
Seedling Soil blocks
Seedling Soil blocks हे एक वैशिष्टपूर्ण असे बियाणं उगवण्यासाठीचे उत्पादन आहे.
बरेचदा मातीतील सामू (PH) बदलल्यामुळे बियाणे उगवत नाही. अथवा एकाच प्रकारच्या जिवाणू वा विषाणूंची संख्या वाढल्यामुळे बियाणं त्यांना बळी पडतात. अर्थात बियाणं रूजवून यावयास अनेक प्रकारची कारणे असली तरी त्यात मानवी हस्तक्षेपामुळे बियाणं येत नाही.
कोणतही बियाणं उगवून येण्यास त्यास योग्य ओलावा, वाफसा, तापमानाची गरज असते. गच्चीवर वाफ पध्दतीत भाज्या घेतांना आपल्याला सातत्याने बियाणांपासून रोपे तयार करणे गरजेचे असते. अशा बियाणं उगवण्यासाठी Seedling Soil blocks हे खूपच परिणाम कारक पणे काम करतांना दिसून आले आहे.
यात आम्ही BISHCOM या मटेरियल चा बारिक भुसा घेवून त्यास योग्य तो दाब देवून दोन इंच उंचीचे Seedling Soil blocks तयार केले जातात. याचे वैशिष्टय खालील प्रमाणे
- यात कोणतेही तण उगवून येत नाही.
- त्यात खताचे योग्य ते पोषण असल्यामुळे बियाणांस योग्य तो खताचा पुरवठा होतो.
- योग्य प्रमाणात वाफसा, तापमान व ओलावा धरून ठेवण्याची क्षमता असते.
- हे Seedling Soil blocks मधे रूजलेले बियाणे आपण सहतेने दुसर्या मातीत मुळांना धक्का न लावता लागवड करू शकता.
- बिजापासून रोप तयार झाल्यावर लगेच लागवड करण्याची वा सारखं लक्ष देण्याची गरज नाही.
हे Seedling Soil blocks विक्रीसाठी उपलब्ध आहेत. खरेदी करण्यापूर्वी वापरून पाहण्यासाठी SAMPLE GIFT न विसरता घेवून जा..
गच्चीवरची बाग, नाशिक.