झाडे लावा, झाडे जगवा, चळवळ गरजेचीच, पण सिमेंटच्या जंगलातील वैराण वाळवंटरूपी टेरेसही हिरवाईने सजवणे तेवढेच गरजेचे.
संदर्भः तुम्हाला माहित आहे का? पान. न.१२ कोट न. ३/६३६
पर्यावरणाचं महत्व हे सर्वच जाणत आहेत. ज्यांना रोजच्या भाकरीची चिंता पडली आहे. ते रोजच्या भाकरीच्या शोधात आहेत. त्यामुळे ते व ज्याचं पोट भरून सात पिढ्या बसून खातील एवढलं कमवलं आहे अशा दोन वर्गातील मधील जो वर्ग आहे. तो म्हणजे आपण मध्यमवर्गीय.. तो जगाची सारीच चिंता वाहतो तसेच आपले कर्तव्य ही जाणतो. पर्यावरणाचं भान असणारा व त्यासाठी काही करू इच्छिणारा हाच तो मध्यमवर्ग. या वर्गाचा पूर्वीही व आता पर्यावरण संरक्षणात बर्यापैकी सहभाग वाढू लागलाय. म्हणजे आपल्या बरोबर आपली जीवसृष्टी वाचावी, ति पुढील पिढीपर्यंत पोहचावं म्हणून संसार सांभाळून शक्य तेवढं करत आहेत. परोपकार, भूतदयेची भावना असलेली ही मंडळी झाडं कशी वाढतील यातही सहभाग घेत आहेत. काही मंडळीना झाडं लावण्याची हौस असते. पण ती जगवणे हे आपले कर्तव्य आहे हे मानणारी मंडळी अहोरात्र रक्ताचे पाणी करून झाडं, वनराई जगवताहेत. त्याला आता चळवळीचे स्वरूप येवू लागले आहे. हे सध्याची खूप जमेची बाजू आहे. आणि हे सारं करणार्या व्यक्तिंना, गटाला खरंच खूप धन्यवाद, की तुम्ही आमच्या वाटेचाही प्राणवायू तयार करत आहात. …
हे सारं महत्वाच आहेच… ही झाली पर्यावरण वाचवण्यासाठीच्या अनेक आघाडीपैकीची एक आघाडी, एक पुढाकार, मग तेवढा पुढाकार पुरेसा का?, झाली आता झाडे लावून, जगवून मग संपल का आपलं काम? नाही ना… औद्योगीक क्रांतीनंतर मानवप्राण्याने आपल्या स्वतःसाठी इतरांचही बरंच ओरबाडलं आहे आपण ते एका रात्रीत नि एका प्रयत्नात ते भरून येण्यासारखं नाही. पर्यावरण हानीची जखम फार मोठी आहे. ती भरण्यासाठीसुध्दा प्रत्येकाला व सामुहिकपणे बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. आपण ज्या शहरात राहतो. त्या शहरात पर्यावरणाला विरोधी असे साहित्य म्हणजे सिमेंटच्या वाळंवटातच राहतो असे म्हणा ना… जरा कडक उन्हात, सुर्य माथ्यावर असतांना टेरेसवर गेलं की सारे चटके कळतात. अधिक उंचावर गेलं की हे सारं शहरभर दिसतं. टेरेस वर कितीतरी जागा रिकामी, ओस पडली आहे. किंबहूना वाया जात आहे. आपण हे सारे हिरवाईने फुलवली तर! ही कल्पना नाही आहे. काही लोक यासाठी प्रयत्न सुरू केलेत. आणि गच्चीवरची बाग, नाशिक तर पूर्णवेळ काम करत आहे. झाडं ही आपल्यासाठी पब्लिक आक्सीजन हब आहेत. तर आपल्या बाल्कनीत, टेरेसवर लागवलेली चार कुंड्यातली झाडं ही सुध्दा प्राईव्हेट आक्सीजन हब आहेत. त्यामुळे फक्त झाडं जगवून चालणार नाही तर आपल्या घराच्या, आजूबाजूला छतावर बाग फुलवणं खूप गरजेचं आहे.
मध्यंतरी ठाणे या शहरात गच्चीवरची बागचे प्रदर्शन आयोजीत केले होते. तेथे त्यांना याची गोडीच नव्हती. विचारपुस केली असता कळाले की कळाले की अपार्टमेंट मधे खिडकीत, बाल्कनीत अशी कुंड्यात झाडे लावण्यास मनाई आहे. कारण रंग दिलेल्या भिंती खराब होतात. नाशिक मधील एका अपार्टमेंट मधला अनुभव तर त्याहून भयंकर आहे. सामूहिक मालकी असलेले टेरेसवर, ते कुटुंब वरच्या मजल्यावर राहत होते त्याला लागूनच वरच्या टेरेस वर बाग फुलवण्याची इच्छा होती. तर बाग फुलवत असेलेल्या कुटुंबाला इतरांनी हाताघाईवर येत त्याला मनाई केली. का तर ती सामूहिक मालकी आहे. कुणा एकट्यानेच का बागेचा आनंद घ्यावा… कुणा एकट्याने विषमुक्त भाज्या का खाव्यात, अशा जेलेसीपायी ते इतरांना पर्यावरणाचा जपू पाहणार्या इच्छुक मंडळीना आडकाठी केली. असल्या आडमुठेपणाला काय म्हणावं..?. माझ्या निरिक्षणात असे आले आहे की अशी बाग फूलण्यास विरोध करणारी मंडळी मानसिक रोगांना बळी पडलेली असतातच पण ते आपल्या कुंटुबातील सदस्यांनाही त्यात ओढतात नि कौटुबिक विनाश करून घेतात. मुळातच गच्ची, बाल्कनीत बाग फुलवणार्यांना विरोध करणारी मंडळी खरंच समाधान जगणं सोडाच… मरत तरी असतील का हो..?. अशी चिंता नेहमी सतावते. वातावरणात किती उष्मा वाढलाय. जिवाची काहीली होतेय. काही माणसं निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी आसूसलेली असतात. अशा कामांनाही विरोध होत असेल तर मला वाटत ही विरोधी करणारी मंडळी आंतकवादीच आहे. जे Suicide Bom बनून समाजात फिरत आहेत. कायद्याची भाषा, अवास्तव तार्किक (अकलेचे तारे) म्हणणं मांडतात. भिंती खराब होण्यापेक्षा आज प्राणवायूची, शुध्द हवेची जास्त गरज आहे. हे कसे त्यांना कळत नाही. असो.. जे वांच्छिल ते ते लाभो….
लेख आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर करा.
लेखाच्या आरंभी असलेले स्वलिखीत, स्वअनुभवीत, स्वः चिंतीत असलेल्या बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन संदर्भातील मोजक्या समर्पक शव्दातीत, बागप्रेमीनी फेसबूकवर लाईक्स केलेल्या मराठी- हिंदी भाषेतील डोळे उघडणार्या व कृतीला प्रवृत्त करणार्या ६३६ बोधपर वाक्यांचा संग्रह असलेले तुम्हाला माहित आहे का? पुस्तक. फक्त २०० रू. ( पोस्ट खर्चासहित)
पुस्तकाबद्दलची या पूर्वी प्रकाशीत झालेली माहिती वाचा…
http://www.gacchivarchibaug.in
टीपः अशाच टीप्स वाचण्यासाठी व्हाट्स अप करा… ९८५०५६९६४४
You must be logged in to post a comment.