”सुपीक माती म्हणजे काय, सुपिक माती कशी बनवायची, तिचे निर्देशक (indicators) काय ही सारी प्रश्न कधी ना कधी आपल्या सार्यांना बागकाम करतांना पडलेली असणारच.”

लाखो वर्षानंतर तयार (म्हणजे उत्पादक) झालेल्या जमीनीवर माणूस शेती शिकला. बियाणं पेरायचं कधी कसं, केव्हां हे म्हणजे तो उगवायला शिकला. व हे वर्षानुवर्ष सुरू राहिलं. पण त्याला आता मातीच सुपिक कशी करायची हे मोठं शिकण्याचं आवाहन त्यापुढे उभ राहिलयं. मागील शतकात जागतिक महायुध्दात वापरून उरलेली घातक रसायने वापरायची कुठे याचा मोठा प्रश्न बड्या देशातील बड्या कंपन्यांना पडला. त्यांनी ति विकसनशील देशात शेती उत्पादन वाढीसाठी वापरावयाचे ठरवले. झालं तर मग… ति वापराचे परिणाम आपण सारेच भोगत आहोत. कधी नव्हे तो मूळ प्रश्न तयार झालाय तो म्हणजे माती सुपिक कशी करायची. कधी नव्हे तो मनूष्य प्राणी आता मातीच्या नापिकतेला,सामोरा जातोय. शेतीच्या शिकण्याच्या प्रवासात हा MAN Made प्रश्न पहिल्यांदाच तयार झाला. कि मातीही नापिक होवू शकते. नि तो कामाला लागला.
जो स्वतः शेती करतो. शहरात राहून गाडग्या- मडक्यात, कुंड्यात भाज्या उगवू पहातो त्याला मातीच्या नापिकतेचा नेहमी प्रश्न पडतो.
तर सुपिक मातीची काही लक्षणं पाहू या..
१) माती वजनाला अंत्यत हलकी लागते.
२) तिला (किंवा त्यात पाणी टाकल्यानंतर) वळवाच्या पहिल्या पावसासारखा सुंगध येतो.
३) दिसायला अगदी काळी भोर, भुरभूरीत चहापत्ती सारखी वाटते.
४) बागेसाठी वापरल्यास ति उत्पादक असल्याचं लक्षात येतं.
उत्पादक माती तयार करण्यासाठीचे टप्पे,
२० टक्के लाल माती, ८० टक्के पालापाचोळा (सुका नैसर्गिक, नारळाच्या शेंड्या, उसाचे चिपाट असा कुजणारा कचरा) यांत वर्षभर भाज्या उगवणं, एकार्थाने ते कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट करणे, हे वर्षभरानंतर चाळून त्यातील जाडा भरडा अवशेष काढून टाकणे. (दुसर्या कुंडीसाठी वापरणे) या चाळलेल्या खतात कंपोस्ट खत, वर्मी कंपोस्ट खत, शेणखत (शेणखतावरील लेख वाचावा) व निमपेंड यांचे मिश्त्रण केले आहे. यातील ओलावा टिकावा म्हणून देशी गायीचे गोमूत्र, जिवामृत टाकले जाते. वरील सार्या प्रक्रियेत विविध प्रकारचे जीवाणूंचे संवर्धन होते त्यांचा मातीतील अस्तित्व वाढते.
अशी ही उत्पादक खत विक्रीसाठी उपलब्ध आहे. (५ किलो पॅकींग-१००रू.)
लेख आपणास उपयोगी, इतरांना उपयुक्त वाटल्यास नक्कीच लाईक व शेअर करा.
गच्चीवरची बाग, नाशिक.
9850569644
http://www.gacchivarchibaug.in
संदीप चव्हाण नाशिक.