मुलं पालेभाज्या खायला नाक का मुरडतात? फास्ट फूड, जे अबाल वृध्दांना का आवडत? थोडा विचार तर करा… संदर्भः तुम्हाला माहित आहे का? पान. न.१२ कोट न. ५/६३६“अहो आमची मुलं भाज्या खायलाच नाही म्हणतात”. अशी प्रत्येक गृहदक्ष असलेल्या आईची तक्रार असते. आपण फक्त तक्रार करतो. त्यावर उपाय शोधत नाही. अर्थात त्यावर आजच्या बाजारातील उत्पादनांनी बेमालूम तोडगा काढलाय. मुलांना अमूक तमूक पोषणासाठी आमची उत्पादने वापरा. मग काय आपण ती रासायनिक दुधात देवून त्यांना वाढवत असतो. किंवा मुलांना समजायला लागल की दुकानात मिळाणारी दोन मिनटांत तयार होणारा किंवा पॅक्ड असणार्या उत्पादनांना बळी पडतात. त्यात “तेढा है लेकीन मेरा है” पासून तर कुरकुरे, चिप्स पासून सारेच आले. स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवून तयार केलेले पदार्थ व तेही कनिष्ठ अशा प्लास्टिकच्या वेष्टनात मिळायला लागलेत.बरं हे फक्त मूलंच खात नाही. आपल्या मोठ्यांच्या जिभेलाही त्याची चव लागली की ते खावेसे वाटते. बरं ते एवढंस खावून पोट भरणं सोडाच खाल्ल्याचे समाधानही मिळत नाही. अर्थातच त्यात त्यांनी अशा प्रकारचे रसायनं मिसळेली असतात. की ते खात रहावसं वाटतं. याला चटक लागणं नाही तर व्यसन लागणं म्हणतात. तर अशी ही उत्पादने वय झालेल्यांनाही आवडतात. जसे मूलांना कार्टुन बघावसं वाटतं तसेच वृध्दांनाही आवडतं. त्यातलं ढिशुम ढिशुम…पाहण्यातून अबाल वृध्द सारेच आनंद लुटतात. कारण लहान मूल व वृध्द मंडळी याची आवड निवड सारखीच होत जाते. काही वृध्द व्यक्ती तर दुकानात मिळणारी साखरेच्या गोळ्या खातांना पाहिली आहेत. असो…आपण कर्ते म्हणून याचा विचार केला पाहिजे. फक्त वयच तसं आहे म्हणून तो प्रश्न बाजूला सारण्यासारखा नाही. हे सारं चटपटीत खावंस वाटणं हे सारं रासायनिक प्रिर्झेव्हेटीवची कमाल आहे. जी आपल्याला घातक असतात. आपल्या परंपरेत असे फास्ट फूड नाहीच काहो? दोन मिनटातं तयार होणारी पदार्थ. शेवया, पोहे, मुरमुरे, ओली भेळ, राजगिरांचे लाडू… पण हे सारं आपण लक्षात कुठं घेतो. तर असो… मुद्दा होता. मुलं भाज्या खात नाही..माझा एक अनुभव आपल्याला सांगावासा वाटतो…दहा वर्षापूर्वी नुकतीच बागेला गच्चीवर सुरवात केली होती. टेरेसवरच्या बागेत चार टोमॅटो पिकले होते. ते खाली किचनमधे बायकोला आणून दिले. तिनेही नुकतेच बाजारातून टोमॅटो विकत आणले होते. बाजारातले व घरचे टोमॅटो तिने एकत्र करून फ्रिज मधे ठेवून दिले. माझा मुलगा बाहेर खेळून आला व त्याला टोमॅटो खावसा वाटला. बायकोने त्याला घाई गडबडीत हाताला आला तो टोमॅटो त्याच्या हातात दिला. त्याला तो खूप आवडला. त्याला दुसरा खावासां वाटला. तिने दुसरा दिला. पण या वेळेस त्याने तोंडातून थूंकून टाकला. छि… काय हा टोमॅटो, म्हणून खेळायला गेला.नंतर यावर घरात चर्चा झाली. मी जरा चौकशी केली असता. असे लक्षात आले की पहिला टोमॅटो त्याने जो खाल्ला, त्याला आवडला तो बागेलतला विषमुक्त होता. तर दुसरा हा बाजारातला होता. बघा मुलांना खाण्यांच्या बाबतीत जी नैसर्गिक चव आहे त्याला ते किती पटकन प्रतिक्रीया देतात. (बाजारातल्या भाज्या न खाणं म्हणजे त्याला चवच नसते हे मुख्य कारण आहे) आपण मोठ्यांच्या जिव्हा आता बोथट झाल्या आहेत. त्या त्या भाजीचे महत्व आहे म्हणून गिळलं नाही गेलं तरी ते पोटातं ढकलतो आहोत. नेमकं मुलाना काय आवडतं त्याचा कुत्रीम इंसेन्स पॅक्ड् फूड मधे बेमालूमपणे मिसळेला असतो. जो मोठ्यांच्या लक्षात येत नाही. पॅक्ड फूड खाण्यानेच भारतातील मूलांचे लठ्ठपणाचा आजार वाढतोय. गुबगुबीत असणं वेगळं व अंगावर सुज असणं वेगळं हे आपल्या लक्षात येत नाही किंवा जाणून बूजून त्याकडे दुर्लक्ष करत आहोत.घरच्या भाजीचा दुसरा एक अनुभव आहे. आम्ही एका ताईंच्या घरी भाजीपाल्याची बाग फूलवयाला सुरवात झाली. त्यात पान कोबी (कॅबेज) ही लागवड केला. पण घरातली आठवतील जाणारी मुलगी म्हणाली काका बागेत पान कोबी नका लावू. मला अजिबात आवडत नाही. त्या ताईही म्हणाल्या की जागा अडेल व तसेही कुणाला आवडत नाही म्हणून लागवड करूच नका. मी त्यांना आग्रह केला. घरचा पानकोबीची चव वेगळीच असते. एकदाच त्याची भाजी करा. यथासावकाश कॅबेज मोठा झाला. त्यांनी कढईत फोडणी दिली. घरातील मुलगी केवळ फोडणी दिल्याबरोबर भाजीच्या नुसत्या सुंगधाने तो तिला पहिल्यांदा खावासा वाटला. यातच घरच्या भाजीचे महत्व लक्षात येते.एकूणच काय हरकत आहे. चार कुंड्यामधे चार भाज्या लावयाला. आपल्याला निसर्गाची घडी बसवून दयावयाची आहे. बाकी सारं काम निसर्गच करणार आहे. माझा अनुभव असा सांगतो की घरचा एक टोमॅटो सुध्दा आपल्या जेवणातील वरण हे चवदार बनवू शकते. बघा… प्रयत्न करून. जमेलच.
लेख आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर करा.
लेखाच्या आरंभी असलेले स्वलिखीत, स्वअनुभवीत, स्वः चिंतीत असलेल्या बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन संदर्भातील मोजक्या समर्पक शव्दातीत, बागप्रेमीनी फेसबूकवर लाईक्स केलेल्या मराठी- हिंदी भाषेतील डोळे उघडणार्या व कृतीला प्रवृत्त करणार्या ६३६ बोधपर वाक्यांचा संग्रह असलेले तुम्हाला माहित आहे का? पुस्तक. फक्त २०० रू. ( पोस्ट खर्चासहित)पुस्तक माहिती- (PDF Download)पुस्तक माहिती (Video)Online खरेदीसाठी लिंक पहा..पुस्तकाबद्दलची या पूर्वी प्रकाशीत झालेली माहिती वाचा…http://www.gacchivarchibaug.inटीपः अशाच टीप्स वाचण्यासाठी व्हाट्स अप करा… ९८५०५६९६४४
वाचकांची प्रतिक्रिया
You must be logged in to post a comment.