सदर लेख लोकसत्ता- चतुरंग पुरवणीत प्रकाशीत झाला आहे. जवळपास ३९ लेखांची लेखमाला प्रकाशीत झाली आहे. बाग प्रेमीसाठी सादर करत आहे.
१)सुरवात…
शहरातील रोजच्या धावपळीचा, त्याच त्याच कामांचा ताण आणि शीण येतोच. मनाला विरंगुळा म्हणून कधी वाचन करतो तर कधी चित्र वाहिन्यांवर फेरफटका मारत असतो. पण मन.. मन तसंच राहातं.. एकटं.. उदास.. शिणलेलं.. काही तरी शोधत असतं.. पण सापडत नाही.. ते सैरभैर धावतच असतं. मनातले विचार काही वेळ का होईना पण बाजूला ठेवून निवांतपणा, आनंदाचे दोन क्षण अनुभवता येईल असं काही तरी हवं असतं. ते सापडतं..
खिडकीतून दूरवर दिसणारे किंवा बागेतील एखादे झाड किंवा इतरांच्या गॅलरीत निरागसपणे डोलणारी रंगीबेरंगी फुलं पाहून.. आपल्याला थोडं निवांत वाटतं, मन सुखावतं.. डोळ्यांना बरं वाटतं. आणि नकळत आपल्याकडेही असं एखादं कुंडीत फुलाचं झाडं असावं असा विचार मनात येतो..
विचार मनात आला की बुद्धी आपल्याला सावध करते. तर्क करून ते खोडून काढते.. कशाला कट कट.. कुंडय़ा आणा, झाडं आणा.. रोज रोज पाणी घाला.. खत घाला, कीड पडते.. बरं त्याविषयी विचारायला जावं तर कुणाला विचारावं असे एक ना अनेक प्रश्न.. जाऊ दे असं म्हणून.. खिडकीतून समोरचीच झाडं बघून विषय सोडून देतो.पण ही कुंडीतील बाग फुलवणं आपल्या, कुटुंबाच्या आरोग्यासाठी हितावह आहे. बाजारात रासायनिक खतांचा मारा झालेली भाज्या-फळे असताना, घरची ताजी-टवटवीत भाजी तीही सेंद्रिय पद्धतीने फुलवता येईल, हा विचारही करायला हवा ना! चला तर मग, घरच्या घरी सकस भाज्या कशा पिकवू शकतो ते पाहूया अधिक विस्तृतपणे.
गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक.
आपल्याला लेख आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर करा.. आमच्या पर्यावरण कार्याचा, नावाचा उल्लेख करावा. ही विनंती…
व्हीडिओ पहाः Nashik : Plantation On Roof top Of building
============================================================================
टीपः १) सदर लेख लोकसत्ता- चतुरंग पुरवणीत पूर्व प्रकाशीत झाला आहे. जवळपास ४० लेखांची लेखमाला प्रकाशीत झाली आहे. सदर लेखमालेचे पुस्तक रूपात (Version 2, Edition 1) प्रकाशीत करणेकामी सर्वप्रकारचे प्रकाशन संस्कार पूर्ण झाले आहेत. पंरतू पैशाअभावी पुस्तक प्रकाशीत करणे अडचणीचे आहे. पर्यावरण हेतूसाठी काही आर्थिक मदत करू इच्छित असल्यास आपले स्वागत आहे. आपले नाव आर्थिकमदत म्हणून छापिल पुस्तकात प्रकाशीत केले जाईल.. (आमची कोणतीही संस्था नाही. हे व्यक्तिगत व कौटुंबिक पातळीवर पर्यावरण संवर्धनाचे काम चालू आहे)
२) सद्य स्थितीत गच्चीवरची बाग (Version-1, Edition 2)- व्दितीय आवृत्ती हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. लोकसत्ता -चुंतुरंग पुरवणीत प्रकाशीत केलेले लेख हे ग.बा. २०१३ आवृत्तीपेक्षा वेगळया स्वरूपाची मांडणी केली आहे.
(सदर लेख मालिका पुस्तक स्वरूपात – रंगीत आवृत्ती प्रकाशीत करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. आपण अर्थ सहाय्य केल्यास पुस्तिका इतरांपर्यंत पोहचवण्यास नक्कीच मदत होईल. आपले योगदान सन्मानपूर्वक पुस्तकाच्या प्रथम पानावर प्रकाशीत केले जाईल, आपले छोटेसे योगदान ही आमच्यासाठी बहूमुल्य असणार आहे)
गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक.
http://www.gacchivarchibaug.in
Email: sandeepkchavan79@gmail.com
You must be logged in to post a comment.