बरीच मंडळी आपल्या घराच्या, बंगल्याच्या आवारात, शेतावर, फार्महाऊस येथे नारळाचे झाडे लावतात. काही खोबर्याचे नारळ असते कर काही पाणीदार शहाळ देणारं नारळं असतात. यांना येणारी नारळं ही वेळेवर काढली गेली तर त्याचा उपयोग होतो. रोज उपयोग करण्यायोग्य अनेक गोष्टीही असतात. बर्याच मंडळीना एकतर रोज काय उपयोग करायचा हे ठावूक नसत किंवा कुटुंबातील संख्या कमी असल्यामुळे त्याची विक्रीपण करतात.
पण घरीच नारळ किंवा शहाळाचा उपयोग करत असतील तर त्याचा कचरा फार तयार होतो. ही ओली शहाळं व सुक्या नारळांच्या कचर्याचं काय करायचं हे सांगणारा हा लेख…
सुकी नारळ असतील तर ते हॅंड ऑपरेटेड मशीन ते सोलून घ्यावे. त्यातील पाणी काढता आले तर उत्तम. बरेचदा त्यातील खोबरे काढणे जरा वेळखाऊ व जिकरीचे असते. यावर उपाय आहे. त्या दोन वाटयांना उपडेच उन्हाच्या दिशेने ठेवा. कालातंराने नारळाच्या टणक भागापासून खोबरे सहजतेने बाजूला करता येते.
सुक्या नारळाच्या शेंड्या, सुकी शहाळं ही तुकडे करून कुंड्या भरतांना तळाशी वापरा किंवा एरिओ ब्रिक्स कंपोस्टींग अथवा एरिओ ब्रिक्स बेड पधद्तीत तळाशी वापरा म्हणजे वर्षभराने ते कुजून जातात.
ओली शहाळं असल्यास त्याचे व्यवस्थापन वेगळ्या पध्दतीने करावे लागते.
आपल्याकडे फार्म हाऊस असल्यास किंवा शेतातील जमीन पुरता येतात. त्यासाठी ओल्या शहाळात, शेण, ओली माती भरावी. व हे उलटे करून ठेवावेत. व मातीने झाकून टाकावेत. व विसरून जावे म्हणजे कालांतराने म्हणजे वर्षभरात याचे जमीनीत छान खतात रूपांतर होते.
आपल्याला त्याचे घरीच व्यवस्थापन करावयाचे असल्यास त्याला खालील प्रमाणे उपाय करता येतील.
त्याचे तुकडे करा. वाळवून घ्या, कंपोस्ट हौदात, ड्रम मधे त्याचे खत तयार करता येईल.
तुकडे करून वाळवून घेतल्यास त्याचा इंधन अथवा शेकोटी म्हणून वापर करा.
बागेत कुंड्या किंवा वाफा भरण्यासाठी त्याचा वापर करा.
ही शहाळं वाळल्यानंतर त्याचा रोपे लावण्यासाठी उपयोग करा.
त्याचे कोकोपीट तयार करता येईल. पण त्यासाठी घरगुती श्रेंडींग मशीनची गरज लागेल.
काय तुम्ही आजही कोकोपीठ वापरताहेत… का? याचा नेमका फायदा तोटा सांगणारा हा लेख… व त्या ऐवजी नेमंक काय वापरावं….
COCO-PITH : GAIN & LOSSES
कोकोपीटला पर्याय बिशकॉम बद्दल वाचा..
कोकोपीठ का नको…
प्रथम कोकोपीठ म्हणजे काय ते समजून घेवू. कोकोपीठ म्हणजे नारळाच्या शेंड्यामधून धागे वेगळे केल्यानंतर जो भूसा उरतो तो भाग म्हणजे कोकोपीठ होय. कोकोपीठचा वापर पॉटींग मिस्क म्हणून करण्याची प्रचलीत पध्दत आहे. तर बाग आणि कोकोपीठ याचा इतका सहसंबध असतांना हा मुद्दा येथे व तेही वापरू नये अशा अर्थाने चर्चिणे जरा आश्चर्यकारक वाटेल. पण यावर कुणीही सहसा चर्चा करत नाही. कारण त्याची बाजारातील सहज उपलब्धता, त्याची मौखीक जाहिरात, कौतुक पहाता व विशेष म्हणजे त्याला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे त्यावर सहसा कोणी बोलत नाही. पण त्याचे परिणाम खूप काही उत्तम नाही. असे तरी अभ्यासातून जाणवले आहे. खरचं दुसरा पर्याय नाही का.. आणि त्याचा नेमका उपयोग कुठे कसा केव्हा का करावा. हे समजून घेवूया..
तर कोकोपीठ हे स्वतः काही खत नाही. कुंडीतील, वाफ्यातील पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेले माध्यम आहे. कारण माती खूप काळ पाणी धरून ठेवत नाही कुंडीत ओलावा राहावा म्हणून वापरले जाते. खरे तर कोकोपीठ हे भाजीपाल्याची रोपे तयार करतांना वापरले जाते. कारण रोपे तयार करतांना त्याला योग्य ओलावा देणे, बियासोबत तण उगवून न येणे, त्याच्या सोबत द्राव्य खतांचे समायोजन होणे व एवढेच काय ते अंगभूत गुण आहेत. त्यामुळे त्याचा बियांपासून रोपे तयार करतांना अथवा रोपे तयार करणार्या नर्सरीत वापर योग्य आहे. पण त्याचा वापर कुंड्याभरण्यासाठी पॉटींग मिक्स म्हणून केला तर झाडे अधिक पाण्याने मरतात. मुळांना पाण्याचा संसर्ग होतो अथवा अधिक ओलावा, पाण्यामुळे कुजतात. वाढलेले तापमान व कुंडीतील पाणी याचे विषम परिणाम झाले की झाडांची मुळे शिजतात. पर्यायाने झाडे दगावतात. खरे तर कुंड्याच्य मुळाशी योग्य प्रमाणात ओलावा असावा. ओलावा व खेळ्त्या हवे मुळे योग्य प्रमाणात वाफसा तयार होतो. व झाडांची मुळे हे वाफ (गंध) स्वरूपात अन्न ग्रहन करतात. फुलांचा गंध आला की आपले मन ताजे तवाणे होते, व्हिक्सची वाफ घेतल्यावर बरे वाटते. तसेच झाडांनाही गंधरूपी वाफसातून अन्न घेतात. त्यासाठी बाग फुलवतांना स्थानिक नैसर्गिक संसाधनाचा ( नारळ शेंड्या, पालापाचोळा) वापर करणे हे कधीही चांगले. कारण त्याच्या वापरामुळे स्थानिक कचर्याचे व्यवस्थापन तर होतेच. शिवाय त्याच्या दूरस्थ वाहतूकीत जो काही खर्च होतो तो वाचतो. प्रदुर्षणामुळे पर्यावरणाची, संसाधनाची जी काही हानी होते ती आज व यापुढे परवडणारी नाही. तसेच कोकोपीठ बनवतांना बरेचदा त्यास भिजवून ठेवले जाते. त्याचा अर्क हा बाय प्रोडक्ट म्हणून इतर उत्पादनात त्याचा वापर होतो म्हणजे एकार्थाने निसत्व असलेला चौथा आपल्या पदरात पडतो. त्यामुळे कोकोपीठचा वापर झाडे जगवण्यासाठी करू नये… आता… कोकोपीठ वापरावयाचे नाही.. मग काय वापरायचे हा प्रश्न येणारच…
तर कोकोपीठ ऐवजी नारळाच्या शेंड्या वापराव्यात. कारण नारळाच्या शेंड्या मधे नैसर्गिक खताचे घटक तसेच राहतात. त्याचा थेट उपयोग मुळांना होतो. तर नारळाच्या शेंड्या या जत्रेत, यात्रेत देवळात, किराणादुकानात, खोबर्यापासून मिठाई तयार करणार्या कारखाण्यात सहज मिळते. नारळाच्या शेंड्या या पाणी तर धरून ठेवतातच. पण त्यातील धाग्यामुळे त्यात जो काही पोकळ पणा राहतो त्यामुळे हवा खेळती राहते. कारण कुंडीत नारळाच्या शेंड्या टाकल्यातर पाण्याचा निचरा तर होतोच. पण कुंडीतील वायू विजनास मदत होते. शिवाय त्यात गांडूळे निवास करतात. ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता असल्यामुळे पाण्याचा ताण वाढला तरी गांडूळे जगतात. वर्षभराने या नारळाच्या शेड्या कूजून जातात. व माती हलकी होण्यास मदत होते. नारळाच्या शेंड्या कुंडीच्या तळाशी वापरल्या तर विटांचे तुकडे वापरायची गरज पडत नाही. कुंडी वजनाला हलकी होते. मातीत कोकोपीठ हे पॉटींग मिक्स म्हणून वापण्यापेक्षा पालापाचोळ्याचा चुरा वापरावा. आम्ही पालापोचोळ्याचा चुरा करून त्यास जिवामृत व गोमुत्रात अंबवून वाळवून त्याचा (Bishcom) वापर केल्यास त्यातून नैसर्गिक खत मिळते. रोपांची, भाजीपाल्याची वेगाने व उत्तम वाढ होते. तसेच वर खत म्हणून त्याचा वापर करता येतो.
बरेचदा नारळाच्या शेंड्याही नाही मिळाल्या तर बोटाएवढ्या जाडीच्या वाळलेल्या काड्या तळाशी वापरता येतातच त्याही नाही मिळाल्या तर रसळ नारळाच्या फांद्याचे धारधार कोयत्याने शेंडी एवढ्या आकाराचे तुकडे तयार करावेत. त्यांचा सुध्दा उत्तमप्रकारे परिणाम पहावयास मिळतो. कारण त्यामधेही तंतुमयता असल्यामुळे नारळाच्या शेंडी सारखेच काम करते. घरच्या घरी बियाणं रूजवण्यासाठी हमखास कोकोपीठचा वापर करावा. बियाणं निव़ड व रूजवण पुढील भागात…
You must be logged in to post a comment.