सदर लेख लोकसत्ता- चतुरंग पुरवणीत प्रकाशीत झाला आहे. जवळपास ३९ लेखांची लेखमाला प्रकाशीत झाली आहे. बाग प्रेमीसाठी सादर करत आहे.
५) गच्ची/गॅलरीतील बाग५) गच्ची/गॅलरीतील बाग
बाग फुलवण्यासाठी टेरेस हा सर्वोत्तम पर्याय आहे. स्वच्छ ऊन, स्वच्छ वारा व ऐसपस जागा, निवांतपणा ही टेरेसची वैशिष्टय़े असतात. टेरेसवर प्रतिकूल परिस्थिती (कडक ऊन, उष्ण वारा, माती नाही) असली तर ती नियंत्रित नक्की असते. टेरेसचे वॉटर प्रूफिंग केले असेल तर खबरदारी म्हणून ५०० मायक्रॉनचा प्लॅस्टिक पेपर सर्वात तळाशी वापरून, त्यावर सरळच्या सरळ लांब विटाचे वाफे साकारता येतात. टेरेसचे बांधकाम थोडे जुने किंवा गळतीची शक्यता वाटल्यास टेरेसवर १ इंच जाडीचा सिमेंट काँक्रीटचा थर द्यावा. त्यावर विटा रचाव्यात व त्यावर प्लॅस्टिक पेपर अंथरून विटांचे वाफे तयार करावेत.
टेरेसप्रमाणे फ्लॅटच्या बाल्कनी/गॅलरीत अशी बाग फुलवता येईल. अगदी ५ बाय १० इतकी जागा असेल तरी चालते. अशा जागेच्या नियोजनासाठी शक्य असल्यास लोखंडी पायऱ्यांची मांडणी करून घ्यावी. प्रत्येक पायरी ही ८ इंच रुंदीची असली तरी चालते. २ फुटांच्या रुंदीच्या मांडणीत ८ इंचाच्या ३ पायऱ्या करता येतात. येथे आयताकृती/सपाट बुडाच्या मातीच्या, प्लॅस्टिकच्या कुंडय़ा किंवा नर्सरी बॅगही रचून ठेवता येतात.
बाल्कनी/गॅलरीला सुरक्षा म्हणून लोखंडी ग्रिल लावता येते. याचाही कल्पकतेने वापर करून कुंडय़ा ठेवण्यासाठी पायरी किंवा कुंडी बसेल अशी गोल रिंग करून घ्यावी. कुंडय़ा, पिशव्या हलवताना सहजपणा येतो.
गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक.
आपल्याला लेख आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर करा.. आमच्या पर्यावरण कार्याचा, नावाचा उल्लेख करावा. ही विनंती…
व्हिडीओ पहाः देशी गाय-गच्चीवरची बाग नाशिक
============================================================================
टीपः १) सदर लेख लोकसत्ता- चतुरंग पुरवणीत पूर्व प्रकाशीत झाला आहे. जवळपास ३९ लेखांची लेखमाला प्रकाशीत झाली आहे. सदर लेखमालेचे पुस्तक रूपात (Version 2, Edition 1) प्रकाशीत करणेकामी सर्वप्रकारचे प्रकाशन संस्कार पूर्ण झाले आहेत. पंरतू पैशाअभावी पुस्तक प्रकाशीत करणे अडचणीचे आहे. पर्यावरण हेतूसाठी काही आर्थिक मदत करू इच्छित असल्यास आपले स्वागत आहे. आपले नाव आर्थिकमदत म्हणून पुस्तकात प्रकाशीत केले जाईल.. (आमची कोणतीही संस्था नाही. हे व्यक्तिगत व कौटुंबिक पातळीवर पर्यावरण संवर्धनाचे काम चालू आहे)
२) सद्य स्थितीत गच्चीवरची बाग (Version-1, Edition 2)- व्दितीय आवृत्ती हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. लोकसत्ता -चुंतुरंग पुरवणीत प्रकाशीत केलेले लेख हे ग.बा. २०१३ आवृत्तीपेक्षा वेगळया स्वरूपाची मांडणी केली आहे.
गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक.
https://organic-vegetable-terrace-garden.business.site/
👆वरील link ही गच्चीवरची बाग नाशिक ची आहे. आपण या site वर click करून आपला review नोंदवावा. आपल्या या एका प्रयत्नाने आम्ही करत असलेले पर्यावरण पुरक काम व निःशुल्क मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल.
संदीप चव्हाण नाशिक.