
शेती, बागबगीचा, किचन, बाथरूममधे
रसायने वापराने नदीची जैवविविधता संपून
प्रदुर्षन वाढते आणि आपण
नदी वाचवण्याच्या फक्त गप्पा करतो.
संदर्भः तुम्हाला माहित आहे का?
पान. न.१२ कोट न. १/६३६
सोशल मिडीयामुळे बर्या वाईट गोष्टीचा प्रचार प्रसार होत असतो. सामाजिक प्रश्नाचा उहापोह, मत मतांतरे होत असतात. यातील एक महत्वाचा प्रश्न चर्चिला जातोय तो म्हणजे पर्यावरण संरक्षणाचा. हा प्रश्न जसा एका दिवसात तयार झाला नाही. तसाच तो एका दिवसात निकाली निघणार नाही. तसेच तो कुणा एकट्यामुळे सुरू केला असेही नाही. त्यात आपल्या सार्यांचेच पाप आहे व त्यावर मात करण्यासाठी आता प्रत्येकालाच त्यात कृतीयुक्त सहभाग नोंदवून त्यावर आपल्याला निश्चितच मात करता येऊ शकते.
नदीला आपण माता समजतो पण तिलाच प्रदुर्षीत करतो. तर परदेशात नदीला नदीच मानतात पण त्याच्या नद्या स्वच्छ सुदंर, जीवनदायीनी असतात. हा फरक आपल्याकडे असला तरी नदी प्रदुर्षणाबद्दल जागृती वाढत आहे. त्यासाठी आंदोलने केली जात आहे. सरकारी पातळीवर संवदेनशीलतेने पाहिले जावे म्हणून दबावगट काम करत आहेत. पण हे खरेच एवढे पुरेसे आहे का?
खरी गंमत पुढे आहे. मुळातच नदी का प्रदुर्षीत होते याचा आपण विचार करतो का, त्याचा आपल्या घरापासून शोध घेतो का ? की केवळ सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था नाही, ते नदीच्या पाण्यात मिसळवले जाते एवढेच कारण आहे ? हे कारण लाख सत्य असले तरी नदी प्रदुर्षणाचे केवळ हे एकच कारण नाही… जनहो… आपण एक बोट प्रशासनाकडे, उदयोगांकडे दाखवत आहोत. चार बोट आपल्याकडे आहेत. याच भान आपण ठेवलं तर नक्कीच नदी प्रदुर्षणावर आपण काही केल्याचं समाधान मिळू शकेन.
शेती, बागबगीचा, किचन, बाथरूममधे
रसायने वापराने नदीची जैवविविधता संपून
प्रदुर्षन वाढते आणि आपण
नदी वाचवण्याच्या फक्त गप्पा करतो.
आपण शेत, घरच्या बागबगीचा फुलवतांना कितीतरी रसायने वापरतो. बाथरूम मधे तर भरमसाठ, हे सारं पावसाळ्यात वाहून नदीत मिसळतात. त्यामुळे तेथील पाणी स्वच्छ ठेवणारे जिवाणू, वनस्पती याला मारक ठरतात. जैवविविधतेची साखळी नष्ट होते व पाणी प्रदुर्षीत होण्यास सुरवात होते. आपण मानवी साखळी करून, आंदोलने करून हा प्रश्न सुटणार नाही. आपण शेती, बाग बगीच्यात रसायनांच्या ऐवजी देशीगायीचे गोमुत्र, वनस्पतीपासून बनवलेले कीड नियंत्रणे आपण वापरू शकतो. घरासमोरच्या हिरवळीला युरिया वापरण्यापेक्षा निमपेंड, जिवामृत वापरले तर हिरवळ ही हिरवीगार होते. व दोनही गोष्टी मातीच्या, पाण्याच्या आरोग्याला आरोग्य प्रदान करतात. तसेच किचन, बाथरूम, फरशी धुण्यासाठी कितीतरी रसयाने वापरले जातात. त्यालाही पर्याय आहेत. जसे भांडे व कपडे धुण्यासाठी राख, रिठा, तुरटीचा वापर करू शकतो. तर फरशी बाथरूम धुण्यासाठी पाण्याबरोबर देशी गायीचे गोमुत्र वापरू शकतो.
आपल्याला सर्वच ठिकाणी, सर्वच वेळेस हे पर्याय असतील असे नाही. काही ठिकाणी हे टाळावे लागतीलही पण आज आपला रसायन वापराचा टक्का हा शंभर असेल तर तो हळू हळू कमी नक्कीच होईल. वरील बोधपर वाक्य हे विचार करण्यासाठीच रचले आहे. खरं तर आपल्या प्रत्येकाकडे नदी वाचवण्यासाठी बरेच काही पर्याय आहेत. कदाचीत आपण ते पाळतही असाल. तर आम्हालाही कळवा आपले प्रयत्न … आपण चला तर मग फक्त गप्पा मारण्यापेक्षा कृतीशील कामाला लागूया…
लेखाच्या आरंभी असलेले स्वलिखीत, स्वअनुभवीत, स्वः चिंतीत असलेल्या बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन संदर्भातील मोजक्या समर्पक शव्दातीत, बागप्रेमीनी फेसबूकवर लाईक्स केलेल्या मराठी- हिंदी भाषेतील डोळे उघडणार्या व कृतीला प्रवृत्त करणार्या ६३६ बोधपर वाक्यांचा संग्रह असलेले तुम्हाला माहित आहे का? पुस्तक. फक्त २०० रू. ( पोस्ट खर्चासहित)
Book trailer: तुम्हाला माहित आहे का?
पुस्तकाबद्दलची या पूर्वी प्रकाशीत झालेली माहिती वाचा…
http://www.gacchivarchibaug.in
टीपः अशाच टीप्स वाचण्यासाठी व्हाट्स अप करा… ९८५०५६९६४४
Comments are closed.