castle-1789929_1280
म्हणतात की दुकानातल्या उसन्या उडदावर देव पूजू नये. तसेच परक्याच्या बागेतील चोरलेल्या फुलांवर देव पूजू नये… स्वतःच बाग फुलवा.. संदर्भः तुम्हाला माहित आहे का? पान. न.१२ कोट न. ४/६३६आपण माणूस म्हणून अजून बरेच विकसीत होण्याचे बाकी आहोत. श्रध्देने रोज देव पुजतो. पण त्यासाठी दुसर्यांच्या बागेतील फूल, न विचारता किंवा चोरून देवपुजा केली जाते. खरंच काहो अशाने देव पावेल का? आपल्याला तरी समाधान मिळेल का…?मराठीत एक म्हण आहे. पुजेसाठी लागणारे उडदाचे चार दाणे आपण दुकानदाराकडे मागवून पुजा केली तर ती पुजा तरी कुणाची लागू होईल. तसेच फुलांचे आहे. ति बाग फुलवणार्या व्यक्ती खरचं सकाळी सकाळी तरी चांगले चार शब्द फुल तोडून नेणार्यासाठी वापरतील का…?अगदीच अपरिहार्यता असेल तर गोष्ट वेगळी आहे. बागेला जागाच नाही असेही कधीच होणार नाही. काहीना काही पर्याय नक्कीच असतात. आपण शोध घेतो का? मुळातच काही माणसांमधे आळसंच तेवढा भरलेला असतो. पुरूष असतील तर हातावर तंबाखू चोळत बसून राहतील, टी. व्ही. पाहत बसतील व महिला असतील तर चारचौघी एकत्र बसून सुख दुखाःपेक्षा हिच तिच किंवा सुनेचं, जावयाचं बोलत बसतील.. पण एकादी कुंडी दारात, खिडकीत ठेवून चार फुलं पुजेसाठी येतील याची तसदी घेत नाही.. फूल चोरून आणण्यात गंमत वाटतही असेल पण समाधान नाही पावणार. मूलं ही लहाणपणी आंबे, बोरं चोरून खाण्यात जी मजा असते. ती मजा फूलं चोरण्यात नक्कीच नाही. अशा असमाधानाने केलेली पूजा तरी कशी लागू होईल.तेव्हा विचार करा. घरात जेष्ठ मंडळीकडून पुजेसाठी फूलं कुठून येतात याच भान घरातल्या कर्त्यांनी ठेवलं पाहिजे. त्यांना चार कुंड्या आणून द्या, झाडं लावण्यास, त्यांची काळजी घेण्यास प्रेरीत करा. तेवढचं त्यांच मनही निसर्गात रमेल. निसर्गासारखा दुसरा मित्र नाही, आनंद व मंनोरंजन देण्यासारख निस्रर्गाची दुसरी देन नाही. चार कुंड्यात झाडं लावण्यानं तेवढच टिव्हीच्या रिमोट वर कुणाचा रिमोट असावा यावरून भांडण होणार नाही. निसर्गाच्या निर्वाज्य प्रेमाने घरातही आनंद पसरले. समाधान मिळेल. चार कुंड्या घरा दारात फुलवण्यानं शुध्द हवा मिळेल, पर्यावरणासाठी काहीतरी मदत होईल. तसही कुठं कुंड्या विकत आणून आपल्याला बाग फुलवायची आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेला पालापाचोळा, नारळाच्या चार शेंड्या, वाळलेलं किचन वेस्ट नि ते भरण्यासाठी एक लिटरच्या शितपेयाच्या बाटल्या, दुधाच्या, पिठाच्या पिशवा, जूने माठ सहज वापरता येतात की.. सुरवात करा… बघा पटलं तर आम्ही आहोतच…संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. ९८५०५६९६४४, ८०८७४७५२४२

लेख आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर करा.

====================================================================

cc tmak COVER.jpg

लेखाच्या आरंभी असलेले स्वलिखीत, स्वअनुभवीत, स्वः चिंतीत असलेल्या बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन संदर्भातील मोजक्या समर्पक शव्दातीत, बागप्रेमीनी फेसबूकवर लाईक्स केलेल्या मराठी- हिंदी भाषेतील डोळे उघडणार्या व कृतीला प्रवृत्त करणार्या ६३६ बोधपर वाक्यांचा संग्रह असलेले तुम्हाला माहित आहे का? पुस्तक. फक्त २०० रू. ( पोस्ट खर्चासहित)

========================================================================

तुम्हाला माहित आहे का? पुस्तक माहिती- (PDF Download)

पुस्तक माहिती (Video)

तुम्हाला माहित आहे का? Online खरेदीसाठी लिंक पहा..

पुस्तकाबद्दलची या पूर्वी प्रकाशीत झालेली माहिती वाचा…

 

http://www.gacchivarchibaug.in

टीपः अशाच टीप्स वाचण्यासाठी व्हाट्स अप करा… 9850569644

वाचकांची प्रतिक्रिया….