COCO-PITH : GAIN & LOSSES

 

कोकोपीटला पर्याय बिशकॉम बद्दल वाचा..

कोकोपीठ का नको…

प्रथम कोकोपीठ म्हणजे काय ते समजून घेवू. कोकोपीठ म्हणजे नारळाच्या शेंड्यामधून धागे वेगळे केल्यानंतर जो भूसा उरतो तो भाग म्हणजे कोकोपीठ होय. कोकोपीठचा वापर पॉटींग मिस्क म्हणून करण्याची प्रचलीत पध्दत आहे. तर बाग आणि कोकोपीठ याचा इतका सहसंबध असतांना हा मुद्दा येथे व तेही वापरू नये अशा अर्थाने चर्चिणे जरा आश्चर्यकारक वाटेल. पण यावर कुणीही सहसा चर्चा करत नाही. कारण त्याची बाजारातील सहज उपलब्धता, त्याची मौखीक जाहिरात, कौतुक पहाता व विशेष म्हणजे त्याला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे त्यावर सहसा कोणी बोलत नाही. पण त्याचे परिणाम खूप काही उत्तम नाही. असे तरी अभ्यासातून जाणवले आहे. खरचं दुसरा पर्याय नाही का.. आणि त्याचा नेमका उपयोग कुठे कसा केव्हा का करावा. हे समजून घेवूया..

तर कोकोपीठ हे स्वतः काही खत नाही. कुंडीतील, वाफ्यातील पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेले माध्यम आहे. कारण माती खूप काळ पाणी धरून ठेवत नाही कुंडीत ओलावा राहावा म्हणून वापरले जाते. खरे तर कोकोपीठ हे भाजीपाल्याची रोपे तयार करतांना वापरले जाते. कारण रोपे तयार करतांना त्याला योग्य ओलावा देणे, बियासोबत तण उगवून न येणे, त्याच्या सोबत द्राव्य खतांचे समायोजन होणे व  एवढेच काय ते अंगभूत गुण आहेत. त्यामुळे त्याचा बियांपासून रोपे तयार करतांना अथवा रोपे तयार करणार्या नर्सरीत वापर योग्य आहे. पण त्याचा वापर कुंड्याभरण्यासाठी पॉटींग मिक्स म्हणून केला तर झाडे अधिक पाण्याने मरतात. मुळांना पाण्याचा संसर्ग होतो अथवा अधिक ओलावा, पाण्यामुळे कुजतात. वाढलेले तापमान व कुंडीतील पाणी याचे विषम परिणाम झाले की झाडांची मुळे शिजतात. पर्यायाने झाडे दगावतात. खरे तर कुंड्याच्य मुळाशी योग्य प्रमाणात ओलावा असावा. ओलावा व खेळ्त्या हवे मुळे योग्य प्रमाणात वाफसा तयार होतो. व झाडांची मुळे हे वाफ (गंध) स्वरूपात अन्न ग्रहन करतात. फुलांचा गंध आला की आपले मन ताजे तवाणे होते, व्हिक्सची वाफ घेतल्यावर बरे वाटते. तसेच झाडांनाही गंधरूपी वाफसातून अन्न घेतात. त्यासाठी बाग फुलवतांना स्थानिक नैसर्गिक संसाधनाचा ( नारळ शेंड्या, पालापाचोळा) वापर करणे हे कधीही चांगले. कारण त्याच्या वापरामुळे स्थानिक कचर्याचे व्यवस्थापन तर होतेच. शिवाय त्याच्या दूरस्थ वाहतूकीत जो काही खर्च होतो तो वाचतो. प्रदुर्षणामुळे पर्यावरणाची, संसाधनाची जी काही हानी होते ती आज व यापुढे परवडणारी नाही. तसेच कोकोपीठ बनवतांना बरेचदा त्यास भिजवून ठेवले जाते. त्याचा अर्क हा बाय प्रोडक्ट म्हणून इतर उत्पादनात त्याचा वापर होतो म्हणजे एकार्थाने निसत्व असलेला चौथा आपल्या पदरात पडतो. त्यामुळे कोकोपीठचा वापर झाडे जगवण्यासाठी करू नये… आता… कोकोपीठ वापरावयाचे नाही.. मग काय वापरायचे हा प्रश्न येणारच…

तर कोकोपीठ ऐवजी नारळाच्या शेंड्या वापराव्यात. कारण नारळाच्या शेंड्या मधे नैसर्गिक खताचे घटक तसेच राहतात. त्याचा थेट उपयोग मुळांना होतो. तर नारळाच्या शेंड्या या जत्रेत, यात्रेत देवळात, किराणादुकानात, खोबर्यापासून मिठाई तयार करणार्या कारखाण्यात सहज मिळते. नारळाच्या शेंड्या या पाणी तर धरून ठेवतातच. पण त्यातील धाग्यामुळे त्यात जो काही पोकळ पणा राहतो त्यामुळे हवा खेळती राहते. कारण कुंडीत नारळाच्या शेंड्या टाकल्यातर पाण्याचा निचरा तर होतोच. पण कुंडीतील वायू विजनास मदत होते. शिवाय त्यात गांडूळे निवास करतात. ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता असल्यामुळे पाण्याचा ताण वाढला तरी गांडूळे जगतात.  वर्षभराने या नारळाच्या शेड्या कूजून जातात. व माती हलकी होण्यास मदत होते.  नारळाच्या शेंड्या कुंडीच्या तळाशी वापरल्या तर विटांचे तुकडे वापरायची गरज पडत नाही. कुंडी वजनाला हलकी होते. मातीत कोकोपीठ हे पॉटींग मिक्स म्हणून वापण्यापेक्षा पालापाचोळ्याचा चुरा वापरावा. आम्ही पालापोचोळ्याचा चुरा करून त्यास जिवामृत व गोमुत्रात अंबवून वाळवून त्याचा (Bishcom) वापर केल्यास त्यातून नैसर्गिक खत मिळते. रोपांची, भाजीपाल्याची वेगाने व उत्तम वाढ होते. तसेच वर खत म्हणून त्याचा वापर करता येतो.

बरेचदा नारळाच्या शेंड्याही नाही मिळाल्या तर बोटाएवढ्या जाडीच्या वाळलेल्या काड्या तळाशी वापरता येतातच त्याही नाही मिळाल्या तर रसळ नारळाच्या फांद्याचे धारधार कोयत्याने शेंडी एवढ्या आकाराचे तुकडे तयार करावेत. त्यांचा सुध्दा उत्तमप्रकारे परिणाम पहावयास मिळतो. कारण त्यामधेही तंतुमयता असल्यामुळे नारळाच्या शेंडी सारखेच काम करते. घरच्या घरी बियाणं रूजवण्यासाठी हमखास कोकोपीठचा वापर करावा. बियाणं निव़ड व रूजवण पुढील भागात…

संदीप चव्हाण. गच्चीवरची बाग नाशिक. 9850569644 / 8087475242

एकदा भेट द्या… गच्चीवरील भाजीपाल्याची बाग….

BISHCOM
alternative for Cocopith