गच करणार आहे. माझा अनुभव असा सांगतो की घरचा एक टोमॅटो सुध्दा आपल्या जेवणातील वरण हे चवदार बनवू शकते. बघा… प्रयत्न करून. जमेलच.

लेख आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर करा.cc tmak COVER.jpg

लेखाच्या आरंभी असलेले स्वलिखीत, स्वअनुभवीत, स्वः चिंतीत असलेल्या बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन संदर्भातील मोजक्या समर्पक शव्दातीत, बागप्रेमीनी फेसबूकवर लाईक्स केलेल्या मराठी- हिंदी भाषेतील डोळे उघडणार्या व कृतीला प्रवृत्त करणार्या ६३६ बोधपर वाक्यांचा संग्रह असलेले तुम्हाला माहित आहे का? पुस्तक. फक्त २०० रू. ( पोस्ट खर्चासहित)पुस्तक माहिती- (PDF Download)पुस्तक माहिती (Video)Online खरेदीसाठी लिंक पहा..पुस्तकाबद्दलची या पूर्वी प्रकाशीत झालेली माहिती वाचा…http://www.gacchivarchibaug.inटीपः अशाच टीप्स वाचण्यासाठी व्हाट्स अप करा… ९८५०५६९६४४

वाचकांची प्रतिक्रिया

Don’t theft: TMAK 4/636

आपण माणूस म्हणून अजून बरेच विकसीत होण्याचे बाकी आहोत. श्रध्देने रोज देव पुजतो. पण त्यासाठी दुसर्यांच्या बागेतील फूल, न विचारता किंवा चोरून देवपुजा केली जाते. खरंच काहो अशाने देव पावेल का?


castle-1789929_1280म्हणतात की दुकानातल्या उसन्या उडदावर देव पूजू नये. तसेच परक्याच्या बागेतील चोरलेल्या फुलांवर देव पूजू नये… स्वतःच बाग फुलवा.. संदर्भः तुम्हाला माहित आहे का? पान. न.१२ कोट न. ४/६३६आपण माणूस म्हणून अजून बरेच विकसीत होण्याचे बाकी आहोत. श्रध्देने रोज देव पुजतो. पण त्यासाठी दुसर्यांच्या बागेतील फूल, न विचारता किंवा चोरून देवपुजा केली जाते. खरंच काहो अशाने देव पावेल का? आपल्याला तरी समाधान मिळेल का…?मराठीत एक म्हण आहे. पुजेसाठी लागणारे उडदाचे चार दाणे आपण दुकानदाराकडे मागवून पुजा केली तर ती पुजा तरी कुणाची लागू होईल. तसेच फुलांचे आहे. ति बाग फुलवणार्या व्यक्ती खरचं सकाळी सकाळी तरी चांगले चार शब्द फुल तोडून नेणार्यासाठी वापरतील का…?अगदीच अपरिहार्यता असेल तर गोष्ट वेगळी आहे. बागेला जागाच नाही असेही कधीच होणार नाही. काहीना काही पर्याय नक्कीच असतात. आपण शोध घेतो का? मुळातच काही माणसांमधे आळसंच तेवढा भरलेला असतो. पुरूष असतील तर हातावर तंबाखू चोळत बसून राहतील, टी. व्ही. पाहत बसतील व महिला असतील तर चारचौघी एकत्र बसून सुख दुखाःपेक्षा हिच तिच किंवा सुनेचं, जावयाचं बोलत बसतील.. पण एकादी कुंडी दारात, खिडकीत ठेवून चार फुलं पुजेसाठी येतील याची तसदी घेत नाही.. फूल चोरून आणण्यात गंमत वाटतही असेल पण समाधान नाही पावणार. मूलं ही लहाणपणी आंबे, बोरं चोरून खाण्यात जी मजा असते. ती मजा फूलं चोरण्यात नक्कीच नाही. अशा असमाधानाने केलेली पूजा तरी कशी लागू होईल.तेव्हा विचार करा. घरात जेष्ठ मंडळीकडून पुजेसाठी फूलं कुठून येतात याच भान घरातल्या कर्त्यांनी ठेवलं पाहिजे. त्यांना चार कुंड्या आणून द्या, झाडं लावण्यास, त्यांची काळजी घेण्यास प्रेरीत करा. तेवढचं त्यांच मनही निसर्गात रमेल. निसर्गासारखा दुसरा मित्र नाही, आनंद व मंनोरंजन देण्यासारख निस्रर्गाची दुसरी देन नाही. चार कुंड्यात झाडं लावण्यानं तेवढच टिव्हीच्या रिमोट वर कुणाचा रिमोट असावा यावरून भांडण होणार नाही. निसर्गाच्या निर्वाज्य प्रेमाने घरातही आनंद पसरले. समाधान मिळेल. चार कुंड्या घरा दारात फुलवण्यानं शुध्द हवा मिळेल, पर्यावरणासाठी काहीतरी मदत होईल. तसही कुठं कुंड्या विकत आणून आपल्याला बाग फुलवायची आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेला पालापाचोळा, नारळाच्या चार शेंड्या, वाळलेलं किचन वेस्ट नि ते भरण्यासाठी एक लिटरच्या शितपेयाच्या बाटल्या, दुधाच्या, पिठाच्या पिशवा, जूने माठ सहज वापरता येतात की.. सुरवात करा… बघा पटलं तर आम्ही आहोतच…संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. ९८५०५६९६४४, ८०८७४७५२४२

लेख आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर करा.

====================================================================

cc tmak COVER.jpg

लेखाच्या आरंभी असलेले स्वलिखीत, स्वअनुभवीत, स्वः चिंतीत असलेल्या बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन संदर्भातील मोजक्या समर्पक शव्दातीत, बागप्रेमीनी फेसबूकवर लाईक्स केलेल्या मराठी- हिंदी भाषेतील डोळे उघडणार्या व कृतीला प्रवृत्त करणार्या ६३६ बोधपर वाक्यांचा संग्रह असलेले तुम्हाला माहित आहे का? पुस्तक. फक्त २०० रू. ( पोस्ट खर्चासहित)

========================================================================

तुम्हाला माहित आहे का? पुस्तक माहिती- (PDF Download)

पुस्तक माहिती (Video)

तुम्हाला माहित आहे का? Online खरेदीसाठी लिंक पहा..

पुस्तकाबद्दलची या पूर्वी प्रकाशीत झालेली माहिती वाचा…

 

http://www.gacchivarchibaug.in

टीपः अशाच टीप्स वाचण्यासाठी व्हाट्स अप करा… 9850569644

वाचकांची प्रतिक्रिया….

its Enough? TMAK 3/636


ad-nauseum-1562850_1280.jpg

झाडे लावा, झाडे जगवा, चळवळ गरजेचीच, पण सिमेंटच्या जंगलातील वैराण वाळवंटरूपी टेरेसही हिरवाईने सजवणे तेवढेच गरजेचे.

संदर्भः तुम्हाला माहित आहे का? पान. न.१२ कोट न. ३/६३६

पर्यावरणाचं महत्व हे सर्वच जाणत आहेत. ज्यांना रोजच्या भाकरीची चिंता पडली आहे. ते रोजच्या भाकरीच्या शोधात आहेत. त्यामुळे ते व ज्याचं पोट भरून सात पिढ्या बसून खातील एवढलं कमवलं आहे अशा दोन वर्गातील मधील जो वर्ग आहे. तो म्हणजे आपण मध्यमवर्गीय.. तो जगाची सारीच चिंता वाहतो तसेच आपले कर्तव्य ही जाणतो. पर्यावरणाचं भान असणारा व त्यासाठी काही करू इच्छिणारा हाच तो मध्यमवर्ग. या वर्गाचा पूर्वीही व आता पर्यावरण संरक्षणात बर्यापैकी सहभाग वाढू लागलाय. म्हणजे आपल्या बरोबर आपली जीवसृष्टी वाचावी, ति पुढील पिढीपर्यंत पोहचावं म्हणून संसार सांभाळून शक्य तेवढं करत आहेत. परोपकार, भूतदयेची भावना असलेली ही मंडळी झाडं कशी वाढतील यातही सहभाग घेत आहेत. काही मंडळीना झाडं लावण्याची हौस असते. पण ती जगवणे हे आपले कर्तव्य आहे हे मानणारी मंडळी अहोरात्र रक्ताचे पाणी करून झाडं, वनराई जगवताहेत. त्याला आता चळवळीचे स्वरूप येवू लागले आहे. हे सध्याची खूप जमेची बाजू आहे. आणि हे सारं करणार्या व्यक्तिंना, गटाला खरंच खूप धन्यवाद, की तुम्ही आमच्या वाटेचाही प्राणवायू तयार करत आहात. …

हे सारं महत्वाच आहेच… ही झाली पर्यावरण वाचवण्यासाठीच्या अनेक आघाडीपैकीची एक आघाडी, एक पुढाकार, मग तेवढा पुढाकार पुरेसा का?, झाली आता झाडे लावून, जगवून मग संपल का आपलं काम? नाही ना… औद्योगीक क्रांतीनंतर मानवप्राण्याने आपल्या स्वतःसाठी इतरांचही बरंच ओरबाडलं आहे आपण ते एका रात्रीत नि एका प्रयत्नात ते भरून येण्यासारखं नाही. पर्यावरण हानीची जखम फार मोठी आहे. ती भरण्यासाठीसुध्दा प्रत्येकाला व सामुहिकपणे बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. आपण ज्या शहरात राहतो. त्या शहरात पर्यावरणाला विरोधी असे साहित्य म्हणजे सिमेंटच्या वाळंवटातच राहतो असे म्हणा ना… जरा कडक उन्हात, सुर्य माथ्यावर असतांना टेरेसवर गेलं की सारे चटके कळतात. अधिक उंचावर गेलं की हे सारं शहरभर दिसतं. टेरेस वर कितीतरी जागा रिकामी, ओस पडली आहे. किंबहूना वाया जात आहे. आपण हे सारे हिरवाईने फुलवली तर! ही कल्पना नाही आहे. काही लोक यासाठी प्रयत्न सुरू केलेत. आणि गच्चीवरची बाग, नाशिक तर पूर्णवेळ काम करत आहे. झाडं ही आपल्यासाठी पब्लिक आक्सीजन हब आहेत. तर आपल्या बाल्कनीत, टेरेसवर लागवलेली चार कुंड्यातली झाडं ही सुध्दा प्राईव्हेट आक्सीजन हब आहेत. त्यामुळे फक्त झाडं जगवून चालणार नाही तर आपल्या घराच्या, आजूबाजूला छतावर बाग फुलवणं खूप गरजेचं आहे.

मध्यंतरी ठाणे या शहरात गच्चीवरची बागचे प्रदर्शन आयोजीत केले होते. तेथे त्यांना याची गोडीच नव्हती. विचारपुस केली असता कळाले की कळाले की अपार्टमेंट मधे खिडकीत, बाल्कनीत अशी कुंड्यात झाडे लावण्यास मनाई आहे. कारण रंग दिलेल्या भिंती खराब होतात. नाशिक मधील एका अपार्टमेंट मधला अनुभव तर त्याहून भयंकर आहे. सामूहिक मालकी असलेले टेरेसवर, ते कुटुंब वरच्या मजल्यावर राहत होते त्याला लागूनच वरच्या टेरेस वर बाग फुलवण्याची इच्छा होती. तर बाग फुलवत असेलेल्या कुटुंबाला इतरांनी हाताघाईवर येत त्याला मनाई केली. का तर ती सामूहिक मालकी आहे. कुणा एकट्यानेच का बागेचा आनंद घ्यावा… कुणा एकट्याने विषमुक्त भाज्या का खाव्यात, अशा जेलेसीपायी ते इतरांना पर्यावरणाचा जपू पाहणार्या इच्छुक मंडळीना आडकाठी केली. असल्या आडमुठेपणाला काय म्हणावं..?. माझ्या निरिक्षणात असे आले आहे की अशी बाग फूलण्यास विरोध करणारी मंडळी मानसिक रोगांना बळी पडलेली असतातच पण ते आपल्या कुंटुबातील सदस्यांनाही त्यात ओढतात नि कौटुबिक विनाश करून घेतात. मुळातच गच्ची, बाल्कनीत बाग फुलवणार्यांना विरोध करणारी मंडळी खरंच समाधान जगणं सोडाच… मरत तरी असतील का हो..?. अशी चिंता नेहमी सतावते. वातावरणात किती उष्मा वाढलाय. जिवाची काहीली होतेय. काही माणसं निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी आसूसलेली असतात. अशा कामांनाही विरोध होत असेल तर मला वाटत ही विरोधी करणारी मंडळी आंतकवादीच आहे. जे Suicide Bom बनून समाजात फिरत आहेत. कायद्याची भाषा, अवास्तव तार्किक (अकलेचे तारे) म्हणणं मांडतात. भिंती खराब होण्यापेक्षा आज प्राणवायूची, शुध्द हवेची जास्त गरज आहे. हे कसे त्यांना कळत नाही. असो.. जे वांच्छिल ते ते लाभो….

लेख आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर करा.

cc tmak COVER.jpg

लेखाच्या आरंभी असलेले स्वलिखीत, स्वअनुभवीत, स्वः चिंतीत असलेल्या बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन संदर्भातील मोजक्या समर्पक शव्दातीत, बागप्रेमीनी फेसबूकवर लाईक्स केलेल्या मराठी- हिंदी भाषेतील डोळे उघडणार्या व कृतीला प्रवृत्त करणार्या ६३६ बोधपर वाक्यांचा संग्रह असलेले तुम्हाला माहित आहे का? पुस्तक. फक्त २०० रू. ( पोस्ट खर्चासहित)

पुस्तक माहिती- (PDF Download)

पुस्तक माहिती (Video)

Online खरेदीसाठी लिंक पहा..

पुस्तकाबद्दलची या पूर्वी प्रकाशीत झालेली माहिती वाचा…

http://www.gacchivarchibaug.in

टीपः अशाच टीप्स वाचण्यासाठी व्हाट्स अप करा… ९८५०५६९६४४

Book: तु.मा.आ.का? 1/636 आपण बदलणार कधी?

नदीला आपण माता समजतो पण तिलाच प्रदुर्षीत करतो. तर परदेशात नदीला नदीच मानतात पण त्याच्या नद्या स्वच्छ सुदंर, जीवनदायीनी असतात. हा फरक आपल्याकडे असला तरी….


water-3361540_1920.jpg

शेती, बागबगीचा, किचन, बाथरूममधे

रसायने वापराने नदीची जैवविविधता संपून

प्रदुर्षन वाढते आणि आपण

नदी वाचवण्याच्या फक्त गप्पा करतो.

संदर्भः तुम्हाला माहित आहे का?

पान. न.१२ कोट न. १/६३६

सोशल मिडीयामुळे बर्या वाईट गोष्टीचा प्रचार प्रसार होत असतो. सामाजिक प्रश्नाचा उहापोह, मत मतांतरे होत असतात. यातील एक महत्वाचा प्रश्न चर्चिला जातोय तो म्हणजे पर्यावरण संरक्षणाचा. हा प्रश्न जसा एका दिवसात तयार झाला नाही. तसाच तो एका दिवसात निकाली निघणार नाही. तसेच तो कुणा एकट्यामुळे सुरू केला असेही नाही. त्यात आपल्या सार्यांचेच पाप आहे व त्यावर मात करण्यासाठी आता प्रत्येकालाच त्यात कृतीयुक्त सहभाग नोंदवून त्यावर आपल्याला निश्चितच मात करता येऊ शकते.

नदीला आपण माता समजतो पण तिलाच प्रदुर्षीत करतो. तर परदेशात नदीला नदीच मानतात पण त्याच्या नद्या स्वच्छ सुदंर, जीवनदायीनी असतात. हा फरक आपल्याकडे असला तरी नदी प्रदुर्षणाबद्दल जागृती वाढत आहे. त्यासाठी आंदोलने केली जात आहे. सरकारी पातळीवर संवदेनशीलतेने पाहिले जावे म्हणून दबावगट काम करत आहेत. पण हे खरेच एवढे पुरेसे आहे का?

खरी गंमत पुढे आहे. मुळातच नदी का प्रदुर्षीत होते याचा आपण विचार करतो का, त्याचा आपल्या घरापासून शोध घेतो का ? की केवळ सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था नाही, ते नदीच्या पाण्यात मिसळवले जाते एवढेच कारण आहे ? हे कारण लाख सत्य असले तरी नदी प्रदुर्षणाचे केवळ हे एकच कारण नाही… जनहो… आपण एक बोट प्रशासनाकडे, उदयोगांकडे दाखवत आहोत. चार बोट आपल्याकडे आहेत. याच भान आपण ठेवलं तर नक्कीच नदी प्रदुर्षणावर आपण काही केल्याचं समाधान मिळू शकेन.

शेती, बागबगीचा, किचन, बाथरूममधे

रसायने वापराने नदीची जैवविविधता संपून

प्रदुर्षन वाढते आणि आपण

नदी वाचवण्याच्या फक्त गप्पा करतो.

आपण शेत, घरच्या बागबगीचा फुलवतांना कितीतरी रसायने वापरतो. बाथरूम मधे तर भरमसाठ,  हे सारं पावसाळ्यात वाहून नदीत मिसळतात. त्यामुळे तेथील पाणी स्वच्छ ठेवणारे जिवाणू, वनस्पती याला मारक ठरतात. जैवविविधतेची साखळी नष्ट होते व पाणी प्रदुर्षीत होण्यास सुरवात होते. आपण मानवी साखळी करून, आंदोलने करून हा प्रश्न सुटणार नाही. आपण शेती, बाग बगीच्यात रसायनांच्या ऐवजी देशीगायीचे गोमुत्र, वनस्पतीपासून बनवलेले कीड नियंत्रणे आपण वापरू शकतो. घरासमोरच्या हिरवळीला युरिया वापरण्यापेक्षा निमपेंड, जिवामृत वापरले तर हिरवळ ही हिरवीगार होते. व दोनही गोष्टी मातीच्या, पाण्याच्या आरोग्याला आरोग्य प्रदान करतात. तसेच किचन, बाथरूम, फरशी धुण्यासाठी कितीतरी रसयाने वापरले जातात. त्यालाही पर्याय आहेत. जसे भांडे व कपडे धुण्यासाठी राख, रिठा, तुरटीचा वापर करू शकतो. तर फरशी बाथरूम धुण्यासाठी पाण्याबरोबर देशी गायीचे गोमुत्र वापरू शकतो.

आपल्याला सर्वच ठिकाणी, सर्वच वेळेस हे पर्याय असतील असे नाही. काही ठिकाणी हे टाळावे लागतीलही पण आज आपला रसायन वापराचा टक्का हा शंभर असेल तर तो हळू हळू कमी नक्कीच होईल. वरील बोधपर वाक्य हे विचार करण्यासाठीच रचले आहे. खरं तर आपल्या प्रत्येकाकडे नदी वाचवण्यासाठी बरेच काही पर्याय आहेत. कदाचीत आपण ते पाळतही असाल. तर आम्हालाही कळवा आपले प्रयत्न …  आपण चला तर मग फक्त गप्पा मारण्यापेक्षा कृतीशील कामाला लागूया…

cc tmak COVER.jpg

लेखाच्या आरंभी असलेले स्वलिखीत, स्वअनुभवीत, स्वः चिंतीत असलेल्या बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन संदर्भातील मोजक्या समर्पक शव्दातीत, बागप्रेमीनी फेसबूकवर लाईक्स केलेल्या मराठी- हिंदी भाषेतील डोळे उघडणार्या व कृतीला प्रवृत्त करणार्या ६३६ बोधपर वाक्यांचा संग्रह असलेले तुम्हाला माहित आहे का? पुस्तक. फक्त २०० रू. ( पोस्ट खर्चासहित)

पुस्तक माहिती- (PDF Download)

Book trailer: तुम्हाला माहित आहे का?

Online खरेदीसाठी लिंक पहा..

पुस्तकाबद्दलची या पूर्वी प्रकाशीत झालेली माहिती वाचा…

http://www.gacchivarchibaug.in

टीपः अशाच टीप्स वाचण्यासाठी व्हाट्स अप करा… ९८५०५६९६४४

 

Book तुम्हाला माहित आहे का?


पर्यावरणासाठी खूप काही करावसं वाटतय

पण सुरवात कुठुन करावी…

बर हे सविस्तर वाचायला वेळ तरी कुठय

तर वाचा छोट्या छोट्या वाक्यातून जाणून घ्या…

बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण,

कचरा व्यवस्थापन संदर्भात टिप्सचे पुस्तक

तुम्हाला माहित आहे का

 पुस्तक कोणासाठी …

पर्यावरण विषय समजून घेण्यासाठी

विषय इतरांना समजून सांगण्यासाठी

सुविचाराप्रमाणे फळ्यावर लिहण्यासाठी

छोट्या वाक्यातून वरील विषयात मूलभूत संकल्पना

समजून घेणेसाठी, माहिती वाढवण्यासाठी व शाळेत, सभेत बोलण्यासाठी…

बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण,

कचरा व्यवस्थापन संदर्भात ५५५ वाक्यांच्या खजिन्यांचे पुस्तक…

पुस्तकः तुम्हाला माहित आहे का

फक्त २०० रू. पुस्तक पोस्टाने पाठवू.

www.gacchivarchibaug.in

Binding: Paperback

 

पुस्तक रूपात घरबसल्या अनुभवा, गच्चीवरची बाग कार्यशाळा स्वलिखीत, स्वअनुभवीत, स्वः चिंतीत असलेल्या बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन संदर्भातील मोजक्या समर्पक शव्दातीत, मराठी- हिंदी भाषेतील डोळे उघडणार्या व कृतीला प्रवृत्त करणार्या ६३६ बोधपर वाक्यांचा संग्रह असलेले तुम्हाला माहित आहे का? पुस्तक. फक्त २०० रू. ( पोस्ट खर्चासहित)

पुस्तक माहिती- (PDF Download)पुस्तक माहिती (Video)Online खरेदीसाठी लिंक पहा..

http://www.gacchivarchibaug.in/tumhala-mahit-aahe-ka.html

 

%d bloggers like this: